दुःखद घटना २

Submitted by उपाशी बोका on 30 July, 2024 - 11:48

आधीच्या धाग्यात २००० च्या वर प्रतिसाद झाल्याने नवीन धागा काढत आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो ना. खूपच वाईट वाटले त्या मुलासाठी.
त्याला सांगणारं, समजावणार कुणीच नसेल का?
असे कसे लोक भावनाशून्य झाले आहेत?

नसरापुरला घडलेली वाईट घटना ज्या मुलिच्या बाबतीत घडली ती माझ्या घराच्या जवळपास रहाते. तिचा मृतदेह अंतिम संस्कारासाठी आणला तेव्हा नागरिकांनी ४-५ तास नवले ब्रिज (मुंबई - बेंगलोर हायवे) जॅम केला होता. आरोपिला शासन करून न्याय दिल्याशिवाय तिचे अंत्यसंस्कार करणार नाही म्हणून. पण काय झालं काय आश्वासन दिलं गेलं समजलं नाही, रात्री उशिरा सगळं पार पड्लं.

दक्षिणा,

हे लिहिण्यासाठी हा धागा नाही याची व्यवस्थित कल्पना आहे. तरीही हेही दिसत असल्याने की यावर एखादा स्वतंत्र धागा निघालेला नाही, प्रशासकांची व वाचकांची माफी मागून येथे लिहीत आहे.

■ सर्वप्रथम म्हणजे विकृतपणाची कोणतीही जात नसते. माध्यमांवर तो गुन्हेगार विशिष्ट समाजाचा आहे असे लिहून जो जातीय गदारोळ चालला आहे तीसुद्धा एक प्रकारची विकृतीच आहे.

■ भावनांची तीव्रता लक्षात घेऊनसुद्धा (हे म्हणवत नाहीये, पण एकूण गर्दी - ज्यात रुग्णवाहिकाही असू शकतात- पाहून म्हणत आहे की) हायवे रोखून धरणे चूक आहे. (यात उगीच मला असंवेदनशील ठरवण्याचा प्रयत्न होऊ शकेल)

■ मुलीच्या वडिलांनी असे म्हणणे की नेत्यांनी आरोपीला फाशी झाल्याशिवाय आमच्या उंबऱ्यात पाऊल टाकू नये हे अगदी योग्य आहे.

■ भडकलेल्या जमावावर लाठीचार्ज करणेही चूक आहे. इतक्या गोष्टी चूक आहेत त्यात हे आणखी एक!

■ आरोपीला 'फार तर फाशी' यापलीकडे काही होणार नाही किंवा कदाचित एन्काऊंटर! हे दुर्दैवी आहे (व या संदर्भात माझा एक धागा आहे).

■ महत्वाचे म्हणजे, आपण सगळे जे गळे काढत आहोत ते दोन दिवसांत हे विसरून जातील.

आपला समाज संपूर्णपणे अनियंत्रित समाज आहे आणि कायद्यांची अंमलबजावणी न होणे / कायद्याची भीतीच न वाटणे हे अतीव लोकशाहीचे लक्षण आहे.

मी हे सगळे येथे लिहिले ते तिथेही लिहू शकलो असतो, पण तू येथे लिहिलेस म्हणून येथे लिहिले.

आता मीच शहाणपणा करून मीच विनंती करत आहे की या विषयावर कृपया येथे लिहू नयेत.

चू भू द्या घ्या

बेफि अगदीच राहवत नाहीये म्हणून एकच मुद्दा लिहिते.
तुमच्या सगळ्या मतांचा आदर आहे आणि मान्य सुद्धा आहे.
दुर्दैवाने आपली न्याय व्यवस्था पूर्वी गुन्ह्याचे रेकॉर्ड असलेल्या व्यक्तीला मोकळे सोडून बसली आहे ज्यामुळे पुन्हा एक निष्पाप जीव गेला हकनाक. जे टाळता आलं असतं. त्यामुळे लोकांचा प्रक्षोभ झाला. अशा घटना इतर देशात होत नाहीत कारण तिथली न्याय व्यवस्था मजबूत आहे. असो मी लोकांचे समर्थन करत नाहीये.

दुर्दैवाने आपली न्याय व्यवस्था पूर्वी गुन्ह्याचे रेकॉर्ड असलेल्या व्यक्तीला मोकळे सोडून बसली आहे ज्यामुळे पुन्हा एक निष्पाप जीव गेला हकनाक. जे टाळता आलं असतं. त्यामुळे लोकांचा प्रक्षोभ झाला.
>>>>> एक्झॅक्टली आणि दुर्दैवाने ही पहिलीच केस नाही की ज्यात कुठलीही पार्श्वभूमी चेक न करता किंवा कुठलीही सायकोमेट्रिक असेसमेंट न करता गुन्हेगारांना समाजात मोकळं सोडलं आहे.

गुन्हेगारांच्या मानवी हक्कांचं रक्षण करता करता कायदा निमूट पाळणाऱ्या सामान्य नागरिकांनाही निर्धोक जगण्याचा मानवी हक्क आहे आणि ती जबाबदारी कायदा सुरक्षा व्यवस्थेची आहे याचा सपशेल विसर पडला आहे का काय अशी परिस्थिती आहे.

किंबहुना गुन्हेगार आणि सामान्य नागरिकांचे मानवी हक्क याच्यात तुलना होऊन जेव्हा गुन्हेगारांचे हक्क वरचढ ठरायला लागतात तेव्हा लोक कायदा हातात घ्यायला समर्थन देतात.

इतर देशात काही गुन्ह्यात जन्मठेपेचा काळ ५० ते ५०० वर्ष असा कितीही असू शकतो आणि माणसाच्या गुन्ह्यावरून ठरते की त्याला आयुष्यात पॅरोल मिळेल की नाही, पॅरोलवरच्या माणसाला टॅग लावून फिरावे लागते सेक्स ऑफेंडर्सच्या लिस्ट जाहीर होतात. आपल्याइथे २० वर्षाची जन्मठेप सुद्धा कमी करतात आणि बाकी गोष्टींचा तर पत्ताच नाही.

सेक्स ऑफेन्डर्स्ची लिस्ट इतकी मोठी होइल ना .... खरोखर!!! चीड येते मला या घाणेरड्या विकृत समाज घटकांची. घाणेरड्या नाल्यासारखे हे लोक दुर्गंधी असतात. घाण करुन ठेवतात.

मन सुन्न करणारी घटना... Sad ही मानसिक विकृती फार पूर्वीपासून समाजात आहे तरी या लोकांना पॅरोलवर का सोडले जाते कळत नाही.

३.५ वर्षांची मुलगी पण सुरक्षित नाही आहे. Sad
नरसापूरची घटना किळसवाणी आणि चिड आणणारी आहे... Angry

नसरापुर घटना खरंच चीड आणणारी. तो पुर्वी रेप साठीच पेरोल वर सुटला होता म्हणे, त्याला पकडले की नाही? पुढचं काहीही कळलं नाही Sad
भडकलेल्या जमावावर लाठीचार्ज >>>> हे तर कहर होतं खरंच. नेते लोक कायम दुसरी अजून मसालेदार बातमी कॅप्चर करून लक्ष विचलीत करतात..

त्याची बायको ठेचा मारा म्हणतेय आता, तिनेच पूर्वी सोडवून आणलेले त्याला असं वाचलं.

बीड, पुणे वगैरेत आणि अजून कुठे कुठे दोन तीन दिवसांत मुलींसोबत वाईट घटना घडल्यात, असं वाचलं.

Pages