मराठी चित्रपट कसा वाटला - २

Submitted by ऋन्मेऽऽष on 13 May, 2025 - 13:06

आपल्या मराठी चित्रपटांवर चर्चा करायला हा मराठमोळा धागा

आधीचा धागा इथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/74623

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

"अगं अगं सूनबाई, काय म्हणता सासूबाई" पाहिला आहे हे सांगणे नामुष्कीच.>>> नावात अगदी भला थोरला रेड फ्लॅग दिसत असतानाही तु निर्धार करुन बघितलास..धुरधरचा योग माझाही येत नाहिये आणी स्पॉयलर पासुन पळताना नुसती दमछाक..इन्स्टा उघडायची सोय नाहि, तरी बर दुसर्या पार्टात हळदिकुन्कु साठीच गाण नाही.

"अगं अगं सूनबाई, काय म्हणता सासूबाई" हा पूर्ण पाहिला. अस्मिता, तू जिथे सोडलास त्या बारशाच्या प्रसंगानंतर काही मिनिटांत एक मोठा धक्का आहे. त्यानंतर सिनेमा बरा आहे. तरी काही नेहमीचे यशस्वी संवाद (खटकणारे) आहेतच. थोडी वेगळी कथा आहे एकूण.

मी पुढे सांगते :फिदी :

मुलगा आणि वडील दोघे मोठा लोखंडी पोस्टर बॅनर अंगावर पडून मरतात. सून माहेरी निघून जाते , पारंपरिक पद्धतीने पाणी तापवणारी सासू हातावर गरम पाणी पडून हात भाजतात म्हणून परदेशातली मुलगी सुनेला विनवणी करून पुन्हा आईकडे पाठवते . मग सुनेला एके दिवशी कळते कि ती प्रेग्नन्ट आहे. ऍबॉर्शन ला जाताना नेमकं सासू बघते आणि तिथे शिरून आम्हाला करायचं नाही असं ठाम सांगून पाळणा वगैरे ऑर्डर करते . आणि म्हणते तू फक्त जन्म दे मी त्याला नीट संभाळीन. मग दोघी घरी राहू लागतात . इतकं करून डोहाळेजेवणाला पोटात दुखून हिचे मूल जातेच . बॅनर बेकायदेशीर असल्याने सुनेने केस केलेली असते . (हि असली एक धडाडी दाखवावीत लागते, आय हॅव नथिंग टू लूज या अविर्भावात )
पुढे काय घडते माहिती नाही मी नाही पहिला .

अस्मिता Rofl

तुळशीला पिरियड मधे हात लावल्याने ती कोमेजून गेली म्हणून सासूने वर्क फ्रॉम होम मधे भर मिटींग मधे सुनेला ओढत नेणं
>>> ईईई. भारतात तीन तलाक उगीच बंद झाले. ते सगळ्या धर्मातल्या असल्या सासवांसाठी राखून ठेवले पाहिजे होते.

बरं ते बाळाचं काय प्रकरण? आपण सांभाळू म्हणजे काय? सुनेला मुव्ह ऑन करायचं असेल आणि नसेल तर जमणार मानसिक इन्वेस्टमेंट पुढच्या किमान २० वर्षांची तर?

एक तर नाव बघून मला भोंडल्यातल्या गाण्यांची आठवण झाली होती. पण ती आम्ही मज्जा म्हणून म्हणतो. नावावरूनच पिक्चर बघायचं नाही ठरवलं होतं. ऋन्मेषचा रिव्ह्यू वाचून नाव कथेला अजिबातच सुट होत नाही असं वाटलं होतं. आणि एवढा डिसोसन्स आहे तर काय पिक्चर असणार म्हणून बघितली नव्हता.

कधी कधी असं वाटतं जगात काय चाल्लंय आणि मराठी पिक्चर काय दाखवतात. बरं ती सत्य घटना दाखवायची होती तर आधीचा थिल्लरपणा का?

अस्मिता , माझ्या पापाचा घडा भरला होता की काय माहित नाही ..मी थिएटर मध्ये बघितला .आई आणि दोन माम्याना घेऊन गेलेले... माझं package काढू नकोस pls :haha:

सून्बाईसासूबाई पोस्टी वाचून इतकं समजलं की
पूर्वार्ध ख.सा.ना.सू.टाईप आहे (९०ज मधला, दया डोंगरे, अर्चना जोगळेकर, नितीश भारद्वाज, 'आधी शिरा, आधी ऑम्लेट' बालीश भांडण)
आणि
उत्तरार्ध माझं घर माझा संसार टाईप आहे. (रीमा लागू, मुग्धा चिटणीस, अजिंक्य देव, तरुण जोडपं लोकल ट्रेनमधून उडी मारून आत्महत्या करतं, नवरा मरतो, बायको वाचते, प्रेग्नंट असते, सासू तिला घरी परत बोलावते, सत्य घटनेवर आधारित) यातले सासू-सून मतभेद बालीश वाटत नाहीत, जरा तरी जेन्युइन वाटतात.

पिरियड मध्ये तुळस कोमेजली हे खरंच २०२६ मधल्या चित्रपटात आहे????>> हे प्रत्यक्ष पाळणाऱ्या उच्चशिक्षित शहरी बायका माझ्या ओळखीत आहे.

माझं घर माझा संसार>> हा सिनेमा पूर्वी टीव्ही वर दोनदा बघितला. दोन्ही वेळेस तेवढाच त्रास झाला.

ऋन्मेषचा रिव्ह्यू वाचून नाव कथेला अजिबातच सुट होत नाही असं वाटलं होतं.
>>>>
अरे माझा नाही रिव्ह्यू. मी नाही बघितला हा सासूबाई पिक्चर. तुम्ही क्रांतीज्योती विद्यालय म्हणत आहात का?

पिरियड मध्ये तुळस कोमेजली हे खरंच २०२६ मधल्या चित्रपटात आहे????>> हे प्रत्यक्ष पाळणाऱ्या उच्चशिक्षित शहरी बायका माझ्या ओळखीत आहे.>>>>माझ्याही

धुरंधर" पाहून त्यावर बोलत असताना तुम्ही "अगं अगं सूनबाई, काय म्हणता सासूबाई" पाहिला आहे हे सांगणे नामुष्कीच. पण गप बसणं त्याहून मोठी नामुष्की. धुरंधर पहायचा नेक इरादा असल्याने तिकडे स्पॉयलर्स टाळत वाचण्याचे खिप्परपाणी तरी किती वेळ खेळणार. सगळ्यांना वाटायचे तुम्हाला मत राहिले नाही, तुम्ही पूर्वी सारखे धटिंगण आणि भांडकुदळ नाही म्हणजे तुमच्यात दम नाही >>>:हाहा:

धमाल आहे पोस्ट Happy

दुश्मन देश मे जाकर जान पर खेलकर हमारे जासूस ने यह जानकारी भेजी है टाईप फिलिंग आलं अअसाकाम्हसू. ची पोस्ट वाचताना. Happy

म्हणजे तूच धुरंधर Happy

बरं झालं बाई,इथल्या comments वाचायच्या आधीच पाहिला मी अगंबाई सूनबाई...नाहीतर बघायची हिम्मतच नसती झाली. आवडला मला विशेष म्हणजे प्रार्थना आवडत नाही पण यातला तिचा अभिनय आवडला..स्टोरी खूप दमदार नाही पण निर्मिती आणि प्रार्थनाच्या अभिनयामुळे कंटाळा नाही आला उलट मजा आली.

मी एकदा पाहू शकले हा सिनेमा - एकतर दक्षिणाने जो ट्विस्ट लिहिला आहे तो मला अनपेक्षित होता. त्यानंतरही सिनेमामध्ये दोघी शेवटपर्यंत सर्व गोष्टींमध्ये struggle करताना दाखवल्या आहेत very badly struggling to cope with the reality and failing. बाळ दगावतं, केस हारतात. काही सुद्धा बरं घडत नाही. They are losers till the end. Raw situations चे snippets चांगले आहेत - मनु chatgpt ला प्रश्न विचारतेय वगैरे.
अनेक संवाद थेट आहेत. सासू प्रेमाने लाडू भरवताना मनु म्हणते की हे तुम्ही तुमच्या होणाऱ्या नातवासाठी करताय माझ्यासाठी नाही हे मला माहीत आहे. किंवा परदेशी राहून उंटावरून शेळ्या हाकणाऱ्या नणंदेला देखील ती योग्य सुनावते. निर्मिती सावंत मला फार आवडते आणि तिने फार छान काम केलं आहे.
परंपरा पाळणाऱ्या बायका यत्रतत्रसर्वत्र आहेत त्यामुळे त्याचे काही आश्चर्य वाटले नाही. काही cliché संवाद आहेत जे मी सोडून देऊ शकले.

मग तेही बंद करून कशातच काही अर्थ नाही हे लक्षात आल्याने "कैं दी पों, हुस्न है सुहाना, मेरे प्यार का रस जरा चखना" वगैरे पाहून झोपी गेले.

>>
जे ब्बात

नेक्स्ट टाईम मराठी काटा काढायला यातली मराठी गाणी ट्राय कर

- दोन रूपे (रुपये नाही, रूपे च) दोन रूपे दे रे मला खर्चाला पान सुपारीला, माहीम चा हलवा आणीन तुला अन् नाही खाल्ल्यास तर मारीन तुला (एकापेक्षा एक)
- नऊवारी नऊवारी नऊवारी / प्रेमासाठी झुकले खाली धरणीवर आकाश (खिचडी)
- ही दुनिया मायाजाल मनुजा जाग जरा (बनवा बनावी)
- कोठारे फेम पॅरडी गाणी (कुठलाही पाचाक्षरी कोठारपट)
- अशोक - लक्ष्या ची सो कॉल्ड रोमँटिक गाणी

तो बरिटो आवडला नाही तर त्यात चव सुधारायला दाण्याची चटणी किंवा कांदा लसूण मसाला घालतील आणि ते जोक वाढवतील. बरिटो नको, जोक आवर व्हायचं
>>
खोसला का घोसला मधला पीजा वर चटणी मागणारा अनुपम खेर आठवला

जिज्ञासाची पोस्ट वाचल्यावर अरेरे! झालं. इतके ट्विस्ट होते/ आहेत आणि जिज्ञासाने एकदा पाहू शकले लिहिलंय तर दुसरं काही नाही सापडलं तर एक दान देवाला देऊन बघेन.

मध्येच दिग्दर्शक आणि बाकीचे लोक बदलले का?

ते तुळस कोमेजली ऐकून धक्का बसल्यासारखं का दाखवताहेत मंडळी?

माझ्या नातलग मंडळींची एक ऑनलाइन मीट ग्रहण आहे म्हणून पुढे ढकलली.

हो हो. जिज्ञासा आणि दक्षिणा दोघींच्या पोस्टी वाचून मीही बघेन की काय वाटतेय. पुढे एवढा संघर्ष, दुःख म्हणजे माझ्या अपेक्षेपेक्षा वेगळ्या वाटेने गेला आहे. दोघेही मरून जातात, बाळही जातं म्हणजे भलत्याच अभद्र गोष्टी घडल्या नंतर. जरा एक्स्ट्रीम वाटलं कथानक.

ॲंकी, मला माहित होतेच आता असं काही येणार! Proud

शर्मिला आणि मंजूताईंना, मम. आहेत असेही लोक. मराठवाड्यात तर प्रचंड सोवळेओवळे पाळणारे लोक आहेत. पिक्चर मधे पाहायला मात्र बोअर झाले.
केया Proud
थॅंक्यू सर्वांना. Happy

मध्येच दिग्दर्शक आणि बाकीचे लोक बदलले का? >>> Lol

माझ्या नातलग मंडळींची एक ऑनलाइन मीट ग्रहण आहे म्हणून पुढे ढकलली >> भरत तुम्ही विचारलं नाहीत चंद्र सुर्यावरून कोण जॉईन करणार आहे म्हणून?

अशोक - लक्ष्या ची सो कॉल्ड रोमँटिक गाणी
>>> हृदयी वसंत फुलताना हे गाणं सोडून बोलायचं, हां, सांगून ठेवते Proud

मला आवडला हा चित्रपट.
अनेकदा चक्रमपणा वाटू लागलेला, पण असाच चक्रम प्रकार माझ्या ही वागण्यात घडत असतोच! पुढेपुढे जाताना काहीच हिंदी/ मराठी सिनेमां प्रकारे होत नाही. ना स्किन डीप समस्या आहेत ना त्यांना काही उत्तरे मिळतात. माझी जी जगण्याची जनरल फिलॉसॉफी आहे तिच्याशी मिळता जुळता होत गेल्याने ही असेल मला आवडला. कौटुंबिक सिनेमेच करायचेच असतील तर असेच चित्रपट मराठीत बनो वाटेल इतका आवडला.
मोक्षू आणि जिद्न्यासा ( सॉरी फोनचे डोके फिरले. नाही जमते नीट लिहायला) ला स्पेशल धन्यवाद. त्यांनी प्रामाणिक मत लिहिल्याने एक चान्स दिला. Happy
अस्मिता, चैन तो है अपना सुख है पराए! दोन रुपये आत्ता मांड. तू पुढे बघितलास आणि आवडला तर मग मात्र विसर ते २ रुपे. ( खर्चाला पान सुपारीला वापरू आपण!) Lol

जिद्न्यासा ( सॉरी फोनचे डोके फिरले. नाही जमते नीट लिहायल >> जे आय जे शिफ्ट वाय ए ए एस ए ए हे करून बघ.

त्यांना ग्रहण बघायचं असेल >> Rofl

काही ठिकाणी हिंदी प्रमाणे रुपांतर होत असेल तर Gyan लिहिल्यावर ज्ञान येते.
त्या धर्तीवर Jingyasa लिहून बघा जिज्ञासा उमटते का ते.
मी अश्या एका ठिकाणी हे ट्राय करून पोस्ट करत आहे.
आणि तिथेच व्हॉइस टायपिंग केले तर काही प्रॉब्लेम येत नाही. मी हल्ली तेच करतो.

वेलकम अमितव ,मला खरंतर या चित्रपटातला खरेपणा भावला. उगाच अपघातानंतर दोघींच नातं लगेच स्ट्राँग होतं,असं न दाखवता ते हळू हळू फुलवत नेलंय. ते बघताना खरंच मजा आली आणि याचं पूर्ण श्रेय निर्मिती आणि प्रार्थनाच्या अभिनयाचं आहे..शेवट सुद्धा अगदी सरधोपट न करता पैशांपुढे सामान्य माणसाचा निभाव लागत नाही हे कटू वास्तव दाखवलं आहे..

हो. अगदी!
त्यांची कुठलीच समस्या सुटत नाही, अगदी कु ठ ली च! पण लगेच एकदम हलाखीची वगैरे परिस्थिती निर्माण होत नाही की दरदर की ठोकरे खावी लागतील. त्या वन डे अ‍ॅट अ टाईम जीवन जगतच असतात. त्यात आनंदच शोधतात असं नाही, तर कधी डार्क ह्युमर, कधी भावनोत्कट आनंद, कधी राग, चिडचिड, दुस्वास, सगळं करतात पण अगेन वन स्टेप अ‍ॅट अ टाईम नॅव्हिगेट आणि कोर्स करेक्शन करत करत आयुष्य व्यतित करत असतात. तुम्ही म्हटलंय तसं नात घट्ट होतं पण हळूहळू शार्प एजेस घासुन गुळगुळीत होतात तसं. एकदम रंधा मारुन सपाट! असा प्रकार नाही.

निर्मिती सावंत जशी तुसडेपणे वागली तसेच लोक तिच्याशी वागतात. त्याने ती बदलली आहे हे तिच्या स्वभावातून जाणवते, हे बदल कधीकधी ती मानसिक रुग्ण आहे की काय वाटण्याइतकं होते तर कधी ती अंतर्मुख होत जाणवते. खरी सासू ही अशीच वागेल मला वाटतं. सर्वात काय आवडलं तर 'मी बदलले आहे' सारखे यडचाप संवाद, किंवा त्याहुन मूर्ख मराठीपणा म्हणजे नॅरेशन वगैरे अजिबात नाही.
बरं समस्या सुटत नाही म्हणून त्या गीतोपदेश वगैरे देत नाहीत की कर्मण्येवाधिकारस्ते करत नाहीत की सर्वसंग परित्याग करत नाहीत. चुकत माकत लॉजिक लावत, मन लावून आयुष्य जगत राहतात. ते मला आवडलं. अगदी वी लिसन बट वी डोन्ट जज पर्यंत वाटचाल होते.
अँड आय स्टँड करेक्टेड. प्रार्थनाने चांगलं काम केलं आहे, मला आवडला तिचा रोल आणि काम. निर्मितीचा केसांचा वीग काही तरी विचित्रच दिसतो.

Pages