Submitted by ऋन्मेऽऽष on 20 May, 2026 - 16:30
जगभरातले जेन झी पेटून उठत आहेत.
आम्ही भारतीय झुरळे कसे मागे राहणार.
एक ठिणगी पडली आणि बघता बघता वणवा पेटला.
हे आमचे इंस्टाग्राम अकाऊंट
फक्त चार (४) दिवसात 8.5 मिलियन म्हणजे तब्बल 85 लाख फॉलोअर्स.
https://www.instagram.com/cockroachjantaparty?igsh=YjhvYnhrZWJsMWtj
आणि ही आमची वेबसाईट
https://cockroachjantaparty.org/
कुठल्या वेगळ्याच जगात राहत असाल आणि हे काय याची कल्पना नसल्यास धागा वाचत राहा...
क्रांती आता फार दूर नाही...
ऑफ द कॉकरोच बाय द कॉकरोच फॉर द कॉकरोच !
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वत्सांनो या मी तुमचीच वाट
वत्सांनो या मी तुमचीच वाट पाहत होतो. बसा तेथे मी पाण्यावरून चालत तुमच्यापाशी येतो.
राज
राज
तुम्ही म्हणजे खुलला परवाना देत आहात.
कुणीही उठावे कुणावरही आरोप करावेत मग तुम्ही इथे येऊन हा देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे म्हणून बाजूला सारावे. जशी मोदी साहेबाची पदवी!
कँट बिलिव्, पिपल कुड बी सो
कँट बिलिव्, पिपल कुड बी सो नाइव..
अहो इथे एखाद्या शांततापूर्ण मार्गाने caa चा विरोध केला म्ह्णून भाषणाच्या आधारावर Secs. 124A, 148, 153A, 302, 307 IPC; 13, 16, 17, 18 UAPA एवढी कलम लावून २०२० पासून जेल मध्ये सडवत ठेऊ शकतेय ,डॉक्टर काफिल खान वर एक भाषणाच्या आधारावर सेडीशन चार्जेस लावता येतात सरकारला ..... हाय काय नाय काय .
जिथे सोयीस्कर तिथे इंटरनॅशनल पॉलिटिक्स ?जिओपॉलिटिक्स वगैरे वापरायचं जिथे हात दगडाखाली असतील आणि बिगर भाजप सरकार असेल तेव्हा मात्र सरकार लेचपेच/देशविरोधी वगैरे वगैरे तेव्हा इंटरनॅशनल पॉलिटिक्स वगैरे कानाडोळा .असो चालायचच्.
मी पक्षीय राजकारणात कधी पडत
मी पक्षीय राजकारणात कधी पडत नाही. पण इथे हसत खेळत चर्चा चालू आहे तर चला, जरा लोकांचे मोरल चेक करूया. जे जे हाती झेंडा घेऊन म्हणतील आमचा पक्ष आणि आमचा नेता भारी त्यांना आरसा दाखवूया
https://www.facebook.com/share/v/1E7949uMFM/
हा व्हिडिओ बघा
बंगालचे नवे मुख्यमंत्री Suvendu Adhikari एकेकाळचे TMC नेता जे लाच घेताना सरळसरळ व्हिडिओमध्ये पकडले गेले होते. ज्यांची खुद्द पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात भ्रष्टाचारी म्हणून निंदा केली होती.
मग नेहमीप्रमाणे त्यांच्यामागे ED लावली गेली होती. परिणामी त्यांनी मांडवली करत भाजप जॉइन केली होती. मग नेहमीप्रमाणे त्यांना क्लीन चीट दिली गेली होती आणि आज तेच भाजपचे मुख्यमंत्री झाले आहेत.
ना खाउंगा ना खाने दुंगा
इथे एक गोष्ट नमूद करतो - वरील व्हिडिओमध्ये या प्रकाराला ध्रुव राठीने हा थुंकून चाटायचा प्रकार आहे असे म्हटले आहे. मी व्हिडिओ शेअर केला म्हणून त्या भाषेची जबाबदारी घेणार नाही. पण त्यात जे आहे त्याचे पुरावे दिले असल्याने आणि ईतर ठिकाणी सुद्धा मी चेक केल्याने ते सत्य आहे याची जबाबदारी घेत आहे.
तर याबद्दल काय म्हणाल? देशात एकूणच सगळीकडे चालू असलेल्या या प्रकाराबद्दल काय म्हणाल?
मला म्हणूनच चीड येऊ लागली आहे राजकारण या प्रकाराची. देशनिष्ठा वगैरे प्रकारच शिल्लक राहिला नाहीये आपल्या देशात असे वाटते. सगळे पैशाला आणि सत्तेला हपापलेले नेते लचके तोडत आहेत देशाचे.
लोकांनाही हे समजते. पण एकदा का त्या नेत्याने एखाद्या समूहाच्या बाजूने आवाज दिला किंवा त्यासोबत आपले काही आर्थिक हितसंबंध गुंतले असतील. तर त्याचे सगळे भ्रष्टाचार बलात्कार माफ! मग आसाराम सारख्या बलात्कार्याला सुद्धा जेल बाहेर काढून मंदिरात व्हीआयपी ट्रीटमेंट देणारा समाज आहे आपला. जनताच असा विचार करत असेल तर नेते सुद्धा तसेच मिळणार!
पण यापुढे नाही!
देशातील हिच परिस्थिती बदलायला आता देशाची युवा पिढी सरसावली आहे. तुम्ही कोणी साथ द्या किंवा नका देऊ. ओवाळत बसा आरती आपल्या आवडत्या नेत्यांची! पण आता ही झुरळे थांबणार नाहीत !!
दिल्लीतील 12 वी सीबीएसई चा
दिल्लीतील 12 वी सीबीएसई चा विद्यार्थी वेदांत अगरवाल ने आपली उत्तरपत्रिका चूक असल्याचा स्क्रीन शॉट सोशल मीडियावर टाकला आणि त्याला प्रसिद्धी मिळताच भाजपचे आयटी सेल लगेच कामाला लागले
त्याला कोक्रोच, पाकिस्तानी, देशद्रोही आणि गद्दार म्हणून पोस्ट पडायला लागल्या
त्याने विचारलं पाकिस्तानी पण सीबीएसई ची परीक्षा देतात का
त्यावर भाजपी अजूनच चवताळून उठली
शेवटी बोर्डाच्या लोकांनी मान्य केले की त्याला मिळालेली री इव्हॅल्यूशन ची उत्तरपत्रिका चुकीची पाठवली गेली
हे एक उदाहरण झालं
की तुम्ही आता कशाही विरूध्द आवाज उठवला की तुम्ही देशद्रोही ठरवले जाणार
आणि याच साठी कोक्रोच पार्टीला पाठिंबा आहे
ते प्रत्यक्षात जमिनीवर उतरून काम करू देत अथवा नको
असंतोषाला वाटा मिळवून देण्याचे काम त्यांनी केलं।आहे
आता अशाच एकेक पार्ट्या येत राहतील आणि भाजप्याच्या नाकात वेसण घालतील
चला, CJP च्या निमित्ताने का
चला, CJP च्या निमित्ताने का होईना ऋन्मेऽऽष आणि आशुचँप यांचे एकमत झाले...
कुणाचं काय तर कुणाचं काय
कुणाचं काय तर कुणाचं काय
त्यांनी आधीही माझ्या
त्यांनी आधीही माझ्या आवडलेल्या लिखाणावर प्रतिसाद दिले आहेत, इथे तर विषय देशाचा आहे. आणि देश फार मोठी गोष्ट आहे
ओह, नोटांच्या प्लेट्स
ओह, नोटांच्या प्लेट्स पाकिस्तानी लोकांना देणारे पी चिदंबरम ( मी धुरंधर मध्ये पाहिले आहे म्हणजे ते खरेच असणार) यांच्यावर कारवाई का झाली नाही हे आता कळले ! नॅशनल सिक्युरीटी इम्प्लिकेशन्स, यू नो !
@विकु खिक्क !
@विकु खिक्क !
@ सुबोध खरे,
@ सुबोध खरे,
पाहिलेत...
आपल्या आवडत्या पक्षाने/नेत्याने केलेल्या भ्रष्ट आचरणांबद्दल बोलायची वेळ येताच भल्या भल्या लोकांची मॉरल संपुष्टात येतात.
म्हणूनच आजच्या काळात जे कोणी निःपक्ष नागरिक असतील त्या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत
आता विशाल दादलानी वर ट्रोल
आता विशाल दादलानी वर ट्रोल तुटून पडले आहेत.
@ऋन्मेष , हे मला उद्देशून आहे
@ऋन्मेष , हे मला उद्देशून आहे का ?
जे कुणी शड्डू ठोकुन मैदानात
काय हे विकु?
जे कुणी शड्डू ठोकुन मैदानात उतरतील त्यांच्यासाठी आहे.
>>
>>
बंगालचे नवे मुख्यमंत्री Suvendu Adhikari एकेकाळचे TMC नेता जे लाच घेताना सरळसरळ व्हिडिओमध्ये पकडले गेले होते. ज्यांची खुद्द पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात भ्रष्टाचारी म्हणून निंदा केली होती.
<<
Lesser of two evils निवडा अशीच परिस्थिती असेल तर काय करावे? आदर्श, निर्मळ, डाग नसणारा नेता येण्याची अनंत काळ वाट पाहत राहणे की देश तोडणार्या नेत्यापेक्षा लाच खाणारा नेता परवडला असे म्हणून त्याच्या मागे समर्थन देणे?
अ तिरेकी मुस्लिम लांगूलचालन करून फुटीर धर्मांध लोकांना डोक्यावर बसवून एक नवा कश्मीरसारखे राज्य बनवण्याचे मनसुबे उधळून लावले हे भाजपचे यश आहे. त्याकरता सर्व अर्थाने पवित्र निष्कलंक असलेला नेता मिळाला नाही. ही एक तडजोड स्वीकारावी लागली. मग?
भाजपने ईडी नामक सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग केलेला आहे. आणि त्यामुळे त्यांची आणि त्याहून जास्त ई डीची विश्वासार्हता संपली आहे.
ईडी संस्थेने कुठल्याही माणसावर खटला चालवून त्याला दोषी ठरवून तुरुंगात डांबल्याचे उदाहरण मला माहित नाही.
सोडून द्या विषय. लैच नपुंसक
सोडून द्या विषय. लैच नपुंसक बचाव वाटतोय.
विकु नाही..
विकु नाही..
हे कुठल्याही एकाच राजकीय पक्षाच्या बाजूने एकांगी विचार करणाऱ्यांसाठी आहे.
तरी वरच्या केस मध्ये हे सुबोध खरे यांना उद्देशून आहे किंवा त्यांना दाखवून देत आहे असे म्हणू शकता.
आमच्या मागच्या chat वाचल्या तर समजेल.
निःपक्ष असणे ही एक भंपक गोष्ट असून त्याचे काय एवढे कौतुक असे ते म्हणाले होते.
म्हणून त्यांच्या आवडत्या नेत्यांनी आणि पक्षाने केलेल्या गैरकृत्यांचे एक छोटेसे सॅम्पल वर आणून त्यावर प्रामाणिक टीका करणे आणि देश प्रथम ठेवणे हे आजच्या काळात किती अवघड आणि मोठी गोष्ट आहे हे त्यांना उदाहरणासह दाखवत होतो.
आणि वरच ताजे उदाहरण आले बघा
shendenaxatra यांनी आपल्या आवडत्या पक्षाने आणि नेत्यांनी केलेले भ्रष्टाचार आणि बलात्कार यावर टीका न करता विरोधकांवर चिखलफेक करून या कृत्यांचा बचाव केला आहे.
मला त्या मुद्द्यावर भांडण्यात आणि राजकीय वादात रस नाही कारण मी अजून अशी शंभर दुष्कृत्य आणू शकतो आणि प्रत्येकाबाबत ते बचाव करताना विरोधकांवर चिखलफेक करणे एवढेच करतील. पण आपल्या लाडक्यावर टीका करणार नाही. आणि ते ज्यांच्यावर चिखलफेक करतील ते सुद्धा माझे लाडके नाहीच आहेत. त्यामुळे या चिखलफेकीत उतरण्यात पॉइंटच नाही.
पण या सगळ्यात देश बाजूला पडत आहे. त्याचा कोणी विचार करत असेल तर मी त्याला समर्थन देईन. जसे तूर्तास या झुरळ चळवळीला देत आहे.
<<म्हणूनच आजच्या काळात जे
<<म्हणूनच आजच्या काळात जे कोणी निःपक्ष नागरिक असतील त्या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत >>
निष्पक्ष म्हणजे नक्की कोण?
"मागच्यांना काढुन तुमच्या हाती सत्ता सोपवली, तुमची आश्वासने, तुम्ही मागच्यांचा चुकांबद्दल त्यांना शिव्या घालत होते तर तुम्ही काही वेगळे कराल म्हणुन, पण आताही मागच्यांच्याच चुका बघा काय म्हणता, 'त्यांनी पण नाही का अमुक केले होते?, मग आम्ही केलेले अमुक x २, ३, ४, ... गोड मानुन घ्या' म्हणत तुम्ही मागच्यांवरच टिका काय बसता? जनतेचे, देशात झालेल्या परिस्थीतीचे प्रश्न सोडुन बटोगे तो कटोगे करत मत काय मागता' असे प्रश्न विचारत सरकारला जाब विचारणारे हे निष्पक्षमध्ये मोडते किंवा कसे? की प्रत्येक वेळी सगळे मेले एकाच माळेचे मणी असे म्हणणे आवश्यक आहे? निष्पक्ष व्यक्तीने अ ने ब वर आरोप केला किंवा ब ने अ वर तर आरोपात तथ्य आहे का हे पहावे की हे लेकाचे सारखेच करावे? सुब्रम्हण्यम स्वामी दोन्ही बाजुंवर भयंकर आरोप करतात. त्यांचे आरोप इथे पोस्ट करुन झुंजवत त्यावर कोण काय म्हणतं यावरुन कोण निष्पक्ष हे ठरवायचे का?
निष्पक्ष म्हणजे अनभिज्ञ की खोलात शिरुन नीट विचार करुन मत बनवणारे? कुठल्याही पक्षाचा झेंडा हाती न घेता जे सुरु आहे ते पाहुन विचार करुन सरकारवर टिका करणारे कोणत्या पक्षात मोडतात? की टिका करण्यापूर्वी मागच्यांनी काय केलं यावर आधी परत टिका केली पाहिजे मगच सद्य सरकारवर टिका केली पाहिजे ? निष्पक्ष असण्यास 'काय फायदा सत्तांतर होउनही' म्हणत नोटाचे बटण दाबणे गरजेचे आहे का की अशा परिस्थितीत सत्तांतर बरे म्हणुन दुसरा पर्याय निवडुन मत दिलेले चालते?
अद्याप कशात काय अन फाटकात पाय असणार्या , सटायर पोस्ट्स करत सरकारवर टिका करणार्या नविन पक्षाला लगेच पाठींबा देणे गरजेचे आहे का?
या प्रश्नांची उत्तरे मिळाली तर कुणी निष्पक्ष आहे म्हणुन टाळ्या वाजवायच्या का यावर विचार करता येईल.
---
हे लिहिले आधी, पोस्ट उशिराने करत आहे. त्यातिल सुब्रम्ण्यन्म स्वामी उदाहरण दिलेल्या मुद्द्यावर तुझ्या वरच्या पोस्टमध्ये उत्तर आले आहे. गूड. इथे येउन तसे मुद्दे उकरुन काढणार्यांना धागाकर्ता म्हणुन हे इथे टाळा असे सांग असे सुचवतो.
CJP ला पाठिंबा नाही की विरोध
CJP ला पाठिंबा नाही की विरोध नाही. Too early to make any opinion about them. सरकारला प्रश्न विचारणे आवश्यक आहे, आणि केवळ तसे केले म्हणुन त्यांच्यावर राळ उठवणे, चरित्रहनन करणे, देशद्रोही म्हणणे वगैरे केवळ हास्यास्पद नव्हे तर ध्रुवीकरणाचे स्पष्ट परिणाम त्यात दिसतात.
Submitted by मानव पृथ्वीकर on
Submitted by मानव पृथ्वीकर on 27 May, 2026 - 02:16
+1
निःपक्ष असणे ही एक भंपक गोष्ट
@ ऋन्मेष
निःपक्ष असणे ही एक भंपक गोष्ट असून त्याचे काय एवढे कौतुक असे ते म्हणाले होते.
भंपक मी छद्म निष्पक्षतेला आणि सवंग लोकप्रियतेसाठ पॉलिटिकली करेक्ट राहण्याच्या प्रयत्नाला म्हणालो आहे
आणि
निवडणूक आयुक्तांना दहशवादी म्हणून जाहीर करून खटला भरवण्याचा आपल्या जाहीरनाम्याला महा भंपक म्हणतो आहे.
निष्पक्ष असताना तुम्ही CJP चा जयजयकार कसा काय करता बुवा.
जरा त्या CJP च्या अध्यक्षांची पार्श्वभूमी पाहून घ्या. आप मधून आलेले आहेत आणि आपच्या पैशावर अमेरिकेत शिक्षण चालू आहे.
Abhijeet Dipke is the founder of the Cockroach Janata Party. ..He studied journalism in Pune for his undergraduate degree and later moved to the United States for higher education.
From 2020 to 2023, he volunteered with the Aam Aadmi Party’s social media team. he worked on meme-based digital campaigning that shaped the party’s political, online and youth engagement.
Read more at:
http://timesofindia.indiatimes.com/articleshow/131218807.cms?utm_source=....
हे पाहिलं कि आपला निष्पक्षतेचा बुरखा फाटून आतली छिद्रे उघडी पडलेली दिसतात.
आपण म्हणालात म्हणून मी गप्प होतो.
जरा आपापसातले वाद थांबवून ब्रेक घ्या लोकहो.
एकत्र येत देशासाठी काहीतरी करायची वेळ आली आहे.
पण आता आपणच परत परत माझे नाव घेता आहात.
असो
बरेच काळाने मला या देशात काहीतरी वेगळे घडतेय अशी आशा दिसू लागली आहे त्यामुळे मी या राजकारण आणि चालू घडामोडी विभागात एन्ट्री मारली आहे. तर आता थांबायचे नाय.
पाहू आपली CJP किती घोडदौड करते ते.
जिग्नेश मेवानी, कन्हैया कुमार सारखे किती उपट सुंभ आले आणि गेले आता अजून किती तरी येतील आणि जातील आणि
तुम्ही तोंडावर पडणार हि भविष्यवाणी स्पष्ट दिसते आहे.
पाहू या घोडा मैदान जवळच आहे.
<< इथे येउन तसे मुद्दे उकरुन
@ मानव, छान पोस्ट.
<< इथे येउन तसे मुद्दे उकरुन काढणार्यांना धागाकर्ता म्हणुन हे इथे टाळा असे सांग असे सुचवतो.
>>>
राजकीय चर्चा धाग्यावर कोणी धागाकर्त्याचे ऐकणे हे तसे अवघडच आहे. पण त्यात स्वतः न उतरणे आणि प्रोत्साहन न देणे इतके करू शकतो. म्हणूनच एक सॅम्पल उदाहरण देऊन पुढे आलेल्या उत्तरांवर प्रतिवाद न करता मुद्दा काय होता एवढेच स्पष्ट केले.
जिथे आयडियली कोणी किती विकास केला हे दाखवून द्यायची चढाओढ लागायला पाहिजे तिथे कोणी किती भ्रष्टाचार केला हे दाखवून द्यायची चढाओढ लागली आहे.
दोन लहान मुले नजरेसमोर आणा,
एकाचे आई वडील मी तुझ्यावर जास्त प्रेम करतो हे त्याला दाखवून द्यायला धडपडत आहेत.
तर दुसऱ्याचे आईवडील तुझा बाप कसा नालायक आहे आणि तुझी आईच कशी हलकट आहे म्हणून भांडत आहेत
आपल्याला यातील कुठल्या मुलाचे आयुष्य जगायला आवडेल हे समजणे इतके अवघड आहे का..
या वादात आईची किंवा बापाची बाजू न घेता तसेच दोघेही नालायक आहेत असेही न म्हणता त्यांचे वर्तन सुधारावे आणि आपले कुटुंब सुखी व्हावे इतकीच ज्याची इच्छा असते तसे निष्पक्ष मूल बनायची आज गरज आहे.
सुबोध खरे,
सुबोध खरे,
आताही आपण मी वर दिलेल्या सरकारच्या भ्रष्टाचारावर टीका करून स्वतः कसे निष्पक्ष आहोत हे न दाखवता ऋन्मेष सुद्धा कसा निष्पक्ष नाही हे दाखवायला धडपडत आहात
आणि हे दाखवताना सुद्धा,
१) मी कॉकरोच पार्टीने जो आवाज उठवला त्याला समर्थन दिले.
२) या चळवळीमागे जो आहे तो एकेकाळी आप या राजकीय पक्षाचा मेंबर होता. किंवा आताही आहे समजा.
ही दोन्ही समीकरणे जोडून मी आप पक्षाचा समर्थक आहे आणि निष्पक्ष नाही हा निष्कर्ष काढलात.
आता तो कसा चुकीचा आहे हे मी तुम्हाला समजवू शकत नाही कारण तुम्ही एका ठराविक राजकीय पक्षाचे समर्थक आहात आणि प्रत्येक घटना त्याच चष्म्यातून बघतात याची मला कल्पना आहे.
जे असे नाहीत त्यांना इथे समजेलच. तर आपण पुढे जाऊया. आपल्यातील मतभेद इतका महत्त्वाचा नाही जितका या धाग्याचा विषय.
--------
या चळवळीचे जे नवीन अपडेट्स येतील ते मी इथे देत राहीलच..
येत्या काळात अशा चळवळी देशभरात येऊ देत. सत्ता बदलो ना बदलो कारण ते लक्ष्य नाहीच आहे. तर सत्ताधारी सुधारणे गरजेचे आहे. भ्रष्ट व्यवस्था बदलणे गरजेचे आहे. अन्यथा सत्ता कुणाचीही येवो, देशातील परिस्थिती बदलणार नाही..
सुबोध खरे किती ती आगपाखड कराल
सुबोध खरे किती ती आगपाखड कराल आ
देशद्रोह कशाला म्हणतात ???
देशावर कोविड चे महासंकट आलेले असतानाही कुंभमेळा आयोजित करून लाखो नागरिकांचा जीव धोक्यात घालणे याला देशद्रोह म्हणतात
कधी कानावर आलेय की काय शिक्षा झाली यासाठी म्हणून
अंधभक्त असायला हरकत नाही पण इतकं ब्रेनवोश झालेलं असणं चांगलं नव्हे
ती झुरळ पार्टी काय करेल न करेल पण तुमच्या लाडक्या पक्षा विरुद्ध उभे राहिलेल्या प्रत्येकाला हे कसे परकीय हस्तक आणि देशद्रोही म्हणत लाथा मारत रहाल तर उद्या देव न करो पण तुमच्यावर वेळ आली तर कोणीही उभा नसेल हा धोका लक्षात घ्या
अर्थात बरबाद झालो धुळीस मिळलो तरी आम्ही भाजपचेच निलाजरे समर्थन करता राहणार हीच भूमिका असेल तर मग पास
निदान अभिजित कडे वेरीफिअबल
निदान अभिजित कडे वेरीफिअबल डिग्री तरी आहे.
अंधभक्त असायला हरकत नाही पण
अंधभक्त असायला हरकत नाही पण इतकं ब्रेनवोश झालेलं असणं चांगलं नव्हे >>> सगळ्यात वाईट म्हणजे ही कीड देशाच्या संरक्षण दलांत, हेरगिरी विभागांत, अगदी न्यायपालिकेत देखील चांगलीच फोफावलेली दिसते. डॉक्टर आंबेडकर जे 'शीला शिवाय ज्ञान कमावलेली जनता, ही राष्ट्राच्या मुळावर उठते' हे जे म्हणाले ते तंतोतंत भारताच्याबाबतीत खरे होताना दिसत आहे....ज्यांना त्यांच्या गर्भावस्थेतच वेचून वेचून ठेचायला हवे होते त्यांना काँग्रेसने पैसे खायच्या नादात आणि मुस्लिम धार्जिणी धोरणे राबवायच्या नादात दुर्लक्ष करून या भस्मासुराला वाढायला मदतच केली, म्हणून या पापात ते ही सारखेच वाटेकरी. जर हे वेळीच आटोक्यात नाही आलं, तर या देशात यादवी दूर नाही, आणि मग पळायला 'घोडा मैदान' सोडा, 'कुरुक्षेत्राचा' बनाव देखील अशांना पुरे पडायचा नाही.
नक्कीच अंध भक्तांच्या वाढीस
नक्कीच अंध भक्तांच्या वाढीस कारणीभूत ठरलेत ते अंध विरोधक
कसलेही बिनबुडाचे हास्यास्पद आरोप करत आपली पत घालवली आणि जिथं खरं तर सरकारला जाब विचारायला हवा तिथं गप बसलेत
मोदी करतात तो सगळा मास्टरस्ट्रोक म्हणणारेही घातक तसे ते करतील ते सगळंच कसं चूक हे सांगत बसलेले विरोधकही
त्यामुळेच आगामी काळात तरुणाई अशाच कुठल्या न कुठल्या असंतोषाला पाठींबा देत राहणार हे नक्की
नक्कीच अंध भक्तांच्या वाढीस
नक्कीच अंध भक्तांच्या वाढीस कारणीभूत ठरलेत ते अंध विरोधक
कसलेही बिनबुडाचे हास्यास्पद आरोप करत आपली पत घालवली आणि जिथं खरं तर सरकारला जाब विचारायला हवा तिथं गप बसलेत >>> +१००
Submitted by आशुचँप on 27 May
Submitted by आशुचँप on 27 May, 2026 - 13:13 >> +१०० आशु
स्वतः कसे निष्पक्ष आहोत हे न
स्वतः कसे निष्पक्ष आहोत हे न दाखवता
छे छे.
मी मुळीच निष्पक्ष असल्याचा दावा करत नाही.
मी भाजप आणि श्री मोदी यांचा समर्थक आहे. सध्या उपलब्ध असलेल्या कोणत्याही नेत्या पेक्षा श्री मोदी आणि शाह हे १०० % जास्त चांगले आहेत असे माझे मत आहे. आणि असेच बहुसंख्य भारतीय जनतेचे मत आहे. म्हणूनंतर श्री मोदी गेली २४ वर्षे सतत जिन्कत आले आहेत.
त्यांनी अनेक चुका केलेल्या आहेत पण इथे मुळातच इतकी धुळवड चालू असते कि मी कशाला आगीत तेल ओतायला जाऊ.
आताच बघा किती लोकांनी लगेच माझ्यावर वेगवेगळे आरोप केले आहेत.
त्यांचा जीव रमवायला ते तसं करतात कारण एका मागून एक निवडणूक भाजप जिंकत चालला आहे
त्यामुळे त्यांची जळजळ होते त्याचा निचरा ते असा करत आहेत. करू द्या बिचार्यांना.
बाकी तुम्ही चालू ठेवा आपला भाबडा प्रयत्न.
हि आप वाली झुरळं एक दिवस तुम्हाला १०० % तोंडघशी पडणार आहेत.
तोवर मी पण वाट पाहतो
Pages