Cockroach जनता पार्टी झिंदाबाद !

Submitted by ऋन्मेऽऽष on 20 May, 2026 - 16:30

जगभरातले जेन झी पेटून उठत आहेत.
आम्ही भारतीय झुरळे कसे मागे राहणार.
एक ठिणगी पडली आणि बघता बघता वणवा पेटला.

हे आमचे इंस्टाग्राम अकाऊंट
फक्त चार (४) दिवसात 8.5 मिलियन म्हणजे तब्बल 85 लाख फॉलोअर्स.
https://www.instagram.com/cockroachjantaparty?igsh=YjhvYnhrZWJsMWtj

आणि ही आमची वेबसाईट
https://cockroachjantaparty.org/

कुठल्या वेगळ्याच जगात राहत असाल आणि हे काय याची कल्पना नसल्यास धागा वाचत राहा...

क्रांती आता फार दूर नाही...
ऑफ द कॉकरोच बाय द कॉकरोच फॉर द कॉकरोच !

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भाबडेपणा आणि बावळटपणा यात एक सूक्ष्म रेषा असते.
ती केंव्हा ओलांडली जाते हे बऱ्याच भाबड्या लोकांना समजत नाही!

तिसरीत असताना शाळेत एकदा कुठल्यातरी प्रसंगी वर्गगीते गाऊन झाल्यावर, बाजुच्याच माध्यमिक शाळेतील नवीन हिंदी शिक्षिका - ज्या गाणी सुद्धा शिकवत - त्यांनी "हे माँ तेरी सुरत से अलग भगवान की सुरत क्या होगी" हे गाणं गायलं.

आम्ही शाळेतून घरी परतताना आधी हेमाचं घर लागलं, बाहेर तिचे बाबा उभे होते, तिने धावत जात आनंदाने ओरडून सांगितलं "बाबा , आज कीनई बाईंनी माझ्यावर गाणं म्हटलं, माझं खूप कौतुक केलं त्यात."

>>
अरेच्चा तुम्हीच आता गलिच्छ भाषा आणि वैयक्तिक हल्ले याबद्दल प्रवचन देऊन आलात ना? कि ती टैमप्लीज होती?
<<
मी कुठलीही गलिच्छ पातळी गाठलेली नाही. विषय आहे कॉक्रोच जनता पार्टी आणि माझी पोस्ट त्यांच्या जंतरमंतरवरील जे काही आंदोलन, सभा, गोंधळ, भारूड चालू होते त्यावरच बोलत आहे. कुठल्याही मायबोली सदस्यावर वैयक्तिक हल्ला नाही. वैयक्तिक हल्ला ह्याची माझी व्याख्या: मत मांडणार्या मायबोली सदस्याची पार्श्व भूमी, शिक्षण, बौद्धिक कुवत, आर्थिक स्थिती अशा कुठल्या तरी गोष्टीवर हल्ला करणे.

नीट प्रकरणी सरकारला धारेवर धरणे आवश्यक आहे. शिक्षणमंत्र्याचा राजीनामा मागणे आणि तो मिळवणे हेही चुकीचे नाही.
मात्र झुरळ या कामासाठी पूर्ण नालायक आहे हे सिद्ध होत आहे. त्या करता ज्या पद्धतीने रान उठवावे लागते ते ह्या तथाकथित पक्षाच्या आवाक्यातले नाही.
काँग्रेस किंवा आप अशा पक्षाने जोर लावायला हवा.

आपल्या आवडत्या पक्षाने आवाज उठवला तरच मी अन्यायाविरुद्ध लढणार ही वृत्ती सामान्य नागरिकांनी सोडून द्यायला हवी.

तसेच मी आवाज उठवून काय फायदा? सत्तेत बसलेले फार शक्तिशाली आहेत, आपल्याला यश मिळणारच नाही या नकारात्मक विचारांना दूर सारता यायला हवे.

मला जर कुठे ढळढळीत अन्याय दिसत असेल आणि मी त्याविरुद्ध निषेध कुठेच नोंदवत नसेल तर मी स्वतःला भारतीय नागरिक म्हणवण्याचा लायक समजणार नाही.

आणि जे आवाज उठवत आहेत त्यांना त्या कामासाठी नालायक बोलायचा हक्क तर मला बिलकुल बिलकुल नाही.

मला जर कुठे ढळढळीत अन्याय दिसत असेल आणि मी त्याविरुद्ध निषेध कुठेच नोंदवत नसेल तर मी स्वतःला भारतीय नागरिक म्हणवण्याचा लायक समजणार नाही## अमेरिकन नागरिक असल्याने काहीजण तसेही लायक नाहीत.
राजीनामा झुरळनी मागितला की काँग्रेस ने हा मुद्दा ahe ka ?

जर मोदीला नैतिकतेची चाड असेल तर त्याने प्रधानला आधीच हाकलून द्यायला हवे होते.

किती लोकं सपोर्ट करतात.

कॉमी साहेब

जालावरील आभासी जग आणि प्रत्यक्ष वस्तुस्थिती यातील फरक बर्याच तरुणांना समजत नाही. काही लाख जालीय अनुयायी आणि जमिनीवर उतरून आंदोलन करणे यातील फरक समजून घ्यावा असे कुणाला वाटत नाही का.

नीट मध्ये घातलेला घोळ हा अनेक तरुणांच्या करियर शी संबंधित आहे याबद्दल सरकारला धारेवर धरणे आणि वड्याचे तेल वांग्यावर काढणे यात काहीतरी फरक आहे कि नाही.

८० च्या दशकात मुंबई विश्वविद्यापीठामध्ये पदवी परीक्षेचे निकाल लागायला महिनोन्महिने लागत असत. माझ्या मित्राच्या भावाची आय आय एम कलकत्ता चा प्रवेश वेळेत निकाल न लागल्याने गेला होता. शेवटी सरकारने एक आय ए एस अधिकारी आणून बसवला आणि ४० दिवसात निकाल लावणे सक्तीचे केले यांनतर मुंबई विश्वविद्यापीठाचा कारभार सुधारला.

आंदोलन करणे आणि सरकारला धारेवर धरणे समजू शकतो. पण मूलभूत मुद्दा कुणीच लक्षात घेऊ इच्छित नाही यायचे मला आश्चर्य वाटते.

२००३ मध्ये भारताची लोकसंख्य १११ कोटी होती आणी २००८ मध्ये १२० कोटी. म्हणजेच २०२१ ते २०२६ मध्ये ९ कोटी तरुण १८ वर्षाचे झाले. दरवर्षी १ कोटी ८० लाख इतक्या मोठ्या प्रमाणावर परीक्षा घेणे आणि त्याचा निकाल लावणे हि गोष्ट सोपी नाही.

त्यातून सगळ्या स्पर्धा परीक्षा या सी बी एस ई च्या अभ्यासक्रमांवर आधारित आहेत. यामुळे अनेक राज्यातील शाळा स्थानिक बोर्ड ऐवजी केंद्रीय बोर्डाशी संलग्न होणे पसंत करतात यामुळे या केंद्रीय यंत्रणेवर अफाट भार पडतो आहे. शिक्षणाचे केंद्रीकरणाऐवजी विकेंद्रीकरण करणे आवश्यक आहे.

दुर्दैवाने सर्वोच्च न्यायालयाने राज्य स्तरावर परीक्षांऐवजी केंद्रीय स्तरांवर परीक्षा घेणे सक्तीचे केले. यामुळे नीट सारख्या परीक्षेत अभूतपूर्व गोंधळ निर्माण झाला.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या किंवा घेऊ नका त्यामुळे प्रश्न कसा सुटेल याबद्दल हि झुरळे काहीच बोलायला तयार नाहीत. अराजक करून असलेले प्रश्न सोडवण्यापेक्षा ते बीवाढवून आपली पोळी भाजण्यापलीकडे हि झुरळे काहीही करू शकणार नाहीत हे सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे.

केवळ मोदीविरोध हा समान धागा असणारे लोक येथे झुरळांबद्दल सहानुभूती दाखवत आहेत.

अभिजित दिपके हा ३० वयाचा युवक अमेरिकेत एक सव्वा कोटी रुपये खर्च करून एम एस पब्लिक रिलेशन करून परत येतो आणि जसा काही सर्व युवकांचा देवदूत असल्याचा अविर्भाव आणतो आणि तरुण त्याच्या मागे हुरळून जातात. याची पार्श्वभूमी तरी पाहून घ्या.

उद्या हेच तरुण हाती काहीही न लागत भ्रमनिरास होऊन नैराश्याच्या गर्तेत गेले तर त्याची जबाबदारी कोण घेणार?

कोणताही ठोस कार्यक्रम नसताना तरुणांना सवंग लोकप्रिय घोषणा देऊन नदी लावणारा हा आहे कोण? त्याचा बोलविता धनी कोण? हे जाणून घेणे आवश्यक नाही का?

उद्या हेच तरुण हाती काहीही न लागत भ्रमनिरास होऊन नैराश्याच्या गर्तेत गेले तर त्याची जबाबदारी कोण घेणार?

>>>>>>>>>>

नीट चा पेपर फुटल्यामुळे दुबार द्यावी लागल्यामुळे निराशेच्या गर्तेत गेलेल्या मुलांची जबाबदारी कोणाची आहे?

सुबोध खरे जरी एका पक्षाचे समर्थन करत असले तरी पडताळून पहा हे त्यांचे म्हणणे पटते. एकदा २०११ ला तोंड पोळले आहे. पुन्हा तीच चूक नको. कदाचित हाच विचार अनेकांचा असणार.

Wait and Watch धोरण चुकीचे नाही.

नीट चा पेपर फुटल्यामुळे दुबार द्यावी लागल्यामुळे निराशेच्या गर्तेत गेलेल्या मुलांची जबाबदारी कोणाची आहे?
जबाबदारी अर्थातच सरकारची आहे!
ते पळून जात नाहीत.
एखाद्या दहशतवादी विरोधी कारवाईत सैनिक मारला जातो त्याच्या कुटुंबाची जबाबदारी सरकारची असते.
उद्या सरकार जबाबदारी घेणार नाही म्हणून सैनिक पळून गेला तर ते चालणार नाही.

सरकार जबाबदारी घेतं पण आंदोलनाचे नेते काय करतात? काही नाही.

मराठा आरक्षण आंदोलनात काय झालं
Out of 1961 total cases registered statewide during the agitations, a regional committee recommended the withdrawal of 733 cases, as charge sheets had already been filed in other 857 of them.
Exemptions: While most protest-related FIRs and non-serious offenses are being cleared, severe criminal charges, such as those involving direct assaults on police officials, may not be withdrawn.

अशा तरुणांच्या केसेस लढण्यासाठी नंतर कोणीही येत नाही.
आईबाप न्यायालयात खेटे मारत राहतात पैशाचा चुराडा होतो.
मुलांची सरकारीच काय बरच वेळेस खाजगी नोकरी मिळण्याची शक्यता सुद्धा धूसर होत जाते.

आणि झुरळांचे नेते वातानुकूलित खोल्यात बसून पुढचे बेत ठरवतात

सुबोध खरे,

मुद्याचे बोलत आहात.

(मी मराठी भाग वाचला.)

आज इंडिया आघाडीची महत्वाची बैठक ठरली आहे. त्यात कदाचित यावरही चर्चा होईल. बातम्या बघितल्या नाहीत. बैठक आधीच झाली असेलसुद्धा.

एवीतेवी सरकारे कोणतेही सबळ कारण नसताना देखील आपल्या विरोधात जाणार्यांना त्यांचे हक्क लाथाडून, येनकेन प्रकारे कोंडीत पकडून न्यायालयात खेटे मारायला लावतेच की?
NEET पेपर लीक हा काही पहिलाच पेपर लीक नाही आहे, आज वर सरकारने कोणती ठोस पावले उचलली? की जेंव्हा लोक रस्त्यावर येणार तेंव्हाच पावले उचलली जाणार?...सरकार पळून जात नाही, पण गेंड्याची कातडी असलेल्या निगरगट्ट मुर्दाडांना तसेही पळून जाण्याची निकड पदरी बाळगलेल्या गोदी मीडिया, आयटी सेल आणि अंधभक्ताच्या मांदियाळी मुळे आज वर कधीही भासली नाही, या पुढे ही भासेल (सत्तेत असेपर्यंत तरी ) याची दूरवर शक्यता दिसत नाही.
आता पर्यंतच्या प्रतिसादां मधून तरी झुरळ झुरळ म्हणून हिणवणार्यांच्या भाषेतून, लिखाणातून ती मुले जेलात जातील, अथवा त्यांचे पालक कोर्ट कचेऱ्यांत खेटे मारतील ही धास्ती कधी जाणवली नाही, निसंधिग्धपणे दिसली ती केवळ वैचारिक गुलामी मुळे नीरक्षीर विवेक हरवून बसलेली एका राजकीय पक्षाची अंधभक्ती. तेंव्हा हा स्टान्स बदलून करू पाहत असलेला बुद्धीभेद थांबवा.

केसेस होईल असे काहीही करू नये हे वेगळे सांगण्याची गरजच नाही. तसे चिथावणीखोर कुणीही लिहिले नाही. ते CJP वालेही कानीकपाळी ओरडून शिस्तीत रहा म्हणून सांगत आहेत.

Crowd intelligence is equal to the intelligence of the least intelligent man on crowd.
हिरवट टाळक्याच्या तरूणांची माथी फिरायला फारसा वेळ लागत नाही!
आपली पोळी भाजून घेण्यासाठी आपल्याकडे भरपूर लोक टपलेले असतातच.

आधी सोमीवर बसुन काय बाता करता रस्त्यावर उतरल्याशिवाय काही होणार नाही सांगितले. आता रस्त्यावर उतरून विनाकारण केसेस ओढवून घ्याल म्हणत आहेत.

यासाठीच सांगितले होते की सोमीवर बसून रस्यावर उतरण्याचे सल्ले देऊ नयेत.

>>>>>तरूणांची माथी फिरायला फारसा वेळ लागत नाही!
आपली पोळी भाजून घेण्यासाठी आपल्याकडे भरपूर लोक टपलेले असतातच. >>>>>

.आपल्या पोळ्या ह्या अशाच भाजून झाल्या की निखारे विझवायची घाई.
भुकेल्यांना सल्ला द्यायला मोकळे " तुम्हाला चटका लागायला नको म्हणून पाणी शिंपडले जरासे.. हो"

जबाबदारी अर्थातच सरकारची आहे!
>>>>>>>>>>>
अपयशी शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा न घेण्यामागे काय असहायता असेल मोदीजींची? ह्यापदासाठी लायक असा एक पण माणूस नाही उरला का देशात? खाजगी कंपनी मध्ये असता तर त्याच्याबरोबर काय झाले असते?

<<<< Crowd intelligence is equal to the intelligence of the least intelligent man on crowd.
>>>>

सुबोध खरे
वाक्य आवडले Happy

आशा करतो सर्वच राजकीय पक्षाच्या समर्थकांना/भक्तांना सुद्धा हे लागू असेल.

हिरवट
>>>
कितीही स्टान्स बदलला तरी टाळक्यात किती द्वेष आणि विष आहे- ते सगळं अवचित उघडं पडतं ते असं.

हिरवट टाळकी म्हणजे? मुस्लिम युवा?
सिरीयसली??
हे आंदोलन मुस्लिमांचे आहे?
आणि त्यांचा असा तुच्छतेने केलेला उल्लेख?
मॉरल?? भाषा??

हिरवट टाळकी हा शब्दप्रयोग श्री व्यंकटेश माडगूळकर यांचा स्वातंत्र्यपूर्व काळातील 1942आहे.

हिरवट चा अर्थ अजून परिपक्व न झालेला (कोणतेही फळ भाजी किंवा पीक असते तसे).

उगाच त्याला धार्मिक रंग देऊन आपल्या मनात कोतेपण/ खुजेपण उघडे करु नका!

Pages