Submitted by ऋन्मेऽऽष on 20 May, 2026 - 16:30
जगभरातले जेन झी पेटून उठत आहेत.
आम्ही भारतीय झुरळे कसे मागे राहणार.
एक ठिणगी पडली आणि बघता बघता वणवा पेटला.
हे आमचे इंस्टाग्राम अकाऊंट
फक्त चार (४) दिवसात 8.5 मिलियन म्हणजे तब्बल 85 लाख फॉलोअर्स.
https://www.instagram.com/cockroachjantaparty?igsh=YjhvYnhrZWJsMWtj
आणि ही आमची वेबसाईट
https://cockroachjantaparty.org/
कुठल्या वेगळ्याच जगात राहत असाल आणि हे काय याची कल्पना नसल्यास धागा वाचत राहा...
क्रांती आता फार दूर नाही...
ऑफ द कॉकरोच बाय द कॉकरोच फॉर द कॉकरोच !
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
विद्यार्थी राष्ट्रगीत गाऊन
विद्यार्थी राष्ट्रगीत गाऊन उत्तर देत आहेत.
आला राजिनामा...
आला राजिनामा...
आत्ताच तिथे जायचा विचार करत
आत्ताच तिथे जायचा विचार करत होतो आम्ही सगळेच.
Confirmed!
Confirmed!
नारेब्द्र मोदी कि हार!
प्रधनने राजीनामा दिला!
प्रधानने राजीनामा दिला! राजा नरमला
माती खाल्ली.
माती खाल्ली.
आगे नरेंद्र की बारी!
पिक्चर अभी बाकी है.
पण मिटिंग होनी है. होगी.
पण मिटिंग होनी है. होगी.
https://www.instagram.com
https://www.instagram.com/reel/DbNcw7sTUFQ/?igsh=MWcyeWx5YTB3OHoyaA==
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आला
कॉकरोज जनता पार्टीचा विजय झाला
आईशप्पथ..
मला स्वप्नात सुद्धा वाटले नव्हते हे शक्य होईल ❤️❤️❤️
इंडियन युथ पॉवर
जेन झी रॉक्स
मला स्वप्नात सुद्धा वाटले
मला स्वप्नात सुद्धा वाटले नव्हते हे शक्य होईल>>> Tbh True!!
येस, बातमी वाचल्या वाचल्या
येस, बातमी वाचल्या वाचल्या हेच आलं मनात
की कसं काय बुवा
याला 101 टक्के बदललेली रणनीती कारणीभूत आहे
जेनझी चे अभिनंदन
पहिला छोटासा का होईना विजय मिळवला
मार खाल्ला, रक्तबंबाळ झाले पण रस्त्यावर उतरून लढा दिला
हे आंदोलन भक्त म्हणत होते तसे फक्त सोशल मीडियावर सुरू होऊन तिथेच संपले असते तर कुणाला आश्चर्य वाटले नसते।
पण हे उतरले रस्त्यावर लढा दिला आणि जिंकले
ब्रावो
राजिनाम मोदी स्विकारे पर्यंत
राजिनाम मोदी स्विकारे पर्यंत थांबायला हवं....कमालीचे ठग आहेत ही लोकं..
इंडियन युथ पॉवर, विजय असो!!!!
इंडियन युथ पॉवर, विजय असो!!!!
जेन झीचे अभिनंदन , पण आता मला
जेन झीचे अभिनंदन , पण आता मला वाटते थोडा धुरळा खाली बसल्यावरच पुढची कॉमेंट करेन, आज पोरांना मनमुराद नाचू दे आनंदात आपल्या विजयाच्या ! पण हा विजय पुढे एका रचनात्मक प्रेशर ग्रुप मधे बदललेला पाहणे आवडेल मला तर. त्यासाठी पहिले हे यश ही तरुणाई कशी हँडल करते आहे ते पाहे पर्यंत माझ्या पुढील कॉमेंट्स राखीव.
जगदगुरू पत्रकार परिषद कधी
जगदगुरू पत्रकार परिषद कधी घेणार आहेत?
सुबोध खरे आणि बेफिकीर याल का.
सुबोध खरे आणि बेफिकीर याल का..
आज माझ्याकडे तुमच्या नेहमीच्या प्रश्नाचे उत्तर सुद्धा आहे आणि निकाल सुद्धा आहे.
सुबोध खरे,
मी जेव्हा इथे पहिल्यांदा राजीनाम्याच्या मागणीच्या पेटीशनची लिंक टाकली होती तेव्हा तुम्ही नेहमी येऊन मला त्याचे आकडे किती झाले हे सांगून चिडवत होता.
बेफिकीर,
तुम्ही नेहमी धाग्याच्या हेडर पोस्ट मधील क्रांती हा शब्द घेऊन चिडवत होता. कुठवर आले आंदोलन विचारत होता.
हे खरेच होईल यावर माझा सुद्धा तेव्हा विश्वास नव्हता.
पण निकाल काही लागो, प्रयत्न करणे महत्वाचे आणि देशभरातील मुले प्रामाणिकपणे ती करत आहेत यावर माझा विश्वास होता. आणि म्हणूनच सपोर्ट होता.
पण आज निकाल सुद्धा या मुलांच्या बाजूने लागला. गटारातली कॉकरोच काय करणार म्हणणाऱ्यांना त्यांनी करून दाखवले.
ही मुले ऑनलाइन जगात रमणारे आहेत असे म्हणणाऱ्या लोकांना रस्त्यावर उतरून दाखवले. नुसते इतकेच नाही तर रक्त सांडून, बलिदान देऊन हा विजय साकार केला आहे.
ज्या ज्या विद्यार्थ्यांनी या प्रकरणात आत्महत्या केली किंवा जे नैराश्यात गेले, त्यांच्या पालकांना आज न्याय झाला असे वाटत असेल आणि एकत्रितपणे आवाज उठवला तर न्याय मिळू शकतो हा विश्वास माझ्यासारखा सगळ्या जनतेला आला असेल.
गेले काही काळ या देशातील परिस्थिती आणि राजकारण बघून मला स्वतःलाही जे हताश झाल्यासारखे वाटत होते, जी मरगळ आली होती ती हे आंदोलन सुरू झाल्याच्या दिवसापासूनच गेली होती. नवीन उत्साह वाटू लागला होता. पण आजच्या निकालाने भारताच्या इतिहासात एक नवीन अध्याय लिहिला गेला आणि आपण त्याचे साक्षीदार ठरलो याचा एक वेगळाच आनंद झाला आहे
यासाठी सर्वच मुलांचे मनापासून अभिनंदन आणि आभार ❤️
बाकीचं नंतर.
बाकीचं नंतर.
तूर्तास कुठेही आंदोलनात भाग घेतलेल्या प्रत्येक मुलामुलीचं अभिनंदन.
ऋन्मेऽऽष >>> अगदी अगदी,
ऋन्मेऽऽष >>> अगदी अगदी, पूर्ण सहमत. अभिनंदन!
रुन्मेष अगदी मनातलं लिहिलं
रुन्मेष अगदी मनातलं लिहिलं आहेस
अगदी याच फिलिंग होत्या
मलाही वाटत नव्हते की हे टिकतील
जसे शेतकरी झाले, पैलवान झाले तसेच हेही मोडून काढतील असे वाटत होते
लाठीचार्ज करण्याचा निर्णय तर अगदीच अंगलट आला कारण त्यानंतरच जे काही एकवटून उभे राहिले त्याला तोड नाही
आता भक्त कितीही थयथयाट करू देत
कितीही हिणावू देत काही फरक पडत नाही
तरुणांचे अभिनंदन. पाहिली
तरुणांचे अभिनंदन. पाहिली मागणी तर मान्य झाली. आंदोलकांवर केलेल्या केसेस काढून टाकणार आहेत का?
लाठीचार्जाबद्दल मुलांची माफी मागावी असं वाटत असलं तरी ते होणार नाही हे माहित आहे. CJP कडे यानंतर पुढच्या सुधारणांसाठी काही आराखडा/ मागण्या आहेत का हे नक्की माहित नाही. काहीतरी आहे हे वाचलं आहे पण त्याची पूर्ण माहिती नाही. फक्त नीट किंवा प्रवेश परीक्षांमधल्या घोटाळ्यापुरते न थांबता एकूणच शिक्षणाबद्दल/ शिक्षणाच्या खाजगीकरणाबद्दल, right to affordable education for all बद्दल पुढे काही व्हावे.
पण हा विजय पुढे एका रचनात्मक प्रेशर ग्रुप मधे बदललेला पाहणे आवडेल मला>>> +१
जय श्रीराम आउट.
जय श्रीराम आउट.
जय जगन्नाथ इन.
धर्मेंद्र प्रधानने बायो बदलला. पार्टी पण बदलणार ?
कालची आशुचॅम्प ची पोस्ट आज
कालची आशुचॅम्प ची पोस्ट आज वाचली. तुमच्या लेकाचे पण कौतुक आहे. माझ्या ओळखीतल्या या पिढीतल्या बहुतांशी सगळ्याच मुलांमध्ये विचारांची खूप स्पष्टता आहे.
आंदोलनात प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष भाग घेतलेल्या आणि पाठिंबा दिलेल्या प्रत्येकाचे अभिनंदन.
ऋन्मेष, तुमच्या आताच्या
ऋन्मेष, तुमच्या आताच्या पोस्टशी सहमत.
मला स्वप्नात सुद्धा वाटले
मला स्वप्नात सुद्धा वाटले नव्हते हे शक्य होईल
>>>> +१११
<<<
<<<
लाठीचार्ज करण्याचा निर्णय तर अगदीच अंगलट आला कारण त्यानंतरच जे काही एकवटून उभे राहिले त्याला तोड नाही
>>>>
येस आशूचॅम्प गेम चेंजिंग मोमेंट!
लाठी चार्ज नंतर त्याला न जुमानता न घाबरता कार्टी दुसऱ्या दिवशी आज हळू मारा काका म्हणत पुन्हा लाठी खायला उभी राहिली तिथे गेमच पलटला. त्या मुलांनी लोकांच्या मनातली भीती काढली जे साधे व्हाट्सअप स्टेटस लावतानाही विचार करायचे की मी सरकारविरुद्ध काही लिहिले तर उद्या त्याचे परिणाम काय होतील.
त्या मुलांनी लोकांच्या मनातली
त्या मुलांनी लोकांच्या मनातली भीती काढली जे साधे व्हाट्सअप स्टेटस लावतानाही विचार करायचे की मी सरकारविरुद्ध काही लिहिले तर उद्या त्याचे परिणाम काय होतील.>>+१००
सध्यातरी परिणामांची खात्री नाही - माझ्यातली ममव.
माझी भाची पण दादरला दोन दिवस
माझी भाची पण दादरला दोन दिवस गेलेली. कालच बहिणीशी बोलत होतो. तिच्या ग्रुप मधले सगळे एबीव्हीपी आणि असेच कडवे आहेत. आधी भाची या अशा विषयांवर त्याच्याशी बोलत असे, हल्ली सोडून देते. त्याचे ही किस्से आणि ब्रेनवॉश सांगत होती.
भाची आणि तिची एक मैत्रीण गेल्या होत्या. मैत्रीण खोटं सांगून आली होती. भाचीने जायला बहिणीचा पाठिंबा होताच, पण बाकी कुठे आम्हाला न पटणाऱ्या/ झेपणाऱ्या गोष्टी तू करणार असलीस तरी तू कुठे आहेस हे सांगून जा, लोकेशन तरी आम्हाला माहीत असलीच पाहिजे इतकीच तिच्यावर कंडीशन घातली आहे. ते ती पाळते म्हणाली.
बरेच जेन झी ब्रेनवॉश झालेले आहेत, पालक तर बहुतेक सगळ्यांचेच कट्टर म्हणावे असे आहेत. त्यामुळे बरीच मुलं गोष्टी खोटं बोलूनच करतात म्हणाली.
काळजी आणि अभिमान दोन्ही वाटलं मला.
AISA - All India Students
AISA - All India Students Association - ची अध्यक्ष नेहा ही सुद्धा जंतरमंतरवर २३ दिवस उपोषण करत होती.
तिचं भाषण https://x.com/khanumarfa/status/2080294007146795178
आज सकाळचं
https://x.com/Shantanu_katre/status/2080957913699697139
तिच्यासोबत अरमान आणि मनीष हेही उपोषणाला बसले होते
https://x.com/harsh_mander/status/2079117024056259061
एक आवडलेला फोटो - व्हाट्सअप
एक आवडलेला फोटो - व्हाट्सअप स्टेटसची सोय झाली म्हणू शकता
https://www.instagram.com
अभिजीत स्टेजवरून आपल्या भाषणात म्हणाला ये पहिली विकेट है.. ये शुरुवात है.. हम रुकेंगे नही..
https://www.instagram.com/reel/DbNmzx0NgUc/?igsh=NnNlaDJqd3R0ZmNq
कॉमेंट सेक्शनमध्ये
इथेनॉल पगलूगडकरी आघाडीवर आहेतआता बुद्धिबळाचा खेळ सुरू होईल. पण ही मुले सुद्धा हुशार वाटत आहेत. येत्या काळात या लढ्यात आपण सुद्धा नागरिक म्हणून आपली जबाबदारी तटस्थपणे पार पाडायला हवी..
पण जाऊ दे पुढचा विचार नंतर...
त्याआधी दोन तीन दिवस या मुलांच्या सेलिब्रेशनचे व्हिडिओ बघूया. त्याची एक वेगळी मजा असेल.
Gen Z चा हा विजय ही एका
Gen Z चा हा विजय ही एका मोठ्या युद्धाची नांदी आहे.
२०२४ ला ४०० पार ची अपेक्षा असताना २४० आल्यात पण सरकार कसंबसं बनवता आलं. ह्यातून मोदी आणि शाह ह्यांनी काय धडा घेतला. त्यांनी एकाधिकारशाही बंद करून सर्वसमावेशक राजकारण करून त्यांचे मतदान वाढवण्याचे कष्ट घेतले नाहीत. उलट त्यांनी SIR च्या माध्यमातून स्वतः मतदार निवडलेत. त्याचा फायदा महाराष्ट्र ते बंगाल येथील निवडणुकात दिसला.
Gen Z आंदोलनातून सरकार काय शिकेल असे तुम्हाला वाटते. माझ्यामते, instragram ची गळचेपी होईल, Gen Z ला कंट्रोल करण्याचे असंवैधानिक प्रयत्न होतील.
आनंदात मिठाचा खडा टाकतोय त्याबद्दल क्षमस्व. पण भाजप आणि त्यांच्या समर्थक विश्वास ठेवण्याजोगे नाहीत.
तुमच मत मांडा
Pages