Cockroach जनता पार्टी झिंदाबाद !

Submitted by ऋन्मेऽऽष on 20 May, 2026 - 16:30

जगभरातले जेन झी पेटून उठत आहेत.
आम्ही भारतीय झुरळे कसे मागे राहणार.
एक ठिणगी पडली आणि बघता बघता वणवा पेटला.

हे आमचे इंस्टाग्राम अकाऊंट
फक्त चार (४) दिवसात 8.5 मिलियन म्हणजे तब्बल 85 लाख फॉलोअर्स.
https://www.instagram.com/cockroachjantaparty?igsh=YjhvYnhrZWJsMWtj

आणि ही आमची वेबसाईट
https://cockroachjantaparty.org/

कुठल्या वेगळ्याच जगात राहत असाल आणि हे काय याची कल्पना नसल्यास धागा वाचत राहा...

क्रांती आता फार दूर नाही...
ऑफ द कॉकरोच बाय द कॉकरोच फॉर द कॉकरोच !

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पूर्वी नववीच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात फ्रेंच आणि रशियन राज्यक्रांती इ. होते. ते यावर्षी वगळलेत. NCERT म्हणतंय - दहावीत असेल. कळेल पुढच्या वर्षी.

सुमीत यांचा धागा बंद पडला. तिथे ही बातमी आणि क्लिप द्यायची होती

होय संपादम मंडळाला जाब विचारायचा आहे
कसा संपर्क करायचा

तुम्हांला मुलांनी संसदेकडे गेलेलं चालत नाही ना? आणि इथे संपादक मंडळाला जाब विचारताय?

संसद कोणाच्या बापाची नाही, असं काहीतरी काल तुम्ही लिहिलं होतं.

संसद जनतेच्या बापाची आहे आणि लोकप्रतिनिधी हे जनते साठी आहेत. मोदी स्वतःला प्रधानसेवक म्हणवतात. आणि ते जनतेला सामोरे जात नाहीत. मग जनता त्यांना भेटायला आली की खिळे लावलेल्या लाठ्या चालवतात.

आता दादरमध्ये रस्त्यावर चालायला सुद्धा ओळखपत्र दाखवावं लागतं.

काल हे सुमीत वाटेल तशा लाठीमाराचं समर्थन करत होते.
त्यांनी हे पहावं
https://www.facebook.com/reel/1585761666587872

तिथे पेलेट गन्सही वापरल्यात बरं का.

तुम्हांला मुलांनी संसदेकडे गेलेलं चालत नाही ना? आणि इथे संपादक मंडळाला जाब विचारताय?

संसद कोणाच्या बापाची नाही, असं काहीतरी काल तुम्ही लिहिलं होतं.

संसद जनतेच्या बापाची आहे आणि लोकप्रतिनिधी हे जनते साठी आहेत. मोदी स्वतःला प्रधानसेवक म्हणवतात. आणि ते जनतेला सामोरे जात नाहीत. मग जनता त्यांना भेटायला आली की खिळे लावलेल्या लाठ्या चालवतात.

नवीन Submitted by भरत. on 23 July, 2026 - 02:1

तेच तर
इकडे आंदोलकांनी एक महिना लावला
किन्नर नाचवले
मोदींना आई वॉर शिव्या घातल्या
मग शेवटी शेवटचा उपाय मग एक महिन्या नंतर संसदेत घुसले
मी तर १० तासात धागा उडाला
काय हे संपादक मंडल
उद्या तुमच्या घरात घुसून जाब विचारला तेव्हा बघू काय करता

झेंडा दिसतो; आग दिसत नाही का?

या आंदोलनाच्या आसपास काही राजकीय पक्ष आपली पोळी भाजत असतील. काही जण विद्यार्थ्यांच्या दुःखाचा वापर स्वतःच्या राजकारणासाठी करत असतील. आंदोलनात पूर्वीच्या इतर आंदोलनांशी जोडले गेलेले काही परिचित कार्यकर्तेही दिसत असतील. त्यांची भूमिका काय आहे, ते विद्यार्थ्यांना मदत करत आहेत की स्वतःचा अजेंडा पुढे नेत आहेत, हे प्रश्न विचारलेच पाहिजेत.

विद्यार्थ्यांमध्ये पुरेसे सक्षम आणि सर्वमान्य नेतृत्व नाही, अशी टीकाही केली जाते. आज नाही तर उद्या हे आंदोलन कुणीतरी ताब्यात घेईल, अशी भीतीही व्यक्त होते. ती भीती पूर्णपणे निराधार आहे, असे म्हणण्याचे कारण नाही. अनेक आंदोलनांचा इतिहास पाहता नेतृत्वाचा अभाव, बाहेरच्या संघटनांचा हस्तक्षेप आणि मूळ मागण्या मागे पडण्याचा धोका खरा असू शकतो.

पण त्यामुळे मूळ प्रश्न नाहीसे होतात का?

परीक्षांचे पेपर फुटले की नाही?
लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले की नाही?
वारंवार झालेल्या प्रशासकीय अपयशाची जबाबदारी कुणीतरी घ्यायला हवी की नाही?
या अन्यायाने आणि निराशेने भरलेल्या वातावरणात विद्यार्थ्यांनी जीव गमावले की नाही?
आणि शांततेने उत्तर मागणाऱ्या तरुणांवर पोलिसांनी गरजेपेक्षा अधिक बळ वापरले की नाही?

एखाद्या आंदोलनाचे नेतृत्व कमकुवत असू शकते. काही अनुभवी कार्यकर्ते त्यात शिरकाव करण्याचा प्रयत्न करत असतील. काही राजकीय गटांना ते आपल्या दिशेने वळवायचे असेल. पण ज्या अन्यायातून ते आंदोलन जन्माला आले, तो अन्याय त्यामुळे कमी होत नाही.

घराला आग लागलेली असताना गर्दीत एखादा खिसेकापू शिरला असेल, तर शहाणी माणसे आधी आग विझवतात. जळत्या घराकडे पाठ करून ती केवळ खिसेकापूबद्दल भाषण देत बसत नाहीत.

धरण फुटले असेल, तर मदतीच्या होडीवर कोणत्या पक्षाचा झेंडा आहे, याची चर्चा नंतर करता येते. होडीचा ताबा उद्या कुणी घेईल, याची काळजीही करता येते. पण आधी बुडणाऱ्या माणसांना वाचवावे लागते.

“या आंदोलनामागे विद्यार्थी नाहीत, तर जुने कार्यकर्ते आहेत,” असे म्हटले जाते. परिचित कार्यकर्त्यांची उपस्थिती दिसत असेलही. पण त्यामुळे खऱ्या विद्यार्थ्यांचे पेपर पुन्हा सीलबंद होत नाहीत. त्यांची वाया गेलेली वर्षे परत येत नाहीत. त्यांची मेहनत, वेळ, पैसा आणि भविष्य वाया गेलेलेच राहतात.

आंदोलन उद्या हायजॅक होऊ शकते, म्हणून आज त्याच्या खऱ्या मागण्यांकडे दुर्लक्ष करणे हा विचित्र तर्क आहे. एखाद्या रुग्णाची औषधे उद्या कुणीतरी चोरू शकतो, म्हणून आज त्याच्यावर उपचारच करू नयेत, असे आपण म्हणत नाही.

उलट, आंदोलन चुकीच्या हातात जाऊ नये असे वाटत असेल, तर विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांना लवकर आणि प्रामाणिक प्रतिसाद देणे हाच सर्वोत्तम मार्ग आहे. सरकार जितके मौन बाळगेल, तितकी बाहेरच्या गटांना जागा मिळेल. विद्यार्थ्यांना विश्वासार्ह नेतृत्व मिळत नसेल, तर त्याचे एक कारण हेही असू शकते की अधिकृत यंत्रणा त्यांच्याशी संवाद साधायलाच तयार नाही.

विरोधी पक्षांचा काही छुपा अजेंडा असू शकतो. सत्ताधाऱ्यांचाही एक उघड अजेंडा असू शकतो—मुख्य प्रश्नांवरून लक्ष दुसरीकडे वळवण्याचा आणि जबाबदारी टाळण्याचा. दोन्हीकडे लक्ष ठेवा. पण प्रमाण विसरू नका.

एका बाजूला काही कार्यकर्त्यांचे संभाव्य राजकीय हेतू आहेत, कमकुवत नेतृत्व आहे आणि आंदोलन भविष्यात भरकटण्याची शक्यता आहे. दुसऱ्या बाजूला परीक्षा व्यवस्थेचे प्रत्यक्ष अपयश आहे, तरुणांचा तुटलेला विश्वास आहे, आत्महत्या आहेत, पोलिसी हिंसाचाराचे आरोप आहेत आणि सत्तेचे मौन आहे.

या दोन्ही गोष्टी एकाच तराजूत तोलणे म्हणजे मृतदेहाशेजारी कोण उभे आहे यावर चर्चा करत बसणे आणि मृत्यू कसा झाला, हे न विचारणे.

आणि पोलिसी कारवाईचे व्हिडिओ पाहण्यासाठी देशाच्या सर्वोच्च न्यायालयाकडेही वेळ नसेल, तर प्रश्न केवळ शिक्षणमंत्र्यांचा राहत नाही. प्रश्न असा उरतो की या देशातील तरुणांचे म्हणणे ऐकण्यासाठी नेमका वेळ कुणाकडे आहे?

राजकारण उघडे पाडा—सगळ्या बाजूंचे राजकारण उघडे पाडा.
आंदोलन भरकटू नये म्हणून सावधही राहा.
पण भविष्यात ते कुणी हायजॅक करेल या भीतीने आजचा अन्याय झाकू नका.

धुरामध्ये कुणाचा झेंडा दिसतो आहे, हे सांगणे कदाचित आवश्यक असेल.
पण त्याहून कितीतरी अधिक आवश्यक आहे हे मान्य करणे की कुठेतरी आग लागली आहे.

आज इतक्या दिवसानंतर सरांची एक गोष्ट पटायला लागली आहे, ती म्हणजे Gen-Z आणि त्यांच्या अगदी आधीची पिढी Millennials, यांच्यात जगाकडे, स्वतःकडे, स्वतःच्या हक्कांकडे पाहण्याच्या दृष्टीकोनात जमीन अस्मानाचं अंतर आहे. हा जो दोन पिढ्यांच्या दृष्टिकोनातील बदल आहे तो या आधीच्या कोणत्याही दोन पिढ्यांमधल्या बदलापेक्षा मोठा आहे. हे कदाचित Gen-Z आणि Millennials ज्या वेगवेगळ्या आर्थीक, सामाजिक आणि टेक्नॉलॉजिकल पार्शवभूमी मधून आले आहेत त्याचा वाटा अधिक असू शकतो. मोठा प्रमाणात बदललेल्या पालकत्वाच्या संकल्पनेवर असणाऱ्या पाल्यांच्या विश्वासात असू शकतो....पण कदाचित त्यामुळे असे एक होऊ शकते की सध्या राजकारणात असलेल्या Generation X आणि baby boomers च्या यांच्याशी निगडीत प्रश्नांवर विचार करण्याच्या संकल्पना अगदीच गैरलागू/ पोकळ ठरत असल्याचे ठळकपणे जाणवू लागलेलं आहे. जर Gen-Z आणि Millennials मधला generation gap इतका प्रचंड असेल तर माझ्या मते Generation X आणि baby boomers हे Due to light years gap Gen-Z च्या दृष्टीकोनाचा स्वप्नातही थांग लावू शकणार नाहीत. खास करून असे राजकारणी/लोक जे फक्त 'मेरी सुनो' वाल्या मानसिकतेतच काम करण्याच्या पद्धतीवर विश्वास ठेवत मोठे झाले आहेत.

<<<<
झेंडा दिसतो; आग दिसत नाही का?
>>>>>

हा मुद्दा छान मांडला आहे.
शेअर करतो इथे तिथे ही पोस्ट..

ADCP removed from Jantar Mantar after video of him slapping female protester goes viral

तिच माझी त्या धाग्यावर शेवट्ची पोस्ट होती

याच वेगाने हे निम्मा भारत हा देशद्रोही आहे हे जाहीर करतील असं वाटतंय Happy Happy Happy

मोदी सरकार विरोधी आंदोलनांमध्ये सहभागी झालेल्या आणि सोशल मीडिया किंवा मुख्य प्रवाहातील माध्यमांद्वारे थेट किंवा अप्रत्यक्षपणे 'देशद्रोही' किंवा 'अराजकवादी' संबोधल्या गेलेल्या नागरिकांची एकूण ढोबळ संख्या कोट्यवधींच्या घरात (सुमारे २ ते ३ कोटींपेक्षा जास्त) जाते.

१. शेतकरी आंदोलन (अंदाजे १ ते १.५ कोटी लोक)अंदाज: दिल्लीच्या सीमांवर (सिंघू, टिकरी, गाझीपूर) वर्षभर ठाण मांडून बसलेले शेतकरी, पंजाब, हरियाणा, आणि उत्तर प्रदेशातील त्यांचे कुटुंबीय व समर्थक.
परिणाम: संयुक्त किसान मोर्चाशी जोडलेल्या लाखो शेतकऱ्यांना आयटी सेलने सामूहिकरीत्या 'खलिस्तानी' किंवा 'देशविरोधी' ठरवले होते.

२. सीएए-एनआरसी विरोधी आंदोलन (अंदाजे ५० लाख ते ७० लाख लोक)
अंदाज: शाहीन बाग (दिल्ली), मुंबई बाग, कोलकाता, लखनऊ आणि देशभरातील शेकडो शहरांमध्ये रस्त्यावर उतरलेले नागरिक.
परिणाम: यात प्रामुख्याने मुस्लिम समुदाय आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचा समावेश होता, ज्यांना 'तुकडे तुकडे गँग' म्हणून सामूहिकरीत्या संबोधित केले गेले.

३. विद्यार्थी, स्पर्धा परीक्षांचे उमेदवार आणि तरुण (अंदाजे ३० ते ४० लाख लोक) अंदाज: JNU, AMU, जामिया मिलिया यांसारख्या विद्यापीठांमधील हजारो विद्यार्थी आणि प्राध्यापक.
नवे आंदोलन (२०२६): नुकत्याच झालेल्या NEET पेपर लीक विरोधी आंदोलनात जंतर-मंतरवर जमलेल्या आणि देशभरात 'कॉकरोच जनता पार्टी' (CJP) बॅनरखाली शिक्षण सुधारणांची मागणी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना आयटी सेलने 'अराजकवादी' किंवा 'देशाची बदनामी करणारे' ठरवले.

४. लडाख आणि मणिपूरचे नागरिक (अंदाजे १० ते १५ लाख लोक)अंदाज: लडाखला ६ व्या अनुसूचीचा दर्जा मागणाऱ्या सोनम वांगचुक यांच्या आंदोलनातील समर्थक आणि मणिपूरमधील शांततेसाठी आवाज उठवणारे स्थानिक नागरिक.परिणाम: या सीमावर्ती भागातील आंदोलकांना अनेकदा 'विदेशी शक्तींच्या हातातील बाहुले' म्हणून आयटी सेलने लक्ष्य केले.

५. डिजिटल आणि वैचारिक समूह (अंदाजे १० ते २० लाख लोक)अंदाज: सोशल मीडियावर सरकारच्या धोरणांवर टीका करणारे स्वतंत्र पत्रकार, मानवाधिकार कार्यकर्ते, लेखक, विचारवंत आणि डाव्या-उजव्या विचारसरणीचे विरोधी समर्थक.परिणाम: यांना 'अर्बन नक्षल' किंवा 'टूलकिट गँग'चे सदस्य म्हणून वैयक्तिक आणि सामूहिकरीत्या लक्ष्य केले गेले.

तुमचा धागा पण रिमुव्ह झाला ना? अरेरे!

तिथल्या तुमच्या पोस्ट्स मला खूप आवडल्या होत्या. विशेषतः ती अंतर्वस्त्र वाली. इथे लिहाल का?

तिथल्या तुमच्या पोस्ट्स मला खूप आवडल्या होत्या. विशेषतः ती अंतर्वस्त्र वाली. इथे लिहाल का?

समपादक एक्दा भेटु द्या

एक पण भारतात नाहि का

असो बोस्तण मधे आहे असे गुगलुन कळाले बाकि पता मिळू द्या
ब१ विसा अहे

चांगली पोस्ट अस्चिग.

आशुचॅम्प, तुम्ही तो वीर दास चा व्हिडिओ बघा, त्यात तो बहुतेल ai ला भारतात गेल्या काही वर्षांमध्ये कुणाकुणाला अँटी नॅशनल म्हणलं आहे याची लिस्ट मागतो आणि वर सांगतो, की जे अँटी नॅशनल किंवा अतिरेकी सिद्ध झाले आहेत त्यांना exclude कर... ही भली मोठी लिस्ट येते त्यात.
सापडला व्हिडिओ परत तर देते लिंक.

हो पहिला भारी आहे
म्हणूनच मग मी एआय ला विचारलं हे असे किती लोकं असतील
तर त्यावर आलेले उत्तर टाकलं आहे वरती

थोडक्यात जे भाजप च्या बाजूने नाहीत ते सगळे देशद्रोही आहेत

मागील पानावर आज आलेले आशुचँप आणि भरत यांचे प्रतिसाद उल्लेखनीय वाटले. सोशल मीडियात जंतर मंतर वर झालेल्या आंदोलनात एका मुलीचा मृत्यू झाल्याचे वाचले. पण सर्च दिला तर क्रिटिकल असल्याच्या बातम्या दिसतात. कुणाला माहिती आहे का नेमकं?

बंद मुळे व्यापाऱ्यांचं नुकसान होतं याबाबत दुमत नाही. अचानक अशा पोस्टस का आल्यात? समजा पुढे सत्तांतर झाले (कधी ना कधी होईलच) तर हे लक्षात राहील का?

कुणीतरी हे बोललं. पुष्कळ आहे.
२०२९ ला सत्तापालट व्हावा. कॉंग्रेसने अन्य पक्षांच्या मदतीने सरकार बनवावं. पाशवी बहुमत मिळू नये. नाहीतर पुन्हा माजण्याची शक्यता आहे.
Screenshot_20260723_143310_Facebook.jpg

These are the tools.. आणि ह्यात काही बुद्धिमान वाटणारी लोकंही आहेत, तेव्हा आश्चर्य वाटतं.. That's how cults work though!>>
१००% बरोबर शब्द वापरलाय.... cult

पुन्हा इथे दिसलात तर खिशात पावडर ठेवेन

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत आंदोलक विद्यार्थ्यांना एका पोलिस कर्मचाऱ्याने धमकी दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काँग्रेसने या प्रकरणाचा निषेध करत पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही या घटनेवर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. दरम्यान, मुंबई पोलिसांनी संबंधित कर्मचाऱ्याला निलंबित करून विभागीय चौकशी सुरू केली आहे.

Pages