Cockroach जनता पार्टी झिंदाबाद !

Submitted by ऋन्मेऽऽष on 20 May, 2026 - 16:30

जगभरातले जेन झी पेटून उठत आहेत.
आम्ही भारतीय झुरळे कसे मागे राहणार.
एक ठिणगी पडली आणि बघता बघता वणवा पेटला.

हे आमचे इंस्टाग्राम अकाऊंट
फक्त चार (४) दिवसात 8.5 मिलियन म्हणजे तब्बल 85 लाख फॉलोअर्स.
https://www.instagram.com/cockroachjantaparty?igsh=YjhvYnhrZWJsMWtj

आणि ही आमची वेबसाईट
https://cockroachjantaparty.org/

कुठल्या वेगळ्याच जगात राहत असाल आणि हे काय याची कल्पना नसल्यास धागा वाचत राहा...

क्रांती आता फार दूर नाही...
ऑफ द कॉकरोच बाय द कॉकरोच फॉर द कॉकरोच !

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@ ऋन्मेष

7 जुलै ला पुढची तारीख आहे 7 जून ला नाही!

आणि 7 जुलै ला फार तर काय होईल त्यांचं x चं खातं परत उघडायला सांगतील यावर सरकार सर्वोच्च न्यायालयात जाईल.
हे ऑनलाईन गुऱ्हाळ असंच चालू राहील.
जोवर माणसं जमिनीवर उतरून आंदोलन करत नाहीत तोवर यातून काहीही निष्पन्न होत नाही.
आभासी जगातले बरेचसे लोक प्रस्थापित आहेत ज्यांच्या नोकऱ्या धंदे व्यवस्थित चालू असतात. ते काही आंदोलनात उतरत नाहीत. खाऊन पिऊन ढेकर देऊन ते असे आभासी जगात लढत असतात.
इथले मायबोलीवरील झुरळां ना पाठिंबा देणारे लोक असेच आहेत.
ते काही आपली नोकरी धंदा सोडून रस्त्यावर उतरणार नाहीत.

आणि जे रस्त्यावर असतात त्यांच्यातील बरेचसे या आभासी जगापासून दूर असतात.

थोडक्यात काय हे CJP वगैरे बहुतांश लोकांचे फावल्या वेळचे टाइम पास धंदे आहेत.

बाकी भाजप याला हवा का देतात हे ना समजणाऱ्या लोकांना परत एक सांगतो.
मोदी विरोधकांना एक खुळखुळा देतात आणि ते तो हलवत राहतात. त्यांना हे कळत नाही की खुळखुळ्या चा आवाज कुठून येतो.
आपण हलवणे थांबवले तर तो आवाज बंद होईल.
एक खुळखुळा थांबवला की मोदी तुलना दुसरा खुळखुळा देतात.
मग हेच चक्र परत चालू राहतं.

वाईट एवढंच वाटतं तुमच्या सारखे भोळे लोक हुरळली मेंढी लागली लांडग्याच्या मागे असे अशा लोकांच्या मागे फरफटत जातात आणि भ्रमनिरास होऊन निराश होतात.

अजूनही जागे व्हा!

राजजी, विरोधक, भाजपा सगळेच मोरॉन्स आहेत.
तुमचा गायडन्स द्यावा. की म्हणजे NEET लीक, CBSE गोंधळ ह्यावर तरुणांनी नक्की काय करायला हवे. तुमच्या सर्व चेकलीस्ट मधून पास होणारी चळवळ येण्याची वाट बघावी का कसे.

मोदी लोकांच्या हातात खुळखुळा देतात या वाक्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, अनावधानाने का असेना भक्तांनी मान्य केलेच शेवटी Happy

मोदी साहेब विरोधकांच्या नव्हे तर गोदी लोकांच्या हातात खूळखुला देतात,
तेव्हा खरे सर, वाजवत रहा वाजवत रहा वाजवत रहा वाजवत रहा.....

माझा एक मित्र आहे तो जॉब स्वीच करायच्या आधी थांबा आता लवकरच धप्पा देणार आहे, वाघ लवकरच झेप घेणार आहे, विरोधकांचा कार्यक्रम फिक्स आहे असे वेगवेगळे व्हॉट्सअप स्टेटस ठेवतो. म्हणजे असतो तर साधा चार पाच हजारासाठी स्विच पण स्टेटस असे जसे काय पुढचा मुक्या अंबानी हाच. त्याचे असे स्टेटस दिसले की समजायचं हा जॉब स्वीच करायच्या तयारीत आहे. त्याचे असे स्टेटस दिसले की आम्ही विचारतो काय रे बरा आहेस ना मॅनेजर उडाला काय तुझ्यावर परत, पार्टी कधी. त्याला ग्रुपमध्ये जाम पिडतो.

@ सुबोध खरे…
७ जून असो जुलै असो ऑगस्ट असो ते महत्त्वाचे नाही..
त्या तारखेला पुन्हा कोर्ट काय निकाल देईल ते सुद्धा महत्त्वाचे नाही..
आजच्या तारखेला त्यांनी पुढची तारीख दिली असताना तुम्ही कोर्टाचा वतीने निकाल कसा घोषित केला? आणि आता ते पुढे काय करणार हे सुद्धा कसे सांगितले?

की जसे तुम्ही स्वतःच म्हणालात की तुम्ही निष्पक्ष नाही आहात तसेच कोर्ट सुद्धा निष्पक्ष नाहीये याची तुम्हाला खात्री आहे.

मलाही कल्पना आहे की आपल्या देशात इडी, सीबीआय, कोर्ट, मिडिया वगैरे बरेच गोष्टी विकल्या गेल्या आहेत, कॉम्प्रमाईज झाल्या आहेत. तरीही कोर्टाच्या सध्याच्या आदेशाचा आपल्या सोयीने दिशाभूल करणारा अर्थ काढून तुम्ही तो असा पब्लिक फोरम वर नाही लिहू शकत.

अर्थात अशी अपेक्षा मी राजकीय धाग्यांवर प्रत्येकाकडून करत नाही...
पण तुम्ही इथल्या पोस्टची आपण जबाबदारी घ्यावी अशी विधाने या धाग्यावर केली होती त्याच्याशी हे विसंगत वाटले इतकेच.

<<<
NEET लीक, CBSE गोंधळ ह्यावर तरुणांनी नक्की काय करायला हवे.
>>>

हा चांगला मुद्दा आहे. जर कॉकरोच करत आहेत ते चुकीचे आहेत तर दुसरे काय करायला हवे यावर चर्चा करायला हरकत नाही.
अश्या बरेच गोष्टी बरेच समस्या आहेत पण पेपर लीक पासून सुरुवात करून मग चर्चा इतर समस्यांवर नेता येईल.

बरोबर. खरे डॉक्टरांनी जे मॅनिफेस्टो बद्दल आक्षेप लिहिले आहेत ते योग्यच आहेत आणि मीही ते लिहिलेले.
पण हे कोक्रोच योग्य मुद्द्यांवर आक्षेप घेत आहेत. मूळ समस्यांवर पूर्ण मौन साधून केवळ राजकीय चिखलफेक मिडिया करत आहे त्यामुळे ही कॉकरोच पार्टी इतकी मोठी झाली. अजूनही ह्या धाग्यावर प्रश्नावर चर्चा करण्याऐवजी तो कोण दिपके आपचा आहे म्हणून चिखलफेक चालली आहे.

बाकी ही कॉकरोच पार्टी हे एक instagram पेज आहे. त्यामुळे पुढेजाउन भ्रमनिरास होईल वैगेरे बोलणे हास्यास्पद आहे. खासकरून Trump चे राईड ऑर डाय समर्थक असणाऱ्या लोकांकडून हे ऐकणे आणखी जास्त विनोदी आहे.

मी बरेच वायरल व्हिडिओ पाहिले ज्यात काही कोकरोच स्वयंसेवक आपल्या विभागातील बेसिक समस्या दाखवून रीळ बनवत आहेत. जसे की अस्वच्छता, खराब रस्ते, वैद्यकीय सेवांचा अभाव वगैरे.. काही व्हिडिओ आवाज उठवल्यावर स्थानिक प्रशासनाने दखल घेत काम केले असेही आहेत. मी ते सेव्ह केले नाहीत. खरे खोटे सुद्धा केले नाहीत. पण सोशल मिडिया हे चांगल्या कामासाठी वापरले गेले तर एक ताकद सुद्धा आहे यावर विश्वास आहे. त्यामुळे ही चळवळ पुढे जाऊन वाढणार तर नाही ना या भीतीने भ्रष्ट राज्यकर्ते घाबरले असतील तर त्यात नवल नाही.

कॉमी, त्यांच्या चौथ्या वाक्यात त्यांनी त्यांच्या मते जनतेने काय करायला हवे सांगितले आहे की. त्यांनी व्यक्त केलेल्या मताप्रमाणे झालं तर त्याला त्यांचा खाऊन पिऊन ढेकर देऊन आभासी जगातून पाठिंबा असेल की ढेकर न येण्या इतपत कमी खाऊन ते स्वतःपण त्यात सामिल होतील एवढाच खुलासा बाकी आहे.

माझ्यामते तशी वेळच येऊ नये. रस्त्यावर उतरण्याचे सल्ले देऊ नयेत. स्वतः आभासी जगात वावरत खुळखुळा देण्याला चाणक्यनीति म्हणत तर मुळीच नाही. निवडुन आले म्हणजे पाच वर्षे राजा, कोणी काही बोलु नये या मानसिकतेतून बाहेर यावे. तुम्ही आमचे मसीहा तुम्ही रिप्लेसबल नाही असा संदेश कुणालाही देऊ नये. आपण काहीही केले तरी लोकांना वाटते आपल्याशिवाय दुसरा पर्यायच नाही हे डोक्यात गेल्याने असले कारभार होतात आणि त्याची जबाबदारी झटकणे, विरोधक तर निवडूनच येत नाही अशी थिल्लर उत्तरे अशा प्रश्नांवर देणे हे प्रकार होतात.
एवढे थांबवले तरी फरक पडायला सुरुवात होईल.

राज, यू आर डुइंग एक्झॅक्टली व्हाट यू आर अ‍ॅडव्हायजिंग द बीजेपी नॉट टू डू. इफ यू आर सो शुअर सी जे पी इज अ जोक , व्हाय आर यू अ‍ॅटॅकिंग इट?

सीजेपी चे थर्मामीटर हे अतुल कुलकर्णींने केलेले वर्णन मला पटले, ताप किती आला आहे हे दाखवतो पण तो उपाय नाही, इथे मुळात ताप आलेला आहे हेच मान्य करणे ज्यांना अडचणीचे आहे तेच हल्ला करत आहेत.

प्रयागराज इथली ती कोचिंग सेंटर्स केवळ सरांनी आंदोलनात भाग घेतला म्हणून सील केली गेली हे खरेच असेल तर भयंकर आहे !

शाहरुख खान , स्वप्नील जोशी, सई ताम्हनकर व क. खु क. ग. हे आपापल्या niche मधले सर्वश्रेष्ठ आहेत हे मला बिनशर्त मान्य आहे !

खुळखुळा नाही ..घंटा दिलाय अक्ख्या देशाला !आणि त्याच घंट्यांचा काही लोकांना खूप अभिमान वाटायला लागलाय .
काँग्रेस काळात पण असा एक मोठा वर्ग होता ज्यांचं व्यक्तिगत आयुष्य मस्त चालेल त्यांना काँग्रेसच्या कारभाराची काही तोशीस पडली नव्हती ,ते बोलायचे सगळं चांगलं तर चाललंय तुम्हाला उगाच काँग्रेस विरोध करायचाय .पण ते समर्थक निदान छाती ठोकून भ्रष्टाचार किंवा गैरव्यवहाराचा "निदान "पब्लिकली समर्थन करायचे नाहीत ,
पण भाजप समर्थक काही झालं तरी ते भारीच या डिनायल मोड मध्ये गेलेत ,आणि यांचा युक्तिवाद काय तर म्हणे चांगलं काम केलं त्याच कौतुक करत नाही तुम्ही ,उद्या मोबाईल च्या नेटवर्कला प्रॉब्लेम झाला तर आपण तक्रार करू आणि मोबाईल कंपनी वाले असाच म्हणतील काय चायला बाकीचे दिवस चांगलं नेटवर्क असत तेव्हा कौतुकाचा एक फोन नाही आणि बंद पडल्यावर तक्रार? Happy
प्रत्येक प्रश्नावर व्हाटअबौटरी /नेहरू/पाकिस्तान/मुसलमान/धर्म/चिवडा/लसूण .

खरे भक्तांचे खरे प्रतिनिधी आहेत.

(या खर्‍यांचे रानोमाळ सुटलेलं लॉजिक, भाषा आणि प्रतिवाद पाहता या स्टेटमेंटचा भक्तांना अपमान वाटला पाहिजे, पण काय सांगता येत नाही. मोदी तुमच्या हातात खेळणं देतो आणि तुम्ही खेळत बसता- असं अनेक भक्तांकडून ऐकलं आहे. या लोकांना कसला अभिमान वाटेल, काहीच सांगता येत नाही)

लोकशाहीत जनतेचा सरकारवर अंकुश हवा
असे आपण शाळेत असताना नागरिकशास्त्रात शिकलो होतो.

पण दुर्दैवाने बरेच जण ते विसरले आहेत.

युवा पिढीचे हे कोकरोच आपल्याला त्याचीच नव्याने आठवण करून देत आहेत.

आत्मपरीक्षण करूया आणि जागे होऊया.

इथे जर कोणी प्रत्येक वेळी सरकारची बाजू घेत त्यांच्या प्रत्येक गोष्टीचे काही ना काही तरी समर्थन करत असेल तर गरजेचे नाही की ते त्या प्रत्येकाचे प्रामाणिक मत असेल. त्यात एखाद्याचा काहीतरी वैयक्तिक स्वार्थ सुद्धा असू शकतो.

त्यामुळे इथे अश्या कोणाचे मुद्दे खोडणे किंवा कोणाचे मत परिवर्तन करणे हे या धाग्याचे निदान माझे तरी लक्ष्य नाही. वर ज्या जनतेच्या अंकुशाबद्दल म्हटले आहे त्यावर फोकस करा. इथेच नाही तर जिथे जिथे व्यक्त होत असाल तिथे तिथे पक्षीय राजकारणापलीकडे जात हाच स्टँड ठेवूया..

इथेच नाही तर जिथे जिथे व्यक्त होत असाल तिथे तिथे पक्षीय राजकारणापलीकडे जात हाच स्टँड ठेवूया. >>> लोकशाहीत सरकारी व्यवस्थेशी निगडीत कोणत्याही अराजकता/ अंदाधुंदी बाबत जनता प्रश्न कुणाला करणार? सरकार मध्ये संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीला,... बरोबर?? पण ती व्यक्ती आहे तर एखाद्या पक्षाचीच, आता ती व्यक्ती आमचा पाठिंबा असलेल्या पक्षाची आहे म्हणून आणि म्हणूनच तुम्ही प्रश्न उपस्थित करत आहात/ विरोधी पक्षाची असती तर तुम्ही तसे केले नसते (If my aunt had a moustache, she would be my uncle टाईप युक्तिवाद) आणि म्हणूनच पक्षीय राजकारण हाच तुमचा एक कलमी कार्यक्रम आहे असा कांगावा त्या त्या पक्षाचे पाठीराखे करतात....आता याला कसं हाताळणार तुम्ही?

अनुमोदन
झुरळ पार्टी हे प्रातिनिधीक उदाहरण झाले, मुद्दा हा आहे की तरुणांच्या मनात असंतोष खदखदत आहे पण त्याला सामोरे जाण्यापेक्षा त्यांना बदनाम करण्यात सरकार आणि भक्त मंडळी व्यग्र आहेत
त्यांना हेच भारी वाटतंय की बघा आम्ही कसे दिपके ची पाळेमुळे खोदून काढली वगैरे
अरे भाबड्यांनो आज दिपके जाईल उद्या कोणीतरी नवीन येईल

प्रॉब्लेम आहे तुमच्या सिस्टीम मध्ये, त्यावर लक्ष द्या
पण ते राहील बाजूला व्हीसल ब्लोअर चा आवाज दाबण्यात याना पुरूषार्थ वाटतो आणि आणि अभिमान

अवघड आहे या मंद भक्तांचे, त्यांच्यासोबत आपल्यालाही खेचून खाली नेणार हे एक दिवस

अरे भाबड्यांनो आज दिपके जाईल उद्या कोणीतरी नवीन येईल>>> मी हे वाचताना भाबडेपणाने काहीतरी वेगळंच वाचलं... Rofl

अवघड आहे या मंद भक्तांचे, त्यांच्यासोबत आपल्यालाही खेचून खाली नेणार हे एक दिवस>>>> हे याचं उत्तर 👇

BJP and its NDA allies govern over 78% of the Indian population and approximately 72% to 76% of India's land area as of the current political landscape in 2026

मग कशाला त्रास करून घेता आहात.

प्रॉब्लेम असा आहे की सिस्टीम करप्ट, राजकारणी करप्ट, वाह्यात इत्यादिंशी आम्हाला काही देणे घेणेच नाही. फक्त आमचे पारडे सत्तेत आहे की इतरांचे याला महत्व आहे. आधीच्या पारड्यांवर ज्या कारणांसाठी टिका केली, शिव्या घातल्या तेच आमचे पारडे सत्तेत असताना करत आहे तर "मले तर लय मजा येऊन राहिली बुवा!"

भक्तांचं कसं झालाय त्यांचा साहेब हुशार भक्त मंद आणि गुलामांचं कसं झालाय साहेब मंद आणि गुलाम हुशार. हे असे हुशार हुशार एकत्र येतील तेव्हा कुठे भारताचा विकास होईल.

https://www.instagram.com/reel/DZCPMgmN5tg/?igsh=MXNrNHdpd3RjYWo5MA==

CJP चे संस्थापक अभिजीत दिपके ६ जून रोजी भारतात परत येत असून, शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतर-मंतर येथे शांततापूर्ण आंदोलन सुरू करणार आहेत.

तुम्ही आमच्या याचिकेवर स्वाक्षरी केली होती. ८ लाख स्वाक्षऱ्या मिळूनही कोणतीही जबाबदारी स्वीकारली जात नाही. आता सोशल मीडियावरील आंदोलनाला शांततापूर्ण लोकआंदोलनात बदलण्याची वेळ आली आहे.

तुम्ही अभिजीत यांना विमानतळावर भेटू शकता आणि तेथून आपण सर्वजण एकत्र संसद मार्ग पोलीस स्टेशनला जाऊन जंतर-मंतर येथे शांततापूर्ण आंदोलनासाठी परवानगी मागणार आहोत.

NEET, CBSE, CUET आणि SSC GD मधील १ कोटींहून अधिक विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे. काही विद्यार्थ्यांनी आपले प्राणही गमावले. तरीही कोणतीही जबाबदारी निश्चित झालेली नाही. आता हे थांबले पाहिजे.

======

तळटीप - वरील पोस्ट कोकरोच इन्स्टाग्राम अकाऊंट वरून कॉपी पेस्ट केली आहे. सोबत लिंक दिली आहे.
आणि इथे फक्त बातमी देण्याच्या हेतूने म्हणून दिली आहे
तरी कृपया कोणी मला "देशद्रोही" ठरवू नये!

भाजपा सरकारने अटक वगैरे करून होणारे आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न केला तर याचा फायदा झुरळानाचं होईल.

झाडूने झुरळ मारता येते पण झाडूतून निघालेली झुरळे कशी मारणार?

अमर प्रेम मधल्या
चिंगारी कोई भडके तो सावन उसे बुझाए
सावन जो आग लगाए उसे कौन बुझाए

ह्यात असे एक कडवे घालता येईल!

भक्तांचं कसं झालाय त्यांचा साहेब हुशार भक्त मंद आणि गुलामांचं कसं झालाय साहेब मंद आणि गुलाम हुशार. हे असे हुशार हुशार एकत्र येतील तेव्हा कुठे भारताचा विकास होईल.>>>
नॉन बायोलॉजिकल ला फक्त आणि फक्त अमानवीय बोकलतच वेसण घालू शकतात. पण बोकलत हेच भक्तांच्या मांदियाळीत सामील झालेत. त्यामुळे विकासाची उरली सुरली आशा सुध्दा संपुष्टात आलीय.

.

Pages