निसर्गाच्या गप्पा (भाग ३५)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 30 March, 2025 - 08:10

Screenshot_20250330_173724_Photos.jpg

नमस्कार, मायबोलीच्या निसर्गाच्या गप्पांच्या ३५ व्या भागात आपले स्वागत आहे.

सर्वप्रथम गुढीपाढव्याच्या व मराठी नविन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

नेहमीप्रमाणेच आपण आपल्याला माहित असलेली निसर्गातील घटकांची माहिती, अनुभव या धाग्यावर शेयर करुन या धाग्याचा एक माहितीपूर्ण संच तयार करुया.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

गुल का रंग गुलाबी

aad10cc0-afb5-4d87-8e7d-0b7a4a58fc7a.jpeg

# Flor de Papel - Again
# My Random Clicks

कोलाज फुकटच्या वेबसाईटवरून केले. त्या वॉटरमार्कस् साठी सॉरी.

14 ला पालघर जवाहर ला पिकनिक आहे. तर 15 ला एक फंकशन आहे किंग जॉर्ज ला .. तर आधी एक्सिबिशन ला एक धावती भेट देऊन मग फंकशन अटेंड करेन असा विचार करतेय.. धावती भेट म्हटली तरी.. 1/2 तास जाणार .. अय्या ह्या फुलाचा रंग आणि शेप किती सुंदर आहे. ह्या भाज्या बघ कशा हिरव्यागार आहेत.. दुधी बघ किती मोठा आणि गुटगुटीत आहे. फ्री मध्ये मिळतील त्या बिया आणि फांद्या घेणार . फुलांचे भाज्यांचे फोटो सेशन होणार आणि हमखास 2 /4 प्लांट्स घरी येणार.

कोणे एके काळी मी हे प्रदर्शन अजिबात चुकवत नसे. मग माबोकर भेटले आणि हे प्रदर्शन गटगचे स्थळ बनले. आता मुंबैच सोडल्यावर काय…

मी कित्येक झाडे तिथे विकत घेतलेली. त्यांचे भाज्यांचे प्रदर्शन पाहुन अगदी श्रवुसारखेच बोलत फिरलोत Happy

कोणे एके काळी मी हे प्रदर्शन अजिबात चुकवत नसे. >>>>>मी सलग तीन चार वर्षे पाहिलं
गेली दोन वर्षे जमलंच नाही

अनिंद्य, बोगनवेलीचा मस्त तजेलदार रंग.
सध्या हायवेच्या दुभाजकांवर रंगीबेरंगी बोगनवेली फुलल्या आहेत.
मी सुद्धा हे राणी बाग प्रदर्शन बरेच वर्षे जातोय.
ह्या वर्षी मात्र हुकलं.
गेल्या आठवड्यात गावी गेलो होतो त्यावेळी ही जास्वंदीची फुले पाहिली. फांद्या आणल्या आहेत.
Screenshot_20260213_200655_Gallery.jpg

सर्व फोटो सुरेख.

भाचीला यावेळी राणीच्या बागेत फुलं प्रदर्शन बघायला जायचं होतं. शाळेला सुट्टी रविवारी असते त्यामुळे त्या दिवशी. मला जमणार नव्हतं, बहीणीला म्हणाले तुम्ही दोघी जा, तिलाही जमलं नाही. भाची थोडी नाराज झाली. पुढच्या वर्षी बघू.

देवकी अडुळसा आहे. काही वर्षांपुर्वीपर्यंत हे प्रत्येकाच्या कुंपणात असायचे. आता लोकांनी लोखंडी कुंपणे बनवायचे मनावर घेतल्यामुळे अडुळसा खुप कमी झालाय. तरी दिसतो अजुनही हे नशिब. पोरांना खोकला झाला की काढ्यात याची पाने घालत. विकतचे अडुळसा सिरप पण मिळते.

अडुळसा आहे. .... अरे वा, साधना धन्यवाद!
बागेत फिरताना हे झाड पाहिले होते. बरीच झाडे लावली गेली होती आणि तोडूनही टाकली गेली. वड, बांबू, जंगली बदाम, कांचन ही सारी रोपे अगदी जवळजवळ लावली होती. 4 फूट झाल्यावर काही तोडली .
मग त्या मोकळ्या जागेत हे झाड दिसले. अजून छोटे आहे. त्याच्या बिया वगैरे तयार होतात का?

मी दारासमोरच्या जागेत भाज्या लावलेल्या ज्यात फ्लॉवर होता. पाच रोपे आणलेली कोबीची म्हणुन. त्याला नंतर फ्लॉवर लावल्यावर कळले Happy त्यामुळे भाजी लागायच्या आधीच केवळ पानांवरुन मला कोबी व फ्लॉवर ओळखता येऊ लागले. फ्लॉवर व कोबीला नत्र भरपुर लागते, मी युरिया वापरत नाही म्हणुन शेणखत घातले. फ्लॉवर मस्त मोठे लागले पण गठठे बनले नाहीत. हा काल खाल्लेल्या फ्लॉवरचा फोटो.

flower.png

मस्तच साधना.
राणीबागेतले प्रदर्शन - मी चुकवायचे नाही.
हे तसेच ते महालक्ष्मी सरस. आता असेल ना तेही एवढ्यातच कधीतरी?

किती मस्त ,स्वता पिकवलेला फ्लॉवर खायला मिळतोय नाहीतर आम्ही कुठला रसायनांनी फवारलेला अगदी गच्च फ्लॉवर खातोय काय माहित . साधना तुमची मेहनत दिसतेय भाज्या आणि शेतीविषयक धाग्यातून. Happy

^^किती मस्त ,स्वता पिकवलेला फ्लॉवर खायला मिळतोय नाहीतर आम्ही कुठला रसायनांनी फवारलेला अगदी गच्च फ्लॉवर खातोय काय माहित . साधना तुमची मेहनत दिसतेय भाज्या आणि शेतीविषयक धाग्यातून. Happy

नवीन Submitted by सिमरन. ^^^

अगदी खरे आहे

'गेल्या आठवड्यात गावी गेलो होतो त्यावेळी ही जास्वंदीची फुले पाहिली. फांद्या आणल्या आहेत.'
माझ्या आजोळी होता हा जास्वंद , आजी गेली आजोळ सुटलं Sad
आज हा फोटो बघून लहानपणापणीच्या आठवणी जाग्या झाल्या.
धन्यवाद ऋतुराज

राणीच्या बागेत जायला जमलं नाही पण काल माटुंग्याच्या रुपारेल कॉलेज मध्ये असलेल्या प्रदर्शनाला गेले .मी पहिल्यांदाच अश्या प्रदर्शनाला गेले होते 6 ला गेले त्यामुळे दीड तासच मिळाला .पण वर्थ इट . कोणाला जायचे असेल तर नक्क्की जा आज सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत आहे.खूपच सुंदर आहे प्रदर्शन मी भरपूर फोटो काढलेत त्यातले काही इथे देते.
1
IMG_20260215_101843.jpg
2
IMG_20260215_101916.jpg
3
IMG_20260215_101946.jpg
4
IMG_20260215_102021.jpg
5
IMG_20260215_102111.jpg
6
IMG_20260215_102236.jpg
7
IMG_20260215_102315.jpg
8
IMG_20260215_102352.jpg
9
IMG_20260215_102448.jpg
10
IMG_20260215_102520.jpg
11
IMG_20260215_102546.jpg
12
IMG_20260215_102628.jpg

जास्वंदी ला लागणारी कीड कशी थोपवता ?>>>>>
अनिंद्य, जास्वंदीला लागणारी मिली बग ही फार हट्टी असते. साबणाच्या पाण्याने व्यवस्थित धुवून, प्रसंगी फांद्या कापून त्याचा नायनाट करावा लागतो. अनेक उपाय करून बघितले. नीम अर्क dilute करून थोडा फरक जाणवला. तंबाखू पाणी, गोमूत्र, हळदीचे पाणी इत्यादी देखील वापरून पाहिले.
साधनाताई,
फ्लॉवर मस्तच
किट्टु Happy
सिमरन, धन्यवाद
सगळे फोटो छान.

Pages