भुभु आणि माऊ बाळांच्या गंमती जमती ३

Submitted by आशुचँप on 25 March, 2025 - 12:02

bhubhumau.jpg

आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.

हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे

या आधीच्या ग्ंमती जमती इथे वाचता येतील

२. https://www.maayboli.com/node/82073

१. https://www.maayboli.com/node/77227

==================================================================

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओडिन छान आहे मजेत आहे
आता पूर्वीसारखा मस्ती जास्त नाही करत
कॅनाल ला जातो तिकडे एक भुभिने 7 8 पिल्ले दिली आहेत ती भुभीपण पांढरी शुभ्र आहे आणि आम्ही तिकडून गेलो की ती पिल्ले आई समजून त्याच्या मागे मागे पळत येतात, तो बिचारा इतका गरीब आहे की कधीच त्या पिलांना ओरडत नाही, ती उड्या मारून मारून त्याला छळतात तरी
फक्त आम्ही म्हणजे मी आणि पोरगा त्याना खायला घेऊन गेलो तर ओडिन पण त्यांच्यात बसून त्याचा शेअर खातो

एक मांजर पण भेटले आहे मन्या नाव त्याचे
त्याच्या गमतीजमती सांगतो नंतर

Pages