Submitted by भरत. on 14 July, 2025 - 03:03
इथे महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर चर्चा व करू.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
इथे महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर चर्चा व करू.
नॅशनल confused पार्टी
नॅशनल confused पार्टी (शरदचंद्र राव दादाजी पवार साहेब)!
आता त्या पक्षातील धुरिणांना सध्या हे समजत नाहीये की आपल्याला काय हवे आहे आणि आपल्या पक्षातील दुसऱ्याला काय हवे आहे.
परदेशी नागरिक सर्वोच्च स्थानी नको म्हणून काँग्रेस फोडून, परत त्याच्याशीच दीड दशक राजकीय संसार करून वयाच्या ८५ व्या वर्षी 'मला राज्यसभेत पाठवा रे' हे एकीकडे!
तथाकथित मूळ पक्षात राहून अचानकच अपघाताबद्दल राजकीय भावनिक उमाळा आणून 'आता आणखी करू तरी काय' हे दुसरीकडे!
दादा गेला, आता मीच (मूळची) हा अविर्भाव जनतेस आवडत नाही हे कळल्यावर 'यंदा कर्तव्य आहे' वाल्यांची सोयरीक इथले मुख्यमंत्री घडवून आणतात का हे बघणारे तिसरीचकडे!
सुनेत्राजी चाळीस वर्षांपूर्वी बाहेरून येऊन व भयानक दुःख निदान वरकरणी मागे ठेवून कारभार सांभाळूही लागल्या.
एकूणच आदर वाढला.
साडेपाच वाजले. ऑफिस सुटायचा
साडेपाच वाजले. ऑफिस सुटायचा टाईम झाला. उठा ब्यागा भरा आणि पळत सुटा.
अजित पवार चक्की पिसिंग पिसिंग
अजित पवार चक्की पिसिंग पिसिंग, NCP Natuarally corrupt party राकॉ शी युती नाही नाही नाही या फडणवीस मोदींच्या वक्तव्यावर भाजप समर्थकांनी विश्वास ठेवलाच होता की. मोदींनी ७०००० को टींचं गाणं गायलं त्याच्या एका आठवड्यात अजित पवार एकनाथ शिंदेंचे मुख्यमंत्री झाले होते. तेव्हा भाजप समर्थक इतरांच्या मतपरिवर्तनाबद्दल बोलताना किती क्यूट दिसतात, ते काय सांगावे!
कॉंग्रेस पक्षाचे प्रवक्ते
कॉंग्रेस पक्षाचे प्रवक्ते श्री. हनुमंत पवार यांना दैनिक पुढारी कार्यालय, मित्र मंडळ चौक पुणे येथे भाजपचे तुषार दामगुडे याने बंदुकीचा धाक दाखवत मारहाण केली आहे
या आधी भाजप कार्यकर्त्यांनी (!) काँग्रेसच्या पुणे येथील कार्या लयावर दगडफेक केली होती.
गृहमंत्री देवाभाऊ आणि पुणेकरांचे अभिनंदन.
भाजपवाल्यांना सुनेत्रा
भाजपवाल्यांना सुनेत्रा पवारांबद्दल किती आदर आहे , पहा.
भाजप कार्यकर्ता हा शिस्तीसाठी , वरिष्ठांचे आदेश पाळण्यासाठी ओळखला जाणारा पक्ष आहे, हे सांगायला नकोच.
भाजपच्या गुंडांना माज आला आहे
भाजपच्या गुंडांना माज आला आहे, कायदा आपले काही वाकडे करू शकणार नाही वर आपल्याला वाचवायला आपले बाप बसले आहेत असे भाजपेयीना वाटते म्हणून गुंडगिरीला ऊत आला आहे!
टिल्लू नेपाळीने खुलेआम
टिल्लू नेपाळीने खुलेआम सांगितलं होतं की, आपला बाप देवगिरी वर बसला आहे , खुशाल हवं ते करा.
भाजपात वरून खाल पर्यंत तडीपार
भाजपात वरून खाल पर्यंत तडीपार, गुंड, मवाली भरले आहेत, त्यात अंधभक्त नीतिमत्ताहीन थेरडे सोशल मीडियावर लेंड्या टाकायला सतत तयार असतातच!
तुषार दामगुडे हे लोकमतच्या
तुषार दामगुडे हे लोकमतच्या एका कार्यक्रमात आपले मत मांडत होते. तेव्हा हणमंत पवार ह्या इसमाने त्यांना शिवीगाळ सुरू केली. "ए दामगुड्या! ए भाडखाऊ! पेशव्याची नाजायज औलाद" वगैरे वगैरे.
https://www.youtube.com/watch?v=G5Ovk_W8II4
आया बहिणीवरून शिव्या देणार असाल तर परिणाम भोगायची तयारी ठेवा.
पोलिस तपासात काय ते निष्पन्न होईलच. पण सकृतदर्शनी तरी हणम्या पवारने आपली पातळी सोडून शिवीगाळ केली आहे असे दिसते.
काँग्रेस हा गांधी विचारांवर चालणारा पक्ष आहे असे ऐकून आहे. आया बहिणीवरून शिवीगाळ करणे हे गांधीच्या परम पवित्र तत्त्वात कसे बसते हे जाणून घ्यायची मोठी उत्सुकता आहे! ह्याला गांधी शाब्दिक हिंसा मानत आणि ती न करण्याविषयी उपदेशामृत पाजत!
र्होईत्या पवार हा साळंत
र्होईत्या पवार हा साळंत असताना पेप्राची विमाने करून उडवत असे. पंचक्रोशीत त्येच्यासारकं इमान उडवनारा कुनी न्हौता. म्हनून त्येला पायलट इमान कसं उडवतो, कसं पाडतो हे येवस्तित म्हाईती हाय. त्यो म्हंतो ते सम्दे आरोप खरे हायंत.
काका आजोबांनी छू करून र्होईत्याला मिडियावर सोडला आहे.
भाजपी थेरडे इंदिरा गांधी,
भाजपी थेरडे इंदिरा गांधी, संजय गांधी ह्यांच्या हत्येबद्दल कॉन्स्पिरशी तयार करतात, पण मुंडे, अजित पवार ह्यांच्याबद्दल चकार बोलत नाहीत.
ह्या दामगुड्या ला माफी
ह्या दामगुड्या ला माफी मागितली तरीही काँग्रेसीनी सोडू नये, भाजपचे माजलेले गुंड सर्व मार्गानी ठेचून काढावेत! बंदुका दाखवायला काय ह्यांच्या बापाचा राज चालू आहे का?
महाराष्ट्रातील काही
महाराष्ट्रातील काही नेत्यांबद्दल एकच : अरेरे
हणम्याने असा आरोप केला आहे की
हणम्याने असा आरोप केला आहे की दामगुडेंनी पिस्तुल दाखवली. आरोप केला म्हणून लगेच तो सिद्ध होत नाही.
हणम्याने दामगुडे साहेबांना भाडखाऊ अशी शिवी दिली. पेशव्यांची नाजायज अवलाद अशी शिवी घातली.
भाडखाऊ म्हणजे घरातील महिलांना वेश्या बनवून त्यांची कमाई खाणारा. अशी गलिच्छ शिवी एका माध्यमावरून जाहीरपणे देणे हे सभ्यतेला धरुन आहे का?
चर्चेत काही संबंध नसताना पेशवे आणि त्यांची नाजायज अवलाद आणायचे काय कारण?
जहरी बामण जातीचा द्वेष कशासाठी?
गाईज गाईज गाईज लीसन नो पर्सनल
गाईज गाईज गाईज लीसन नो पर्सनल अटॅक. ओन्ली मजा मस्ती ह्याव ए फन. लाईफ इज गिफ्ट अँड वी ह्याव्ह टू मेक इट नीट अँड क्लीन. जय हिंद जय महाराष्ट्र
शाहू महाराजांनी आपल्याला
शाहू महाराजांनी आपल्याला बाळाजी विश्वनाथ याने सोडवून आणले आणि प्रस्थापित केले याची जाण ठेवून त्यांना आणि वंशजांना पेशवाईची वस्त्रे दिली ( पुढेही कुणाला द्यायची याचा अधिकार राखून ठेवला. एक प्रकारची पॉवर ऑफ अटॉर्नी ). त्या वेळचा तो निर्णय त्यांचा होता. हा इतिहास. पण ती खदखद अधुनमधून बाहेर पडते. इतिहास सोडा.
आता एप्स्टीन फाईलमध्येही पंतप्रधानांचा उल्लेख येतो की to dance and sing to the tunes of trump ...( Dhruv Rathee chanel दोन आठवड्यांपूर्वी). मग आता विरोधकांनी योग्य असा खटला दाखल करावा. पण पण महाविकास आघाडीच्या किंवा INDIA BLOCK च्या आतबाहेर करणाऱ्या एकजुटीमुळे !हे शक्य नाही. झाले ते समोर आहे. कृती करण्याची हिम्मत नाही. तिकडे एका कॉन्ग्रेस नेत्याने खरा नेता कोण तर ममता बॅनर्जीच आहे सांगून खिंडार पाडलंय.
काही धागेदोरे हाती लागले की हल्ला होतो पण दमदार होत नाहीये. आणखी एक गायिका गाण्याच्या स्टेजवरून घाणघाण शिव्या घालत आहे. राज ठाकरे शिंदेंच्या घरी जाऊन सुधारणांविषयी चर्चा करतात. पण निवडणुकीला उभे राहून सदनात येऊन मुद्दा मांडत नाहीत. लोकसभेला जावे, विधानसभेला जावे.
आता काय करता येईल ते पाहावे नेत्यांनी. खुर्ची पकडण्याच्या धडपडीत एकजूट हरवत चालली आहे. https://youtu.be/pUjGU5D7UH4?si=nRxMQseCud3OaX3K
Mag त्या दामगुड्याने पोलिसात
Mag त्या दामगुड्याने पोलिसात जायच्व होते पिस्तुल दाखवायला त्याच्या बापाचा राज चालू आहे का?
भाजपायींच्या पुन्हा विरोधी
भाजपायींच्या पुन्हा विरोधी पक्षांकडे मागण्या सुरू झाल्या. एवढे करून हे मत कोणाला देणार, तर भाजपलाच.
ब्रिटनमध्ये माजी राजदूताला आणि प्रिन्स अँड्र्यूला एप्स्टीन फाइल प्रकरणी अटक झाली. युरोपातल्या अनेक देशांत लोकांना राजीनामे द्यावे लागले. तिथे कोणता विरोधी पक्ष न्यायालयात गेला होता?
आरोप होत असतील तर त्याची चौकशी करणे हे सरकारचे काम नाही? अगदी ७०००० कोटी प्रकरणी सुद्धा तेव्हाच्या आघाडी सरकारने चौकशी नेमली आणि अजित पवारांनी ती होईपर्यंत मंत्रीपद सोडले होते. मनमोहन सिंग यांच्या काही मंत्र्यांचेही भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून राजीनामे घेतले होते.
--
अपशब्द वापरल्याबद्दल हनुमंत पवार यांचा निषेध.
--
सुशांत सिंग राजपूत, पालघर साधू या प्रकरणांची चौकशी करत असलेल्या सीबीआयकडे आता अजित पवार विमान अपघाताची चौकशी. म्हणजे काहीही बाहेर येणार नाही याची व्यवस्था.
दामगुड्याचे पिस्तुल नी
दामगुड्याचे पिस्तुल नी लायसन्स जमा केले म्हणे, त्याच्या लवकर मुसक्या आवळाव्यात नी भाजपेयींची गुंडगिरी प्रशासनाने मोडावी, आपल्या बापाचे राज्य नाही हे भाजप्यांना प्रशासनाने दाखवावे.
आरोप झालेत तर त्याची अधिकृत
आरोप झालेत तर त्याची अधिकृत कॉपी घेऊन आपल्या कोर्टात जावेच.
वर छत्रपती शाहू महाराज आणि
वर छत्रपती शाहू महाराज आणि बाळाजी विश्वनाथ यांच्या संदर्भात एक वाक्य आलं आहे.
माझ्या वाचनात आलं की महाराणी ताराबाईंविरोधात बाळाजींनी शाहू महाराजांना साथ दिली म्हणून त्यांना पेशवाई दिली.
समजा एप्स्टिन फाइलमध्ये
समजा एप्स्टिन फाइलमध्ये विरोधी पक्षातल्या एखाद्या नेत्याचं नाव असतं , तर मोदीशहां नी काय केलं असतं?
त्याला भाजपात घेतला असता
त्याला भाजपात घेतला असता हाकानाका
The Directorate General of
The Directorate General of Civil Aviation on Tuesday grounded four registered aircraft of VSR Ventures Pvt Ltd over safety lapses found after it conducted an audit into the Baramati plane crash that claimed Maharashtra deputy chief minister Ajit Pawar’s life last month.
The European Union Aviation Safety Agency (EASA), the European Union's (EU) aviation regulator that certifies non-EU airlines operating in its territories, had denied permission to VSR Ventures to enter EU airspace, India's aviation regulator DGCA said earlier in a statement.
EASA suspended Third Country Operator (TCO) authorisation for VSR Ventures after the company failed to respond to the EU aviation regulator's queries on an accident on September 14, 2023, involving a Learjet 45 (tail No. VT-DBL)
रोहित पवार कागदी विमाने उडवतात त्यामुळे असं झालं.
र्होईत्याने असाही दावा केला
र्होईत्याने असाही दावा केला की वैमानिक सुमित कपूर यांनी मुद्दाम विमान जमिनीवर आदळले. विमानात गरजेपेक्षा जास्त इंधन होते.
मग विमानावर बंदी घालायचे काय कारण? जर पायलट डोके फिरलेला असेल तर विमानाचा काय दोष?
की र्होईत्या डझनभर दावे करणार आणि त्यातला एखादा अदमासे ठीक निघाला तर बघू असा काही इचार आहे का?
"माझ्या वाचनात आलं की महाराणी
"माझ्या वाचनात आलं की महाराणी ताराबाईंविरोधात बाळाजींनी शाहू महाराजांना साथ दिली म्हणून त्यांना पेशवाई दिली." >>> साथ दिली हे खरं पण निव्वळ तेव्ढ्यामुळे बाळाजी विश्वनाथाला पेशवाई दिली नाही. मुअज्जमने सोडून दिल्यावर शाहूकडे ना सैन्य होते, ना पैसा , ना लढण्याचा किंवा कारभार करण्याचा अनुभव. संसाधनांचा अभाव असला तरी शाहूकडे संभाजीचा मुलगा असण्याचा मोठा asset होता. ताराबाई अतिशय खमकी होती. प्रत्यक्ष नियंत्रण करणाऱ्या ताराबाईच्या हाताखाली काम करण्यापेक्षा शाहूसारख्या मवाळ राजाला तोंडदेखला मुजरा करून जास्त स्वतंत्रपणे राहणे हे बऱ्याच सरदारांना श्रेयस्कर वाटले. अशा सरदारांची बाळाजीने मोट बांधली. बाळाजीने हुशारीने शाहूसाठी सैन्य उभारायला खूप मदत केली आणि त्याच्या अंतर्गत व बाह्य शत्रूंचा बंदोबस्त करून त्याचे बस्तान बसवण्यात महत्त्वाची भूमिका निभावली. त्यामुळे शाहूने बाळाजीला "सेनाकर्ते" हे पदवी दिली. तरीही बाळाजी हा पेशवा नव्हता. शाहूला धुडकावून लावणाऱ्या कान्होजी आंग्रे ह्या अतिशय बलिष्ठ सरदाराने शाहूच्या पेशव्यालाच कैद केले. त्याला सोडवायची जबाबदारी शाहूने बाळाजीवर सोपवली. तेव्हा वाटाघाटींसाठी वजन मिळावे, आणि एवीतेवी पेशवा तर कैदेतच आहे, म्हणून बाळाजीने शाहूकडे पेशवेपद मागितले, आणि त्याने ते दिले. बाळाजीने हा विश्वास सार्थ करत पेशव्याला सोडवले (पण अर्थातच त्याचे पद काही त्याला परत मिळाले नाही ) आणि कान्होजीला सुद्धा शाहूच्या बाजूल वळवून घेतले. त्यानंतर तर बाळाजीने मोठ्या सैन्यासह दिल्लीची वारी करून मुघल साम्राज्याच्या kingmaker ची भूमिका निभावली, दक्षिणेच्या सहा सुभ्याचें महसूल हक्क मिळवले, आणि येसूबाई वगैरे छत्रपतींच्या कुटुंबियांना सोडवून आणले. वास्तविक प्रतिनिधी हे पद पेशव्याच्या वरचे होते, पण आपल्या कर्तृत्वाने बाळाजीने आणि पुढे बाजीराव, बाळाजी बाजीराव वगैरेंनी त्यांच्या पदाचे महत्त्व मोठे केले. शाहूला आपल्या मर्यादांची जाणीव होती. त्याने शहाणपणाने पेशव्यांकडे सत्ता delegate केली. माधवरावापर्यंत पेशव्यांनी चांगल्यापैकी कामगिरी केली. त्यानंतर भाकरी फिरवायची गरज होती. कदाचित महादजी शिंदे किंवा यशवंतराव होळकर ह्यांना जास्त सत्ता मिळाली असती तर त्यांनी मराठी राज्य जास्त चांगल्या प्रकारे धरून ठेवलं असतं. पण ते झाले नाही आणि पुढच्या पेशव्यांच्या कारकीर्दीत मराठी राज्य क्रमाक्रमाने लयाला गेलं.
एप्स्टिन फाइलमध्ये कुणाचं नाव
एप्स्टिन फाइलमध्ये कुणाचं नाव असतं तर......
१.त्याने स्वतः राजीनामा देणे वेगळी गोष्ट.
२. संसदेत त्यावर आवाज करणे हा एक मार्ग.
३. तो सत्तेतून बाहेर पडत नसेल तर आपल्याकडे एप्स्टिनचा पुरावा कोर्टात टिकेल का हा एक विचार येतो.
काही किंवा अनेक कारणाने
काही किंवा अनेक कारणाने पेशव्यांना वस्त्रं मिळाली हे खरं. पण त्यासाठी आता हळहळ करून विषय उकरून काय उपयोग आहे?
आताच्या राज्यसभेतल्या जागेवरचा महाविकास आघाडीतला वाद बघा. वस्त्रं कुणाला देतात ते. केवळ अरेरे. त्यात साठ वर्षे राजकीय खेळी करणारे विश्वासू नेतेही रांगेत आहेत.
पेशवाईचा विषय स्वतःच काढला
पेशवाईचा विषय स्वतःच काढला आणि त्यावर आता हळ हळ करू नका असं स्वतःच सांगतात.
कोर्ट बिर्ट जाऊ द्या. भाजपने ज्यांच्यावर आरोप केले त्यांनाच आपल्या मांडीवर घेतलं. एजन्सीने भुज बळांच्या केसची फाइलच मिळत नाही, काय केस होत नाही ते आठवत नाही असं सांगितलं. यावर एक नागरिक , एक मतदार म्हणून काही मत नसतंच. कारण आम्ही फक्त भाजपचे सिंधूसम निष्ठावंत पाठिराखे असतो.
त्यानिमित्ताने इथे छान करमणूक होते .
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांदरम्यान महायुतीमधल्या वादा - हाणामार्यांसाठी स्पष्टीकरणं देणारे महाविकास आघाडीतल्या वादाबद्दल बोलताना क्यूट दिसतात.
मी केवळ भरत ह्यांच्या
मी केवळ भरत ह्यांच्या प्रतिक्रियेवर जास्त माहिती दिली. भरत ह्यांचा तसा हेतू नसेलही, पण त्या वाक्यातून बाळाजीचे शाहूची बाजू घेणे हे अधोरेखित होऊन, त्याचे कर्तृत्व अनुल्लेखित राहिल्यासारखे जाणवले. म्हणून थोडी माहिती दिली. थोडक्यात शाहूकडे बाळाजीपेक्षा कर्तृत्ववान आणि एकनिष्ठ असा बाळाजीच्या जवळपासही येणारा दुसरा माणूस नव्हता. म्हणून त्याला पेशवाई मिळाली. माझी प्रतिक्रिया ही एकंदरीतच अवांतर आहे.
बाकी धाग्याच्या विषयाला धरून बोलायचं तर पेशव्यांच्या नावाने आज केलं जाणारं ब्रिगेडी जातीयवादी राजकारण उबग आणणारं आहे.
Pages