Submitted by ऋन्मेऽऽष on 20 May, 2026 - 16:30
जगभरातले जेन झी पेटून उठत आहेत.
आम्ही भारतीय झुरळे कसे मागे राहणार.
एक ठिणगी पडली आणि बघता बघता वणवा पेटला.
हे आमचे इंस्टाग्राम अकाऊंट
फक्त चार (४) दिवसात 8.5 मिलियन म्हणजे तब्बल 85 लाख फॉलोअर्स.
https://www.instagram.com/cockroachjantaparty?igsh=YjhvYnhrZWJsMWtj
आणि ही आमची वेबसाईट
https://cockroachjantaparty.org/
कुठल्या वेगळ्याच जगात राहत असाल आणि हे काय याची कल्पना नसल्यास धागा वाचत राहा...
क्रांती आता फार दूर नाही...
ऑफ द कॉकरोच बाय द कॉकरोच फॉर द कॉकरोच !
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
चिडकू आणि केशावकूल हे
चिडकू आणि केशावकूल हे वेगवेगळे आयडीज आहेत यावर माझा पूर्ण विश्वास आहे,
याआधीही एका धाग्यावर काही गंमतीजमती झाल्या होत्या.
त्याऐवजी पुढची पिढी घडवण्याचे
त्याऐवजी पुढची पिढी घडवण्याचे काम सुरू करावे.>>>
पुढची पिढी आपल्याला घडवते आहे हे लक्षात आले नाहीये का?
https://www.facebook.com
https://www.facebook.com/share/p/1BTdcWos4L/
आता खरंतर आंदोलन आणि जंतर मंतरवरची गर्दी, पोलिसांनी आणि सरकारने मुलांना आणि तिथे त्या मुलांना मदत दिलेला त्रास हे सगळं सध्या तरी थांबलेलं असेल पण तरी गेल्या काही दिवसात सरकार कसं सूडबुद्धीने वागत होतं हे कळतं हे वाचल्यावर.
राज अज्ञानी
राज अज्ञानी
तुमची कल्पना चुकीची आहे. मी चिडकू ह्यांचा ड्यू आय डी आहे हे मी खुल्या दिलाने मान्य करतो. तसेच मी अजून बरयाच लोकांचा ड्यू आय डी आहे. उदा शी जीन पिंग, अमेरिकन तात्या, नेतन्युआहू, राहुल गांधी. वेळ येईल तसे तसे मी हि गुपिते उघडी करेनच. आज एव्हढे पुरे आहे.
सर, मागे रेव्यु यांची बाजू
सर, मागे रेव्यु यांची बाजू मइयमितपणे नियमितपणे वेगवेगळे आयडीज आले होते. तुम्हीही त्यातले एक होतात. माझा मुद्दा चुकीचा आहे हे एकापेक्षा जास्त आयडीज बाजू मांडून सिद्ध करत होते. तुम्हाला आठवतो का हो तो धागा?
ते तीनही आयडीज वेगवेगळे आहेत हे मी तिथेच म्हटले होते. आता पुन्हा मला खोटं ठरवाल तर माझा नाईलाज आहे. तो धागा सापडला तर पुढे काय झालं हे आठवेल.
नीट आणि जेईई या परीक्षांचे
नीट आणि जेईई या परीक्षांचे क्लासेस अडीच ते तीन लाख रूपये फीस आकारतात. ही फीस ज्यांना परवडत नाहीत ते प्रवेश प्रक्रियेतून फेकले जातात. अनिताला बारावीला ९८% गुण मिळाले. म्हणजे मेरीट नव्हते हा लाडका युक्तीवाद करता येत नाही.
या मुद्द्यात लॉजिक नाही असा बिनडोक हलकटपणा मागे ही काही धाग्यांवर दिसला आहे. या जोरावर कुणीही कुणाचे ड्युआयडी नाहीत हे ठामपणे सांगता येतं. तीन जण जर असाच बिनडोक हलकटपणा करत असतील तर ते एकमेकांचे ड्युआयडी नाहीत हे सिद्ध होते.
उडवा आता.
अजून एक
अजून एक
मी तुमचा पण ड्यू आय डी आहे हे तुम्ही विसरलात कि काय?
अर्थात तुम्ही हे मान्य करणार नाही हे माहित आहे.
ही तुमची मजबुरी आहे.
बरं सर.
बरं सर.
मी म्हणत होतो तुम्ही कुणाचे ड्युआयडी नाहीत. हे मान्य नाही तर नाईलाज आहे.
आयडी उडाला का हे बघायला आलो तर एक नवीन दिसतंय. चालू द्या आता.
लॉजिक म्हणजे काय हे ठरवणारे लोकशाहीवादी न्यायाधीश आयडी उडवणार आहेत.
(No subject)
aschig
aschig
चांगले विचार मांडले आहेत. पण ...
अल्पना तुमची कालची शेजारचे
अल्पना तुमची कालची शेजारचे लोक काय म्हणत होते ती पोस्ट वाचुन बापरे वाटलं. काय लोक असतात! वरची फेसबुक पोस्ट वाचली. सूडबुद्धीने वागणारे सरकार आहे. हे आंदोलन लक्षात ठेवून पुढे सूड बुद्धीने वागणार नाही याची खात्री देता येत नाही या अर्थाचं कुणी इथे आधीच लिहिलंय ते स्केपटीसीझम अनाठायी नाही.
अमितव तुमच्या भाचीचे, तिच्या मैत्रिणी कौतुक वाटले!
प्रधानांचा नाराजीनामा तर झाला आता पुढे काय असा प्रश्न पडणे त्यावर चर्चा करणे गैर नाही. आंदोलनाबद्दल (आधी) स्केप्टिक असणंही गैर नाही.
त्यात आमचा काही संबंध नाही, तुम्ही सरकार विरोधी ना, तुम्ही याची उत्तरं द्या, काय दिवे लावणार आहेत ही पोरं आता असा आविर्भाव नसावा.
ज्यांना हे सगळं सोरोस फंडेड, देशद्रोही, चिनी, पाकिस्तानी हात, आमच्या लाडक्या सरकार विरुद्ध रचलेले षडयंत्र वगैरे वाटत होते, हे आंदोलन इतर आंदोलनांप्रमाणे कसंही चिरडून टाकलं असतं तर छान वाटलं असतं, मुलांना कसंही मारलंय त्याचं काही वाटत नव्हते आणि ज्यांना अजुनही या दिशेने चर्चा जाऊन आंदोलन हे सरकारविरुद्ध, देशाविद्ध षडयंत्रच कसं होतं हे दाखवण्यात रस असेल त्यांना मात्र पास.
मला तर अजूनही राजकारण समजत
मला तर अजूनही राजकारण समजत नाही आणि कधी फॉलो करत नसल्याने कधी फार समजणार सुद्धा नाही.
पण आता मी डोळे झाकून कोणावरच विश्वास ठेवायचा नाही हे फॉलो करू लागलो आहे.
तिकडे जमलेली हजारो मुले नक्कीच आपल्या हेतूशी प्रामाणिक होती. पण त्यांना जमवणारे मात्र त्याच हेतूशी प्रामाणिक होते की नाही यावर आता मी कुठला निष्कर्ष काढत नाही. फक्त फ्लो आहे त्यानुसार डोळसपणे जावे एवढे ठरवले आहे.
जिथे जिथे या सरकारचा उघड भ्रष्टाचार दिसत आहे तिथेही सरसकट त्यांचे समर्थन करणारी जी जनता आसपास दिसत आहे त्यांच्यातलाच एक मला बनायचे नाही हे नक्की. मग ते या बाजूचा असो किंवा विरुद्ध बाजूचा.
पण एक मात्र आहे, एकीकडे मी या कित्येक सत्ताधारी नेत्यांच्या मुलाखती बघतो. त्यात त्यांचा माज दिसतो किंवा ढोंगीपणा लक्षात येतो. त्याउलट या जेन झी लीडर मुलांच्या मुलाखती बघताना मला एक कळकळ जाणवते. अश्याचीच आता देशभरात फळी उभारायला हवी. काल अभिजीत म्हणाला तसे या पहिल्या विजयानंतर त्याला किंवा कोणा एकाला आता हिरो बनवू नका. देशाचे नुकसान त्यानेच झाले आहे.
https://youtu.be/VKUoijYReGA
https://youtu.be/VKUoijYReGA?si=UTX9G0xifjcYm1eD
झुरळांचा धुराळा खाली बसण्यापूर्वी अनेक शंकासुर त्यांच्या बुद्धिमता, परिपक्वता ह्यावर शंका उपस्थित करतात. त्यांच्यासाठी हा व्हिडिओ देत आहे. ही जेनझी पिढी आपल्या पिढीपेक्षा कैक प्रकाशवर्ष पुढे आहे. त्यांचे प्रश्न समजून घेणारा आणि बरोबर घेऊन जाणारा देशात फक्त एकच राजकीय नेता आहे.
ही एक घटना आवडली.
ही एक घटना आवडली.
लोकांनी गोदी मिडीयाचा धिक्कार केला.
पण त्या मागच्या पत्रकार माणसाची आदराने माफी मागितली.
कमाल आहेत ही मुले. कुठले पूर्वग्रह दूषित मत ठेवून नाहीत हा यांचा गुण सुद्धा आहे आणि ताकद सुद्धा.
https://www.instagram.com/reel/DbOlZfaOnY3/?igsh=MXE3dDBnbmdldHl2YQ==
https://www.instagram.com
https://www.instagram.com/reel/DbOqdcRzpvH/?igsh=MWtjZHV6Nnczd2Z5bQ==
https://www.instagram.com
https://www.instagram.com/reel/DbM0TT1zdA4/?igsh=MTFiY3ZoYmp1Nno0OQ==
त्या तोरसेकर चा गचाळ भाषेतला
त्या तोरसेकर चा गचाळ भाषेतला गचाळ लॉजिक वापरून गचाळ चेहऱ्याने केलेला गचाळ वीडियो अजून कसा आला नाही? की आला?
तोरसेकरला डोवाल आणि एफबीआय पेक्षा जास्त माहिती आहे, म्हणून शंका आली. घरी आवडत नसतानाही शेपूची भाजी खात असेल.
फेसबुकवर लोक बळच हैराण करत
फेसबुकवर लोक बळच हैराण करत आहेत की यांनी कसे सिलेक्टिव्ह प्रश्नांवर आंदोलन केले वगैरे
म्हणलं तुम्ही करा, आंदोलन न करता आधी सरकारला प्रश्न तरी विचारा हे असे का म्हणून, ते तुम्ही काही करणार नाही आणि अपेक्षा काय तर या मुलांनी सगळे प्रश्न हाताळले पाहिजेत म्हणून
त्यांना जे हवे होते ते प्रश्न त्यांनी विचारले
तुम्हाला ज्या प्रश्नांची उत्तरे हवी आहे ते प्रश्न तुम्ही विचारा सरकारला
तुम्हीही नागरिक।आहात, टॅक्स।भरता, सरकार आपलं आहे
मग विचारा की बिनधास्तपणे हे असे का म्हणून
तर तिथं शेपूट घालायची आणि तुंणतुंणे वाजवत बसायचं हेच का नाही बोलले तेच का नाही बोलले
म्हणलं त्यानी 173 प्रश्न विचारले तर तुम्ही येऊन म्हणाल हे काय हा 174 वा का नाही विचारला, हे असे सिलेक्टिव्ह आंदोलन काय कामाचे
विश्व्ंभर चौधरींना विचारलं
विश्व्ंभर चौधरींना विचारलं होतं कि आता जनलोकपाल कुठेय? अण्णा का आंदोलन करत नाहीत?
तर ते म्हणाले कि सगळी आंदोलने अण्णांनीच करायची का? तुम्ही करा की.
मी म्हणालो अहो चौधरी जनलोकपाल आंदोलन करायला आम्ही नव्हतं सांगितलं. त्या वेळी आम्ही सांगत होतो कि विधेयक कुठलं मांडायचं हे सांगण्ञासाठी प्रतिनिधी आहेत. किमान लोकांना विचारायचं होतं. बिल तुम्ही बनवलं, आंदोलन तुम्ही केलंत, लखनौत जाऊन लोकपाल नाही म्हणून धरणे दिलेत, गुजरातेत नऊ वर्षे लोकपाल नाही म्हणून काहीही केलं नाहीत, आणि आता शेवटी मोदी सत्तेत आले, जनलोकपालचा पत्ता नाही, तर तुम्ही म्हणता अण्णांनीच का उपोषणाला बसायचं. किमान नितीन आगेच्या केसमधे तरी अण्णांनी काही प्रतिक्रिया दिली का? सगळ्या गोष्टीत देत असतात.
त्यानंतर पाच मिनिटांनी चौधरींनी ब्लॉक केलं. संध्याकाळी "नितीन आगेच्या हत्येचा अण्णा हजारे आणि त्यांच्या संस्थेतर्फे निषेध" असे पत्रक सर्वत्र झळकले.
अनेक आंदोलनांना कव्हरेजच मिळत नाही.
राज अद्न्यानी जी >>सर, मागे
राज अद्न्यानी जी >>सर, मागे रेव्यु यांची बाजू मइयमितपणे नियमितपणे वेगवेगळे आयडीज आले होते. >>> माझा नामोल्लेख झाला म्हणून विचारतो.... काय संदर्भ?
पूर्ण वाचा प्रतिसाद.
पूर्ण वाचा प्रतिसाद.
तोरसेकरला डोवाल आणि एफबीआय
तोरसेकरला डोवाल आणि एफबीआय पेक्षा जास्त माहिती आहे, म्हणून शंका आली. >>>> खिक्क!स्वतःला जेम्स बाँड समजतो म्हातारा!
सध्या माझ्यातही जेन झी घुसलाय,
एक जण सोमीवर विचारत होता की कर्नाटक पंजाबात पेपरफुटी झाली ह्यावर सीजेपी का बोलत नाही?
त्याला बोललो किंतीथले विरोधक काय त्यांची आ* घालत आहेत का? तर बदाबदा लाईक्स येऊन पडले आता बोला.
माझ्या मते असे देशव्यापी
माझ्या मते असे देशव्यापी आंदोलन उठता-बसता होउ शकत नाही. ही वन्स इन अ लाईफटाइम घटना असते जी आपल्याला बघायला मिळाली हे आपले नशीब. नाहीत आपली सहिष्णुता आणि एका गालावर थप्पड दिल्यास दुसरा गाल , हा प्रकार अंगात मुरलेला आहेच.
आता जेव्हा तवा गरम आहे तेव्हाच सरकारला धारेवर धरुन, आमूलाग्र बदल घडवुन आणला पाहीजे आणि सरकारला धारेवर धरणे हे काम असते विरोधी पक्षाचे. मग विरोधी पक्ष यात काय नेतृत्व करु शकतात हे पहाणे महत्वाचे ठरेल.
जेन झींनी सुरुवात तर करुन दिली. पण त्या सुरुवातीचा उपयोग कसा करुन घ्यायचा हे कोणाला तरी नेतॄत्व असलेल्या (मग ते सरकार असो वा विरोधी पक्ष) समजायला हवे. साप तर बिळातून निघालाय ना मग आता ठेचाच पूर्ण.
तोरसेकरचे काहीच पटत नाही,
तोरसेकरचे काहीच पटत नाही, काही लोक अजिबात आवडत नाहीत आणि अत्यंत पराकोटीचा राग येतो, त्यातला हा माणूस. त्याचा व्हिडिओ येईल नक्कीच त्याला फार मिरची लागली असेल.
तोरसेकर हा कसा मोदी शहाचाच
तोरसेकर हा कसा मोदी शहाचाच मास्टरस्ट्रोक आहे अस सांगून वेळ मारून नेतील.
"Too much democracy " youtube
"Too much democracy " youtube वर डॉक्युमेंटरी आहे. किसान आंदोलनावर. नक्की बघा.
नाहीत आपली सहिष्णुता आणि एका
नाहीत आपली सहिष्णुता आणि एका गालावर थप्पड दिल्यास दुसरा गाल , हा प्रकार अंगात मुरलेला आहेच.>>> Gen Z आंदोलन हे ह्याचाच प्रकार होता. Gen Z हातात कोणतही शस्त्र न घेता आंदोलनात उतरले होते. त्यांनी प्रतिकार न करता लाठीमार सहन केला, पॅलेट गन चे हल्ले सहन केले.
https://www.facebook.com
https://www.facebook.com/share/r/1DyWCiEdyL/
फेसबुकावर ७५ वर्शाच्या आजोबा
फेसबुकावर ७५ वर्शाच्या आजोबा शोभतील अशा व्यक्तीला जेन झी ने असभ्य शब्द वापरले, मोदी कसे ग्रेट आहे, प्रल्हाद्जोशीहा देखिल सन्घाचाच माणुस बसवुन कसा मास्टरस्ट्रोक मारला आहे वगैरे रतीब सुरु झाला आहे. एकाने तर " थांबाच, आता हिंदु राष्ट्र म्हणुन घोषणा होते कि नाहि बघा" अशी धमकीपण दिलि.
फेसबुकावर ७५ वर्शाच्या आजोबा
फेसबुकावर ७५ वर्शाच्या आजोबा शोभतील अशा व्यक्तीला जेन झी ने असभ्य शब्द वापरले, मोदी कसे ग्रेट आहे, प्रल्हाद्जोशीहा देखिल सन्घाचाच माणुस बसवुन कसा मास्टरस्ट्रोक मारला आहे वगैरे रतीब सुरु झाला आहे. एकाने तर " थांबाच, आता हिंदु राष्ट्र म्हणुन घोषणा होते कि नाहि बघा" अशी धमकीपण दिलि.>>>>
नरेंद्र मोदी च्या पार्टीत आहेत तरी का चांगली माणसं. कुणीही आला तरी घटिया च असणार ना.
Pages