Submitted by जागू-प्राजक्ता-... on 30 March, 2025 - 08:10

नमस्कार, मायबोलीच्या निसर्गाच्या गप्पांच्या ३५ व्या भागात आपले स्वागत आहे.
सर्वप्रथम गुढीपाढव्याच्या व मराठी नविन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
नेहमीप्रमाणेच आपण आपल्याला माहित असलेली निसर्गातील घटकांची माहिती, अनुभव या धाग्यावर शेयर करुन या धाग्याचा एक माहितीपूर्ण संच तयार करुया.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
ही कंदील जास्वंद आहे का?
ही कंदील जास्वंद आहे का?
रंग फारच सुरेख आहे.
तुमच्या बागेत धाड टाकायला यायचं आहे मला.
ओह सिमरन ही जांभळी गुलाबी
ओह सिमरन ही जांभळी गुलाबी फुले बघून खूप नॉस्टॅल्जिक वाटले. मस्त.
सर्वांना मकरसंक्रांतीच्या
🪁 सर्वांना मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा 🪁
तुमच्या बागेत धाड टाकायला
तुमच्या बागेत धाड टाकायला यायचं आहे मला.+1
सिमरन, किती सुरेख फुले! ❤️
सिमरन, किती सुरेख फुले! ❤️
निगकरांना संक्रांतीच्या
निगकरांना संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा !!

जवळच्या बंगल्यात बहरलेला संक्रांत वेल....
सर्व फोटो मस्त मस्त मोहक.
सर्व फोटो मस्त मस्त मोहक.
संक्रातवेल म्हणतात का याला, माहिती नव्हतं, सुरेख रंग.
तिळगुळ घ्या गोड गोड बोला, सर्वांना शुभेच्छा.
काय केशरी रंग अहाहा
काय केशरी रंग अहाहा
गुलाब आणि संक्रांत वेल मस्त!
गुलाब आणि संक्रांत वेल मस्त!
आजच्या बर्डींग मध्ये दिसलेले
१७ जाने. २०२६. आजच्या बर्डींग मध्ये दिसलेले पक्षी:
Acorn Woodpecker - लालभडक डोक्यामुळे हा तसा पटकन दिसतो. देखणा सुतारपक्षी.

California Scrub Jay - जमिनीवर कायम बिया शोधत फिरत असतो. फार कॉमन आहे हा इथे. बहुतेक वेळेस चोचीत मोठ्ठी बी असतेच.

Hermit Thrush - हा नेहमीच माझ्या बर्ड बाथवर येतो पण आज ट्रेलवर सूर्यप्रकाशात छान पोझ दिली त्याने.

Red-Tailed Hawk - हा माझा लाईफर होता (म्हणजे मला प्रथमच दिसला आहे हा आयुष्यात). एका वृक्षाच्या अगदी टोकावर उंच जागी बसला होता. खरं प्रकाशाच्या दृष्टीने पर्फेक्ट जागी होता पण तोंडासमोर फारच फांद्या येत होत्या.

Orange crowned warbler - घरी आल्यावर वार्बलर साहेबांनीही हजेरी लावली.

वर्षा, सुंदर फोटोज्
वर्षा, सुंदर फोटोज्
वर्षा, छान फोटो!
वर्षा, छान फोटो!
हा भारतातला नेहेमीचा पक्षी..
हा भारतातला नेहेमीचा पक्षी..

सर्वच फोटो देखणे वर्षा.
सर्वच फोटो देखणे वर्षा.
छंदीफंदी कोंबड्या ना गं?
हो. कोंबडा बराच दिमाखदार होता
हो. कोंबडा बराच दिमाखदार होता.त्याचा फोटो अप लोड करायला काही त्रास होत होता म्हणून कोंबड्यांचा टाकला.
कुल!! कोंबडा फार भावखाऊ असतोच
कुल!! कोंबडा फार भावखाऊ असतोच. तुर्रेदार व एकदम शिष्ठ कुर्रेबाज पक्षी आहे.
धन्यवाद अनिंद्य, छंदीफंदी.
धन्यवाद अनिंद्य, छंदीफंदी.
आवडता धागा सगळे फोटो मस्त.
आवडता धागा सगळे फोटो मस्त.
सदाफुलीची अर्धोन्मिलीत काळी.. जनरली सकाळी उजाडताना फुलं उमललेली असतात पण आज थंडीमुळे अर्धवट उमलली होती कळी म्हणून फोटो काढला.

सुप्रभात निगकर.
सुप्रभात निगकर.
कसे आहात सगळे?
गुलाबाच्या कळ्या सुंदर.
वर्षा, काय सुंदर फोटो आहेत पक्षांचे.
California Scrub Jay चा चोचीत बी उचललेला जास्त आवडला.
पक्ष्यांचे फोटो काढणं ही मोठी कला आहे. शाली म्हणून आयडी होते. काय सुंदर फोटो असायचे त्यांचे. तुमचे फोटो पाहून आठवण झाली.
कोंबड्या पण मस्तच आहेत.
जवळच्या बंगल्यात बहरलेला संक्रांत वेल....>>>>> मस्त आहे हा रंग. संक्रांत वेल मी आतापर्यंत नेहमी बंगल्यातच पाहिला आहे.
सदाफुलीचा रंग अगदी तजेलदार आहे.
. .
.
.
पांढरा गुलमोहर. Delonix elata.
खूप पूर्वी याचे मुंबईतील एकमेव झाड महालक्ष्मी रेसकोर्स वर होते असे ऐकले आहे. आता ते नाही.
गडद गुलाबी सदाफुली
गडद गुलाबी सदाफुली = 👌
सदाफुली नो फस प्लांट. नावाला सार्थक करणारे.
पांढरा गुलमोहर. !!
पांढरा गुलमोहर. !!
आधी कधी बघितला नव्हता. सोबतचा Yellow/ Mustard रंग सर्वाधिक आवडीचा.
आधी कधी बघितला नव्हता. सोबतचा
आधी कधी बघितला नव्हता. सोबतचा Yellow/ Mustard रंग सर्वाधिक आवडीचा.>>>>>>> ताज्या फुलांचा रंग पांढरा. तीच फुले कोमेजली की रंग पिवळा.
… फुले कोमेजली की रंग पिवळा.…
… फुले कोमेजली की रंग पिवळा.…
अरे वा ! हे तर “मुरझाना खिलने से बेहतर” झाले याठिकाणी
फुले फार सुंदर आहेत. पाने,
फुले फार सुंदर आहेत. पाने, लाजाळूच्या पानांसारखी आहेत. टेक्सासमध्ये लाजाळू खूप होती, सॅन अँटॉनिओ की न्यु ब्राऊनफेल्स ते आठवत नाही. पाय द्यावा लागायचा क्वचित.
धन्यवाद सर्वांना.
धन्यवाद सर्वांना.
>>पांढरा गुलमोहर.
वाह, मी प्रथमच ऐकतेय, पाहतेय.
सदाफुलीचा रंग किती सुरेख आहे.
पांढरा गुलमोहोर पहिल्यांदाच
पांढरा गुलमोहोर पहिल्यांदाच पाहिला.
लाल सदाफुलीचा रंग सुरेख आहे.ममो तुमच्या लाल सदाफुलीला माझ्या सफेद सदाफुलीचा झब्बू




आणि हा चाफा
गुलाब
ही सगळी मुंबई पुणे हायवे पेट्रोल पंपा वरची सुंदर झाडं
पांढरा गुलमोहर पहिल्यांदाच
पांढरा गुलमोहर पहिल्यांदाच ऐकला आणि पाहिला . धन्यवाद ऋतुराज !!
सिमरन, मस्त फुले.
सिमरन, मस्त फुले.
बृहन्मुंबई महानगरपालिका आणि वृक्ष प्राधिकरण आयोजित फळे, फुले, भाजीपाला प्रदर्शन
कुठे: वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालय (राणीची बाग)
कधी: ६ ते ८ फेब्रुवारी २०२६, सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत.
नॅशनल सोसायटी ऑफ द फ्रेंड्स ऑफ ट्रीज आयोजित फळे, फुले, भाजीपाला प्रदर्शन
कुठे: डी जी रुपारेल महाविद्यालय, माटुंगा
कधी:
१४ फेब्रुवारी २०२६, दुपारी १२ ते रात्री ८ वाजेपर्यंत.
१५ फेब्रुवारी २०२६, सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत.
राणी बागेतील प्रदर्शनाला कोण जाणार आहे का? जमल्यास इथे फोटो टाका. यंदा माझे हुकणार आहे हे.
मस्त फोटो सगळेच. पांढरा
मस्त फोटो सगळेच. पांढरा गुलमोहोर प्रथमच ऐकतेय.
पांढरी सदाफुली फारच सुंदर. पांढऱ्या पाकळ्या आणि मध्ये गुलाबी ठिपका...
राणी बाग प्रदर्शन छानच असत, जमेल त्यांनी नक्की बघा.
Pages