मराठी चित्रपट कसा वाटला - २

Submitted by ऋन्मेऽऽष on 13 May, 2025 - 13:06

आपल्या मराठी चित्रपटांवर चर्चा करायला हा मराठमोळा धागा

आधीचा धागा इथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/74623

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शेवटच्या परिच्छेदासाठी अगदी. तेवढं लिहिले नाही. फील गुड ताणून फेक केले नाही किंवा वास्तव ताणून भीषण केले नाही. सुवर्णमध्य आहे. खराही वाटतो आणि करमणूकही करतो. असे सगळे आहे. पकड ढिली होत नाही, कंटाळा येत नाही. मलाही सुनेचा मित्र ॲक्सेप्ट करणं अगदी नैसर्गिक झाल्यासारखे वाटलं. अगदी सटली येतो विषय पण नाराजी आणि स्वीकार दोन्ही सहज वाटला. उगाचच अंगावर येणारा वितंडवाद नाही. काही सीन्स मधे त्या रेस्टॉरंटच्या सुंदर वाटलं मुंबई, काही सीन्स मधे बकाल वाटले. तो फरक मुद्दाम अधोरेखित केला असेल. मला मुंबई आवडतं, कनेक्शन नाही तरीही. उदरनिर्वाहासाठी इतक्या जणांना सामावून घेतल्यानंतर जसं दिसेल तसं आहे, झालं. आता आपलं जमलं यावर तर चर्चा अजून कशी ओढणार. आता दुसरा पिक्चर बघू. Proud तोवर ज्यांनी नाही पाहिला त्यांनी पाहून बघा आणि लिहा. Happy

मी "रात्र आरंभ" नाही पाहिला. आता मराठी बाणा जपतोय तर मला सिंहासन दिसला, आपल्या जन्माआधीचा. तो पाहायचा आहे. विसरून गेला आहे. दूरदर्शन वर कधी काळी पाहिला असेल पण अजिबात आठवत नाही. ऐकून आहे म्हणून बघेन.‌

मीही या चित्रपटाविषयी लिहायला आले होते. झी 5 वर बघितला. खूपच छान कामे झाली आहेत सर्वांची. ऋन्मेष, thanks for recommending !
क्रांतिज्योती विद्यालय पण बघितला. ठीक वाटला .

या धाग्याची सुरुवातच त्या चित्रपटाने झालेली आहे. Lol माझा राहिलेला बघायचा.
क्रांतिज्योती विद्यायल पण बघायचा आहे पण सचिन खेडेकर असल्याने आणि मराठी शाळा, उसासे आणि कढ असतील ती काय असं उगाचच वाटल्याने अजुन धीर केलेला नाही.

सचिन खेडेकर मलाही आवडत नाही ते ममांच्या ऑरामुळे का त्याचा त्याचाच ते नक्की माहीत नाही. कृत्रिम आणि स्टिफ ठराविक ममवच सूट होते. थोडे कढ सोस, अगदीच वाईट नाही. काही काही वेळा बाळबोध वाटतो. कढापासून सुटका नाही, प्रवचनापासून सुद्धा.

आपण सगळ्यांना पाहा, पाहा म्हणतोय, पण आपणच राहिलो होतो असे दिसतेय. Lol

हो, क्रांतीज्योती विद्यालय अमेय वाघसाठी तरी बघावा. इतर पिक्चर ओके वाटला तरी त्याचा चांगला परफॉर्मन्स बघायला मिळेल.

या धाग्याची सुरुवात आता थांबायचे नाही ने झाली हे वर वाचले. लगेच परीक्षण सुद्धा लिहिलेले. पण ओटीटीवर आल्यानंतर मी तो धागा दोनचार वेळा वर कसा काढला नाही हे समजत नाही. स्पेशली घरी मुलीला दाखवल्यावर आणि तिला आवडल्यावर तरी त्याची नोंद त्या धाग्यावर करायला हवी होती.. कसे राहिले ते Happy

क्रांतीज्योती मला बोर झाला. एक मोठा तुकडा बघितलाय. उरलेला बघण्याचा मुहूर्त लागला नाही अजून.
काय टी क्षिति जोग Sad arrrrrrr. मला अजिबात आवडत नाही.

बापालाच इतका वाईट डायलॉग टाकलाय सिनेमात.

आज मला आलेल्या हनुमान जयंतीच्या एका शुभेच्छेमध्ये अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान या गाण्याच्या पहिल्या चार ओळी आहेत. हे गाणं मला आवडतं. हनुमाना शी संबंधित कितीतरी ठळक प्रसंग चार चार ओळींत बसवलेत.
गीतकार कोण म्हणून शोधलं तर दादा कोंडके. चित्रपट तुमचं आमचं जमलं.

दादा कोंडकेंच्या चित्रपटांना नाक मुरडायचं , तुच्छ लेखायचं हा टिपिकल ममवपणा झाला. पण त्यांनी त्या काळात सलग सुपरहिट पिक्चर्स दिलेत. सोंगाड्या , एकटा जीव सदाशिव पाहिलेत. स्टोरी इ. काही आठवत नाही. गोविंदाचा जिस देश में गंगा रहता है हा एकटा जीव सदाशिवचा रिमेक ना?
त्यांचे सुरुवातीचे चित्रपट पाहिले पाहिजेत असं वाटतंय. इथे लिहिलं आणि दुसर्‍या कोणीतरी पाहून त्याबद्दल लिहिलं की अनुमोदन देण्यासाठी किंवा वाद घालण्यासाठी तरी पाहेन. Wink

भरत दादांनी हे गाणे बहुतेक व्ही. शांतारामांना challenge म्हणून लिहीले होते. फक्त द्वयर्थी लिहीता हा आरोप खोडून काढण्यासाठी.

भरत
पूर्ण डबल मिनींग चित्रपटापेक्षा त्यांचे आधीचे चित्रपट छानच आहेत.
त्यांच्या चित्रपटात दिसणारं गाव बघायलाही आवडतं मला.
आता तशी।घरं गावात देखील नाहीत.

आता थांबायचं नाही आवडलेला
इथे लिहिलेलं असेल तेव्हा

सचित पाटील आणि मुक्ता बर्वेचा तो हल्लीच आलेला चित्रपट पाहिला.
शेवट कैच्या काय होता. बिल्ड चांगला।केला।होता पण वाया गेला असे वाटले.
सचित पाटील अजूनही किती तरुण दिसतो.

उत्तर पाहिला
रेणुका आणि अभिनय बेर्डेचा
त्यातले संवाद आवडले

मंदार, दादा कोंडकेंनी चॅलेंज म्हणून हे गाणं लिहिलं असेल तर आणखीनच कौतुकास्पद आहे.
दादांच्या चित्रपटांतल्या गाण्यांना मराठी रॅप म्हणता येईल का?

झकासराव, हो आधी ते कथा सांगताना विनोद आणत. मग विनोद सांगायला कथा रचू लागले असं झालं असावं.

भरत दादांनी हे गाणे बहुतेक व्ही. शांतारामांना challenge म्हणून लिहीले होते. फक्त द्वयर्थी लिहीता हा आरोप खोडून काढण्यासाठी. >> हे बरोबर आहे.

अन्जनीच्या सुता गाणं मला सुद्धा प्रचंड आवडते.

मंदार +१. असंच ऐकलं आहे.
ढगाला लागली कळं मध्ये पण व्ही शांतारामांना जबरा झोडपलाय.

बामणाच्या मळ्यात कमळाच्या तळ्यात (राजकमल स्ट्यडुओच्या लोगोत कमळ होतं)
येशील का संध्याकाळी (संध्या)
जाऊ दुसरीकडं नको बाबा तिकडं (बाबा म्हणजे भालजी पेंढारकरांना ते बाबा म्हणत)
बसलाय संतू माळी (अर्थात शांताराम)
म्हातार्‍याला लागलाय चळ
पाणी थेंब थेंब गळं.
हे एकटा जीव मध्ये वाचलेलं आहे. अजब रसायन होतं. त्यांचे नंतरचे सिनेमे मला आता बघितले ते अगदीच लो बजेड रद्दड वाटलेले. सोंगाड्या आणि एकटा जीव आवडलेले. आता परत बघायचे असतील तर बघेनच! Happy

>>> दादा कोंडकेंच्या चित्रपटांना नाक मुरडायचं , तुच्छ लेखायचं हा टिपिकल ममवपणा झाला.
हजर! Lol

ते सिनेमे चालत होते तेव्हा माझं ते बघायचं/कळायचं वगैरे वय नव्हतं, आणि नंतर पाहण्याचा प्रयत्न केला पण अजिबात आवडले नाहीत.
'एकटा जीव' वाचल्यावर माझं त्यांच्याबद्दलचं मत उलट आणखीनच वाईट झालं. अत्यंत उथळ माणूस.

सुपरहिट सिनेमे काढले असतील - गुड फॉर हिम! नॉट माय कप ऑफ टी!

तो 'आता थांबायचं नाय' इथे (पुन्हा) वाचून पाहिला एकदाचा. खरंच छान कामं केलीत सगळ्यांनी, विशेषत: भरत जाधव!
स्टोरी टिपिकल फील-गुड टेम्प्लेटची वळणं घेत जाते, पण ठीक आहे.

मला ते सफाई कामगार इतक्या अनसेफ पद्धतीने काम करतात - अजूनही - आणि मुंबईसारख्या मेट्रो शहरातही - हे पाहून मात्र मेजर धक्का बसला आणि फार वाईट वाटलं!
त्यांच्यासाठी काही सेफ्टी प्रोटोकॉल्स नाहीत?!!

मला त्यावरून एक प्रश्न आहे. कुणाला माहीत असेल तर सांगा. माझ्या मुलीने सुद्धा माझ्या सोबत पाहिला- आता थांबायचं नाय - तिला प्रश्न पडला होता. भारतात अशी GED testing टाईप परीक्षा नाही का ? ज्याने तुम्ही आयुष्यातला अनुभवावरून, आहे त्या ज्ञानावरून परीक्षा देऊन हायस्कूल डिप्लोमा मिळवू शकाल! रात्र शाळेत न जाता. ही सोय अमेरिकेत आहे.

अमलताशमधे अमोल होता तसा येथे अमित आहे >>>> Lol

आता थांबायचं नाय बद्दल छान लिहीले आहेस अस्मिता. अमितचीही पोस्ट आवडली. मलाही आवडला होता हा पिक्चर. मला माझीच पोस्ट सापडली नाही. बरीच पाने शोधली. नंतर आठवले की ऋ ने वेगळा धागा काढला होता तेथे लिहीले होते Happy

एकटा जीव सदाशिव दूरदर्शनवर कधीतरी पाहिला होता. तेव्हा आवडला होता हे लक्षात आहे. बाकीचे पिक्चर पाहिलेले नाहीत/आठवत नाही. ममव लोकांचे इम्प्रेशन हे नंतरच्या पिक्चर्स मुळे असावे. recency bias. नंतर केबीसी व दुसर्‍या इनिंग मधले पिक्चर्स ई च्या आधी ९०ज मधे अमिताभची इमेज काय झाली होती आठवत असेल तर त्यावरून अंदाज लावता येतो. आंधळा मारतो डोळा मधले अरूणा इराणीचे गाणे आहे - ते म्हणजे "क्रास" न होता चावटपणा किती मस्त करता येतो त्याचे उदाहरण आहे. नंतरच्या पिक्चर्स मधली बरीच गाणी भिकार आहेत. मा़झ्या डोक्यातील ठोकताळा म्हणजे दादा कोंडक्यांना जयवंत कुलकर्णीचा आवाज असेल तर गाणे/पिक्चर चांगला. महेंद्र कपूरचा असेल तर नाही. अर्थात "अंजनीच्या सुता" सारखे अपवाद असतीलच. ते गाणे चांगले आहे. जयवंत कुलकर्णीचे "चल रं सर्जा" गाणे मला खूप आवडते. इतक्या वेगवेगळ्या भाज्या व पिके एकाच परिसरात एकाच वेळी "हार्वेस्ट" लेव्हलला येत असतील काय हा तपशील दुर्लक्षित करून.

स्वाती, उथळ माणूस म्हणजे एकटा जीव मधला रोल तसा होता की आत्मचरित्र किंवा त्यांच्यासंबंधी दुसरे काही वाचून बनलेले मत?

माझ्या भावाने वाचून मला फुल रेको दिला होता. माझं नाही झालं पण त्यांना त्यांच्या भाच्यांनी, नातलगांनी कसं फसवलं. कारण ह्यांनी लग्न केले नाही म्हणून एकटेच राहिले आणि पैश्यासाठी लोक गोळा होऊ लागले इत्यादी. त्यांनी सावरकरांचे नाशिकचे घर विकत घेतले होते म्हणे म्हणून मला आदर वाटला होता. कारण त्या घराची वासलात लागली असती आणि तो ऐतिहासिक, साहित्यिक ठेवा म्हणून घेतले बहुतेक. हे कर्णोपकर्णी ऐकलेले. माझं व्यक्ती म्हणून चांगलेच मत आहे.

शेवटी जे ज्याला जमेल ते करून तो ठसा निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो. मला कुठलाही सिनेमा आवडलेला नाही, उलट वेडगळपणा असह्य झाला आहे. येथे मुका घ्या मुका वर लिहिले होते सहज. पण भरतनी ममवपणा बद्दल लिहिले आहे त्याच्याशी जनरली सहमत आहे. त्या कंडिशनिंग मधून निघण्यासाठीच मी पाहून, लिहून पाहिला. आपण असे लगेच उथळ किंवा गंभीर किंवा सखोल होतं नसतो, आपण प्रत्येक क्षणामधे वेगवेगळ्या प्रतलावर असतो. आयुष्यातल्या वीस- पंचवीस मोजक्या क्षणांमधे संबंध कॅरेक्टरचा ग्राफ बसणं शक्यच नाही. ह्या सगळ्या including उथळ, पांचट सुद्धा मानवी भावनाच आहेत. आवडणं न आवडणं आहेच तरीही जजमेंट्स बऱ्यापैकी कंडिशनिंग असू शकते. बऱ्याचदा कलाकार विरूद्ध इमोशन्स म्हणून एक्स्प्रेस होत असतील म्हणजे जे मुळात मनात आहे त्यापासून दूर जाण्यासाठी. काही खात्री नाही कशाचीच एवढं अधोरेखित करतेय.

स्वाती हे जनरलीच काहीबाही वाटण्यातून लिहिले आहे. असहमती म्हणून अजिबात नाही.

'क्रास' मस्त शब्द वापरलात फा.
दादा कोंडके = क्रास हेच समीकरण आहे माझ्या मनात त्यांचा एकही सिनेमा पाहीलेला नसूनही.

>>> हे जनरलीच काहीबाही वाटण्यातून लिहिले आहे. असहमती म्हणून अजिबात नाही.
हो, आणि असहमतीही वेलकमच आहे एनी वे! Happy

मी उथळ हे पांचट किंवा बाष्कळ या अर्थी म्हटलेलं नाही. त्यांचे चित्रपट, त्यांचा विनोद, त्यांची सवंगसुद्धा लोकप्रियता हा निराळा भाग. त्याबद्दल आवडनावड अपेक्षितच आहे.
माझं ते मत माणूस म्हणून त्यांचे अनुभव त्यांनी आत्मचरित्रात ज्या पद्धतीने मांडले आहेत त्यावरून झालेलं आहे. त्या सिंहावलोकनात एक 'आठवणार्‍या प्रसंगांची जंत्री' यापलीकडे काहीही हाती लागलं नाही माझ्या.
त्या अनुभवांची त्यांनी काही संगती लावल्याचं, काही आत्मपरीक्षण केल्याचं, काही स्किनडीपसुद्धा विचार केल्याचं त्यात दिसत नाही.
निळू फुले, अशोक सराफ यांसारख्या नटांनी प्रत्येकी एकेका प्रोजेक्टनंतर पुन्हा आपल्याबरोबर काम करायला कसा नकार दिला इथपासून ते परदेशात जाताना विमानातल्या मराठी न समजणार्‍या हवाई सुंदरीशी आणि तिच्याबद्दल आपण आणि आपले मित्र कसं मराठीत शिवराळ बोलून आपणच हसत होतो इथपर्यंत सगळं त्यात ते बोलतात, पण त्याला प्रांजळपणाही म्हणवत नाही. मुळात त्यात काही अंतर्मुख होण्यासारखं आहे हे समजण्याची कुवतच नसावी असं वाटत राहातं. उथळ म्हटलं ते या अर्थी.

बाकी साहित्यात काय आणि चित्रपटांत काय, बीभत्सासह कुठल्याच रसाला कमी लेखण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. Happy

मुळात त्यात काही अंतर्मुख होण्यासारखं आहे हे समजण्याची कुवतच नसावी असं वाटत राहातं. उथळ म्हटलं ते या अर्थी.
>>>> समजलं. Happy हे पण गाट इट, तुमी पन एडिटा आमी पण एडिटू.

स्वातीशी सहमत. पण मला माहित नसलेलं थोडं गॉसिप समजलं, ते एकाच बाजुने समजलं, नसतं समजलं तरी ठीकच असतं वगैरे आहेच. पण तो काळ काय होता, मराठी सिनेमात काय चालू होतं, चढ उतार, तो काळाचा तुकडा इ. बद्दल एक पर्स्पेक्टिव्ह माझ्या झोळीत पडलं. एक किडा मनात असतो तो ही थोडा शमला. एक माणुस काय होता, होऊन गेला ते वाचलं झालं!

Pages