Submitted by ऋन्मेऽऽष on 13 May, 2025 - 13:06
आपल्या मराठी चित्रपटांवर चर्चा करायला हा मराठमोळा धागा
आधीचा धागा इथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/74623
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एक डाव धोबीपछाड >>> हा
एक डाव धोबीपछाड >>> हा कुठल्याच OTT वर नाहीये ना?
वर लिहिला आहे की नाही लक्षात
वर लिहिला आहे की नाही लक्षात नाही पण
"यंदा कर्तव्य आहे" ही छान आहे. ( स्मिता शेवाळे आणि अंकुश चौधरी)
तसेच "जीवन संध्या" अशोक सराफ किशोरी शहाणे
दोन्ही छान आहेत.
एक डाव धोबीपछाड >>> हा
एक डाव धोबीपछाड >>> हा कुठल्याच OTT वर नाहीये ना?>>
यू ट्यूब वर आहे. मी परवाच पाहून हसण्याचा रिचार्ज मारून घेतला.
घो मला असला हवा २००९
घो मला असला हवा २००९
लपन्डाव १९९३ अबोलि १९९५
लपन्डाव १९९३
अबोलि १९९५
संप्रति, धोबीपछाडची लिंक द्या
संप्रति, धोबीपछाडची लिंक द्या ना जरा. मागे एकदा कुणीतरी इथेच लिंक दिली होती पण ते छोटे छोटे व्हिडिओज होते.
अशा पद्धतीने सगळ्याच प्रकारचे
अशा पद्धतीने सगळ्याच प्रकारचे मराठी सिनेमे या यादित गर्दि करू लागलेले आहेत.
@ वावे, लिंक:https://m
@ वावे, लिंक:
https://m.youtube.com/watch?v=e7ZSmRMptDs&pp=ygUUZWsgZGFhdiBkaG9iaSBwYWN...
रेगे २०१३
रेगे २०१३
दोघी
दोघी
आम्ही दोघी आलेत का लिस्टमधे?
कदाचित पाहिला होता मी, अश्विनी ने छान काम केलय.
'नितळ' - अंगावरील कोडावरती एक
'नितळ' - अंगावरील कोडावरती एक छान चित्रपट आहे.
-----------
काल 'फुलवंती' परत पाचव्यांदा पाहीला. काय सुंदर सिनेमा आहे. ओटीटी वर आहे का माहीत नाही माझ्याकडे विकत घेतलेला आहे.
प्राजक्ताचे डोळे फार कोमल सुंदर आहेत. गश्मीरबद्दल तर काय बोलावे. गश्मीरची पत्नी झालेल्या त्या अभिनेत्रीनेही छान काम केलेले आहे. आणि हो नाना फडणविस शोभले आहेत. वेशभूषा, डिमिनर.
थँक्यू संप्रति!
थँक्यू संप्रति!
तुमच्या यादीतला 'कैरी' कुठं
तुमच्या यादीतला 'कैरी' कुठं बघायला मिळाला तुम्हाला? मी मागे बराच शोधलेला. >>>>> संप्रति, खूप आधी पाहिला होता CD आणून.
मी ही शोधला, पण नाही सापडला.
नवीन, वेगळाच कैरी चित्रपट दिसतोय आता.
मी पांघरूण सिनेमाबद्दल खूप
मी पांघरूण सिनेमाबद्दल खूप ऐकलं आहे. आणि मला तो बघायचा आहे, पण कुठेच उपलब्ध नाही. कोणी काही मार्ग सुचवू शकेल का?
इथे कुणीतरी चांगले
इथे कुणीतरी चांगले लिहिल्यामुळे मी सासू बाई सुनबाई हा सिनेमा पाहायला घेतला ..त्यात प्रार्थना बेहरे आणि निर्मिती सावंत चे चेहरे अजिबात बघवत न्हवते . मी फास्ट पळवत पळवत पहिला ...निर्मिती सावंत चा बहुतेक विग आहे पण त्यामुळे ती काही तरी विचित्र दिसते (येथे कंट्रोल करतेय ) शेवटच्या डान्स स्टेप पण कायच्या काय आहेत .
नशीब थिएटर मध्ये नाही बघितला ...तसाही बघितलाच नसता ....
सुपरडुपर पाहिला का कोणी इथे?
सुपरडुपर पाहिला का कोणी इथे?
सुपरडुपर - हलका फुलका आहे.
सुपरडुपर - हलका फुलका आहे. शेवट predictable आहे.
आम्ही दोघी वेडींगचा शिनेमा
आम्ही दोघी
वेडींगचा शिनेमा
मी पांघरूण सिनेमाबद्दल खूप
मी पांघरूण सिनेमाबद्दल खूप ऐकलं आहे. आणि मला तो बघायचा आहे, पण कुठेच उपलब्ध नाही. कोणी काही मार्ग सुचवू शकेल का?>>> मला पण हा सिनेमा बघायचा आहे. प्लिज कोनि लिन्क देवू शकेल का?
Here is a totally subjective
Here is a totally subjective list of 50 Marathi Films.
https://www.instagram.com/p/DWg4dRlAQ-w/?utm_source=ig_web_copy_link&igs...
अगदी टॅकी करून पाहिलं नाही , पण या पन्नासातले काही इथल्या यादीत आले नाहीत आणि यायला हवेत असे वाटले.
वेळ काढून , ती नावं शोधून लिहितो.
दहावी फ
दहावी फ
बायको...पण कुणाची? हा पिक्चर
बायको...पण कुणाची? हा पिक्चर बघतोय. तुम्ही पण बघा. आवडेल.
रमेश देवचा पोरगा आहे. सुधीर दळवीचा पोरगा आहे. साई ताम्हणकर हिरॉईन आहे.
https://www.youtube.com/watch?v=Ze_q_XYwhQI
परवा टिव्हीवर प्रवाह पिक्चर
परवा टिव्हीवर प्रवाह पिक्चर वर हाफ टिकीट पाहिला.
अतिशय सुंदर पिक्चर आहे. चित्रपटात काहीही सुंदर नाही तरीही. झोपडपट्टीतील दोन गरीब मुलांना पिझ्झा खावा वाटतो त्यासाठी काय काय करावे लागते याची गोष्ट. इतके गोड गोड क्षण आहेत आणि एवढी दैना आहे, ते सगळं खरं वाटतं. दोन लहान मुलांनी जबरदस्त अभिनय केला आहे.
ती खरंच झोपडपट्टीतली, शाळा सोडून दिलेली, कचरा उचलणारी वगैरे वाटतात. छोट्याशा भूमिकेत भाऊ कदम आहे, जो रेल्वे ट्रॅक बदलणारे लोक असतात ( काय म्हणतात त्यांना) तो आहे. तिथला कोळसा ही मुलं उचलून तीन रूपये किलोंनी विकतात व पिझ्झाचे तीनशे रुपये गोळा करतात. बाप यांचा जेलमध्ये, आई वकीलाकडे हेलपाटे घालून परेशान. आज्जी घरीच भाकरीवर भाज्या घालून भाजून देते तर हे फेकून देतात. यांना पिझ्झाच हवा.
एकदा तर पप्पा नको, पिझ्झाच हवा म्हणतात. आपापल्या आयुष्यात छोटे छोटे आनंद शोधलेले आहेत. यांचा एक मध्यमवर्गीय मित्र आहे, त्याला सोसायटीच्या बाहेरून बोलावं लागतं. तो डब्यात एकदा पिझ्झा घेऊन येतो पण उष्टा. लगेच मोठ्या मुलाचा स्वाभिमान आडवा येतो व ते खूप मोह होत असूनही खात नाहीत. चांगले कपडे घालून गेलो तर पिझ्झा वाला पिझ्झा देईल वाटून मॉललाही जातात. त्यासाठी चोरी करायला बघतात पण पटत नाही म्हणून विचार बदलतात. पैसे गोळा करून पिझ्झा घ्यायला जातात तर कपडे बघून मालक कानाखाली देतो. पैसे असूनही. हा व्हिडिओ ब्लॅकमेल करण्यासाठी - आपल्या समाजातील मुलांवर शोषण, ॲट्रॉसिटी ॲक्ट वगैरे लावून नेते वापर करतात. मुलांचं आणि आईचं तसं काहीच नसतं पण विषय कुठल्या कुठे जातो.
नाल्याकाठी राहाणारी भीम नगर नावाची झोपडपट्टी. मुलांची नावे मोठं कावळ्याचं अंडं आणि छोटं कावळ्याचं अंडं. इतकी अदृश्य जनता. तेथेही हित जपणारी आणि फायदा बघणारी लोक आहेतच. काही काही सुंदर नाही, पण गोष्ट फार आवडली. सर्वांची कामं उत्तम आहेत. कुठे मिळाला तर जरूर बघा.
ट्रेलर पाहा.
https://youtu.be/HdM6lms8Pn8?si=GC9ssM4M68afpB6X
इंटरेस्टिंग दिसतोय. बघायला
इंटरेस्टिंग दिसतोय. बघायला हवा. होपफुली शेवट चांगला असेल.
रेल्वे ट्रॅक बदलणारे लोक असतात ( काय म्हणतात त्यांना) >>> पॉईण्ट्समन. मोठ्या लीव्हरने ट्रॅक बदलणारे.
थॅंक्यू, तोच रोल आहे भाऊ
थॅंक्यू, तोच रोल आहे भाऊ कदमचा.
शेवट संमिश्र आहे. चांगलाच म्हणेन तरीही, कारण आधीच्या कथानकाशी सुसूत्रता धरून आहे. अतिशय सुंदर आणि निरागस चित्रपट आहे, खरंच वाटतं सगळं. अधूनमधून बालसुलभ गमतीही आहेत. सतत गंभीर नाही. पिझ्झा साठी पैसे गोळा करताना काय काय होतं हे पाहताना मजाही येते आणि द्या या मुलांना पिझ्झा एकदाच, आहेच काय किंमत त्याची असं वाटत राहतं. पण ते आपल्यासाठी , त्यांच्यासाठी फार मोठी गोष्ट आहे ती. कारण त्यांच्या जगात ह्याची स्वप्नं पण बघता येत नाहीत.
छान वाटतोय! बघतो.
छान वाटतोय! बघतो.
उत्तम ओळख अस्मिता. मिळाला तर
उत्तम ओळख अस्मिता. मिळाला तर बघेन.
बायको...पण कुणाची? या
बायको...पण कुणाची? या पिक्चरचं अजून एक नाव आहे शशी देवधर.
हाय फाय पिक्चर आहे. एकदम भारी. सायकिअॅट्रिस्ट , सायकॉलॉजी.
सस्पेन्स शेवटपर्यंत समजत नाही. म्हणजे हिरॉईनला अजिंक्य देवच्या गाडीची धडक बसल्यावर ती हॉस्पिटलमधे नाव सांगते शशी देवधर. घराचं नाव सांगते. पण तिथं फर्नांडीस बाई राहत असते. तिच्याकडं साहा वर्षांपूर्वी घर विकत घेतल्याची कागदपत्रं असतात.
अजिंक्य देव मधेच लटकतो. कारण पोलीस त्यालाच सगळीकडं पळवत असतात. तो बिचारीला घरी घेऊन जातो आणि पेपर मधे सापडली आहे अशी जाहीरात देतो. म्हणून पोलीस चौकीत एक जण येतो. तो तिचा नवरा आहे असं सांगतो. पण त्याचं आडनाव ठाकूर असतो आणि बायकोचं नाव तो मीनल सांगतो.
पण शशी देवधर म्हणते कि ती या माणसाला ओळखत नाही. म्हणून मग रमेश देव तिला स्वतःच्या क्लिनिक मधे नेतो. त्तिथे कळतं कि तो डॉक्टर आहे. मनाचा डॉक्टर.
मग तो पोलिसांना घेऊन येतो. तिथे तिचा नवरा ठाकूर त्याच्या वडलांना घेऊन येतो. ते त्यांची स्टोरी सांगतात कि तिला मूल होत नाही म्हणून तिच्या मनाने दोष आपल्याकडे घेतला. मग ती निघून गेली.
ते सांगतात कि तिच्या वडलांकडे जाऊ. त्यांचे नाव किशोर पेडणेकर. ते सांगतात कि हा माझा जावई आहे आणि ही माझी मुलगी मीनल पेडणेकर आहे. ती वडलांना ओळखते.
पोलीस म्हणतात कि नवरा बायकोला घेऊन जाऊ शकतो. पण इथे देव आनंद ऑब्जेक्षण घेतो. कि ती जोपर्यंत म्हणत नाही कि हा नवरा आहे तोपर्यंत नाही.
मग तो एक इंजेक्शन देतो. तिला हिप्नोटाईज करतो आणि तिच्या मनात प्रवेश करतो. मग खरी स्टोरी कळते.
स्प्लिट पर्सनॅलिटीचा आजार असतो तिला. हे असंलं एकदम हाय फाय आहे. असे पण पिक्चर्स असतात. असा विषय पहिल्यांदाच दाखवलाय.
मीनल लहान असतानाचा रोल कुणी केलाय ती पण भारी आहे. हिरॉइन झालेली जरा जड आहे. चेहरा हलत नाही. अजिंक्य देव कसला देखणा आहे. देव आनंदची आठवण झाली खूप वेळा.
पूर्वार्ध ख.सा.ना.सू.टाईप आहे
पूर्वार्ध ख.सा.ना.सू.टाईप आहे (९०ज मधला, दया डोंगरे, अर्चना जोगळेकर, नितीश भारद्वाज, 'आधी शिरा, आधी ऑम्लेट' बालीश भांडण) - अर्चना जोगळेकर नाही, वर्षा उसगावकर आणि चंदू पारखी खलनायक
Pages