डायनोसॉरचे असे सिनेमे चिकाटीने बघितल्याबद्दल अम्भिनंदन ! जगाला विनाशापासून वाचवणारे आणि अशा सिनेम्यांपासून सावध करणारे यांच्यात अजिबात फरक नसतो. मायबोलीने
अशा साहसी प्रेक्षकांना नोबेल प्रमाणे रोख पुरस्कार चालू करावा हा प्रस्ताव ठेवतो.
अमिताभ बच्चन जंजीर मधून लोकांच्या मस्तिक्षात जाऊन बसला. दीवार मधे तो लोकांना आपला वाटू लागला. थोडी सहानुभूती मिळाली. तरी पण बच्चन काळजात गेला तो अमर अकबर अँथनी मुळेच. यातल्या त्याच्या टपोरी कॅरेक्टर मुळे नाका नाक्यावरच्या भाई लोकांना आपण बच्चन झाल्यासारखं वाटू लागलं. जे लोक आधी बच्चन मधे स्वतःला शोधायचे ते आता स्वतःच बच्चन व्हायला सुरूवात झाली. सलीम जावेद ते कादरखान ही मोठी क्रांती बच्चनने लीलया पेलली.
यातला अँथनी अनाथ आहे. तो अँथनी गोन्साल्विस असं नाव धारण करत असला तरी त्याला इंग्लीश येत नाही हे लोकांना फारच भावलं. म्हणजे आता दोन प्रकारचे बच्चन झाले. एक दीवार, त्रिशूल, सिलसिला अशा क्लासिक पिक्चर मधून येणारा फारेण्डी बच्चन आणि गल्लीतला बच्चन ( जो नंतर गरीबांचा बच्चन म्हणून मिथुन साठी संजीवनी ठरला ).
चक्क फादरकडे राहिलेला बच्चन शाळेत गेलेला नाही, टपोरी गिरी करत फिरतो आणि त्याला इंग्लीश येत नाही. बाय द कोईफिशिएण्ट ऑफ द हिमोग्लोबिन इन द अॅटमॉसफिअर ऑफ द कंट्री यातलं एकही अक्षर कळालेलं नसलं तरी बच्चनला सुद्धा इंग्लीश येत नाही आणि त्याने लोकांना सुतिया बनवलेलं आहे हा आनंद अवर्णनीय होता.
लावारीस मधे इंग्रजी झाडणार्या झीनत अमानची बच्चन जिरवतो हे फारच अपीलिंग होतं. इथे आम्ही ब्रिटीशांची गुलामी झुगारून देण्यासाठी इंग्लीशमधे कमी मार्क्स आणतो, दांड्या गुल करतो आणि सुंदर मुली इंग्लीश झाडतात. सुंदर मुली नाकारतील याची जेव्हढी भीती वाटत नाही तेव्हढी त्या डायरेक्ट इंग्लीश मधे सुरू होऊ शकतात याची धास्ती असायची. नाक्यानाक्यावर्चे अँथनी गोन्साल्विस कितीही पराक्रमी असले function at() { [native code] }री सुंदर पोरींच्या इंग्रजीला भिऊन असायचे. कदाचित इंग्रजीमुळे सुंदर मुली सुरक्षित राहू शकल्या असाव्यात, यासाठीच सरकारने प्रशासनाची इंग्लीश ही भाषा बंद केली नसावी. कारण या सुंदर मुली शेवटी प्रशासनातल्या बाबू लोकांच्या बायका बनतात. त्याच लाडाने त्यांना बाबू म्हणत असल्याने सरकारी बाबू असा शब्दप्रयोग रूढ झाला असावा.
मग अशा एका झीनत अमानची जिरवल्यावर बच्चनने एका अन्यायाचा बदला घेतल्याचं कोण समाधान !
बरं बच्चनने झीनत अमानला त्रास द्यायचं कारण नव्हतं. ती आपल्या मार्गाने चालली होती. तेव्हां काही मायबोली नव्हती , नाहीतर ती तिच्या दुनियेत खूष आहे, तुम्हाला काय पडलीय असं घोकून पाठ केलेला एखादा आयडी बच्चनला शिकवायला गेलाच असता. पण बच्चनच्या खांद्यांवर वर तेव्हां नाक्यावरच्या बच्चनचं ओझं असायचं. त्यामुळे झीनत अमान इंग्लीश मधे बोलली हाच अपराध मोठा होता. त्याचा धडा त्याने शिकवला इतकंच काय शेवटी तिला स्वतः अग्रेसिव्ह राहून, पडतं न घेता पटवलं हे समाधान असल्यानेच पिक्चर सुपरहीट झाला.
अ अ अँ हा कितीही इल्लॉजिकल पिक्चर असला तरी एकदा का इल्लॉजी हद से परे गेली कि माणसाचं अपेक्षा ठेवणं बंद होतं आणि तो एण्जॉय करू लागतो. कादरखानी भट्टीचं हेच वैशिष्ट्य आहे. पण अ अ अॅ मधे काही सीन्स एकदम ऑल टाईम ग्रेट पण आल्याने त्याला मोडीत सुद्धा काढता येत नाही. जेव्हढं त्यातलं मेडीकल सायन्स प्रगत आहे, दृश्यांची कंटिन्युईटी धमाल आहे ( जेल मधे चेहर्यावर मारहाणीचे वण, पुढच्या प्राणच्या घरात चकाचक चेहरा आणि पुन्हा जेल मधे मारहाणीचा मेक अप, तरी आरशासमोरचा धमाल सीन अशा चुका झाकोळण्यासाठी पुरेसा आहे.
आरशासमोरची अॅक्टींग एव्हढी हातखंडा झाली कि पुन्हा मर्द मधे तो सीन घुसडला आहे. माय नेम इज अँथनी गोन्साल्विस हे संपूर्ण गाणंच धमाल आहे आणि ते फक्त बच्चनच करू शकतो. ( अशा विनोदी गाण्यांसाठी धर्मेंद्र पण सूट होऊ शकतो पण त्याचा बाज वेगळा).
आणि देवासमोरची अॅक्टींग. या प्रकारच्या अभिनयासाठी दोनच नावं. एक दिलीपकुमार आणि दुसरा बच्चन. शत्रुघ्न सिन्हाने विश्वनाथ मधे असा सीन केलाय पण त्यात त्याने देवाला डायलॉगबाजी करून घाबरवून सोडलंय. बच्चनचा कनेक्ट कुठेच दिसत नाही. संत नामदेवाचं विठ्ठलाशी भांडण असायचं. अर्थात नामदेव हे संत असल्याने त्यांचं भांडण भाबडं होतं. दिलीप आणि बच्चन हे लार्जर दॅन लाईफ त्यातही बच्चन तर गल्लीदादा असल्याने त्याचं टपोरी भाषेत भांडण असायचं. पुन्हा तसे सीन्स होणे नाहीत. ज्यांनी बच्चनच्या या लीला थेटरात अनुभवल्या, त्या वातावरणात बच्चनचे सिनेमे अनुभवले त्यांच्यासारखी भाग्यवान पिढी दुसरी नाही. ( दिलीपकुमार काही जणांना आवडत नाही, त्यांना मोठ्या मनाने क्षमा करण्यात येत आहे). शत्रूचा देवापुढचा सीन ( हे सगळे महादेवालाच वेठीस धरायचे, भोळा सांब आहे ठीक आहे, तिसरा डोळा उघडला तर ?) म्हणजे " शंकर , श्रीराम आया तो उसे कह देना, रावण आया था" टाईप झाला आहे. देवाशी ते लाडीक भांडण नाहीच. विधाता मधला दिलीपकुमार बघा. "आज से मै हू इस बच्चे का विधाता ". कसलं रिअल भांडण वाटतं. तो भक्तच आहे पण रागावलेला हे कळतं.
बच्चनच्या या लीलांचा इंपॅक्ट एव्हढा होता कि कधीच कुठल्याही सुंदर मुलीपुढे नमतं घेतलं नाही. पुढे जरी लक्षात आलं कि जितेंद्रचे सिनेमे बघणार्यांना मुली लवकर पटतात तरीही बच्चन प्रेमी असल्याने अशा तुच्छ गोष्टींचं वाईट वाटून घेतलं नाही. दुसरं म्हणजे इंग्रजी आलं नाही तरी वाईट वाटलं नाही. उलट इंग्रजीवरचा राग पुढे मायबोलीवर येऊन इंग्लीश चित्रपट बघणे कसे हीन अभिरूचीचे आहे हे दाखवण्यात निघाला.
बच्चनच्या काळात बच्चन आवडणार्यांना सुहास शिरवळकर पण आवडायचे हे एक निरीक्षण. मात्र सुशिंच्या एका मंदार कथेत " नाक्यावरच्या बच्चनने "बस क्या, तुम अमीर लोग हम गरीबों को कुछ भी करेगा ?" असं विचारल्यावर मंदारने त्याच्या कानाखाली एक ठेवून दिली, त्याबरोबर आणखी तीन बच्चन पळाले" हे वाचून सुशिंनी भावना दुखावल्या असं वाटलं. पण आपले दात आपलेच ओठ असं झालेलं. त्या क्षणी बच्चन फॅन्स कडे असंही बघणारे लोक असतात याची जाणिव झाली.
सूटाबूटातला स्टायलिश बच्चन ते इन्कलाब मधल्या "अॅक्सिडेंट हो गया रब्बा रब्बा" गाण्यात भोकाभोकाचं लाल बनियन घालून नाचणारा बच्चन अशा ब लीलांनी आजची धुलवड साजरी करूयात. जय बच्चन !
( ब ने हा धागा हायजॅक केला तर ते या धाग्याचं नशीब समजावं ).
सध्या हा आणि पुपोचा धागा ॲक्टिव्ह आहे म्हणून डायनो झाले की पुपो पहायची आणि परत डायनो.
<<<<< थोड्या वेळाने मन:पटलावर पुरणपोळी खाणारा डायनो साकार होईल अशाने!
थोड्या वेळाने मन:पटलावर पुरणपोळी खाणारा डायनो साकार होईल अशाने!
>>
अशाने पेक्षा आशा (काळे) ने वाचलं अन् तिनी पुरणपोळी केलेली असेल असं इमॅजिन झालं
पुढे टी रेक्स 'आज एक माणूस रुसलंय जणू ' वगैरे म्हणतानाही इमॅजिनला...
' एक पार्क अन् बारा टी रेक्स ' मधून साभार
च्यायला, इमॅजिनेशन चे डायनो थांबायचं नावंच घेत नाहीयेत
ललिता पवार अन् राजशेखर च्या लुक मधले टी रेक्स इमॅजिन होतायत
अवघाची हा पार्क...
जेल मधे चेहर्यावर मारहाणीचे वण, पुढच्या प्राणच्या घरात चकाचक चेहरा आणि पुन्हा जेल मधे मारहाणीचा मेक अप >>> अमिताभनेही सांगितले होते मधे की त्या सीन्समधे तो "वण" चेहराभर फिरला आहे
तरी पण बच्चन काळजात गेला तो अमर अकबर अँथनी मुळेच >>> टोटली!
क्लासिक पिक्चर मधून येणारा फारेण्डी बच्चन >>> नाही नाही. अँथनी, सिकंदर, नटवर, अमित, अर्जुनसिंग हे सगळेही आपलेच बच्चन मी कादर खानच्या धाग्यात लिहीले होते तसे, सलीम जावेदचा विजय तुम्हला भेटला तर एखादा करारी डॉयलॉग मारून निघून जाईल. पण अँथनी, सिकंदर एकदम ब्म्बैय्या भाषेत तुमच्याशी गप्पा मारतील. तेव्हा पब्लिकला ते जास्त आपले वाटले यात काही आश्चर्य नाही.
झीनतचा संदर्भ दोस्तानाचा म्हणताय की लावारिसचा? बहुधा दोस्तानाचा वाटतोय.
बच्चनच्या या लीलांचा इंपॅक्ट एव्हढा होता कि कधीच कुठल्याही सुंदर मुलीपुढे नमतं घेतलं नाही >>> सीनमधे/फ्रेममधे सुंदर हिरॉइन आहे आणि हीरोला तिची बिलकुल फिकीर नाही हे पडद्यावर फक्त देव आनंद आणि बच्चनच पुल ऑफ करू शकत होते. इतर कोणीही नाही. म्हणजे करायला बरेच गेले पण जमले नाही. "रोमॅण्टिक बाते मुझे बोअर करती है सोनिया" वगैरे पाहून आपलेही तसेच आहे असा समज व्हायचा. पण नंतर एखादी सुंदर मुलगी पाहिल्यावर तो लगेच दूर व्हायचा
मंदारने त्याच्या कानाखाली एक ठेवून दिली, त्याबरोबर आणखी तीन बच्चन पळाले >>>
त्यात भिकू सत्याला सांगतो की जिजामाता पार्क मधल्या बडी छीपकली का चेहरा एकदम भाऊ के माफिक है... >>> आठवला तो संवाद
अशाने पेक्षा आशा (काळे) ने वाचलं अन् तिनी पुरणपोळी केलेली असेल असं इमॅजिन झालं
पुढे टी रेक्स 'आज एक माणूस रुसलंय जणू ' वगैरे म्हणतानाही इमॅजिनला... >>>
थोड्या वेळाने मन:पटलावर पुरणपोळी खाणारा डायनो साकार होईल अशाने! >>> पोनीटेल असेल तर लेडी डायनो असेल, अनलेस तेव्हा तशी काही फॅशन असेल. मग ती येऊ कशी कशी मी नांदायला म्हणेल. "जेवण करते पुर्णाची पोळी..." वगैरे
फ्रेममधे सुंदर हिरॉइन आहे आणि हीरोला तिची बिलकुल फिकीर नाही हे पडद्यावर फक्त देव आनंद आणि बच्चनच पुल ऑफ करू शकत होते
>>>> अगदी अगदी.
शम्मी करू शकला असता पण त्यापेक्षा तिला छळणे त्याला जास्त आवडायचे.
झीनतचा संदर्भ दोस्तानाचा म्हणताय की लावारिसचा? >>> लावारिसचा. ती तिच्या इंग्लीश कुत्र्याला बिस्कीटं घेत असते तेव्हां बच्चन तिचा क्लास घेतो.
सीनमधे/फ्रेममधे सुंदर हिरॉइन आहे आणि हीरोला तिची बिलकुल फिकीर नाही हे पडद्यावर फक्त देव आनंद आणि बच्चनच पुल ऑफ करू शकत होते. >> देव आनंदचा चेहरा कसला बोलका आहे. त्याने लक्ष दिलं नाही तरी ललना त्याच्या आगे मागे फिरतील.
इतर कोणीही नाही. म्हणजे करायला बरेच गेले पण जमले नाही. >>> साऊथ इंडीयन हिरोंना विसरून कसं चालेल ? चॅलेंज देऊन हिरॉईनला सायकॉलॉजिकली कंट्रोल करतात आणि दिलेल्या टायमिंग मधे ती पटते पण. काही काही हिरविनी त्यांच्या पुढे मला पटव किंवा तू पट म्हणून गयावया करत असतात.
"रोमॅण्टिक बाते मुझे बोअर करती है सोनिया" >>> बाब्बौ ! कसला आवाज लागलाय त्या डायलॉगला. ते बच्चन ला शोभलं सुद्धा.
( ब ने हा धागा हायजॅक केला तर ते या धाग्याचं नशीब समजावं ).>>>बच्चन पुढे चिकवा म्हणजे अतिसामान्य ..व्याख्या विक्खी विक्खु
फ्रेममधे सुंदर हिरॉइन आहे आणि हीरोला तिची बिलकुल फिकीर नाही हे पडद्यावर फक्त देव आनंद आणि बच्चनच पुल ऑफ करू शकत होता.
सनी देओल, अमृता सिंग दोघांनाही फार काही अॅक्टिंग जमलेली नाही.
तरी नवे चेहरे, लव्ह स्टोरी, गाणी, जावेद अख्तरचं लेखन यामुळे तेव्हा गाजला बहुदा.
'बादल यू गरजता है' गाण्यात प्रत्येकवेळी समेवर(च) बिजली चमकते आणि हिरॉइन घाबरून हिरोला मिठी मारते. बिजली बघते बघते आणि शेवटी म्हणजे आता चमकतच नै ज्जा... तर दोघं खरंच समेवर मिठी मारतच नाहीत.
हिरॉइनच्या श्रीमंती आगाऊपणाला वठणीवर आणण्याचे सगळे उपाय थकल्यावर शेवटी तिला शिक्षा म्हणून हिरो किस करतो, यावर तेव्हा कुणीच ऑब्जेक्शन घेतलं नाही का?
Submitted by ललिता-प्रीति on 5 March, 2026 - 06:15
हिरॉइनच्या श्रीमंती आगाऊपणाला वठणीवर आणण्याचे सगळे उपाय थकल्यावर शेवटी तिला शिक्षा म्हणून हिरो किस करतो, यावर तेव्हा कुणीच ऑब्जेक्शन घेतलं नाही का?>>>>
कोण घेणार?? तेव्हाच्या सगळ्याच चित्रपटात हिरोइनीमागे लागलेले हिरो ज्याला आज स्टॉकिंग म्हणतात ते करत असत. कोणी कसले ऑब्जेक्षन घेत असे. उलट आजही ती गाणी लोकप्रिय आहेत.
निओ नॉईर क्राईम या फ्रेजबद्दल वाचलं होतं आधी. बहुतेक अनुराग कश्यपचाच असेल कुठला तरी. तेव्हां काहीही समजलं नव्हतं. पण केनेडी बघताना नेमका काय प्रकार आहे हे समजलं. हा मूव्ही बघायला तसला मूड हवा आणि एका बैठकीत बघितला तर ठीक. सगळं उदास वातावरण, एक विचित्र तरीही समोर चाललेल्या थीमला पोषक असं पार्श्वसंगीत आणि वेगळीच सिनेमॅटोग्राफी, लांब सावल्या, अंधार, अंधारे जग. एक वेगळीच मुंबई आपल्यासमोर येते. भूमीगत विश्व म्हणतात तशी भूमीगत मुंबई/ कोविडच्या काळातले सुनसान रस्ते पुन्हा बघायला मिळाले.
कथा खूपच बेसिक आहे. पण तिचं पडद्यावरचं एक्झेक्युशन आहे कि काही दम नाही म्हणताना आपण पुढे बघत राहतो. मला एका बैठकीत बघायचं सुख नाही. म्हणून लिंक तुटत पाहिला. ठरवलं होतं कि एक किंवा दोन शब्दात लिहायचं...
पण हा वेगळा प्रकार आणि अनुराग कश्यपची वेगळी हाताळणी. एण्काउंटर्स वर अनेक सिनेमे आले असतील. पण कोविडच्या काळात झालेल्या काही घटनांचा बेमालूम वापर करत एक डार्क थीम केनेडीत मांडली आहे. पटकथा फारच गुंतागुंतीची आहे. त्यामुळे विस्कळीत पणा जाणवतो.
केनेडी हा एक चक्रम माणूस आहे चक्रम हा शब्द इथे अचूक नाही, माझ्या लक्षात येत नाही. या सिनेमाच्या अनेक कथेत दैत्य आहेत. पण तो protagonist आहे कारण तो दैत्यांनीभरलेल्या जगात स्वतःच स्वतःचा बनलेला दैत्य आहे. त्याची स्वतःची एक कहाणी आहे, जी तुकड्या तुकड्यात येते, ज्यामुळे उत्सुकता टिकून राहते. त्याचा मास्क पण विअर्ड आहे. मुद्दामच तो तसा घेतला आहे.
यातले नाते संबंध पण व्यवहारावर आहेत ( ट्रँझॅक्शनल). याला हिरो पण नाही म्हणवत, अँटी हिरो पण नाही. तो पश्चात्ताप दग्ध पण वाटत नाही, पण त्याला पश्चात्ताप करावासा वाटतोय हे त्याच्या आजूबाजूला वावरणार्या काही पात्रांमुळे कळते.
राहुल भट ची बॉडी लँग्वेज , उदास डोळे, खर्जातला (?) कि हस्की आवाज, हे सगळं अशा एका माणसाचं चित्र उभं करतं जो मुळातून चांगला नाही, पण आपल्या पापांची जाण असलेला आहे आणि काही तरी शोधतोय, जरी ते निरर्थक असलं तरी. दाढी नसताना राहुल भट अजिबात चांगला दिसत नाही.
राजकीय ताणतणाव पण संवादातून येत राहतो. खोलात न जाताही राजकारणाचा परिणाम कसा होतो हे हुषारीने आलं आहे.
चित्रपटातले सगळे भाग स्वतंत्रपणे आकर्षक वाटतात, जणू काही वेगवेगळ्या शॉर्ट फिल्म्स किंवा स्किटस एकत्र केलेत असं . पण त्यांना गुंफणारा धागा मिसिंग आहे. हा कमकुवत भाग आहे.
चित्रपट कथानक आणि दिग्दर्शकाची शैली यांच्यात अडकला आहे. दोन्ही नीट साधत नाही. ल्युडो पण त्याचाच आहे ना ? अनुराग कश्यपची ही पद्धत इंटरेस्टींग आहे. तो एखाद्या साच्यात स्वतःला अडकू देत नाही. हे ही करून बघू असा प्रयत्न आहे. तरी सुद्धा कश्यप छाप आहेच.
थोडक्यात, केनेडी हा काही परफेक्ट चित्रपट नाही. पटकथा काही ठिकाणी विस्कळीत आहे. पण अनुराग कश्यपची राजकारणाबाबतची चीड , राहुल भटचा जबरदस्त अभिनय, आणि कोविड काळातल्या मुंबईचं गडद चित्रण , हे असे सर्व मिळून एक अस्वस्थ करणारा अनुभव देतात. कश्यपचा प्रामाणिक neo-noir म्हणता येईल.
रेको - वेगवेगळे प्रयोग बघायला आवडत असतील, आता काय बघू हे ठरत नसेल तरच वाटेला जा.
ता. क. >> कान्स महोत्सवात मिडनाईट स्क्रीनिंग सेक्शन मधे प्रदर्शित झालेला हा पहिला भारतीय चित्रपट ठरला. स्क्रीनिंग संपल्यानंतर सात मिनिटे स्टँडींग ओव्हेशन मिळालं. त्यानंतर सिडनी महोत्सवातही टाळ्या थांबतच नव्हत्या. हे आत्ता वाचल्यानंतर एव्हढच समजलं कि आपल्याला सिनेमा अजूनही कळत नाही.
इथल्या बर्याच पोस्टी वाचायच्या राहिल्या होत्या. परवा बब्बन यांची पोस्ट वाचली. घाईत कमेण्ट केली. आत्ता बघितलं भरपूर टीपी झालेला आहे. चालू द्या. येत राहीन अधून मधून.
केबेडीचा रिव्यू आवडला. मी आत्ताच सायरसने राहूल भट्ट ची घेंतलेली मुलाखात बघत होतो. राहुल भट्ट ह्याला पोलीस नुआर म्हणाला. मुलाखतीत अनुराग कश्यप च्या दिग्दर्शना बद्दल बरीच चर्चा झाली. नुआर माझ्या आवडीचा विषय असल्याने लगेच येऊन इथला रिव्यू ही वाचला. बघावा लागेल, पण तो झी ५ वर आहे . हा एक प्रोब्लेम आहे . बघुया.
केनेडीचा रिव्यू आवडला राभू. मी १५-२० मिनिटे बघून कंटाळून सोडून दिला होता. आता चिकाटीने अजून थोडा बघून पाहतो
'बादल यू गरजता है' गाण्यात प्रत्येकवेळी समेवर(च) बिजली चमकते आणि हिरॉइन घाबरून हिरोला मिठी मारते. बिजली बघते बघते आणि शेवटी म्हणजे आता चमकतच नै ज्जा... तर दोघं खरंच समेवर मिठी मारतच नाहीत. >>>>
हिरॉइनच्या श्रीमंती आगाऊपणाला वठणीवर आणण्याचे सगळे उपाय थकल्यावर शेवटी तिला शिक्षा म्हणून हिरो किस करतो, यावर तेव्हा कुणीच ऑब्जेक्शन घेतलं नाही का? >>> हे लक्षात नाही. बराच काळ झाला बेताब पाहून. पण हे आणि साधनाने लिहीलेले बरोबर आहे. पूर्वीच्या पिक्चर्स मधे कायच्या काय लोक चालवून घ्यायचे. असे सीन्स बहुतांश सगळ्या हीरोंच्या कोणत्या ना कोणत्यातरी पिक्चर मधे आहेत
पूर्वीच्या पिक्चर्स मधे कायच्या काय लोक चालवून घ्यायचे. असे सीन्स बहुतांश सगळ्या हीरोंच्या कोणत्या ना कोणत्यातरी पिक्चर मधे आहेत
>>> तर काय? वेस्टर्न कपडे घातलेल्या, इंग्लिश बोलणाऱ्या, येता जाता मॉंजी, पापाजी न करणाऱ्या नायिकेला अतिप्रसंगापर्यंत नेऊन मग हिरोकडून वाचवणारे व एकदम संस्कारी बनवणारे (पक्षी साडी नेसवणारे) पिक्चर डोक्यावर घेतलेत लोकांनी. त्यामानाने किस ही किस झाड की पत्ती.
केनेडी बघायला सुरुवात केला आणि मला पण पहिल्या काही मिनिटांत वाटलं काय सुरू आहे ही नक्की?
नंतर खिळून राहिले. अनुराग कश्यपच्या रॉ direction चा उत्तम नमुना.
राहुल भट्ट ने मिळालेल्या भूमिकेला पूर्ण न्याय दिला आहे. थंड डोक्याने न्याय अन्याय याचा निकाल लावणारा.
त्याचा आवाज आणि बॉडी या सिनेमाचा यू एस पी आहे. कमिशनरच्या भूमिकेत मोहित टाकळकर ने जान फुंकली आहे.
सगळ्यांनाच आवडेल असं नाही पण मेकिंग फार इंट्रेस्टिंग आहे.
डायनोसॉरचे असे सिनेमे
डायनोसॉरचे असे सिनेमे चिकाटीने बघितल्याबद्दल अम्भिनंदन ! जगाला विनाशापासून वाचवणारे आणि अशा सिनेम्यांपासून सावध करणारे यांच्यात अजिबात फरक नसतो. मायबोलीने
अशा साहसी प्रेक्षकांना नोबेल प्रमाणे रोख पुरस्कार चालू करावा हा प्रस्ताव ठेवतो.
ब. लीला
ब. लीला
( चिकवा प्रेमींना होळीच्या शुभेच्छा )
अमिताभ बच्चन जंजीर मधून लोकांच्या मस्तिक्षात जाऊन बसला. दीवार मधे तो लोकांना आपला वाटू लागला. थोडी सहानुभूती मिळाली. तरी पण बच्चन काळजात गेला तो अमर अकबर अँथनी मुळेच. यातल्या त्याच्या टपोरी कॅरेक्टर मुळे नाका नाक्यावरच्या भाई लोकांना आपण बच्चन झाल्यासारखं वाटू लागलं. जे लोक आधी बच्चन मधे स्वतःला शोधायचे ते आता स्वतःच बच्चन व्हायला सुरूवात झाली. सलीम जावेद ते कादरखान ही मोठी क्रांती बच्चनने लीलया पेलली.
यातला अँथनी अनाथ आहे. तो अँथनी गोन्साल्विस असं नाव धारण करत असला तरी त्याला इंग्लीश येत नाही हे लोकांना फारच भावलं. म्हणजे आता दोन प्रकारचे बच्चन झाले. एक दीवार, त्रिशूल, सिलसिला अशा क्लासिक पिक्चर मधून येणारा फारेण्डी बच्चन आणि गल्लीतला बच्चन ( जो नंतर गरीबांचा बच्चन म्हणून मिथुन साठी संजीवनी ठरला ).
चक्क फादरकडे राहिलेला बच्चन शाळेत गेलेला नाही, टपोरी गिरी करत फिरतो आणि त्याला इंग्लीश येत नाही. बाय द कोईफिशिएण्ट ऑफ द हिमोग्लोबिन इन द अॅटमॉसफिअर ऑफ द कंट्री यातलं एकही अक्षर कळालेलं नसलं तरी बच्चनला सुद्धा इंग्लीश येत नाही आणि त्याने लोकांना सुतिया बनवलेलं आहे हा आनंद अवर्णनीय होता.
लावारीस मधे इंग्रजी झाडणार्या झीनत अमानची बच्चन जिरवतो हे फारच अपीलिंग होतं. इथे आम्ही ब्रिटीशांची गुलामी झुगारून देण्यासाठी इंग्लीशमधे कमी मार्क्स आणतो, दांड्या गुल करतो आणि सुंदर मुली इंग्लीश झाडतात. सुंदर मुली नाकारतील याची जेव्हढी भीती वाटत नाही तेव्हढी त्या डायरेक्ट इंग्लीश मधे सुरू होऊ शकतात याची धास्ती असायची. नाक्यानाक्यावर्चे अँथनी गोन्साल्विस कितीही पराक्रमी असले function at() { [native code] }री सुंदर पोरींच्या इंग्रजीला भिऊन असायचे. कदाचित इंग्रजीमुळे सुंदर मुली सुरक्षित राहू शकल्या असाव्यात, यासाठीच सरकारने प्रशासनाची इंग्लीश ही भाषा बंद केली नसावी. कारण या सुंदर मुली शेवटी प्रशासनातल्या बाबू लोकांच्या बायका बनतात. त्याच लाडाने त्यांना बाबू म्हणत असल्याने सरकारी बाबू असा शब्दप्रयोग रूढ झाला असावा.
मग अशा एका झीनत अमानची जिरवल्यावर बच्चनने एका अन्यायाचा बदला घेतल्याचं कोण समाधान !
बरं बच्चनने झीनत अमानला त्रास द्यायचं कारण नव्हतं. ती आपल्या मार्गाने चालली होती. तेव्हां काही मायबोली नव्हती , नाहीतर ती तिच्या दुनियेत खूष आहे, तुम्हाला काय पडलीय असं घोकून पाठ केलेला एखादा आयडी बच्चनला शिकवायला गेलाच असता. पण बच्चनच्या खांद्यांवर वर तेव्हां नाक्यावरच्या बच्चनचं ओझं असायचं. त्यामुळे झीनत अमान इंग्लीश मधे बोलली हाच अपराध मोठा होता. त्याचा धडा त्याने शिकवला इतकंच काय शेवटी तिला स्वतः अग्रेसिव्ह राहून, पडतं न घेता पटवलं हे समाधान असल्यानेच पिक्चर सुपरहीट झाला.
अ अ अँ हा कितीही इल्लॉजिकल पिक्चर असला तरी एकदा का इल्लॉजी हद से परे गेली कि माणसाचं अपेक्षा ठेवणं बंद होतं आणि तो एण्जॉय करू लागतो. कादरखानी भट्टीचं हेच वैशिष्ट्य आहे. पण अ अ अॅ मधे काही सीन्स एकदम ऑल टाईम ग्रेट पण आल्याने त्याला मोडीत सुद्धा काढता येत नाही. जेव्हढं त्यातलं मेडीकल सायन्स प्रगत आहे, दृश्यांची कंटिन्युईटी धमाल आहे ( जेल मधे चेहर्यावर मारहाणीचे वण, पुढच्या प्राणच्या घरात चकाचक चेहरा आणि पुन्हा जेल मधे मारहाणीचा मेक अप, तरी आरशासमोरचा धमाल सीन अशा चुका झाकोळण्यासाठी पुरेसा आहे.
आरशासमोरची अॅक्टींग एव्हढी हातखंडा झाली कि पुन्हा मर्द मधे तो सीन घुसडला आहे. माय नेम इज अँथनी गोन्साल्विस हे संपूर्ण गाणंच धमाल आहे आणि ते फक्त बच्चनच करू शकतो. ( अशा विनोदी गाण्यांसाठी धर्मेंद्र पण सूट होऊ शकतो पण त्याचा बाज वेगळा).
आणि देवासमोरची अॅक्टींग. या प्रकारच्या अभिनयासाठी दोनच नावं. एक दिलीपकुमार आणि दुसरा बच्चन. शत्रुघ्न सिन्हाने विश्वनाथ मधे असा सीन केलाय पण त्यात त्याने देवाला डायलॉगबाजी करून घाबरवून सोडलंय. बच्चनचा कनेक्ट कुठेच दिसत नाही. संत नामदेवाचं विठ्ठलाशी भांडण असायचं. अर्थात नामदेव हे संत असल्याने त्यांचं भांडण भाबडं होतं. दिलीप आणि बच्चन हे लार्जर दॅन लाईफ त्यातही बच्चन तर गल्लीदादा असल्याने त्याचं टपोरी भाषेत भांडण असायचं. पुन्हा तसे सीन्स होणे नाहीत. ज्यांनी बच्चनच्या या लीला थेटरात अनुभवल्या, त्या वातावरणात बच्चनचे सिनेमे अनुभवले त्यांच्यासारखी भाग्यवान पिढी दुसरी नाही. ( दिलीपकुमार काही जणांना आवडत नाही, त्यांना मोठ्या मनाने क्षमा करण्यात येत आहे). शत्रूचा देवापुढचा सीन ( हे सगळे महादेवालाच वेठीस धरायचे, भोळा सांब आहे ठीक आहे, तिसरा डोळा उघडला तर ?) म्हणजे " शंकर , श्रीराम आया तो उसे कह देना, रावण आया था" टाईप झाला आहे. देवाशी ते लाडीक भांडण नाहीच. विधाता मधला दिलीपकुमार बघा. "आज से मै हू इस बच्चे का विधाता ". कसलं रिअल भांडण वाटतं. तो भक्तच आहे पण रागावलेला हे कळतं.
बच्चनच्या या लीलांचा इंपॅक्ट एव्हढा होता कि कधीच कुठल्याही सुंदर मुलीपुढे नमतं घेतलं नाही. पुढे जरी लक्षात आलं कि जितेंद्रचे सिनेमे बघणार्यांना मुली लवकर पटतात तरीही बच्चन प्रेमी असल्याने अशा तुच्छ गोष्टींचं वाईट वाटून घेतलं नाही. दुसरं म्हणजे इंग्रजी आलं नाही तरी वाईट वाटलं नाही. उलट इंग्रजीवरचा राग पुढे मायबोलीवर येऊन इंग्लीश चित्रपट बघणे कसे हीन अभिरूचीचे आहे हे दाखवण्यात निघाला.
बच्चनच्या काळात बच्चन आवडणार्यांना सुहास शिरवळकर पण आवडायचे हे एक निरीक्षण. मात्र सुशिंच्या एका मंदार कथेत " नाक्यावरच्या बच्चनने "बस क्या, तुम अमीर लोग हम गरीबों को कुछ भी करेगा ?" असं विचारल्यावर मंदारने त्याच्या कानाखाली एक ठेवून दिली, त्याबरोबर आणखी तीन बच्चन पळाले" हे वाचून सुशिंनी भावना दुखावल्या असं वाटलं. पण आपले दात आपलेच ओठ असं झालेलं. त्या क्षणी बच्चन फॅन्स कडे असंही बघणारे लोक असतात याची जाणिव झाली.
सूटाबूटातला स्टायलिश बच्चन ते इन्कलाब मधल्या "अॅक्सिडेंट हो गया रब्बा रब्बा" गाण्यात भोकाभोकाचं लाल बनियन घालून नाचणारा बच्चन अशा ब लीलांनी आजची धुलवड साजरी करूयात. जय बच्चन !
( ब ने हा धागा हायजॅक केला तर ते या धाग्याचं नशीब समजावं ).
अॅक्सिडेंट हो गया रब्बा
अॅक्सिडेंट हो गया रब्बा रब्बा" हे गाणे कुली मधले आहे, इन्किलाब मधले nahi
ओके भास्करराव.
ओके भास्करराव.
सध्या हा आणि पुपोचा धागा
सध्या हा आणि पुपोचा धागा ॲक्टिव्ह आहे म्हणून डायनो झाले की पुपो पहायची आणि परत डायनो.
<<<<< थोड्या वेळाने मन:पटलावर पुरणपोळी खाणारा डायनो साकार होईल अशाने!
थोड्या वेळाने मन:पटलावर
थोड्या वेळाने मन:पटलावर पुरणपोळी खाणारा डायनो साकार होईल अशाने!
>>
अशाने पेक्षा आशा (काळे) ने वाचलं अन् तिनी पुरणपोळी केलेली असेल असं इमॅजिन झालं
पुढे टी रेक्स 'आज एक माणूस रुसलंय जणू ' वगैरे म्हणतानाही इमॅजिनला...
' एक पार्क अन् बारा टी रेक्स ' मधून साभार
च्यायला, इमॅजिनेशन चे डायनो थांबायचं नावंच घेत नाहीयेत
ललिता पवार अन् राजशेखर च्या लुक मधले टी रेक्स इमॅजिन होतायत
अवघाची हा पार्क...
अँकी!
अँकी!
अँकी
अँकी
आता सत्या आठवला
आता सत्या आठवला
त्यात भिकू सत्याला सांगतो की जिजामाता पार्क मधल्या बडी छीपकली का चेहरा एकदम भाऊ के माफिक है...
अँकी
अँकी
Submitted by बब्बन on 28
Submitted by बब्बन on 28 February, 2026 - 18:54
रेको नोट करून ठेवला आहे.
केनेडीचा आधीच रेको मिळालेला आहे.
इमॅजिनेशन चे डायनो थांबायचं
इमॅजिनेशन चे डायनो थांबायचं नावंच घेत नाहीयेत
ललिता पवार अन् राजशेखर च्या लुक मधले टी रेक्स इमॅजिन होतायत
<<<<<<<
'डायनो गाऊ कशी अंगाई?'
पण मी बघताना माझ्या
पण मी बघताना माझ्या डोक्यावरून गेला होता व हॉलीवूड वाल्यांचा काहीतरी self indulgent
<<<<< म्हणजे हॉलिवूडचा पुणे-52?
खेळ कुणाला डायनोचा कळला
खेळ कुणाला डायनोचा कळला
मी असो, तू असो, हा असो, कुणी असो...
जेल मधे चेहर्यावर मारहाणीचे
जेल मधे चेहर्यावर मारहाणीचे वण, पुढच्या प्राणच्या घरात चकाचक चेहरा आणि पुन्हा जेल मधे मारहाणीचा मेक अप >>>
अमिताभनेही सांगितले होते मधे की त्या सीन्समधे तो "वण" चेहराभर फिरला आहे 
तरी पण बच्चन काळजात गेला तो अमर अकबर अँथनी मुळेच >>> टोटली!
क्लासिक पिक्चर मधून येणारा फारेण्डी बच्चन >>>
नाही नाही. अँथनी, सिकंदर, नटवर, अमित, अर्जुनसिंग हे सगळेही आपलेच बच्चन
मी कादर खानच्या धाग्यात लिहीले होते तसे, सलीम जावेदचा विजय तुम्हला भेटला तर एखादा करारी डॉयलॉग मारून निघून जाईल. पण अँथनी, सिकंदर एकदम ब्म्बैय्या भाषेत तुमच्याशी गप्पा मारतील. तेव्हा पब्लिकला ते जास्त आपले वाटले यात काही आश्चर्य नाही.
झीनतचा संदर्भ दोस्तानाचा म्हणताय की लावारिसचा? बहुधा दोस्तानाचा वाटतोय.
बच्चनच्या या लीलांचा इंपॅक्ट एव्हढा होता कि कधीच कुठल्याही सुंदर मुलीपुढे नमतं घेतलं नाही >>> सीनमधे/फ्रेममधे सुंदर हिरॉइन आहे आणि हीरोला तिची बिलकुल फिकीर नाही हे पडद्यावर फक्त देव आनंद आणि बच्चनच पुल ऑफ करू शकत होते. इतर कोणीही नाही. म्हणजे करायला बरेच गेले पण जमले नाही. "रोमॅण्टिक बाते मुझे बोअर करती है सोनिया" वगैरे पाहून आपलेही तसेच आहे असा समज व्हायचा. पण नंतर एखादी सुंदर मुलगी पाहिल्यावर तो लगेच दूर व्हायचा
मंदारने त्याच्या कानाखाली एक ठेवून दिली, त्याबरोबर आणखी तीन बच्चन पळाले >>>
त्यात भिकू सत्याला सांगतो की
त्यात भिकू सत्याला सांगतो की जिजामाता पार्क मधल्या बडी छीपकली का चेहरा एकदम भाऊ के माफिक है... >>>
आठवला तो संवाद 
अशाने पेक्षा आशा (काळे) ने वाचलं अन् तिनी पुरणपोळी केलेली असेल असं इमॅजिन झालं
पुढे टी रेक्स 'आज एक माणूस रुसलंय जणू ' वगैरे म्हणतानाही इमॅजिनला... >>>
थोड्या वेळाने मन:पटलावर पुरणपोळी खाणारा डायनो साकार होईल अशाने! >>>
पोनीटेल असेल तर लेडी डायनो असेल, अनलेस तेव्हा तशी काही फॅशन असेल. मग ती येऊ कशी कशी मी नांदायला म्हणेल. "जेवण करते पुर्णाची पोळी..." वगैरे 
ॲंकी, श्रद्धा, ऋतूराज, फा
ॲंकी, श्रद्धा, ऋतूराज, फा
फ्रेममधे सुंदर हिरॉइन आहे आणि हीरोला तिची बिलकुल फिकीर नाही हे पडद्यावर फक्त देव आनंद आणि बच्चनच पुल ऑफ करू शकत होते
>>>> अगदी अगदी.
शम्मी करू शकला असता पण त्यापेक्षा तिला छळणे त्याला जास्त आवडायचे.
झीनतचा संदर्भ दोस्तानाचा
झीनतचा संदर्भ दोस्तानाचा म्हणताय की लावारिसचा? >>> लावारिसचा. ती तिच्या इंग्लीश कुत्र्याला बिस्कीटं घेत असते तेव्हां बच्चन तिचा क्लास घेतो.
सीनमधे/फ्रेममधे सुंदर हिरॉइन आहे आणि हीरोला तिची बिलकुल फिकीर नाही हे पडद्यावर फक्त देव आनंद आणि बच्चनच पुल ऑफ करू शकत होते. >> देव आनंदचा चेहरा कसला बोलका आहे. त्याने लक्ष दिलं नाही तरी ललना त्याच्या आगे मागे फिरतील.
इतर कोणीही नाही. म्हणजे करायला बरेच गेले पण जमले नाही. >>> साऊथ इंडीयन हिरोंना विसरून कसं चालेल ? चॅलेंज देऊन हिरॉईनला सायकॉलॉजिकली कंट्रोल करतात आणि दिलेल्या टायमिंग मधे ती पटते पण. काही काही हिरविनी त्यांच्या पुढे मला पटव किंवा तू पट म्हणून गयावया करत असतात.
"रोमॅण्टिक बाते मुझे बोअर करती है सोनिया" >>> बाब्बौ ! कसला आवाज लागलाय त्या डायलॉगला. ते बच्चन ला शोभलं सुद्धा.
( ब ने हा धागा हायजॅक केला तर
( ब ने हा धागा हायजॅक केला तर ते या धाग्याचं नशीब समजावं ).>>>बच्चन पुढे चिकवा म्हणजे अतिसामान्य ..व्याख्या विक्खी विक्खु
फ्रेममधे सुंदर हिरॉइन आहे आणि हीरोला तिची बिलकुल फिकीर नाही हे पडद्यावर फक्त
देव आनंद आणिबच्चनच पुल ऑफ करू शकत होता.भारी चर्चा सुरुय
भारी चर्चा सुरुय

'बेताब' अनेक वर्षांनी पुन्हा
'बेताब' अनेक वर्षांनी पुन्हा बघितला.
सनी देओल, अमृता सिंग दोघांनाही फार काही अॅक्टिंग जमलेली नाही.
तरी नवे चेहरे, लव्ह स्टोरी, गाणी, जावेद अख्तरचं लेखन यामुळे तेव्हा गाजला बहुदा.
'बादल यू गरजता है' गाण्यात प्रत्येकवेळी समेवर(च) बिजली चमकते आणि हिरॉइन घाबरून हिरोला मिठी मारते. बिजली बघते बघते आणि शेवटी म्हणजे आता चमकतच नै ज्जा... तर दोघं खरंच समेवर मिठी मारतच नाहीत.
हिरॉइनच्या श्रीमंती आगाऊपणाला वठणीवर आणण्याचे सगळे उपाय थकल्यावर शेवटी तिला शिक्षा म्हणून हिरो किस करतो, यावर तेव्हा कुणीच ऑब्जेक्शन घेतलं नाही का?
हिरॉइनच्या श्रीमंती आगाऊपणाला
हिरॉइनच्या श्रीमंती आगाऊपणाला वठणीवर आणण्याचे सगळे उपाय थकल्यावर शेवटी तिला शिक्षा म्हणून हिरो किस करतो, यावर तेव्हा कुणीच ऑब्जेक्शन घेतलं नाही का?>>>>
कोण घेणार?? तेव्हाच्या सगळ्याच चित्रपटात हिरोइनीमागे लागलेले हिरो ज्याला आज स्टॉकिंग म्हणतात ते करत असत. कोणी कसले ऑब्जेक्षन घेत असे. उलट आजही ती गाणी लोकप्रिय आहेत.
केनेडी झी ५
केनेडी झी ५
निओ नॉईर क्राईम या फ्रेजबद्दल वाचलं होतं आधी. बहुतेक अनुराग कश्यपचाच असेल कुठला तरी. तेव्हां काहीही समजलं नव्हतं. पण केनेडी बघताना नेमका काय प्रकार आहे हे समजलं. हा मूव्ही बघायला तसला मूड हवा आणि एका बैठकीत बघितला तर ठीक. सगळं उदास वातावरण, एक विचित्र तरीही समोर चाललेल्या थीमला पोषक असं पार्श्वसंगीत आणि वेगळीच सिनेमॅटोग्राफी, लांब सावल्या, अंधार, अंधारे जग. एक वेगळीच मुंबई आपल्यासमोर येते. भूमीगत विश्व म्हणतात तशी भूमीगत मुंबई/ कोविडच्या काळातले सुनसान रस्ते पुन्हा बघायला मिळाले.
कथा खूपच बेसिक आहे. पण तिचं पडद्यावरचं एक्झेक्युशन आहे कि काही दम नाही म्हणताना आपण पुढे बघत राहतो. मला एका बैठकीत बघायचं सुख नाही. म्हणून लिंक तुटत पाहिला. ठरवलं होतं कि एक किंवा दोन शब्दात लिहायचं...
पण हा वेगळा प्रकार आणि अनुराग कश्यपची वेगळी हाताळणी. एण्काउंटर्स वर अनेक सिनेमे आले असतील. पण कोविडच्या काळात झालेल्या काही घटनांचा बेमालूम वापर करत एक डार्क थीम केनेडीत मांडली आहे. पटकथा फारच गुंतागुंतीची आहे. त्यामुळे विस्कळीत पणा जाणवतो.
केनेडी हा एक चक्रम माणूस आहे चक्रम हा शब्द इथे अचूक नाही, माझ्या लक्षात येत नाही. या सिनेमाच्या अनेक कथेत दैत्य आहेत. पण तो protagonist आहे कारण तो दैत्यांनीभरलेल्या जगात स्वतःच स्वतःचा बनलेला दैत्य आहे. त्याची स्वतःची एक कहाणी आहे, जी तुकड्या तुकड्यात येते, ज्यामुळे उत्सुकता टिकून राहते. त्याचा मास्क पण विअर्ड आहे. मुद्दामच तो तसा घेतला आहे.
यातले नाते संबंध पण व्यवहारावर आहेत ( ट्रँझॅक्शनल). याला हिरो पण नाही म्हणवत, अँटी हिरो पण नाही. तो पश्चात्ताप दग्ध पण वाटत नाही, पण त्याला पश्चात्ताप करावासा वाटतोय हे त्याच्या आजूबाजूला वावरणार्या काही पात्रांमुळे कळते.
राहुल भट ची बॉडी लँग्वेज , उदास डोळे, खर्जातला (?) कि हस्की आवाज, हे सगळं अशा एका माणसाचं चित्र उभं करतं जो मुळातून चांगला नाही, पण आपल्या पापांची जाण असलेला आहे आणि काही तरी शोधतोय, जरी ते निरर्थक असलं तरी. दाढी नसताना राहुल भट अजिबात चांगला दिसत नाही.
राजकीय ताणतणाव पण संवादातून येत राहतो. खोलात न जाताही राजकारणाचा परिणाम कसा होतो हे हुषारीने आलं आहे.
चित्रपटातले सगळे भाग स्वतंत्रपणे आकर्षक वाटतात, जणू काही वेगवेगळ्या शॉर्ट फिल्म्स किंवा स्किटस एकत्र केलेत असं . पण त्यांना गुंफणारा धागा मिसिंग आहे. हा कमकुवत भाग आहे.
चित्रपट कथानक आणि दिग्दर्शकाची शैली यांच्यात अडकला आहे. दोन्ही नीट साधत नाही. ल्युडो पण त्याचाच आहे ना ? अनुराग कश्यपची ही पद्धत इंटरेस्टींग आहे. तो एखाद्या साच्यात स्वतःला अडकू देत नाही. हे ही करून बघू असा प्रयत्न आहे. तरी सुद्धा कश्यप छाप आहेच.
थोडक्यात, केनेडी हा काही परफेक्ट चित्रपट नाही. पटकथा काही ठिकाणी विस्कळीत आहे. पण अनुराग कश्यपची राजकारणाबाबतची चीड , राहुल भटचा जबरदस्त अभिनय, आणि कोविड काळातल्या मुंबईचं गडद चित्रण , हे असे सर्व मिळून एक अस्वस्थ करणारा अनुभव देतात. कश्यपचा प्रामाणिक neo-noir म्हणता येईल.
रेको - वेगवेगळे प्रयोग बघायला आवडत असतील, आता काय बघू हे ठरत नसेल तरच वाटेला जा.
ता. क. >> कान्स महोत्सवात
ता. क. >> कान्स महोत्सवात मिडनाईट स्क्रीनिंग सेक्शन मधे प्रदर्शित झालेला हा पहिला भारतीय चित्रपट ठरला. स्क्रीनिंग संपल्यानंतर सात मिनिटे स्टँडींग ओव्हेशन मिळालं. त्यानंतर सिडनी महोत्सवातही टाळ्या थांबतच नव्हत्या. हे आत्ता वाचल्यानंतर एव्हढच समजलं कि आपल्याला सिनेमा अजूनही कळत नाही.
इथल्या बर्याच पोस्टी
इथल्या बर्याच पोस्टी वाचायच्या राहिल्या होत्या. परवा बब्बन यांची पोस्ट वाचली. घाईत कमेण्ट केली. आत्ता बघितलं भरपूर टीपी झालेला आहे. चालू द्या. येत राहीन अधून मधून.
केबेडीचा रिव्यू आवडला. मी
केबेडीचा रिव्यू आवडला. मी आत्ताच सायरसने राहूल भट्ट ची घेंतलेली मुलाखात बघत होतो. राहुल भट्ट ह्याला पोलीस नुआर म्हणाला. मुलाखतीत अनुराग कश्यप च्या दिग्दर्शना बद्दल बरीच चर्चा झाली. नुआर माझ्या आवडीचा विषय असल्याने लगेच येऊन इथला रिव्यू ही वाचला. बघावा लागेल, पण तो झी ५ वर आहे . हा एक प्रोब्लेम आहे . बघुया.
केनेडीचा रिव्यू आवडला राभू.
केनेडीचा रिव्यू आवडला राभू. मी १५-२० मिनिटे बघून कंटाळून सोडून दिला होता. आता चिकाटीने अजून थोडा बघून पाहतो
'बादल यू गरजता है' गाण्यात प्रत्येकवेळी समेवर(च) बिजली चमकते आणि हिरॉइन घाबरून हिरोला मिठी मारते. बिजली बघते बघते आणि शेवटी म्हणजे आता चमकतच नै ज्जा... तर दोघं खरंच समेवर मिठी मारतच नाहीत. >>>>
हिरॉइनच्या श्रीमंती आगाऊपणाला वठणीवर आणण्याचे सगळे उपाय थकल्यावर शेवटी तिला शिक्षा म्हणून हिरो किस करतो, यावर तेव्हा कुणीच ऑब्जेक्शन घेतलं नाही का? >>> हे लक्षात नाही. बराच काळ झाला बेताब पाहून. पण हे आणि साधनाने लिहीलेले बरोबर आहे. पूर्वीच्या पिक्चर्स मधे कायच्या काय लोक चालवून घ्यायचे. असे सीन्स बहुतांश सगळ्या हीरोंच्या कोणत्या ना कोणत्यातरी पिक्चर मधे आहेत
पूर्वीच्या पिक्चर्स मधे
पूर्वीच्या पिक्चर्स मधे कायच्या काय लोक चालवून घ्यायचे. असे सीन्स बहुतांश सगळ्या हीरोंच्या कोणत्या ना कोणत्यातरी पिक्चर मधे आहेत
>>> तर काय? वेस्टर्न कपडे घातलेल्या, इंग्लिश बोलणाऱ्या, येता जाता मॉंजी, पापाजी न करणाऱ्या नायिकेला अतिप्रसंगापर्यंत नेऊन मग हिरोकडून वाचवणारे व एकदम संस्कारी बनवणारे (पक्षी साडी नेसवणारे) पिक्चर डोक्यावर घेतलेत लोकांनी. त्यामानाने किस ही किस झाड की पत्ती.
ल्युडो पण त्याचाच आहे ना ?
ल्युडो पण त्याचाच आहे ना ?
<< नाही.
Ludo हा अनुराग बासू चा.
केनेडी बघायला सुरुवात केला

Pages