बिग बॉस मराठी सिझन ६

Submitted by दीपांजली on 14 January, 2026 - 14:02

बिग बॉस मराठी सिझन ६ सुरु झाला आहे.
त्यावर चर्चा करण्यासाठी हा धागा !
स्पर्धक :
दीपाली सय्यद : ( अभिनेत्री/पॉलिटिक्स्ल बॅक्ग्राउंड)
सागर कारंडे : ( कॉमेडियन/ अ‍ॅक्टर)
सचिन कुमावत: (खान्देशी गायक)
सोनाली राऊत: (मॉडेल, एक्स बिबॉ कॉन्टेस्टन्ट )
आयुष संजीव: (अ‍ॅक्टर )
तन्वी कोलते: (अभिनेत्री)
करण सोनावणे/फोकस्ड इन्डियन : इन्फ्लुएन्सर, कॉमेडियन, क्रिकेट प्लेयर्स/ क्रिकेट क्स्न्टेन्ट साठी फेमस.
प्रभू शेळके:रील स्टार
प्राजक्ता शुक्रे,: इन्डियन आयडॉल सिझन १
अनुश्री माने : मॉडेल्/अ‍ॅक्ट्रेस
रुचिता जामदार,: एम टि.व्ही रोडीज एक्स कॉन्टेस्टन्ट
राकेश बापट,: अ‍ॅक्टर/एक्स बिबॉ कॉन्टेस्टन्ट
रोशन भजनकर: अमरावतीचा बॉडी बिल्डर
दिव्या शिंदे: युवा नेता
विशाल कोटियन : अ‍ॅक्टर/एक्स बिबॉ कॉन्टेस्टन्ट
राधा मुंबईकरः लावणी +आयटेम डान्सर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

राकेश बहुदा मजा करत होता, किंवा साजुक तूपातले हेल्दी फ्लर्टिंग !
करण प्राज्कता प्रकरण मात्रं पुढे गेलेले दिसतय.
Btw, राकेशची एक्स वाइफ , ‘रिद्धी डोगरा‘ फारच सुंदर आहे, आज राकेशने मेन्शन केले कि ते अजुनही बेस्ट फ्रेन्ड्स आहेत, रोज बोलतात एकमेकांशी वगैरे..असे कसे बेस्ट फ्रेन्ड्स रहाता येते काय माहित Happy
ती रिद्धी सध्या ‘द फिफ्टी‘ मधे आहे आणि नवीन नॅशनल क्रश होण्याच्या मार्गावर आहे, शो मधे एक तरुण दिलफेक आशिकही मिळाला आहे तिला !
असो, आज राखी येऊन काहीही फरक नाही पडला, सागरची कॅमेराशी बोलताना रिअ‍ॅक्शन आवडली Proud
राखीने इत्॑क्या सगळ्या ट्रिटमेन्ट्स नंतर आता स्किन लाइटनिंगही केलेली दिसतय, अगदी मायकेल जॅक्सन सारखे पांढरे फटक Uhoh
तन्वी आज हुशार वाटली, विशालचं डोकं कसं चालतय प्रेडिक्ट करायला लागली आहे.

फार बोअर होता एपिसोड. वाईल्ड कार्ड एन्ट्रि म्हणून राखी? निक्कि ला आणायचं कि त्यापेक्षा. तिने थोडा तरी स्पाईस आणला असता .

आयुषला बिबॉसचा कंटाळा आला आहे अस वाटत आहे.इच्छा नसेल तर काढा ना त्याला.
पण मराठी बिबॉसमध्ये फारस यायला कोणी तयार नसत अस वाचल होत.
त्यामुळे वाईल्ड कार्ड पण कमी येतात.आलेच तर राखी,आरोह आणि बिचुकले येतात.
सध्या फार बोअर होत आहे.

अगदीच एकतर्फी चालु आहे बिगबॉस, टोळीला टक्कर द्यायला एकही नाही, राकेशची काय स्ट्रॅटजी तर फोटो पुलमधे टाकला.. अगदीच तिसरी ड व्हरायटी .. दोनदा बिबॉ मधे जाऊन आला तरी इतकच डोकं चालतय त्याचं.. करणची पण सागळी गच्ची गॅन्ग नॉमिनेट झाली Proud
मला आता विशाल रुचीता क्रिन्ज लव्हस्टोरी नको आहे , वय ४० आणि २० , कन्टेन्ट साठी हे मात्रं प्लिज नको Uhoh

आत्ता राखी आलेय... काही दिवसांनी निकी ला पण आणतीलच.
कारण राखी येऊन दोन दिवस झालेत पण मसाला भाजला नैये आजून तिने...

काय महान रटाळ भाग कालचा.. राखी ला आणुन पण हीच अवस्था... ती बाई काही करणार नाही म्हणत मस्त सगळ्यांसाठी स्वयंपाक वगैरे करते आहे की....
दात तोडायच्या टास्क मधे पण काही मज्जा आली नाही.. प्राजक्ता ने गृहित धरलेलं की ती नॉमिनेट होणार नाही पण अनुश्री ने गेम केला.. त्यावेळी तिचं तोंड बघण्यासारखं झालेलं... राबा करतो त्या सगळ्या गोष्टी मला फुसक्याच वाटतात.. फोटो फाडुन फेकुन दिला त्याने.. काय उपयोग..
राखी ने सगळा स्वयंपाक बनवला तर तन्वी लगेच वैतागली..
काहिच घडत नव्हतं तर राखीने रुचिता ला उचकवलं.. पण तेही फेक वाटलं...
हा सिझन उरकणार बहुतेक लवकर

कसले बावळट आहेत ,पूर्ण टोळीला नॉमिनेट करण्याचा चान्स होता,पण अख्खी टोळी वाचली.काय प्लँनिंग करतात,डील करतात त्यांच त्यांनाच माहित.
राखीला आता कोणी भावच देत नाही.तिला का आणतात आणि ती तरी का तयार होते यायला.

इथे वाचून यावेळी बघत नाहीये ते बरं वाटलं. मराठी बिग बॉस बंद करा आता कलर्स मराठी. काही व्हरायटी नाही, थोडे दिवस झालेकी राखीला आणा. सर्व तोच तोच पणा.

यावेळी कोणाचे इलेमिनेशन झालं तर वाईट देखील वाटत नाहीये कारण तेवढी अटॅचमेंटच नाहीये. चौथा पाचवा वीक झाला तरी देखील आयुष, सचिन असे खेळत आहेत की काहीही घेणं देणं नाही. पहिल्या सीझनमध्ये कोणी एविक्ट झालं की किती वाईट वाटायचं. मेघाचं फेक एव्हिक्शन झालं होतं तेव्हा तर तिचे दुश्मनसुद्धा रडले होते. इथे अजिबातच डेडिकेशन नाही ,त्यामुळे अटॅचमेंट नाही.
काल राखी आली तर विशाल तिच्यासोबत मिळून रुचिताची किती टर उडवत होता तरी देखील तिला काहीच वाटले नाही .तो हेसुद्धा म्हणाला की टोळीशिवाय तुझा काही गेमच नाही. याउलट तन्वी बरोबर जाऊन भिडते त्याला.
आयुषला पाठवा आता घरी त्याला फारच कंटाळा आलेला दिसतोय.
राखी आली की मजा येते मात्र ,काही नाही तर एखादा कॉमेडी शो पाहिल्यासारखं वाटतं तसेही बिग बॉस अगदीच रटाळ झालं होतं ते थोडं तरी पहावसं वाटेल ते तिच्याचमुळे. काल राखीने रुचिताच्या 'ऑग ऑग ऑग ' ची मस्त टर उडवली..जाम ईरिटेट करते ती रूचिता.बसली नंतर रडत.

मला पण नॉमिनेट झालेल्याबद्दल अज्जिबात सहानुभूती नाही. खेळतच नाहीयेत ते. बावळट गँग सगळी. अनुश्रीने डील दिले आणि यांनी विश्वास ठेवला हेच कमाल वाटले. त्यांनी डील पाळले नाही तर ?असा विचारदेखिल करत नाहीत का!! हे सगळे फूल्स आहेत एकजात, टोळीच काय तो गेम खेळते फक्त मग काय होणार. आयुष जाईल असे वाटते आता.
रुचिताने विशाल बद्दल बोललेले आजच्या प्रोमो मधे दिसतेय. मी फार अटॅच्ड झाले अहे वगैरे. ( ते पण बरोबर वॅलेन्टाइन डे च्या सोयीने) कदाचित मिसगाइडिंंग प्रोमो असू शकेल. किंवा ठरवून केलेला ड्रामा . असे घरात कोणाबद्दल खरंच फीलिंग निर्माण झाल्या, आणि त्याविषयी ती व्यक्ती अनशुअर आहे, तर इतकी खाजगी बाब , त्याबद्दल बोलायचे तर ती व्यक्ती स्मोकिंग रूम मधे नाहीतर बाथरूम मधे बोलेल एक वेळ पण माइक वर लिविंग रूम मधे बोलतायत म्हणजे फेक असण्याची शक्यता जास्त.
बाकी राखीने येऊन फार काही केलेले नाही अजून.

बाकी राखीने येऊन फार काही केलेले नाही अजून.>>आज टाकल्या की राखीने बर्याच काड्या...रुचिताला पोह्यांवरुन भडकवलं. दिपालीला म्हणे तू कशाला करतेस पुन्हा पोहे. काही करू नकोस..कधी नव्हे ते प्राजक्तालाही बरोब्बर अडकवले तिने काडी टाकून..तन्वीने करेक्ट सुनावलं प्राजक्ताला..मला तर वाटतंय रुचितामुळे game weak होतोय हे विशालला राखीनेच सांगितले असावे.

पण विशालमधे हिंमत आहे रुचीतालाही गप्प करायची, काल त्याने सरळ विचारले कि टोळी आणि माझा सपोर्ट नसेल तर तुझा काय गेम आहे, तू एक भांडणारी मुलगी इतकीच तुझी इमेज आहे !
रुचीतानी ऊत्तर दिले पण ते अगदीच गुळमुळीत, विशालला कन्फ्रन्ट करायची एकातही हिंमत नाही .. ‘मला तू आवडतेस पण मी तुझ्या प्रेमात नाही‘ हे ही त्याने आधीच बोलून स्वतःला सेफ केलय.. मग काय रुचीतानेही ‘डिअर जिन्दगी‘ स्टोरी फेक करायचे ठरवले असेल तर नवल वाटणार नाही, मेन्टॉरच्या प्रेमात तरुण मुलगी , याची चर्चा तर होणारच , बॅड गर्ल इमेजची तशीही तिला फिकिर नाही !
Btw, त्या दिव्याची प्रेस कॉन्फरन्स झाली आहे आज, अपेक्षे प्रमाणे शाब्दिक तलवार वगैरेशब्दं फिरवतेय आता !
बिबॉने अर्धेच फुटेज दाखवले , त्यांच्या सोयीने बरेचसे फुटेज हाइड केले, तिच्या हेल्थ प्रॉब्लेम्सची काळजी घेतली नाही, क्रिटिकल होई पर्यन्त इन्जक्शन दिले नाही वगैरे वाट्टेल ते बोलतेय !

विशालला कन्फ्रन्ट करायची एकातही हिंमत नाही >>तन्वीमध्ये आहे ती धमक..मला तर वाटतं विशाल तन्वीला घाबरतो म्हणून तिने त्याला 'बोका ' बनवलं, तेव्हापासून तिच्या वाट्याला नाही गेला तो.

कालचे पोहे फारच छान झाले होते वाटतं.. लगेच संपले... त्यावरुन राडे... राखी ने अजुन पेटवलं...
दीपाली रडली, विशाल ने समजावलं.. सगळं ठरवुन वाटलं..
प्राजक्ता ला तन्वी ने सुनावलं ...प्राजक्ताने विचारलेला प्रश्न कुचकट होता.. स्वतः आणि करण काय करताय्त ते बघ म्हणावं आधी. तन्वी ने बरोबर सुनावलं तिला.. प्राजक्ता काही बोलुच शकली नाही..
नंतर माझ्याकडे खुप मोठी कामं आहे म्हणाली.. ... प्राजक्ता चं कौतुक कमी करुन जरा तिला धक्क्यावर बोललं पाहिजे आता.. परत पातळी दाखवता वगैरे म्हणाली.. मला आवडायची खरंतर ही आधी.. डीसेंट राहाते म्हणुन.. पण कालच्या प्रसंगात नाही आवडली
काल तन्वी ला विशाल ने इतक्या घाण पद्धतीने ओढले ते बघुन एक क्षण भितीच वाटली.. ती अल्मोस्ट तोंडावर आपटली असती.. करण पण विचित्र पणे तिला पायाला धरुन ओढत होता...
अनुश्री परवा रडलेली दाखवली.. राबा सोबत असताना वडिलांची आठवण आली म्हणुन.. २ आठवड्यापुर्वी तिनेच राबा ने हात ओढला म्हणुन चुकिच्या पद्धतीने ड्रामा केलेला.. आणि आता वडील .. वा वा. काय फेकाडे लोक आहेत हे...

करण चा घाणेरडेपणा आता बघवत नाहिये.. दात घासत किचन मधे कोण येतं.. ते पण गॅस पाशी..... त्यावर कोणीतरी त्याला बोलायला हवं होतं..
तेपण दुपारच्या जेवणाच्या वेळी आला.. सकाळी पोहे खाताना दाखवलं त्याला.. म्हणजे दात न घासता ब्रेकफास्ट केला की का.. यक्क...

Btw, त्या दिव्याची प्रेस कॉन्फरन्स झाली आहे आज, अपेक्षे प्रमाणे शाब्दिक तलवार वगैरेशब्दं फिरवतेय आता !
बिबॉने अर्धेच फुटेज दाखवले , त्यांच्या सोयीने बरेचसे फुटेज हाइड केले, तिच्या हेल्थ प्रॉब्लेम्सची काळजी घेतली नाही, क्रिटिकल होई पर्यन्त इन्जक्शन दिले नाही वगैरे वाट्टेल ते बोलतेय ! >>
दिव्या ला कन्फेशन रुम मधे २-३ वेळा बिबॉ ने तलवार शब्दाबद्दल हिंट दिली होती.. तेव्हा ती ठाम होती..
आता बाहेर येउन तिच्या वकिलांनी सांगितलं असेल म्हणुन प्रेस कॉन्फरन्स घेउन "शब्दिक तलवार" असा बदल केला.. घरातले स्पर्धक बाहेर येउन थेट कोर्टात गेले तर दिव्या अडकु सुद्धा शकते म्हणुन हे सगळं कव्हर अप चालु आहे दिव्या टीम चं..
बिबॉ कडे पुर्ण लिगल टीम आहे.. त्यांनी सगळा अभ्यास करुन हिला घराबाहेर काढलं असणार...

विशाल करण खूप फिजिकल झाले तन्वी बरोबर हे खरय पण तन्वीला तेच्च हवं होतं, ती म्हंटली सुद्धा तिला चालतं !
नंतर बोलून दाखवण्यासाठी कि ती वुमन कार्ड खेळत नाही, एव्हरीथिंग फॉर फुटेज, जे मिळेल ते , हर्ट झाली तर सिंपथी !
विशाल म्हंटला होतान कि लाइमलाइट मधे येण्यासाठी तन्वी हात कापून देईल , अगदी १००% खरं आहे !
तन्वी प्राजक्ता अर्गुम्नेट मजा आली, प्रभुनेही मस्तं उत्तर दिलं प्राजक्ताला , राखी पण व्यवस्थित सगळीकडे जाऊन काड्या टाकायचं काम करतेय !
मला वाटतं यांना १००% बाहेरचा फिडबॅक मिळतोय, प्राजक्ताला काही युट्युबर्स म्हणतात ‘आयुर्वेदिक’ , आजच बरोब्बर तन्वीला कसा सुचला हा शब्दं ?
प्रेमाचे वारेही १४ च्या आसपास वहातय घरात !
विशाल आज रुचीताला म्हणे कि शेवटपर्य्नत तुझ्या बरोबर असणार नाही कदाचित, का तर म्हणे मागच्या सिझनला अभिजीत सावन्त जिंकला नाही कारण तो निकी बरोबर होता. नक्की काय म्हणायचे होते त्याला?
आज पण कित्ती कन्ट्रोल करत होता विशाल अख्खं घर, राखीच्या येण्याने त्याला एक्ट्यालाच काहीही फरक पडलेला नाहीये, जे तिला घाबरतात त्यांना हसत होता तो.
कभी कभी लगता है कि विशाल ही बिगबॉस है Biggrin

तन्वी कडे बघुन कधी कधी वाटतं की मेघा धाडे सारखं पोटेन्शीयल आहे तिच्यात.
कोणालाही थेट भिडते, किचन मधे चांगला वावर आहे, स्वयंपाक चांगला करत असावी, जीव लावुन टास्क खेळते, बोलताना पण मुद्दे बर्‍यापैकी नीट मांडते, कोणत्या गोष्टीचा मुद्दा उठवायचा ते तिला नीट कळतं, स्वत: कडे फोकस घ्यायचं बरोबर कळतं, ड्रेसिंग पण आवडतं तिचं...
मेघा ला २ चांगल्या स्पर्धकांची साथ होती तसं तन्वी ला नाहिये.. प्रभु तिच्यासोबत असतो पण म्हणाव तेवढा स्ट्राँग खेळाडु नाही. मुलींपैकी बाकी कोणीच नाही. ... तन्वी डोकं लावुन खेळली तर टॉप २ मधे जाईलही.. विशाल आणि तन्वी दोघं टॉप २ वाटतायत मला सध्यातरी Happy

राकेश काल प्राजक्ताशी काहीही बोलत होता,त्यालाच माहित.तिच्या प्रश्नांची उत्तरच नव्हती त्याच्याकडे.
नंतर टास्कच्यावेळी गाजर वर फेकल आणि बिबॉस शांत राहिले.
आता वर फेकल्यावर आणि तेही राकेशने ,मग विशाल जाणारच,मग बिबॉस जागे झाले.
अरे पण फेकणार्याला पण बोला ना,वर फेकण,लपवण,चढण जर अलाउड नाही तर मग फेकण चालणारच नाही.
आणि ती प्राजक्ता ,खरच बावळट आहे,त्यावर म्हणते ,आम्ही पाण्यात फेकू.
अग,तो करण सकाळी पाण्यातच असतो,पाण्यात फेकून काय होणार आहे,लपवायच आहे ना.पण पाण्यात फेकून कस चालेल.खरच कळत नाही का हिला.
संत आयुष महाराज बहुतेक संन्यास घ्यायला आलेले आहेत.यावेळी एलिमिनेशन झाल तर काढाव.
राखी आग लावते हे तिथे सगळ्यांनाच माहित आहे,मग तरीही सगळे एकमेकांशी का भांडत आहेत.
राखी काही दिवसच असणार आहे ,हे एक दोघ सोडले तर बिबॉस फॉलो करणार्या सगळ्यांनाच तिथे माहित असणार ,मग राखीने भडकल्यावर काय वेड्यासारखे भांडत आहेत.
प्रोमोवरून तर वाटत आहे की,राखीलाच कँप्टन केल असाव म्हणजे हा.ही टास्क बहुधा रद्दच झाला असावा..
एकंदरीत लास्ट सिझन बघता अभिजितने काहीही न करता त्याला आणि सिंपथी प्लेअर सूरज आणि टीआरपी क्वीन निक्की ला आणल ते बघता,गुडी बाईंना टॉप 2मध्ये आणतील सुध्दा.त्याबरोबर एक विशाल आणि तापट शेवटपर्यंत राहिला तर त्यालाही.नेतील.
तन्वी मला सुध्दा सध्यातरी बरी वाटत आहे.पण कधीकधी फार इरिटेट करते.खरतर शांत रहून स्वतःवर कंट्रोल ठेवला तर मला तिला विनर बघायला आवडेल.पण बिबॉसला ती विनर नको असेल आणि गुडी बाईं हव्या असतील तर मग प्रश्नच मिटला.म्हणूनच काल त्या दोघींमधल भांडण हायलाईट केल नसेल ना.

खरतर बिबॉसचा खरा गेम अनुश्री आणि विशाल खेळत आहेत .पण अनुश्रीने आधी माती खाऊन विनर होण्याचे चान्सेस कमी केले आहेत आणि विशाल कितीही मास्टरमाइंड असला ,बिबॉस गेमसाठी परफेक्ट असला तरी त्याला नक्कीच करणार नाहीत.

मिळाली मिळाली यु ट्यूब वर .
काय फाजील बाई आहे ही दिव्या .
हिचं वय काय , हि बोलते काय ? विद्रोह , बंडखोरी , माज , स्वाभिमान .
आता तलवार म्हणजे वैचारिक तलवार म्हणे, तिथे तर काही बोलली नाही , आणि धमकीच आहे , तुम्ही माझं पूर्ण ऐकलं नाही , क्लिप अर्धीच दाखवली वगैरे सारवण.

दिव्या बाहेर गेली तेव्हाच स्वतःची इमेज जपायला त्यांनी मला नाही काढले मीच आले बाहेर असे म्हणणार असे वाटले होते. लीगल केस, अट्रोसिटी वगैरे भाषा तिच्यापेक्षा इतर च जास्त बोलत आहेत. तिने सगळे ऑप्शन्स सध्या ओपन ठेवले आहेत असे दिसते Happy
राखी काहीही हंगामा करत आहे. आज एका प्रोमोत "तो हमाल कुठे आहे, मला नाव नाही आठवत" असे म्हणाली. रुचितालाही विशाल वरून आणि लव अँगल वरून टोमणे मारतेय असे दिसले प्रोमोत.
लव अँगलचा अचानक वॅलेन्टाइन डे च्या सुमाराला सुळसुळाट झालाय. रुचितानंतर आता करण ला पण खोटे खोटे कुछ कुछ होता है झालेले दिसते. विशाल आणि रोशन पण रुचिताशी बोलताना काय ठरलं तुझं , प्रेम करायचंय का अश्या भाषेत चेष्टा करत होते त्यावरून मला जवळपास खात्रीच वाटते आहे की बिबॉ ने बोलावून विचारले असणार कोण कोण प्रेमाचे नाटक करायला तयार आहात त्यांनी या आठवड्यात सुरु करा, तुम्हाला फुटेज मिळेल. Lol
कॅप्टनशिप टाक मधे गाजरे लपवणे हे टास्क चाच भाग होता ना! वर टाकलेले ( लूपहोल) चालत असावे. गुडि गुडि प्राजक्ताला तन्वीने दिलेले उत्तर आवडले. आयुर्वेदिक शब्द ऐकून मी पण चमकले, हा शब्द युट्यूबर्स कडुन ऐकला होता. पण ती निदान काहीतरी गेम खेळते आहे. आयुष अजिबात दिसतच नाहीये. इत्क्या कॅमेर्‍यांपैकी कुठेही तो चुकूनही दिसू नये हेच आश्चर्य आहे. जाणार नक्कीच यावेळी. कुणाच्याही खिजगणतीतही नाहीये तो, बोलण्यात पण त्याचे नाव येत नाही.

दिव्याने केस केली असं येतंय कालपासून. अर्थात बिग बॉस ची ही लीगल टीम असेल ना, सगळ्या शक्यता तपासल्या असतील.

चोविस वर्षाची दिव्या म्हणते २० वर्ष चळवळीत आहे. वयाच्या चौथ्या वर्षापासून तलवार (शाब्दिक) चालवतेय की काय? माझा जन्म चळवळीतला आहे म्हणे. हि जर चोवीसची आहे तर हिचा जन्म २ ० ० १ किंवा २ ० ० २ चा असणार , तेव्हा कोणती चळवळ होती ?

राखी सावन्त मुद्दाम उचकवतेय हे माहित असून लोक ट्रिगर होतायेत, तेही रुचीता सारखी बिबॉ कोळून प्यायलेली प्लेअर , मला तर हसु येत होतं बघताना Proud
रोशन , सागर तर रडायला लागले, राखीने सळो कि पळो केले !
तन्वीही किती पाठान्तर केल्या सारखी कर्कश्श भांडते १००% स्क्रिप्टेड वाटतय !
Btw, कायम ऑब्झर्व करतेय कि बिगबॉस फार चावट आहेत, तन्वी आली रे आली कि मागून कॅमेरा फोकस करतात , आज राखी म्हंटलीच तिला कि बॉडी मस्तं आहे,‘कार्डॅशिअन बट’ आहे तुझ्याकडे Wink

मला सुद्धा तन्वी ची फिगर आवडते . मागच्या कोणत्यातरी पानावर मी लिहिलं होतं कि ती सिंहकटी आहे .

लव अँगलचा अचानक वॅलेन्टाइन डे च्या सुमाराला सुळसुळाट झालाय. रुचितानंतर आता करण ला पण खोटे खोटे कुछ कुछ होता है झालेले दिसते. विशाल आणि रोशन पण रुचिताशी बोलताना काय ठरलं तुझं , प्रेम करायचंय का अश्या भाषेत चेष्टा करत होते त्यावरून मला जवळपास खात्रीच वाटते आहे की बिबॉ ने बोलावून विचारले असणार कोण कोण प्रेमाचे नाटक करायला तयार आहात त्यांनी या आठवड्यात सुरु करा, तुम्हाला फुटेज मिळेल >>>>>>>>> तन्वीला पन्चिन्ग बॅग च्या ऐवजी आयुषला मार हे सुद्दा बिबॉने सान्गितल असेल, पण आयुषने तिला भाव दिला नाही.

रोशन , सागर तर रडायला लागले, राखीने सळो कि पळो केले ! >>>>> अगदी अगदी. हाच सागर परवा माझा कॅप्टनशिपचा भार हलका केला म्हणून राखीचे आभार मानत होता. काल तोच बोलतोय की एक बाई घरात येतेय आणि भाण्डणे होतायत. मला हे सहन होत नाहीये म्हणे.

राखी सावन्त मुद्दाम उचकवतेय हे माहित असून लोक ट्रिगर होतायेत >> हो ना. तिला काय सिरियसली घेतात लोक! ती काय वाट्टेल ते बोलते. तरी प्रोमो मधे दाखवले ते "विशाल मला प्रेम हवं! मी ** आहे!" अस तिने रुचिताला म्हटलेले दाखवले नाही एपिसोड मधे.
गुडी गुडी प्राजक्ता ला काय त्रास होत होता आणि, म्हणे एका बाई ने दुसर्‍या बाई ला बोलले तर मला त्रास होतोय. उगीच काहीही नाटकं.
लिटरली सळो की पळो केले आहे Lol मला पण रोशन, सागर रडायला लागलेले बघून हसू येत होतं. एकूण काय तर राखीने बिबॉ चा पैसा वसूल करून दिला!

राखी आल्यानंतर अख्ख घर ओरडायला लागल आहे.पण राखी फारफारतर हा आठवडा असावी.नंतर बघू काय होत.
पूर्ण सिझन होईल का ,अशी शंका येत आहे.
आयुष तर नक्की जाईल.
काल राकेशने अनुश्रीला चीट केल्यावर अनुश्रीने जे काय कपडे वगैरे फेकले त्यावरून गुडी बाईंनी खरतर गोंधळच घालायला हवा होता.कारण अनुश्रीने तर चक्क चीट करून नॉमिनेट केल होत.पण गुडी बाई थंडच राहिल्या.
बिबॉसने काल राकेश आणि विशालला मुद्दाम एकत्र ठेवल असाव.त्यांच एकमत शक्यच नव्हत आणि राकेश जे काही विशालवर ब्लेम ठेवून मी कसा खरा सागत आहे,ते तर पटतच नाही.विशाल टोळीचे लोक कँप्टनसाठी उमेदवार झाल्यापासून टोळीचाच कँप्टन होणार हे बोलत होता.
राकेशला मागच्या धक्क्यावर भाऊंनी केलेल टोळीच कौतुक पचनी पडल नव्हत ,तो राग त्याने असा काढला.अर्थीत तो गेम खेळला हे बरोबरच आहे.पण तिथेही वाशालने त्याचा गेय ओपन केलाच की याला स्वतःशिवाय दुसर कोणीही कँप्टन नको आहे वगैरे आणि पुढच्या आठवड्यात कँप्टनशिपच्या टास्कमधल्या राड्याची पण सूचना दिलीच आहे.
बिबॉसला हेच अपेक्षित असाव.
पण नेहमीसारखी राखी आता एवढी इंप्रेसिव्ह नाही वाटत,हे बहुतेक तिला पण कळल आहे.
तीचाही येणारा वीक लास्ट वीक असावा.
या धक्कयावर टोळीला फायर करून येणार्या आठवड्यासाठी चार्ज करणार बिबॉस.

Pages