मराठी चित्रपट कसा वाटला - २

Submitted by ऋन्मेऽऽष on 13 May, 2025 - 13:06

आपल्या मराठी चित्रपटांवर चर्चा करायला हा मराठमोळा धागा

आधीचा धागा इथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/74623

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आधीच रामदास बदनाम आहे. म्हणजे बोहल्यावरून पळून गेला म्हणून नाही. तर शिवबाचा न-गुरु असल्याबद्दल. तिकडे तर विचारूच >>>>>

रामदासकृत मनाच्या श्लोकांचा आणि बोहले/न-गुरु यांचा काहीच संबंध नाही. आपल्याला मनाच्या श्लोकांत जे सांगितलेय त्याचे थोडेफार पालन करता आले तरी आयुष्य शांततेत जाईल.

मनाचे श्लोक चित्रपटाबद्दल जे सुरु आहे ते पब्लिसिटी स्टंट जास्त वाटतेय.

कलाकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल उरस्फोडीने लिहिणारे स्वतःच्या सोशल मिडिया पानावर इतर जिवंत, त्यांच्या अवतीभवती वावरणार्‍या पण वेगळी मते बाळगणार्‍या लोकांवर जी आगपाखड करत असतात ती बघुन गंमत वाटते.

मला अ स्वा ची खरेच चाड असेल तर मी कोणाच्या कुठल्याही कृत्यावर आक्षेप घेता कामा नये हेमावैम. त्याचे ते अ स्वा आहे. अ स्वा चा आनंद फक्त कलाकारांनीच घ्यावा आणि त्याचा रसास्वाद घेणार्‍या रसिकांनी स्वतःची अभिव्यक्ती फक्त टाळ्या वाजवुनच व्यक्त करावी ही कसली लोकशाही????? Happy Happy धुमधडाका दोन्ही बाजुने व्हावा. Happy Happy लोकशाहीत पॉप्कॉर्न भरपुर खपले पाहिजेत.

इथले सर्वांचे (मनाचे श्लोक) प्रतिसाद नवीन धाग्यावर हलवले आहेत

@ साधना,
आपण देखील आपला प्रतिसाद त्या स्वतंत्र धाग्यावर हलवला तर इथे अवांतर चर्चा टाळता येईल.

ऋन्मेऽऽष
माझं पोस्ट फक्त मनाचे श्लोक ला उद्देशून नव्हती.
त्या वादात पडण्याइतका वेळ, शक्ती आणि इच्छा काहीच नाहीये.

मुद्दाम वेगळ्या धाग्यावर प्रतिसाद देण्याइतका हा चित्रपट आणि हा विषय दोन्ही माझ्यासाठी महत्वाचे नाहीत. मी अजुन चर्चा करुन फुकटची पब्लिसिटी देणार नाही.

साधना ओके. आणि उत्तम निर्णय!

पण ज्यांना यापुढे चर्चा करायची आहे त्यांनी हा खालील धागा वापरा जेणेकरून इथे अवांतर पोस्ट होणार नाहीत.

मनाचे श्लोक – चित्रपटावरून चालू असलेला वाद
https://www.maayboli.com/node/87331

रामदासस्वामींनी मनाचे श्लोक लिहीले त्याला तीनशेहून अधिक वर्षे झाली. या पिक्चरचे नाव ते दिले म्हणून उद्या मृण्मयी देशपांडेने मनाचे श्लोक लिहीलेत असे कोणी समजणार नाही >>>>
Copyright म्हणजे फक्त त्या author/artist च नाव जोडलं जाणे असे नाही.

a legal right that protects original works of authorship, such as literary, dramatic, musical, and artistic works, once they are fixed in a tangible form. It grants the owner the exclusive right to reproduce, distribute, perform, and display the work. The protection is automatic upon creation.

300 वर्षे जून साहित्य आहे ज्यावेळी copyright कायदे नव्हते किंवा जुन्या साहित्याला ते लागू होत नाहीत पण म्हणून मग ते मनाला येईल तसे कसेही वापरा, कोण विचारतो हा कुठला attitude aahe.

तिजोरीला कुलूप नाहीये तर मारा डल्ला असलाच प्रकार तो. ह्यात मग कुठली /कसली मूल्यं!

मृण्मयी देशपांडेने चित्रपट मागे घेतला आहे आणि नाव बदलून पुन्हा १६ ऑक्टोबर पासून रिलीज करायचा निर्णय जाहीर केला आहे.

फारेण्ड, तुमच्या या चित्रपटावरच्या पहिल्या प्रतिसादाशी सहमत.
फक्त शेवटच्या परिच्छेदाबद्दल - अभिव्यक्तीस्वातंत्र्य आता कुठेही अ‍ॅब्सोल्यूट नाही. अगदी अमेरिकेतही.
तसंच एखाद्या गोष्टीबद्दल आक्षेप असेल आणि तो सनदशीर मार्गाने नोंदवणे यात मला वावगे वाटत नाही. उदा : केरला फाइल्स मध्ये ही ३०००० मुलींची गोष्ट आहे असं दाखवल्याबद्दल काही लोक कोर्टात गेले होते. आणि कोर्टाने त्यांचे म्हणणे मान्य केले. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि प्रपोगंडा हे दोन्ही मुद्दे आहेत.

इथे मी लिहिलंय ते दमदाटी करून चित्रपटाचा खेळ बंद पाडणं, स्क्रीन फोडून टाकू अशी धमकी देण्याबद्दल. असं करणार्‍यांवर कोणतीही कायदेशीर कारवाई होईल, असं वाटत नाही.

लोकहो ही चर्चा नवीन धाग्यावर करा..
एकेक पोस्ट करत वाढत जाणार..
हा धागा मराठी चित्रपट कसा वाटला यासाठी राहू द्या

मनाचे श्लोक – चित्रपटावरून चालू असलेला वाद
https://www.maayboli.com/node/87331

वाद बाजूला ठेवला तर..
मराठी चित्रपटांची नावे हे एक कोडंच आहे. निर्मात्यांना प्रेक्षकांना आकर्षित करतील, कथानकाबद्दल उत्सुकता निर्माण होईल अशी नावे का सुचत नाहीत ?
वरणभात, वडापाव, जिलेबी असली नावं असल्यावर कोण जाईल बघायला. मनाचे श्लोक असं नाव वाचून कोण लवस्टोरी आहे असे समजून बघायला जाईल ? वर्ड प्ले करताना निर्माता, दिग्दर्शकाला हे ध्यानात येत नसेल का ? अर्थपूर्णच द्या असं काही नाही. पण घासून गुळगुळीत झालेले शब्द शीर्षक म्हणून का वापरावे ? हिंदीतले शब्द आपल्याला नवे असतात म्हणून काही तरी भारी आहे असं वाटतं. मराठी सिनेमात जी नावे देतात ती बघता खलबत्ता, फुंकणी, किसणी, चाळणी, सांडशी, मोरीतला घडा, देवळीतला करंडा, फणी अशी नावे नक्की येतील. अर्थात असे नाव देऊनही सिनेमा जर भन्नाट असेल आणि ते नाव पाहिल्यानंतर शोभत असेल तर माऊथ पब्लिसिटी होऊ शकते. उदा खिचडी.

मनवा आणि श्लोक यांची प्रेमकथा किंवा धेडगुजरी भाषेत लवस्टोरी नाव दिलं असतं तर प्रेमकथा बघायला जाऊ म्हणुन विचार करत असलेले कॉलेजचे प्रेक्षक गेलेही असते.

फक्त शेवटच्या परिच्छेदाबद्दल - अभिव्यक्तीस्वातंत्र्य आता कुठेही अ‍ॅब्सोल्यूट नाही. अगदी अमेरिकेतही. >>> भरत मी त्याबद्दल म्हणत नाहीये. जे अपवाद "जेनेरिकली" लागू होतात ते माहीत आहेत आणि ते ही सर्वच केसेस मधे समान लागू होतात. मी लिहीले आहे ते असा सपोजेड अपमान कोणाचा झालाय, त्याविरूद्ध कोणता गट उभा आहे यावरून कधी अभिव्यक्तीस्वातंत्र्याबद्दल बोलणारे, तर कधी "अभिव्यक्ती स्वातंत्र्य ठीक आहे पण..." असे म्हणून प्रत्यक्षात त्याला विरोध करणारे - त्यांच्याबद्दल.

ज्यांचे मत सर्व केसेस मधे कन्सिस्टंट आहे त्यांच्याबद्दल हे नाही.

कुर्ला टू वेंगुर्ला

एकही सेलिब्रिटी (हिरो/ हिरोईन ), बिग बजेट, अतिरंजित गोष्ट नसतानाही एखादी सरळ, साधी, सोपी गोष्ट घेऊन सुंदर सिनेमा कसा बनवता येतो याचं उदाहरण म्हणजे कुर्ला टू वेंगुर्ला!

पाहायला गेल तर सोपी गोष्ट, कोकणातल्या / मालवणातल्या गावात राहणाऱ्या मुलांना लग्नासाठी मुळीच मिळत नाहीत, कारण प्रत्येक मुलीच स्वप्न असतं मुंबईला स्थायिक व्हायचं.
मग त्यातून लग्नासाठी खोट बोलण, तुटणारं लग्न वाचवायला त्याचं अखेर बायकोला घेऊन मुंबईला जाणं. मुंबईची हवा चाखल्यावर मग होणार तिचं मतपरिवर्तन.
त्याच्या बहिणीच प्रेम, मित्राने गावातच राहून फॅक्टरी सुरू करून रोजगारनिर्मिती करणं अशी काही उपकथानकही बाजून येत जातात आणि चित्रपटाला अधिक बळकट बनवतात.

मालवणी भाषा, गावातील परिसर, निसर्ग सगळंच छान!
सर्व कलाकारांनी उत्कृष्ट तरी सहज असा अभिनय केलाय. छोटे छोटे बारकावेही छान टिपले आहेत.

मुख्य म्हणजे बघताना जाणवतं की हा चित्रपट फक्त एका गावापुरता किंवा कोकणापुरता नाही.
The grass is greener on the other side hya उक्तीप्रमाणे
गावात असताना वाटतं मुंबईत किती सुखं आहेत,
भारतात राहताना वाटतं परदेशात कित्ती काय काय आहे,
पण तिथे गेल्यावर कळतं की दुरून डोंगर साजिरे.
त्या सुखांकरता/ आनंदाकरता किंमत मोजावी लागते आणि ती.मोजताना मग ते सुख, सुख वाटतं का?

हा चित्रपट सगळ्या बाजूंनी आवडला - विषयाची कास तर सोडत नाही, प्रश्नही मांडतो, उत्तरेही शोधतो आणि मनोरंजनही करतो तेही कुठेही लांबण न लावता.

Pages