महाराष्ट्रातील राजकारण

Submitted by भरत. on 14 July, 2025 - 03:03

इथे महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर चर्चा व करू.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>पक्ष त्वरीत थोरल्या पवारांच्या अखत्यारीत गेला असता जे काही नेत्यांना नको होते.<<
पण हल्लीच्या घडामोडि वरुन अजित पवारांची तीच (अंतिम) इच्छा होती, असं पिल्लु सोडलेलं आहे त्याचं काय? जानेवारी महिन्यात या विषयावर ८-१० वेळा बैठका झाल्या, आणि अजित पवारांनी त्यांच्या पक्षातल्या नेत्यांशी चर्चा केली, असं शरद पवार गट म्हणतोय तर अजित पवार गट फेटाळुन लावतोय. बुद्धिबळाच्या खेळासारखे शह्/प्रतिशह दिले जात आहेत; शेवटि चेकमेट कोण करेल हा प्रश्न सध्यातरी अनुत्तरीत आहे..

पवार कुटुंबियांकडुन १३व्या पर्यंत किंवा नंतर विस्मयकारी बातमी ऐकण्याची तयारी ठेउया...

पुढच्या निवडणुकीत
सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होतील असे मला वाटते.
काँग्रेसची खूप मंडळी सुनेत्रा पवारांकडे जातील, आणि राष्ट्रवादी + शपा + काँग्रेस = राष्ट्रवादी (सु) किंवा 'सुराष्ट्रवादी' असा एक मोठा पक्ष उदयाला येईल.
सुराष्ट्रवादी + भाजप हे मिळून सत्ता स्थापन करतील त्यात सुनेत्रा पवार या मुख्यमंत्री होतील. मामुंना केंद्रात घेतले जाईल कारण तिथे भाजपचे संख्याबळ घटणार आहे.

राष्ट्रवादी ( शप) याला काही अर्थ उरलेला नाहीये. त्यांच्याकडचा एकजण घड्याळ गटात जाईल आणि मग मोठी रांगच लागेल. म्हणजे त्यातील नेते एकेकटे प्रवेश करतील. त्यांचा अगोदरचे राजकीय स्थान शून्य होईल.
जोपर्यंत कोणत्याही सह्या होऊन करार निवडणूक आयोगाकडे जात नाही तोपर्यंत गप्पाच असतात. तुतारी गट संपूर्णपणे घड्याळ गटात राष्ट्रवादीत जाणे अपरिहार्य आहे. आणि त्याचे पुढारीपण सुप्रियाला घ्यावे लागेल. परंतू त्यांना आत घ्यायचे का नाही हे शेवटी घड्याळाच्या समितीने ठरवल्याशिवाय काहीही होणार नाही. कौंटुबिक सख्य वेगळे आणि कागदोपत्री करार वेगळे असतात.
भाजपासह युतीबद्दल बोलायचे तर ते राष्ट्रवादी ( शप) गटास ओळखत नाहीत.
आणि गंमत पाहा काल अदाणी आणि पवार काकांची भेट झाली. बाहेरून दबाव?

>>सुराष्ट्रवादी + भाजप हे मिळून सत्ता स्थापन करतील >>
आताची राजकीय परिस्थिती पाहता भाजपा कशाला सुराष्ट्रवादी ( किंवा आणखी काही गट)त्या समोर नाक घासत जाईल?
भाजपाला जेव्हा उतरती कळा लागेल. ( आणि ती लवकरच लागावी अशी बऱ्याच जणांची इच्छा आहे ) तेव्हा पक्षांना एमाइएमसमोर नाक घासत किंवा हात रुमालात बांधून हजर व्हावे लागेल. हे दिवस फार दूर नाहीत.

शरद पवार भाजप चे मंद नेते नी अंधभक्त कार्यकर्ते ह्यांच्या डोळ्यात धुळफेक करण्यात कमालीचे यशस्वी झाले आहेत, मुळात घड्याळ गट वेगळा काढून भाजप सोबत पाठवण्यात त्यांचाच हात होता, काही झाले त्वरी प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, तटकरे ही लोक शरद पवारांना सोडून जाणारी नाहीत! पवारांनी आपल्या गटावरील ईडी ची चौकशी टाळलीच पण सत्तेचा मलिदही मिळवला!

भाजप चे संसदेतले बहुमत खूप कमी होइल त्यामुळे त्यांना महाराष्ट्रात नमते घ्यावे लागणार आहे. म्हणून सुराष्ट्रवादी सत्तेत येईल.

त्यांना शिंदेसेनेचे लोक आवडत नाहीत.

त्यामुळे केंद्रामध्ये विनाशर्त पाठिंबा आणि राज्यांमध्ये मोकळे रान असे बार्गेन करणे सुनेत्रा पवारांना करावे लागेल आणि त्या यशस्वी होतील असे मला वाटते. गृह खाते बीजेपीला मिळाले की बीजेपीला मुख्यमंत्री पदाचे फारसे नाही पडलेले.

भाजप समर्थकांचं कधी कौतुक वाटतं. कधी कीव येते,

आपल्या सरकारच्या कारभारावर बोलतील तर शपथ. कुठल्याही निवडणुका झाल्या की जितम् मया करत मांड्या थोपटत हजर होतात.
आता मनपा निवडणुकांतल्या निकालाने तीही सोय ठेवली नाही. रवींद्र चव्हाणांना त्यांच्याच जिल्ह्यात दोन मनपांत शिंदेसेनेने जमिनीला नाक लावायला लावलं. लातूरमध्ये जाऊन विलास राव देशमुखांच्या आठवणी पुसणार होते. तिथे लोकांनी कोण रवींद्र चव्हाण असं विचारलं.

मनपांचे निकाल लागून १५ दिवस झाले.तरी अजून एकाही ठिकाणी साधा महापौर ठरला नाही. मुंबई मनपा प्रशासकाच्या हाती असल्याला ४ वर्षे होतील.

आता अजित पवार गेल्यावर भाजपने पेपरांत पानभर जाहिराती दिल्यात. तिकडे शरद पवार अजित पवारांचे आमदार पळवतील म्हणून यांना धास्ती पडली आहे. मुस्लिम द्वेष आणि पवार द्वेष यात महाराष्ट्रात तरी पवारद्वेषाचं पारडं जड.
दोन राकॉच्या विलिनीकरणाच्या चर्चा तरी दिवसांनी करा , प्रथा पाळा म्हणून सांगतात. तेच उपमुख्यमंत्रीपदासारख्या असंवैधानिक पदाची शपथ पवारांची पत्नी ते गेल्यापासून ४ दिवसांत घेते याबद्दल सारवासारव करतात. आता तर व्यवस्थित मंत्रीमंडळ आहे. हवाच तर आणखी एक उपमुख्यमंत्री आहे. अजित पवार गटाचे मंत्रीही आहेत. त्यातल्या एकाला गटनेता करता आलं असतं. पण शरद पवारांची भीती. यानिमित्ताने राकॉच्या आमदारांना गौहाटी व्हाया सूरत जाऊन काय हाटिल काय डोंगर बघायची संधी होती, खरं तर. दु:ख निवारण करण्यासाठी जातोय असंही सांगता आलं असतं.

आताच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल २३ नोव्हेंबरला लागले. फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ ५ डिसेंबर म्हणजे निकालापासून बाराव्या
दिवशी घेतली. मंत्र्यांनी शपथ घ्यायला आणखी १० दिवस लागले. त्या तुलनेत आताची घाई पहा.

हे आहेच. लोकसत्ताचा अग्रलेखही यात सामील झाला आहे.
सुनेत्रावहिंनीनी चूक करून तर ठेवली, शप गट काय करतो पाहू. आमचं ठरलं होतं ठरलं होतं हे सांगत राहणार किती दिवस आणि कशासाठी? संजय राऊतांनीही आपली तोफ चालू केली आहे. राजना चिंता पडली आहेच की पटेल का पाटील . सगळीकडे नुसती हळहळ व्यक्त होत आहे.
फुटून गेलेल्या पक्षाची चिंता यांना कशाला?

देवेंद्र फडणवीस पुढं म्हणाले की, आम्ही हे ठरवलं होतं, आपण वेगवेगळे लढतोय, मी असं सांगितलं होतं, जिथं आपण लढतोय तिथं मैत्रीपूर्ण लढती आहेत, असं समजूयात. मी आतापर्यंत संयम पाळलाय, त्यांचा संयम थोडा ढळलाय, कदाचित निवडणुकीतील स्थिती पाहून दादांचा संयम कमी झालेला वाटतोय. ते 15 तारखेनंतर नाही बोलणार असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

कोणताही परिवार एकत्र येत असेल तर मला आनंद आहे. राज ठाकरेंनी मला क्रेडिट दिलं याचा आनंद वाटतो. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न होतं ते दोघे एकत्र येत असतील तर त्याचा आनंद मला आहे, त्याचा मला आशीर्वाद मिळेल. बहीण आणि भाऊ एकत्र आलेत का याचा अंदाज मला नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. ११ जानेवारी.

अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत भाजपने भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता. मात्र, अजित पवार यांनी सर्वप्रथम स्वत:च्या पक्षाकडे पाहिले पाहिजे. ते नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील पक्षाबद्दल बोलत आहेत, हे त्यांनी ध्यानात ठेवावे. खरं तर आरोप प्रत्यारोप कसे करावेत हे त्यांनी ठरवले पाहिजे. आम्ही कधी आरोप करायला गेलो तर त्यांना फार अडचणी निर्माण होतील, याची त्यांनी काळजी घेतली पाहिजे, असे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी म्हटले. -३ जानेवारी

आपल्या लाडक्या मित्राबद्दल असं बोलतात होय?

या निवडणुकांत बरीच धुसफूस झाली होती.
महायुती ही लघूयुती कधीही होऊ शकते. शिंदे भाजपाला धाकात ठेवायला यशस्वी झाले होते तसंच अजितदादांना ही वाटू लागले असेल. पूर्वी मातोश्रीवर जसे दिल्लीचे नेते नाक घासत जायचे तसे ते बारामतीत किंवा सिल्वर ओकवर यावेत असं पवार काकांनाही वाटत होते . म्हणजे अजितदादांना आपल्याकडे वळवून ते साध्य करता येईल ही काकांची खेळी होती. त्यामुळे विलिनीकरण सभांना अजितदादाच दिसताहेत. परंतू याला इतर आमदारांना विचारावे लागणार होतं.
जी पलटी मारायची होती त्याची जरा सुरुवात म्हणता येईल असे काही आरोप भाजपावर झाले होते. तरी सत्तेतलं स्थानही डळमळीत करून घ्यावं लागणार होतं अशी दुहेरी अडचण.
आणि शेवटी काय झालं तर सह्या झालेले कागद कुठे आहेत? म्हणजे या दिवसाला तरी ते नाहीत. मग तो मुद्दा वारंवार का उगाळत आहेत पवार गट?
तटकरे यांनी काही उत्तरं दिली किंवा उकल केली आहे आज.

ही परिस्थिती मांडली आहे या भावनेने
https://youtu.be/NWxEX952w2A?si=TtwlwJzDtSjmq-v8
काय करायचे हे शरद पवार गटाला प्रश्न पडला आहे. पण एक नक्की आहे की श्रेय घ्यायचे आहे. महाराष्ट्रातील सर्वेसर्वा तेच आहेत.

भाजप द्वेष्ट्या लोकांची दातखिळी बसलेली दिसते! चालायचंच! परिस्थितीच बिकट आली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत निवडणूका देखील भाजप आणि मित्र पक्षांनी खणखणीत जिंकल्या.
अजित दादांच्या चितेवर आपल्या स्वार्थाची पोळी भाजून घ्यायचे मनोरथ रचणारे बारामतीचा जाणता राजा, त्याची लाडकी राजकन्या आणि अन्य संधीसाधू शप गटाचे लोक आता गप्प झाले असतील अशी आशा करतो! (जाणती राजकन्या अजितदादांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी एखादा लग्न समारंभ असावा आणि त्यात मानाची करवली असावी अशा आनंदात वावरत होती हे अनेक लोकांना खटकले!)

आँ?

मनपनिवडणुकांच्या निकालानंतर गायब झालेले उगवले.

आता पुन्हा गायब व्हा.

बुद्धिबळ खेळांच्या स्पर्धा होतात. त्यामध्ये कधीकधी एकच पूर्वीचा विजेता अनेक जणांशी एकाच वेळी खेळतो त्याची आठवण झाली. केंद्रात एक डाव ..आपल्या प्याद्याचा वजीर करणे, राज्यात फडणविसांशी खेळून त्यांना दमवणे, राज्यात दुसरा एक डाव - राष्ट्रवादी सोडून गेलेल्यांना हरवणे . असे तीन डाव पवार काका खेळले.

आनंदात वावरत होती >>> घ्या!! उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यायला धावणाऱ्या वैनीबद्दल पण लिवा की दाजी

>>
मनपनिवडणुकांच्या निकालानंतर गायब झालेले उगवले.
<<
महाराष्ट्रातील राजकारण हा विषय आणि ह्या निवडणुका झाल्या, निर्णय आले तरी इथे स्मशानशांतता ?
केवळ भाजप द्वेष्टे सुन्न झाले म्हणून इथे सन्नाटा ?
ठीक वाटले नाही म्हणून लिहिले!
असो.

>>
घ्या!! उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यायला धावणाऱ्या वैनीबद्दल पण लिवा की दाजी
<<
लिहितो की! पुरोगामीत्वाचे ढोल बडवणारे थोरल्या पवारांचे चमचे अचानक सुनेत्रा बाईंनी सुतक का नाही पाळले? दिवस का नाही पाळले? वगैरे टाहो फोडू लागले. असेच चालू राहिले असते तर त्यांनी केशवपन करुन लाल आलवण नेसून कोपर्यातील केरसुणीप्रमाणे वावरावे असेही म्हणायला कमी केले नसते!
ज्या बाईंना ४० वर्षे पवार घराण्यात सून म्हणून वावरत असताना हे बाहेरचे पवार म्हणून हिणवण्याचे दुष्कृत्य पवारांनी केले त्यांना इतकी सहज क्षमा केली जाणार नाही. आणि हा त्वरेने केलेला शपथविधी ह्या सूडाचाच पुढचा अध्याय आहे. दोन तुकड्यांचे एकीकरण होणे विसरा असा पवारांना दिलेला संदेश आहे. दु:ख विसरून, मन घट्ट करून कर्तव्य म्हणून उचललेले पाऊल आहे.
पवार अतिशय खुनशी वृत्तीचे कसे आहेत आणि खालच्या पातळीवर कसे उतरतात ह्याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे त्यांनी सुनेत्राबाई पवारांना घातलेली ही अर्वाच्य शिवी!

आय वॉज मिसिंग धिस फन.

अहो, एस आर डी - तुम्ही शरद पवार गटाला सुतक पाळायचा सल्ला दिला होता त्याची पुन्हा आठवण करून देतो.

गचाळ आणि किळसवाणा धागा आहे. दोन्हीकडचे लोक भ्रष्टाचारी आहेत. दोन्हीकडच्यांनी निष्पापांचे जीव घेऊन ढेकर दिला आहे. दोन्हीकडचे दंगलीत सहभागी आहेत. अशा हलकट पक्षांची बाजू घेणारे लोक निर्लज्जपणे नैतिकतेचा आव आणून डुकरासारखे घाणीत लोळत राहतात. लोकांनाही माहीत आहे कि कुणीच धुतल्या तांदळासारखे नाहीत. पण या हलकट सुशिक्षितांना त्यांची बाजू लढवाविशी का वाटते ?

यांना भर चौकात उलटे लटकवून यांच्या ढुं**वर पोकळ बांबूचे फटके दिले पाहीजेत. लाजा सोडल्यात या डुकरांनी. भगवी बाजू बदनाम आहे पण तिचे समर्थक किमान शिवराळ भाषेचा वापर करत नाहीत. उर्मटपणा करत नाहीत. बाजू घेताना चुकतात पण ते वैयक्तिक जीवनात सज्जन आहेत.

बातम्या ऐकताना एकीकडे दुर्घटना (अपघात का घातपात ?) कशी झाली याची विविध माहिती, तर दुसरीकडे शपथविधी, पत्रकारांनी शरद पवार गट नेत्यांना विचारणे,त्यावरची उत्तरं असं दणका सुरू होता. मग आली तटकरेंची मुलाखत. त्यांनी आणखी माहिती पुरवली. कोणी विलिनीकरणाचं घोडं अगोदर दामटवलं किंवा डालगं उलटं करून कोंबडं बाहेक्ष काढलं हे सर्वच चक्रावून टाकणारी होतं. .
आता आणखी काल रोहित पवारांनी घटनेचं विश्लेषण केलं हा भाग पहिला झाला. तेराव्यानंतर ( म्हणजे पुरोगाम्यांचे विवेक सिंधु किंवा आणखी काही निर्णय सिंधू) लागू करणार आणि मोठा धडाका करणार. बाकी निर्णय दामटायला किंवा माथी मारायला सर्वांनाच कोणतेतरी धर्मग्रंथ आठवतात.
आणखी काय लिहू? जनतेनेही त्यांच्या परीने मतांचा कौल दिलाच.
आता काकांनी पाठीशी घातलेल्यांनाही मतदारांनी सोडले नाही. ते युकेला जाऊन राहतील का?

मुम्बै तक नामक शिवसेना, शरद पवार यांच्या प्रचारासाठी बनवलेले चॅनेल आता भाजप आणि मित्रपक्षांचा चौफेर विजय पाहून उर बडवणे, बांगड्या फोडणे, भाजपला अर्वाच्य शिव्याशाप घालणे एवढाच कार्यक्रम करत आहेत. तो जास्त मनोरंजक आहे!
पत्रकारिता न करता एका बाजूचा प्रचार करणार्या माध्यमावर अशी वेळ येणे अपरिहार्य आहे. जमिनीवरील वास्तव समजून घेणे आणि ते लोकांसमोर मांडणे ही पत्रकाराची कामे आहेत हे विसरले की असेच होणार.

थोरले पवार कफ झाला म्हणून (थोडक्यात, राजकीय कारकीर्द निराशाजनकरित्या संपत आल्याचे कळले म्हणून) रुबी हॉल ला येणे, रेवतीताईंची सोयरीक फडणवीस व गडकरी यांनी जमवून देणे, विलीनीकरण हा मुद्दा कधी नसणारच हे सामान्यांना सहज कळणे, सर्वत्र तुतारी मागे पडणे, सुप्रियाताई नेतृत्व करणार तरी कोणाचे हा प्रश्न उभा ठाकणे या पार्श्वभूमीवर रोहित पवार हळूहळू सुनेत्राजींच्या पक्षाच्या बाजूला कलणे हे समजण्यासारखे आहे.

विलीनीकरण - घड्याळ कशाला तुतारीत जाईल? आली तर तुतारीच विलीन व्हायला येईल हे कोणीही सांगेल. आणि निव्वळ तुतारी वाजणे आता शक्य नाही हेही जवळपास सिद्ध केले क्रूर जनतेने! तिकडे चंद्रपूरचे तिसरेच! पक्षाचे हाय कमांड काय म्हणतात हे ढुंकूनही न पाहता भाजपला पाठिंबा देऊन टाकला. राजसाहेबांच्या पक्षाची या सगळ्या गोंधळात परिस्थिती अशी झाली की अस्तित्वात राहावे की राहू नये हे कळत नाही.

घातपात - त्या भयंकर दुर्घटनेबद्दल कोणतेही विधान करणे नकोसे वाटते व बेजबाबदारीचे वाटेल. मात्र, घातपात असेलच तर त्याचा फायदा कोणाला झाला असता हेही सगळे जाणतात. त्यात तो फायदा तर बाहेरून येऊन पवार झालेल्यांनी होऊच दिला नाही.

जाऊ द्या. राजकारण हा एक खेळ आहे. चाली रचल्या गेल्या पण यश फिरकले गवसले नाही.
पवार आणि इतर कॉन्ग्रेस नेत्यांनी सहकार चळवळीतूनच महाष्ट्रात पाय घट्ट रोवले होते. काही कारणांमुळे ढिलाई झाली असेल त्यामुळे ताबा सुटत गेला असावा. इकडे मुंबईतल्या लोकांना फार बातम्या दिगंत नाहीत. मी फक्त पेपर आणि चानेलच्या बातम्यांवरून मत बनवतो.
पुन्हा लोकमत आपल्याकडे फिरवण्यासाठी खूप प्रयत्न विरोधी गट करतीलच.

ज्यांना नॅचरली करप्ट पार्टी म्हटलं , ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले , चक्की पिसिंगचं गाणं गायलं , ज्यांच्याशी अगदी आपद्धर्म म्हणूनही युती करणार नाही असं देवाभाऊंनी त्रिवार नाही म्हटलं, त्या अजित पवारांशी देवाभाऊंनी दोनदा गाठ बांधली आणि मग एकेकावरचे भ्रष्टाचाराचे आरोप आणि केसेस गुंडाळून ठेवले होते तेव्हा इथल्या भाजपायींच्या कळफल काला अर्धांगवायू झाला होता. आता दोन राकॉच्या एकत्र येण्याची चर्चा होतेय म्हटल्यावर तो बरा झाला.

शरद पवारांबद्दल काही विशिष्ट लोकांना वाटणारा इतका द्वेष पाहून पवारांबद्दलचा आदर वाढला.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ ह्यांनी असे विधान केले की टिपू सुलतान हा इसम छत्रपती शिवाजी महाराजांच्या तोडीस तोड वीर होता. ज्याप्रमाणे महाराजांनी मराठा साम्राज्य स्थापन केले तसेच टिप्यानेही केले.
आदरणीय शरद पवार सोडले तर कुठल्याही व्यक्तीची महाराजांशी तुलना करणे म्हणजे महापाप समजले जाते.
मालेगाव शहरी शांतिदूत गटाने महापौर पद पटकावले तेव्हा त्यांच्या ऑफिसात फक्त टिप्याची तसबीर लावली गेली. गांधी, आंबेडकर, फुले, नेहरू कुणी नाही. शिवछत्रपती तर नाहीतच नाहीत!
त्या एक तसबीरी भूमिकेचे समर्थन करण्यासाठी हर्षवायू सपकाळ उतरले आणि टिप्याचा पोवाडा गाऊ लागले आणि नको ते बोलून बसले!
एकंदरीत काँग्रेस ही एम आय एम च्या तोडीची मुस्लिम लांगूलचालन करणारी पार्टी आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले.
काही दिवसापूर्वी गिरीश महाजनांनी कुठल्याशा भाषणात डॉ आंबेडकरांचा उल्लेख नाही केला म्हणून काही स्वघोषित पुरोगामी खवळले होते. जवळपास त्यांना फासावर लटकवावे इथवर लोकांचा संताप संताप झाला होता. ह्याची आठवण होणे अपरिहार्य आहे.

Pages