Cockroach जनता पार्टी झिंदाबाद !

Submitted by ऋन्मेऽऽष on 20 May, 2026 - 16:30

जगभरातले जेन झी पेटून उठत आहेत.
आम्ही भारतीय झुरळे कसे मागे राहणार.
एक ठिणगी पडली आणि बघता बघता वणवा पेटला.

हे आमचे इंस्टाग्राम अकाऊंट
फक्त चार (४) दिवसात 8.5 मिलियन म्हणजे तब्बल 85 लाख फॉलोअर्स.
https://www.instagram.com/cockroachjantaparty?igsh=YjhvYnhrZWJsMWtj

आणि ही आमची वेबसाईट
https://cockroachjantaparty.org/

कुठल्या वेगळ्याच जगात राहत असाल आणि हे काय याची कल्पना नसल्यास धागा वाचत राहा...

क्रांती आता फार दूर नाही...
ऑफ द कॉकरोच बाय द कॉकरोच फॉर द कॉकरोच !

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>>>>>>त्याच्या सत्यतेची जबाबदारी माझी असणारच.
फ्रीडम ऑफ स्पीच चे काय?
काय जबाबदारी घेणार. नाही घेत मी जा करा काय ते - असे कोणीही म्हणु शकते. तुम्ही काय घंटा वाकडं कराल? जो ऐकतो त्याची जबाबदारी आहे की सत्यासत्येचा पडताळा करणे. जबाबदारी म्हणजे तसे त्याने केले अ थवा नाही तरी अर्थात फरक काहीच पडत नाही.
--------------------
डॉ खरे, तुम्ही दर वेळी फार हाय मॉरल स्टँड घेता. तुमचा स्वभाव असेल.

The Manifesto.

Read it once. Read it twice. Then send it to someone who needs to read it.

01
If the CJP comes in power, no Chief Justice shall be granted a Rajya Sabha seat as a post-retirement reward.

02
If any legit vote is deleted, whether in a CJP or opposition-ruled state, the CEC shall be arrested under UAPA, as taking away voting rights of citizens is no less than terrorism.

03
Women shall receive 50% reservation, not 33%, without increasing the strength of Parliament. Additionally, 50% of all Cabinet positions shall be reserved for women.

04
All media houses owned by Ambani and Adani shall have their licences cancelled to make way for truly independent media. Bank accounts of Godi media anchors shall be investigated.

05
Any MLA or MP who defects from one party to another shall be barred from contesting elections — and from holding any public office — for a period of 20 years.

या पूर्ण प्रतिसादात आपण कुणी लिहिले आहे त्याचा आगापिछा काय याबद्दल काहीही लिहिलेले नाही याचा अर्थ हे आपणच लिहिलेले आहे असा सरळ अर्थ काढला जातो.

तेंव्हा आता तो मी नव्हेच म्हणून पाठ फिरवणे हा सरळ सरळ पळपुटे पणा आहे.

आणि

तो न वाचता जर आपण सरळ पुढे ढकलला असेल तर ते सवंग लोकप्रियतेसाठी केलेलं आहे असे मी स्पष्टपणे म्हणेन.

उगाच लोकांकडून टाळ्या मिळवण्यासाठी काहीतरी ढकलायचं आणि अंगावर आलं कि पळपुटेपणा करायचा?

@ सामो

If any legit vote is deleted, whether in a CJP or opposition-ruled state, the CEC shall be arrested under UAPA, as taking away voting rights of citizens is no less than terrorism.

असे म्हणणे हे सुज्ञपणाचे आहे का?

बरं
आता लो मॉरल स्टॅन्ड घेतो
))=((

Don’t take it so sentimentally, CJI tells lawyer complaining of online ‘distortion’ of the ‘cockroach’ remark

आतातरी भाजपिग़्ज नी आपापल्या खुराड्यात परत जावं.

हॅ

इथल्या प्रतिसादांना कोण सिरियसली घेतंय?

चार घटका करमणूक म्हणून पाहतो

आणि

मोदी सतत निवडून येतात म्हणून वैफ़ल्यग्रस्त झालेल्या लोकांचे शिमग्यातील मोदी सहस्त्र नाम वाचून फार गंमत वाटते

सुबोध खरे नेहमी माजी उपराष्ट्रपती बद्दल अत्यंत वाईट टीका करत असतात

<<<<
मी जर येथे ते फॉरवर्ड केले असेल तर त्याच्या सत्यतेची जबाबदारी माझी असणारच.
>>>>>

मी सत्याची जबाबदारी घेईन
त्यांनी वापरलेल्या भाषेची जबाबदारी मी का घेऊ?

उलट तो शब्द गाळून किंवा बदलून कॉपी पेस्ट केला असता तर ते असत्य ठरले असते Happy

<<<तो न वाचता जर आपण सरळ पुढे ढकलला असेल तर ते सवंग लोकप्रियतेसाठी केलेलं आहे असे मी स्पष्टपणे म्हणेन.
>>>>

आणि कोण म्हणाले न वाचता कॉपी पेस्ट केले.
वाचून केले.
पण त्यातील शब्द खोडले नाहीत.

दोन्हीतील फरक समजत नसेल तर मी पुन्हा पुन्हा समजावेन. कारण मी थ्री इडियट मधील रांचो आहे Happy

<<<
उद्या कोणीतरी जालावर लिहिले की श्री राहुल गांधी यांची एक बायको आहे आणि त्यांनी इतर तीन बायका 'ठेवल्या' आहेत.
मी जर येथे ते फॉरवर्ड केले असेल तर त्याच्या सत्यतेची जबाबदारी माझी असणारच.

>>>>

हे जे तुम्ही मुद्दाम राहुल गांधी यांचे नाव घेत खोडसाळ उदाहरण दिले आहे त्यावरून आपल्या moral बद्दल काय बोलावे हे तुम्हीच स्वतः ठरवा Happy
तुम्ही इथे एका ठराविक पक्षाचीच बाजू घेऊन भांडणार हे मात्र मला समजले आहे Happy

इथल्या प्रतिसादांना कोण सिरियसली घेतंय?
चार घटका करमणूक म्हणून पाहतो

वेरी गुड
तुमचा हेतू तुम्हाला लखलाभ
मी मात्र मला या देशाची समाजाची काळजी आहे आणि याचे काहीतरी देणे लागतो म्हणून येथे प्रतिसाद देत आहे.
आणि म्हणूनच युवा जनतेने जी क्रांतीची आशा दाखवली आहे तिच्यावर विश्वास ठेवून त्यांना सपोर्ट करत आहे

ऋन्मेऽऽष
सर, सगळे प्रतिसाद अगदी चपखल. लोकांची भाषा त्यांची लेवल दाखवते.

केशवकूल धन्यवाद
आणि हे खरे आहे
लोकांची भाषा त्यांची लेवल दाखवते.

या बाबतीत माझ्या आईची एक गोष्ट कायम मनात ठसली आहे. कधीतरी इथे लिहिले असेलही. थोडक्यात पुन्हा सांगतो. अनुकरण करावे अशी आहे.

माझ्या लहानपणी घरचे सारे कट्टर शिवसेना. घरचेच नाही तर बिल्डिंग सुद्धा. तेव्हा ती राजकीय पक्ष कमी आणि संघटना जास्त होती. आमच्यासाठी व्हिलन कोण तर तेव्हाचे सत्ताधारी काँग्रेस पार्टी.

तर एकदा शाळेत निबंध लिहायचा होता. विषय होता माणूस चंद्रावर राहायला गेला तर. मी त्यात लिहून आलो की ### नावाचा नेता तिथेही जमिनी हडपून आपला भ्रष्टाचार सुरू करेल. घरी आईला माझे हे लहान वयातले मोठे वाक्य कौतुकाने सांगितले तसे ती ओरडली. म्हणाली, त्यांचा असा एकेरी उल्लेख करायचा नाही. मी गोंधळात पडलो. म्हटले एखाद्या नेत्याला भ्रष्टाचारी म्हणू शकतो पण त्याचा उल्लेख एकेरी करायचा नाही, हे काय लॉजिक आहे! पण आईने तो मान केवळ वडिलधारी व्यक्ती या नात्याने ठेवायला सांगितला नव्हता. तर ते ज्या पदावर आहेत त्या पदाचा मान ठेवायलाच हवा असे म्हणाली. तिची ती शिकवण कायम मनात ठसली.

पुढेही आमच्या बिल्डींगमधील मित्र नेत्यांचा हव्या त्या भाषेत उद्धार करायचे. पण मी आजतागायत कधी कुठल्या नेत्यांचा उल्लेख एकेरी केला नाही. इतर शेलकी विशेषणे तर दूरची गोष्ट. फ्रस्ट्रेशन आले तर सगळे नेते हरामखोर बोलतो. पण एखाद्या नेत्याला अपमानास्पद शब्द वापरून कधीच नाही.

बाकी इतरांच्या भाषेबद्दल टिप्पणी करायची नाहीये. कारण एखाद्याने वैतागून कुठल्या भ्रष्ट नेत्याला शिव्या घातल्या म्हणून त्याला संस्कार नाही असेही नसते. आजच्या तारखेला जगभरातले राजकारण इतके सडके झाले आहे की कोणाचीही चिडचिड होऊ शकते. कोणाचाही उद्रेक होऊ शकतो. पण शेवटी संयम हेच शस्त्र!

मुद्दाम राहुल गांधी यांचे नाव घेत खोडसाळ उदाहरण दिले आहे.

ही विचारसरणी हास्यास्पद आहे.

राहुल गांधी ऐवजी श्री मोदी किंवा अमित शाह घ्या
मूळ मुद्दा भरकटवताय कशाला?

संयम बाळगायचा म्हणताय आणि चिडचिड थांबवण्यासाठी इतके मेगाबायटी प्रतिसाद देताय?

मुद्देसूद उत्तरं द्या

सुबोध खरे नेहमी माजी उपराष्ट्रपती बद्दल अत्यंत वाईट टीका करत असतात.

"नेहमी"?

बाकी मी टीका केली आहेच आणि त्याबद्दल मी मल्लिनाथी करणारही नाही

हमीद अन्सारी यांनी मुसलमानांना भारत असुरक्षित वाटतं हे विधान दोनदा केलं!
एक व्हिडीओ मी स्वतः पाहिलेला आहे!

इराण मधील रॉ संघटनेने मोठ्या कष्टाने निर्माण केलेलं हेरांचं जाळं त्यांनी उघडकीस आणून रॉ संघटनेचे कित्येक वर्षांचे कष्ट अक्षरशः धुळीस मिळवले.
एकदा वाचून पहा.

आणखी एक
Hamid Ansari backs Sharia court proposal, says each community has right to practice own personal law.

https://www.financialexpress.com/india-news/hamid-ansari-backs-sharia-co...

यावर आपल्याला त्यांची तरफदारी करायची असेल तर करा!

SOURCE काय तर OPINDIA आणि सनातन प्रभात! आणि कोणी Ex RAW ऑफिसर!
आय के गुजराल तर गेले. पण अन्सारी अजून आहेत! का नाही त्यांना पकडत आणि राष्ट्र द्रोहाचा खटला भरत?

<<<<
संयम बाळगायचा म्हणताय आणि चिडचिड थांबवण्यासाठी इतके मेगाबायटी प्रतिसाद देताय?
>>>>

मेगाबायटी Happy

माझ्या नावावर टिचकी मारा
माझ्या लिखाणात जा
तिथे माझे धागे मोजा
जवळपास ६००+ दिसतील
त्यात शतकी किती आहेत मोजा
जवळपास १५०+ दिसतील
त्यातील प्रत्येक धागा उघडा
तिथे निम्मे प्रतिसाद माझेच दिसतील.
मी मेगा गिगा वेगा टीगा बायटी प्रतिसाद देत लहानाचा मोठा झालो आहे Happy
लिखाण माझ्या रक्तात आहे,
माझ्या श्वासात आहे,
माझ्या उच्छवासात आहे..
मी ते नाही थांबवू शकत.
याला चिडचिड म्हणत असाल तर मी चिडलो आणि तुम्ही जिंकलात असे कबूल करूया. पण चर्चा थांबवूया नको.
बरेच काळाने मला या देशात काहीतरी वेगळे घडतेय अशी आशा दिसू लागली आहे त्यामुळे मी या राजकारण आणि चालू घडामोडी विभागात एन्ट्री मारली आहे. तर आता थांबायचे नाय Happy

SOURCE काय तर OPINDIA

हा दुवा न पाहताच ? तो दिलाय करण त्यात एन के सूद यांची मुलाखत आहे!

इतर कोणतेही दुवे पाहू शकता. भरपूर आहेत जाला वर
काय म्हटलंय ऐवजी कोणी म्हटलंय याकडेच लक्ष आहे आपलं!

Financial express मध्ये काय म्हटलंय ते ही पाहिलं का?
तेवढं पाहून घ्या.
त्यांना शरिया न्यायालये हवी आहेत.
आहे संमती?

पुन्हा एकदा
आय के गुजराल तर गेले. पण अन्सारी अजून आहेत! का नाही त्यांना पकडत आणि राष्ट्र द्रोहाचा खटला भरत?
का नाही पकडत ? मग ह्याचा अर्थ काय समजायचा? हे गंभीर प्रकरण नाही का?
ह्याला उत्तर द्या,

जाला वर
काय म्हटलंय ऐवजी कोणी म्हटलंय याकडेच लक्ष आहे आपलं!>>
तुमचंही. तुम्हीही ॠ ने काॅपीपेस्ट केलेलं जे आहे त्यावर कोणी लिहीलंयचीच चिकित्सा करत बसले आहात. तो मेसेज सीजेपी ने सगळीकडे प्रसारित केलेला असूनही ॠ ला जबाबदार ठरवत बसले आहात.

मुळीच नाही!

जालावर काय लिहिलंय त्याचा मुद्देसूद प्रतिवाद केला आहे!

ते ज्याने कुणी लिहिलंय त्याला कायद्याचे मूलभूत ज्ञान नाही हे स्पष्ट आहे.

पण ऋन्मेष ने ते पुढे ढकललंय म्हणजे त्याची जबाबदारी संपते असे नाही.

का नाही त्यांना पकडत आणि राष्ट्र द्रोहाचा खटला भरत?

असं करायला हवं होतं/ पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे!

उपराष्ट्रपती पदावर 10 वर्षे असलेल्या माणसाने मुसलमानांसाठी वेगळे शरिया न्यायालय पाहिजे ही मागणी करणे देशद्रोहापेक्षा कमी नाही.

अहो म्हनजे हे आरोप खोटे आहेत अस त्याचा अर्थ आहे. तुम्ही रुंमेश ला म्हणताहात कि फर्वड करताना जबाबदारी ने करा. आणि इथे स्वतः काय करत आहात?

हे आरोप खोटे आहेत

तुम्ही निकाल देऊन मोकळे झालात?

शरिया न्यायालयांबाबत आपले म्हणणे काय आहे?

शरीयाचे आपण नंतर बघू. पण ह्या राष्ट्र द्रोहाचा मुद्दा तुम्ही बाजूला का साराताय. बीजेपी ला केव्हढा फायदा होईल त्याचा विचार करा.

जरा आपापसातले वाद थांबवून ब्रेक घ्या लोकहो.
एकत्र येत देशासाठी काहीतरी करायची वेळ आली आहे.

पेटीशन लाईन ब्लॉक झालेली.

https://petition.cockroachjantaparty.org/sack/?utm_source=ig&utm_medium=...

पण आता पुन्हा उघडली आहे
वर टिचकी मारा Happy

IMG_20260526_003948.jpg

२०१९ मध्ये हे आरोप झाले. माझे सोडून ध्या हो. तुम्ही अत्तेत आहात तर खटला भरा. नाहीतर त्याचा अर्थ काय होतो हे समजून घ्या. मी नाही निकाल दिलेला. बीजेपी सरकारने निकाल दिला आहे.

>>का नाही त्यांना पकडत आणि राष्ट्र द्रोहाचा खटला भरत?<<
कँट बिलिव्, पिपल कुड बी सो नाइव..

भारत सरकारने कबुली देणं (देशद्रोहाचा खटला) कि आमचे गुप्तहेर फलाण्या देशात होते, जे पकडले गेले.. याचा शॉर्ट/लाँग टर्म परिणाम इंटरनॅशनल पोलिटिक्स वर काय होइल आणि त्याची किंमत कशी भोगावी लागेल याचं उत्तर अर्थात महापालिकेत उंदिर मारण्याच्या खात्यात काम करणार्‍यांकडे नसेलचं याची मला तरी खात्री आहे. असो..

गुजराल सोडा, मोरारजी देसाइंचं भारत रत्न याच कारणा करता हिसकाउन का घेतलं गेलं नाहि, या प्रश्नातंच त्याचं उत्तर दडलेलं आहे..

बाकि चालु द्या...

Pages