Cockroach जनता पार्टी झिंदाबाद !

Submitted by ऋन्मेऽऽष on 20 May, 2026 - 16:30

जगभरातले जेन झी पेटून उठत आहेत.
आम्ही भारतीय झुरळे कसे मागे राहणार.
एक ठिणगी पडली आणि बघता बघता वणवा पेटला.

हे आमचे इंस्टाग्राम अकाऊंट
फक्त चार (४) दिवसात 8.5 मिलियन म्हणजे तब्बल 85 लाख फॉलोअर्स.
https://www.instagram.com/cockroachjantaparty?igsh=YjhvYnhrZWJsMWtj

आणि ही आमची वेबसाईट
https://cockroachjantaparty.org/

कुठल्या वेगळ्याच जगात राहत असाल आणि हे काय याची कल्पना नसल्यास धागा वाचत राहा...

क्रांती आता फार दूर नाही...
ऑफ द कॉकरोच बाय द कॉकरोच फॉर द कॉकरोच !

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हिंदुस्थान टाइम्स चा दुवा दिलेला आहे

>>>> ते लाईव्ह रिपोर्टिंग होते btw. दिपके अजून आला नव्हता. त्यानंतर लोकं भरू लागली असेही त्याच लाईव्ह फीड मध्ये पुढे दिले आहे.

आंदोलनाच्या बंदोबस्तासाठी 75 पोलीस अधिकारी, 750 कर्मचारी आणि SRPF च्या दोन तुकड्या तैनात होत्या, अशी बातमी लोकमत दैनिकाने दिली आहे

300 लोकांच्या मोर्चा आंदोलन साठी 800 पोलीस?

आंदोलन कोणाचे होते नक्की

पुण्याची क्लिप पाहिली. बरेच लोक आलेले दिसत होते. विद्यार्थी तर होतेच पण ज्येष्ठ नागरिकही आलेले होते.

अण्णा हजारेंच्या २०११ च्या आंदोलनाची आठवण येतेच. तेव्हा सुरूवातीला ते जेन्युइन आंदोलन होते. लोक अगदी उत्स्फुर्तपणे सामील होत होते. मी तेव्हा पुण्यात राहात होतो त्यामुळे अगदी प्रत्यक्ष तो उत्साह पाहिला आहे. त्यावेळी मी मुक्ता या आयडीने काढलेल्या व बरीच चर्चा झालेल्या धाग्यावर मी लिहीले होते ते या आंदोलनाबद्दलही माझे तसेच मत आहे.

-----
यात सामील असलेल्या असंख्य लोकांनी जनलोकपाल बिलचा मसुदा वाचला नसेल, त्यांना या लढ्यातून नक्की काय साध्य करायचे आहे याचा तपशील माहीत नसेल पण भ्रष्टाचार मिटवण्यासाठी हे काहीतरी चालू आहे एवढेच त्यांच्या दृष्टीने पुरेसे आहे. यात इतर अनेक स्वार्थी हेतू असलेले लोक, पक्ष्/संघटना सामील होतीलच, पण ते सगळीकडेच होत असेल. हा लढा अशा संघटनांना हायजॅक करून द्यायचा नाही हे अण्णा व इतर नेत्यांना बघावे लागेल.

मला नाही वाटत कोणत्याही एवढ्या मोठ्या चळवळीत सर्वांना त्यातील तपशीलाची जाण असते, त्यातून निर्माण होणारे कायदे/सरकार हे लोकशाहीच्या तत्त्वांवर असावेत, घटनेच्या मूळ चौकटीत असावेत वगैरे गोष्टी ही नेत्यांची जबाबदारी. आणि विचारवंत, कायदातज्ञांची - त्यातील बरेच लोक यात सामील होउन आतून ते बदलण्याऐवजी सध्या पेपर्स मधे या लढ्याविरूद्ध लिहीत आहेत
-----

यात आंदोलनाकरता येणार्‍या लोकांना हा अभिजित दिपके कोणत्या पक्षाचा आहे, तो अमेरिकेहून भारतात का परत आला, ही भाजपची बी टीम आहे की काँग्रेसची, याच्याशी काही मतलब नाही. त्यांना पेपरफुटी मुळे आणि ते जे काय नवीन तंत्रज्ञान चुकीच्या पद्धतीने implement झाले त्याने झालेले नुकसान व सरकारची उदासीनता याचा राग आहे. तो ते व्यक्त करत आहेत, इतकेच. याचे पुढे काय होईल, यात राजकारणी घुसतील, त्यातून आप सारखा नवीन पक्ष तयार होईल, काही दिवस लोक सगळी आशा त्यांच्यावर लावतील आणि एकदा ते सत्तेत आले की इतर सत्ताधारी लोकांसारखेच वागतील - की यापेक्षा काही वेगळे होईल, कोणालाच माहीत नाही. पण लोकांचा राग खरा आहे व सरकारने त्याची दखल घ्यायला हवी हे नक्की.

मात्र लोकांच्या मागण्या बघितल्या तर सगळा भर मंत्र्याच्या राजीनाम्यावर दिसत आहे. अशा वेळी मंत्र्याने राजीनामा देणे व दुसर्‍या कोणालातरी हे हॅण्डल करू देणे हाच नॉर्म आहे. पण सगळे आंदोलन त्याभोवती घुमवत ठेवण्याने काय फायदा होणार आहे? हे धर्मेन्द्र प्रधान कोण मला माहीत नाही. मी त्यांची याबद्दल एक पत्रकार परिषद/मुलाखत पाहिली. निदान त्यात मला माज वगैरे काही दिसला नाही.

"राजीनामा द्या" या गोष्टीचे संदर्भ बदलले असतील आता. मात्र जुनी गोष्ट तीच आहे- सध्याच्या व्यक्तीने काम नीट न हाताळल्याने तिने ते काम सोडून दुसर्‍याला दिलं पाहिजे, आणि हे असं कामाचं वाटप ज्यांच्याकडे आहे, त्यांनी पात्रता बघून काम सोपवलं पाहिजे. त्या अधिकारावर असलेल्या व्यक्तीने सिच्युएशन नीट न हाताळता आल्याबद्दल त्या पदावरून दूर झालं पाहिजे. इतकी सोपी गोष्ट. हे कळायला अवघड आहे का? राजीनामा द्या. नंतर काय होईल ते होईल आणि ते नंतर बघू, पण आता नीट कायदेशीर काही झालं नसेल, कुणावर तरी अन्याय झालेला आहे, काहीतरी चुकीचं झालेलं आहे; तर आहे ते कुठच्या तरी पद्धतीने बदलाय्ला हवं. हे कळायला इतकं अवघड आहे का??

यासाठी सध्या आपल्याकडे कुठची एस्टॅब्लिश्ड, प्रुव्हन, अशी सिस्टिम आहे?

सरकारी अधिकार्‍यांच्या, उच्चपदस्थ आयुक्त वगैरे लेव्हलच्या लोकांच्या बदल्या का होतात? (आता राजकारणी लोकांचे पर्सनल इंटरेस्ट- म्हणून बदल्या होतात- असं उत्तर देऊ नका).

काहीतरी चुकीचं झालेलं आहे; तर आहे ते कुठच्या तरी पद्धतीने बदलाय्ला हवं. हे कळायला इतकं अवघड आहे का?? >>> हे माझ्या पोस्टबद्दल आहे का? मी सहमतच आहे.

हो, फा. "पण सगळे आंदोलन त्याभोवती घुमवत ठेवण्याने काय फायदा होणार आहे?" यावर मी ते लिहिलं. आंदोलन 'सुरू' करण्याबाबत आहे ना ते. 'घुमवत ठेवणं' फार पुढची गोष्ट आहे. विशेष्ठ दिशेने 'घुमवत ठेवणं' हे सत्ताधारी पक्ष किंवा काँग्रेस आणि भाजपसारखे सीझन्ड (म्हणजेच गुन्हेगारी प्रवृत्तीचे) पक्षच ते करू शकतात ना?

आता अण्णांच्या आंदोलनाचाही विषय निघेल. त्याबद्दलही भरपूर लिहायचंय. घागाकर्ता काढेलच लवकर धागा.

आंदोलन 'सुरू' करण्याबाबत आहे ना ते. >>> ओके फेअर पॉइंट. सहमत.

मला घुमवत त्या अर्थाने म्हणायचे नव्हते. वर्तमानपत्री भाषा वापरायची तर "सगळ्या आंदोलनाचा केंद्रबिंदू..." वगैरे लिहावे लागेल. पण तुझा पॉइण्ट पटला Happy

"अभिजित दिपकेंच्या हातातील पुस्तक हे RSS शी निगडित डायमंड पब्लिकेशनने निर्माण केलेले पुस्तक! बाबासाहेबांनी आत्मचरित्र कधी लिहिलेच नव्हते"

-- सुजात आंबेडकर

https://www.facebook.com/share/v/1FGX9oqiJQ/

पब्लिकेशन पण पक्षाशी निगडीत आणि त्या पब्लिकेशनची पुस्तके वाचायची नाहीत असं काही असतं का हल्ली?
डगलस अ‍ॅडम्सचा कोट वाचुन मस्त वाटलं, एकदम गुदगुल्यावगैरे झाल्या. परत हिचहायकर्स वाचलं पाहिजे.

https://www.instagram.com/reel/DZmyCofAm3j/?igsh=aGw3c25md3k5aXdt

अभिजीत दीपकेला आज जयपूर आंदोलनात गर्दीत काही समाजकंटकांनी मारहाण करायचा प्रयत्न केला.
तरीही त्याने नंतर अपील केली की आपण हिंसात्मक वळण द्यायचे नाही.
हा मार्ग डरपोक लोकांचा असतो.

'People from RSS' behind attack on me: Dipke
अरे अभिजित हे काय बोलून गेलास तू?
आहा, समंजल. मुद्दाम ना. खोटे खोटे.

कुठलं पुस्तक कुठल्या पब्लीकेशनशी आहे म्हणून वाचू नये हा अर्थ काढणे मूळच्या पूर्वग्रहद्दूषित किंवा अर्धवट माहितीवरून थेट निष्कर्ष काढण्याच्या वृत्तीतून येत असावे. संघाने किंवा संघाच्या विचारधारेला मानणार्‍यांनी प्रसिद्ध व्यक्तींवर जी पुस्तकं लिहीली आहेत त्यात हळूच भेसळ केलेली असते. पूर्वी भगतसिंगांवर छोट्या छोट्या पुस्तिका मिळायच्या. पण गेल्या काही वर्षात भगतसिंग डाव्या विचारांचे होते आणि नास्तिक होते हे समोर आल्यापासून भगतसिंग हा विषयच बाद्द झालेला आहे.

बाबासाहेब आंबेडकर म्हटलं कि संघाच्या अनेक विद्वानांना थॉटस ऑन पाकिस्तान मधले उतारे तोडुन मोडून आणि संदर्भ सोडुन द्यायची घाई झालेली असते. विशेष म्हणजे असे काही नग असतात कि जे सिनेमा न पाहतच कसं बोलता किंवा पुस्तक न वाचताच कसं बोलता असे उपदेश इतरांना करू लागतात ते ही माना डोलावू लागतात. (त्यांची नावे क्रमाने द्यायची असतील तर पास).

जर हे पुस्तक मुळातून बाचले तर सुटे उतारे दिल्याने काय अनर्थ होतो हे लक्षात येतं. अशा परिस्थितीत ज्या माणसाने स्वतःची आत्मकथा लिहीलीच नाही ती प्रकाशित करून त्यात अनेक असंबद्ध उतारे घुसवलेले असतील, ही साधी गोष्ट एखाद्या आंदोलनाचे नेतृत्व करणार्‍या उच्चशिक्षित तरूणाला माहिती नसेल तर रेड फ्लॅग दिसतो. यात हास्यास्पद काय आहे?

अण्णांच्या आंदोलनाने पोळल्यावर दीपके पण फुंकून पिला पाहीजे हा साधा विचार आहे. त्यासाठी कुठलेही आंतरराष्ट्रीय लेखक संदर्भ सोडून कोट करायची काय गरज? इर्रिलेव्हन्ट संज्ञा आणि इर्रिलेव्हन्ट पुस्तके कोट केल्याने सारासार अविचार समर्थनीय कसा होईल? इतर सर्व मूर्ख कसे या अर्विर्भावात २४ * ७ राहणे कसे जमते? कधीतरी आपणही चूक असू शकतो किंवा समोरचा बरोबर असू शकतो हा विचार मनाला शिवत नसेल तर कठीणच आहे.

अण्णांच्या आंदोलनाने पोळल्यावर दीपके पण फुंकून पिला पाहीजे हा साधा विचार आहे. >>>
सहमत
पण मुद्दा हा आहे को दिपके हा केंद्रस्थानी नाहीच मुळी
तो फक्त एक चेहरा आहे, मी पहिल्यापासून म्हणतोय की तरुणाई चा असंतोष आहे हा, दिपके जाईल आजून कोणीतरी येईल
पण अन्याय आणि बेताल वागण्याला विरोध हा व्हायलाच हवा आणि जो आवाज विरोधात उभा राहील त्याला देशद्रोही म्हणणे हा जो ट्रेंड सुरू केलाय ना भाजप्यानी त्यालाही विरोध व्हायला हवा

सरकार ला सतत हे जाणवत राहिले पाहीजे की आपल्याला प्रश्न विचारणारे कोणी आहेत
आणि असे तसे कोणी नाहीत तर देशाचे तरुण आहेत

"डीपके हा लेटेस्ट जनरेशनचा रोबो आहे. त्याला चावी कुणी दिली आहे हे आन्हाला माहित आहे. इत्यादी ..."
असे मी नाही म्हणत आहे. पण असे काही लोकांचे म्हणणे आहे खरे.

पण अन्याय आणि बेताल वागण्याला विरोध हा व्हायलाच हवा>>> आजकाल लोक, कोण बोलतंय हे पहिलं पहातात आणि का बोलतंय याचे आडाखे बांधत बसतात आणि त्यावर आपला त्या भुमिकेला पाठिंबा असेल किंवानाही हे ठरवतात....हे सव्यापसव्य करण्यापेक्षा, कोणीही काय बोलतोय हे पाहून ही एकमेव कसोटी लावून आपली त्यावर ( जे बोलतोय त्यावर) भुमिका ठरवणे हे सद्यस्थितीत उत्तम या निष्कर्षाप्रत मी आलो आहे, ज्याने खुपशा गोष्टी सोप्या होतील आणि जी शक्ती आडाखे बांधण्यात , संशय घेण्यात खर्ची पडते ती ही कुठे तरी सत्कारणी लागण्याच्या शक्यता वाढतील, कारण तुम्ही कितीही डोकेफोड करा सध्याच्या जगात तुम्ही स्वतः सोडून इतर कुणाचेही त्याच्या भुमिकांमागचे हिडन एजंडे काय आहेत हे नाही शोधू शकत अगदी तुमच्या घरातल्यांचे सुध्दा.

सगळे दिपके ला झोडण्यात मग्न आहेत पण खरा प्रॉब्लेम दिपके नाही तर राज्यकर्ते आहेत
मग आपल्यावर शेकू नये म्हणून पाळलेल्या बुद्धिभ्रष्ट्रांचा कळप सोडूम द्यायचा, बसतात मग ते दिपकेची आई काय करते, तो कसा कोणाचा माणूस आहे, किती पेटीशन आल्या, गर्दी किती झाली असल्या पोस्टीं पाडत

दिपकेला मारतील हाकलून लावतील आणि जितम म्यां च्या घोषणा देऊन आनंद व्यक्त करतील पण प्रॉब्लेम सुटलेला नाहीच
उद्या अजून कोणी उभा राहील तेव्हाही ते हाच खेळ खेळत राहतील

उद्या यांच्याच घरातल्या कोणाला याची झळ लागली की मग त्यांना जाणीव होईल की काय करत होतो आपण

सहमत
पण मुद्दा हा आहे को दिपके हा केंद्रस्थानी नाहीच मुळी
तो फक्त एक चेहरा आहे, मी पहिल्यापासून म्हणतोय की तरुणाई चा असंतोष आहे हा, दिपके जाईल आजून कोणीतरी येईल
पण अन्याय आणि बेताल वागण्याला विरोध हा व्हायलाच हवा आणि जो आवाज विरोधात उभा राहील त्याला देशद्रोही म्हणणे हा जो ट्रेंड सुरू केलाय ना भाजप्यानी त्यालाही विरोध व्हायला हवा

सरकार ला सतत हे जाणवत राहिले पाहीजे की आपल्याला प्रश्न विचारणारे कोणी आहेत
आणि असे तसे कोणी नाहीत तर देशाचे तरुण आहेत>>>> लेक जेन झी असल्याने त्याच्या मित्र मैत्रिणींशी बोलणे होत असते. त्याच्या मित्र मंडळींचे हेच म्हणणे आहे. त्यांना हा एक प्लॅटफॉर्म मिळाला आहे. सध्याच्या विरोधी पक्षांचा (स्पेशली काँग्रेस चा) प्लॅटफॉर्म का नाही वापरत असे त्यांना विचारून झाले आहे. यातल्या बर्‍याच जणांना राहुल गांधींचे विचार पटतात पण काँग्रेस चा प्लॅट्फॉर्म accessible / approachable वाटत नाही. काँग्रेस अजूनही तरूणांपर्यंत पोचू शकत नाहीये.

सरकार नेहमीच आपली ध्येये आणि कायदे टप्प्याटप्प्याने कसे लागू करता येतील हे पाहते. त्यांची प्रत्येक रणनीती ही सुरुवातीला एक लहानसा शिरकाव (चंचुप्रवेश) करून हळूहळू आपले बस्तान बसवण्याची खेळी असते. ते केवळ आणि केवळ जनमताची चाचपणी करत असतात, असं काहीसं मागे राज ठाकरे बोललेले एकदा सभेत.

राज ठाकरेला कुणी कितीही शिव्या घालोत, पण तो कधी कधी काही गोष्टी ज्या बोलतो त्यात वास्तव दडलेलं असतं. प्रत्येक मोठ्या बदलाचा पायलट प्रोजेक्ट लहान स्वरूपात कुठेतरी अमलांत आणला जातो, आणि जेंव्हा त्याच्या विरोधात जनमत आकार घेत असते, अशा वेळी जे १००% गॅरंटीवाल्या राजकीय/सामाजिक नेत्याच्या/संघटनेच्या अपेक्षेने डोळे लावून कुंपणावर बसलेले असतात त्यांची निष्क्रियता मोठा घात करते....आपल्या तोंडाला अशी तशी पानं पुसलीच जाणार आहेत, पण अशावेळी निष्क्रिय राहून, ज्या भविष्याच्या भूताची सावली दिवसागणिक आपल्या मनात मोठी होते आहे, ते भविष्य आणखी थोडा काळ टाळण्याची/ लांबवण्याची एक संधी आपण दवडतो आहे, किंबहुना त्या भविष्याकडे सत्ताधाऱ्यांना हव्या असलेल्या वेगाने वाटचाल करण्याला हातभारच लावत आहोत.
Time is the ultimate weapon of the weaker side. — Robert Greene

So, better bleed the clock, until the tables turn!!

कोण बोलतंय पेक्षा काय बोलतंय हे भाबडं किंवा आपल्याला सोयीचं अधांतरी विधान आहे. अण्णा, किरण बेदी, योगेंद्र यादव, अरविंद केजरीवाल, कन्हैया, जिग्नेश, चंद्रशेखर रावण यांच्या बतावासाठी हेच तत्व वापरलं गेलं. आता पुन्हा तेच. दरवेळी एक तमाशा उभा करायचा आणि शंका घेणं हे सुद्धा पाप आहे असं वातावरण निर्माण करायचं. त्यासाठी तात्विक युक्तिवाद करत रहायचे हे किती वेळा चालेल?

अशीच न्याय बुद्धी असेल तर आमच्या लाडक्या पंतप्रधानांवर किती तरी वेळा जीवघेणे हल्ले झाले किंवा तसे कारस्थान उघड झाले. कुणी कुणी त्याचा निषेध केला सांगा बरं. नसेल तर का नाही केला?

किसान आंदोलनात ज्या दलित पत्रकाराचा मारहाणीत मृत्यू झाला त्याची बातमी तरी झाली का? कि तरूणीला उचलून नेले पुढे काय झाले हे लक्षात नाही, पण तिचीही दखल घेतली गेली नाही. त्या आंदोलनात सरकारने कितीतरी युट्युबर्स, फ्री लान्सर्स पेरले होते किंवा स्पष्ट शब्दात बोलायचे तर विकत घेतले होते जे सरकारच्या विरोधात बोलत होते. त्यांच्या वर झालेल्या कारवाईला हायलाईट केले गेले. नंतर ते सहीसलामत सुटले आणि त्यांचे चॅनल्स सुद्धा व्यवस्थित चालू आहेत.
या दरम्यान सरकार आणि विरोधी यांचे कारनामे उलगडून दाखवणाऱ्या पत्काराला सरकारने आपल्या बाजूने लिहायला भाग पाडले. आता त्याची विश्वासार्हता रद्द झाली.

अण्णांच्या आंदोलनाने जन आंदोलनावरचा विश्वास उडाला.
मला तरी अभिजीत दीपकेला सिरीयसली घ्यावे असे वाटत नाही. ज्यांना घ्यायचे त्यांचा तो प्रश्न आहे. राजू परुळेकर आणि निरंजन टकले यांनी व्यक्त केलेल्या मतांशी सहमत आहे.

अण्णांच्या आंदोलनाच्या कव्हरेजच्या वेळी माझा सख्खा भाऊ मुंबईतून काम करत होता. त्याच्या कडून समजलेल्या अनेक गोष्टी इथे शेअर करू शकत नाही. पण इतर कुणाहीपेक्षा मी त्याच्या वर विश्वास ठेवेन.

परवा अभिजीत दिपके म्हणाले की धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला नाही तर पंतप्रधान यांचा राजीनामा घेतला जाईल. (फेसबुकवर हे तीन ठिकाणी वाचायला मिळाले).

<<< अण्णांच्या आंदोलनाच्या कव्हरेजच्या वेळी माझा सख्खा भाऊ मुंबईतून काम करत होता. त्याच्या कडून समजलेल्या अनेक गोष्टी इथे शेअर करू शकत नाही. पण इतर कुणाहीपेक्षा मी त्याच्या वर विश्वास ठेवेन
>>>>

शेअर करा बिनधास्त!
सत्य जनतेसमोर आणण्यास कोणाची भिती असेल तर ती लोकशाही कसली.

सरकार नेहमीच आपली ध्येये आणि कायदे टप्प्याटप्प्याने कसे लागू करता येतील हे पाहते. त्यांची प्रत्येक रणनीती ही सुरुवातीला एक लहानसा शिरकाव (चंचुप्रवेश) करून हळूहळू आपले बस्तान बसवण्याची खेळी असते. <<<< उदाहरणार्थ शब्दांचे आणि नियमांचे खेळ करत तिसरी भाषा प्रकरणाआडून केली जाणारी हिंदी सक्ती

सांगा मग
अन्यथा हवेत केलेल्या विधानांना काही अर्थ नाही.
आपल्याला या धाग्यावर तेच टाळायचे आहे.

<<<
फेसबुकवर हे तीन ठिकाणी वाचायला मिळाले
>>>

तुमची पोस्ट वाचून आता दुसरा कोणीतरी तिसऱ्याला सांगेल की फेसबूकवर हे तीन ठिकाणी वाचायला मिळाले आणि मायबोलीवर सुद्धा वाचले.

त्यामुळे शक्य तिथे खरे खोटे आपण पडताळून शेअर करूया. तो खरेच असे म्हणाला का याचा व्हिडिओ आहे का बघूया.

बाकी त्यात काही गैर नाही. राजीनामा हे टोक झाले. पण देशात जे घडते त्याची जबाबदारी पंतप्रधानांनी देखील घेणे अपेक्षित असते.

Pages