मराठी चित्रपट कसा वाटला - २

Submitted by ऋन्मेऽऽष on 13 May, 2025 - 13:06

आपल्या मराठी चित्रपटांवर चर्चा करायला हा मराठमोळा धागा

आधीचा धागा इथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/74623

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा नवीन आहे. नका पाहू. फार वाटले तर जुनाच पुन्हा पहा. त्यातले काही सीन्स अजूनही भिडतात. तूच लिहिले होते कधीतरी राभु. वाचल्याचे आठवत आहे. Happy

अन्जूताई Proud बरं, नाव ठेवेन तुझ्या जावयाला. सासूनीच सांगितले आहे मग कसली भीती !

ॲन्की Proud किती दिवसांनी दर्शन!

Lol

दक्षि Waves app आमच्या tv वर आहे. नवऱ्याला विचारून तुला नीट सांगते. आमच्याकडे एल जी स्मार्ट tv आहे आणि एअरटेल एक्स्ट्रीम बॉक्स आहे. मला माहिती नव्हतं आहे ते. इथे वाचून मी कासव, दिठी बद्दल सांगितलं तर तो म्हणाला आहे हे app आपल्याकडे. आता मला बघता येतील दोन्ही पिक्चर्स.

ॲन्की Proud किती दिवसांनी दर्शन!
>>
बिझलोय जरा
चिकवा चा 200+ पोस्ट चा बॅकलॉग आहे अजून
(सिनेमे बघायला वेळ आहे, बॅकलॉग क्लिअर करायला नाही... इंजिनिअरिंग ची आठवण आली...)

दक्षि आमच्या एल जी स्मार्ट tv मध्ये waves app नाहीये पण एअरटेल एक्स्ट्रीम बॉक्स मध्ये गुगल प्ले स्टोअर आहे आणि त्यात ते app आहे त्यामुळे इन्स्टॉल करता आलं.

https://www.youtube.com/watch?v=W3Pj3zSUERU

बाप्रे ! बालमैत्रीण अशा प्रकारे संसारात टपकली आणि बायको समोर जे नाही ते बोलून मोकळी झाली तर बाका प्रसंग आहे. यासाठी बालमैत्रीणच असू नये. मोहन जोशी होते म्हणून निभावून नेलं. Lol

चित्रपटाच्या धाग्यावर टाकले आणि इथेही लिहिते, कोणाला पाहायचा असेल तर…

आजचा दिवस माझा चित्रपट यु ट्युबवर हल्लीच आला आणि म्हणुन पाहिला. खुप आवडला. संवाद व अभिनय उत्तम आहेत. पि डि व त्याचा मुलगा आणि मुख्यमंत्री व म्हाडा अध्यक्ष हे दोन्ही प्रसंग आवडले. मुम व त्यांची पत्नी यांचे संबंध व पत्नी नवर्‍याला घरच्यांसमोर कसे सांभाळुन घेते हेही छान दाखवलेय.

स्वतःच्या मस्तीत राहुन दुसर्‍याचा मुद्दाम अपमान केला आणि चुक झाली हे कळल्यावर त्याचे परिमार्जन करण्यासाठी हातातली सत्ता राबवली हाच एवढाच विषय आहे. बाकी चित्रपटात राजकीय काही नाही. सचिन खेडेकर व मांजरेकरने उत्कृष्ट काम केलेय.

आपल्या हातातली सत्ता वापरुन आपण खुपच चांगले काम केले म्हणुन स्वतःबद्दल कृतकॄत्य वाटणार्‍या मुख्यमंत्र्याला स्वतःसमोर उभा असलेला वंचितांचा डोंगर दिसल्यावर तो परत जमिनीवर येतो. शेवट छान केलाय. दोन्ही गाणी छान आहेत. पहिले गाणे बहुतेक चंद्रकांत लिमयांनी गायले आहे. चित्रपटात पार्श्वसंगीतकार व संगीतकार दोघांनाही वेगवेगळे ठळक श्रेय दिलेय पण गायकांना दिलेले नाही.

मुख्यमंत्री विलासराव देशमुखांवर बेतलाय. खरी घटना आहे असे कमेंटमध्ये वाचले, खखोदेजा.

प्राईम वर मी बघण्याचा प्रयत्न केला होता, पण अश्विनी भावेला उगिचच खेडवळ टोन मध्ये बोलताना ऐकु शकले नाही.
मराठी सिनेमे थोडे नेटानेच बघावे लागतात. बघेन उरलेला लवकरच.

कुठे लिहू ते कळत नव्हते म्हणून इथेच लिहितो.
"क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम" सिनेमा पाहिला.
खूप म्हणजे खूपच आवडला. नक्की बघा. आता झी 5 वर आला आहे

त्यात खटकलेली एक गोष्ट...
त्यात विशाल आणि राकेश जेव्हा शाळेच्या बाहेर पॅटीसच्या टपरी बद्दल आठवणी सांगतात तेव्हा विशाल म्हणतो "इथे एक म्हातारी आजी बोरं विकायची. आठवतंय?" त्यावर राकेश म्हणतो "अरे बोरं नाही चण्यामण्या बोरं म्हण......काय सुटलं ना टाळूला पाणी?"
त्याला टाळ्याला म्हणायचं असावं. पण टाळ्याला पाणी सुटतं का?
तोंडाला, जिभेला पाणी सुटणं ठीक आहे. टाळूला?

उत्तर आणि क्रांतिज्योती बरेच दिवस दिसत होते , पण पैसे मागत होते. आज होताहेत ओपन.

अगं अगं सूनबाई. काय म्हणता सासूबाई
स्क्रोल करताना हे नाव दिसलं कि आई, बायको लगेच थांबायला सांगतात. काय आहे बघू ना..
सासू, सून, नणंद, भावजय हे नावात दिसलं कि बायका मॅग्नेट सारख्या खेचल्या जातात. पुढचा जन्म बाईचा घेतल्याशिवाय समजायचं नाही एव्हढं काय आकर्षण असतं ते.

प्रेमाची गोष्ट - २

मेरी - खव्याचा गोळा
प्रिया - ज्यु. सो. कु.ची पुढची जनरेशन वाटावी अशी (अ‍ॅक्टिंग स्किल्स बेताची, पण सो कॉल्ड स्टाइलच्या जीवावर वेळ मारून नेणारी)

पण ललित प्रभाकर - आय कॅन्डी. त्याचा स्क्रीन प्रेझेन्स कायमच आवडतो. अ‍ॅक्शन-रिअ‍ॅक्शन्स सुद्धा परफेक्ट असतात त्याच्या.
त्यामुळे सिनेमा एकूण आवडला. एकदा बघण्यासारखा आहे.
लांबी जरा कमी हवी होती.

सेकन्ड चान्स मिळाल्यावरचा त्याचा आनंद व्यक्त करण्याचा सीन आवडला.

सेकन्ड चान्सनंतरचा सिनेमा अधिक इन्टेन्स वाटला.

तिघी पाहिला आयपीटीव्हीवर. सुंदर सिनेमा आहे. नॉर्मली मला खूप इमोशनल करणारे आवडत नाहीत. पण प्रॅक्टीकल अ‍ॅप्रोच सुद्धा आल्याने रिलेटेबल वाटला. भारती आचरेकर रॉक्स!!

मी विचारणार होते , तिघी बघितला का ?
काही अमराठी लोकानी अजिबात चुकवू नका साण्गितल्याच्या रील्स होत्या .
ईमोशनल सिनेमे मला झेपत नाहीत . बघू की नको विचार करतेय

मला तर उत्तर सिनेमा झेपलाच नाही. नेमकं त्यांना काय सांगायचं आहे त्यातून?
कोणितरी विस्कटून सांगा.

सगळे जग "धुरंधर" पाहून त्यावर बोलत असताना तुम्ही "अगं अगं सूनबाई, काय म्हणता सासूबाई" पाहिला आहे हे सांगणे नामुष्कीच. पण गप बसणं त्याहून मोठी नामुष्की. धुरंधर पहायचा नेक इरादा असल्याने तिकडे स्पॉयलर्स टाळत वाचण्याचे खिप्परपाणी तरी किती वेळ खेळणार. सगळ्यांना वाटायचे तुम्हाला मत राहिले नाही, तुम्ही पूर्वी सारखे धटिंगण आणि भांडकुदळ नाही म्हणजे तुमच्यात दम नाही. Lol

अगं अगं व्हॉटेव्हर फक्त अर्धा तास पाहिला पण धुरंधर नाही पाहिला म्हणून हे लिहीत आहे. तर बायकी आणि क्रिंज नाव आहे पण म्हणताना "महिलाप्रधान" वगैरे शब्द वापरतात. मग मला मनात "मीही महिलाच आहे हो" - असा प्रतिध्वनी उमटतो. भयंकर बोअर झाला. निर्मिती सावंत आणि प्रार्थना बेहेरे दोघी सासूसुना आहेत. त्या इतक्या बोअर कारणाहून भांडत असतात, की त्या भांडकुदळ कमी ढ जास्त वाटल्या.

खरंतर माझ्या सारखीने या नावाचा पिक्चर बघायला जाऊच नये. पण वरून लेबल लावून नये, संधी द्यावी वगैरे उच्च विचार आले आणि मुळात विचार उच्च नसल्याने बुडबुड्यागत विरून सत्यवादी शकुनी बाहेर पडला. अजिबात बघू नका. इमोशनल वगैरे होण्याच्या, बायाबापड्या रडण्याच्या रीळा मलाही आल्या होत्या. पण मी बापडी नाही!

या दोघी ज्या कारणामुळे भांडत होत्या ---
बायकोच्या साडीच्या निऱ्या करतो पण आईच्या नाही.
उपवासाच्या दिवशी साबुदाणा न भिजवल्याने कांदे पोहे.
सासूने पै पै जमवून आणलेली भांडी जपलेला आहेरातला पिंप सुनेने पसारा म्हणून टाकून देणे.
पर्यावरणाचा विचार म्हणून पुन्हा काचेची भांडी - खर्च - मी माझी कमावती आहे. यावरून एक रडारड. तुळशीला पिरियड मधे हात लावल्याने ती कोमेजून गेली म्हणून सासूने वर्क फ्रॉम होम मधे भर मिटींग मधे सुनेला ओढत नेणं. भांडणं! मग ती म्हणणार - मी आज बारश्याला येणार नाही.

हे झाल्यावर ते बारश्याला गेले सुनेची आई बाथरूममध्ये घसरून पडली अशी थाप मारली आणि मी बंद केला. नंतर हेवी फिलॉसॉफीकल पॉडकास्ट पाहिला, मग तेही बंद करून कशातच काही अर्थ नाही हे लक्षात आल्याने "कैं दी पों, हुस्न है सुहाना, मेरे प्यार का रस जरा चखना" वगैरे पाहून झोपी गेले.

प्रार्थना बेहेरे फुकटातही बघवत नाही. मराठी पिक्चर बघणं मला रिस्की वाटतं फार. (बरेचसे हिंदीही त्याच गटात मोडतात खरंतर). पण ह्या सारखा चित्रपट आजवर तयार झालेलाच नाहीच्या थाटात जे प्रमोशन चालतं त्याचं मला कौतुक वाटतं.

अगं अगं व्हॉटेव्हर >>>
मुळात विचार उच्च नसल्याने बुडबुड्यागत विरून सत्यवादी शकुनी बाहेर पडला >>> Lol

नामुष्की लॉजिक Lol सुनेची आई कोठे आली मधेच?

धमाल लिहीले आहेस. आला का ओटीटीवर?

तिच्या वरून थाप मारली आहे. सून भांडणामुळे रागावून बारश्याला गेली नाही आणि तेथे बारश्याला का नाही आली असं कुणी विचारलं तर - तिची आई बाथरूममध्ये घसरून पडली हे कारण. सगळ्यांना यांचं जमत नाही हेही माहीत असतं. तुला खरंच जाणून घ्यायचं होतं का हे Lol मी पण काहीही लिहीत बसलेय. यात सून काहीतरी बरीटो का काही करते पण सासू व्हाट्सॲप वरील काकवांप्रमाणे वरणभात खाते. नवऱ्यालाही खायला लावते. कारण युद्ध होतं ना हे! आपल्याकडचं सैन्य तिकडे जाऊ द्यायचं नव्हतं.

Lol
घरगुती बरिटो पेक्षा वरणभात परवडला. तो बरिटो आवडला नाही तर त्यात चव सुधारायला दाण्याची चटणी किंवा कांदा लसूण मसाला घालतील आणि ते जोक वाढवतील. बरिटो नको, जोक आवर व्हायचं. त्यापेक्षा पिठलं भात मिळेल का? Wink मला मेक्सिकन खाण्याचा आणि मुख्य म्हणजे पिण्याचा ओव्हर्डोस झालेला आहे. अशाही प्रार्थना बेहेरे आणि निर्मिती सावंत दोन पार्ट्या असतील तर मी कधीही निसा पार्टीतच.

बाकी ते पिरियड मध्ये तुळस कोमेजली हे खरंच २०२६ मधल्या चित्रपटात आहे???? मरो! मी यावेळी अस्मिताचा सल्ला शिरोधार्य मानून नाही बघणार. Lol

'उत्तर ' मला खूप आवडलेला. रेणुका आणि अभिनय बेर्डे दोघांनी छान काम केलेलं. कथा पटकथा संवाद सगळं नवं मॉडर्न कालसुसंगत होतं. काही ठिकाणी बाळबोध झालेला किंवा आणि त्रुटीही होत्या पण मराठीत असे सिनेमे बनणार असतील तर मी तेवढं चालवून घेईन.

उत्तर मीही पाहिला आणि मलाही आवडला. त्याबद्दल लिहायचे राहूनच गेले. पोस्टला अनुमोदन. रेणुका शहाणेचे काम खूप आवडले. अभिनयचेही चांगले आहे.

Lol पिठलं भात वगैरे साठी संपूर्ण पिक्चर पाहा. त्यात एवढा मोठा झालास आईला घाबरत अजूनही चोरून दारू पितोस वगैरे सूनेचे ताशेरे आहेत. सासरा रांगोळी काढताना दाखवला आहे, तेवढं आवडलं. निर्मिती सावंत - गिझरच्या गरम पाण्याला ती मजा नाही, तसं शेकून निघत नाही. मी गॅस वरच आंघोळीसाठी पाणी तापवेन. इत्यादी. अर्ध्या तासात मी जे पाहिले ते हे आहे साधारण.

निर्मिती सावंत आवडते पण ह्यात हेच आहे.

Pages