Submitted by ऋन्मेऽऽष on 20 May, 2026 - 16:30
जगभरातले जेन झी पेटून उठत आहेत.
आम्ही भारतीय झुरळे कसे मागे राहणार.
एक ठिणगी पडली आणि बघता बघता वणवा पेटला.
हे आमचे इंस्टाग्राम अकाऊंट
फक्त चार (४) दिवसात 8.5 मिलियन म्हणजे तब्बल 85 लाख फॉलोअर्स.
https://www.instagram.com/cockroachjantaparty?igsh=YjhvYnhrZWJsMWtj
आणि ही आमची वेबसाईट
https://cockroachjantaparty.org/
कुठल्या वेगळ्याच जगात राहत असाल आणि हे काय याची कल्पना नसल्यास धागा वाचत राहा...
क्रांती आता फार दूर नाही...
ऑफ द कॉकरोच बाय द कॉकरोच फॉर द कॉकरोच !
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सोमीवर बसून रस्यावर उतरण्याचे
सोमीवर बसून रस्यावर उतरण्याचे सल्ले देऊ नयेत.
हा सल्ला आपण झुरळांच्या नेत्याला द्या.
हा सल्ला आपण झुरळांच्या
हा सल्ला आपण झुरळांच्या नेत्याला द्या.>>
चर्चा या धाग्यावर सुरू आहे. या धाग्यावर जे लिहिले ( आणि मग त्यात यू टर्नही झाला, ही वेगळी गोष्ट) त्याबद्दल ती कॉमेंट आहे.
तेव्हा या संदर्भात टिप्पणी करा, ती विषयावर राहील.
हिरवट टाळक्याचा हा उल्लेख
हिरवट टाळक्याचा हा उल्लेख ब्यंकटेश माडगूळकरांचाच आहे पण तो तुम्ही म्हणता तसा नाहिये.
गम्मत म्हणजे हा उल्लेख त्यांच्या बाबाखान दरवेशी ह्या व्यक्तिचित्रात त्याचे वर्णन करताना आहे. आणि त्याचा अर्थ भडक माथ्याचा असे आहे.
ओके
ओके
पण बरे झाले तुम्ही नेमक्या कुठल्या अर्थाने म्हणालात हे क्लिअर झाले.
कारण दुर्दैवाने आजकाल या शब्दांचे संदर्भ बदलले आहेत.
आणि या आंदोलनाबाबत सुद्धा असे प्रयत्न आधीच चालू आहेत. अमुक तमुक दहशतवाद्यांना सपोर्ट करणारे वगैरे अपप्रचार चालू आहेत
माझ्या आठवणीप्रमाणे हा उल्लेख
माझ्या आठवणीप्रमाणे हा उल्लेख देन्या बाड या त्यांच्या वर्गमित्राच्या संदर्भात आहे आणि तो १९४२ च्या चळवळीत पत्री सरकार मध्ये कमांडर होता.
त्याने विचारले कि काही सावकाराचे प्रश्न जमीनीचा वाद असेल तर बंदूक दाखवून मिटवता येईल.
त्यावर व्यंकटेशानी त्याला विचारले आमच्या माणदेशात शंभर तरुण नोकरी विना आहेत त्यांना नोकरी देता येईल का ?
किंवा येथे दुष्काळ फार पडतो तेंव्हा धरण बांधून पाण्याची सोय करता येईल का?
यावर देन्याने ते करण्यात असमर्थता दाखवली.
यावर त्यांची टिप्पणी होती कि खळ्ळ खट्याक क्रांती करून असे प्रश्न कायमचे सोडवणे शक्य नाही.
अपयशी शिक्षण मंत्र्यांचा
अपयशी शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा न घेण्यामागे काय असहायता असेल मोदीजींची? >>>
कारण सगळे कार्य पंतप्रधान ऑफिस आणि शाह संचालित करतात. मंत्री फक्त बाहुले आहेत. प्रधान चा राजीनामा घेतला तर पुढे मोदीचा राजीनामाही मागितला जाईल.
उगाच त्याला धार्मिक रंग देऊन
उगाच त्याला धार्मिक रंग देऊन आपल्या मनात कोतेपण/ खुजेपण
>>>
तुम्हा लोकांचे दाखवायचे आणि वागवायचे रंग कसे वेगळे आणि वेगवेगळे आहेत, हे सार्यांना माहिती आहे. त्यासाठी कोतेपण आणि खुजेपण हे शब्द फारच मवाळ आहेत.
गेल्या लोकसभेत मोदींचे स्थान
गेल्या लोकसभेत मोदींचे स्थान काहीसे डळमळीत झाले होते. ओरिसामधून कसाबसा आधार मिळवला आहे. ह्या राजकीय असहायतेमुळे बहुतेक धर्मेंदर प्रधानचा राजीनामा घेतला जात नसावा.
पण ही राजकीय सबब त्या सरकारची आणि पक्षाची आहे. विरोधी पक्षाने आणि नीट लीक प्रकरणी पोळलेल्या जनतेने ह्याची पर्वा करण्याचे कुठलेही कारण नाही.
त्या नालायक मंत्र्याचा राजीनामा घेतलाच पाहिजे. पुढचा शिक्षणमंत्री निदान ह्या धाकात राहील की विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळणारा भ्रष्टाचार लोक सहन करणार नाहीत.
देशाचा पंतप्रधान शिकलेला असता
देशाचा पंतप्रधान शिकलेला असता तर त्याला neet परीक्षेचे महत्व कळले असते.
देशाचा पंतप्रधान शिकलेला असता
देशाचा पंतप्रधान शिकलेला असता तर त्याला neet परीक्षेचे महत्व कळले असते.>>> अगदी +++
इथे किती लोक शिकलेले आहेत?
इथे किती लोक शिकलेले आहेत? त्यांचय शिकलेले असल्या-नसल्याने नक्की काय फरक पडला आहे?
शिक्षण नाही हा टोमणा मारायचा असेल तर मारा... पण मुद्दलात बरंच काही मिसिंग आहे ते विसरू नका!
इथे किती लोकांनी neet परीक्षा
इथे किती लोकांनी neet परीक्षा दिलेली आहे?
लोकांनी टिप्पणी करण्या अगोदर मी दोन वेळेस अखिल भारतीय वैद्यकीय स्पर्धा परीक्षा यशस्वी पणे दिलेली आहे हे स्पष्ट करू इच्छितो
इथे किती लोकांनी पेपर फुटलेली
इथे किती लोकांनी पेपर फुटलेली नीट दिली आहे?
मी पेपर फुटलेली दहावी दिली
मी पेपर फुटलेली दहावी दिली आहे
>>> इथे किती लोकांनी neet
>>> इथे किती लोकांनी neet परीक्षा दिलेली आहे?
अश्या प्रकारचे मुद्दे इथे गांभीर्याने घेतले गेले तर फक्त कविता, गझला, कथा व गप्पांची वाहती पाने राहतील. अनेक सदस्यांना येथे नीरस वाटू लागेल.
अश्या प्रकारचे प्रश्न येथील जवळपास प्रत्येक चर्चेला लागू होतील . अश्या प्रकारचे प्रश्न जर निकष ठरले तर अनेकजण काहीही लिहू शकणार नाहीत. 'तुम्ही का रस्त्यावर उतरून आंदोलन करत नाही?' हा प्रश्न कॉक्रोच जनता पार्टीच्या मूळ ध्येयाशी सहमत असलेल्यांना याच धाग्यावर विचारला जाऊ शकेल.
तेव्हा, पु ल यांचे वाक्य आठवायचे आणि तुफान चर्चा करत राहायची.
तुम्ही त्या परीक्षेत पास झाला आहात म्हणून तुम्ही हे विचारू तरी शकता.
प्रस्थापित व्यवस्थेला प्रश्न
प्रस्थापित व्यवस्थेला प्रश्न विचारणं, प्रश्न विचारु शकणं वेगळं. शब्दांची आणि वाक्यांची नाजायज आणि बेकायदेशीर अफरातफर करुन गद्य आणि पद्यात पोश्टींचे परिच्छेद रचणं वेगळं.
झुरळ जाते भिंत चढुनी, पोहोचे
झुरळ जाते भिंत चढुनी, पोहोचे दुसरीकडे,
धागा निघे एका वाटे, डुगुडुगे मागेपुढे
विषय होता राजकारण, सुरुवातीला भारी
चार प्रतिसादांत झाली झिंगायची तयारी.
इतिहासातून अर्थशास्त्र, तिथून खुर्ची दुरुस्ती
असे वळावे धागे जणू झुरळांचीच वस्ती.
कोक्रॉच जनता पार्टीचा हाच महान विचार
भरकटण्यात आहे गती, विषयाचा घाला आचार
वाचक खुळा शोधत बसतो मूळ प्रश्नाचा धागा
चर्चा करत असते कुस्ती, घोडं फरार पलटी टांगा
स्त्रिच्या आरोग्य समस्या फक्त
स्त्रिच्या आरोग्य समस्या फक्त स्त्रीलाच कळू शकतात,त्यामुळे जगात कुठेच पुरुष स्त्रीरोगतज्ज्ञ दिसत नाहीत.
त्यामुळे जगात कुठेच पुरुष
त्यामुळे जगात कुठेच पुरुष स्त्रीरोगतज्ज्ञ दिसत नाहीत. >>> हे जरा जास्तच झालं. बरेच पुरुष स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत.
खान सरांचा गेम केला आता.
खान सरांचा गेम केला आता.
सगळीकडून तुटून पडले आहेत.
बिकाऊ मीडिया तर चेकाळली आहे.
सोशल मिडिया ताकद दाखवायची वेळ आली आहे या लोकांना...
देशाचा पंतप्रधान शिकलेला असता
देशाचा पंतप्रधान शिकलेला असता तर त्याला neet परीक्षेचे महत्व कळले असते.
याच नात्याने मग मी विचारले किती लोकांनी नीट (किंवा वैद्यकीय प्रवेश परीक्षा) दिलेली आहे.
त्यावर लगेच लोकांना मिरच्या झोंबल्या.
असो
चालायचंच
आपलं तो बाब्या दुसर्याचें ते कार्ट.
खरे सर, ते सगळे उपाययोजना
खरे सर, ते सगळे उपाययोजना करण्याच्या क्षमतेचे आहेत का? त्यांच्याकडे अधिकार आहेत का?
कि पंतप्रधान आणि हे लोक एकाच पातळीवर आहेत?
<<'तुम्ही का रस्त्यावर उतरून
<<'तुम्ही का रस्त्यावर उतरून आंदोलन करत नाही?'>>
हा प्रश्न इथेच नव्हे तर कुठेही केवळ माहिती करता विचारला तरच त्याला थोडाफार अर्थ असेल. कुणाची इच्छा नाही/ इच्छा आहे पण वेळ नाही/मला रस्यावर आंदोलन करण्याची भीती वाटते/जाणार आहे/ इत्यादि माहिती मिळेल. त्याचे काय करायचे ते प्रश्नकर्त्याला माहित.
"तुम्ही इथे काय लिहिता/फक्त इथे लिहुन काय फायदा, तुम्ही रस्त्यावर जाऊन आंदोलन करा." हा स्टान्स असेल तर तो उंटावर बसून दिलेला सल्ला आहे.
("तुम्ही सीजेपी विरुद्ध इथे काय बोलता जा रस्यावर उतरून आंदोलन करा" असे इथल्या सीजेपीला विरोध करणाऱ्यांना म्हटले तर तो सुद्धा तेवढाच वाह्यातपणा असेल.)
त्यात खाऊन पिऊन ढेकर देऊन वगैरे मसाला असेल तर तो मुद्देवंचितांचा नो बॉल/ शहाजोगपणा/ट्रोलिंग वगैरे प्रकारात मोडेल.
फक्त इथे -सोमीवर- लिहावे की रस्यावरील आंदोलनात सहभागी व्हावे की दोन्ही करावे हे लोक स्वतः ठरवतील.
"या माझ्या सोबत, मी रस्यावर उतरून आंदोलन करत आहे", किंवा "आपण रस्यावर उतरून आंदोलन करायचे का?" म्हटले तर त्याला नक्कीच अर्थ आहे. काही इच्छुक लोक होतीलही तयार.
(एवढे लिहिले तर हे पण: माझ्या सीजेपी बद्दलच्या आधीच्या भूमिकेत - ना पाठिंबा ना विरोध - अद्याप बदल नाही. पाठिंब्याची शक्यता तूर्तास कमी वाटते आहे.
विरोध असेल तरी आपल्याला आवडत नाही ना मग त्यांच्यावर काय वाट्टेल ती दडपशाही होई ना का, काहीपण बदनामी होई ना का आपल्याला काय त्याचे असे वाटणार नाही.)
@राज अज्ञानी
@राज अज्ञानी
कि पंतप्रधान आणि हे लोक एकाच पातळीवर आहेत?
जर मोदीला नैतिकतेची चाड असेल तर त्याने प्रधानला आधीच हाकलून द्यायला हवे होते.
हा प्रतिसाद पहा.
अतिशय सभ्य आणि संयत भाषेत मांडलाय नाही?
>>> हा प्रश्न इथेच नव्हे तर
>>> हा प्रश्न इथेच नव्हे तर कुठेही केवळ माहिती करता विचारला तरच त्याला थोडाफार अर्थ असेल.
माझ्या प्रतिसादाचा अर्थ असा आहे की अश्या प्रकारचे प्रश्न जर विचारणे। सुरू झाले तर चर्चा होणे अवघड होईल.
त्यांनी ती परीक्षा दिली म्हणून ते विचारू शकले.
(यात कोणालाही उद्देशून काही नाही.)
खरे सर
डुपुक (ड्युप्लिकेट कमेंट)
खरे सर, मी काय विचारले त्याचा
खरे सर, मी काय विचारले त्याचा मतितार्थ तुम्हाला समजलेला आहे असं मी समजतो.
कुणी लिहिले हे मी पाहिले नाही. लिहिणारा माझा नातेवाईक नाही आणि त्याने एकेरी उल्लेख केला हे बरोबर कि चूक हे माझ्या प्रश्नाचे उत्तर नाही.
पंतप्रधानांनी नीटची परिक्षा दिली असती तर या वाक्यात पंतप्रधानांना पेपरफुटीचे गांभीर्य आहे का हा प्रश्न आहे असे मी समजतो. या परीक्षेसाठी उपाययोजना सरकारच करू शकते. पंतप्रधानांना गांभीर्य आहे का म्हणून सामान्य माणसाला पण ते आहे का असे विचारणे यातले लॉजिक समजले नाही. सामान्य माणसाकडे पण तितकेच अधिकार आहेत कि पंतप्रधान पण सामान्य व्यक्ती प्रमाणेच हतबल आहे हा माझा प्रश्न आहे.
असभ्य भाषा हा वेगळा विषय आहे आणि त्याचा निषेध तुम्ही कमेण्ट कर्त्याकडे केलाच असेल. मी त्यासाठी जबाबदार आहे कि मॉडरेशनचे अधिकार माझ्याकडे आहेत?
Following widespread outrage
Following widespread outrage over a handwritten "guess paper" leak, the central government has officially cancelled the May 3, 2026 NEET-UG examinationand implemented several sweeping legal, administrative, and logistical measures.
CBI Probe Ordered: The Ministry of Education handed over the comprehensive investigation to the Central Bureau of Investigation (CBI) to dismantle organized paper leak networks.Mass Arrests: Multiple crackdowns across several states—including Rajasthan, Haryana, and Maharashtra—have led to the arrest of key kingpins and suspects associated with the exam mafia.
Parliamentary Accountability: The Parliamentary Standing Committee on Education has strictly demanded written action-taken reports from both the National Testing Agency (NTA) and the CBSE regarding loopholes in examination execution and command failures.Revised Exam Schedule and Candidate ReliefNationwide Re-test: A fresh pan-India NEET-UG re-examination is officially scheduled for June 21, 2026.
No Extra Fee: Over 22 lakh registered medical aspirants can appear for the re-test without any additional registration fees.City Preference: To minimise candidate distress, Union Education Minister Dharmendra Pradhan announced that students are permitted to choose their preferred exam city for the re-test. Admit cards are being re-issued on the official NTA Portal.
Tightened Security Measures for the June 21 Re-testMilitary Logistics: The government has roped in the Indian Air Force (IAF) to securely transport confidential question papers from printing presses directly to 18 key locations nationwide, eliminating transit leaks.Paper Setters Isolation: Subject matter experts and paper setters have been placed under strict communication blackouts and isolation in undisclosed locations without phone or internet access.Cyber Crackdown: The NTA and Ministry of Electronics and Information Technology are actively collaborating with tech giants (including Meta, Google, and Telegram) to instantly block channels attempting to fraudulently sell fake or simulated re-test question papers.
Long-term Structural ReformsEnd of Pen-and-Paper Format: The Ministry of Education announced a complete policy shift to eliminate physical paper transit vulnerabilities. Starting from 2027, NEET will permanently migrate to a Computer-Based Test (CBT) format with heavy digital encryption safeguards.Radhakrishnan Committee Implementation: The government has committed to fully enforcing all structural and data security recommendations laid out by the high-level expert committee headed by former ISRO Chief Dr. K. Radhakrishnan.If you are an aspirant or parent looking to navigate these recent changes, let me know if you need help finding how to re-download your admit card, details on exam city center guidelines, or updates on the CBT transition protocol.
अजून काय काय करायला हवेय?
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेऊन दुसरा शिक्षण मंत्री नेमला तरी तो याहून काय वेगळे करणार आहे?
Parliamentary Standing
Parliamentary Standing Committee on Education currently chaired by MP Digvijaya Singh.
धर्मेंद्र प्रधान यांचा
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेऊन दुसरा शिक्षण मंत्री नेमला तरी तो याहून काय वेगळे करणार आहे?### खि खि खि.. किती तो भाबडेपणा म्हणावा. आणि हो, ते सभ्य आणि संयत भाषेचे म्हणाल तर भाजपा प्रवक्त्यापासून मोदीपर्यंत सर्वांना तुमची शिकवणी लावा
Pages