क्रिकेट - १०

Submitted by कृष्णा on 13 October, 2025 - 07:56

जुना धागा २००० पार होऊ लागला म्हणून हा नविन धागा.

इथे जुना धागा आहे...

https://www.maayboli.com/node/86160

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

प्रामाणिकपणे आजचा त्याचा खेळ पाहून असे वाटलेले कि ह्या गॅपमूळे तो फ्ल्यूएंसी घालवून बसला आहे. दर वेळी ब्रेकनंतर परत ग्रूव्ह मधे यायला वेळ लागतोय. आपण तसे वन डे कमीच खेळतो त्यामूळे ह्यावर काही सहज इलाज दिसत नाही. तेंव्हा ही मूव्ह फारशी चकित करणारी नसावी. वर्ल्ड कपसाठी तयारीच करायची असेल तर आत्ताच स्टेप घेतली तर काही फारसे चूक ठरेल असे नाही. पण जाण्या आधी एक ग्लोरीयस इनिंग बघायला आवडेल. दोनदा दोनशे करणारा पूर्वीचा रोहित परत एकदा तरी बघायला आवडेल.

आज ७ विकेट्स पडल्यावर अय्यरकडून धोनीसारख्या खेळीची अपेक्षा होती मला. टेल-एंडर्सना हाताशी धरत, गरज पडेल तेव्हा स्ट्राईक फार्म करत शेवटपर्यंत (पूर्ण ५० ओव्हर्स) खेळून २६० च्या पलिकडे स्कोअर न्यायला हवा होता. एंड रिझल्ट बदलला असता कि नाही ते सांगता येणार नाही पण ही मॅच्युरिटी बघायला आवडली असती.

शर्माची तडाखेबंद मोठी खेळी बघायला नक्कीच आवडेल.

रविवारी रोहित शर्माची लास्ट मॅच आहे. मी पण रविवारी लास्ट मॅच बघणार नंतर क्रिकेटला रामराम. सचिन नंतर रोहित एकच होता ज्याच्यामुळे मॅच बघायला मजा यायची.

आज टी २० मधे सोबर्स हे नाणे काय चालले असते राव ! अमेझिंग आकडे आहेत सगळेच. बॉलिंगचे किती प्रकार ! अशक्यप्राय प्रकार आहे सगळाच !

क्रिकेटमधलं एक अवलिया व्यक्तिमत्व, काळाच्या कसोटीवर आजही लक्ख उठून दिसतील असे अष्टपैलू रेकॉर्ड्स असलेल्या आणि “जीवन हे जगण्यासाठी आहे“ ही उक्ती कृतीतून सिद्ध करणार्या गॅरी सोबर्स ला विनम्र श्रद्धांजली!

* जीवन हे जगण्यासाठी आहे“ ही उक्ती कृतीतून सिद्ध करणार्या गॅरी सोबर्सला...*. - अगदी खरंय फेफजी !
सोबर्सना मैदानावर पाहणं हाच एक आनंद असे. इतका चपळ, चतुरस्र व सहजसुंदर वावर असणारा खेळाडू अगदी दुर्मिळच! आपले सोलकर, अझरुद्दीन, कपिल असे काही खेळाडू याच पठडीतले पण त्यांनाही सोबर्स गुरुस्थानीच असावेत .
नक्की साल आठवत नाहीं पण ब्रेबॉर्न स्टेडियमवरचा भारत वि. वे. इंडीज कसोटी सामना. कर्णधार सोबर्स संघाच्या किंचित पुढे पण सहकाऱ्यांशी हंसत खेळत टाळ्यांच्या गजरात मैदानात उतरतो, कमरेतून किंचीत पुढे वाकून पण छाती पुढे काढलेली, शर्टाची कॉलर वर, छातीवरची बटणं उघडी व बेफिकीर, सहजचा अहंकाररहीत आत्मविश्वास मिरवत !! स्टेडियममध्ये कुजबुज, ' तो बहुतेक आजच मॅच संपवणार, उद्या त्याला महालक्ष्मी रेसकोर्सवर डर्बीला जायचंय ' ! आणि खरंच, त्या दिवशी नाहीं पण दुसऱ्या दिवशी लंचपूर्वी सामना जिंकून सोबर्स डर्बीला हजर; पण त्यातही फुशारकी नाही, घमेंड नाही, फक्त ' शक्य आहे तर जरा इथल्या डर्बीची पण मजा घेऊ की ', ही जगण्याची मस्त वृत्ती !
वर्ल्ड इलेव्हन वि. ऑस्ट्रेलिया कसोटी ( पॅकर सिरीज ). सोबर्स 254! खुद्द ब्रॅडमन म्हणतात, ' माझ्या आयुष्यात मी पाहिलेली सर्वोत्तम फलंदाजी ! ' . त्या खेळीत वापरलेली बॅट अगदी सहज, बिनदिक्कत व दिलदारपणे सुनील गावसकरला बहाल करून सोबर्स मोकळे !!!

वाह भाऊ! मस्त आठवण शेअर केलीत. इंटरनेटवर प्रसिद्ध झालेल्या मसाला घातलेल्या किस्स्यांपेक्षा असे प्रत्यक्षदर्शी अनुभव फार भावतात.

ज्या काळी कसोटी सामने आजच्या पेक्षा अगदी कमी व्हायचे त्याकाळातील हे सोबर्सचे आकडे आहेत. अशा खेळाडूंमुळे क्रिकेट gentleman's game वाटायचा. अतिशय स्पर्धात्मक पण खिलाडू वृत्ती. He was first superstar. Anju Mahendru बरोबरचे प्रकरण, सहा सिक्सर, 365 n.o. सगळच अचाट.
त्यांना श्रद्धांजली.

छान आठवण भाऊ!

महालक्ष्मी डर्बी वाचून त्याच्या दुसऱ्या आठवणी डोळ्यासमोर आल्या पण त्या पुन्हा कधीतरी...

*...सहा सिक्सर, * - तो व्हिडिओ पाहिलाय. किती सहज मारल्या आहेत त्या सिक्स ! नंतरच्या मुलाखतीत तो म्हणतो, पहिल्या चार सिक्स मारेपर्यंत मनात विक्रमाचा विचारच नव्हता; पाचवी मारली व मग मात्र ठरवून रेकॉर्ड केला ! ज्या गोलंदाजाला ह्या सिक्सर मारल्या, तो पण आनंदात मिरवतोय म्हणून कुणी त्याला छेडलं, तर तो म्हणतो, 'सोबर्स बरोबर माझं नांव आता घेतलं जाणार तर आणखी काय हवं !!!!' . इति सोबर्स महात्म्यम ! Wink

आणि ते सिक्सर्स जुन्या बॅट्स ने बनवले होते ज्या खूप पातळ असत. जर का आजच्या बॅट्स असत्या तर बहुतेक वर्षाला एकदा तरी सहा चेंडूवर सहा सिक्सर्स मारले असते.

आज आपण बुमरा अन् कुलदीपला बसवून अर्शदीप, प्रसिध, गुरनूर, प्रिन्स या चौघा टी २० बॉलर्स ना अक्षर सोबत खेळवतोय. निम्म्याहून अधिक ओव्हर्स मधे आपल्याला एकही विकेट काढता आली नाहीये. दुबे ऐवजी राहुल ला आणल्याने कुणी पार्ट टाइम बॉलर ही नाहीये...

रोहित शर्माचं शतक आणि द्विशतकाकडे वाटचाल. आज रोहित शर्माचं द्विशतक होऊ दे मेस्सी हारला तरी चालेल.

खाईन तर तुपाशी (बाउंडरी) नाहितर राहीन उपाशी (नो सिंगल्स) अशा विचारात आज खेळलेत.

रोहित ला बहुधा गंभीर नि आगरकर ला आज मिडल फिंगर दाखवायची होती Wink

बटलर गोल्फ खेळल्यासारखा पॉवर गेम खेळू शकतो नि सध्या रेड हॉट फॉर्ममधे आहे अशा माणसाला स्लो, स्लोअर नि स्लोएस्ट बॉल टाकण्यात काय पॉईंट होता देवच जाणे !

अय्यर 4 नंबर वर सेट असताना किशन साठी त्याचा नंबर चेंज करून त्याचा गेम डिस्टर्ब केलाय
आज किशन ला डेथ मध्ये मारायला ठेऊन अय्यर / राहुलला वर खेळवायला हवं होतं. शेवटच्या 4 ओव्हर्स मधे 50 मारायला थंड डोक्याने फोडून काढता येणारा कुणीतरी हवा. ते राहुल / अक्षरचं कामच नाही...

शेवटच्या तीन ओव्हर्स मधे वाटलेल्या 62 रन्स च्या खिरापतीमुळे हरणार आपण

Rohit Sharma becomes the first Indian batter to score an ODI hundred at Lord’s.

Aged 39 years & 80 days, Rohit Sharma is the oldest to score an ODI century at Lord’s and the oldest for India across all formats.

Century in Southampton
Century in Birmingham
Century in Nottingham
Century in Manchester
Century in Leeds
Century in Bristol
Century in London (Kennington oval)

Only lords pending. Getting into the lords honours board will be iconic

Do it man Rohit Sharma

^^^^^^^^^^

असा मेसेज फिरत होता.

भावाने शब्द राखला. Happy

टीम सिलेक्शन फारच चमत्कारिक होतं. कुलदीप आणि बुमराह उपलब्ध असतील तर ते ऑटोमॅटिक चॉइसेस असले पाहिजेत. ह्या बॉलर्सनी ४०० च्या आत इंग्लंडला रोखलं हेच कौतुक आहे.

ऑलराऊंडर्स म्हणजे फक्त बॉलर्सना च बॅटिंग करता यायला हवी असं का? बॉलिंग टाकू शकणारे बॅट्समन पण चालू शकतील ना?

स्पेअर अ थॉट फॉर रो-को! ते दोघं क्रीझवर असेपर्यंत आशा जिवंत होत्या. गंभीर-आगरकर ना कुणी काही प्रश्न विचारणार असतील ही अपेक्षा आहे.

ऑलराऊंडर्स म्हणजे फक्त बॉलर्सना च बॅटिंग करता यायला हवी असं का? बॉलिंग टाकू शकणारे बॅट्समन पण चालू शकतील ना?
>>
या कॅटेगरी मध्ये आपण हार्दिक ची रिप्लेसमेंट शोधताना दुबे पाशी अडकलोय. फार फार तर नीतिश / हर्षित / सुंदर कडे जातो. टॉप ऑर्डर बॅटर नी बॉलिंग करावी अशी अपेक्षा असल्यास आपण सुंदर ला 2- 3 डाऊन बॅटिंगला पाठवतो
या लूप मधून बाहेर येत नाही तोवर अवघड आहे...

स्पेअर अ थॉट फॉर रो-को! ते दोघं क्रीझवर असेपर्यंत आशा जिवंत होत्या.
>>
रोहितचा हॅमस्ट्रिंग पुल झाला नसता तर निकाल वेगळा दिसू शकला असता

“ या कॅटेगरी मध्ये आपण हार्दिक ची रिप्लेसमेंट शोधताना दुबे पाशी अडकलोय. फार फार तर नीतिश / हर्षित / सुंदर कडे” - आचार्य अत्र्यांचं विनोदावर एक भाषण आहे. त्यात अपेक्षाभंगातून विनोदनिर्मिती कशी होते ते सांगताना ते म्हणतात कि “टिळक गेले, गांधीही गेले….. हल्ली माझीही तब्ब्येत बरी नाहीये“. त्याच धर्तीवर टीम मॅनेजमेंटचं “पंड्या इंजुअर्ड आहे…. हर्षित राणा सुद्धा अनुपलब्ध आहे“ हे विधान वाटतं मला Happy

आपल्याकडे तरुणाईतली एवढी प्रचंड प्रमाणात प्रतिभा वारंवार आपल्याला आयपीएल, रणजी इ.त दिपवून टाकत असते, तरीही आपल्याला रिप्लेसमेंटचा प्रश्न भेडसावतो हेच आश्चर्य आहे. उदंड चांगल्या नवोदितांपैकी खरेखुरे असामान्य प्रतिभावान खेळाडू हेरण्यात व त्यांना वेळीच संधी देण्यात आपण कमी तर पडत नाही ना ? अजूनही आपण रोकोवरच अवलंबून रहाणं फारसं कौतुकास्पद नाही, जरी त्या दोघांसाठी तें खरंच तसं असलं तरीही. पंड्या निश्चितच उपयुक्त खेळाडू आहे पण रोको श्रेणीतला असामान्य नाही व त्यालाही पर्याय नसणे हे तर क्रिकेट धोरणासाठी लज्जास्पदच !!!

कुलदीपला बसवण्याचे कारण बहुधा आपण आफ्रिका नि ऑस्ट्रेलियाच्या कप ची तयारी करत आहोत हे असावे. तिथे लागणारा गोलंदाजांछा ताफा चाचपडणे सुरू आहे. गंभिरचे ऑल राऊंडर वरचे प्रेम बघता, तिथला एकमेव स्पिनर अक्षर किंवा सुंदर असेल असे वआटते. कदाचित क्रूणाल वगैरेची जो बॅटींग करू शकतो त्याची वर्णी लागू शकेल. कुलदीप नि बॅटींग हे फारसे जमत नसल्यामूळे तो वगळला जात असावा. आआणि तसे पाहता मागची मॅच शेवटच्या ३-४ ओव्हर्स मधे घालवली आहे आपण.

Pages