Cockroach जनता पार्टी झिंदाबाद !

Submitted by ऋन्मेऽऽष on 20 May, 2026 - 16:30

जगभरातले जेन झी पेटून उठत आहेत.
आम्ही भारतीय झुरळे कसे मागे राहणार.
एक ठिणगी पडली आणि बघता बघता वणवा पेटला.

हे आमचे इंस्टाग्राम अकाऊंट
फक्त चार (४) दिवसात 8.5 मिलियन म्हणजे तब्बल 85 लाख फॉलोअर्स.
https://www.instagram.com/cockroachjantaparty?igsh=YjhvYnhrZWJsMWtj

आणि ही आमची वेबसाईट
https://cockroachjantaparty.org/

कुठल्या वेगळ्याच जगात राहत असाल आणि हे काय याची कल्पना नसल्यास धागा वाचत राहा...

क्रांती आता फार दूर नाही...
ऑफ द कॉकरोच बाय द कॉकरोच फॉर द कॉकरोच !

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओह. अतिरिक्त माहिती, एखादी वेगळी बाजू समोर आली तर बदलेल असे मला वाटलेले. पण काही हरकत नाही. ज्याचा त्याचा दृष्टिकोन आणि एखाद्याबद्दल मत बनवायची प्रक्रिया वेगळी असणारच. तसेही या धाग्यावर हा मुद्दा नाही इतका महत्वाचा नाही. पुढे जाऊया.

या आंदोलनासंबंधीत इंस्टा रीळसाठी एक वेगळा धागा काढायला हवा.. काय एकेक धमाल आहेत.. काही क्रिएटिव्ह.. काही इमोशनल.. काही सुखावणारे.. काही फुल हॅपनिंग.. काही अरे आता आपण तिकडे असायला हवे असे वाटणारे..
मी गेले तीन चार दिवस रोज झोपण्याआधी तीन-चार तास रीळच बघत बसतो Lol

मी पण
बिहारी विद्यार्थी लोकांचा तर फुल्ल फॅन

टियर गॅस का इंतेजाम नही किये हो क्या वर जे काही हसलोय

आज तर विचारत होते एके47 नहीं लाय हो क्या

बॅरिकेड्स काय पळवून नेल्या, पोलिसांसोबत रस्सीखेच काय खेळली
एक भाजप्या नेता भेटला तर त्याला पकडून नेलं हम अकेले क्यो लाठी खाय, तुम् भी चलो मजा आयेगा

अरे म्हणलं आवरा

त्यात अजून पाकिस्तानी लोकांच्या रिल्स ने पण धमाल आलीये
एक जण रिल्स करून सांगतोय हे पाकिस्तान फंडिंग करत आहे असं सांगणे बंद करा, इथं आम्हाला खायला पैसे नाहीत तुमच्या प्रोटेस्ट साठी कुठून देऊ पैसे Happy

ऋ , अगदी. मी इथे पहिल्यांदा कमेंट केली आज आणि दोन चार पोस्टीच वाचल्या आणि मला रीळा यायला लागल्या. फारच धमाल आहेत, खूपच रमलेय. Happy

थांबा चहा पिऊन येतो आणि तासाभरात काढतो
मी व्हाट्सअप वर शेअर केलेल्या काही रीळ स्टॉक मध्ये असतील.. वरची पाकिस्तानची सुद्धा पाहिली ती सुद्धा असेल.

यातुन काही होईल न होईल, आशुच्या आणि अल्पनाच्या मुलांनी लिहिलंय तसं टेक इट फॉर ग्रांटेड, अंकल्स पार्टीचा रिअ‍ॅलिटी चेक मिळतोय तो ही एक धडाच आहे. >>> १००%

खरे म्हणजे भाजपचे "इलेक्शन मशीन" इतरांच्या फार पुढे होते २०१४ साली तरी. राजदीप सरदेसईचे पुस्तक आहे त्यातली वर्णने वाचून समजते. त्यांना लोकांची पल्स जितकी समजली आणि इलेक्ट्रॉनिक मिडीयाचा वापर कसा करायचा ते समजले ते इतर कोणत्याच पक्षाला समजले नाही. ते तज्ञ लोक अजूनही पक्षात व सरकारात असतील तर याचा उपयोग २०१९ साठी कसा करायचा ते त्यांना समजेल.

पण बराच काळ सत्तेवर असलेले लोक अपरिहार्यपणे स्वतःच्या बबलमधे जातात. आजूबाजूला खुशमस्करे तयार होतात, तेच पुढे जातात आणि मूळचे लोक बाजूला होतात. काँग्रेसही त्यातूनच गेली आहे. यांचे तसे झाले असेल तर माहीत नाही.

दुसर्‍या बाजूला रागाने कसा याचा उपयोग केला नाही कळत नाही. त्याचे बोलणे या जनरेशनला कनेक्ट होईल असे असते. सध्यातरी दोन्ही गट एकमेकांकडे संशयाने पाहात आहेत असे दिसते.

बॉस असावा तर मोदीजीं सारखा! एम्प्लॉयी च्या इतक्या कॅम्प्लेन येऊन ही फायर करत नाही. असे बॉस आम्हाला का मिळत नाहीत! Rofl

अल्पना नंतर भरत यांच्या भाच्याचे आणि आशुचॅम्प यांच्या मुलाचे इथले अपडेट्स पाहुन फार छान वाटले.

जेनझी कुठलेही भक्त नाहीत, रॅशनल विचार करताहेत हे पाहुन फार आनंद झाला आहे.

ड्रग्ज्सची धमकी पोलिस देतोय आणि तो साधा पोलिस!>> हे असे असू शकते.

मी क्लास मधे शिकवताना चे video जर माझ्या मुलांनी केले ना तर मला पण दुष्ट आंटी म्हणून पकडतील.

Hw नाही केलं तर, आता तुला फटके देते...
काहीही बावळट उत्तर आलं तर/ इतर काही त्रास दिला तर, आता न मी तुला दोन तास उभं करणार आहे...

हे अगदी बिनदिक्कत म्हणते मी! आणि त्यांच्या पालकांना ते माहित आहे.

(माझे विद्यार्थी गोड आहे तरीही)

सध्या चालू असलेल्या आंदोलनातल्या पोलिसांच्या वागण्याची ही तुलना नाहीय. पण थोडं वडिलकीच धमकावणं काही पोलिस वापरत असतील ही शक्यता आहेच, चुक असलं तरीही....

पण थोडं वडिलकीच धमकावणं काही पोलिस वापरत असतील ही शक्यता आहेच, चुक असलं तरीही

वडीलकी ? खिशात ५० ग्राम पावडर टाकतो म्हणणे वडिलकी ? ५० ग्रॅम पावडर म्हणजे कोकेन/ एखाद ऑपिएट किंवा सिंथेटिक मध्ये थेट मेथाम्फेटमीन derivatives होतात ! Narcotics Drugs and Psychotropic Substances Act, 1985 नुसार पन्नास ग्राम मध्ये काय होऊ शकते ह्याची कल्पना तुम्हाला असेलच न ? :O :O

कठीण आहे. तुम्हांला आयुष्यातून उठवीन म्हणाला तो.
पोलिसांनी ड्ग्ज, आर्म्स प्लांट केल्याच्या घटना घडल्या आहेत. तेही भर रस्त्यात.
सीसीटीव्ही होते म्हणून त्या लोकांची सुटका तरी झाली.

आता डोकी फोडण्याचं, पेलेट गन्स आणि खिळे लावलेल्या काठ्यांचं पण समर्थन करून टाका.

{दुसर्‍या बाजूला रागाने कसा याचा उपयोग केला नाही कळत नाही}
झुरळं यायच्या आधीपासून राहुल याबद्ददल बोलतो आहे. छात्रों की गूंज कोटा इथे झाली.
देशभर nsui , youth congress आंदोलंन करताहेत.
Cbse osm चा फटका बसलेल्या मुलांना तो भेटला.. त्याचग podcast आहे.
२० तारखेला तरुणांना मारहाण झाल्यापासून त्याने दोन पत्रकार परिषदा घेतल्या. काल पेलेट गन्सने जखमी झालेल्या मतरुणाला आणलं.
हे तो राजकीय उपयोग करून घेण्यासाठी करत नाहीए, हे मात्र खरं आहे. वेडा आहे तो.

या पोरांनी पोलिसांना उगाच घाबरायची गरज नाही, आपलेही हक्क असतात, ते माहीत करून घेऊन बोलून कसे दाखवायचे हे शिकवलं.
Reels generation whats app university च्या कित्येक योजने. पुढे आहे.

झुरळं यायच्या आधीपासून राहुल याबद्ददल बोलतो आहे. छात्रों की गूंज कोटा इथे झाली
yess! फक्त राहूल गांधी ह्यांच्यात हे सातत्य आढळते. कांग्रेस पार्टीचीचे नेते रोज एखादा विषय घेऊन पत्रकार परिषद घेत असतात. तेथे पत्रकार खुलेपणाने त्याविषयावर प्रश्न विचारू शकतात परंतू पत्रकार विषय सोडून पश्न विचारतात. मेनस्ट्रीम मिडीया हे कधीच दाखवणार नाही. राहूल गांधीच युवकांचे प्रश्न समजू शकतात. ।

मुंबई , दिल्ली पोलिसांनी इतकं काही केलंय या आठवड्यात. त्याकडे दुर्लक्ष करून प्रेमळ पोलिस काकांचा गालगुच्चा घेणाऱ्यांचं कौतुक.

आपण सुद्धा जरा जेन झी प्रमाणे कूल एटीट्यूडने विचार करायला शिकलो तर बरे होईल Happy
ती मुले काका गाडीत एसी लावा, गाणी लावा असे हट्ट पूर्ण करून घेत त्या गाण्यांवर नाचून पोलीस जीपमध्येच त्यांच्यासमोर नाचाचा व्हिडिओ बनवत होती. पोलिस आणि ते विद्यार्थी यात असा मस्तीचा माहोल होता, ते पोलीस सुद्धा त्यांच्या रंगात रंगलेले हे दुसऱ्या व्हिडिओत उघड दिसतेय, आणि त्याच टोनमध्ये म्हटलेले एक वाक्य पकडून लोक लोड घेत आहेत. त्या पोलिसाची तुलना लाठीने डोके फोडणाऱ्या दिल्ली पोलिसांशी करत आहेत.. चिल गाईज Wink

ब्रेकिंग न्यूज
पंतप्रधान मोदीनेही धर्मेंद्र प्रधान ह्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. Lol

माझा मुलगा जास्त बोलत नाही. त्याने काय करावं हे मी ठरवत नाही. पण राजकीय गोष्टीत १८ वर्षे पूर्ण झाल्याशिवाय उतरायचं नाही ही माझी इच्छा आहे. पण हा कधीच काही सांगत नाही. विचारत नाही. थेट कृती केल्यावरच समजतं.
तो आंदोलनात जाऊन आला हे मित्रांशी फोनवर बोलत असताना समजलं. त्याचे मित्रही असेच आहेत. आंदोलनातल्या पुणेरी पाट्यांबद्दल बोलत होते ते ऐकून समजलं. बाकी पुण्यात आंदोलन कुठे चालू आहे ते ही मला माहिती नाही.

तो बायकोला जोराने सांगत होता कि एकही पक्ष लायक नाही, एकही नेता विश्वासू नाही. तेव्हां या वयाच्या मुलांत काय चालू आहे हे समजलं. या वयात मला राजकारण समजत नव्हतं. भारतीय जनता पक्ष आणि जनता पक्ष यातला फरकही कळत नव्हता. कॉलेजमधे असताना राजकारणात जायचं नाही असं कुणी सांगितलं नव्हतं, पण तशी इच्छाच नव्हती. माझ्यावेळी भविष्य होतं. या मुलांना भविष्य उरलेलं नाही. भारतातले उद्योजक चीनमधे कारखाने लावत असल्याने मेकॅनिकल इंजिनियरींगला आता स्टुडंटस मिळत नाहीत. शिक्षण एव्हढं महाग आहे कि बाहेरच्या देशात शिकणं स्वस्त झालंय. त्यासाठी कर्जं काढावं लागतं. त्याच वेळी त्या त्या देशात त्या देशातल्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या योजना ऐकल्या कि आपल्या देशात ही शैक्षणिक लूट असून कुणी त्यावर चकार शब्द का बोलत नाही हा प्रश्न पडतो. यावर तोडगा निघणार नसेल तर काय फायदा? मुलाला जे आज जाणवलं ते लक्षात यायला कितीतरी वर्षे गेली. कुठल्याही पक्षाला सपोर्ट करून खाऊजा ने उद्ध्वस्त झालेली व्यवस्था पुनर्स्थापित होणार नाही. साम्यवाद आणा असा काही हट्ट नाही, पण मूठभर लोकांच्या हातात अर्थकारण जाण्यासाठी जनता बेहाल झाली आहे त्यावरचं सोल्युशन ना अण्णांच्या आंदोलनात होतं, ना या आंदोलनात दिसतं. उद्या अभिजीत दीपकेला आम आदमी पक्ष उत्तर प्रदेशमधे फिरवेल. किंवा त्यांच्या छुप्या समझोत्यानुसार भीम आर्मी किंवा तत्सम पक्षाकडून फिरवून मतांच्या फाटाफुटीचा बंदोबस्त करेल. त्याचा फायदा भाजपलाच होईल. उत्तर प्रदेशचा गढ राखला कि पुन्हा २०२९ ला सत्तेत यायचा रस्ता सोपा होईल. परिसीमन बिल मंजूर झालं कि दक्षिणेत एकही जागा नाही मिळाली तरी चालेल. राष्ट्रवादी , शिवसेनाने आपल्या खासदारांची रसद सप्लाय केली आहे आणि दुसरीकडे ते विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा पण देत आहेत. एव्हढी डबल ढोलकी आहे. शेवटी यांच्यापैकीच कुणाला न कुणाला आंदोलनाचा फायदा होणार आहे.

काल मुलाला विचारलं कि एक राजीनामा घेण्यापेक्षा नीटची परीक्षाच नको ही मागणी का नाही? त्याने उत्तर दिलं नाही. अशा वेळी तो काहीच बोलत नाही. आता एआय ला विचारत असेल. त्याला हे ही सांगितलं कि ए आय कडे सर्व प्रश्नांची उत्तरं नसतात. अनेकदा ती फसवी असतात. मेनस्ट्रीमवर आधारीत असतात.

या वयातल्या मुलांशी राजकारणावर चर्चा करणं हे चमत्कारिक वाटतंय. पण आता नाईलाज आहे. मुलांनी काहीही निर्णय घ्यावा, पण आपल्या वर प्रेम करणार्‍या पालकांशी, आजूबाजूच्या लोकांशी साधकबाधक चर्चा करावी. पुढे कुणाच्या हातचं बाहुलं बनू नये. भाजप जावं ही कुणाचीही इच्छा असेल. पण त्यासाठी मला स्वतःला रस्त्यावर उतरणं गरजेचं आहे. तसं आंदोलन जाणत्यांनी केलं पाहिजे. या आंदोलनातून उद्याचे नेते तयार होतील. ते खरोखर नीटवर तोडगा काढणार असतील तर ठीक. पण ही आंदोलने सुरू होतात एका मुद्द्यावर, तो पुढे हरवला जातो. तो फक्त कॉल देण्यासाठी असतो. या आंदोलनातल्या नेत्यांनी १८ वयाच्या आतल्या युथने येऊ नये असे आवाहन केले तर बरं होईल. हे सर्व पंचविशीच्या पुढचे आहेत.

विचार करायला लावणारा प्रतिसाद आहे !

मला आशुचॅम्पने वर्णन केलेले त्यांच्या मुलाने अटेंड केलेले पुण्यातील आंदोलन आवडले, पटले. NEET हाच मुद्दा केंद्रस्थानी ठेऊन झालेले निरलस आंदोलन. गंमत म्हणजे त्यासाठी आशुचॅम्पने पोराचे काही खास कंडिशनिंग केलेले पण वाटले नाही, गडी स्वतःच्या अंतःप्रेरणेने गेला मैदान मारून आला.

सुरुवातीचे काही मंतरलेले भारलेले आवेगातले दिवस उलटल्यावर आता वाटते, NEET पेपर फुटीने कंटाळून मैदानात उतरलेल्या पिढीला राजकीय आखाड्यात कॅनन फोडर म्हणून तर वापरले गेले नाहीये ?

इतके प्रचंड ढवळणारे आंदोलन झाले की त्यानंतर आत्मपरीक्षण obvious वाटते, कारण प्राथमिक वाफ जिरलेली असते, डोकी शांत झालेली असतात, विचारांचा ओघ पुन्हा नॉर्मल वर आलेला असतो आणि आंदोलनाचा टेंपो consistent ठेवायला कोर्स करेक्शन काय काय ठेवायला हवे आहे ते ठरवण्याचा करेक्ट टाईम असतो तो.

त्यांना लोकांची पल्स जितकी समजली आणि इलेक्ट्रॉनिक मिडीयाचा वापर कसा करायचा ते समजले ते इतर कोणत्याच पक्षाला समजले नाही.>>> माझ्या मते त्यांना ते समजले पण काळासोबत त्यांनी त्यांच्या ट्रीक्स इव्हॉल्व्ह नाही केल्या. त्यामुळे त्यांच्या आताच्या वेळेच्या संदर्भात आउटडेटेड टॅक्टीक्स ना कायमस्वरूपी फशी पडलेले हे मुख्यत्वे अगदी वयस्कर लोकच दिसतात, जे मुळातच नाकासमोर चालणारे होते, डिजीटल जगाच्या कंटेंट मागच्या मेकॅनिझमशी अवेअर नव्हते, फॅक्टचेक करायच्या फदांत न पडणारे पडणारे, निवडक कादंबऱ्या, लघूकथा, दिवळीअंक वाचनाशिवाय पॉलिटीक्स, सोशिॲलॉजी, सायकॉलॉजी, सोशल इंजिनिअरिंग अशा विषयांच्या बाबतीतल्या चौफेर वाचनाविषयी पुर्णपणे अनभिज्ञ असे ते लोक होते. यांच्या सोबतच ज्यांना अशा विशयांचे ज्ञान होते वाचन होते ते सुरवातीच्या काळात कॉग्रेसच्या भ्रष्ट कारभाराला कंटाळले होते आणि काहीतरी चांगले होईल अशा आशेने या सोशल इंजिनिअरिंग च्या कह्यात गेलेले , पण हा वर्ग पहीला
रेडफ्लॅग दिसताच बाहेर पडला. बाकी GenZ चं बोलायचं तर ते यात कशातच नसणारे, 'बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर' अशा मनोवृत्तीचे आणि unapologetically मिडल फिंगर दाखवून मुव्ह ऑन होणारे....हा वर्ग कंट्रोल करायला फार कठीण, गोदी मिडीया फेल होण्याचं कारण हा वर्ग लाईव्ह मधे जगतो, जन्मजात टेकसॅव्ही आहे, जो पर्यंत तुम्ही खोट्या नरेटीव्हची स्क्रिप्ट तयार कराल, तोवर हा हजारो व्हिडिओ, मीम्स इंस्टा स्नॅपचॅट वर अपलोड करुन मोकळा झलेला असतो....ज्या क्षणी याला टॅकल करायच्या प्रोसेस मधे कोणतीही व्हर्टीकल हायरार्की, चेरीपिकींग, येणार किंबहुना कोणताही प्रोसेस येणार त्याचवेळी हे त्या यंत्रणेला १००% आउटपेस करणार.

फाविद, तुम्ही या आणि इतर धाग्यावर टाकलेल्या जेन झी माईंडसेट पोस्ट सगळ्या छान आणि परफेक्ट शब्दात आहेत.

मोदीचा मास्टर स्ट्रोक!
जंतर मंतर प्रदर्शन करणाऱ्या genz चे दाणापाणी तोडण्यात येत आहे.
डीसटोपिया डीसटोपिया म्हणतात तो हाच!!
चला आपण कुपणावर बसून त्याना सल्ला देऊया.

Pages