Cockroach जनता पार्टी झिंदाबाद !

Submitted by ऋन्मेऽऽष on 20 May, 2026 - 16:30

जगभरातले जेन झी पेटून उठत आहेत.
आम्ही भारतीय झुरळे कसे मागे राहणार.
एक ठिणगी पडली आणि बघता बघता वणवा पेटला.

हे आमचे इंस्टाग्राम अकाऊंट
फक्त चार (४) दिवसात 8.5 मिलियन म्हणजे तब्बल 85 लाख फॉलोअर्स.
https://www.instagram.com/cockroachjantaparty?igsh=YjhvYnhrZWJsMWtj

आणि ही आमची वेबसाईट
https://cockroachjantaparty.org/

कुठल्या वेगळ्याच जगात राहत असाल आणि हे काय याची कल्पना नसल्यास धागा वाचत राहा...

क्रांती आता फार दूर नाही...
ऑफ द कॉकरोच बाय द कॉकरोच फॉर द कॉकरोच !

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शशी थरूरने आपले जड इंग्लिश थोडे दिवस बाजूला ठेवून आपल्या पक्षाचा नेता राहुल गांधी देशभर युवकांशी शिक्षण आणि बेरोजगारीवर संवाद साधतोय, त्याच्याबरोबर फिरायचे कष्ट घे आणि युवकांशी त्यांच्या भाषेत संवाद साध. तिकडे हुशारी दाखव. उगाच सल्ले देत बसू नको.

जाहीरनामा मजेशीर आहेच.
पण लोकं सिरीयसली त्या जाहीरनाम्यानुसार नियम बनले तर त्याची अंमलबजावणी करताना काय होईल याचा विचार करत आहेत हे जास्त मजेशीर वाटले.

त्या जाहीरनाम्यात देशातली परिस्थिती आणि समस्या अधोरेखित केल्या आहेत.

ट्रस्ट मी.. जेन झी चे कोकरोच हुशार आहेत. ते समजतील यामागचा नेमका अर्थ !

यांनी कॉकरोच हेच नाव का घेतले?
>>>
त्यांनी नाही घेतले. त्यांना कोणीतरी दिले. त्यांनी ते स्वीकारले Happy

बाई दवे.. मी त्यांनी त्यांनी काय करतोय. आम्ही आम्ही करायला हवे. मी सुद्धा त्यांना फॉलो करतोय. मी सुद्धा कोकरोच आहे. आमच्या घरून दोन आहेत.

@ अग्नीवीर,

झुरळ जनता पार्टी (CJP) ही उच्च बेरोजगारी, आर्थिक निराशा आणि परीक्षेतील वादांचा निषेध करण्यासाठी भारतीय तरुण आणि डिजिटल कार्यकर्त्यांनी तयार केलेली एक उपहासात्मक राजकीय चळवळ आहे.

भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी न्यायालयाच्या सुनावणीदरम्यान केलेल्या एका अत्यंत वादग्रस्त वक्तव्यावरून याला त्याचे नाव मिळाले.

एका वकिलाला फटकारताना, त्यांनी देशातील बेरोजगार आणि निराश तरुणांची तुलना "झुरळे" आणि "परजीवी" यांच्याशी केली होती.

अपमानित होण्याऐवजी, तरुण भारतीयांनी आणि माजी राजकीय रणनीतिकार अभिजित दीपके यांनी त्या अपमानाला सन्मानाचे प्रतीक म्हणून स्वीकारण्याचा निर्णय घेतला आणि सत्ताधारी भारतीय जनता पक्षावर (भाजप) एक उपहासात्मक भाष्य म्हणून 'सीजेपी'ची स्थापना केली.

संस्थात्मक पाठिंब्याचा अभाव असूनही संकटांवर मात करून टिकून राहण्याच्या दृढ निश्चयाचे प्रतीक म्हणून या चळवळीत झुरळाचा वापर केला जातो.

एव्हढे फालोव्हर्स आहेत पण लोक इथे हेटाळणी करत आहेत. त्यांचे प्रश्न समजून घ्या. त्याचे काय करायचे ह्यावर विचार करा,

त्यांचे प्रश्न समजून घ्या. त्याचे काय करायचे ह्यावर विचार करा
__
केशवकूल +७८६
ती आपलीच मुले आहेत.

झुरळ पार्टी कुठंही म्हणाली नाही, सत्ता उलथून टाका, देशात बंडाळी करा, भाजपला खाली खेचा तरीही त्यांना मिळणारा पाठिंबा बघून भाजपने आयटी यंत्रणा कामाला लावली आणि बघता बघता व्यवस्थित हे कसे देशद्रोही आहेत, कसे पाकिस्तान मधून फंडिंग होते असा भडिमार सुरू झाला आयटी सेल ने तर इतकी नीच पातळी गाठली की त्या दिपके च्या आईने दोनदा घटस्फोट घेतला आहे, असल्या घोटाळेबाज माणसापासून लांब रहा आशा पोस्ट फिरवायला सुरू केल्या
काही जण म्हणत आहेत हे आपल्या युवा पिढीला भडकवत आहे, जसं काय आपले नेते कधीच धर्माच्या, जातीच्या महापुरुषांच्या नावावर युवा लोकांना भडकवत नव्हते
झुरळ नावाची म्हातारी मेल्याचे दुःख नाही
पण काळ सोकावतो आहे
कुणीही आज भाजप च्या विरोधात काहीही अवाक्षरही काढतो म्हणाला तर ही सगळी सुसज्ज यंत्रणा अशी काही तुटून पडते की विचारायची सोय नाही आणि याच सिस्टीमचा जनक गोबेल्स ने लिहून ठेवले आहे की जेव्हा एका इशाऱ्यावर खरेखोटें भलेबुरे टीका विखार जेव्हा सर्वबाजूने होऊ लागतो त्याला तोंड देणे सर्वसामान्य माणसाला शक्य होत नाही, तो मोडून पडतो.
आणि दुःख या गोष्टीचे वाटते की अनेक सुशिक्षित लोकही यात अग्रेसर आहेत. आज याला जुमला, आप चे पिल्लू म्हणून हिणवले आणि हा असंतोष मोडून टाकला तर उद्या कधी कोणीच व्यवस्थेवर प्रश्न विचारण्याची हिंमत करणार नाहीत

पुन्हा एकदा लिहितो
भाजप म्हणजे भारत नव्हे
भाजपला विरोध करणे, त्यांच्या चुका दाखवणे म्हणजे देशविरोधी नाही
भाजपला विरोध म्हणजे राहुल गांधी केजरीवाल ममता ला समर्थन असे होत नाही
चुकीला चूक म्हणलं तर तुम्ही पाकिस्तानचे, खलिस्तानचे हस्तक बनत नाही

कुणीतरी कुठंतरी क्षीण का असेना हा दिवा पेटता ठेवा
हीच नम्र विनंती

आशूचॅम्प छान पोस्ट.
व्हाट्सअपवर एखाद्या चर्चेत शेअर करतो.

त्याला धमकी मिळत आहे वगैरे व्हिडिओ आताच पाहिले. वाईट वाटले. भीती सुद्धा वाटू लागली. ज्याने किंवा ज्यांनी हे सुरू केले ते घाबरले, मागे हटले, अगदी विकले गेले तरी चालेल. इतक्या युथ ने सपोर्ट केला. काहीतरी विचार केला यातच आनंद मानेन. पण कोणाच्या जीवाशी बरेवाईट व्हायला नको.

मला जे वाटले ते लिहितो.

एक असंतोष आहे व त्याला वाचा फुटली. ती वाचा बंद करण्यात आली. ती पुन्हा दुसऱ्या मार्गाने फुटेल.

असंतोष व्यापक आहे हे मिळालेल्या प्रतिसादांमुळे ठळकपणे पुढे आले.

झुरळ हे वक्तव्य करणारी व्यक्ती त्या पदावर आहे तेच मुळात सत्ताधारी पक्षामुळे, ही धारणा सर्वमान्य झाल्यासारखे दिसले.

आता:

देश-परदेशातील, भारतातल्या विविध भागांतील, विविध आर्थिक, कौटुंबिक, जातीय, सांस्कृतिक पार्श्वभूमीतून एका नावाखाली एकत्र आलेल्या तरुणाईची किती प्राधान्ये समान असतील. किंबहुना, 'व्यक्ती तितक्या प्रवृत्ती' असे असू शकेल. कोणी अतिशय गंभीरपणे या उत्स्फूर्तपणे व्यापक झालेल्या आंदोलनाकडे बघत असेल तर कोणी केवळ मजा म्हणून किंवा राग व्यक्त करण्यासाठी subscribe, follow, like वगैरेवर टिचकी मारली असेल. जेव्हा प्राधान्यांमधील समान गोष्टी फक्त विशिष्ट समूहालाच फायदेशीर ठरत असल्याचे कळेल तेव्हा इतर अनेकांचा उत्साह ओसरेल. (विशिष्ट समूह हा उल्लेख जातविषयक अथवा धर्मविषयक नाही). राजकीय पक्षांनी जमिनीवर येऊन व नागरिकांशी कोणत्याही माध्यमातून थेट संवाद साधून केलेली विषयाची मांडणी ही या देशातील जनतेच्या दृष्टीने आंतरजालीय माध्यमातून मतपरिवर्तन घडवून आणण्यापेक्षा अजूनही प्रभावी आहे.

मूळ समस्येवर विचार व कृती होत नाही.

'तुम्ही चुकत आहात' हे सातत्याने सांगताना 'आम्ही व आमच्यापैकी नेमके कोण काय व कसे सगळे काही बरोबर करू शकेल' हे सांगितलेच जात नाही. ही मूळ समस्या आहे. ही समस्या अस्तित्वात असण्याचे कारण हे आहे की तोलामोलाचे नेतृत्व नाही ही प्रतिमा झालेली आहे.

प्रथम, तसे नेतृत्व कोण करू शकेल यावर लक्ष केंद्रित होणे आवश्यक आहे.

(नेहमीप्रमाणे, या प्रतिसादात येथील कोणालाही उद्देशून काहीही व्यक्तिगत रोख असलेले लिहिलेले नाही.)

नक्कीच
फक्त भाजपचे लोकं बोलले असते तर इतकं वाईट वाटलं नसतं पण झुरळ पार्टीचा अकाउंट बंद केल्याचा आनंद व्यक्त करणारे मित्र पाहिले तर खरोखरच विचारावं वाटतं

नक्की कशाचा आनंद झालाय तुम्हाला?
ते टेररिस्ट होते? ते बलात्कारी, खुनी होते?
न्यायाधीशांनी केलेल्या बेलगाम व्यक्तव्यांबद्दल आणि एकूणच व्यवस्थे बद्दल निर्माण झालेली चीड होती
आता तुम्ही सगळ्यांनी मिळून तो आवाज दडपून टाकला
आता?
बेरोजगारी कमी झाली? गॅस पेट्रोलचे दर आटोक्यात आले? कायदा सुव्यवस्था निर्माण झाली?

माझं असं म्हणणं मुळीच नाही की झुरळ पार्टीने हे सगळं केलं असतं पण ज्या एकजुटीने सगळे त्यांच्याविरुद्ध उभे राहिले, जणू काही हा हल्ला आपल्या प्राणप्रिय पक्षावर नव्हेतर आपल्यावर झाला असावा अशा भीमदेवी थाटात
इतकी एकजूट असा आक्रमक पवित्रा अन्य गोष्टीत दाखवावा असे का वाटलं नाही कुणालाच?
गर्दीला चेहरा नसतो, एकाने दगड मारला की सगळेच मारत सुटतात, मग समोरचा गुन्हेगार आहे का नाही याची खातरजमा पण कोणाला करायची नसते
इतके जण मारत आहेत, म्हणजे नक्कीच हा गुन्हेगार असणार असल्या झुंडशाही चा आपण भाग होऊन कोणाला तरी अद्दल घडवली असा आनंद आहे का हा?

काय नक्की साध्य केलं नक्की आवडेल जाणून घ्यायला

लोकहो,

https://petition.cockroachjantaparty.org/sack/?utm_source=ig&utm_medium=...

चेक करा हे पेटिशन दिसते का?

The education system is compromised. From the tragic loss of students who died by suicide, to the millions of futures broken by a decade of paper leaks, this failure cannot go ignored. There must be consequences.
Sign below to demand the immediate removal of the Education Minister.

मी साईन केले. समाधान मिळाले.
याचा फायदा होतो का किंवा होईल का याची कल्पना नाही.
पण समाधान मिळाले.

कारण मला पक्षीय राजकारणाचे काही पडले नाहीये. ज्यांना पडले असते त्या लोकांना वाटते की आपली पार्टीच देश व्यवस्थित चालवू शकते. पण प्रॉब्लेम पार्टीचा नाही तर सिस्टिमचा आहे.

काँग्रेसने घोटाळे आणि भ्रष्टाचार अतिप्रमाणात केले त्यामुळे ते सत्तेबाहेर गेले आणि भाजप आले. यांनी काही वेगळे केले नाही तर भ्रष्टाचारच अधिकृत करून टाकला. विरोधी पक्षातील भ्रष्ट नेते आपल्या पक्षात घेऊन पवित्र केले. उद्या आपण हे सरकार उलथावले आणि एखादी नवीन युती/आघाडी आली तरी त्यातही यातले भ्रष्ट नेतेच देशाचा कारभार हाकत असणार आणि ते सुद्धा काही वेगळे करत नसणार.

त्यामुळे गरज आहे ती भ्रष्ट व्यवस्था बदलायची.
सरकार बदलले तरी ठीक नाही बदलले तरी ठीक पण सुधारले जरूर पाहिजे !

जिथे जिथे बदलाची सुधारणेची आशा दिसते तिथे तिथे मी माझा सपोर्ट दाखवतो!

सर, तुमच्या धाग्याचा टीआरपी वाढायला माझा थोडा हातभार लावतो. हा व्हिडिओ बघा. बाकी चालू द्या. मला या प्रकरणात काही माहिती नाही आणि इंटरेस्ट पण नाही.

आशुचॅम्प, पोस्ट आवडली.

सत्ताधारी आणि विरोधक फक्त झुरळ पार्टीला खाली खेचण्याकडे लक्ष देत आहेत, आणि त्यात त्यांनाच जास्त डॅमेज होतोय, होणार हे नक्की. उलटपक्षी, या जाहीरनाम्यातुन उपरोधाने असेल किंवा खरे असेल पण जे मुद्दे मांडलेत त्यांची किमान दखल घेतली तरीही विरोधक आणि सत्ताधारी दोघांवरही लोकांचा रोष कमी होऊ शकतो. पण,

आपल्या कारस्थानी सरकारकडून काय किंवा मूर्खशिरोमणी विरोधकांकडून काय हे घडण्याची अपेक्षा ठेवणेच चूक आहे. जेन z, विचारशील आहे, त्यांना खरे मुद्दे कळतील, तेव्हा हेच लोक सत्ता उलथवु शकतील, किमान सत्तेला घाम तरी नक्कीच फोडू शकतील!

एक असंतोष आहे व त्याला वाचा फुटली. ती वाचा बंद करण्यात आली. ती पुन्हा दुसऱ्या मार्गाने फुटेल.>>+१००

आशुचॅम्प, पोस्ट आवडली.

गरज आहे ती भ्रष्ट व्यवस्था बदलायची.>>+१००

https://www.instagram.com/reel/DYkjHgZsJpK/
CJP Rap.
यात 'बस झालं आता ध्रुवीकरण - खऱ्या समस्यांवर- मुद्द्यांवर-विकासाबद्दल बोला' हे नविन पिढीच्या विचारांचे ट्रु रिफ्लेक्शन असेल तर ते चांगले आहे
आशुचॅम्प पोस्ट्स आवडल्या.

बाकी: सरकारवर टिका करणे अजिबात चूक नाही, जे जबाबदार आहेत त्यांच्यावरच टिका जास्त होते. आधीच्या सरकारांवर टीका करूनच बदल हवा म्हणुन या सरकारला निवडून दिलेले असते. तेव्हा विरोधकांवर टिका का करत नाही, त्यांनी नव्हतं का केलं असं? असे काही/बरेच लोक मोठा मुद्दा मांडल्या सारखे म्हणतात त्याला काही अर्थ नाही. विरोधकांवर टिका करण्यासही काहीच आक्षेप नाही, ते चूक नाहीच. त्यांनी पण भ्रष्टाचार, अमुक केलं नव्हतं का? करत सत्ताधाऱ्यांचे समर्थन (किंवा व्हाईस व्हर्सा समर्थन) करणे चूक. (अशी व्हॉट अबाउटरी कुणी पक्षपात करून बोलत असेल तर ते दाखवण्या पुरती ठीक आहे, चुकीचे समर्थन करण्यास ठीक नाही.)

आपण शक्य तिथे व्यक्त होतो. (हे कुठल्याही धाग्यावर जाऊन कसेही व्यक्त होण्याचे समर्थन नव्हे.)

हे सगळं व्यर्थ आहे, मायबोलीवर लिहुन ते काही नेत्यांपर्यँत पोचत नाही म्हणुन व्यक्त होण्यात काय अर्थ आहे वगैरे अजिबात पटत नाही. प्रत्येक छोट्याशा समूहाने सरळ नेत्यांनांच कळेल असे लिहितो म्हटलं तर ते ही नेते वाचणार नाहीत. आणि एखाद्या छोट्या समूहाचे मत काहीही असो, त्याला कचऱ्याची टोपली दाखवली जाईल. किंबहुना आपल्या भ्रष्टाचारावर म्हणा, स्वार्थी निर्णयावर म्हणा किती लोक विरोध करतील, त्याकडे दुर्लक्ष करायचे किंवा ते कसे दाबायचे, दुसरीकडे कसे लक्ष गुंतवायचे या डावपेचात राजकारणी मुरलेले असतात.
आपण समाजमाध्यमांवर व्यक्त झालो की ते हळुहळु वेगवेगळ्या पातळींवर रिफ्लेक्ट होऊन मग संबंधितांपर्यँत पोचते आणि ही टिका व्यापक असेल तर मग त्यावर मग विचार केला जाण्याची शक्यता असते.
समाजमाध्यमांपेक्षा प्रभावी व्यासपीठ सहज उपलब्ध असेल तर लोक ते वापरतील.

आपण मत दिलेला पक्ष सत्तेत आला तर त्यांच्या चुकांवर टिका करण्याची जबाबदारी वाढते असे माझे मत. ते सगळ्यांनीच मानले पाहिजे असे नाही.

टिका ही फक्त सत्ता उलथवायला, आपला कुठला आवडता पक्ष असेल तर त्याला सत्तेत आणायला नसते. सत्ताधाऱ्यांना आणि त्याच सोबत विरोधकांनासुद्धा हे आम्हाला रुचले नाही, हे चालणार नाही असा संदेश पोचण्यास असते.

वेगळा पक्ष, वेगळा नेता, वेगळा पर्याय उभा करणे वगैरे वेगळी गोष्ट आहे आणि तसे होत असेल तर चांगलेच आहे.

आधी आपण नेत्यांना मखरात बसवून नाचणे, कुणी मग यांचे पाय मातीचेच आहेत असे व्यवस्थित दाखवले तर दोन मिनिटांकरता मखर खाली ठेवून "पण दुसरा काय पर्याय आहे? दगडापेक्षा विट मऊ त्यात वीट निवडली बुवा." असे म्हणुन दोन मिनिटे उलटली की परत मखर डोक्यावर घेऊन नाचणे बंद केले पाहिजे.

(टिका = सरकार कुठल्याही पक्षाचे असो चुकतेय तेथे मुद्देसूद टिका याच अर्थाने खाली टिका हा शब्द वर वापरला आहे. यातही मतभेद असू शकतात आणि त्यावरील मुद्देसूद टिका ही यात आली.)

समाजमाध्यमांपेक्षा प्रभावी व्यासपीठ सहज उपलब्ध असेल तर लोक ते वापरतील.>> आहे ना. मतदान पेटी. पण त्यावरचा विश्वास उडालाय केव्हाच.

मतदान हे काय चुकते त्यावर टिका करण्याचे माध्यम नव्हे. सत्तांतर करण्याचे किंवा आहे त्यांनाच ठेवण्याचे माध्यम आहे.
"सरकार वर टिका" या विषयावर मी लिहिले आहे. त्यात सत्तांतर हाच उद्देश असला पाहिजे असे नव्हे असेही लिहिलंय.
------
आणखी एक मुद्दा स्पष्ट करतो :
यात वर " दुसरा पर्यायच नाही, तो दगड आणि ही वीट आहे" हे खरं की खोटं वगैरे इर्रीलिव्हंट आहे. परत सरकार कुठल्याही पक्षाचे असो. ज्यांचे याबाबत जे मत असेल ते असो (माझेही याबाबत एक मत आहेच.)
आपण जेव्हा केव्हा दगड की वीट अशा परिस्थितीत सापडून वीट निवडतो तेव्हा वीट डोक्यावर घेऊन नाचत नाही, विटेच्या चुका दाखवण्यास संकोचत नाही हा मुद्दा मांडायचा आहे.

सक्षम पर्याय दिसत नाही असा एक मुद्दा वारंवार येतो.
२०१४ मध्ये सत्तेवर आलेल्यांनी प्रचारात मांडलेल्या भ्रष्टाचार, काळा पैसा, महागाई, बेकारी , खालावलेली अर्थव्यवस्था या समस्या सोडवल्या का? की त्या आणखी वाढवल्या?
उपाशी बोका यांनी ज्यांचा व्हिडियो दिला आहे, त्यांच्या इतर व्हिडियोवर नजर टाकली तर त्यांचा कल दिसून येतो. या झुरळांना हिट मारा या म्हणणामागची विचारसरणी परिचयाची आहे.

सोशल मीडियावरच्या एका पोस्टचा असा परिणाम झाल्यावर त्यांना दडपण्याचा सरकारकडून व सरकारच्या हस्तकांकडून होणारा प्रयत्न घाबरल्याचं लक्षण आहे.

IMG_7131.jpeg

प्रश्न का विचारायचे हा प्रश्न ज्याना पडलाय त्यांच्यासाठी. दिखाव्यासाठी का होईना दखल घ्यावी लागली. सोशल मीडियावरून रस्त्यावर यायची वाट न पाहायची बुद्धी व्हावी अशी अपेक्षा आहे.

बाकी असंतोष आहे या पर्यंत सरकारचे चिअर लीडर आले. झुरळ म्हणाले म्हणून असंतोष नसून नोकऱ्या नाही, त्यात परीक्षेचे पेपर फोडतायेत, रस्त्यावर ट्रॅफिक पाचीला पुजलेले, इंस्टाग्राम वर बाहेरच्या देशात सगळे चांगले दिसते आणि इथे परिस्थिती भीषण, राजकारणाचा उद्देश सत्ता हे साधन आणि पैसा हे साध्य नाही इथपर्यंत झाला नाही तर सत्तांतर होईलच. मतपेटीतून नाही झाले तर अराजक अशी बरीच उदाहरणे आहेत.

तोलामोलाचे नेतृत्व पाहिजे या मानसिकतेतून जनता जितक्या लवकर बाहेर येईल तितके लवकर शासन सुधारायची संधी आहे. बदल हा ऑन ग्राउंड काम करूनच येतो. जे आहेत त्यातूनच जे काम करायचं ते प्रामाणिक पणे करणारे लोक पाहिजेत

मानवमामा पोस्ट मस्त!

आणि "हे चालणार नाही" रॅप सुद्धा मस्त शेअर केले.
कलाकार आणि कला हे एक चांगले माध्यम असते अश्या काळात लोकजागृतीचे आणि एकजूट दाखवायचे. गाण्यातील भावना भिडल्या की नेमके व्यक्त होता न येणाऱ्या लोकांच्या मदतीला ते शब्द येतात.
गल्लीबॉय चित्रपटातील आझादी म्हणून रॅप साँग आहे. ते सुद्धा बरेच लोकांच्या नजरेतून तेव्हा निसटले होते पण आजच्या काळात ट्रेंड होऊ लागलेय.

Kerala BJP president Rajeev Chandrasekhar on Saturday alleged that the Cockroach Party, a satirical digital outfit that recently emerged on social media, was part of a cross-border influence operation aimed at destabilising India and targeting Prime Minister Narendra Modi>>>
पहा कळसूत्री भावल्या हलायला/ बोलायला लागल्या.

Pages