भुभु आणि माऊ बाळांच्या गंमती जमती ३

Submitted by आशुचँप on 25 March, 2025 - 12:02

bhubhumau.jpg

आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.

हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे

या आधीच्या ग्ंमती जमती इथे वाचता येतील

२. https://www.maayboli.com/node/82073

१. https://www.maayboli.com/node/77227

==================================================================

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>>>>कुत्री जेव्हा पुर्ण रिलॅक्स असतात तेव्हाच असे पाठीवर झोपतात.
मांजरे, कुत्री पाठीवर लोळत, आपल्याला जेव्हा पोट दाखवितात तेव्हा समजावे की त्यांनी आपल्यावर पूर्ण विश्वास टाकलेला आहे. इट इज अ सेफ स्पेस फॉर देम.

हाहा सिंबा सिली बॉय Happy
लेटेस्ट ती गोल्डन रिट्रिवर ची बातमी पाहिली की नाही. एका बंद घरात इन्ट्रुडर घुसला. घरात उचकापाचक केली, फूड घेऊन खाल्ले, नॅप पण घेतली. त्यांचा गोल्डन घरात होता. तो अजिबात भुंकला वगैरे नाहीच उलट तीन वेळा त्या चोराकडे जाऊन चल खेळु म्हणून त्याला टॉय दिले Lol
मालक बाहेर होते त्यांनी हे सर्व रिंग कॅमेर्‍यात पाहिले ( डोक्याला हात लावला असेल) आणि पोलिस बोलावले, पोलिस आल्यावर त्यांचे देखेल या गोल्डन ने टॉय देऊन स्वागत केले Happy
अशा रितीने गार्ड डॉग म्हणुन सपशेल नापास झाला बिचारा स्वीट डॉग Happy मिडियावर त्याचे इन्तरव्ह्यू व्हायरल झालेत Happy

हो मी पण वाचलं.किती गोड असेल ते कुत्रं. आमच्या घरचे म्हटले की त्याचे मूळ मालक त्याला वेळ आणि प्रेम देत नसतील म्हणून बिचारं आल्या गेल्याकडे खेळणं घेऊन जात असेल.

मूळ मालक त्याला वेळ आणि प्रेम देत नसतील म्हणून बिचारं आल्या गेल्याकडे खेळणं घेऊन जात असेल.... हेच मनात आले. तसेही लॅब आणि रिट्रिवर हे संरक्षण करण्याचे नाहीत.

आमची लॅब्राडूडल बेल वाजली की आधी जिन्याच्या वरच्या लॅंडींगकडे पळते मग तिथून सुरक्षित अंतरावरुन भुंकणे चालू करते Lol

आमच्या घरचे म्हटले की त्याचे मूळ मालक त्याला वेळ आणि प्रेम देत नसतील >>> उलट असण्याची जास्त शक्यता आहे. Happy म्हणजे घरच्यांशी नेहमी तसे खेळायची सवय असल्यामुळे इन्ट्रुडर शी तसेच वागला असेल. कुत्र्यांना सवय असते खेळणे आणून पायाजवळ ठेवायचे अन म्हणायचे खेळा! गोल्डन तसेही फ्रेन्डली असतात फार.

हो, असू शकेल.मूळ ब्रीडच प्रेमळ दिसतेय. तसंही कुत्री मांजरं आणि लहान मुलं अन प्रेडीक्टएबल वागू शकतात.

Pages

नवीन प्रतिसाद लिहा