Submitted by भरत. on 14 July, 2025 - 03:03
इथे महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर चर्चा व करू.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
इथे महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर चर्चा व करू.
मागे एक खरड आली आहे ना.
मागे एक खरड आली आहे ना.
आता वस्त्र कुणाला पाच मार्चला?
मागे कुणी तरी या धाग्यावर
मागे कुणी तरी या धाग्यावर मुम्बै तक चॅनेल ठाकरे बंधूनी कसे मॅनेज केलंय म्हणून गळा काढत होतं....पण हल्ली चॅनेल्स भलतीच बदमाश झाली आहेत हेच खरं...आता ट्रम्पने विश्वगुरुंच्या छातीकडे पाहून दडपून जाऊन, रशियाकडून भारताला ३० दिवस तेल घेण्याची परमिशन दिलीय खरी, पण हे भामटे न्युजवाले विश्वगुरूंना त्यांच क्रेडिट द्यायलाच तयार नाहीत लेकाचे....बातम्या कशा स्पिन करतात पहा.
महाराष्ट्रातले राजकारण -
महाराष्ट्रातले राजकारण - बारामती काका हरले तरी किंवा जिंकले तरी सर्व गमावून बसणार आहेत. दिल्लीतल्या घरी शमो शमो नमो जप.
आणि दादरचा किंग सगळ्यांच्या घरी पायधूळ झाडत आहे - नाना पटोळे
Fake Aadhaar and caste
Fake Aadhaar and caste certificates made in the name of Devendra Fadnavis and Eknath Shinde
AIMIM leader and former MP Imtiaz Jalil has claimed that there is a big scam in Maharashtra’s Ramai Awas Gharkul Yojana. Imtiaz Jalil alleged in the press conference that fraud worth crores of rupees is being done in the name of this scheme for the last several years in Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation. According to AIMIM leader Jaleel, the seriousness of this alleged scam is so much that even fake Aadhar cards, ration cards and caste certificates were made in the name of state Chief Minister Devendra Fadnavis and Deputy Chief Minister Eknath Shinde and on the basis of those documents, the money of Gharkul Yojana was embezzled.
कुठल्यातरी कीर्तनकाराने एका
कुठल्यातरी कीर्तनकाराने एका अल्पवयीन मुलिवर @त्याचार केला अशी बातमी आहे. आता पडळकर, राणे, जग्ताप हिन्दु जन आक्रोश मोर्चा कधी काढणार ?
अशोक खरात - महाराष्ट्राच्या
अशोक खरात - महाराष्ट्राच्या एप्स्टीन फाइल्स?
Captain Files !!
Captain Files !!
शिंदे- दादा गटाचे लोकं सापडणार, उगाच नाही सी एम नी आदेश दिलेत
महाराष्ट्र राज्य महिला
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांनी बलात्काराचा आरोप असणार्या खरातांच्या डोक्यावर छत्री धरणे, त्यांची पाद्यपूजा करणे आणि खरातच्या ट्रस्ट साठी ट्रस्टी म्हणून काम हे सर्वच धक्कादायक आहे.
https://www.freepressjournal.in/pune/video-of-rupali-chakankar-washing-f...
काहीही. यात काय धक्कादायक?
काहीही. यात काय धक्कादायक? पूज्य आसाराम बापूंना मंदिरांत व्ही आय पी ट्रीटमेंट मिळते. काल त्यांच्या प्रेरणेने सकल हिंदू समाजाने शोभा यात्रा काढल्या आणि विक्रम संवत २०८३ हे हिंदू नवीन वर्ष साजरे केले.
कुलदीप सिंग सेनगरच्या समर्थनार्थ एक महिला पुढे आली होती.
लागेबांधे असतात म्हणून छत्री
लागेबांधे असतात म्हणून छत्री धरतात. फळ मिळणार त्यांचे.
शिंदेसेनेच्या मंत्र्याला
शिंदेसेनेच्या मंत्र्याला पोलिसांनी हाणलं म्हणे?
हा उठाच्या राज्यात गृह
हा उठाच्या राज्यात गृह राज्यमंत्री होता, 100 पोलिस त्याला सलाम ठोकायचे. आता 100 पोलिसानी फरफटत नेला आणि ठोकला म्हणून बोंबलत फिरतोय . फार लवकर न्याय झाला मिंध्ये सेनेचा
एकानाथ शिंदे स्वतःच्या
एकानाथ शिंदे स्वतःच्या तोंडाने स्वतःची काय लायकी राहिली आहे, ते सांगत आहेत.
https://www.youtube.com/watch?v=4FB8GU4rXhM
आदित्य ठाकरेंनी अगदी योग्य नाव दिलंय यांना.
तुम्हा सगळ्यांच्या उत्साहाला
तुम्हा सगळ्यांच्या उत्साहाला सलाम.
महाराष्ट्र गेल्या सातशे आठशे वर्षात तसाच आहे राजकारणाच्या बाबतीत.
पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धानी आपल्याला थोडी नवीन मूल्ये दिली जी सर्वच जगात पोचली होती.
तरीही बेसिक कोअर बदलला नाही. का व्यर्थ वायफळ चर्चा करता तुम्ही लोक?
@रॉय,
@रॉय,
तसा म्हणजे कसा? २०१४ नंतर काहीच बदल झाला नाही असे म्हणायचे आहे का?
बा़की संधीसाधूपणा, भ्रष्टाचार हे सगळे पूर्वीपासूनच आहे. पण स्वातंत्र्योत्तर काळात काही दशके तरी लोकशाहीची मुल्ये पाळली जात होती.
जेंव्हापासून समाजकारण ते
जेंव्हापासून समाजकारण ते राजकारण ते सत्ताकारण असा प्रवास सुरु झाला तेंव्हापासूनच संधिसाधूपणा व भ्रष्टाचार उत्तरोत्तर वाढतच गेला आहे (यात उतार कधी जाणवलाच नाही).
२०२९ नंतर जरी सत्ताबदल झाला तरी यात फरक पडेल याची लेखी हमी आज कोणी देऊ शकेल?
संधिसाधूपणात संधी देणारा जेव्हढा दोषी आहे तेव्हढाच संधी साधणारा पण दोषी असतो कि नाही?
बाकी सर्वपक्षीय सत्ताकारण्यांबद्दल माझी मते अतिशय तीव्र आहेत जी येथे लिहू शकत नाही
सुप्रिया ताई, लवकर तुमचा पक्ष
सुप्रिया ताई, लवकर तुमचा पक्ष वहिनीबाईंच्या पक्षात विलीन करा आणि देवाभाऊंसोबत मेवा खायला जा.
ठाण्याच्या एका मुलीने एक
ठाण्याच्या एका मुलीने एक विडंबन कविता केलेली होती ती आपल्यावरच आहे हे असा राग धरून खटल्यात गुंतवलेलं होतं. पण आता पवार काकांना दोघांनी धरून चालवावं लागतंय, बोललेले समोरच्याला समजतही नाही तरी खुर्चीचा काय तो सोस आणि ती मिळवण्यासाठी सुप्रिया ताईंनी किती उंबरठे झिजविले. बाबा महाराजांकडे गेले नाहीत इप्सित साध्य करायला हे खरं आहे पण काय तो अट्टाहास. सुप्रिया सुनेत आणि प्रियांका चतुर्वेदी यांची खुर्ची गेली.
सुप्रियाताईंना लवकर घ्या
सुप्रियाताईंना लवकर घ्या तुमच्यात. दीड पाऊल आल्याच आहेत. आता तटकरेपण जरा नरमलेत.
म्हणजे शिंदेसेनेला ठोकायला आणखी जोर मिळेल.
शंभुराजे देसाईंना धुणारा पोलिस अधिकारी आधीही वेगवेगळ्या प्रकरणांत गाजलेला आहे. देवाभाऊंचा खास असावा.
आता एकदा दस्तुरखुद्द शिंदेंना फटके बसताना दिसायचं तेवढं शिल्लक आहे. हे शिंदे म्हणे २०१९ च्या आधी खिशात राजीनामे घेऊन फिरायचे. आता कोण त्या फाइलींत नावं आहेत म्हणून असे लाचार झालेत की मिळेल त्या खुर्चीला चिकटून बसायचंच अशी गत आहे का माहीत नाही.
त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी २०२२ मध्ये सरळ राजीनामा दिला होता, त्याचं पुन्हा कौतुक वाटतं.
बरं २०१९ मध्ये मुख्यमंत्रीपद निवासस्थान सोडायच्या आधी तिथे कसले विधीबिधी झाले होते ना?
ही बातमी सोशल मीडियावर दिसत
ही बातमी सोशल मीडियावर दिसत होती, तोवर फार लक्ष दिलं नव्हतं. आता लोकसत्तेने पहिल्या पानावर छापली आहे.
: रेल्वे विभागाच्या शून्य आधारित वेळापत्रक धोरणामुळे राज्यातील अनेक महत्त्वाच्या रेल्वेगाड्या बंद करण्यात आल्या आहेत, तर काही रेल्वेगाड्यांचे मार्ग अंशत: रद्द केले आहेत. राज्यांतर्गत रेल्वेगाड्या बंद केल्या असल्या तरी उत्तर भारतासाठी मात्र मुंबईतून रेल्वेगाड्या सोडण्यात येत आहेत.
या गाड्या बंद…
मुंबई-कोल्हापूर सह्याद्री एक्स्प्रेस, मनमाड-मुंबई गोदावरी एक्स्प्रेस, भुसावळ-मुंबई पॅसेंजर, पुणे-कर्जत-पनवेल पॅसेंजर, मुंबई-विजापूर पॅसेंजर, पुणे-पनवेल पॅसेंजर आणि पनवेल मार्गे धावणारी पुणे-भुसावळ एक्स्प्रेस दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद करून दिवा-रत्नागिरी रेल्वेगाडी सुरू
या गाड्या सुरू…
दादर ते गोरखपूर, दादर ते बलिया, एलटीटी ते सहरसा अमृत भारत, पनवेल ते अलिपूरद्वार अमृत भारत.
रेल्वे प्रशासनाने उत्तर भारतात जाणार्या विशेष रेल्वेगाड्यांच्या संख्येत वाढ केली आहे. नुकताच होळी आणि उन्हाळी विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात येत आहेत. मात्र, यातही दुजाभाव करण्यात आल्याचे दिसून येते. राज्यातंर्गत रेल्वेगाड्या साप्ताहिक चालवण्यात येतील, तर उत्तर भारतात जाणार्या रेल्वेगाड्या दररोज, आठवड्यातून तीन ते चार वेळा चालवण्यात येण्याचे नियोजन केले आहे. सीएसएमटी ते मडगाव, एलटीटी ते मडगाव या रेल्वेगाड्या साप्ताहिक चालवण्यात येतील. तर सीएसएमटी ते गोरखपूर, एलटीटी ते दाणापूर या रेल्वेगाड्या दररोज चालवण्यात येतील. तसेच दादर ते गोरखपूर आठवड्यातून चार वेळा, दादर ते बलिया आठवड्यातून तीन वेळा चालवण्यात येतील.
आता यावर कोणी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी विमानतळे झाली आहेत आणि उडान योजने अंतर्गत मराठी लोक विमानानचे प्रवास करत असल्याने रेल्वेगाड्या रिकाम्या जात होत्या, असं लिहू शकेल.
दादर रत्नागिरी गोवा किंवा सावंतवाडीपर्यंत वाढवता आली असती.
आता महाराष्ट्राची भाषा हिंदी करून टाका.
https://www.facebook.com/reel
https://www.facebook.com/reel/1768812714100489
शंभुराजे देसाई विधानसभेत सांगताहेत पोलिसांनी किती छान मारलं. राकॉच्या मंत्र्यालाही हाणलं म्हणे.
https://www.facebook.com/reel/1768812714100489
मोदींना लोकसभेत जायला भीती वाटते. महाराष्ट्रात मंत्री असुरक्षित.
(No subject)
(No subject)
१.राष्ट्रवादीचे दोन्ही गट
१.राष्ट्रवादीचे दोन्ही गट चालवण्याची जबाबदारी भाजपने उचलली आहे.
२. शिंदेचे राजकारण आणि मुलुखगिरी वाखाणण्याजोगी आहे.
३. महाराष्ट्राचा कैवारी कुणी रेल्वेत राहिलेला नाही. दिलेल्या गाड्या करोनात बंद झाल्या त्या पुन्हा सुरू केल्याच नाहीत.
४. हल्लीच एक नवीन एक्स्प्रेस पनवेल _ रत्नागिरी सुरू केली होती तीही काढून टाकली.
५. महाराष्ट्रातील रेल्वे प्रवासी संघ फक्त रेल्वे अधिकाऱ्यांच्या मुलाखती घेऊन खास सरकारी ढंगाचे प्रचारकी पोवाडे ऐकणे, आम्ही कशी त्यांची मुलाखत आयोजित केली वगैरेंचे श्रेय घेण्यापुरतेच उरले आहेत. एरवी भजने.
६. उप्र आणि बिहारसाठी अनारक्षित फास्ट एक्स्प्रेस चालवतात पण एक पॅसेंजर ट्रेन महाराष्ट्रात चालवता येत नाही.
७. पुण्यासाठी पुण्यापर्यंत धावणाऱ्या एक्स्प्रेस आहेत तशा नाशिकसाठी नाहीत.
८. महाराष्ट्रातील कोकणपट्टीसाठी कोकण रेल्वेच्या फक्त तीन गाड्या आहेत.
९. गणपतीच्या दिवसांत दिवा ते चिपळूण जाणारी लोकल गाडी कायम चालू ठेवत नाहीत.
शिंदेंचं आतापर्यंतच बेस्ट
शिंदेंचं आतापर्यंतच बेस्ट भाषण
असा बाणेदारपणा टिळकांनीही दाखवला नव्हता.
--
हल्ली ते रवींद्र चव्हाण दिसत नाहीत.
शिंदे (आणि अजित पवार) मनाला
शिंदे (आणि अजित पवार) मनाला भिडणारं बोलतात. उद्धवसाहेब हा उल्लेख आवडला.
----------
सध्या रविंद्र चव्हाण आणि फडणिसांचं काही बिनसलं आहे. ते बहुतेक डोंबिवलीत चव्हाण विरुद्ध श्रीकांत असा खोडा पडला आहे. डोंबिवलीत स्टेशनजवळच्या सर्व फेरीवाल्यांना हाकललं आहे , बहुतेक हप्ता बंदी.
रेल्वेगाड्यांबद्दलची बातमी
रेल्वेगाड्यांबद्दलची बातमी वाचली. त्यात मूळ कारण वेगळेच असावे पण दादर-रत्नागिरी च्या जागी गोरखपूर एक्सप्रेसला वेळ दिल्याने अनेकांना यातून "ष्टोरी" बनवता आली आहे असे सोशल मीडियावरून दिसते (भरत तुम्ही लोकसत्ताच्या बातमीवर विसंबून लिहीले आहे, त्यामुळे माहिती व त्यावरचे आरोप यात तफावत असली तरी हे तुम्हाला उद्देशून नाही). एकतर सह्याद्री, गोदावरी वगैरे गाड्या आधीच बंद केल्या गेल्या होत्या. २-३ वर्षे झाली. मधल्या काळात सुरू होत्या का कल्पना नाही. यातील बर्याच गाड्या कोव्हिडकाळानंतर पूर्ववत झालेल्या नाहीत. दादर-गोरखपूर अचानक आत्ता सुरू झालेली नाही. गेली तीन वर्षे तात्पुरती सेवा म्हणून सुरू होतीच.
रेल्वेने उत्तरेला झुकते माप देणे हे कायमच चाललेले आहे. गेल्या काही वर्षांत आय आय टी ने तयार केलेल्या झीरो बेस्ड टाइम टेबल द्वारे अनेक बदल सुचवले आहेत, त्यातलाच हा एक दिसतो. पण लोकांच्या हिताचा नाही. रेल्वेगाडीतून किमान पन्नास लोक उतरत असतील तरच त्या स्टेशनवर थांबा असायला हवा असली समीकरणे सार्वजनिक सेवेत चालत नाहीत. त्यामुळे कोकणातल्या लोकांकरता थेट दादरहून गाड्या असायलाच हव्यात यात वाद नाही.
मात्र या बातमीला हे कोणत्यातरी गायपट्टा षडयंत्राचा भाग आहे असे दाखवले जात आहे ते खरे वाटत नाही. काही सोयीचा डेटा वापरून स्टोरी बनवली आहे. बाकी रेल्वेच्या बाबतीत महाराष्ट्राला दुजाभाव स्वातंत्र्यानंतर रेल्वेचे नवीन विभाग झाले तेव्हापासून आहे. त्यात काही नवीन नाही. याउलट गेल्या दहा बारा वर्षांत महाराष्ट्रातील (आणि देशातील) अनेक नवीन मार्गांवर गाड्या सुरू झाल्या आहेत. अफाट वेगाने विद्युतीकरण झाले आहे. हे गेल्या दहा बारा वर्षांत ज्या वेगाने झाले आहे तितक्या वेगाने आधी कधीच झाले नव्हते. याचे श्रेय सरकारला आहे, की रेल्वेच्या अधिकारी, नियोजन वगैरे करणार्यांना, मला माहीत नाही. कोणालाही द्या. मला जे चित्र दिसत आहे त्याबद्दल मी लिहीले.
आज दौंड बारामती, पुणे-कोल्हापूर सारख्या मार्गांवर इतर ठिकाणसारखीच विद्युत इंजिने धावतात. कोकण रेल्वेचेही तेच. हे सगळे भाग दशकानुदशके दुर्लक्षित होते. कोल्हापूर तर आधी दक्षिण-मध्य रेल्वेचा भाग असल्याने तेथे काहीच बदल होत नव्हते, कारण त्या विभागाचे सगळे लक्ष आंध्र कडे होते. एक सिंगल लाइन, दिवसातून ७-८ संथ गाड्या, इतकेच कोल्हापूरच्या वाट्याला होते. तेथे राहणारे जास्त अचूक सांगू शकतील आता किती फरक पडला आहे. मध्यंतरी नगरहून बीड मार्गे परळी वैजनाथला रेल्वेचे काम चालू झाले. त्यातला बीडपर्यंतचा भाग पूर्ण झाला आहे. पुण्या मुंबईहून त्या भागात जाताना रेल्वेचा वापर कधी ऐकला नव्हता (एक दोन गाड्या आहेत, मुंबई लातूर). आता काही वर्षात कॉमन होईल. औरंगाबाद, नगर, लातूर, नांदेड, आणि फलटण, लोणंद सारखी गावे ही "रेल्वेच्या जाळ्यात" फारशी नव्हती. यातील काही ठिकाणी तुरळक गाड्या असतीलही. रेल्वेचे प्लॅन्स पाहिले तर पुढच्या ५-१० वर्षांत यातील अनेक ठिकाणी चित्र पूर्ण बदलेल.
गेल्या १२ वर्षात रेल्वेचे
गेल्या १२ वर्षात रेल्वेचे अनेक नवीन प्रकल्प राबविण्यात आले आहेत. रेल्वे स्टेशन्स सुशोभीकरण आणि सोयीसुविधांचे आधुनिकीकरण झाले आहे.
फारेण्ड , काही मुद्द्यांशी
फारेण्ड , काही मुद्द्यांशी सहमत. सुविधा वाढल्यात हे नक्की.
त्या बातमीला पोलिटिकल टोन आहे म्हणूनच ती या धाग्यावर दिली आहे.
Key Features of Zero-Based Timetabling:
Justified Operations: Every train and halt is added only if it is scientifically justified, ensuring high demand and commercial viability.
कोकण रेल्वेने प्रवास करणार्यांना हे सांगितले तर ते रेल्वेखाली जीव देतील.
या बातमीचा दुसरा अर्थ असा की यु पी बिहारमधून महाराष्ट्रात येणारा ओघ अजूनही वाढताच आहे. देवाभाऊंनी बिहारी लोकांना पुढची छठपूजा
मुंबईच्या चौपाट्यांवर करा असं प्रेमाचं आमंत्रण दिलं आहे.
बिहारी लोक आमच्याकडे दिवाळीला या असं आपल्याला सांगतील का?
--
सिंधूताई, सध्याचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव हे भाजपचे महाराष्ट्र प्रभारी आहेत .
----
अशी ही सातार्याची तर्हा. सातारात जिप अध्यक्ष म्हणून निवड झालेल्या बाई शिंदेसेनेच्या आमदाराची पत्नी आहे. ती नुकतीच भाजपमध्ये गेली. आणि तिच्यासाठी शिंदेंच्या मंत्र्याने - माजी गृहराज्यमं त्र्याने मार खाल्ला.
भाजपला साधा जिप अध्यक्ष करायला मूळ भाजपवाला मिळत नाही, हे लिहून काही उपयोग नाही.
--
शिंदेंच्या मंत्र्यांला बडवलं.पोलिसांनी. पोलिस येतात गृहमंत्रालयाच्या खाली. गृहमंत्री देवाभाऊ.
आणखी गंमत. त्या पोलिस अधिकार्याला सस्पेंड करा असा आदेश मर्चिडीज फेम नीलम गोर्हेंनी दिला. तो सभापतींनी स्थगित केला.
>>गेल्या १२ वर्षात रेल्वेचे
>>गेल्या १२ वर्षात रेल्वेचे अनेक नवीन प्रकल्प राबविण्यात आले आहेत. रेल्वे स्टेशन्स सुशोभीकरण आणि सोयीसुविधांचे आधुनिकीकरण झाले आहे.>> कुर्ला आणि वांद्रे टर्मिनस चांगले केले परंतू दादर पश्चिम रेल्वे टर्मिनस आणि सेंट्रल रेल्वे टर्मिनस १९६० पासून जसे आहे तसेच आहे. शिवाय रात्री अकरा बाराला सुटणाऱ्या गाड्या जिथे कुठे दिवसभर यार्डात पडून असतात तिथून भरपूर डास घेऊन येतात.
सगळ्या नव्या LHB coach असणाऱ्या नव्या डब्यांच्या गाड्या उप्र आणि बिहारला दिल्या आहेत. गुजरात सौराष्ट्र कच्छला एकही नव्या दिल्या नाहीत. कोकण रेल्वेची पहिली गाडी मंगलोर 12133/34, 12619/20 एक्स्प्रेस अजूनही १९९५ चीच आहे. टॉयलेट्स युनिट्स फार वाईट अवस्थेत आहेत.
Pages