Cockroach जनता पार्टी झिंदाबाद !

Submitted by ऋन्मेऽऽष on 20 May, 2026 - 16:30

जगभरातले जेन झी पेटून उठत आहेत.
आम्ही भारतीय झुरळे कसे मागे राहणार.
एक ठिणगी पडली आणि बघता बघता वणवा पेटला.

हे आमचे इंस्टाग्राम अकाऊंट
फक्त चार (४) दिवसात 8.5 मिलियन म्हणजे तब्बल 85 लाख फॉलोअर्स.
https://www.instagram.com/cockroachjantaparty?igsh=YjhvYnhrZWJsMWtj

आणि ही आमची वेबसाईट
https://cockroachjantaparty.org/

कुठल्या वेगळ्याच जगात राहत असाल आणि हे काय याची कल्पना नसल्यास धागा वाचत राहा...

क्रांती आता फार दूर नाही...
ऑफ द कॉकरोच बाय द कॉकरोच फॉर द कॉकरोच !

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आशू चॅम्प, खरेना आतली माहिती आहे की जेवण हे चीन आणि पाकिस्तान मधील मित्रांनी पाठवले आहे. एवढी साधी गोष्ट तुम्हाला समजत नाही काय?

आशू चॅम्प, खरेना आतली माहिती आहे की जेवण हे चीन आणि पाकिस्तान मधील मित्रांनी पाठवले आहे. एवढी साधी गोष्ट तुम्हाला समजत नाही काय?

खरे तुम्ही हे पोटासाठी करत असाल तर तसे सांगा आम्ही वर्गणी काढून सोय करतो वर्षभराची. तुम्हाला खरे वाटत असेल तर तुम्हाला रामाची मोदीजींची आणि ३३ कोटी देवांची शप्पथ तुम्ही हे थांबवा. तुम्ही ही शप्पथ मोडली तर मोदींजींची सत्ता २.५ वर्षे कमी होईल.

शर्मिलाजी, सध्या मोदीजी भारत दौऱ्यावर आले आहेत. अतिथी देवो भव ही आपली संस्कृती आहे. टोचणारे प्रश्न विचारून नॉन बायोलॉजिकल माणसाला आणि सुबोध खरे सारख्या माणसाला विनाकारण त्रास देऊ नका ही नम्र विनंती.

अन्याया विरुद्ध आवाज उठवणे हे खरे तर लोकशाहीतील प्रत्येक नागरीकाचे कर्तव्यच आहे. आयामचे, त्याच्या मित्राचे आणि त्यांच्या पालकांचे कौतुक! अल्पनाच्या माहेर घराला चळवळीची परंपरा आहे. तिच्या आईबाबांचे कार्य खूप मोठे आहे. त्यामुळे सुबोध खरेंचे तारतम्य वगैरे पोस्ट वाचून हसूच आले.
आम्ही सत्तेवर नसताना करायचो ते आंदोलन आणि इतर करतात तो देशद्रोह हा डबल ढोलकीपणा! एकीकडे मारे सोईनुसार १९७५ च्या आणिबाणीची आठवण करुन देत डार्केस्ट आवर म्हणत गळे काढायचे आणि एकीकडे यांना जाब विचारला की लोकशाहीची मूल्ये राजरोस पादळी तुडवत लगेच देशद्रोह म्हणून बोंब!
मी मृणाल गोरेंची पाणीवाली बाई बघितली, आणिबाणीत माणसे भूमिगत होताना अनुभवली, मंडल आयोग-आंदोलन पाहिले आणि २०१४ नंतर हळू हळू होणारी मूल्यांची घसरण - ऊठसूठ हिंदू खतरेमेचे फिअर मॉगरिंग, जाब विचारला की पाकिस्तानला जाण्याचा सल्ला देणारे अंधभक्त , इडी आणि पावन करुन घेण्याचा खेळही. माझ्या मते या भाजपने तेव्हाच्या कॉग्रेसपेक्षाही खालची पातळी गाठली आहे. ही वाजपेयींची भाजपच नाही.

खरे ने हे दोन्ही व्हिडिओ टाकून सेल्फ गोल मारलाय

जराही नीट बघितलं तरी कळतंय की काय आहे ये

आणि किरण बेदी लाठी चार्ज बद्दल बोलली आहे, खिळे लावून रक्तपात होईपर्यंत मारा असे म्हणाले नाहीये, तसेच पोलीस नाव लपवून का आले होते, छातीवर नेमप्लेट असते ती का काढण्यात आली होती
जे मारत होते त्यांचे फोटो व्हायरल झाले आहेत त्यात सध्या वेशातले गुंड दिसत आहेत देऊ ते व्हिडिओ आणि फोटो ??

आणि मग बोल

मीच थांबतो जाऊ देत
बोकलत यांनी चांगली आठवण करून दिली
मीच लिहिलं होतं हे इतका विखार का आणि आज माझा तसाच संताप होतोय

पण या लोकांच्या निर्ढावलेल्या वृत्तीचे काय करावं? माणूस म्हणून एक सहवेदना
खरेला इंग्रजी कळत म्हणून empathy नावाची गोष्ट कधी कळणार ??

खरंच या लोकांना असं वाटतं की पावसात बेदम मार खाणारे, रक्तबंबाळ होणारे सगळे पैसे देऊन आणलेले भाडोत्री होते?
याना काय मुले बाळे आहेत का नाहीत नसली तरी माणूस म्हणून काही जाणिवा आहेत का नाहीत का त्याही बोथट झाल्या आहेत

किरण बेदी आत्ताचे आंदोलन हाताळत नाहीयेत. त्यामुळे त्यांनी पूर्वी काय कसे केले ते इथे उगाळून काय सिद्ध होते? सध्याच्या परीस्थितीत जे घडत आहे, जे आयामसारख्या मुलांनी प्रत्यक्ष अनुभवले ते खोटे ठरवायची केविलवाणी धडपड थांबवा.

पोलिस स्वत: आपल्याच गाडीच्या काचा फोडतानाचे व्हिडिओ आहेत.

आज मुंबईत चेंबुरला निदर्शने झाली. खरेने जायला हवे होते आणि इथे उपस्थित केलेले प्रश्न तिथे विचारायला हवे होते मग त्याला सगळ्या प्रश्नाण्ची साग्रसन्गीत उत्तरे मिळाली असती. तसेही पवई अणि चेम्बुर लांब नाही

जेम्स भाजप मुलांना मारताना परिणाम काय होतील याची पर्वा करत नाहीये आणि तुम्ही आंदोलनाच्या क्रेडिट वरून धुळवड होईल म्हणून अनॅलिसिस करत बसलाय. मी तर म्हणतो मोदीजींनी मोदीजींविरुद्ध एक दिवस उपोषण करावे धर्मेंद्र चा राजीनामा घ्यावा आणि क्रेडिट पण घ्यावे. कोणीही काही म्हणणार नाही.

सिरिअसली, या लोकांना मुलांची काळजी नाही, त्यांच्या मागण्यांविषयी आस्था नाही, त्यांच्या भविष्याची चिंता नाही. चिंता कसली तर क्रेडीट कोणाला मिळतंय, जेवण कोण देतंय, पैसे वाटले असतील, कोणी वाटले असतील, वांगचुक वैज्ञानिक आहे की नाही, रॅन्चोचे कॅरैक्टर वांगचुकवर आधारित आहे की नाही..
विशिष्ट ऑर्गनायझेशनच्या लोकांनी (ह्यात रेमेडोके तरूणही आहेत) तर पार वांगचुकची बायको अमेरिकन व सोरोस फाउंडेशनची वगैरे धडधडीत खोटे पसरवणे सुरू केले होते. त्याची पत्नी गीतांजली सीनमधे आल्यावर मग गप बसले. हे सगळे वाट्सप अंकल/आंटी लोक कामातून गेले आहेत. संवेदना, सहवेदना, व्हिजन, सारासार विवेकबुद्धी आणि हो तारतम्य, काहीही उरले नाही यांच्याकडे आता. नुसता एका पक्षाचा खोटार्डा अजेंडा चालवणे! ह्यांना खरंच उपचारांची गरज आहे. स्वतः समाजाचा कुजका भाग बनले आहेत आणि सगळीकडे रोग पसरवत आहेत. मग झुरळं होणारच.

"Pride goes before destruction" means that arrogance or excessive self-esteem often leads to one's downfall.
मोदीजी ह्याचा अर्थ काय ते कुणाला तरी विचारा.

अरे वा!
लोकांनी व्हिडीओ पाहिले हे पाहून भरून आलं!
निदान एवढं मान्य केलं तरी पुरे की पोलीस लाठी मार करतात त्यात त्यांना आनंद होत नाही.
इथे टोळीच्या लोकांना समजून आले असेल की असे कितीही व्हिडीओ पाठवता येतात ज्याने दुसऱ्या बाजूच्या लोकांना कटकट होते.
मायबोलीवर जिथे तिथे असे दुवे व्हिडीओ टाकून एका उत्तम स्थळाचा विचका कसा होतो हे त्यांना त्यांच्याच औषधांचा डोस देऊन मी दाखवलं आहे.

माणसं चिडचिड झाली की किती खालच्या पातळीवर उतरू शकतात हेही सर्वांना सहज समजून आलं.

लोक माझ्या वैयक्तिक पातळीवर किती खाली उतरू शकतात हेही त्यांनी दाखवून दिलं.

बाकी मला काहीही सिद्ध करायचं नाही.
भाजप च्या अनेक चुका झाल्या आहेत आणि पुढेही होतील.
माझा संघाशी किंवा भाजपशी कोणताही संबंध नाही किंवा राजकारणात उतरण्याचा हेतू नाही.
माझ्यामुळे काही लोकांच्या अंगाची लाहीलाही झाली काहींची फार चिडचिड झाली त्यांची मी क्षमा मागतो.
या आंदोलनात इजा झालेल्या विद्यार्थ्यांबद्दल मला पूर्ण सहानुभूती आहे त्याचबरोबर त्यांनी इजा केलेल्या पोलिसांबद्दल लोकांना सहानुभूती असावी इतकेच माझे म्हणणे आहे.

यावर मी या धाग्यावरून रजा घेतो आहे.

कुणालाही मुद्दाम दुखावणे हा माझा हेतू नाही.

त्यातून काही लोक हा गेला म्हणून सुटकेचे चार अवमानकारक शब्दही इथे लिहितील.
त्यांचेही भले होवो.

भेटूच

https://www.instagram.com/reel/DbFvmjRhoMX/?igsh=MTl0a3IxNXJxdzdpYw==

ITBP आणि इतर असे १०००० जवान जंतर मंतर जवळ deploy केले आहेत. मला भीती वाटते की ह्यांनी जंतर मंतर चा तिआन मेन स्क्वेअर नको करायला.

माणसं मारण्यात यांचे असलेले निर्ढावले पण माहित आहे म्हणून भीती वाटते.

एवढं मान्य केलं तरी पुरे की पोलीस लाठी मार करतात त्यात त्यांना आनंद होत नाही.>> तेच टाळता आलं असतं हेच म्हणायचं आहे आम्हाला. मुलांशी निट बोलणी करून.. वांगचुकच उपोषण बोलून थांबवता आलं असतं. लाठ्यांपर्यंत वेळ आली नसती.

भाजप च्या अनेक चुका झाल्या आहेत आणि पुढेही होतील.>> त्या चुकांची जबाबदारी घ्यायला त्यांनी शिकलं पाहिजे.

या आंदोलनात इजा झालेल्या विद्यार्थ्यांबद्दल मला पूर्ण सहानुभूती आहे त्याचबरोबर त्यांनी इजा केलेल्या पोलिसांबद्दल लोकांना सहानुभूती असावी इतकेच माझे म्हणणे आहे.>> ज्यांना मार लागला त्या सगळ्यांबद्दल सहानुभूती आहे. पण हे टाळता आलं असतं. आणि या लाठीचार्ज ची जबाबदारी पण कुणीतरी घ्यायलाच पाहिजे

यावर मी या धाग्यावरून रजा घेतो आहे.>> त्यामुळे कदाचित तुम्ही हे वाचणार नाही.

पण वाचलंच तर ज्यांना अजूनही कळलं नाही त्यांना नक्की सांगा -

भाजप च्या अनेक चुका झाल्या आहेत आणि पुढेही होतील.>> त्या चुकांची जबाबदारी घ्यायला त्यांनी शिकलं पाहिजे.

गिरे तो भी टांग उपर

असो

या आंदोलनात इजा झालेल्या विद्यार्थ्यांबद्दल मला पूर्ण सहानुभूती आहे >>>

निदान एकतरी अंधभक्त इतकं बोलला हेही नसे थोडके

निदान एकतरी अंधभक्त इतकं बोलला हेही नसे थोडके
हा लोकशाहीचा विजय आहे. चुका दाखवणे हे विरोधकांचे काम आहे.

आयटी सेलने सध्या time please घेतल्याने आता कुठलेच अंधभक्त येथे काही काळ येणार नाहीत.

अल्पना, ही प्रथमदर्शी पोस्ट वाचुन गलबललं. आपल्याच देशाच्या नागरिकांवर, मुलांवर, वृद्धांवर हे अत्याचार. वर हे खरे टाईप लोक म्हणणार संसदेवर आले तर काय दुसरं करायचं? अचानक एक दिवस उठून संसदेवर आलेले नाहीत हे. इतके दिवस नाकर्तेपणा केल्याने आलेले आहेत. वे़ळीच कारवाई झाली असती, बोलणी झाली असती तर ही वेळ येती ना. त्या परिसरात किती सुरक्षा आहे आणि कोणाला कसं जाऊ दिलं जात, नेहेमीच, तर हे असं होण्यात सरकारची किती भयानक चूक आहे हे समजणे अवघड नाही.

खरे इथे रजा घेत आहेत हा त्यांचा दुसरा उत्तम निर्णय. पहिला मी मी पणाचे तुणतुणे कमी करणे होता. सुधारायला वाव आहे तर.
भ्रमर, तुला कशाला दुसरे हवे आहेत?! Lol

भ्रमर, अमितव, केशवकूल,

(माझ्याबद्दल लिहिले असलेत तर)

नियमित वाचत आहे. येथे काही लिहिणे हे बंद केले ह्याची कारणे:

■ मी विद्यार्थ्यांप्रती सहानुभूती व्यक्त केलेलीच होती. (तेवढे केले की झाले असे म्हणत नाही)

■ दोन्ही बाजूंचे असंख्य व्हिडीओ सोमीवर डोळ्यांवर आदळत आहेत. पण दुसरी बाजू असू शकते हे येथे कदापिही मान्य होणार नाही ह्याची खात्री आहे. सोमीवर व वाहिन्यांवर (ज्याला गोदी मीडिया म्हंटले जाते) पुराव्यांसकट नेमकी दुसऱ्या बाजूचीच असंख्य उदाहरणे दाखवली जात आहेत. ते सगळे खोटे, असंवेदनशील व महामुर्ख आणि येथे सगळे विद्वान असे असल्याने मी फक्त वाचत आहे.

■ काही लिहावे तर असे नक्की म्हंटले जाईल की तू असंवेदनशील, निर्लज्ज, आंधळा आहेस.

■ येथील भाषेचा स्तर न गाठणे हे माझे माझ्यापुरते धोरण आहे.
=====

दुसरे एक:

वर अल्पनाताई ह्यांनी व अनेक धाग्यांवर भरत ह्यांनी इंग्लिशमधील असंख्य मोठया पोस्ट्स कॉपी पेस्ट केल्या आहेत. तेव्हा हे मराठी संकेतस्थळ असल्याचा उल्लेख झालेला नव्हता. मी एकदा करणारही होतो एका कोणत्यातरी धाग्यावर, पण त्या गोष्टीवरून कोणाला काही म्हणावे असे वाटले नाही व शेवटी तो येथील प्रशासकांचा विषय आहे.

असो!

वाचत राहणारच आहे.

Pages