क्रिकेट - १०

Submitted by कृष्णा on 13 October, 2025 - 07:56

जुना धागा २००० पार होऊ लागला म्हणून हा नविन धागा.

इथे जुना धागा आहे...

https://www.maayboli.com/node/86160

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

भाऊ Lol

काय अर्थ आहे फोटोफिनिश ह्या वाक्प्रचाराचा?

आरे मुंबईच्या पिच क्युरेटरला समज द्या कोणीतरी, अवघड काम करुन ठेवलं होतं. हे असं पिच रोल केलं तर सामना टोटली अनफेअर ठरु शकतो. काल सुर्याला सुर गवसला म्हणून वाचलो आपण.
अमेरिकेची पहिली बॅटिंग असती तर त्यांचे ही हाल झाले असते.

A photo finish occurs in a sporting race when multiple competitors cross the finishing line at nearly the same time. As the naked eye may not be able to determine which of the competitors crossed the line first, a photo or video taken at the finish line may be used for a more accurate check.

बाकी, फेल्ट बॅड फॉर नेत्रावळकर. फारच हाणला त्याला. १६+ नी!
डेथ ओवर्स मध्ये प्रेशरमुळे चुका केल्या त्यानी. सुर्या इत्का सेट असताना त्याला बॉल पुढे टाकले आणि काहीतर फुल्ल टॉस होते.

धन्यवाद ऋन्मेष.

लंका आयर्लंड सामना प्रमुख संघ आणि दुय्यम संघ असे म्हणू शकत नाही. सध्या दोन्ही संघ एकाच लेव्हलला वाटतात. वन डे असती तर लंकेला मायदेशाचा advantage जास्त असता. ट्वेंटी मध्ये बघूया किती मिळतो. तूर्तास सामना बरोबरीत चालू आहे.

*लंका आयर्लंड सामना प्रमुख संघ आणि दुय्यम संघ असे म्हणू शकत नाही. * - खरं तर टी 20 स्पर्धेतल्या सामन्यात कोणताच संघ प्रमुख, दुय्यम नसतो, असं मला वाटतं. कोणत्याही संघातला एखादा खेळाडू पण सामना पूर्णपणे फिरवू शकतो, जे इतर फॉरमॅटमध्ये शक्य असलं तरी इतकं सोप्पं नसतं. मर्यादित षटकांच्या ह्या युगात पूर्वीची ' लींबूटिंबु संघ ' ही संकल्पनाच मोडीत निघाली आहे !

“मर्यादित षटकांच्या ह्या युगात पूर्वीची ' लींबूटिंबु संघ ' ही संकल्पनाच मोडीत निघाली आहे” - पुष्कळ अंशी सहमत आहे. पण तरिही स्कॉटलंड, अमेरिका, नेपाळ ह्यांचे पहिले सामने बघता एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली - ह्या संघांना अटीतटीच्या सामन्यांना ‘क्लोज’ करण्यासाठी किंवा समोरचा संघ अडचणीत असताना त्यांच्या नाड्या आवळण्यासाठी लागणारा अनुभव कमी पडतो. आणि अश्या वेळी ह्या टीम्स आणि तुलनेनं जास्त एस्टॅब्लिश्ड टीम्स ह्यातला फरक उठून दिसतो. त्या अर्थानं ह्यी टीम्स ‘लिंबुटिबू‘ वाटतात.

क्रेक्टय, फेफ.
काल अमेरिकेची बॅटिंग आधी आली असती आणि पड्झड झाल्यावर सुर्या सारखा शेवटपर्यंत कदाचित किल्ला लढवता नसता आला त्यांना. पाठीशी असलेल्या दांड्ग्या अनुभवामुळेच शक्य झालय हे.

क्रिकेट हा खेळ असा आहे ज्यात तुमच्या डोक्यात काय चालू आहे हे खूप मॅटर करते.

दुबळ्या संघाशी खेळताना यांच्याशी हरलो तर नाचक्की असे एक वेगळेच प्रेशर असते. अडखळत सुरुवात झाली तर ते वाढते आणि आणखी चुका होतात.

गंमत म्हणजे आता यांच्याशी सुद्धा हरतो की काय असे वाटते तोपर्यंत हे प्रेशर असते. पण आता तर हरणारच याची खात्री वाटली की अचानक उलटे होते आणि ते प्रेशर जाते.

त्या दुबळ्या संघाबाबत मात्र नेमके उलट होते. जिंकायची संधी आहे असे लक्षात येते तेव्हा त्यांच्यात चेव चढतो. जेव्हा खरेच जवळ येतात तेव्हा मात्र हातपाय गारठतात.

सामने चांगले होत आहेत अगदीच एकतर्फी नाहीत.

ते बांगलादेशचे वकीलपत्र घेऊन पाकचे स्वतःच्या पदारात दान पाडून घ्यायचे प्रयत्न सुरु दिसतायेत!

सामने चांगले होत आहेत अगदीच एकतर्फी नाहीत. >> +१ फक्त टी २० सामने असल्यामूळे चिकार धावा नाहि निघाल्या तर चुकचुकल्यासारखे वाटते एव्हढेच Happy

“टी २० सामने असल्यामूळे चिकार धावा नाहि निघाल्या तर चुकचुकल्यासारखे वाटते एव्हढेच” - Lol खरंय. पण परवाचं वानखेडेचं पीच किंवा प्रेमदासाचं पीच वेगळं वाटलं. बॉल करामती करत होता. वर्ल्डकपला पीचेस बनवण्याची जबाबदारी आयसीसीची असते.

अर्थात वर्ल्डकपचं प्रेशर ही असू शकेल. बायलॅटरल किंवा फ्रँचाइझी क्रिकेट आणि वर्ल्डकप मधे इतका फरक तर असणं अपेक्षितही आहे.

*Protecting the spirit of cricket " साठी भारता बरोबर खेळणार आहेत.* - अग अग म्हशी, मला कुठे नेशी ! Wink

Pakistan vs U.S.A., 12th Match, Group A
ICC Men's T20 World Cup

USA 20/0 (2/20 ov, T:191)
PAK 190/9
Andries Gous* 6(6)
Shayan Jahangir 14(6)

U.S.A. need 171 runs in 108 balls.

पाकिस्तान स्पिनर लंकेत चांगली कामगिरी करत आहेत.
इंग्लंड स्पिन समोर बरेचदा ढेपाळते. त्यामुळे त्या ग्रुप मधून न्यूझीलंड पाकिस्तान सेमीला यायची शक्यता आहे.

अर्थात वर्ल्डकपचं प्रेशर ही असू शकेल. >> बटलरही तेच म्हणाला.

पाकिस्तानचा परत एकदा U-TURN. >> आयसीसी ने काय कंसेशन्स दिली आहेत त्यासाठी ह्याची उत्सुकता आहे. एशिया कप चे काय ? तो कधी देणार नकवी परत ? भारताने कुठल्याही प्रकारच्या बाय लॅटरल्स किंवा ट्राय सिरीजला मान्यता देऊ देऊ नये.

*आयसीसी ने काय कंसेशन्स दिली आहेत त्यासाठी ह्याची उत्सुकता आहे. * -
आत्ताच्या टी 20त न खेळण्याबद्दल बांगलादेशला कोणतीही आर्थिक वा इतर ' पेनल्टी ' लागणार नाही व त्यांना आयसीसी स्पर्धा घेण्याची संधी मिळेल, ह्या दोन सवलती तरी दिल्याचं निश्चित असावं. ( अर्थात, ह्या सवलती दिल्या नसत्या तरीही पाकिस्तान 15 फेब चा सामना खेळणार, याबद्दल शंकाच नव्हती.)

दरवेळी ठरवून भारत पाक एकाच ग्रूपमध्ये ठेवतात.
सर्वांना पैसा कमवायचा आहे.
त्यामुळे निश्चिंत राहावे.

ह्या दोन सवलती तरी दिल्याचं निश्चित असावं. >> हो भाऊ ह्या दोन वाचलेल्या. अजून काही छुपे आहे का त्याची उत्सुकता आहे कारण नकवी ने असे विधान केले आहे कि आय सी सी ने बाकीचे डीटेल्स टी २० स्पर्धेनंतर उघड करण्याबद्दल सांगितले आहे.

खरं तर ICC ने बंगलादेशाचे एव्हढे लाड करायची काही गरज नाही. ऐनवेळी कारण नसताना स्पर्धेतून माघारीसाठी त्यांना शिक्षा मिळायला पाहिजे.

त्यांच्याबद्दल फार चांगलं मत नसण्याची अनेक कारणं असू शकतात, पण पाक व बंगला हे क्रिकेटवेडे देश आहेत हे वादातीत आहे. त्यामुळे, आयसीसी त्यांच्याबाबत कांहिंशी उदारमतवादी असणं स्वाभाविक आहे. पण, त्यांच्या राष्ट्रीय अस्मितेचा व जागतिक छबीचा क्रिकेट हा आत्यंतिक महत्त्वाचा घटक आहे, याचं भान बालिशपणे वागताना त्या दोन्ही देशांना नसावं, हे दुर्दैव !!!
( " ... Why does Pakistan repeatedly enjoy embarassing itself !" - Ricky Ponting )

कालची अफगाणीस्तानची मॅच पैसा वसूल होत एकदम खरी !

अभिशेक च्या इंजरी मूळे सॅमसन ला परत चान्स मिळॅल उद्या असे वाटतेय.

“भारताने कुठल्याही प्रकारच्या बाय लॅटरल्स किंवा ट्राय सिरीजला मान्यता देऊ देऊ नये.” - ही बाब आयसीसीच्या अखत्यारीत येतंच नाही आणि ह्या वादात बीसीसीआय वादी/प्रतिवादीच्या पोझिशनमधे च नसल्याने हा मुद्दा गैरलागू ठरेल.

अफगाणिस्तान आजची मॅच हॉटस्टार वर विसाव्या ओवर पासून दोन्ही सुपर ओवर बॉल टू बॉल आहेत..
कोणाला इच्छा असेल तर बघून घ्या.. धमाल आहे.

आपली आणि अफगाण डबल सुपर ओवर आठवली.. रोहीत शर्मा वन man शो स्पेशल

नामिबिया च्या फिरकी गोलंदाजांपुढे आपण नांगी टाकली, पाकिस्तानचे spinners यांच्यापेक्षा खूप चांगले आहेत

नामिबिया च्या फिरकी गोलंदाजांपुढे आपण नांगी टाकली >> मला वाटाते इरामसच्या विचित्र शैलीचा तो परीणाम होता. एकदा दोन्नदा खेळाले कि त्यातले नावीन्य ओसरले कि मग असे होणार नाही. अर्थत नामिबिया विरुद्ध आपण दोन वर्षांनीच खेळू हेही आहेच. अक्षर ला पहिल्यांदाच आज बोनहेडेड बॅटिंग करताना पाहिले.

Pages