क्रिकेट - १०

Submitted by कृष्णा on 13 October, 2025 - 07:56

जुना धागा २००० पार होऊ लागला म्हणून हा नविन धागा.

इथे जुना धागा आहे...

https://www.maayboli.com/node/86160

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

नामिबिया झिम्बाब्वे हे गरीब आणि जंगलाचे देश आहेत. त्यांच्या देशाचे खेळाडू काटक असतात. एकदा का हे खेळाडू त्यांच्या देशात गेले की कोल्ही कुत्री त्यांच्या पाठीवर लागतात आणि ते धाऊन धाऊन राकट बनतात.

*नामिबिया नक्की कुठे आहे हे परत एकदा शोधून बघितले * -
छोट्या व गरीब देशांना खेळांचा खूप मोठा आधार असतो याची हीच कारण असावीत - 1) जगात त्यांची खास ओळख निर्माण होते 2) आर्थिक, सैनिकी बळ नसूनही त्यांना बलाढ्य देशांशी लढण्याची, जिंकण्याची संधी मिळते व ३) खेळाडूंच्या जागतिक किर्तीमुळे राष्ट्रीय अस्मिता बळावते व तरुण पिढीला चैतन्य मिळते. म्हणूनच, असे देश खेळात अग्रेसर होणं ही जागतिक खेळांची सर्वात मोठ्ठी उपयुक्तताच समजली जावी!!

अरे, श्रीलंका, झिंबाब्वे, अफगाणिस्तान, बांगलादेश ..... इतके देश असताना, जिथे क्रिकेटवेडे लोक नाहीत त्या भिकार अमेरिकेत कशाला गेलास !!20190209_102604_0 (1).jpg

AUS 72/4 (11/20 ov, T:170)
ZIM 169/2
Matt Renshaw* 24(21)
Glenn Maxwell 19(22)

Australia need 98 runs in 54 balls.

ऑस्ट्रेलिया हरली आणि बाहेर गेली तर मजा येईल.
सुपर एट मध्ये आपल्या ग्रुपमध्ये झिंबाब्वे येईल त्या जागी

छोट्या व गरीब देशांना खेळांचा खूप मोठा आधार असतो याची हीच कारण असावीत >> म्हणून नाहि भाऊ तर त्या संघातून खेळणारे बहुतांशी गोरे होते म्हणून बघितले Happy

*म्हणून नाहि भाऊ तर त्या संघातून खेळणारे बहुतांशी गोरे होते म्हणून * - कबूल, पण मला अशा संघांबद्दलचा मुख्य मुद्दा अधोरेखित करायची संधी हवीच होती , ती घेतली ! Wink

काय गंमत आहे बघा, आज ब्रह्मचारी मारुतीच्या शनिवारी रोमँटिक ' व्हॅलेंटाईन डे ' आलाय, आणि तुमचा उद्याचा भारत - पाक सामना ' प्रेमदासा ' स्टेडियमवर !!!

टॉस हरलो.
पण पहिली बॅटिंग आली.
आपण बहुधा तीच घेतली असती.
अर्शदीप जाऊन कुलदीप आला.
अभिषेक शर्मा परत आला.
अपेक्षित बदल झाले.
आता आपले मारधाड फलंदाज पाकिस्तानी फिरकी गोलंदाजी कसे खेळतात यावर सगळा खेळ आहे. पहिल्या इनिंगलाच हे समजेल.

84 -2 ( 8 overs ) !
ईशांत अफलातून खेळी !!

१७ ओवर १४०-४
३ ओवर ३० आले तर १७० होतात
पाकिस्तानी नाही मारत आपल्याला इतके.
त्यांची स्ट्रेंथ स्पिन गोलंदाजी होती इथे. सामना जिंकले असते तर त्याच्या जीवावर. पण ते झाले नाही..

*सामना जिंकले असते तर त्याच्या जीवावर. पण ते झाले नाही..* खरं तर, केवळ फिरकीच्या जोरावर टी 20 सामना जिंकायचा असेल, तर फिरकीला सुरवातीलाच विकेट्स मिळून दबाव निर्माण झाला पाहिजे. ( म्हणून, पाकने 6 फिरकी गोलंदाज वापरून पाहिले). पण ईशांतने ते होऊ दिलं नाही. नंतर तो दबाव निर्माण झाला, पण तेंव्हा उशीर झाला होता.
बघू, आता भारतीय गोलंदाज काय कमाल करतात तें !!

पाकिस्तान ४ डाऊन. मी बोललो होतो.
मला भीती वाटते की यांच्या लवकर विकेट जातील आणि १०० १२५ पार करतील की नाही माहीत नाही>>>> व्हेन बोकलत बिलीव्हज ऑल कायनाद बिलीव्हज.

पाकिस्तानचा सगळ्यात चांगला chance त्यांनी पहिले फलंदाजी करून 150 ते 160 धावा काढून नंतर 5 फिरकी गोलंदाजांचा वापर करून भारतावर दबाव आणण्यात होता, पण त्यांनी पहिले गोलंदाजी स्वीकारून तो पण घालवला

*त्यांनी पहिले गोलंदाजी स्वीकारून तो पण घालवला* - कदाचित, त्याच्या फलंदाजीबाबतच ते साशंक होते म्हणून भारतावर दबाव निर्माण करण्यासाठी त्यांना आधी कमी धांवात बाद करणं हा पर्याय पाकने निवडला असावा. आपल्या संघाचं composition निश्चितच जिंकण्यासाठी अधिक उपयुक्त होतं.

*त्यांनी पहिले गोलंदाजी स्वीकारून तो पण घालवला* - कदाचित, त्याच्या फलंदाजीबाबतच ते साशंक होते म्हणून भारतावर दबाव निर्माण करण्यासाठी त्यांना आधी कमी धांवात बाद करणं हा पर्याय पाकने निवडला असावा. भारताच्या संघाचं composition निश्चितच जिंकण्यासाठी अधिक उपयुक्त होतं. आपण टॉस जिंकला असता तर आपण प्रथम फलंदाजीच घेतली असती, असं मला खात्रीलायकपणे वाटतं.

मॅच थोडीशी अपेक्षित मार्गाने जात, भारताने जिंकली. सुरूवातीला मॅच चुरशीची होईल अशी जी शक्यता वाटत होती ती दोन्ही पॉवरप्ले मधेच भारताने खोटी ठरवत, संपूर्ण वर्चस्व गाजवलं. अभिनंदन टीम इंडिया!!

२००३ च्या वर्ल्डकपची मॅचसुद्धा महाशिवरात्रीच्याच दिवशी होती (सचिनचे ९८). पण त्यावेळच्या आणि आजच्या पाकिस्तान संघाच्या ताकदीत केव्हढा फरक आहे. एक क्रिकेट चा फॅन म्हणून पाकिस्तान, वेस्ट इंडिज, झिंबाब्वे वगैरे संघांची पडझड पाहून मला वाईट वाटतं. तुल्यबळ संघांत, चुरशीचे सामने व्हावे (आणि त्यात भारत जिंकावा Happy ) असं वाटतं. असो.

काल १७० पार झाल्यावरच जाणवले की पाक संघ ढेपाळणार ह्या धावसंख्ये समोर. आपल्या खेळाडूंनीही काही टाळता येण्या जोग्या चुका केल्या.
शिवदुबेचे धावबाद होणे, कुलदीप/ किशन झेल सोडणे इत्यादी

*आपल्या खेळाडूंनीही काही टाळता येण्या जोग्या चुका केल्या.* - +१ ! इत्यादींमध्ये महत्त्वाचं - - ४-५ ओव्हर्स शिल्लक असताना हार्दिकने पहिल्याच चेंडूवर सिक्सरचा प्रयत्न करणे.

झेल सुटत राहतात. आज सोडतील उद्या पकडतील. धावबाद बद्दल हेच. त्या चुका असल्या तरी चिंतेचे कारण नाही. बडे बडे मॅच मे ऐसी छोटी छोटी गलतीया होती रहती है Happy

चांगली गोष्ट म्हणजे पीच योग्य प्रकारे रीड केला. त्यानुसार गेम प्लान बनवला. ईशान किशनने आपल्याला गेम मध्ये पुढे नेऊन ठेवले तरी तो बाद झाल्यावर 200 चा प्रयत्न करून पाकिस्तानला गेम मधून पूर्ण आऊट करायला गेले नाही. कारण त्या नादात विकेट फसल्या असत्या तर 160 वर थांबलो असतो. ती रिस्क टाळली. सूर्या आणि तिलक यांची भागीदारी कितीही रटाळ आणि कातडीबचाव वाटली तरी ती ठराविक टारगेट डोक्यात ठेवून दिसली. आणि म्हणून धावा वेगात येत नसताना देखील कुठेही ते पॅनिक झालेले दिसले नाही.

हार्दिक यूएस समोर देखील असेच आल्या आल्या मारण्यात गेला होता. दोन्ही वेळा तो इगो मध्ये गेला असे वाटले. अर्थात काल त्याला मारायलाच पाठवले होते, कारण सूर्या आणि तिलक भागीदारीने विकेट हातात अशी स्थिती झाल्यावर आता रिस्क घ्यायला हरकत नाही अशी स्टेज आलेली. पण त्या पिचवर पहिल्याच बॉलवर मारायला गेला ही चूक त्याची स्वतःची होती. तो बाद होताच गंभीरचा चेहरा बरेच काही बोलून गेला.

लंकेतील स्पिनिंग पिच आणि पाकिस्तानकडे उपलब्ध असलेले स्पिनर पाहता, पाकिस्तानला अजूनही स्पष्ट ऍडव्हान्टेज आहे. पाकिस्तान फायनलला पोहोचला तर त्यात आश्चर्य वाटणार नाही.

Pages