Submitted by कृष्णा on 13 October, 2025 - 07:56
जुना धागा २००० पार होऊ लागला म्हणून हा नविन धागा.
इथे जुना धागा आहे...
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
जुना धागा २००० पार होऊ लागला म्हणून हा नविन धागा.
इथे जुना धागा आहे...
मी आपल्या संघाबद्दल विनाकारण
मी आपल्या संघाबद्दल विनाकारण आशावादी आहे का , हे प्रत्यक्ष स्पर्धेत आपला संघच ठरवेल; मी तो निर्णय मनापासून स्वीकारेन !
Bi lateral मध्ये सगळे संघ
Bi lateral मध्ये सगळे संघ प्रयोग करत असतात, विविध combinations try करत असतात, त्यातील विजयानी हुरळून जाण्यात अर्थ नसतो, जाऊ द्या 1 मार्च la मान्य करावे लागेल. सगळ्या भारतीय commentators chya अती कौतुक आणि वाह्यात जाहिराती यामुळं अजून त्रास होतो
विंडीजचा आजचा रन रेट पाहता ते
विंडीजचा आजचा रन रेट पाहता ते मोठा विजय मिळवतील.
त्यामुळे आपल्याकडे एकच मार्ग आहे तो म्हणजे आफ्रिकेने विंडीजला हरवावे.
कारण झिंबाब्वेने आफ्रिकेला हरवणे तसे अवघड आहे.
आफ्रिका विंडीज अहमदाबादलाच असल्याने आफ्रिकेचे पारडे जड असेल म्हणू शकतो.
# आपले दोन्ही सामने आपल्याला जिंकायचे आहेतच
मला वाटतं, कालच्या एका
मला वाटतं, कालच्या एका सामन्यामुळे आपल्या फलंदाजीबद्दल साशंक होण्याचं कारण नाहीं; आपली संघ निवड मात्र जरा अधिक काळजीपूर्वक करायला हवी, हे खरं >> +१. अनाकलनीय निर्णय हा गंभीरच्या कोचिंगचा पायाच आहे त्यामूळे ह्यात काही नवीन नाही.
मला एक वाटते कि पहिल्या आठात ५-६ लेफ्टी असणे तोट्याचे आहे. सॅमसन फॉर्ममधे नसला तरी निव्वळ तो असल्यामूळे ओपनिंग बॉलिंग ऑफी ने करता येत नव्हती नि शर्माला सुटायला मोकळीक मिळत होती. सध्या तो स्वतःच्या अॅप्रोचबद्दल भयंकर साशंक वाटतो . (किशनला पहिला बॉल फेस काअयला सांअगणॅ मला खटकले . अशाने शर्माच्या आत्मविश्वासावर प्रश्न उभा राहतो.) तिलक ला आल्याआल्या मारणे जमत नाही हे माहित असूनही त्याला त्याच्या शैलीविरुद्ध खेळायला सांगणे ऑड वाटले.
"अनाकलनीय निर्णय हा गंभीरच्या
"अनाकलनीय निर्णय हा गंभीरच्या कोचिंगचा पायाच आहे" - +१ ..ह्यात बरेचदा बॉलिंग भरडली जाते. जर ७ बॅट्समेन फार काही करू शकत नसतील, तर आठवा मॅच जिंकून देणार नाही. पण ह्या प्रक्रियेत बॉलिंग अगदीच विसविशीत होऊन जाते. काल अफ्रिकेला फक्त बुमराह ला जपून खेळायचं होतं. वरूणवर चा अॅटॅक कॅल्क्युलेटेड होता, जो यशस्वी ठरला. मधल्या ओव्हर्समधे विकेट-टेकिंग ऑप्शनच नव्हता. सुंदर ला पॉवरप्ले बॉलर म्हणून घेतला होता असं टीम मॅनेजमेंटकडून सांगितलं गेलं. पण त्याने पहिली ओव्हर १० व्या च्या आसपास टाकली.
विंडीजचा झिंबाब्वेवर दणदणीत
विंडीजचा झिंबाब्वेवर दणदणीत विजय. आता आपली दणदणीत हार अजूनच जाणवते आहे. साऊथ आफ्रिका आणि वेस्ट इंडिजचा NRR गाठणे अशक्यप्राय आहे. म्हणजे आपण उर्वरित दोन्ही मॅचेस जिंकणे आणि वेस्ट इंडिज दोन्ही हरणे गरजेचे आहे. अन्यथा ICCला आर्थिक फटका बसेल.
आय सि सि गेले खड्ड्यात्! बी
आय सि सि गेले खड्ड्यात्! बी सि सि आय ला पैसे मिळतच रहातील. बास झाले.
अहमदाबाद येथिल अंतिम
अहमदाबाद येथिल अंतिम सामन्याचे तिकीट बुकिंग सुरु आहे.
पाकिस्तान अंतीम सामना खेळणार नाही हे नक्की दिसतयं!
आपण झिम्बाब्वे ला कडक चोपलं
आपण झिम्बाब्वे ला कडक चोपलं तर फायनल च्या आशा पल्लवीत होऊन तिकीट विक्रीला जोर येईल
No host nation has ever won
No host nation has ever won the Men's T20 World Cup on home soil.
Since the inaugural 2007 edition, every title has been won by a non-host team.
लंका बाहेर पडली.
आपण बाहेर पडू अशी शक्यता आहे.
हा इतिहास कायम राहणार वाटते.
फायनल कोण येते की नाही याची
फायनल कोण येते की नाही याची वाट बघत बसतील त्यांना नंतर तिकीट मिळणार नाही. त्यामुळे लोकं तिकीट घेणारच.
फग
भारतीय संघाला खूप खूप शुभेच्छा !!!!
पुजारी म्हणतो, देवाला गोंधळात नाही टाकणार ! झिंबाब्वे विरुद्ध आपण मोठ्ठं जिंकूदे , द.आफ्रिका त्यांच्या विरुद्ध हरूदे, द. आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज सामना रद्द होऊदे इ. इ. ह्यातलं फक्त एकच काय गाऱ्हाणं घालायचं तें सांग !!
विंडीज १ ओव्हर १७. पळा पळा
विंडीज १ ओव्हर १७. पळा पळा ब्यागा भरा.
वेस्ट इंडिज 46 - 4 ( 5
वेस्ट इंडिज 46 - 4 ( 5 ओव्हर्स ) !
*पळा पळा ब्यागा भरा. * - श्रद्धा आणि सबुरी !!!
90- 7 !!
90- 7 !!
वेस्ट इंडीज बेटांवरील शाळेत पाढे 6 पासूनच सुरू होतात का !! 1, 2 , 4 नाही तर फाक्त सिक्सर मारूनच स्कोअर करीन, असा विडा उचलूनच फलंदाज मैदानावर उतरत असावेत !!! द आफ्रिकेचं. क्षेत्ररक्षण लाजवाब !!!
फाक्त सिक्सर मारूनच स्कोअर
फाक्त सिक्सर मारूनच स्कोअर करीन, असा विडा उचलूनच फलंदाज मैदानावर उतरत असावेत
>>
आपले लोक पण हेच करतात की हल्ली
*आपले लोक पण हेच करतात की
*आपले लोक पण हेच करतात की हल्ली* - पण हल्ली तीच टी 20 ची सामान्य स्ट्रॅटीजी असावी; 97 - 7 वरून वेस्ट इंडीज आज 177 वर पोचले त्याच्याच आधारे !!!!
आता द आफ्रिका पण 11 प्रति ओव्हर धावा करून 108- 1 आहेत. डी कॉक हा निर्विवाद अफलातून फलंदाज आहे !!!
दक्षिण आफ्रिकेचा वेस्ट
दक्षिण आफ्रिकेचा वेस्ट इंडीजवर विजय. भारताच्या सेमीफायनल अपेक्षा अबाधित. पण भारताचा क्रमांक दुसरा राहील आणि पाकिस्तानचा पहिला क्रमांक शक्य नाही. म्हणजे भारताला श्रीलंकेत खेळावे लागणार नाही.
म्हणूनच पहिली मॅच हारलो.
म्हणूनच पहिली मॅच हारलो. तुम्हाला काय वाटलं आपला संघ दुबळा आहे? फुल्ल क्यालक्युलेशन भाई.
भारताचे सेमी फायनलच्या दिशेने
भारताचे सेमी फायनलच्या दिशेने पहिले पाऊल
म्हणजे भारताला श्रीलंकेत
म्हणजे भारताला श्रीलंकेत खेळावे लागणार नाही.
>>>
फायनल खेळावी लागू शकते जर भारत पाक दोघे फायनल पोहोचले तर..
256 !!!!!(
256 !!!!!
अब तक २५६
अब तक २५६
ज्यांना वाटत असेल आता या मॅच मध्ये बघण्यासारखे काही उरले नाही त्यांच्यासाठी...
India should win by 148 runs to stay ahead of west Ind run rate in case if the match against west Ind wash out
आज आपला वैयक्तिक सर्वाधिक
आज आपला वैयक्तिक सर्वाधिक स्कोअर ५५ आहे फक्त..
आणि आपला टोटल स्कोअर २५६
टीम वर्क
भारत जिंकला. आता वेस्ट
भारत जिंकला. आता वेस्ट इंडीजला हरवणे जरूरी आहे. पावसाची आत्ता तरी शक्यता वाटत नाही.
All cylinders firing is a good sign for India's batting.
दुबेला अष्टपैलू समजण्याची चूक करू नये. तो एक निष्पाप गोलंदाज आहे. त्याला थोडे क्षेत्ररक्षणाचे धडे देणेपण गरजेचे आहे.
संजुने आजपण निराशा केली. त्याची fearless बॅटिंग बघायला आवडते पण तो आपले स्थान संघात पक्के करण्यात अपयशी ठरत आहे.
संजू अपेक्षेपेक्षा लवकर आऊट
संजू अपेक्षेपेक्षा लवकर आऊट झाला. पण साडेतीन ओव्हर्समधे ४८ रन्स ची ओपनिंग देऊन गेला. तो मोमेंटम पुढे इतरांनी टिकवला.
अजून एक गोष्ट बघायला आवडली असती. बॅटिंग विकेटवर अतिरिक्त बॅट्समन ऐवजी, अतिरिक्त बॉलर असायला हवा होता. दुबे ऐवजी कुलदीप चा विचार होऊ शकला असता.
*दुबे ऐवजी कुलदीप चा विचार
*दुबे ऐवजी कुलदीप चा विचार होऊ शकला असता.* कदाचित, रनरेटची प्रचंड गोची झाली असल्याने, फलंदाजी मिळाल्यास खूप प्रचंड मोठी धावसंख्या उभी करून, त्या दबावाखाली झिम्बाब्वेला लवकर गुंडाळून रनरेट आटोक्यात आणायचा बेत असावा. त्याकरता दुबे आवश्यक होता. ह्या प्लॅनचा पहिला भाग दुबेला न वापरताही सफल झाला, पण दुसरा भाग मात्र गंडला ( श्रेय झिम्बाब्वेला ); कुलदीपला घेऊनही त्यात फार फरक पडला नसता, असं वाटतं.
आपला सहाव्या गोलंदाजाचा खूप
आपला सहाव्या गोलंदाजाचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे, दुबे reliable nahi. Zimbabwe ni पण 2 ओव्हर्स मध्ये 46 रन्स मारले, आफ्रिकन्स ni पण 36 काढले होते, 2024 मध्ये आपले proper 6 गोलंदाज होते, यावेळेस त्यामुळे आपल्याला प्रॉब्लेम येणार आहे
बर चाललय आता. हाच संघ अंतिम
बर चाललय आता. हाच संघ अंतिम सामन्यात खेळेल. दुबे खाली आहे म्हणून वर सतत वाटेल तसे मारता येते. कालच्याच सामन्यात त्याची वाईट गोलंदाजी झाली. क्षेत्ररक्षण मात्र सुधारले पाहिजे.
वरुण चक्रवर्ती पण गेल्या दोन
वरुण चक्रवर्ती पण गेल्या दोन मॅचेस मध्ये effective नाही. त्यामुळे कुलदीप संघात असणे जास्तच गरजेचे आहे. हार्दिक आणि अक्षर बऱ्यापैकी भरवशाचे आहेत. दुबेऐवजी कुलदीप संघात येऊ शकतो पण सूर्याने जास्त जबाबदारीने खेळले पाहिजे.
Pages