मराठी चित्रपट कसा वाटला - २

Submitted by ऋन्मेऽऽष on 13 May, 2025 - 13:06

आपल्या मराठी चित्रपटांवर चर्चा करायला हा मराठमोळा धागा

आधीचा धागा इथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/74623

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दादा कोंडके अत्यंत ग्रामीण आणि रफ माणूस होता. त्यामुळे चित्रपटसृष्टीला साजेसे गरजेचे मॅनर्स नसावेत त्यांच्याकडे. पण माणूस अतिशय टॅलेंटेड होता (ग्रामीण जनतेचे मनोरंजन करणारा एकमेव माणूस म्हटलं तरी चालेल)
आर्थिक नियोजन नीट जमले नाही. आशा भोसले सारखी व्यक्ति पण या माणसाच्या प्रेमात होती ही मला वाचून सुद्धा पटले नाही.

सोंगाड्या' आणि 'एकटा जीव' ही दोन्ही दादा कोंडके यांची आत्मचरित्रं आहेत. ही दोन्ही पुस्तकं इतरांनीच लिहिली आहेत. यावरून त्या दोन्ही 'शब्दांकनकारांमध्ये' वादही झाला होता. या दोन्ही पुस्तकांतील अनेक घटना कपोलकल्पित आहेत, असं पुस्तकं आल्यावर काहींचं म्हणणं होतं.
या खोटेपणावर 'एका सोंगाड्याची बतावणी' हे पुस्तक श्री. इसाक मुजावर यांनी लिहिलं आहे.
त्यांच्या आयुष्यावर सिनेमा करताना नक्की परवानगी कुणाची घ्यायची, हाही प्रॉब्लेम आला होता. उमेश - गिरीश यांनी फार उत्तम चित्रपट लिहिला होता. पण त्याचं पुढे काही झालं नाही.

घरचे माझ्या आधीच्या पिढीतले सगळे दादा कोंडकेकडे 'लोककलावंत' म्हणूनच बघतात असं मी पाहिलंय.
स्टेजवरून लोककला सादर करणं, त्यातून ग्रामीण रांगड्या प्रेक्षकांशी जोडून घेणं ही त्याची खासीयत होती.
सिनेमा म्हणजे तेव्हाचं नवीन काहीतरी, करून बघू, असं म्हणून केलेले. किंवा इतरांनी भरीलाही घातलेलं असू शकतं. ते चलनी नाणं ठरतंय म्हटल्यावर, किंवा वगनाट्य वगैरे मागे पडल्याने पुढे ते करत राहिला असंही असू शकतं. पण ते करतानाही लोककलेच्या धाटणीनेच सादर करण्याला त्याचं प्राधान्य होतं.
- हे सगळं मी घरच्या मोठ्यांकडून वेळोवेळी ऐकलेलं आहे.
दरवेळी ही चर्चा ऐकली की मला दादा कोंडकेची वगनाट्यं बघायला मिळावीत असं वाटायचं.

मध्यंतरी पांडू हवालदार पुन्हा पाहिला. तेव्हा हा सिनेमा इतका का गाजला असावा असा विचार करत करत पाहिला. त्याची उत्तरं म्हणून जागोजागी बरीच एलिमेन्ट्स सापडतात.
मी दादा कोंडकेची 'फॅन' नाही, कारण त्याचे फक्त सिनेमेच पाहिलेत.
मात्र 'एकटा जीव' पुस्तकाचे अनेक रिव्ह्यूज वगैरे वाचून पुस्तक वाचण्याचा विचार सोडून दिला होता.

लली पांडू हवालदार खरोखरी विनोदी होता सिनेमा. मी प्रचंड हासले होते बघताना. लिनाचिंमं ला सलग 9 दिवस त्यांचे सगळे रौप्य महोत्सवी सिनेमे लागले होते मी आणि मैत्रिणीने पास घेतला होता आणि पहिले तीन दिवस बघितले पुढे नाही जाऊ शकलो. कारण पब्लिक अतिशय गावठी आणि वाह्यात. टोप्या शिट्या टाळ्या गोंगाट.

पांडू हवालदार मध्ये अशोक सराफने चांगली साथ दिली होती, पुढे आपलं नाव सुद्धा असं द्वैर्थी सिनेमांशी जोडलं जाऊ नये म्हणून अशोक सराफ आणि कथा अकलेच्या कांद्याची इतकं गाजूनही निळू फुले बाजूस सरकले.

पण दादा कोंडके यांची नाळ कायम मातीशी जोडलेली असल्याने त्यांनी तो ग्रामीण बाज सोडला नाही.

एकटा जीव मध्ये फक्त सेन्सॉर बद्दल लिहिलेला टॉपिक च फार इंट्रेस्टिंग आहे, बाकी पुस्तक ओके ओके.

अंजनीच्या सुता माझं प्रचंड आवडतं गाणं आहे. छान लिहिलं आहे दादा कोंडके यांनी.

परवा गुरुवारी तेच गुणगुणत होते. मी लहान असताना, इथे डोंबिवलीत स्थानिक मूळ समाजाची लग्नं, सत्यनारायण पूजा असायची तेव्हा हे गाणं असायचंच आणि दुसरं ऐका सत्यनारायणाची कथा त्यामुळे पाठ होती ही गाणी तेव्हा.

खालच्या चित्रपटांसारखे आणखी काही मराठी चित्रपट माहितीत असल्यास सुचवावे.‌ मला जरा हवे आहेत.

संत तुकाराम (१९३६)
अमर भूपाळी (१९५१)
पेडगावचे शहाणे (१९५२)
जगाच्या पाठीवर (१९६०)
साधी माणसं (१९६५)
पिंजरा (१९७२)
सामना (१९७४)
जैत रे जैत (१९७७)
सिंहासन (१९७९)
उंबरठा (१९८२)
एक होता विदूषक (१९९२)
मुक्ता (१९९४)
वजीर (१९९४)
बनगरवाडी (१९९५)
दोघी (१९९५)
सरकारनामा (१९९८)
घराबाहेर (१९९९)

-------*****---------
-------*****--------

ध्यासपर्व (२००१)
वास्तुपुरूष (२००२)
देवराई (२००४)
वळू (२००८)
निशाणी डावा अंगठा (२००९)
हरिश्चंद्राची फॅक्टरी (२००९)
विहीर (२००९)
गाभ्रीचा पाऊस (२००९)
एक डाव धोबीपछाड (२००९)
घो मला असला हवा (२००९)
नटरंग (२००९)
त्या रात्री पाऊस होता (२००९)
एक कप च्या (२००९)
गंध (२००९)
सुंबरान (२००९)
जोगवा (२००९)
शाळा (२०११)
देऊळ (२०११)
मसाला (२०१२)
काकस्पर्श (२०१२)
पुणे ५२ (२०१३)
फॅंड्री (२०१३)
आजचा दिवस माझा (२०१३)
दुनियादारी (२०१३)
नारबाची वाडी (२०१३)
संहिता (२०१३)
पोस्टकार्ड (२०१४)
रेगे (२०१४)
कोर्ट (२०१५)
नागरिक (२०१५)
किल्ला (२०१५)
बायोस्कोप (२०१५)
हायवे (२०१५)
ख्वाडा (२०१५)
कट्यार काळजात घुसली (२०१५)
अस्तु (२०१५)
उदाहरणार्थ नेमाडे (२०१६)
लेथ जोशी (२०१६)
सैराट (२०१६)
जाऊंद्या ना बाळासाहेब (२०१६)
कासव (२०१७)
फास्टर फेणे (२०१७)
गुलाबजाम (२०१८)
सायकल (२०१८)
नाळ (२०१८)
मुळशी पॅटर्न (२०१८)
त्रिज्या (२०१९)
दिठी (२०१९)
द डिसायपल (२०२१)
गोदावरी (२०२१)
वाळवी (२०२३)
घर बंदुक बिर्याणी (२०२३)
आत्मपॅम्फ्लेट (२०२३)
नाळ-२ (२०२३)
जारण (२०२५)
आरपार (२०२५)
साबर बोंडं (२०२५)

>>> खालच्या चित्रपटांसारखे आणखी
तुमच्या (एकाच) लिस्टीची रेन्ज तुकारामापासून गुलाबजामापर्यंत पसरलेली पाहून कन्फ्यूज झाले आहे मी. Proud
'यांच्यासारखे' म्हणजे कुठलेही मराठी - असं विचारताहात का?

'पाणी' चांगला होता इतक्यात पाहिलेल्यांत, आणि 'स्थळ'ही.

ही लिस्ट देऊन कोपायलटला विचारा. कदाचित चांगली माहिती देईल. ग्राफ वगैरे की किती कौटुंबिक, किती सामाजिक, किती राजकीय, किती सेल्फ हेल्प्स, किती निव्वळ करमणूक (हे मराठीत शून्यच असेल) अशी मौलिक माहिती ही मिळू शकेल. उगा माणसांना विचारलंत तर ह्युमन बायास येईल. एआय तो बायास पण फ्लॅटन आऊट करुन/ लो पास फिल्टर लाऊन योग्य माहिती पुरवेल. आज नाही तर उद्या नक्की!
हे वरच्या सारखे जोक हवे असतील तरी प्रॉम्प्ट मध्ये सांगा की दोन चार जोक ही करुन मिळतील. जोक कसे हवे? निखळ, कोट्या, शाब्दिक, तिरकस असं विचारुन टेलरमेड नवे कोरे जोकही मिळतील. इथल्या लोकांचे प्रतिसाद, शैली वगैरे पुरवलंत तर माणसागणित त्या शैलीत तिरकस, खत्रुड, आशाकाळे काय वाट्टेल ते प्रतिसाद मिळतील. उगा माणसांना का कामाला लावता?

माझ्या कडून ही
शेजारी
लाखाची गोष्ट
गुळाचा गाणपती
जगाच्या पाठीवर
काका मला वाचवा
पाठलाग
ब्रह्मचारी
चिमणी पाखरे
सांगते ऐका.
माणूस
मोरूची मावशी
श्यामची आई
बाळा जो जो रे
दुप्लीकेट झाले असतील तर काढून टाका,
आठवले कि अजून लिहीन.

एप्रिल मे 99
जावई विकत घेणे आहे
बिनकामाचा नवरा
नवरे सगळे गाढव

कुंकू १९३७
माणूस १९३९
लोकशाहीर राम जोशी १९४७
एलिझाबेथ एकादशी २०१४
सुगंधी कट्टा १९७४
मल्हारी मार्तंड १९६५
रंगल्या रात्री अशा १९६२
दुनियादारी चालतो तर अशी ही बनवाबनवी सुद्धा चालेल.
देवकी नंदन गोपाला १९७७
गोंधळात गोंधळ १९८१
झुंज १९७५
असला नवरा नको ग बाई १९७७ टीव्हीवर लहानपणी पाहिला तेव्हा आवडला होता. आताचं सांगता येणार नाही. क्लिप्स दिसतात अधूनमधून. विनोद ओढून ताणून केलेत, तरी हसू येतं. राजा गोसावी , शरद तळवलकर, रंजना

दादा कोंडक्यांचा एकही सिनेमा नाही?

थॅंक यू, भरत, स्वाती, दक्षिणा, केशवकूल, अमितव.‌
प्रतिसादांतून काही नवीन नावं कळाली. Happy
बनवा बनवी चा 'अतिपरिचयात अवज्ञा' असा सीन झालेलाय आता.. दादा कोंडक्यांचे पिच्चर बघितलेत, 'पांडू हवालदार' एक चांगला वाटलेला आठवतो.. पण मला पुढे पुढे त्यांच्या सगळ्या सिनेमांमध्ये तेच तेच विनोद केलेयत असे वाटायला लागले.

आराम हराम आहे
एक उनाड दिवस
आनंदी गोपाळ
बालक पालक
प्रेमाची गोष्ट
लाईक अँड subscribe
TCGN
जगाच्या पाठीवर
पैशाचा पाऊस
मुंबईचा जावई
मुंबईचा फौजदार
गणानं घुंगरू हरवलं
पिंजरा
पाठलाग
पुढचं पाऊल
आत्मविश्वास
जैत रे जैत
कळत नकळत
चौकट राजा

Submitted by vijaykulkarni on 6 April, 2026 - 23:26 >> विकु, काननबाला ऑर दुर्गा खोटे का? Wink

संप्रति, एक 'कदाचित' नावाचा चित्रपट आहे. दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी. अश्विनी भावे, सचिन खेडेकर, सदाशिव अमरापूरकर. पण तो ओटीटीवर मला तरी सापडला नाही. पूर्वी टीव्हीवर बघितला होता. सापडला तर मलापण सांगा. अत्यंत उत्कृष्ट आहे.
चंद्रकांत कुलकर्णीचाच 'भेट' नावाचा सुंदर चित्रपट आहे. हा प्राईमवर आहे. प्रतीक्षा लोणकर, अतुल कुलकर्णी, दीपा श्रीराम, श्रेयस तळपदे वगैरे सगळे चांगले लोक आहेत.
'मातीमाय'. दिग्दर्शन चित्रा पालेकर. कलाकार अतुल कुलकर्णी आणि नंदिता दास. हाही ओटीटीवर आहे की नाही कल्पना नाही. मी थिएटरमध्ये बघितलाय.

मसाला, दिठी, हरिश्चंद्राची फॅक्टरी, वास्तुपुरुष हे यादीत दिसले नाहीत म्हणून.

यातले बरेचसे मीच पाहिलेले नाहीत. सगळ्यांच्या पोस्टींची नोंद घेतली आहे.

कदाचित यु ट्युबवर आहे. >>
मी पण कदाचित थिएटर मध्ये जाऊन पाहिला होता >>
'कदाचित' आठवतो आहे >> Lol

मसाला, दिठी, हरिश्चंद्राची फॅक्टरी, वास्तुपुरुष हे यादीत दिसले नाहीत म्हणून.>> आहेत ना.

वावे, थॅंक यू. कदाचित, भेट बघितल्यासारखे आठवतायत.
मातीमाय हे नाव ऐकले नव्हते. नोंदवून ठेवतो आहे.

कदाचित यूट्यूबवर आहे, पण क्वालिटी चांगली नाही.
स्वाती, हो, अश्विनी भावेनेच प्रोड्यूस केला होता.

संप्रति १,
काही आणखी सिनेमे.
चौकट राजा
सर्जा
कैरी १९९९
देवराई
वास्तुपुरुष
दहावी फ
भेट
नॉट ओन्ली मिसेस राऊत
श्वास
डोंबिवली फास्ट
उत्तरायण
मातीच्या चुली
शेवरी
बाधा
ब्लाइंड गेम
नितळ
आघात
शाळा
एक हजाराची नोट

ऋतुराज,
तुमच्या यादीतला 'कैरी' कुठं बघायला मिळाला तुम्हाला? मी मागे बराच शोधलेला. अजूनही बघायला मिळाला तर हवाच आहे. जी ए कुलकर्ण्यांच्या कथेवर आहे तो.
नितळ, बाधा भारीएत.
सर्जा तली गाणी चांगलीएत.
आणि उत्तरायण पेक्षा 'तू तिथं मी' जास्त आवडलेला.

अरे होते का यादीत - Lol व्हेंटिलेटर (गोवारीकरचा)
कदाचित माझाही पाहायचा राहिला आहे, अश्विनी भावेच्या मुलाखतीत ती बोलली होती याबद्दल. पण नंतर ती तिच्या बागेतल्या भरभरून आलेल्या गाजरांविषयी इतकी पॅशनेटली बोलली की मला गाजरंच लक्षात राहिली. Proud

लिहिलेले काही वरच्या यादीत दिसले, ते काढून नवीन

मोगरा फुलला
सोहळा
होडी (इतका depresseing चित्रपट आहे की बस)
रीटा
72 मैल एक प्रवास
आणि माबो फेमस अमलताश

Pages