Submitted by ऋन्मेऽऽष on 13 May, 2025 - 13:06
आपल्या मराठी चित्रपटांवर चर्चा करायला हा मराठमोळा धागा
आधीचा धागा इथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/74623
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
काही गोष्टी बोलणे सोपे पण
काही गोष्टी बोलणे सोपे पण करणे तेव्हढेच कठीण हे खरं आहे .
पण आई मुलगा दोघच एकमेकांना आहेत. त्याचा तुटकपणा ( कधी कधी उफाळून येणारा) तिला माहीत आहे. ती समंजस आहे. तिला आई व्यतिरिक्त एक स्त्री म्हणून आपलं वेगळं अस्तित्व जाणवतं. अशा वेळी मुलाच्या / किंवा त्या दोघांच्या ( मानसिक ) स्वास्थ्यासाठी / नात्यासाठी, वयात आलेल्या मुलाबरोबर - ती फक्त त्या शक्यतांचा विचार करत होती हे सांगणे किंवा तसं बोलणे शक्य होते असे वाटणे अवाजवी वाटत नाही.
रूपाली धन्यवाद!
'पॉंडिचेरी ' पाहिला...खूपच
'पॉंडिचेरी ' पाहिला...खूपच आवडला...सई ताम्हणकर आणि वैभव तत्त्ववादीचा अभिनय खूपच छान आहे...
उत्तरचे परीक्षण छान आहे
उत्तरचे परीक्षण छान आहे छन्दिफन्दि. बघेन हा.
झी 5 वर 'स्थळ 'पाहिला...
झी 5 वर 'स्थळ 'पाहिला... अजिबात आवडला नाही...काही कथा आहे असे वाटलेच नाही...इथे खूप चांगले reviews वाचले होते म्हणून नेटाने शेवटापर्यंत पाहिला...पण नाहीच आवडला ...उलट नायिकेने आधीच action घेऊन काही करून दाखवले असते तर जास्त चांगला वाटला असता चित्रपट...
अहो ती होतकरू जरी असली तरी
अहो ती होतकरू जरी असली तरी गावातली मुलगी आहे तुम्ही अश्या मुली पाहिल्या नसतील . मी माझ्या गावात अश्या अनेक मुली पाहिल्यात ज्यांना शिकायचं होत पण पाहिलं प्राधान्य घरात लग्नाला दिलं जातं. अगदी दहावी बारावी त असल्यापासून .कमीतकमी शिक्षण तरी पूर्ण करू द्या असं सांगितल्यावर" शिकल की मग लगीन झाल्यावर" असं म्हणून लग्न लावून देतात अगदी मोजक्या नशीबवान मुली चांगलं सासर मिळालं सपोरटीव्ह नवरा मिळाला तर शिकतात नाहीतर आयुष्य मुलं बाळं, धुणी भांडी वगैरे संसाराचा व्यापात आपली शिक्षणाची स्वप्न विसरून जातात. त्यातूनही संसार सांभाळून सासर माहेरच्यांचे टोमणे एकूण जिद्दीने शिकलेल्या मुलीही आहेत. स्थळ मधलीही मुलगी परिस्थितीला बांधलेली आहे तो शिक्षकही नकार देतो तेव्हा तिची आशा मावळते पण शेवट नीट बघितला तर लक्षात येईल की चित्रपट पॉझिटिव्ह नोट वर संपलाय. मला वाटतं खूप मुली रिलेट करतील चित्रपटाला गावातल्याच काय शहरातल्याही, शेवटी शिक्षणाला महत्व न देणारी कुटुंब शहरातही असू शकतात .मला आवडला पिच्चर. तळागाळात जो मेसेज पोचवयाचाय तो या चित्रपटाच्या माध्यमातून व्यवस्थित पोचतो.
सिमरन किती छान लिहीलयस. बघते
सिमरन किती छान लिहीलयस. बघते स्थळ सापडला तर.
अहो ती होतकरू जरी असली तरी
अहो ती होतकरू जरी असली तरी गावातली मुलगी आहे तुम्ही अश्या मुली पाहिल्या नसतील . >>>अशा मुली असतात हे मलाही मान्य आहेच...पण खरं आयुष्य आणि चित्रपट यात एक सीमारेषा असते ना...त्यानुसार जो शेवट दाखवलाय, तो climax दाखवून कथा अजून फुलवली असती तर मला आवडलं असतं...
पण खरं आयुष्य आणि चित्रपट यात
पण खरं आयुष्य आणि चित्रपट यात एक सीमारेषा असते>>>हल्लीचे काही चित्रपट पाहता ती सीमारेषा पुसट झाल्याचे लक्षात येईल. तुम्ही जो सांगताय तो शेवट मलाही आवडला असता पण तितका परिणामकारक झाला नसता,(याचा शेवट जसा "फँड्री" चा शेवट होता तसा आहे) कदाचित याचा जर सिक्वेल आला तर तश्या स्टोरीची अपेक्षा करू शकतो . शेवट हा शेवट नाही तर सुरुवात आहे . पुढचा पिच्चर प्रत्येकीने आपआपला लिहायचा .
@धनश्री नक्क्की बघ .स्पेशली सुरुवातीचा स्वातंत्रदीन वाला बघायचा सीन मस्त आहे ,त्या सीन वरून मुलांनाही जाणीव होईल की सगळं खानदान घेऊन जेव्हा मुलीला बघायला जेव्हा जाता आणि जे प्रश्न विचारता त्याची उत्तरं देताना किती दडपण येत असेल मुलीला.
सिमरन तुम्ही छान लिहिलं आहे .
सिमरन तुम्ही छान लिहिलं आहे . मला पण स्थळ सिनेमा खूप आवडला.
थँक्स दक्षिणा आणि मला तूच
थँक्स दक्षिणा आणि मला तूच म्हण, एव्हडीही मोठी नाहीये मी
काल प्रेमाची गोष्ट 2अमेजॉन प्राईम वर पाहिला आणि गाणं पण तेच आहे, रिक्रिएट केलेलं, तेही वाईट, पाहिलं किती सुंदर होतं" ओल्या सांजवेळी" (यांना नवीन गाणी लिहायला काय होतं काय माहीत ) काही वेगळेपण नाहीये, एक हिरोईन हिरोची बेस्ट फ्रेंड असते बालपणीची ती दोघे लग्न करतात पण मग त्यात ट्विस्ट दिलाय अजून एक हिरोईन आवडते हिरोला तीही बालपणीचच मैत्रीण असते पण एका वर्षाने मोठी . लग्नानंतर हिरोला रियलाईज होत की आपलं प्रेम नाहीये जिच्याबरोबर लग्न केलंय तीच्यावर, ती फक्त मैत्रीण म्हणून आवडते ,खरं दुसरी आवडते .मग असं काहीतरी होतं ज्याने त्याला आयुष्य परत रिवर्स करून मनाप्रमाणेजगण्याचा चान्स मिळतो .मग हिरोचं आयुष्य बदलतं का? हिरोला खरं प्रेम मिळतं का कोणाशी शेवटी लग्न होतं ?हे चित्रपटात पाहा.मला ठीकठाक वाटला चित्रपट. ललित चाच आरपार बंडल वाटलेला पण त्यात आणि यात दोन्हीत ललित भारी दिसतो .दोन्ही हिरोईन हिंदीतल्याच आहेत मेरी झालेली हिरोईन "पाणी" सिनेमात आवडली होती. यात ठीकठाकच वाटली. शेवटचं गाणं मात्र पकाऊ आहे.
प्रेमाची गोष्ट २ हा कधी आला,
प्रेमाची गोष्ट २ हा कधी आला, कुठे लागलाय? थिएटर रिलीज नाहीये का?
मला प्रेमाची गोष्ट २ बघायचं
मला प्रेमाची गोष्ट २ बघायचं डेरींगच नाही. पहीला इतका मनावर ठसलाय आणि लाजवाब एव्हरग्रीन वाटतो. अतुल सागरिका कमाल जोडी. मनात आलं की बघते मी .
ललित पूर्वी आवडायचा पण आता वय दिसतं चेहऱ्यावर, मुलाखत बघताना जाणवलं. रिद्धीमा आवडते. चित्रपट बघावासा नाही वाटला.
अंजू मलाही ललित आरपार च्या
थिएटर रिलीज नाहीये का?>>>> थिएटर ला लागून गेलाय . आता ott वर आलाय प्राइम.
अंजू मलाही ललित आरपार च्या प्रीमियर व्हिडिओ मधे काहीतरी वेगळाच दिसत होता बोटॉक्स वगैरे चेहर्यावर केल्यासारखा . नाहीतर खरच वय दिसायला लागलंय, पण मराठीत सध्यातरी तो एकच हॅण्डसम हिरो आहे .
गश्मीर
गश्मीर
आणि सिद्धार्थ चांदेकर सुद्धा छान आहे
चांदेकर सुद्धा छान आहे>>> ते
चांदेकर सुद्धा छान आहे>>> ते फारच वरणभात दिसतात .
लव्ह लग्न लोच्या बघितला का ?
लव्ह लग्न लोच्या बघितला का ? बघून लिहा कुणी तरी इथे.
योगा घटस्फोट, पतंजली घटस्फोट.
कच्चं लग्नं पक्कं लग्न. सचिन तेंडुलकर इफेक्ट वगैरे.
दोन जुळ्या बहीणी, त्यांची आई पूर्वीच्या मराठी पिक्चरमधली ढलती हेमामालिनी. हिरवट आज्जी.
यातली आकाराने धाकटी मयुरी देशमुख, आकाराने मोठी कोण समजलं नाही. तर दोघींची कुंडली पाहणार्या ज्योतिषाने साम्गितलेलं कि दोघींची जन्मवेळ एकच असल्याने दोघींच्या आयुष्यात दोन दोन लग्ने आहेत. पहिलं लग्न टिकणार नाही, दुसर्या लग्नात मात्र त्या सुखी होतील. सुरूवातच आमो बहीण रडत घरी येते आणि बायका घटस्फोट म्हणून चित्कारतात या सीनने होते.
यातून धडा घेत मयुरी देशमुख ठरवते कि एखादा भोळा, गावाकडचा मुलगा बघावा आणि त्याच्याशी लग्न करावं . समजा त्याने घटस्फोट नाहीच दिला तर सगळ्या घराला आपल्या वागणुकीने असं हैराण करावं कि आपोआपच घटस्फोट द्यावा. समजा जर काही अंगाशी आलंच तर त्या मुलाला वीस लाख रूपये द्यायचे म्हणजे तो गप्प होईल. हे सगळं गुपचूप करायचं आणि मग तिच्या बॉयफ्रेण्डशी लग्न करायचं. (आजीने लिव इन कर असं सुचवलेलं असतं.. खरं म्हणजे एव्हढं लॉजिकल सजेशन ज्येनां कडूनच येऊ शकतं , मग पिक्चर कसा घडणार ? )
तर मंडळी भारी भारी पिक्चर सोडा, माहीत आहे सगळे स्टिव्हन सिप्लबर्गचे शिष्य आहेत. जरा आपल्या दादा कोंडकेंचं नामस्मरण करा, मराठीचं नाव घ्या आणि बघा हा सिनेमा. शेवट काय होतो हे कळवा.
(श्रेयनामावालीत लग्नकल्लोळ असं नाव आहे. बाहेर लव्ह लग्न लोच्या. टोयोटाच्या शोरूममधे मारूतीच्या गाड्या मिळतात त्या घेता ना ? मग या शंका नको)
काल मी "संत ज्ञानेश्वरांची
काल मी "संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई" सुरू केला. खूपच कृत्रिम आहे. विग वगैरे कॉमेडी सर्कस मधल्या सारखे टोप टाईप दिसतात. भाषा अतिशय पुस्तकी. इंद्रायणी नदी सिजीआय गंगेसारखी विशाल पात्राची दाखवली आहे. मृणाल कुलकर्णी रूक्मिणी व समीर धर्माधिकारी विठ्ठलपंत कुलकर्णी आहे. सुपरमॉडेल विठ्ठलपंत पाहून मी काय करू? पैठणची बाकीची त्रासदायक मंडळी जुन्या दूरदर्शनवरची ओव्हरॲक्टिंग करत होती. उरलेली हळवी मंडळी तुपकट वाटत होती. परकर पोलकी व साड्या कोऱ्या करकरीत आणि फेटे पण कडक दिसतात. ज्ञानेश्वर एकदम गोजिरवाणा आणि निवृत्ती भयंकर कुपोषित वाटला. तरीही मला मुक्ताई बद्दल नवीन काही माहिती मिळाली तर हवी आहे म्हणून लोचटासारखे कंटिन्यू करेनच. गो नि दांडेकर यांच्या 'मोगरा फुलला' या कांदबरीतले संदर्भ घेतले असावेत अशी दाट शक्यता आहे. मला तरी राहून राहून आठवण आली. सुरवातीला असणारे श्रेयनामावलीतील 'नमस्कार चमत्कार" फॉरवर्ड केल्याने 'मोगरा फुलला' चे श्रेय वाचले नाही.
या या अस्मिता. तुम्ही आलात
या या अस्मिता. तुम्ही आलात कि प्राजक्ता माळीचं हास्यजत्रेतलं अँकरिंग सुरू झालं असं वाटतं.
तुमच्या टेन्शनवरची मात्रा, चिकवा जत्रा !
धन्यवाद दादा
धन्यवादव्वा , दादावा दादा !
वा दादा !
^^^सुपरमॉडेल विठ्ठलपंत पाहून
^^^सुपरमॉडेल विठ्ठलपंत पाहून मी काय करू?^^^^
अस्मिता, अशी फुटले हे वाचून ना.....
कप हिंदकळला हातातला ...
इंद्रायणी नदी सिजीआय
इंद्रायणी नदी सिजीआय गंगेसारखी विशाल पात्राची दाखवली आहे >>>
पैठणची बाकीची त्रासदायक मंडळी जुन्या दूरदर्शनवरची ओव्हरॲक्टिंग करत होती. उरलेली हळवी मंडळी तुपकट वाटत होती >>>
मृणाल कुलकर्णी सतराव्या, अठराव्या शतकातील भूमिका करते. यात अजून तीन चार शतके मागे गेलेली दिसते. एका पिक्चर मधे सध्याच्या काळातील रोल करताना तिचा एक संवाद होता की तिला पुण्याहून मुंबईला कसे जायचे माहीत नाही. बरोबर आहे, कारण ती ज्या भूमिका सहसा करते त्यांच्या काळात मुंबईच नव्हती. तिला फक्त शनिवार वाडा, लाल महाल, रायगड अशा ठिकाणांची ओळख असेल.
वा दादा! >> मीतर वाटच पाहात
वा दादा! >>
मीतर वाटच पाहात असते ,कधी अस्मिता चिकवावर लिहिते.आणि
ह्या स्मायली टाकायला मिळतील.
>>कारण ती ज्या भूमिका सहसा करते त्यांच्या काळात मुंबईच नव्हती. तिला फक्त शनिवार वाडा, लाल महाल, रायगड अशा ठिकाणांची ओळख असेल.>>
फा
फा

)
सिमरन
मी कसाबसा जवळजवळ पूर्ण केला. ज्ञानेश्वर समाधी घ्यायला गेले तेव्हा मला असह्य कंटाळा आला व मी ते बदलून "काटी रात मैने खेतोमें तू आई नहीं " लावले. काहीही नवीन नाही, बघू नका. एकनाथ - आदिनाथ कोठारे कच्चं मडके, ताटी उघडा, चांगदेव काही काही वेगळे दाखवले नाही. अभंग ऐकायला बरं वाटलं पण म्युझिकल असल्यासारखे सतत येत होते. विसोबा खेचर - योगेश सोमण ( अन्जूताईचे कोणीतरी आहेत म्हणून मला तिची आठवण आली
ते वा दादा वर दोन तीन लोक
ते वा दादा वर दोन तीन लोक हसले तेव्हा माझ्या डोक्यात क्लिक झाले
कासव आणि दिठी Waves app वर
कासव आणि दिठी Waves app वर फुकट उपलब्ध आहेत.
हे app प्रसारभारतीचं आहे. यावर अनेक उत्तम भारतीय चित्रपट, लघुपट आहेत. जाहिरातींचा जरा त्रास आहे.
धन्यवाद चिनूक्स या माहितीसाठी
धन्यवाद चिनूक्स या माहितीसाठी.
अस्मिता मी बघितला नाहीये
अस्मिता
मी बघितला नाहीये पिक्चर. बघेन असंही वाटत नाही. योगेश सोमण, मोठ्या नणंदेचे जावई आहेत त्यामुळे भाचेजावई. ते नातेवाईक असले तरी त्यांच्याबद्दल जे काही वाटलं ते बिनधास्त लिही.
लहानपणी tv वर संत ज्ञानेश्वर (जुना पिक्चर)बघितलेत, त्या भावंडांचा छळ बघून त्रास व्हायचा ते आठवलं आणि ताटी उघडा ज्ञानेश्वरा एकदम काळजात जायचं. त्यातले आवडलेले सीन्स रेडामुखी वेद वदवून घेतात ज्ञानोबा आणि मुक्ताबाई चांगदेवाचं गर्वहरण करते तो.
ज्ञानेश्वर समाधी घ्यायला गेले
ज्ञानेश्वर समाधी घ्यायला गेले तेव्हा मला असह्य कंटाळा आला व मी ते बदलून "काटी रात मैने खेतोमें तू आई नहीं " लावले.
>>
जे ब्बात
सुपरमॉडेल विठ्ठलपंत पाहून मी
सुपरमॉडेल विठ्ठलपंत पाहून मी काय करू? >>>
हा नवीन आहे का ? जुना पाहिलाय आणि खूप आवडला होता. जुने संतांचे सिनेमे, त्यांच्यावर झालेले अत्याचार यापेक्षा पण त्यातले संवाद बोलायची पद्धत आहे ना त्यामुळे ते सगळे भोळे भाबडे वाटतात. ते ऐकूनच डोळ्यात पाणी येत राहतं. इतके कसे साधे लोक ! त्या वेळच्या सिनेमांना आपल्याकडून कधीच फूटपट्ट्या लावल्या जात नाहीत.
Pages