Submitted by ऋन्मेऽऽष on 20 May, 2026 - 16:30
जगभरातले जेन झी पेटून उठत आहेत.
आम्ही भारतीय झुरळे कसे मागे राहणार.
एक ठिणगी पडली आणि बघता बघता वणवा पेटला.
हे आमचे इंस्टाग्राम अकाऊंट
फक्त चार (४) दिवसात 8.5 मिलियन म्हणजे तब्बल 85 लाख फॉलोअर्स.
https://www.instagram.com/cockroachjantaparty?igsh=YjhvYnhrZWJsMWtj
आणि ही आमची वेबसाईट
https://cockroachjantaparty.org/
कुठल्या वेगळ्याच जगात राहत असाल आणि हे काय याची कल्पना नसल्यास धागा वाचत राहा...
क्रांती आता फार दूर नाही...
ऑफ द कॉकरोच बाय द कॉकरोच फॉर द कॉकरोच !
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सरकार ला सतत हे जाणवत राहिले
सरकार ला सतत हे जाणवत राहिले पाहीजे की आपल्याला प्रश्न विचारणारे कोणी आहेत
आणि असे तसे कोणी नाहीत तर देशाचे तरुण आहेत>>>>
आता हे वाचा
New Delhi: While denying bail to a Right to Information (RTI) activist, the Supreme Court on Monday (June 15) orally remarked that RTI activism has become a new business.
https://thewire.in/law/supreme-court-rti-activism-business-remarks
अन्यथा हवेत केलेल्या
अन्यथा हवेत केलेल्या विधानांना काही अर्थ नाही >> कोणते विधान हवेत केले आहे? माझ्या भावावर माझा विश्वास आहे हे?
याच नाही कुठल्याही धाग्यावर
याच नाही कुठल्याही धाग्यावर हवेतली विधाने टाळायची असतील तर ऋन्मेष या आयडीमागच्या व्यक्तीला कोणत्याही आयडीने मायबोलीवर येता कामा नये ही व्यवस्था करावी लागेल. हे शक्य आहे का? नाहीतर अशी हवेतली विधाने होतच राहणार.
ऋन्मेष, माझ्या भावाबद्दल
ऋन्मेष, माझ्या भावाबद्दल पुन्हा काही असंवेदनशील बोलणार असशील तर आधीच सांगतो कि तो आता या जगात नाही. न बघता काहीही वक्तव्ये करायची ही सवय बदल. प्रत्येकाचं काही तरी कारण असतं.
तू एक महामूर्ख, प्रतिसादाला हपापलेला आणि अशा फालतूगिरीसाठी कसलाही अभ्यास किंवा वाचन न करताही काही धूर्त लोकांच्या पाठिंब्यामुळे चढवून ठेवलेला बेताल आणि लक्ष न देण्याच्या लायकीचा आयडी आहे हे माझं वैयक्तिक मत आहे. ते मी इथे मांडलं नव्हतं. आता मांडलं आहे. हे माझं मत आहे हे हवेतलं विधान कसं होईल? मला ते मांडायचं नव्हतं पण एखादा बिनबुडाचा बेताल आयडी मांडा बिनधास्त असे का म्हणतो जे न कळण्याइतके बाकीचे मंदबुद्धी आहेत का? जे विधान केलेच नाही ते हवेतले आहे आणि या धाग्यावर टाळायचे याचा अर्थ काय? वरचा मजला पूर्ण रिकामा आहे कि त्यात नासकं, सडकं काही आहे?
तुझ्या घरच्या प्रिय व्यक्तीने तुला काही न काही माहिती सांगितली असेल जी बाहेर सांगता येत नाही. ती मी सांगणार नाही असे म्हणणे हवेतले विधान कसे होईल हे मला नीट समजावून सांग नाहीतर माफी माग.
>>> त्यामुळे शक्य तिथे खरे
>>> त्यामुळे शक्य तिथे खरे खोटे आपण पडताळून शेअर करूया. तो खरेच असे म्हणाला का याचा व्हिडिओ आहे का बघूया.
अवश्य शोध घे. माझे म्हणणे धादांत खोटे आहे हे इथे सिद्ध झाले तरी मला फरक पडणार नाही कारण मला माहित आहे की ते मी फेसबुकवर वाचले आहे.
>>> बाकी त्यात काही गैर नाही. राजीनामा हे टोक झाले. पण देशात जे घडते त्याची जबाबदारी पंतप्रधानांनी देखील घेणे अपेक्षित असते.
अच्छा! मग पंतप्रधानांनी आत्ता नेमके काय करायला हवे ते कृपया सांग. माझ्या माहितीनुसार परीक्षा परत घेतली जात आहे, झुरळ पार्टीचे आंदोलन कुठेही ठरले तरी सरकार आडकाठी करत नाहीये आणि गुन्हेगारांची चौकशी वगैरे गोष्टी कायद्यातील तरतुदींनुसार सुरू आहेत. काही करायचे राहिले असले तर कृपया अवश्य नोंदव.
<<<< तुझ्या घरच्या प्रिय
<<<< तुझ्या घरच्या प्रिय व्यक्तीने तुला काही न काही माहिती सांगितली असेल जी बाहेर सांगता येत नाही. ती मी सांगणार नाही असे म्हणणे हवेतले विधान कसे होईल हे मला नीट समजावून सांग नाहीतर माफी माग
>>>>>
जर तुम्ही एखादी गोष्ट इथे सांगू सुद्धा शकत नसाल तर कुठेतरी संशयाची सुई जाईल असे मांडण्यात काय अर्थ आहे म्हणून याला हवेतले विधान म्हटले.
बाकी यात तुमच्या भावाचा काही संबंध नाही. त्याजागी इतर कोणीही असते तरी मुद्दा हाच राहिला असता.
त्यामुळे बाकी पोस्ट मध्ये जो कांगावा करायचा प्रयत्न आहे त्याला पास. तो मला नवीन नाही. मायबोलीवर जे नवीन आयडी येतात त्यातील निम्मे माझ्याच मागे असतात. आणि त्यांच्या निम्म्या पोस्ट माझ्यावरच असतात. तुम्ही सुद्धा त्याला अपवाद नाही आणि माझ्या सर्व धाग्यावर हेच करत आहात. तुमच्यामुळेच मला मायबोलीवर लॉगिन करताना सेलिब्रिटी असल्याचे फील होते
तरीही तुम्हाला वाटत असेल की मी नीट समजावून सांगण्यात कमी पडलो आणि तुम्हीच बरोबर आणि मी चुकलो तर मी तुमची दोन्ही ढोपरापासून हात जोडून माफी मागतो.
आय रिपीट...
तरीही तुम्हाला वाटत असेल की मी नीट समजावून सांगण्यात कमी पडलो आणि तुम्हीच बरोबर आणि मी चुकलो तर मी तुमची दोन्ही ढोपरापासून हात जोडून माफी मागतो.
<<<<<माझे म्हणणे धादांत खोटे
<<<<<
माझे म्हणणे धादांत खोटे आहे हे इथे सिद्ध झाले तरी मला फरक पडणार नाही कारण मला माहित आहे की ते मी फेसबुकवर वाचले आहे.
>>>>
हे असे असेल तर यापुढे मग मला काहीच म्हणायचे नाहीये
मी राजकीय धाग्यांवर नवीन आहे.
असे फेसबुकवर वाचले खरे खोटे तुम्ही बघा म्हणत काही लिहिलेले चालते याची मला कल्पना नव्हती.
मी आपली सुद्धा माफी मागतो !
मग शेवटी काय ठरलं?
मग शेवटी काय ठरलं?
झुरळ जनता पार्टी आणि तिच्या जाहीरनाम्याबद्दल?
अभिजित दिपके कोणाचं उभं केलेलं बुजगावणं आहे?
आर एस एस चं, आप चं, काँग्रेसचं कि आणखी कुणाचं?
कांगावा कसला रे माथ्या?
कांगावा कसला रे माठ्या?
कोणते हवेतले विधान आहे ते कोट कर इथे. तुझ्या पासला काही किंमत नाही.
मी आणि माझा भाऊ यांच्यात जे काही संभाषण झाले ते मी इथे दिलेले नाही. तर कसली संशयाची सुई? ते दिलेले नसताना तू काय बेताल बडबड करत होतास? आणि जरी समजा विधान केले तर तू पुरावे मागणार. ते दिले तर वाचणार नाहीस. यात तुला आणि तुला चढवून ठेवणार्यांना मजा येणार. मला तरी यात कसली मजा आहे हे कळत नाही. तुला वाचायची अक्कल नाही, पुराव्याने बोलायची अक्कल नाही, पण तू इतरांना पुरावे मागणार, तुला पुरावे मागितले कि तू टिंगल करणार. टिंगल करा पण तुझ्यासारख्या बिनबुडाच्या आयडीने टिंगल करणे हे अपमानास्पद असते.
मी ते इथे शेअर करू शकत नाही हे म्हटल्यावर तू का म्हणालास शेअर करा बिनधासत?
दर वेळी हे चालणार नाही. या प्रश्नाचे उत्तर दे. तुझ्या तीर्थरूपांचे नोकर आहेत का बाकीचे?
मायबोलीवर निम्मे आयडी येतात
मायबोलीवर निम्मे आयडी येतात आणि ते तुझ्या मागी असतात याच्याशी मला काहीही मतलब नाही. तू माझी खोडी काढलीस, मी तुझ्या मागे लागलोय. तुझ्या मागे आयडी लागतात तर तुझेही फेक आयडी उचापती करत असतील. या आयडीने तू सभ्य राहत असशील, अन्य आयडीने शिव्या देत असशील ते मला सांगणार आहेस का? मग तुझ्यामागे आयडी लागतात ही रडकथा कशाला ऐकवतोस/ तुझ्याकडेच ठेव.
माफी मागायची तर नीट मागायची. तरी सुद्धा तुम्हा ला वाटत असेल ही मखलाशी करत असशील तर मी तुला सोडणार नाही.
आता विषयावर.
आता विषयावर.
मूर्खासारख्या आयडीने प्रश्न विचारले म्हणून.. अण्णांचं स्वरूप आता जगाला समजलेले आहे. माझ्या भावाने काय सांगितले हे दिले न दिले तरी आता फरक पडणार नाही. काहीच दिवसांपूर्वी त्या वेळी ज्यांनी ज्यांनी सबुरीची भूमिका घेतली त्यांचे धागे वर काढून अभिनंदन केलं होतं. तेव्हांही आतासारख्म्च कंपल्शन निर्माण करण्याचा प्रयत्न झाला होता. त्याला बळी न पडता आपल्याला जे जाणवतंय त्यावर ठाम राहणारे खरोखर कौतुकास पात्र आहेत. असाच विवेक सर्वांनी दाखवला असता तर अण्णांनी जे डॅमेज केलं ते झालं नसतं.
आता द्दीपकेच्या या ड्राम्याला बळी पडायचं नाही असं ज्यांना वाटतंय त्यांचं म्हणणं २०४१ मधे खरं झाल्यावर कौतुक करूच. पण मधल्या काळात यामुळे जे काही नुकसान होईल त्याची जबाबदारी कोण घेईल?
अण्णांना सपोर्ट केला ही चूक झाली अशी कबुली कुणी कुणी दिली? समाजमाध्यमांवर आपली तत्कालीन वक्तव्ये भूतासारखी पिच्छा करत असतात
परवा अभिजीत दिपके म्हणाले की
परवा अभिजीत दिपके म्हणाले की धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला नाही तर पंतप्रधान यांचा राजीनामा घेतला जाईल. (फेसबुकवर हे तीन ठिकाणी वाचायला मिळाले).>>>>
खरंतर हेच करायला पाहिजे. प्रधान गेला की दुसरा येईल तोही हेच करत राहणार कारण सगळेच मंत्री कळसूत्री बाहुले आहेत. सगळे निर्णय तर मोदी आणि शाह च घेतात.
<<<
<<<
अभिजित दिपके कोणाचं उभं केलेलं बुजगावणं आहे?
आर एस एस चं, आप चं, काँग्रेसचं कि आणखी कुणाचं?
>>>>
आर एस एस च्या कोणीतरी काल त्याच्यावर हल्ला केला.
अर्थात हे नाटक सुद्धा असू शकते.
एवढ्यात काही सांगणे अशक्य.
पण याच्याशी माझे काही घेणे देणे नाही मला आंदोलनात आलेल्या एका माणसाचा स्टँड आवडला. जणू माझाच आहे.
"मी इथे कॉकरोच पार्टीला सपोर्ट करायला आलो नाही. मी इथे जेन झी पिढीला सपोर्ट करायला आलो आहे. मी स्वतः जेन झी नाही पण माझी मुले जेन अल्फा आहेत. आज मी या प्रोटेस्ट करणाऱ्या मुलांच्या सपोर्टमध्ये उभा नाही राहिलो तर उद्या माझी मुले अशीच प्रोटेस्ट करताना दिसतील."
याचा व्हिडिओ कॉकरोच इन्स्टा अकाउंटच्या स्टोरी वर चेक करू शकता.
ज्यांनी २०१४ मध्ये सर्व आधीच
ज्यांनी २०१४ मध्ये सर्व आधीच ओळखलेले, सॅरकॅस्टिकली नाही पण जेन्युअली मला त्यांचा थॉट प्रोसेस जाणून घ्यायला आवडेल. ते कोणताही निर्णय घेताना/ अनुमान करताना काय काय तपासून पाहतात आणि त्यांचा सक्सेस रेट काय असतो (जो की नक्कीच अबोव्ह ऍव्हरेज असावाच ) हे ही जाणून घ्यायला आवडेल. त्यातून ते कोणत्याही गोष्टी बाबत साशंक होताना एखाद -दुसऱ्या उदाहरणाच्या आधारेच ते पुढे त्यासारख्या प्रत्येक बाबतीत शंकेखोर बनतात की सांख्यिकीशी प्रतारणा ना करता प्रत्येक प्रसंगाला त्याचं जरी आधीच्या अनुभवाशी असोसिएशन असलं तरी एक स्वतंत्र केस स्टडी म्हणून अनुमान लावताना नव्याने ठोकताळे जोडून खात्री करून घेतात, हे ही पाहणे रंजक असेल
हेच ज्यांनी अण्णांवर आणि आता
हेच ज्यांनी अण्णांवर आणि आता दीपकेवर विश्वास ठेवणार्यांचाही थॉट प्रोसेसला लागू होतं.
एव्हढं किचकटीकरण करायची गरज काय?
काही गोष्टी जाणवतात, त्या सांगणे व्यवहार्य नसतात. इतका त्यात रसायनशास्त्रमकालिदासम काथ्याकूट करायची गरज आहे का?
जमिनीचा व्यवहार करताना समोरचा आपल्याला फस्सवणार आहे असे वाटले तर तो थॉट प्रोसेस लिहून काढायचा का? किंवा सायबर फ्रॉडमधे? काहीच्या काही. या प्रत्येक गोष्टीत थॉट प्रोसेस का हवा हे सांगा.
माझा फंडा जास्त कॉम्प्लिकेटेड
माझा फंडा जास्त कॉम्प्लिकेटेड नाही आहे, मी कोणत्या कारणाला(cause) सपोर्ट करायचा हे ठरवतो....जेंव्हा आपण एखाद्या व्यक्तीला सपोर्ट करायचे ठरवतो तेंव्हा गोष्टी किचकट बनतात. बहुतेकदा आपल्या मनाला त्या पटून देखील आपण त्या इतर कुणालाही पटवून देऊ शकत नाही, त्या व्यक्तीच्या यशापयशा सोबत संलग्नता येते/राहते , उद्या दिपके या cause पासून वेगळा होऊन त्याच्या विरुद्ध विचारसरणी असलेल्यांच्या वळचणीला गेला तर माझी त्याच्याशी असलेली बांधीलकी संपुष्टात येईल.

तुम्हाला शुभेच्छा !
तुम्हाला शुभेच्छा !
जेव्हां कुणी लिंक पाठवेल त्यावर बिनधास्त क्लिक करा. आय ट्रस्ट ब्रो म्हणा.
जमीन घेताना आणि प्रत्येक व्यवहारात सजग, सावधान राहणे गरजेचे नाही. आय ट्रस्ट ब्रो. सिंपल.
काही गोष्टी जाणवतात, त्या
काही गोष्टी जाणवतात, त्या सांगणे व्यवहार्य नसतात. >>> आय ट्रस्ट ब्रो याच्यासाठी होतं. रच्याकने जेंव्हा आपण "मला असं वाटत, म्हणून माझ्यावर विश्वास ठेव" असा समोरच्याला सांगतो, तेंव्हा हे कोट वापरतात
थॉट प्रोसेस लिहून काढायचा का? >> लिहावा असाच काही गरजेचं नाही, पण थॉट प्रोसेस असावा हे गरजेचं आहे. आपण काय/कसा विचार केलेला हे तर आपल्याला ठाऊक असतंच ना? किंबहुना राजकारणासारख्या क्लिष्ट प्रांतातील एखाद्या घटनेचे/ गोष्टीचे अनुमान लावताना त्यामागे कोणताही ही थॉट प्रोसेस नसेल तर अश्या अनुमान आणि अंदाजांचे मूल्य माझ्या मते कोणत्याही रँडम गेस पेक्षा अधिक नसते, आणि नो ऑफेन्स, निव्वळ आपल्याला जाणवते म्हणून केलेले रँडम गेस माझ्यासकट प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी अचूक ठरलेलेच असतात.
फार्स विथ द डिफरंस
फार्स विथ द डिफरंस
जेव्हा एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवल्यामुळे आपले काही नुकसान होणार नसते, झाला तर फायदाच होणार असतो तेव्हा त्या गोष्टीवर विश्वास ठेवणे ही सगळ्यात चांगली Strategy. ह्याला पास्कल'स वेजर असे म्हणतात.
pascal's Wager is a philosophical argument by Blaise Pascal suggesting that it is a rational bet to believe in God, as the potential benefits of belief (eternal happiness) outweigh the finite losses incurred by living a religious life if God does not exist. Essentially, since we must choose whether to believe or not, Pascal argues that believing in God is the safer option.
म्हणून माझा दिपके वर विश्वास आहे.
सावध राहण्याने नुकसान होत
सावध राहण्याने नुकसान होत नाही असे मी इतके दिवस समजून होतो. जाऊ द्या. पाघपा.
अण्णांच्या आंदोलनामुळे एव्हढे मोठे नुकसान झाल्यावरही निव्वळ वादासाठी वाद म्हणून काहीच्या काही लॉजिक लावणार्यांना काय डोकं लावणार!
एकदा खड्ड्यात पडल्यानंतर दुसर्या वेळी अक्कल येणार नसेल तर कपाळमोक्ष अटळच आहे.
(No subject)
केशवकूल देवाचे उदाहरण पटले
केशवकूल देवाचे उदाहरण पटले नाही.
पण स्ट्रेटेजी पटली.
सध्याच्या स्थितीत जो सरकारला जाब विचारेल त्याला एकटे पडू देऊ नये कारण मुळात जाब विचारने ही आपली सुद्धा जबाबदारी आहे.
तरीही जर कोणाला यात संशयास्पद वाटत असेल तर काही हरकत नाही,
पण मग निदान स्वतंत्रपणे तरी तो जाब विचारायची धमक दाखवा.
ज्यांना थॉट प्रोसेस ( :हाहा:)
ज्यांना थॉट प्रोसेस ( :हाहा:) पाहीजे त्यांनी कष्ट घ्या आणि वर काढलेले धागे वाचून काढा. २०११ साली काय थॉट प्रोसेस होती हे समजेल. उगॉच शंकेखोर वगैरे निगेटिव्ह शब्द वापरण्यापेक्षा सजग नागरीक कसे सावधान असतात ते बघा. आणि एव्हढा मोठा खड्डा खणल्यावर रेड फ्लॅग दिसत असताना पुन्हा खड्ड्यात उड्डी मारण्याची थॉट प्रोसेस मात्र नक्की लिहा. इतकंच नाही तर इतरांनाही खड्ड्यात उड्या मारायचा आग्रह करण्यामागे काय थॉट प्रोसेस काय असते हे लिहाच.
मी या धाग्यावर पहिल्यापासून हेच लिहीलंय कि दीपकेला माझा पाठिंबा नाही, ज्यांना द्यायचा ते देऊ शकतात, आता माझं मत काय आहे हे मांडण्यासाठी अग्नीदिव्य करायचं का? मी काही कुणाला आग्रह केला नाही. पण जे लिहायचं टाळलं ते लिहा म्हणून आगाऊ सल्ल्यापासून हवेत लिहायचं नाही पर्यंत मुक्ताफळे आणि थॉट प्रोसेस सांगा पर्यंत मजल गेलीच आहे.
अण्णांच्या आंदोलनाबाबत आता घडून गेल्यानंतर पुन्हा मागे जाऊन हे सर्व मला माहीत होते असा दावा करण्यात अर्थ नाही. पण ते उस्फूर्त नव्हते. विश्वचषक संपल्यावर जंतरमंतरवर एक दिवसाचे लाक्षणिक आंदोलन झाले होते. त्यानंतर विविध टीव्ही शो मधून अण्णा केजरीने हजेरी लावलेली होती.
१९९७ साली मनोज रघुवंशीने आर एस एस च्या अनेकांनी मास मीडीयाचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. ते नवीन टीव्ही क्रांतीमधे सामील झाले आहेत असा एक टिव्ही शो केला होता. मनीष सिसोदिया हे पत्रकार होते. ते अण्णांच्या आंद्दोलनासाठी मीडीया मॅनेजमेंटचं काम बघत होते.
रॉञटरने अण्णा, केजरीवाल आणि नरेंद्र मोदी यांच्ञा सोशल मीडीयावरच्या उदयाबद्दल गौप्यस्फोट उघड केला होता जो कारवां आणि अन्य एका स्वतंत्र मीडीया हाऊसने छापला होता. सध्या हे इंटरनेटवर सहज उपलब्ध नाहीत. वेब अर्काईव्ह मधून सर्च करता येत असल्यास शोधून घ्या.
या रिपोर्ट मधे अण्णा, केजरी आणि मोदी यांच्या मीडीया मॅनेजमेंट मधे काही लोक कॉमन होते याकडे लक्ष वेधले होते. आयआयटीतले लोक होते. प्रशांत किशोर यांनी त्या वेळी भूमिका पार पाडली होती. अण्णा दिल्लीत उपोषणाला बसल्यानंतर (आधी जंतरमंतर) दिल्लीत २४ * ७ कॅमेरे लागलेले होते. सुरूवातीला शंभर लोक सुद्धा नव्हते रस्त्यावर. पण चोवीस तास लाईव्ह, अण्णांवर कारवाई, एक दिवस जेल या क्रमामुळे उत्सुकता वाढत गेली. मग राजघाटावर अण्णा गेले, तिथून रामलीला. तिथे अण्णा कि रसोई लावली. दिल्लीतले भिकारी जमा झाले. तीच गर्द्दी म्हणून दाखवली.
नंतर हौसे गवसे नवसे येत गेले. मग पिक्चर हिट होतो तसं आंद्दोलन हिट झालं
यात आम्ही म्हणतो तेच जनलोकपाल पास करा, संसदेचं अधिवेशन घ्या हा हुकूमशाही अप्रोच आवडलेला नव्हता. हे सामान्य जनतेचं मत होतं. जेया धाग्यावर आलेलं आहे.
आता जे लोक २०२६ ला तुमची २०११ साली काय थॉत प्रोसेस होती हे विचारत आहेत त्यांचा सत्कार रामलीलावर ठेवा.
दीपकेचे फॉलोअर्स असेच संशयास्पद आहेत. रेड फ्लॅग्ज आहेतच.
पैशावरून वाद झालेला होता हे एक दोन रिपोर्टस मधे आलंही होतं. पण आता २०११ सालचे ते रिपोर्टस शोधणं जवळजवळ अशक्य आहे. अण्णा आंदोलनातले सर्व चेहरे सेट झालेत. किरण बेद्दींना भाजपने राज्यपाल बनवले. पुढे केजरीवालांनी समाजवाद्यांना खड्यासारखे बाहेर काढले. योगेंद्र यादव, प्रशांत भूषण इत्यादी. किंवा या नाट्यातला त्यांचा रोल संपला असेल.
वराणसी मधून मोदी उभे राहिले ती निवडणूक जड होती. मुरली मनोहर जोशी प्रत्येक वेळी कमी मताधिक्याने निवडून आले होते. शेवटच्या वेळी कसीबसे निवडून आले होते. केजरीवाल त्यांच्या विरोधात उभे राहिले. माध्यमांनी केजरी विरूद्ध मोदी असा सामना लावला. केजरीने मोदीविरोधातल्या मतांत फाटाफूट केली आणि मोदी निवडून आले. या बदल्यात दिल्ली आपला मिळाली. काँग्रेसचे उच्चाटन झाले.
आंदोलनादरम्यान केजरीवाल राज्यांनी त्यांच्या अधिकारात लोकपाल नियुक्त करा नाहीतर आम्ही धरणे धरू अशा धमक्या देत होते.
ते मग लखनौला मायावतींच्या विरोधात उपोषणाला बसले. मग महाराष्ट्रात आले. मुंबईत हल्ला झाला म्हणून कांगावा झाला.
पण नऊ वर्षे लोकपालचनियुक्त न केलेल्या आणि कॅगचा ठपका असलेल्या मोदींच्या विरोधात ब्र सुद्धा नाही काढला. यांचाच शिष्य आता केजरी पार्ट २ करतोय. हा लाँच आता झाला. पण २०२७ ला उत्तर प्रदेश निवडणुकीत त्याचा वापर केला जाईल आणि नंतर क्न्हैय्याप्रमाणे एका कोपर्यात बसवले जाईल.
थॉट प्रोसेस चा आग्रह झाला म्हणून सांगितले आता सांगितल्यावर पण समाधान होईल याची काहीही खात्री नाही. ना मतपरिवर्तन होईल ही अपेक्षा... कशाला हवं होतं ते?
वेब अर्काईव्ह मधून शोधायचे असल्यास संदर्भः
२०११-१२ च्या काळात अण्णा हजारे आंदोलनात अरविंद केजरीवाल आणि बाबा रामदेव यांचा काही काळ संपर्क होता. केजरीवालने रामदेवना ट्विटरवर सपोर्टही दिला होता. पण नरेंद्र मोदी यांच्याशी त्यावेळी विरोधी संबंध होते (रामदेव मोदींचे समर्थक होते).
मोदींचे सोशल मीडिया २०१४ च्या निवडणुकीपूर्वी - स्वतंत्र IT टीम होती (अरविंद गुप्ता, राजेश जैन, बी.जी. माहेश इ.). त्यांना Pinstorm सारख्या एजन्सीचा वापरही झाला.
केजरीवाल यांच्यासाठीही Pinstorm ने काम केल्याचे उल्लेख आहेत (२०१४ च्या आसपास).
रामदेव यांचा स्वतंत्र प्रमोशनल नेटवर्क होता (Patanjali आणि त्यांच्या टीमद्वारे). पण रामदेव अण्णांच्या समर्थनार्थ आले होते. हे टिव्हीवर दिसलेले आहे. शिवाय पळ काढल्याचे उल्लेख आहेत.
अण्णा आणि अरविंद केजरीवाल
अण्णा आणि अरविंद केजरीवाल यांच्यात २ कोटी रूपयांवरून जो वाद झाला याच्या लिंक्स आता उपलब्ध नसतील या समजामुळे मी भावाने जी माहिती दिली त्यावर मी विश्वास ठेवेन पण इथे देता येत नाही असे म्हटले होते. अण्णांची लीगल टीम तेव्हां चांगलीच सक्रीय होती. आता आता पर्यंत त्यांचे एकमेव निष्ठावान विश्वंभर चौधरी होते ते ही आता निर्भया बानोकडे गेले आणि आता झुरळ आंदोलनात सामील झाले आहेत.
https://www.ndtv.com/india-news/anna-hazare-rejects-arvind-kejriwals-off...
ज्या महाभागाने हवेत माहिती नको असे म्हटलेय त्याने इथे आमच्या व्हॉट्स अॅप ग्रुप वर अमूक तमूक वाचले असे अनेकदा इथे सांगितलेय. तसेच अनेक वेळा संदर्भ खोदून खोदून विचारल्यावरही उत्तरं देण्याचे टाळलेले आहे. दोन्हीपैकी कुठल्या वेळेला हे हवेत किंवा तारेत होते माहीत नाही.
मोदींवर विश्वास ठेवून
मोदींवर विश्वास ठेवून फसलेल्या लोकांनी कुठं जायचं?
अण्णा मुळे नुकसान कोणाचे आणि कसे झालं?
नीट च्या पुनरपरिक्षेच्या संदर्भात देखील काही लिक झाल्या आहेत अशी बातमी आहे आणि सरकारने टेलिग्राम अँप वर बंदी घातली आहे,
हा मास्टरस्ट्रोक बघून वॉटसप आणि अन्य वापरणारे आता काय करतील?
गायपट्ट्यातले अंधभक्त माबोवर येऊ लागले तर काय आणि कसा प्रतिसाद द्यावा?
असे काही प्रश्न मनी दाटले आहेत
सगळं रामायण सांगितलं आहे.
सगळं रामायण सांगितलं आहे. शिवाय ते धागेही वर काढले आहेत.
रामायण पण नाईलाजाने सांगितले.
नीटच्या परीक्षेने फसलेल्या लोकांनी पुन्हा दीपकेंना न फसता निवडणुकीत विचारपूर्वक कर्तव्य करावे. उद्या दीपकेने फसवले तर कुठे जायचे हा प्रश्न कोण विचारणार? मुळात अण्णांच्या आंदोलनानंतर जनलोकपाल आलंच नाही, अण्णांनी आग्रह धरला नाही. मग अण्णांना सपोर्ट करणार्यांनी कुठे पश्चात्ताप व्यक्त केला का? तो न करताच नव्या आंदोलनाची भलावण का?
इथे हॅलो इफेक्ट टाळणे जास्त रिलेव्हन्ट आहे. कन्फर्मेशन बायस नाही,
असंतोषाची स्पेस व्यापायचा
असंतोषाची स्पेस व्यापायचा संघी डाव
https://www.youtube.com/watch?v=0ZkRGUksSjw&t=2332s
ह्या धाग्याचे शीर्षक आहे
ह्या धाग्याचे शीर्षक आहे "Cockroach जनता पार्टी झिंदाबाद !"
चर्चा त्यापुरतीच मर्यादित ठेवूया. अन्ना आणि २०११ ह्यासाठी पाहिजे तर स्वतंत्र धागा काढावा.
मी वर्तमान काळात वावरणारा आहे. Now and Here!
पुन्हा एकदा pascal wager,
दिपके सच्चा असेल तर फायदाच फायदा, नसेल तर जे आहे तेच चालू राहील.
उम्मीद पे दुनिया कायम है.
आशा नाम मनुष्याणां काचिदाश्चर्यशृङ्खला ।
यया बद्धा: प्रधावन्ति मुक्तास्तिष्ठन्ति पङ्गुवत् ॥
संशयात्मा विनश्यति.
पण धोक्याची सूचना आणि लाल कंदील दाखवल्याबद्दल मात्र अनेक आभार!
जगभरातले जेन झी पेटून उठत
जगभरातले जेन झी पेटून उठत आहेत.
आम्ही भारतीय झुरळे कसे मागे राहणार.
एक ठिणगी पडली आणि बघता बघता वणवा पेटला.
यातलं एक तरी अक्षर खरं झालेलं दिसतंय का?
म्हणूनच मी सुरुवातीलाच म्हणालो होतो कि हे सगळं हास्यास्पद आहे.
गायपट्ट्यातले अंधभक्त माबोवर
गायपट्ट्यातले अंधभक्त माबोवर येऊ लागले तर काय आणि कसा प्रतिसाद द्यावा?>>> आठवण काढली आणि आलेच!
Pages