क्रिकेट - १०

Submitted by कृष्णा on 13 October, 2025 - 07:56

जुना धागा २००० पार होऊ लागला म्हणून हा नविन धागा.

इथे जुना धागा आहे...

https://www.maayboli.com/node/86160

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

लखनौ नी आज तरी अर्जुन तेंडूलकर ला चान्स द्यायला हरकत नव्हती. पण बिचाऱ्याचंं बॅडलकच खराब आहे...

पहिल्या सामन्यात रोहीत खेळला आणि मुंबईने आजवरचा आपला सर्वात मोठा २२१ चेस आरामात पार पाडला.

चौथ्या सामन्यात २४० चेस करताना ५ ओवर बिन बाद ५६ अशी सुरुवात होती. रोहित बाहेर गेला आणि मुंबई सुद्धा कायमची बाहेर गेली.

आज पुन्हा आला, पुन्हा खेळला आणि मुंबईचा २२९ चा नवा सर्वात मोठा चेस हसतखेळत साजरा झाला.

रोहित आज चाचपडत होता तेंव्हा वेगळेच वाटले एकदम. अगदी तो फॉर्म मधे नसला तरी असे क्वचितच बघायला मिळते. नंतर सगळे रुळावर आले.

स्काय ला बसवायची गरज आली आहे. किती वेळा त्याच प्रकारे त्याच शॉट वर बाद होणार ?

*रोहित आज चाचपडत होता तेंव्हा वेगळेच वाटले" - खरंय. रिकल्टन 15 चेंडूत 37 व रोहित 15 चेंडूत 15, असा स्कोअर होता; मग रोहितने आवेश खानच्या ओव्हरमध्ये ६-४-६-४- 1 धावा करून 20 चेंडूत 36 हा स्वतःचा नॉर्मल रन रेट गाठला ! छान वाटलं नंतर रोहितला त्याचा शैलीदार खेळ करताना बघून !

रोहीत फार चाचपडत होता असे मला वाटले नाही पण मोठे शॉट येत नव्हते म्हणून जरा चिडचिड होत होती.
आवेशला पहिला फोर मारताच त्याने मानेला दिलेला झटका बोलका होता. पुढे ती ओवर मोठी होणार हे तिथेच समजले होते.

शॉर्ट बॉल ला ज्या तर्‍हेने सुरूवातीला खेळत होता त्यावरून चाचपडणे दिसते होते. नेहमीचा सराईतपणा नव्हता. "फार" चाचपडत होता असे म्हटलेले नाहिये.

काल सूर्या कप्तान होता तरीही बुमरा दुसर्‍या ओव्हर मधे आला. मागे दोन सामन्यांमधे हेच झाले होते तेंव्हा हार्दिक वर ठपका ठेवला गेला होता. कदाचित बॉलिंग ऑर्डर , विशेषतः सुरूवातीच्या २-३ षटकांची ड्रेसिंग रूम मधेच कोच, कप्तान बॉलर्स ह्यात ठरवत असतील असे वाटाते. पुढे मग कप्तान नि कोचिंग सिग्नल्स ह्यावर होत असावे. खर तर बुमराला दुसरी किंवा तिसरी ओव्हर देणे हि त्याच्या कौशल्याला दाद दिली आहे असे मला वाटाते. असा बॉलर त्याला कौशल्य दाखवायला नविन बॉलच हवा असे नाही ह्याउलट चहर सारख्याला नवा बॉल देणे मस्ट आहे कारण त्याचा एफेक्टीव्हनेस्लगेच कमी होत जातो. तेंव्हा बुमरा कितवी ओव्हर टाकतो ही त्याला दिलेली पोच पावती आहे असे वाटते. नि त्याच बरोबर काल त्याच्या पहिल्या दोन ओव्हर्स बघून 'डीड हि वोकप ऑन द राँग साईड ऑफ द बेड टूडे ?' असेही वाटले Wink

आज संजूने मस्त बॅटिंग केली. त्याच्या कौशल्याला, भारतीय संघाबरोबर घालवलेल्या वेळामुळे, वर्ल्डकपमधे लाभलेल्या यशामुळे परिपक्वता आली आहे. त्याने आजची इनिंग मस्त प्लॅन आणि एक्झिक्यूट केली. लवकरच गायकवाडकडून संजूकडे खांदेपालट झाली तर आश्चर्य वाटू नये.

संजूचे दिवस पलटले आहेत.
फायनली त्याला क्लॅरिटी आली आहे आणि आपल्यातील टॅलेंटला न्याय देऊ लागला आहे.
पुढच्या सीझनला चेन्नई कर्णधार होण्याची शक्यता आहे.
भारतीय एकदिवसीय संघात देखील तो स्थान मिळवू शकतो.
राहुल कीपिंग करताना कॅन्सिस्टंट नाही. चुका फार करतो. त्यामुळे ती जागा तशी रिक्तच आहे जी संजू घेऊ शकतो. अर्थात राहुल निव्वळ फलंदाज म्हणून संघात राहू शकतोच.

संजूचा फॉर्म व निवडसामित्यांची लहर यांचा कंटाळवाणा लपंडाव खूप वर्षं चालला होता ; आता दोघंही हातात हात घालून मजेत फिरताहेत, हा आनंददायी प्रवासही तितकाच दीर्घकालीन ठरो, ही आशा व प्रार्थना !!!

संजूचा फॉर्म व निवडसामित्यांची लहर यांचा कंटाळवाणा लपंडाव खूप वर्षं चालला होता ; आता दोघंही हातात हात घालून मजेत फिरताहेत, हा आनंददायी प्रवासही तसाच दीर्घकालीन ठरो, ही आशा व प्रार्थना !!!

संजू वनडे मधे कीपर म्हणून आला तरी बॅटिंग कुठे करेल हा प्रश्न आहेच.
जयस्वाल, गिल, रोहित हे तीन ओपनर आहेत. राहुल लोअर ऑर्डर / फिनिशर रोल मधे सेट आहे (संजू या जागी पूर्वी फेल गेलाय). त्याला परत ट्राय करून सेट होतो का हे बघण्याइतका वेळ आता वर्ल्डकप च्या आधी तरी हातात नाही.

आणि आपला सध्याचा बॅटिंग ओव्हर कीपिंग अप्रोच बघता आत्ता तरी राहुल ला प्रेफरन्स मिळू शकेल. संजू दुसरा कीपर म्हणून टीम मधे असेल, पण फर्स्ट चॉईस राहुल कडेच जाण्याची शक्यता आहे

जयस्वाल, गिल, रोहित हे तीन ओपनर आहेत.
>>>>

रोहीत शर्मा २७ वर्ल्डकप खेळेलच याची अजून मलाही खात्री नाही. देव न करो पण त्याचा फॉर्म फिटनेस काही गडबडला बाहेर पडला तर... पण राहू दे. कश्याला वाईटसाईट बोला. रोहीत खेळेलच हे गृहीत धरू तुर्तास.

पण जयस्वालची वनडे जागा फिक्स नाहीये. तो राखीव ओपनरच आहे.
जर त्या जागी संजू १५ च्या संघात आला तर राखीव ओपनर आणि राखीव विकेटकीपर अशी दुहेरी राखीव भूमिका बजावू शकतो.

लाईटचा स्पीड ३लाख प्रती सेकंद असतो जर का अर्जुन तेंडुलकरने ६ लाख प्रती सेकंद स्पीडने बॉल टाकला तर समोरच्याला तो बॉल 1 सेकंद लेट दिसणार आणि सटासट दांडके उडणार. पेटंट घेऊ का या आयडियावर कोणाला समजायच्या आत.

पण जयस्वालची वनडे जागा फिक्स नाहीये. तो राखीव ओपनरच आहे. >> मला वाटते राखीव ओपनर ह्याचा अर्थ तो फिक्स्ड धरला जावा. " संजू १५ च्या संघात आला तर राखीव ओपनर आणि राखीव विकेटकीपर अशी दुहेरी राखीव भूमिका बजावू शकतो" ह्याला अनुमोदन पण पंत पण तिथे येऊ शकतो (परत तो डावखुरा आहे ज्याची उणीव पेन्ड संघामधे आहे) हे लक्षात घेऊया.

राखीव ओपनर ह्याचा अर्थ तो फिक्स्ड धरला जावा.
>>>>
हे काही नाही पटले. कारण आपल्याकडे कित्येक राखीव खेळाडू पदार्पण न करता देखील बाहेर पडले आहेत.
उपलब्ध पर्यायात तो राखीव म्हणून पुढे होता इतकेच. नवीन तगडा पर्याय पुढे आला तर पहिली कुऱ्हाड राखीव वरच पडणार. अर्थात त्याला लगेच बाहेरचा रस्ता दाखवतील असे नाही. पण येत्या वर्षभरात कोणाला किती संधी मिळते आणि कोण किती तिचे सोने करतो यावर अवलंबून आहे.

पण संजूला चान्स मिळेलच. ट्वेंटीमध्ये वर्ल्डकप खेळला आहे. चमकला आहे. जर इनिंग बिल्ड करायची क्वालिटी दाखवू शकला, जी सध्या ट्वेंटी मध्येही दाखवत आहे, तर निव्वळ फलंदाज म्हणूनही यशस्वीला टक्कर देऊ शकतो.

पंत म्हणाल तर एवढे वर्षात तो व्हाईट बॉल फॉरमॅटमध्ये नेमके कसे खेळायचे हेच शोधत आहे. आगामी वनडे सिरीजसाठी संघ निवडला जाईल त्यात पंत पंधरा बाहेर जात संजूला चाचपणे सुरू होईल असे मला वाटत आहे.

असो. तरी २०२७ वर्ल्डकपला अजून वेळ आहे. तूर्तास इतके सारे फॉर्ममधील पर्याय असणे चांगली गोष्ट आहे. तरी रोको फॉर्म मध्ये राहावेत हिच इच्छा.. गेले दोन वर्ल्डकप ते जसे खेळले आहेत ते पाहता दोघांचा मोठ्या स्पर्धांचा अनुभव आणि या स्टेजवर परफॉर्म करायची क्षमता मोलाची आहे.

हे काही नाही पटले. >> तुला पटावे असा अजिबात आग्रह नाहिये रे. जैस्वालने खटकण्यासारखे काहीहि केलेले नाहिये. लेफ्ट-राईट कॉम्बो बाबत गंभीर प्रचंड आग्रही आहे. एकंदर ज्या कंसिस्टंटली आगरकर नि गंभीर संघ निवडतात ते बघता संधी दिल्याशिवाय संजूसाठी जैस्वालला बाहेरचा रस्ता दाखवतील असे वाटत नाही. टी २० नि वन डे ह्या टीम्स मधे बहुतांशी वेगळे खेळाडू असण्यावर भर दिला गेला आहे असे मला जाणवते.

<<<<< एकंदर ज्या कंसिस्टंटली आगरकर नि गंभीर संघ निवडतात ते बघता संधी दिल्याशिवाय संजूसाठी जैस्वालला बाहेरचा रस्ता दाखवतील असे वाटत नाही.
>>>>>

हे ऐकून अभिमन्यू ईश्वरन एका कोपऱ्यात रडत असेल आणि दुसऱ्या कोपऱ्यात साई सुदर्शन हसत असेल Happy

असो, तरीही यशस्वीला संधी न देता काढतील असे मी म्हटले नव्हते. वर्ल्डकप दूर आहे अजून. संजूला त्याच्या वाटणीची संधी मिळायची शक्यता आहे इतकेच.

तसेच ट्वेंटीचा आणि वनडेचा संघ शंभर टक्के वेगळा ठेवतात असेही काही नाहीये. पांड्या बूमराह दोन्हीकडे आहेतच. शुभमन गिल याला सुद्धा ट्वेंटी मध्ये घेतलेच नव्हते तर थेट उपकर्णधार केले होते. त्याचा फॉर्म नेमका तेव्हाच खूप घसरला म्हणून आयत्यावेळी बाहेर गेला. तेव्हाही ईशान किशन डोमेस्टिक फॉर्म बघून थेट आत आला होता आणि संजूच्याही आधी खेळला होता.

तसेच ट्वेंटीचा आणि वनडेचा संघ शंभर टक्के वेगळा ठेवतात असेही काही नाहीये. >> कळीचा शब्द 'बहुतांशी' हा आहे. मुद्दा फॉर्म चा नाही तर यशस्वीला संजूसाठी बाहेर बसवण्याचा आहे.

हे ऐकून अभिमन्यू ईश्वरन एका कोपऱ्यात रडत असेल >> असेल ? त्याच्या वडलांनी आधी मुलाखतही दिली होती कि ह्याबद्दल.

Pages