भुभु आणि माऊ बाळांच्या गंमती जमती ३

Submitted by आशुचँप on 25 March, 2025 - 12:02

bhubhumau.jpg

आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.

हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे

या आधीच्या ग्ंमती जमती इथे वाचता येतील

२. https://www.maayboli.com/node/82073

१. https://www.maayboli.com/node/77227

==================================================================

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तो बरोबर दहा वाजता घुटमळतो क्रेटपाशी हे म्हंटले की निघतो, कधीकधी वाट पाहतो कमांडची..... अस्मिता, तू जावे हे लिहिलंस त्याच्याबरोबर आदल्या दिवशी मी एक रील पाहिलं होतं त्याच्यात एका जर्मन शेफर्डने झाडाची फांदी दातात पकडली होती.एक मुलगी ती फांदी वाकवायचा प्रयत्न करत होती.2 वेळ तिने फांदी जमिनीपर्यंत वाकवली.कुत्र्याने फांदी सोडली नाही. बिचारा कुत्रा फांदीला लटकत होता आणि कुई कुई ओरडत होता.व्हिडिओ काढणाऱ्या व्यक्तीने शेवटी त्यांच्या भाषेत कमांड दिली त्याबरोबर त्याने फांदी सोडली कमांडसाठी बिचारा थांबला होता.रीलसाठी कोणत्या थराला ही मंडळी जातात देव जाणे.

देवकी मुक्या प्राण्यांच्या दुर्बळतेचा गैरफायदा हा जो मुद्दा मी मांडलेला त्यात हा प्रकार मोडतो. फार छळ मांडतात लोकं. का तर ते मुके प्राणी आज्ञाधारक असतात, बोलू शकत नाहीत.

आधी जरा रिक्षा फिरवून घेतो -
मी वाचलेले पुस्तक - ४ धाग्यावर एक ब्रिटिशकालीन १९३७ मध्ये प्रकाशित डिरेक्टरी (सिविल लिस्ट ऑफ इंडिया अँड बर्मा) वाचतोय त्यात कैक मजेशीर गोष्टी वाचण्याची मौज येते आहे.

आता मुख्य काम -
त्याच डिरेक्टरी मधे केनेल क्लब ऑफ इंडिया (सन १९३७) ची जाहिरात आहे

IMG-20260719-WA0041.jpg

जाहिरात म्हणते की तुमचा डॉगी पेके किंवा ग्रेट डेन असेल पण त्याची पेडिग्री महत्वाची आहे, तेव्हा तुम्ही आम्ही पुरवलेले फॉर्म विकत घ्या (द सिव्हिल अँड मिलिटरी गॅझेट लिमिटेड, पोस्ट बॉक्स क्र. ३६, लाहौर, पंजाब ह्यांच्याकडून) आणि तो नीट भरून आम्हाला पाठवा (म्हणजे आम्ही त्याची नोंद करून ठेवू) किंमत रूपये एक फक्त (२५ फॉर्म दस्त साठी).

Pages