Submitted by धनि on 7 April, 2026 - 09:25
२००० होऊन गेले म्हणून नवीन धागा.
मागच्या धाग्याची लिंक
https://www.maayboli.com/node/87006?page=66
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
The Odyssey खूप आवडला. ट्रेलर
The Odyssey खूप आवडला. ट्रेलर आल्यापासून IMAX मध्येच पहायचा हे ठरवले होते. पहिल्या आठवड्याची तिकिटे खूप आधीच संपलेली होती त्यामुळे दुसऱ्या आठवड्यात पाहिला. आणि IMAX मध्ये बघण्याचे सार्थक झाल्यासारखे वाटले. एकदम सुंदर चित्रीकरण आणि कसदार अभिनय झाला आहे सगळ्यांचा.
सगळे युद्ध आणि इतके थरारक प्रसंग एकदम अंगावर येतात पण त्याचबरोबर त्यांचे सगळ्यांचे क्लोज अप शॉट्स पण खूप परिणामकारक वाटतात. चेहऱ्यावर बदलणारे भाव मनात चालणारा गोंधळ सुंदरपणे दाखवतात.
मागे एक गोष्ट ऐकलेली - चित्रपट मोठ्या पडद्यावर चांगला दिसावा असे वाटत असेल तर भरपूर लाँग शॉट्स - जे थरारक असतील आणि मग एकदम क्लोज अप्स - जे नाट्य दाखवतील असा संगम झाला तर तो मोठ्या पडद्यावर बघायला हवा असे वाटते. नोलनला ते बरोबर कळलेले आहे.
पटकथा एकदम गोळीबंद वाटली. कुठेच विचार करायला वेळ न देता प्रसंग पुढे सुरू राहतात. नोलनच्या आवडीनुसार एका सरळ रेषेत कथानक न जाता मध्ये मध्ये फ्लॅशबॅक येऊन त्यात कथा पुढे सरकते. शेवट एकदम जबरदस्त वाटतो. डायलॉग नवीन इंग्लिश मध्ये आहेत म्हणून काही लोकांची टीका कानावर आलेली आहे पण पिक्चर बघताना अजिबात खटकले नाही. उलट बोजड भाषा नसल्याने सगळे समजायला सोपेच झाले.
********* Spoilers *********
ट्रॉय च्या युद्धाचा प्रसंग छोटाच असला तरी अंगावर येणारा आहे. लहानपणापासून विचार होता की त्या घोड्यात सैनिक कसे बसले असतील. यात त्यांना किती हाल झाले असतील ते दाखवले आहे.
सरसीच्या बेटावर सहाय्यक अभिनेत्यांनी खूप मस्त अभिनय केलेला आहे. तिने दिलेले अन्न खायचे नाहीये, पोट भरलेले आहे पण तरीही ते खातोच आहे हे काय भारी त्यांच्या चेहऱ्यावर दिसते.
फार चर्चा झालेली नसलेले पण मला ज्यांचा अभिनय आवडला ते म्हणजे जॉन लेगुझामो आणि हिमेश पटेल. हिमेश पटेलने ओडिसस चा उजवा हात अप्रतिमपणे साकारला आहे. सुरुवातीला सगळे ऐकणारा पण मग हळू हळू ऐकेनासे होणारा सहकारी त्याच्या बोलण्यातून आणि अभिनयातून चपखल दिसतो.
जो मिळेल त्यातल्या त्यात सगळ्यांत मोठ्या पडद्यावर बघा.
मलाही हिमेश पटेलचे काम भारी
@ओडिसी-
मलाही हिमेश पटेलचे काम भारी वाटलं धनि, खरेतर रॉबर्ट पॅटिन्सन पेक्षा तो जास्त वेळ आहे आणि तो जास्त लक्षात राहतो. ओडिसियस वर त्याचा संपूर्ण विश्वास आणि नंतर प्रतारणेच्या भावनेने आलेला संताप आणि चुकीचे निर्णय - हे फार छान दाखवलं आहे. ट्रॉयचा प्रसंग काटा आणतो. शेवटचं स्वयंवर रामायणाची आठवण करून देते. अगदी प्रत्यंचा लावण्यापासून. हे मी लिहायला विसरले. आपली सगळी माणसं आपल्यामुळे किंवा आपल्यासाठी लढताना मेली म्हणून तो प्रचंड अस्वस्थ असतो. अर्जुनविषाद योगच आहे वेगळा, अपराधबोधाचा. पण म्हणून "सूटर्स" ( पेनलपीला आलेली वर्षानुवर्षे यांच्या राजाश्रयाचा फायदा- झूसच्या मते पण अतिथी देवो भव होते हेही- घेणारी स्थळं) यांना क्षमाबिमा करत नाही. तेथेही योग्य तेच करतो. ओडिसियस म्हणजे शौर्य आणि धैर्य याचे पालन करणारा हे अगदी पटते.
होमरच्या ओडिसियस आणि इलियाद मधे सगळ्या मानवी भावना आणि प्रसंग येऊन गेले आहेत असे म्हणतात. जगातील सगळ्या कथांचे बीज कुठेनकुठेतरी याच दोन महाकाव्यांत येतं आणि हेच फक्त ओरिजनल आहे असे वाचलेय. अगदी त्यामुळे "व्यासोच्छिष्टं जगत् सर्वम्" हेच आठवले. म्हणून होमरला ती उपमा दिली.
कॉमी, मला ॲन उत्तम अभिनेत्री वाटते. पण येथे सतत आधुनिक वाटत होती. तिचा नैसर्गिक लूक मुळात ओल्ड फॅशन्ड नाही. चेहरा वगैरे. मला मॅटचे काम सर्वोत्तम वाटले. भावनांचे सगळे चढउतार त्याला दाखवता आले आहेत. तो सतत योद्धाही नाही, पश्तातापदग्ध आहे, प्रतिक्षेत आहे, स्मृती गेली आहे तरी सतत कसली तरी ओढ आहे, काही तरी खुणावत आहे. ती तगमग चांगली दाखवली आहे. तेवढा वावही त्या भूमिकेत होता.
शेवटचं स्वयंवर रामायणाची आठवण
शेवटचं स्वयंवर रामायणाची आठवण करून देते >> अगदी अगदी.
प्रत्यंचा लावणे तर अगदी तेच वाटते.
मला तरी ऍन चे काम आवडले. पॅटीसन पण भारी आहे. यात तो एकदम चत्रा माणूस चेहऱ्यावरूनच दिसतो. त्याने ते लोचट भाव बरोबर पकडलेले आहेत.
नेफीवर रन (२०२०) पहिला.
नेफीवर रन (२०२०) पहिला. पायाने अधू असलेल्या एका मुलीला ती घेत असलेल्या औषदाबद्दल शंका येते. मग ती उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करते. जबरदस्त खिळवून ठेवणारा, सुरवातीपासून शेवटपर्यंत थरार.
नेटफ्लिक्स - "वध". खूप रेको
नेटफ्लिक्स - "वध". खूप रेको ऐकूनही पाहायचा राहिला होता. मस्त पिक्चर आहे. संजय मिश्रा, नीना गुप्ता, पांडेचे काम केलेला आणि पोलिस एसपी - चौघांची कामे मस्त. पण मुख्य लीड जोडी - संजय मिश्रा आणि नीना गुप्ताने- फारच सुंदर काम केले आहे. पहिल्या फ्रेमपासून पिक्चर एंगेज करतो.
आता दुसरा भागही पाहायचा आहे.
वध बघायचा आहे.
वध बघायचा आहे.
आता दुसरा भागही पाहायचा आहे.
आता दुसरा भागही पाहायचा आहे.
>>
ऑफिशिअल मराठी रीमेक पण बघ- देवमाणूस
मुख्य जोडी ममा अन् रेणुका शहाणे, पोलिस सुभा
ऑडेसी बघुन आलो. नोलन!
ऑडेसी बघुन आलो. नोलन!
भन्नाट बनवला आहे. ट्रोजन हॉर्स म्हणजे मला खाली चाकं लावलेला घोडा, ज्यात प्रत्येक पायात एक अशी एक फारतर चार माणसं उभी रहातील असं काही वाटलेलं. हा इथला ट्रोजन हॉर्स आणि खचाखच, हालाखित आणि शब्दशः ठोकरा खाणारे सैनिक, समुद्रावरचे सीन तर निव्वळ अप्रतीम आहेत. सद्या मॅट डेमन आणि टॉम हॉलंडच्या इतक्या मुलाखती ऐकल्या आहेत की अनेक प्रसंगात, अरे यात हे झालेलं. हे डॉल्फिन दिसले तर खरंच सायटिंग झालेलं असं होत असल्याने आणखीनच जोडला जाऊन भारी वाटलं.
वेगवान, आणि दृष्यांची रेलचेल असलेला, आजच्या इंग्रजी भाषेचा वापर केला असल्याने आणखी आवडला.
/बाहुबली आदिपुरूष, विरूद्ध
रामायण, आदिपुरूष, विरूद्ध ओडेसी /बाहुबली/ अवतार
https://www.youtube.com/watch?v=Z2Y3qrORrR8
असोका नावाचा एक पिक्चर शाहरूखखानने बनवला होता. बडे स्टार्स आहेत आणि खरी खुरी ऐतिहासिक व्यक्तिरेखा आहे म्हणून बघायचा प्रयत्न केला होता. ना कथा विश्वासार्ह वाटली, ना कथा सांगण्याची पद्धत, ना प्रसंग. काहीच्या काहीच. ज्याला कुणाला हा पिक्चर संपूर्ण बघता आला त्याला पद्मपुरस्काराने सन्मानित करावं. यापेक्षा पूर्वीच्या काळी शाहू मोडकचे रामायण वगैरे सिनेमे यायचे. रविवारी सकाळचा शो असायचा. ते चांगले होते. तंत्र मागास असलं तरी.
हो, त्यात ते "आ तयार हो जा"
हो, त्यात ते "आ तयार हो जा" असं गाणं आहे. ते टीव्हीवर पाहुन त्या पिरियड ऐवजी १९६०-७० मधील व्हिलनच्या अड्ड्यावरील गाणे टाईप फिल आला होता, त्यामुळे पहावासा वाटला नाही.
व्हिलनच्या अड्ड्यावरील गाणे >
व्हिलनच्या अड्ड्यावरील गाणे >>
ओडिसीचे विनोदी रूपांतर "ओ
ओडिसीचे विनोदी रूपांतर "ओ ब्रदर व्हेअर आर्ट दाऊ" पाहतोय. मजेशीर आहे. जॉर्ज क्लूनी युलिसिस उर्फ ओडिस्यसच्या भूमिकेत.
हो, त्यात ते "आ तयार हो जा"
हो, त्यात ते "आ तयार हो जा" असं गाणं आहे. ते टीव्हीवर पाहुन त्या पिरियड ऐवजी १९६०-७० मधील व्हिलनच्या अड्ड्यावरील गाणे टाईप फिल आला होता, त्यामुळे पहावासा वाटला नाही.>> +११११११
असोका मधेच 'Drinking and driving is injurious to health' - मदिरा पीकर बैलगाडी नही चलानी चाहिये हा उदात्त संदेश आहे
असोकाच्या शांतीच्या संदेशापेक्षा त्या चित्रपटात तोच जास्त लक्षात राहिला!
ज्याला कुणाला हा पिक्चर
ज्याला कुणाला हा पिक्चर संपूर्ण बघता आला त्याला पद्मपुरस्काराने सन्मानित करावं. >>>> थिएटर ला बघितला होता. पुरस्कार घ्यायला कोठे येऊ?

गाणी छान आहेत त्या सिनेमातली. रात का नशा ऐकून आजही घाम फुटतो.
असोका पाहिला आहे. फारसा
असोका पाहिला आहे. फारसा लक्षात नाही. काही खास वाटला नव्हता इतके लक्षात आहे.
ओडिसीचे विनोदी रूपांतर "ओ ब्रदर व्हेअर आर्ट दाऊ" पाहतोय. मजेशीर आहे. जॉर्ज क्लूनी युलिसिस उर्फ ओडिस्यसच्या भूमिकेत. >>> ओह हा संदर्भ माहीत नव्हता. या पिक्चरबद्दल ऐकले आहे. पाहायचा आहे. जॉर्ज क्लूनी तर आवडतोच.
+1 कुठे आहे हा पिक्चर कॉमी ?
+1 फा. कुठे आहे हा पिक्चर कॉमी ?
मदिरा पीकर बैलगाडी नही चलानी चाहिये हा उदात्त संदेश आहे >>>> खरं का ?
मला अजिबात आठवत नाहीये आता.
अशोका तर मी सुद्धा पूर्ण
अशोका तर मी सुद्धा पूर्ण पाहिला नाही. मला तो चित्रपट खराखुरा ऐतिहासिक वाटावा असा जमलाय की बॉलीवूड लव्हस्टोरी याच्याशी काही घेणेदेणे नव्हते. पण त्यातला लांब केसांचा शाहरुख हा आपला ओळखीचा शाहरुख वाटलाच नाही. तो काळ म्हणजे मी आणि माझी आई दोघेही कट्टर शाहरुख फॅन आणि त्याच्याबाबत आमची सगळी मते जुळायची. इथेही दोघांचे एकमत झाले होते.
त्यातली एक दोन गाणी मात्र फार आवडीची. पण आजही ऐकताना शाहरुख डोळ्यासमोर न येता करीना येते हेच त्या चित्रपटाचे सर्वात मोठे अपयश.
सन सनन गाण्यात संगमरवरी
"सन सनन" गाण्यात संगमरवरी मूर्ती सारखी दिसते करीना, शाहरुख कुठल्याही ॲंन्गलने सम्राट अशोक वाटला नाही. ते दोघे शोभलेही नाहीत एकत्र. दुसरी हृषिता भट आहे, तीही मिसफिट वाटली राणी म्हणून. शाहरुख ऐतिहासिक वाटतच नाही, तेथेही जाऊन बुजगावण्यासारखे हात लांब करायचा हिरोईनसाठी असंच वाटत राहतं.
मग येणारेजाणारे "ऐतिहासिक" लोक भाजीची पिशवी, कडीचा डबा टांगायचे फैलावलेल्या हातांवर.
तेथेही जाऊन बुजगावण्यासारखे
तेथेही जाऊन बुजगावण्यासारखे हात लांब करायचा >>>
मग येणारेजाणारे "ऐतिहासिक" लोक भाजीची पिशवी, कडीचा डबा टांगायचे फैलावलेल्या हातांवर. >>>>
सीनचा संदर्भ लक्षात नाही पण हे धमाल आहे.
सन सनन! बराच वेळ आठवत होतो की काहीतरी रिपिटिंग शब्द असलेले पाण्यातले गाणे कोणते होते.
तसा काही सीन नाहीये अशोकात पण
तसा काही सीन नाहीये बहुतेक अशोकात पण शाहरुख तसाच वाटतो कुठेही म्हणून लिहिले.
हे पाहा - "थ्री इडियट्स" मधल्या रांचो सारखा तुम्हाला डेमोच देते
, म्हणजे आधी दोघे एकमेकांजवळच नाचत असतात तो आणि हिरोईन पण हे असे करण्यासाठी तिला पतंग जसं हवेत उंच जावा म्हणून एक पोरगं हातात पतंग घेऊन दूर जाऊन उडी मारून वर वाऱ्यावर उडवते तसं - तिला ही बुजगावणे पोझिशन सार्थकी लागावी म्हणून दोन किमी अंतरावर लांब सोडून पळत यायला लावतात, तोवर हा असाच तिष्ठत उभा!
ऐतिहासिक कथेत हे अंगावर उलटेल नक्कीच!
माबो वाचक, तुम्हाला हिंदकेसरी
माबो वाचक, तुम्हाला हिंदकेसरी द्यावा लागेल.
शाहरूख खानची ही पोझिशन म्हणजे निर्मात्याने विचारलंय कि "मानधन किती घेशील?"
या प्रश्नाला त्याने "इतक" असं दिलेलं उत्तर असं वाटतं.
Wow.. वरचा शाहरुख बदाम बदाम
Wow.. वरचा शाहरुख बदाम बदाम बदाम ❤️❤️❤️
हाच तो खरा शाहरुख आहे!
मलाही बदामच वाटतो तो ऋ,
मलाही बदामच वाटतो तो ऋ, अशोकाच्या वेळेस मात्र शेंगदाणा वाटला.
राज
तिला ही बुजगावणे पोझिशन
तिला ही बुजगावणे पोझिशन सार्थकी लागावी म्हणून दोन किमी अंतरावर लांब सोडून पळत यायला लावतात, तोवर हा असाच तिष्ठत उभा! >>>
अशोकाच्या वेळेस मात्र शेंगदाणा वाटला >>>
शाहरूख खानची ही पोझिशन म्हणजे निर्मात्याने विचारलंय कि "मानधन किती घेशील?"
या प्रश्नाला त्याने "इतक" असं दिलेलं उत्तर असं वाटतं. >>>>
राअ
राअ
शाहरूख खानचा जबरदस्त
शाहरूख खानचा जबरदस्त परफॉर्मन्स
https://youtu.be/81Eh2_l23lw?t=1519
ओ ब्रदर... कुठेही मिळाला नाही
ओ ब्रदर... कुठेही मिळाला नाही स्ट्रीमिंग वर. त्यामुळे आमच्या जुन्या समुद्री चाचे मार्गांचा वापर करून सिनेमा मिळवला.
अस्मिता.. शेंगदाणा हो
अस्मिता.. शेंगदाणा
हो
@ राज अज्ञानी,
हे शाहरुख मिमिक्री करताना बहुतांश जण जे बकरीसारखे करतात ते मला फार इरिटेटिंग वाटते.
पण तुम्ही शेअर केलेल्या व्हिडिओत त्याला पकडून लहानपणीचा रडण्याचा आयटम जमला आहे.
या शोधाचे वर्णन "ओ ब्रदर
या शोधाचे वर्णन "ओ ब्रदर व्हेअर आर्ट दाउ" व्हेअर आर्ट दाऊ असे होईल
ओ ब्रदर (व्हेअर आर्ट दाऊ)²
ओ ब्रदर (व्हेअर आर्ट दाऊ)²
Pages