मराठी चित्रपट कसा वाटला - २

Submitted by ऋन्मेऽऽष on 13 May, 2025 - 13:06

आपल्या मराठी चित्रपटांवर चर्चा करायला हा मराठमोळा धागा

आधीचा धागा इथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/74623

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वर लिहिला आहे की नाही लक्षात नाही पण
"यंदा कर्तव्य आहे" ही छान आहे. ( स्मिता शेवाळे आणि अंकुश चौधरी)
तसेच "जीवन संध्या" अशोक सराफ किशोरी शहाणे
दोन्ही छान आहेत.

एक डाव धोबीपछाड >>> हा कुठल्याच OTT वर नाहीये ना?>>
यू ट्यूब वर आहे. मी परवाच पाहून हसण्याचा रिचार्ज मारून घेतला.

दोघी
आम्ही दोघी आलेत का लिस्टमधे?
कदाचित पाहिला होता मी, अश्विनी ने छान काम केलय.

'नितळ' - अंगावरील कोडावरती एक छान चित्रपट आहे.
-----------
काल 'फुलवंती' परत पाचव्यांदा पाहीला. काय सुंदर सिनेमा आहे. ओटीटी वर आहे का माहीत नाही माझ्याकडे विकत घेतलेला आहे.
प्राजक्ताचे डोळे फार कोमल सुंदर आहेत. गश्मीरबद्दल तर काय बोलावे. गश्मीरची पत्नी झालेल्या त्या अभिनेत्रीनेही छान काम केलेले आहे. आणि हो नाना फडणविस शोभले आहेत. वेशभूषा, डिमिनर.

तुमच्या यादीतला 'कैरी' कुठं बघायला मिळाला तुम्हाला? मी मागे बराच शोधलेला. >>>>> संप्रति, खूप आधी पाहिला होता CD आणून.
मी ही शोधला, पण नाही सापडला.
नवीन, वेगळाच कैरी चित्रपट दिसतोय आता.

मी पांघरूण सिनेमाबद्दल खूप ऐकलं आहे. आणि मला तो बघायचा आहे, पण कुठेच उपलब्ध नाही. कोणी काही मार्ग सुचवू शकेल का?

इथे कुणीतरी चांगले लिहिल्यामुळे मी सासू बाई सुनबाई हा सिनेमा पाहायला घेतला ..त्यात प्रार्थना बेहरे आणि निर्मिती सावंत चे चेहरे अजिबात बघवत न्हवते . मी फास्ट पळवत पळवत पहिला ...निर्मिती सावंत चा बहुतेक विग आहे पण त्यामुळे ती काही तरी विचित्र दिसते (येथे कंट्रोल करतेय ) शेवटच्या डान्स स्टेप पण कायच्या काय आहेत .
नशीब थिएटर मध्ये नाही बघितला ...तसाही बघितलाच नसता ....

मी पांघरूण सिनेमाबद्दल खूप ऐकलं आहे. आणि मला तो बघायचा आहे, पण कुठेच उपलब्ध नाही. कोणी काही मार्ग सुचवू शकेल का?>>> मला पण हा सिनेमा बघायचा आहे. प्लिज कोनि लिन्क देवू शकेल का?

Here is a totally subjective list of 50 Marathi Films.
https://www.instagram.com/p/DWg4dRlAQ-w/?utm_source=ig_web_copy_link&igs...
अगदी टॅकी करून पाहिलं नाही , पण या पन्नासातले काही इथल्या यादीत आले नाहीत आणि यायला हवेत असे वाटले.

वेळ काढून , ती नावं शोधून लिहितो.

बायको...पण कुणाची? हा पिक्चर बघतोय. तुम्ही पण बघा. आवडेल.
रमेश देवचा पोरगा आहे. सुधीर दळवीचा पोरगा आहे. साई ताम्हणकर हिरॉईन आहे.
https://www.youtube.com/watch?v=Ze_q_XYwhQI

परवा टिव्हीवर प्रवाह पिक्चर वर हाफ टिकीट पाहिला.
अतिशय सुंदर पिक्चर आहे. चित्रपटात काहीही सुंदर नाही तरीही. झोपडपट्टीतील दोन गरीब मुलांना पिझ्झा खावा वाटतो त्यासाठी काय काय करावे लागते याची गोष्ट. इतके गोड गोड क्षण आहेत आणि एवढी दैना आहे, ते सगळं खरं वाटतं. दोन लहान मुलांनी जबरदस्त अभिनय केला आहे.

ती खरंच झोपडपट्टीतली, शाळा सोडून दिलेली, कचरा उचलणारी वगैरे वाटतात. छोट्याशा भूमिकेत भाऊ कदम आहे, जो रेल्वे ट्रॅक बदलणारे लोक असतात ( काय म्हणतात त्यांना) तो आहे. तिथला कोळसा ही मुलं उचलून तीन रूपये किलोंनी विकतात व पिझ्झाचे तीनशे रुपये गोळा करतात. बाप यांचा जेलमध्ये, आई वकीलाकडे हेलपाटे घालून परेशान. आज्जी घरीच भाकरीवर भाज्या घालून भाजून देते तर हे फेकून देतात. यांना पिझ्झाच हवा.

एकदा तर पप्पा नको, पिझ्झाच हवा म्हणतात. आपापल्या आयुष्यात छोटे छोटे आनंद शोधलेले आहेत. यांचा एक मध्यमवर्गीय मित्र आहे, त्याला सोसायटीच्या बाहेरून बोलावं लागतं. तो डब्यात एकदा पिझ्झा घेऊन येतो पण उष्टा. लगेच मोठ्या मुलाचा स्वाभिमान आडवा येतो व ते खूप मोह होत असूनही खात नाहीत. चांगले कपडे घालून गेलो तर पिझ्झा वाला पिझ्झा देईल वाटून मॉललाही जातात. त्यासाठी चोरी करायला बघतात पण पटत नाही म्हणून विचार बदलतात. पैसे गोळा करून पिझ्झा घ्यायला जातात तर कपडे बघून मालक कानाखाली देतो. पैसे असूनही. हा व्हिडिओ ब्लॅकमेल करण्यासाठी - आपल्या समाजातील मुलांवर शोषण, ॲट्रॉसिटी ॲक्ट वगैरे लावून नेते वापर करतात. मुलांचं आणि आईचं तसं काहीच नसतं पण विषय कुठल्या कुठे जातो.

नाल्याकाठी राहाणारी भीम नगर नावाची झोपडपट्टी. मुलांची नावे मोठं कावळ्याचं अंडं आणि छोटं कावळ्याचं अंडं. इतकी अदृश्य जनता. तेथेही हित जपणारी आणि फायदा बघणारी लोक आहेतच. काही काही सुंदर नाही, पण गोष्ट फार आवडली. सर्वांची कामं उत्तम आहेत. कुठे मिळाला तर जरूर बघा.

ट्रेलर पाहा.
https://youtu.be/HdM6lms8Pn8?si=GC9ssM4M68afpB6X

Pages