Cockroach जनता पार्टी झिंदाबाद !

Submitted by ऋन्मेऽऽष on 20 May, 2026 - 16:30

जगभरातले जेन झी पेटून उठत आहेत.
आम्ही भारतीय झुरळे कसे मागे राहणार.
एक ठिणगी पडली आणि बघता बघता वणवा पेटला.

हे आमचे इंस्टाग्राम अकाऊंट
फक्त चार (४) दिवसात 8.5 मिलियन म्हणजे तब्बल 85 लाख फॉलोअर्स.
https://www.instagram.com/cockroachjantaparty?igsh=YjhvYnhrZWJsMWtj

आणि ही आमची वेबसाईट
https://cockroachjantaparty.org/

कुठल्या वेगळ्याच जगात राहत असाल आणि हे काय याची कल्पना नसल्यास धागा वाचत राहा...

क्रांती आता फार दूर नाही...
ऑफ द कॉकरोच बाय द कॉकरोच फॉर द कॉकरोच !

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

या पार्टीचे निम्मे सभासद पाकिस्तानी आहेत अशी पुडी आता भाजपने सोडली आहे. गोदी मेडिया वाले ही पोपटपंची करत आहेत यात आश्चर्य नाही पण किरेन रिजिजु सारखे केंद्रीय मंत्रीही ही फेक न्यूज चालवत आहेत ! धन्य !

ही नवी पार्टी पाहून मोदीभक्त इतके का चेकाळले आहेत ?
भाजप चे दार ठोठवत असलेले कुमार विश्वास यांनी झुरळ या शब्दावर फालतू कोट्या करून टीका केली आहे,
कर्नाटकात तर भाजप नेत्यांनी काही खरोखरची झुरळे आणून जाहीरपणे त्यांना ठार केले आहे !

पाकिस्तानात कॉकरोच अवाम पार्टी काढलीय म्हणे, ' कॉपी आहे, पण उद्देश सारखाच ' आहे त्यांनी म्हटले आहे.

पाकिस्तानातून ४९ टक्के फॉलोवर यांचे त्यांनी स्वतःच पुरावे देत खंडन केले आहे आपल्या अकाऊंटचा हा स्क्रीन रेकॉर्ड व्हिडिओ बनवून

https://www.instagram.com/reel/DYtGkP9pokh/?igsh=MTJjeTV6MXlydHE5Yg==

जेवढा जास्त विरोध, जेवढी जास्त बदनामी करण्याचा प्रयत्न होईल तेवढाच जास्त फायदा झुरळांना होईल.

हास्यास्पद

कॉकरोच बद्दल वक्तव्य सरन्यायाधिशानी केलं.

त्याचा भाजप किंवा श्री मोदी यांच्याशी संबंध नाही.

पण काही मतलबी लोकांनी श्री मोदी यांनी न्यायव्यवस्था पण आपल्या वळचणीला बांधल्याचे आरोप करून उगाच वड्याचे तेल वांग्यावर काढण्याचे प्रयत्न केलेले आहेत.

मुळात सरन्यायाधीश हे कॉलेजियम सिस्टीममुळे आलेले आहेत. हि सिस्टीम मोडीत काढण्याचे प्रयत्न भाजप सरकाने NJAC कायदा करून केले होते ज्याला सर्वपक्षांनी पाठिंबा दिला होता. पण सर्वोच्च न्यायालयाने ते रद्दबातल ठरवून आपला सवता सुभा चालू ठेवलेला आहे.

तरी त्यांची निवड हरियाणा उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणू झाले तेंव्हा तेथे सरकार काँग्रेसचेच होते. याशिवाय ते सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश झाले ते सेवाज्येष्ठता क्रमाने झालेले आहेत. कोणा न्यायधीशाला डावलून भाजप सरकारने केलेले नाहीत.

सरकारने CJP ची स्थळे बंद केली याबद्दल लोकांची मते वेगवेगळी असू शकतील.

परंतु काहि घटनात्मक पदे असतात उदा राष्ट्रपती, सरन्यायाधीश, सरसेनानी.

त्यांच्यावर कोणा उपट सुंभाने परदेशात राहून टीका करणे हे त्या पदाचा अवमान आहे.

बाकी

The Manifesto.
Read it once. Read it twice. Then send it to someone who needs to read it.

हा अत्यंत भंपक आणि विचार न करता सवंग लोकप्रियतेसाठी काढलेला आहे हे स्पष्ट आहे

01
If the CJP comes in power, no Chief Justice shall be granted a Rajya Sabha seat as a post-retirement reward.

Justice Ranjan Gogoi: Nominated in 2020 shortly after his retirement in November 2019.Justice Ranganath Misra: The former Chief Justice of India, who was elected to the Rajya Sabha in 1998 as a member of the Indian National Congress (INC).Justice Baharul Islam: A former Supreme Court judge who resigned from the bench in 1983 and was later elected to the Rajya Sabha on a Congress ticket.

हि तीन उदाहरणे सोडली तर न्यायधीशांनी संसदेत प्रवेश केलेला नाही.

02
If any legit vote is deleted, whether in a CJP or opposition-ruled state, the CEC shall be arrested under UAPA, as taking away voting rights of citizens is no less than terrorism.

कुठे तरी कनिष्ठ निवडणूक अधिकाऱ्यांनी केलेल्या चुकीसाठी मुख्य निवडणूक आयुक्तांना जबाबदार धरून त्यांना अजामीनपात्र दहशवादी कायद्याखाली अटक करायची हि मागणी करताना कोणताही विचार केलेला नाही.

हे म्हणजे एखाद्या पोलीस कॉन्टेबलने केलेल्या मारहाणीसाठी पोलीस महासंचालकांना अजामीनपात्र गुन्ह्यासाठी अटक करण्याइतकी विधिनिषेधशून्य मागणी आहे.

The Unlawful Activities (Prevention) Act (UAPA), enacted in 1967, is India's primary anti-terror legislation. It aims to prevent and penalize unlawful activities, terrorist acts, and the financing of terrorism that threaten the sovereignty and integrity of India.

देशाच्या एकता आणि अखण्डते ला धोका देणारी दहशतवादी कृती यात आपल्याला कुठे दिसते?

03
Women shall receive 50% reservation, not 33%, without increasing the strength of Parliament. Additionally, 50% of all Cabinet positions shall be reserved for women.

स्त्रियांसाठी सरसकट ५० टक्के आरक्षण देणे हा एक विचार आहे पण सत्ताधारी पक्षाच्या निवडलेल्या सदस्यात जर तेवढ्या स्त्रियाच नसतील तर मंत्रिपदे कशी द्यायची हा विचार ना करता सवंग लोकप्रियतेसाठी केलेली मागणी आहे. असे झाल्यास राबरीदेवी सारख्या रबर स्टॅम्प संसद सदस्या तयार होतील याने बाबू आणि नोकरशाहीच जास्त बळकट होईल.

04
All media houses owned by Ambani and Adani shall have their licences cancelled to make way for truly independent media. Bank accounts of Godi media anchors shall be investigated.

२०१२ मध्ये अंबानी यांनी न्यूज १८ विकत घेतले तो वर सर्व प्रसार माध्यमे स्वतंत्र आणि निष्पक्ष होती असे आपले म्हणणे आहे का?
(अडानी यांनी पहिले प्रसार माध्यम २०२२ मध्ये विकत घेतले)

गोदी मीडिया कोणती हे कुणी ठरवायचे? केजरीवाल यांनी प्रमाणित केलेल्या सर्वात प्रामाणिक अशा तपास अधिकाऱ्यांनी कि ऋन्मेष ने?

आणि सर्व प्रसार माध्यमांच्या बँकेच्या खात्यांची चौकशी कुणी करायची सी बी आय ईडी का आयकर खात्याने? पण मग ते परत म्हणणार हे सर्व तर सरकारी पक्षाच्या दावणीला बांधलेले आहेत.

आणि सामान्य माणसाला मुळात साधी चौकशी कशी करायची याचे मूलभूत ज्ञानही नसते. मग सायबर गुन्हे तर सोडाच आर्थिक गुन्हे यांचा तपास कसा करायचा?
इतकी सर्व यंत्रणा असली तरी सायबर आणि आर्थिक गुन्ह्यांचा तपास किती किचकट असतो हे तेलगी हर्षद मेहता केतन पारेख केसेस मध्ये पाहिले नाही का?
सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली केलेल्या तपासात सुद्धा २ जी घोटाळ्यात सज्जड पुरावा मिळू शकला नाही

05
Any MLA or MP who defects from one party to another shall be barred from contesting elections — and from holding any public office — for a period of 20 years.

The Indian Government enacted the Anti-Defection Law in 1985. दोन तृतीयांश पेक्षा कमी सदस्य पक्ष सोडून गेले तर त्यांचे सदस्यत्व रद्द होते. तेंव्हाच्या सरकारने काहीतरी विचार करूनच कायदा केला असेल ना?

पक्षांतर्गत हुकूमशाही किंवा पक्ष नेतृत्व मूलभूत तत्वांशी हरताळ फासून काम करत असेल तर निवडून गेलेल्या सदस्यांनी काय फक्त मम म्हणायचे का? मग सकृतदर्शनी लोकशाही असली तरी पक्षांतर्गत हुकूमशाहीच चालेल.

अशा साठी २० वर्षे निवडणूक लढवण्यावर बंदी घालणे म्हणजे भुरट्या चोरीसाठी फाशीची शिक्षा देण्यासारखे आहे.

मुळात श्री मोदी यांचा या कॉकरोच वक्तव्याशी कोणताही संबंध नाही.

केवळ त्यांच्यावर शिंतोडे उडवण्यासाठी एका परदेशी उपट सुंभाने काढलेला हा भंपक उपक्रम आहे.

वड्याचे तेल वांग्यावर काढणायचा भंपक आणि हास्यास्पद प्रयत्न आहे

अहो सर
ते ५०% समंर्थक पाकिस्तानी आहेत हे लिहायचे विसारालातच!

सरकारने CJP ची स्थळे बंद केली याबद्दल लोकांची मते वेगवेगळी असू शकतील.

परंतु काहि घटनात्मक पदे असतात उदा राष्ट्रपती, सरन्यायाधीश, सरसेनानी.

त्यांच्यावर कोणा उपट सुंभाने परदेशात राहून टीका करणे हे त्या पदाचा अवमान आहे.

>>>> काहीही हा. भारतीय व्यक्ती आहे शिक्षणासाठी बाहेर गेला आहे. तुमचे समविचारी लोक परदेशात राहून काँग्रेस आणि राहुल गांधी, विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ह्यांच्यावर कमी खालच्या शब्दात टीका करत नव्हते काय. त्यामुळे आता हा ढोंगीपणा नको प्लीज

अजामीनपात्र दहशवादी कायद्याखाली अटक करायची हि मागणी करताना कोणताही विचार केलेला नाही. >>>>
ज्ञानेश सारखे भाजपसाठो काम करणारे आयोग अध्यक्ष असतील तर त्यांना फरपटत ओढून गाढवावर मिरवणूक काढून मग सगळे अतिरेकी कायदे लावून जेलात सडवले पाहिजे! पण फक्त अटकच करायची मागणी केली आहे ह्यात काय चुकीची मागणी आहे?
सरन्यायाधीशावर कुठलीही टीका करण्यात आलेली नाही? अर्धवट नि एकांगी लेखन आहे, ह्या लेखातून cjp चा द्वेष नी भाजपला नुकसान होईल ही भीती स्पष्ट दिसते.

सुबोध खरे,

मलाही हा प्रश्न लिहावासा वाटत होता की न्यायाधीशांचे निरीक्षण हे भाजपचे मत असे का समजले जात आहे.

मात्र आता लिहीत नाही याचे एक कारण म्हणजे तुम्ही ते लिहिलेतच आणि दुसरे म्हणजे ते भाजपचे मत आहे हे येथे सिद्धही होईल.

पूर्वी विरोधाच्या समुद्राला आलेल्या कन्हैयासारख्या काही लोप पावलेल्या लाटांची आठवण झाली खरी.

तुमच्या प्रतिसादातील इतर भागाबाबत काही म्हणू शकत नाही कारण तेवढे इंग्रजी नाही समजत.

सुबोध खरे,
<<<< कॉकरोच बद्दल वक्तव्य सरन्यायाधिशानी केलं. त्याचा भाजप किंवा श्री मोदी यांच्याशी संबंध नाही.
>>>>
+786
काही संबंध नाही
त्यामुळे भाजप उगाच टेन्शन घेत आहे Happy

तिकडे काँग्रेसला वाटत आहे की उद्या जाऊन हे कोकरोच आपली सरकार विरोधात असलेले मतदार फोडतील. म्हणून त्यांनाही टेन्शन आहे असे देखील कुठेतरी वाचले.

एक कॉकरोच घरात शिरले की एकमेकांशी पटत नसलेल्या सासु सुना दोन्ही घाबरून एकत्रपणे बेडवर उड्या मारत आहेत असे चित्र डोळ्यासमोर आले Happy

.

<<< त्यांच्यावर कोणा उपट सुंभाने परदेशात राहून टीका करणे हे त्या पदाचा अवमान आहे.
>>>>
मायबोलीच अमेरिकेतील संकेतस्थळ आहे आणि कित्येक मायबोलीकर अमेरिकेतूनच लिहितात. कौतुक आणि टीका दोन्ही करतात Happy

पण मी सुद्धा काही कमी नाही. मी सुद्धा मुंबईत बसून त्यांच्या ट्रम्पला शिव्या घालतो Happy

.

<<<<The Manifesto >>> याबद्दल माझे आधी लिहून झाले आहेच की ते राजकीय व्यंग आहे. त्यात देशातील परिस्थिती आणि काही समस्या मांडल्या आहेत. त्यावर जे उपाय/कायदे सुचवले आहेत त्यांना इतके सिरियसली घेत अंमलबजावणीवरून सखोल चर्चा करायची गरज नाही. तरी लोकं पानपानभर पोस्ट लिहून ते खोडून दाखवत आहेत. त्यांनी लक्ष वेधलेल्या समस्या मात्र सिरियसली घ्या. आणि त्या तेवढ्याच नाहीत तर खूप आहेत. त्यासाठी त्यांचे अकाउंट फॉलो करायला विसरू नका Happy

..

<<< गोदी मीडिया कोणती हे कुणी ठरवायचे? केजरीवाल यांनी प्रमाणित केलेल्या सर्वात प्रामाणिक अशा तपास अधिकाऱ्यांनी कि ऋन्मेष ने?
>>>>>

अरे माझे नाव का इथे? मी स्वतः गोदी मिडिया हा शब्द कधीच वापरला नाहीये. कारण तो शब्द मोदी या शब्दावरून आला आहे असे वाटते आणि मी कधीच असे पंतप्रधानपदी असलेल्या व्यक्तीचा अपमान करत नाही.

पण ज्याला लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हटले जाते ती आपली मिडिया निःपक्ष नसून राजकीय पक्ष आणि उद्योगपतींना विकली गेलेली आहे आणि नुसते टीआरपी मागे लागते हे मात्र मान्य आहे. किंबहुना हे तर लहान मुलांना सुद्धा हल्ली माहीत आहे. त्यामुळे मी तर गेले कित्येक वर्षे बातम्याच बघितल्या नाहीयेत.

असो,
त्या माझ्याच मोदींच्या आवाहन धाग्यावर मायबोलीकर भरत हे मला मोदी-भाजपा समर्थक समजून माझ्याशी वाद घालत आहेत आणि इथे तुम्ही मला मोदी-भाजपा विरोधक समजून अशी विधाने करत आहात.

एक निःपक्ष भारतीय नागरिक म्हणून हेच माझे यश आहे. एकदा माझ्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत Happy

मुळात श्री मोदी यांचा या कॉकरोच वक्तव्याशी कोणताही संबंध नाही.

केवळ त्यांच्यावर शिंतोडे उडवण्यासाठी एका परदेशी उपट सुंभाने काढलेला हा भंपक उपक्रम आहे.

वड्याचे तेल वांग्यावर काढणायचा भंपक आणि हास्यास्पद प्रयत्न आहे >>> हेच हास्यास्पद आहे. cjp ने मोदी विरोधात कुठलेही वक्तव्य केलेले मी तरी पहिले नाही. तरी मोदीभाट आणि समर्थक उगाच cjp मोदीविरोधात आहे म्हणून हाकाटी पिटून राहिलेत. वड्याने वांग्याचे तेल स्वत:वर ओढवून घ्यावे हा प्रकार सोमी वरील सर्व भक्त मंडळी करताना दिसत आहेत.

जर मोदींचा यात काही संबंध नसेल तर मोदींभक्त भाजप समर्थक इतके तव्यावर बसल्यासारखे का उडत आहेत, न्यायाधीश आणि झुरळे बघून घेतील ना त्यांच्यातला प्रॉब्लेम, 99 टक्के विखारी टीका करणारे भाजपचे आहेत, आणि दिपके च्या आईच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणारे कोण आहेत? कुठल्या अँगल ने हे समर्थनिय ठरते?
इतका राग, प्रचंड द्वेष तर आजवर कुठल्या नेत्याबद्दल व्यक्त झालेला दिसला नाही, नक्की भाजपला भीती कशाची वाटत आहे? नेपाळची पुनरावृत्ती होईल अशी? म्हणून ते जातीने यात उतरले आहेत का?

झुरळ जनता पार्टी हा मुद्दा कदाचित आठवड्याभरात विस्मरणातही जाईल. तो तसा जाऊ नये याची दक्षता माध्यमे घेत आहेत, पण ते माध्यमांचे काम आहे.

माध्यमे त्याना सोयीचे तोवरच मुद्दा लावून धरतात
पोर्श प्रकरण आठवतंय? काय झालं त्याचं पुढे? तो मुलगा आता दिल्लीला असतो आत्याकडे, आई आणि अन्य जामिनावर बाहेर आहेत

माध्यमे काम करत आहेत हे?
जोवर प्रकरण तापलेले होतं तोवर पान पान भरून बातम्या देत होते

झुरळ पार्टीही तशीच इतिहास जमा होईल यात शंका नाही

मुद्दा त्यांनी काय केलं हा नाहीये तर विरोधी सूर कसा अमानुषपणे चिरडला गेला याचा खेद जास्त आहे, व्यवस्थेला कळलं असणारे की कशाप्रकारे वेळीच असंतोष दाबून टाकता येतो, काही नाही फक्त भडिमार करत राहायचा खोटे नाटे, दिशाभूल करणारे मेसेज फॉरवर्ड आणि अंधभक्तांना तर हे पवित्र काम वाटतं

काय आहे माहिती आहे का उद्या तुम्हाला मला किंवा कोणालाही व्यक्त व्हायचं झालं तर काहीही नाहीये, एकटा माणूस काहीही करू शकत नाही, जोवर संविधानिक पद्धतीने, नासधूस न करता आपला उद्वेग आपला असंतोष व्यक्त करण्यासाठी साधन असणे हे जिवंत लोकशाही चे लक्षण आहे

झुरळ पार्टी मेली मरू द्या पण आता पुढे काय
का जे आहे ते सगळं आपल्या भल्यासाठीच सुरू आहे अशी मनाची समजूत काढत रहायचं आहे

>>> झुरळ जनता पार्टी हा मुद्दा कदाचित आठवड्याभरात विस्मरणातही जाईल. तो तसा जाऊ नये याची दक्षता माध्यमे घेत आहेत, पण ते माध्यमांचे काम आहे.

एक स्वतंत्र प्रतिसाद आहे

तुमचे समविचारी लोक परदेशात राहून काँग्रेस आणि राहुल गांधी, विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ह्यांच्यावर कमी खालच्या शब्दात टीका करत नव्हते काय. त्यामुळे आता हा ढोंगीपणा नको प्लीज.

मुदलात खोट आहे!

हे सर्व राजकारणी आहेत त्यांच्यावर टीका करणे किंवा मोदी शाह यांच्यावर टीका करणे हे एकच आहे.

त्यांच्यावर टीका इथे सुद्धा होतेच आहे

पण सरसेनानी, सरन्यायाधीश हे निष्पक्ष आणि निवडून आलेले राजकारणी नव्हेत.

दोन मुद्द्यांची साफ गल्लत होते आहे!

झुरळ जनता पार्टी हा मुद्दा कदाचित आठवड्याभरात विस्मरणातही जाईल.
हे तर 100 % होणार च आहे.

म्हणूनच त्याला मी उपट सुंभ म्हटले आहे!

झुरळांचे काही मुद्दे हास्यास्पद नक्कीच वाटू शकतात. काही मुद्दे हास्यपदच आहेत. पणं त्यांचं accounts बंद करणे, त्यांची बदनामी करणं हे अजून जास्त हास्यास्पद आहे.
भाजपाला नक्कीच त्यांची भीती वाटतं आहे. त्यात हे नेहमीचे राजकारणी नाहीत त्यामुळे तुम्ही ७० वर्ष काय केले ची टेप चालणार नाही.

ED, CBI मुद्दे शोधायला कामाला लागले असतील. काहीच नाही सापडले आणि तो अभिजित भारतात आलाच तर देशद्रोहचा गुन्हा नक्कीच लावला जाईल.

न्यायाधीश आणि झुरळे बघून घेतील ना

हाच मुद्दा आहे.

मोदींवर टीका होते तेंव्हा काय होतं?

ध्रुव राठी सारखा टिनपाट माणूस शेकड्यानी रीळ बनवतो त्याला कोणी काही केलं नाही.

राहुल गांधींसारखा माणूस जिथे तिथे मोदींवर टीका करत असतो त्याला कोण काय करतंय?

कारण राजकारण्यांवर टीका आणि न्यायव्यवस्थेवर टीका हे मुळात दोन वेगळे मुद्दे आहेत.
एवढंच मला म्हणायचंय!

दिपके च्या आईच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणारे कोण आहेत?

त्याच्या आईच्या चारित्र्यावर कोणी टीका केली असेल तर ते नक्कीच अत्यंत खालच्या दर्जाचे आणि चूक आहे.

Bank accounts of Godi media anchors shall be investigated.
@ ऋन्मेष

हे आपल्या जाहिरनाम्यातीलच वाक्य आहे.
तेंव्हा ते मी केलंच नाही असं कसं म्हणता येईल?

मुळात ही लाईनच आर्बिट्ररी आहे. की अमुक तमूक वर टीका चालेल परदेशातूनही चालेल, पण अमुक तमूक वर मात्र परदेशातून टीका झाली नाही पाहिजे...

मागे गवई ह्या CJI विरुद्ध सुद्धा पुष्कळ पुष्कळ परदेशस्थ लोकांनी टीका केलेली अँटी हिंदू म्हणून. ते ही ट्विटर खाते गोठवून ते सुद्धा पाकिस्तानने फंड केलेत म्हणायला हवे होते का ?

झुजपची instagram आणि ट्विटर पाने गोठवणे कोणत्याही प्रकारे समर्थनीय नाहीये !

झुजपची instagram आणि ट्विटर पाने गोठवणे कोणत्याही प्रकारे समर्थनीय नाहीये !>>>>> ह्या बद्दल त्यांचे मत गुल्गुल्गुलमाळीत आहे.

एक निःपक्ष भारतीय नागरिक म्हणून हेच माझे यश आहे. एकदा माझ्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत.

भंपक गोष्टींसाठी टाळ्या?

उगाच आपण कसे समतोल आहोत किंवा निष्पक्ष आहोत असे दाखवायची काय गरज आहे.

आयुष्य भर पोलिटिकली करेक्ट राहण्याची तारेवरची कसरत करून काहीही निष्पन्न होत नाही!

धड इकडे नाही धड तिकडे नाही.

<<<<<
Bank accounts of Godi media anchors shall be investigated.
@ ऋन्मेष
हे आपल्या जाहिरनाम्यातीलच वाक्य आहे.
>>>>>

हे तर मी त्यांच्या साइटवरून कॉपी पेस्ट केले. त्यातला एखादा शब्द (गोदी मिडिया) मी वापरत नसेल म्हणून बदलू तर शकत नाही ना?

शब्द सोडा त्यांनी जे ५ पॉइंट मांडले त्याच्यातील प्रत्येकाशी सहमत असेल असेही नाही. पण कॉपी पेस्ट एडिट करून करणे चुकीचे आहे.

तसेच मी कॉपी पेस्ट केले म्हणून सगळे जसेच्या तसे माझे विचार आहेत किंवा एकूण एक शब्दाची मी जबाबदारी घ्यावी असे नाही ना होत.

पण तुम्ही तर गोदी मीडिया कोणती हे कुणी ठरवायचे? ऋन्मेष ने? असे म्हणत सगळी जबाबदारीच कॉपी पेस्ट करणाऱ्या माझ्यावर टाकली Happy

<<<< भंपक गोष्टींसाठी टाळ्या? >>>

कुठल्याही एका पक्षाचा झेंडा हाती न घेता फक्त आणि फक्त देशाचा आणि समाजाचाच विचार करणे ही भंपक गोष्ट !
बरं भंपक तर भंपक
पण याचीच आज देशाला गरज आहे.
ही सगळी झुरळे तीच भंपक गोष्ट करावीत अशी इच्छा आहे .

आपण एखादी गोष्ट सामाजिक जालावर देता तेंव्हा आपली काही जबाबदारी आहे की नाही?

उद्या कोणीतरी जालावर लिहिले की श्री राहुल गांधी यांची एक बायको आहे आणि त्यांनी इतर तीन बायका 'ठेवल्या' आहेत.
मी जर येथे ते फॉरवर्ड केले असेल तर त्याच्या सत्यतेची जबाबदारी माझी असणारच.

"कुणीतरी म्हणाला म्हणून ते कॉपी पेस्ट केले हे चालेल" असे आपले म्हणणे आहे का?

Pages