Cockroach जनता पार्टी झिंदाबाद !

Submitted by ऋन्मेऽऽष on 20 May, 2026 - 16:30

जगभरातले जेन झी पेटून उठत आहेत.
आम्ही भारतीय झुरळे कसे मागे राहणार.
एक ठिणगी पडली आणि बघता बघता वणवा पेटला.

हे आमचे इंस्टाग्राम अकाऊंट
फक्त चार (४) दिवसात 8.5 मिलियन म्हणजे तब्बल 85 लाख फॉलोअर्स.
https://www.instagram.com/cockroachjantaparty?igsh=YjhvYnhrZWJsMWtj

आणि ही आमची वेबसाईट
https://cockroachjantaparty.org/

कुठल्या वेगळ्याच जगात राहत असाल आणि हे काय याची कल्पना नसल्यास धागा वाचत राहा...

क्रांती आता फार दूर नाही...
ऑफ द कॉकरोच बाय द कॉकरोच फॉर द कॉकरोच !

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<< मी मुळीच निष्पक्ष असल्याचा दावा करत नाही.
>>>

वेरी गुड, मग तर विषयच संपला Happy

मी स्वतःला निष्पक्ष समजतो आणि तुम्ही ते मान्य केले नाही त्यामुळे ते तुम्ही आहात असा माझा गैरसमज झाला होता इतकेच. त्याबद्दल क्षमस्व Happy

आता विषयावर बोलूया...
बॅक टू झुरळ !

<<<
हि आप वाली झुरळं एक दिवस तुम्हाला १०० % तोंडघशी पडणार आहेत.
>>>>

मी सामान्य माणूस आहे. मला तोंडघशी पडायची आणि राजकारण्यांपासून फसायची सवय आहे. माझा अजून एक धागा आहे इथे. राघव चड्डावाला. त्याने देखील मला तोंडघशी पाडले. काहीतरी नवीन विचार आणतोय असे वाटले म्हणून इंप्रेस झालेलो. पण तो सत्ताधारी पक्षाचाच माणूस निघाला. खरे रूप उघड होताच आता एकाही समस्येवर काहीही बोलत नाहीये. पडलो तोंडघशी. पण म्हणून काय रडत बसू?

पण यावेळी गोष्ट वेगळी आहे. आता मी कुठल्या पार्टी किंवा एखाद्या नेत्याकडे तो येऊन आपला देश बदलेल या आशेने बघत नाहीये. आता मी या देशातील जेन झी युवा पिढीकडे आशेने बघत आहे. त्या सगळ्यांना सपोर्ट करत आहे. झुरळ फॉलोअर्स आकडा २२+ मिलियन आहे. इतके जण मला तोंडघशी कसे पाडू शकतील? Happy

एक अशिक्षित माणूस केजरीवालांसारख्या सुशिक्षित माणसाहून हुशार कसा असू शकेल? ह्या प्रश्नाचे उत्तर नसेल तर स्वतःला अंधभक्त घोषित करा!

झुरळ फॉलोअर्स आकडा २२+ मिलियन आहे. इतके जण मला तोंडघशी कसे पाडू शकतील?

जालावरचं जग हे आभासी असतं हे ज्या दिवशी तुम्हाला समजेल त्या दिवशी तुमचे डोळे उघडतील.

खरे सर त्यांचे डोळे उघडण्याची शक्यता तरी आहे

अंधभक्तांचे तेही नाही

विचारलेल्या प्रश्नांना सोयीस्कर बगल देऊन झुरळे काय करतील यावर वेळ का बरे घालवत असतील भाजप समर्थक

एकीकडे म्हणतात की आम्हाला काही फरक पडत नाही आणि दुसरीकडे ताव भरभरून पोस्ट लिहितात
तेही अशा थाटात की केवळ भाजप समर्थक आहेत म्हणून देश वाचलाय

असेही तोंडघशी पडण्याचा अनुभव भाजप समर्थकांच्या इतका कोणालाच नसेल
Happy

*सोनं खरेदी करू नका, पेट्रोल आणि डिझेलवरील अवाजवी खर्चावर बंदी, तेल सेवनावर बंदी, दिवसातून तीन वेळा जेवण्यावर बंदी, परदेशात जाण्यावर बंदी, शेतात रासायनिक खते टाकण्यावर बंदी, कार किंवा मोटरसायकलवरून एकट्याने प्रवास करण्यावर बंदी, एलपीजीवर बंदी घालण्याचे आवाहन करण्यात आले आहे,*
*परंतु वायफळ बडबड करण्यावर, खोटे बोलण्यावर, जनतेला घाबरवण्यावर, विरोध करणाऱ्यांना चिरडण्यावर आणि सरकारच्या धोरणांविरुद्ध लिहिणाऱ्यांना धमक्या देण्यावर कोणतीही बंदी नाही.*

खरे सर, लिमिटेड समर्थन असू शकते हे तुम्हाला समजत नाहीये की पटत नाहीये ?
सध्या भाजपा भारतातल्या बहुतांश राज्यात सत्तेत आहे. जवळपास दीड दशकापासून घसघशीत बहुमताने केंद्रात सत्तेत आहे. त्यामुळे आपच्या समर्थकाने असो किंवा काँग्रेस समर्थकाने असो, अनेक लोकांच्या नाराजीला एक वाट मोकळी करून दिली आहे, ह्याचा अर्थ असा नाही होत की त्या वाटेत आपली नाराजी व्यक्त करणारे सगळे त्या विशिष्ठ पक्षाचे कट्टर भक्त बनतील.

ह्या CJP ची सोमी पाने बंद केली जातात, सत्ताधारी लोक ह्या पानांना पाकिस्तानचे समर्थन आहे असे धादांत खोटे बोलतात त्यावर तुम्ही मूग गिळून शांत बसला आहात. पण हा सिजेपीचा माणूस आपचा आहे हे अगदी आरोप असल्याच्या स्टाईल मध्ये टाकत आहात.

खरे सर,
तुम्ही जाहीरनाम्यावर घेतलेले आक्षेप बव्हंशी मान्य आहेत. हे खूळ फार दिवस टिकणार नाही हा तुमचा अंदाजही मला मान्य नसला तरीही रिझनेबल आहे.

पण 'त्याचे शिक्षण आप च्या पैश्यावर सुरू आहे' हे फारच धाडसी विधान आहे आणी त्याला पुरावा म्हणून वरील पोस्ट्स अजिबात पुरेशा नाहीत.

मनीष सिसोदियांसोबत त्याचा फोटो हा तर माझ्या मते प्लस पॉइंट आहे. ईडी ची भिती घालताच गपगुमान शेपूट घालून भाजप मध्ये दाखल होणार्‍यांपेक्षा हे नक्कीच उजवे !

<<<<
पण 'त्याचे शिक्षण आप च्या पैश्यावर सुरू आहे' हे फारच धाडसी विधान आहे आणी त्याला पुरावा म्हणून वरील पोस्ट्स अजिबात पुरेशा नाहीत.
>>>>>

पुरेसे असायला त्यात आहे तरी काय?
मला तर पैशाचा उल्लेख सुद्धा दिसला नाही त्यात..

अर्थात ते पुरावा असल्याशिवाय विधान करणार नाहीत. उद्या देतील ठोस पुरावा ते सोडा..
पण मुळात आप पक्षाचा कार्यकर्ता असणे यात ते कोणी दहशतवादी असल्यासारखे काय चालू आहे इथे??

विरोधी पक्षाचे कार्यकर्ते म्हणजे दहशतवादी की पाकिस्तानी??

या मुद्द्याला खरे खोटे करणे हेच मुळात हास्यास्पद वाटत नाही का कोणाला इथे??

मोदी आपल्या पोस्ट मध्ये फ्रेंड डोलांडाचे गुणगान करत असतो, सगळीकडे त्याला मिठ्या मारत फिरतो ह्याचा अर्थ तात्यामुळे मोदी टिकला आहे असा घ्यावा का ? कैच्या कै अर्थ लावतात खरे. हास्यास्पद तुम्ही ठरत आहात.

आपण ज्यांना मत देऊ ते निवडून नाही आले तर आपले मत वाया जाते असा समज वाढला आहे. त्याचेच पुढे तुम्ही एखाद्याचे समर्थन केले तर तो निवडुन आला पाहिजे अन्यथा तुम्ही तोंघडशी. निवडून कुठल्याही मार्गाने येवो डजन्ट मॅटर.
आपण निवडुन दिलेले कांगावेखोर निघाले, भ्रष्टाचाऱ्यांवर आधी तोंडभरून टिका करून, ईडी सीबीआयचा धाक दाखवून, त्यांना मिठ्या मारत आपल्या पक्षात घेऊन, मोठमोठी पदे देऊन, वरुन . "पहले भ्रष्टाचार का किसी पे आरोप भी लगा हो तो लोग ऊन से सौ कदम दूर रहते थे. लेकीन आजकल तो भ्रष्टाचारियों को गले मिलकर उन्हे कंधे पर बिठाने की फॅशन आ गयी है" म्हटलं तरी ही आपण तोंडघशी पडत नाही. कारण निवडून आला आहे ना आपला नेता!
पूर्वी काही खोडकर लोकांनी आपल्याकडील एका सुविचाराचा "बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले" असा विपर्यास करुन त्याचा कुविचार केला आणि तो पुस्तकातून व्हायरल केला.
पण सत्य आता बाहेर आले आहे. "बोले त्याच्या विपरित चाले त्याची वंदावी पाऊले" हा मूळ सुविचार आहे हे लोकांना कळले आहे.

तेव्हा हे ऋन्मेष, तू कोण निवडून येण्याची दाट शक्यता आहे आणि कोण या मूळ सुविचारात उतरतो हे पाहून डोळे झाकून समर्थन करत जा. तू कधी तोंडघशी पडणार नाहीस.

पण मुळात आप पक्षाचा कार्यकर्ता असणे यात ते कोणी दहशतवादी असल्यासारखे काय चालू आहे इथे

विरोधी पक्षाचे कार्यकर्ते म्हणजे दहशतवादी की पाकिस्तानी

मी एकदा तरी त्याला दहशतवादी आहे असे म्हटल्याचे दाखवा.

उलट त्यांच्याच जाहीरनाम्यात त्यांनी एक जरी मतदार यादीतून गायब झाला तर थेट मुख्य निवडणूक आयुक्ताना अजामीनपात्र अशा दहशतवादी कायद्याखाली अटक करा हे लिहिलेले आहे.

हा सिजेपीचा माणूस आपचा आहे

२०२० ते २०२३ हा आपच्या सोशल मीडियाचे काम करत होता हे टाइम्स ऑफ इंडिया चा संदर्भ देऊन वर लिहिलेले आहेच.

पहिल्या प्रतिमेत (जी २०२४ ची आहे) तो आप शी संलग्न आहे आणि तसा संबंधात राहणार आहे असे त्यानेच म्हटलेले आहे आणि "इतरही" बऱ्याच गोष्टी धूसर आहेत. चष्मा पुसल्यास आणि reading between the lines केल्यास साफ होतील.

मुद्दा तो आप चा असल्याबद्दल अजिबात नाही.

येथे बरेच लोक हा कोणीतरी नवीनच झुरळ युवक असल्याचा निरागस दावा करत आहेत त्यांचा उद्या भ्रमनिरास होईल यासाठी आजच वस्तुस्थिती मांडली आहे.

ईडी ची भिती घालताच गपगुमान शेपूट घालून भाजप मध्ये दाखल होणार्‍यांपेक्षा हे नक्कीच उजवे.

ईडी ची भीती घालण्यासाठी त्याच्याकडे कधी सत्ता नव्हती कि पैसाही नाहीये. तो सध्या तरी विद्यार्थी म्हणून अमेरिकेत आहे तेंव्हा त्याला "ईडी ची भीती" आहे या म्हणण्याला कोणताच आधार नाही .

The Enforcement Directorate (ED) is a law enforcement and economic intelligence agency of the Government of India. Established on 1 May 1956, it is responsible for enforcing economic laws and combating financial crimes.

निवडून कुठल्याही मार्गाने येवो डजन्ट मॅटर.

ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे अतोनात आरोप करून राजकारणात आलेल्या श्री केजरीवाल यांनी सत्तेसाठी त्याच काँग्रेसशी हातमिळवणी केली.
भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध होऊन तुरुंगवास झालेल्या लालूप्रसाद यादव यांच्याबरोबर युती करताना इंडि आघाडीच्या नेत्यांना काहीच वाटले नाही.

पाच कोटींचा शिश महल बांधणाऱ्या केजरीवाल यांनी एके काळी केलेले दावे साफ मोडीत टाकून सत्तेसाठी कुणाशीही युती केली.

शिवसेना हा जातीयवादी पक्ष आहे म्हणून तिच्या स्थापनेपासून अकांड तांडव करणाऱ्या काँग्रेसला सत्तेसाठी त्याच शिवसेनेशी युती केलेली चालते
आणि हीच काँग्रेस केरळ मध्ये मुस्लिम लीग बरोबर युती करताना त्यात लोकांना जातीयवाद दिसत नाही.

मग साधन शुचिता आणि भ्रष्टाचाराबद्दल बद्दल रडारड करताना आपल्या पायाखाली काय जळतं आहे ते दिसत नाही का?

जनता इतकी दूधखुळी नाही.

श्री मोदी किंवा योगी यांच्यामागे जाताना जनता हे पाहते कि हे स्वतः स्वच्छ असून यांच्या आगे पीछे कुणीही नाही ज्यांच्या साठी ते संपत्ती संचय करतील.

आजतागायत श्री मोदी यांच्यावर एकही भ्रष्टाचाराचा आरोप चिकटलेला नाही. यात त्यांचे २००१ ते २०१४ हि १३ वर्षांची कारकीर्द आहे जेंव्हा काँग्रेसची सत्ता होती आणि ईडी सीबीआय सारख्या पिंजऱ्यातल्या पोपट म्हणून संबोधल्या संस्था त्यांच्या दिमतीला होत्या.

२७२ आकडा गाठण्यासाठी भाजप ने अनेक गणंग घेतले आहेत ते पटण्यासारखे नाही हे मान्य केले तरी म्हैस दूध देत नसेल तर तिचे चारित्र्य पाहून काय करायचे?

तुम्ही मला इतर विरोधी पक्षांचा, युत्यांचा समर्थक, त्यांच्या भ्रष्टाचार किंवा इतर सगळ्या गुन्ह्यांचे, " जाओ पहले उस आदमी की साइन ले आओ"वाला समर्थक इत्यादि समजून लिहिलेले दिसतेय.
असो.

आजतागायत श्री मोदी यांच्यावर एकही भ्रष्टाचाराचा आरोप चिकटलेला नाही. >>> Lol Lol

मी हरलो Lol

तुम्ही जी तुमच्या विरोधकांची इतरांची उदाहरणे दिली ते सारे आणि ज्यांना तुम्ही वाचवायला धडपडत आहात ते सुद्धा .. असे सगळेच भ्रष्टाचारी आहेत. आणि हे माझे मत नाही तर हे फॅक्ट आहे.

पण तुम्ही निष्पक्ष नसल्याचे तुम्ही आधीच मान्य करायचा प्रामाणिकपणा दाखवल्याने पुढे बोलण्यास काही शिल्लकच राहत नाही.

म्हणून विषय झुरळपुरता ठेवूया Happy

२२ मिलियन झुरळे कुठल्या कुठल्या पार्टीचे सदस्य आहेत याचा डेटा तुमच्याकडे आहे का?

पण मुळात आप पक्षाचा कार्यकर्ता असणे यात ते कोणी दहशतवादी असल्यासारखे काय चालू आहे इथे

विरोधी पक्षाचे कार्यकर्ते म्हणजे दहशतवादी की पाकिस्तानी
>>>
मी एकदा तरी त्याला दहशतवादी आहे असे म्हटल्याचे दाखवा.
>>
मी एकदा तरी तुम्ही त्याला दहशतवादी म्हटले आहे असे म्हटल्याचे दाखवा Happy

अर्थात, झुरळ फॉलोअर्स पाकिस्तानी आहेत हे दाखवायचा आटापिटा भाजप आयटी सेल ने मात्र करून झाला आहेच.

India has the largest Instagram audience in the world, with an estimated 534.4 million users.

The viral satirical movement "Cockroach Janta Party" (CJP) has surged to over 20 million Instagram followers.

its official X (formerly Twitter) account with over 200,000 followers.

हे ३.७ % युवक CJP चे इन्स्टा वर फॉलोअर आहेत.

CJP चे सदस्य नव्हेत.

बरेचसे आप वाले याचे फॉलोअर असतील. कारण हा आपच्या सोशल मीडियाचा प्रमुख होता.

ते सोडले तर बरेचसे तरुण केवळ कुतूहल म्हणून फॉलोअर झालेलं आहेत.

झुरळ पक्षाचा ठोस कार्यक्रम नसेल तर अनेक असे तरुण याला सोडून नवीन कुणाला तरी शोधतील यात शंका नाही.

सामान्य माणसाला कोणीतरी अवतार पुरुष/ मसीहा लागतो. आपल्या कष्ट प्रद जीवनातून आपली कोणी तरी अलगद सुटक करेल हि भाबडी आशा तो बाळगून असतो.

स्वतः प्रचंड कष्ट करण्याची तयारी नसते. बऱ्याच वेळेस कष्ट करण्याची तयारी असली तरी संधी मिळत नाही. संधी मिळाली तरी त्याचे सोने होत नाही.
आपल्या बरोबरचा माणूस पुढे गेलेला दिसल्या वर माणसे वैफल्यग्रस्त होतात.

त्यात सार्वजनिक जीवनातील भ्रष्टाचार सोशल मीडिया मुळे फार चटकन लोकांना समजू लागला आहे. या परिस्थितीतुन बाहेर पाडण्याचे साधन सहज सापडत नाही.

अगदी अर्जुन सुद्धा असा किंकर्तव्यविमूढ झाला होता मग सामान्य माणसाची काय कथा?

यामुळे सामान्य माणूस कोणी तरी अवतार पुरुष येऊन आपली सर्व दुःखे दूर करेल हि भाबडी अशा बाळगून असतात. यामुळेच अनेक माणसे बाबा बुवा यांच्या नादाला लागतात.

अरविंद केजरीवाल यांनी अशाच आशा सामान्य माणसांना दाखवली यामुळे अनेक सुशिक्षित माणसे पण त्यांचा मागे गेली होती. कालांतराने ते सर्व त्यांना सोडून गेले. (त्याच्या कारणात मी सध्या जात नाही) पुढे भ्रष्टाचाराच्या विरोधात उभे असलेले अरविंद केजरीवाल यांच्या शीश महालातील एक एक गोष्टी सोशल मीडिया मुळे लोकांना दिसू लागल्या वर ते त्याला सोडून जाते झाले.

एके काळी लालू प्रसाद यांचा मागे पण लोक असेच होते. मग पुढे त्यांच्या भ्रष्टाचारामुळे तरुणांचा भ्रमनिरास झाला.

कन्हैया कुमार झाला, जिग्नेश मेवानी झाला

आता लोक नव्या माणसाच्या शोधात आहेत

तारुण्यात असा भाबडेपणा फार असतो.

२७२ आकडा गाठण्यासाठी भाजप ने अनेक गणंग घेतले आहेत ते पटण्यासारखे नाही हे मान्य केले तरी म्हैस दूध देत नसेल तर तिचे चारित्र्य पाहून काय करायचे?
सेल्फ गोल.

सामान्य माणसाला कोणीतरी अवतार पुरुष/ मसीहा लागतो. आपल्या कष्ट प्रद जीवनातून आपली कोणी तरी अलगद सुटक करेल हि भाबडी आशा तो बाळगून असतो.

यामुळे सामान्य माणूस कोणी तरी अवतार पुरुष येऊन आपली सर्व दुःखे दूर करेल हि भाबडी अशा बाळगून असतात. यामुळेच अनेक माणसे बाबा बुवा यांच्या नादाला लागतात.>>>>या तुमच्या मतावर मात्र मी १००% सहमत आहे.....कारण? याचे भरभरून पुरावे आणि ढळढळीत उदाहरणे आज भारतात यत्र तत्र सर्वत्र दिसतायत. ( आणि हो, या अवताराने निदान त्याच्या मर्जीतल्या सामान्य नसलेल्या काही जणांचे तरी नक्कीच भले केल्याचे दिसते, त्या बाबतीत हा इतर अवतारांपेक्षा उजवाच हो Lol )

sddefault_1.jpg3b9a4426769abb068f551f164500d261175354654628493_original.jpeg145706-pmsztdrzcf-1596875444.jpeg

हि सुद्धा वस्तुस्थिती आहे.

मी भ्रष्टाचार करून मला हवे ते पदरात पडून घेणार नि वर मोदींनी काहीही केलं नाही असेच म्हणणार.

चालायचंच.

माणूस स्वार्थी असतो हि वस्तुस्थिती.

सारांश - तरुण आजच्या भ्रष्ट व्यवस्थेवर नाराज आहेत.

तरुण युगानुयुगे भ्रष्ट व्यवस्थेवर नाराज आहेत.

फ्रेंच राज्यक्रांती पासून रशिया, चीन, व्हिएतनाम,क्युबा येथील क्रांत्या, सर्व राष्ट्रांचा स्वातंत्र्य लढा हे कशाचे द्योतक आहे ?

सामान्य माणसाला कोणीतरी अवतार पुरुष/ मसीहा लागतो. आपल्या कष्ट प्रद जीवनातून आपली कोणी तरी अलगद सुटक करेल हि भाबडी आशा तो बाळगून असतो.

आम्हाला मोदी बाबत हेच वाटलेलं
चला आता कोणीतरी येईल देशाला नवी दिशा देईल

पण मग नोटबंदी झाली कोविड मध्ये टाळ्या आणि थाळ्या खेळून झालं, मग गावलन मध्ये ना कोई आया असे सांगण्यात आले
ब्लॅक मनी, टेररिस्ट यांची नांगी ठेचणार असे सांगण्यात आले
एकीकडे अडाणी अंबानी याना कुठं कुठं प्रॉपर्टी वाढवू असं झालं
तर दुसरीकडे गुंड खुनी बाहुबली लोकांना तिकीट देऊन बिहार बंगाल जिंकले, लाडक्या बहिणींना पैसे वाटून महाराष्ट्र मध्य प्रदेश जिंकले

सब चंगा है जी Happy

भ्रमनिरास होतो हे अगदी खरे आहे Happy

श्री मोदी किंवा योगी यांच्यामागे जाताना जनता हे पाहते कि हे स्वतः स्वच्छ असून यांच्या आगे पीछे कुणीही नाही ज्यांच्या साठी ते संपत्ती संचय करतील. >>>> मुळीच नाही...यांच्या मागे उभे असलेले बहुतांश जण हे मुस्लिम द्वेषाने पछाडलेले, आणि ज्यांच्या मनावर लहान पणापासुनंच असुरक्षिततेची भावना बिंबबवण्यात आली असे कमालीचे complex असलेले हे लोक आहेत हे ( फक्त मायबोली संदर्भातच नाही हे, माझ्या जवळचे देखील आहेत त्यात ) ....नवरा मेला तरी चालेल पण सवत रंडकी झाली पाहिजे! या मनोवृतीनेच हे लोक चालतात/ वागतात आणि त्यांची ही विचार भावना प्रबळ करणारे त्यांचे पालक देखील याच मनोवृत्तीने जगले असतील अशी मला दाट शंका येते ... ज्यांना खरे तर शिक्षणापेक्षा अधिक समुपदेशनाची/ थेरपी ची गरज होती ते लोक शिकले, सन्मानीय पदावर पोहचले पण आपल्या मनातील लहानपणा पासूनची न पचू शकलेली असुरक्षिततेची मळमळ बाहेर ओकून पूर्ण समाज नासवला हेच आजचे सर्वत्र दिसणारे वास्तव आहे.

येथील चर्चा पाहून एकंदरीत असे वाटत आहे की

१) सध्याच्या सरकारचे सगळे भ्रष्टाचार आणि दुष्कृत्ये इथे सर्वांनाच मान्य आहेत.

२) फक्त काहीना आशा आहे की काहीतरी क्रांती घडून हे चित्र बदलेल.

३) तर काहीना विश्वास आहे की सरकारचे कोणी काही उखडू शकणार नाही.

झुरळांनी आपला असंतोष जाहीर केल्याने मुद्दा क्रमांक १ सर्वमान्य झाला आहे हे झुरळांचे पहिले यश Happy

Pages