Submitted by दीपांजली on 14 January, 2026 - 14:02

बिग बॉस मराठी सिझन ६ सुरु झाला आहे.
त्यावर चर्चा करण्यासाठी हा धागा !
स्पर्धक :
दीपाली सय्यद : ( अभिनेत्री/पॉलिटिक्स्ल बॅक्ग्राउंड)
सागर कारंडे : ( कॉमेडियन/ अॅक्टर)
सचिन कुमावत: (खान्देशी गायक)
सोनाली राऊत: (मॉडेल, एक्स बिबॉ कॉन्टेस्टन्ट )
आयुष संजीव: (अॅक्टर )
तन्वी कोलते: (अभिनेत्री)
करण सोनावणे/फोकस्ड इन्डियन : इन्फ्लुएन्सर, कॉमेडियन, क्रिकेट प्लेयर्स/ क्रिकेट क्स्न्टेन्ट साठी फेमस.
प्रभू शेळके:रील स्टार
प्राजक्ता शुक्रे,: इन्डियन आयडॉल सिझन १
अनुश्री माने : मॉडेल्/अॅक्ट्रेस
रुचिता जामदार,: एम टि.व्ही रोडीज एक्स कॉन्टेस्टन्ट
राकेश बापट,: अॅक्टर/एक्स बिबॉ कॉन्टेस्टन्ट
रोशन भजनकर: अमरावतीचा बॉडी बिल्डर
दिव्या शिंदे: युवा नेता
विशाल कोटियन : अॅक्टर/एक्स बिबॉ कॉन्टेस्टन्ट
राधा मुंबईकरः लावणी +आयटेम डान्सर
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
काल त्या तांदुळावरून किती तो
काल त्या तांदुळावरून किती तो ड्रामा,बर एवढ सगळ होऊन त्याचा भात करून खाल्ला की नाही ते दाखवलच नाही.
जोड्या अँज एक्स्पेक्टेड आहेत.
पण काल नॉमिनेशन टास्कच्या वेळी रुचिता-तन्वी, राकेश-अनुश्री चक्क सेफ खेळले.कोणीच एकमेकांना नॉमिनेट केल नाही.कदाचित पुढचे पाच दिवस आणखी कठीण होतील म्हणून नको,म्हणून.असेल कदाचित.
बिबॉसने काल नॉमिनेशन चा क्रायटेरिया तन्वीला कॉर्नर करण्यासाठी ठेवला असावा अस वाटल,बिबॉसला तन्वीला आता चांगलच दाखवून सिंपथी मिळवून द्यायची असावी,कारण काल "मला जाऊ द्या ना घरी"अस सतत तिच चालू होत,अशा वेळी बिबॉस कन्फेशन रुम मध्ये बोलावतात,जस रोशनला बोलावल होत,पण तस न करता असा टास्क ठेवला की विक कंटेस्टंटला काढायच.
मला शोच सोडायचा आहे अस म्हणणारा कंटेस्टंट घरातल प्रेशर हँडल न करता आल्याने नॉमिनेट होतो विक आहे म्हणून.
तसा टास्कही होता.पण एक दोन सोडल्यास कोणी म्हणजे कोणीच तन्वीला नॉमिनेट केल नाही.
रोशनने तिला नॉमिनेट करण्याच जे काही कारण दिल ते त्याच त्यालाच माहित.
तन्वी नॉमिनेट झाली असती तर तिने गोंधळ घातला असताच,पण रुचिता आणि तिने घर दणाणून सोडल असत जस मागच्या सिझनमध्ये निकी आणि अरबाज ने केल होत.पण तस काहीही झाल नाही.
ओमकार सध्या सोमिवर हीरो ठरत आहे आणि आयुष व्हिलन.
पण आयुष चांगला प्लेअर आहे.तो राहिला पाहिजे.
या वीकमध्ये बहुतेक सचिनच जाईल बाहेर.
सोनालीने घरातल्या अनहायजिनिक वातावरणामुळे इन्फेक्शन झाल आणि शोमधून बाहेर आली अस सांगितल आहे.
म्हणजे तिचा जो आळशीपणा होता ते तिच आजारपण होत का?पण आजारी अशी कधी वाटली नाही.
तो ओमकार थोडा ललित प्रभाकर
तो ओमकार थोडा ललित प्रभाकर सारखा दिसतो , आज त्याने विन्टर कॅप घातली होती तेंव्हा वाटला.
आज सचिन, ओम्कार एकदमच इमोशनल टडोपा मोड मधे गेले एकदम, ते दोघे काही अॅक्टर्स नाहीत म्हणजे परफॉर्मन्स नसावा, पण इतके इमोशनल असतील कसे टिकणार इथे ?
हे लोक येडेच आहेत तसेही , मित्रांनाच नॉमिनेट करतात , नाहीतर प्रभु आहेच सॉफ्ट टार्गेट !
जोडी टास्क मधे राकेश - विशाल जोडी करायला हवी होती, जरा रायव्हलरी दिसली असती.
ती बी ग्रेड अनुश्री कशाला राकेश बरोबर ?
वीकेंडला कोण जाणार याची
वीकेंडला कोण जाणार याची चर्चा सोमि वर नेमकी कुठे होते ?
वीकेंडला कोण जाणार याची चर्चा
वीकेंडला कोण जाणार याची चर्चा सोमि वर नेमकी कुठे होते ?>> Fb वर groups आहेत काही special बिग बॉस मराठीची चर्चा करणारे त्यावर समजतं..
कोणती पेजेस आहेत ? मला पण
कोणती पेजेस आहेत ? मला पण आवडेल फॉलो करायला .
कोणती पेजेस आहेत ? >>BigBoss
कोणती पेजेस आहेत ? >>BigBoss Marathi 6 - star katta
मी हे एकच follow करते अजून पण आहेत बहुतेक. तुम्ही fb वर big boss marathi असं सर्च केलं तर अजून बरेच groups मिळतील.
दक्षिणा, काही यू ट्यूबर्सही
दक्षिणा, काही यू ट्यूबर्सही आहेत जे रोज च्य रोज एपिसोड रिव्ह्यू करतात आणि त्यांचे कोणी खबरी असतात, ते कधी कधी आधीच बातम्या लीक करतात म्हणे , त्यातल्या सगळ्या नाही पण काही खर्या ठरतातही. ते वोटिंग ट्रेन्ड्स पण सांगतात दर आठवड्याचे. पब्लिक तिथेही उत्साहात कमेन्ट्स करत असतात. मी रेग्युलरली फॉलो करत नाही पण फीड मधे हे येतात बर्याचदा -
उदा:
https://www.youtube.com/watch?v=mZg42FljILo
https://www.youtube.com/watch?v=LBFxwYSAuGs
आजचा एपिसोड air केला नसता तरी
आजचा एपिसोड air केला नसता तरी चालला असता
आजचा कॅप्टन्सी टास्क बघून
आजचा कॅप्टन्सी टास्क बघून हहपुवा !

तन्वीने राकेशच्या नकळत त्याच्या पजाम्यामधे मागून लाटणं टाकलं (लपवायला) , शब्द्शः तंबूमे बंबू
दीपाली रुचिकाच्या पाठीवर पापड लाटत होती , इतर बाय्॑का दिसेल त्या सरफेस वर पापड लाटत होत्या, करण पीठाची उधळण करत रंगपंचमी खेळत होता, प्रभु कणकेचा गोळा चड्डीत लपवत होता , विशाल तन्वी अॅडल्ट झोम्बाझोबी.. रुचीता तर वाइल्ड आहे टास्क्स मधे .. तिचे हिन्दी बिबॉ मधे स्थान आज पक्कं झालं , she just passed the auditions !
टास्क्स शेवटी सगळे गिरणीवाले दिसत होते
बाकी मला नाही वाटत कि रुचीताने करणला मारलं वगैरे, एकमेकांवर पीठ फेकणे चालु होते , जे करणनेच सुरु केले !
विशाल कितीही क्रिन्ज वाटत असला तरी काय भारी प्लेयर आहे, इतर लोक बालवाडीत, आणि त्यात हा मास्टर्स केलेला स्टुडन्ट आहे , त्याच्या ताकदीपुढे कोणाचा निभाव लागत नाहीच पण त्याचं डिकोडींग ,पोकिंग स्किल्स, ओमकारला त्याच्या मित्राविरुद्ध पेटवून देणे इ. मल्टिटास्किंग नॉन स्टॉप चालु होते !
प्रभु बाकी भारी पुरून ऊरला त्याला, काय मस्तं चुरुचुरु उत्तरं देतो , मला तोच एन्टरट्र्निंग वाटतोय सगळ्यात !
काय दिव्य टास्क होता कालचा..
काय दिव्य टास्क होता कालचा.. नुस्ता राडा करुन टाकला सगळ्यांनी मिळुन...काहीही चाललं होतं...

रुचिता अगदीच हाताबाहेर गेलेली केस आहे.. अनुश्री सुद्धा... पण या दोघी बाहेर गेल्या तर सगळे सगळा ड्रामा संपेल हेही खरं..
त्यांना शेवटपर्यंत नेउन उडवणार... विनर करणार नाहीत हे नक्कीच..
हात लावण्यावरुन इतकं रामायण होउनही काल राकेश अनुश्री एकदम छान बोलत आणि फिरत होते..
काल काहीच न झाल्यामुळे लिहिण्यासारखं सुद्धा काही नाही
हात लावण्यावरुन इतकं रामायण
हात लावण्यावरुन इतकं रामायण होउनही काल राकेश अनुश्री एकदम छान बोलत आणि फिरत होते.. >>>> अगदी अगदी. आज तर अनुश्री चक्क राकेशची बाजू घेऊन रुचिताशी भाण्डणार आहे अस प्रिकेपमध्ये दिसल होत. बघू काय होतय ते.
मलाही काल जाम हसू आले पापड
मलाही काल जाम हसू आले पापड टास्क बघताना
प्रभू फार फनी आहे.
विशाल कितीही क्रिन्ज वाटत असला तरी काय भारी प्लेयर आहे >> +११ . तो अक्षरशः पुस्तक वाचावे तसा प्रत्येकाचा गेम किंवा स्ट्रॅटेजी रीड करतो आणि एक्सपोज करतो. त्याच्या स्वतःच्याही भरपूर स्ट्रॅटेजीज सतत चालू असतात.
रुचिताने करण ला मारले असे मला वाटत नाही. आज आता त्याहून वरचा वाद रुचिता आणि राकेश मधे झालेला दिसतो आहे. ज्यात आख्ख्या घराने उडी घेतलेली आहे. ( असे सोमि वर बघून वाटतेय) काय तर रुचिता ने राकेश ला इनअप्रोप्रिएटली टच केले! तेही मला वाटते टास्क च्या झोंबाझोंबीतच झालेले असू शकते. नाहीतर कशाला जातीये ती त्याला टच करायला. २ च आठवड्यापुर्वी याच्याच एक्झॅक्टली उलट सिचुएशन होती, रुचिता- अनुश्रीने राकेश वर आरोप केला होता , हे किती आयरॉनिक आहे! यामुळे राकेशलाच बोलणी पडू शकतात भाऊच्या धक्क्यावर.
काल अनुश्र्री ने काम न करण्यावरून पुन्हा ड्रामा केला. अगदी आउटराइट नाही म्हणत होती. राकेश यावर हसत होता . पूर्वी मला असे वाटायचे अशी कशी हिंमत करतात हे लोक? वीकेन्ड ला काय होईल, शिक्षा म्हणून नॉमिनेट होऊ याची भिती कशी नाही? पण एकूण आता मला असे फीलिंग आले की तिला - किंवा इतर ट्रबलमेकर सदस्यांना बिबॉ स्वतःच असले टास्क देत असावेत. आपल्याला फक्त एडिटेड वर्जन दिसतं १ तासाचं . बाकी उरलेल्या दिवसभरात ते लोक काय करतात आपल्याला काय माहित. बर्याचदा इतर लोक या लोकांशी नीट हसत बोलत असतानाही दिसतात.
राकेशने आज उगीच कांगावा केला,
राकेशने आज उगीच कांगावा केला, काहीच इनॅप्रोप्रिएट टच वगैरे दिसला नाही, वाट लाग्णार आहे राकेशची विकेन्डला !
दीपालीने शब्दं फिरवले कि राकेश आता फिरवतोय माहित नाही पण राकेश पूर्ण चूक होता , वर आत जाऊन फेकाफेकी!
रुचीता विशाल क्लिअर करायला आले तर म्हणे मला जे बोलायचय ते विकेन्डला बोलेन
ती अॅग्रेसिव्ह आहे /निगेटिव आहे म्हणून उगीच वाट्टेल ते बिल फाडत होते रुचीताच्या नावाने हे लोक !
असो, रुचीताने या निमित्ताने अख्खा एपिसोड तिच्या नावावर केला राकेशमुळे!
बाकी विशाल द डिकोडर १००% बरोब्बर बोलला रुचीताला “ तू रडतेस कशाला, आत्ता तू ज्या सिच्युएशन मधे आहेस त्या पोझिशनला याऊन लाइमलाइट घ्यायला तन्वी हात कापून देइल”
राबा ने काल जे काही केले ते
राबा ने काल जे काही केले ते अजिबात योग्य नव्हते.. २ आठवड्यांपुर्वीच अनुश्री ने त्याच्यासोबत जे केलं सेम तेच त्याने आता रुचितासोबत केलं.. गेम खेळताना धक्काबुक्की होणारच आहे.. रुचिता वर जर एवढा भडकला तर तन्वी ने नको त्या जागी लाटणं लपवलं तेव्हा तिच्यावर का नाही ओरडला ?
राबा आता मला हुकलेला वाटायला लागलाय.. त्याला कसं खेळावं कळत नाहिये.. शांत राहिला की दिसत नाही आणि ओरडायला भांडायला योग्य मुद्दे सापडत नाहीत... त्याच्यापेक्षा प्राजक्ता हुषार आहे.. स्वतः चा आब राखुन खेळते आणि गरज पडेल तिथे दिसते सुद्धा...
विशाल फार हुषार आहे.. कोण कसं वागतंय आणि का हे त्याला बरोब्बर कळतं पण तरी नाहीच आवडत तो..
तन्वी आणि रुचिता ची कालची भांडणं आणि ती बघायला बेडरुम मधे जमलेले लोक बघुन हसायला आलं.. लहानपणी आमच्या गल्लीत नगरपालिकेच्या नळावर जरा जरी आवाज चडलेले ऐकु आले की लगेच आजुबाजुची लोकं आपपल्या घराच्या खिडकीत, गॅलरीत येउन भांडण बघत बसायची..त्याची आठवण आली
कोण कॅप्टन झाला कळलं का ? सोमी वर दिसत नाहिये.
आयुष ला काय झालंय ? यंदा स्पर्धक जास्त आजारी का पडतायत ? गेल्या आठवड्यात पण दीपाली, त्या आधी राकेश आजारी होता...
राकेश तापट आणि तन्वी यांना
राकेश तापट आणि तन्वी यांना जर घरात राहायच नसेल तर वीकेंडला भाऊंनी त्यांची इच्छा पूर्ण करून धक्का द्यावा.निदान तस नाटक तरी कराव.
सारख काय,ही राहणार असेल तर मी राहीन.हा खेळून आला आहे ना बिबॉस, माहिती असेलच ना की कुठल्याही कारणाने चर्चेत राहणार्याला किंवा राहणारिला इतक्या लवकर काढत नाहीत.तरी काय सारख बोअर करतात.
काल खरतर रुचिता राकेशकडून टोकरी घ्यायला गेल्यावरच राकेश घाबरला होता.कोणालातरी यायला सांगतपण होता.रुचिता व्यवस्थित खेळत होती.सरक्ळसरळ टीम ए जिंकली होती.चांगला टास्क चालू होता,छान झाला असता.
राकेशने पूर्णपणे वाट लावली.
रुचिताने खरतर सोनालीसारख रिअँक्ट व्हायला हव होय,पण शांत बसेल ती रुचिता कसली.
आता ती तन्वी आणि रुचिता असह्य होत चालल्या आहेत.
दिपाली सरडा आहे रंग बदलणारा.
पण या वीकमध्ये अजूनतरी अनुश्री चक्क सुसह्य वाटली.
टास्क पण चांगला करत होती.
क्रेडिट राकेशला मिळेल हे सांगायला नकोच.
कँप्टन टास्क चांगला चालू आहे.ठरवून खेळत असले तरी.पण चार आठवडे होतील,टोळी सोडली तर नक्की कोण कोणामध्ये तेच कळत नाही आहे अजून.
आज तर अनुश्री चक्क राकेशची
आज तर अनुश्री चक्क राकेशची बाजू घेऊन रुचिताशी भाण्डणार आहे अस प्रिकेपमध्ये दिसल होत. बघू काय होतय ते. >>>>>>>>>> प्रोमो मिसलिडिन्ग होता.
आज दिव्याच्या एलिमिनेशन चा
आज दिव्याच्या एलिमिनेशन चा एकदम अनपेक्षित ट्विस्ट!! ती बोललीच तसं पण. मुळात कोणी नॉमिनेट केले तर असं इतकं एक्सट्रीम बोलायचे कशाला. तो त्यांचा व्ह्यू . बिबॉ , राकेश तरी तिला वार्न करत होते. पण तसं पाहिलं तर तिचे बाहेर चे काम आणि इमेज पाहता तिला माफी न मागता तशीच जहाल इमेज टिकवणे हे या गेम मधे टिकण्यापेक्षा केव्हाही जास्त महत्त्वाचं असणार. राजकारणात नक्कीच पुढे येणार सरकार आता

बाकी बिबॉ सगळ्या बेशिस्त लोकांपुढे एकदम हतबल झालेले दिसले आज
ते पावर की चे टास्क बहुधा ओंकार ला वाचवायलाच आणले की काय असे वाटते आहे. सचिन कुमावत जातील बहुतेक घरी.
मी बिग बॉस असतो तर बोललो असतो
मी बिग बॉस असतो तर बोललो असतो ‘ दिव्या, तलवार नसली म्हणून काय झालं, सुरी तर आहे ना. कसली वाट पाहताय भोसका एकेकाला’
किती मसाला होता आजच्या एपिसोड
किती मसाला होता आजच्या एपिसोड मधे , कदाचित या सिझनचा सर्वात काँट्रोव्हर्शिअल एपिसोड !
दिव्या जे बोलली आणि बिबॉने तिला ज्या महापुरुषांची आठवण करून दिली, सगळाच प्रकार सेन्सिटिव्ह आणि अवघड झाला असणार बिबॉ टिमला !
रितेशला खरे तर खूप मटेरिअल आहे विकेन्डला, पण फार काही अपेक्षा नाहीत !
राखी सावंत येतेय असं बघितलं
राखी सावंत येतेय असं बघितलं youtube वर. यावेळी विकेंड वार कसा होता, मागचा मी बघितला नाही. बरा नसेल तर नाही बघणार.
राखी सावंत येतेय असं बघितलं
राखी सावंत येतेय असं बघितलं youtube वर. यावेळी विकेंड वार कसा होता, मागचा मी बघितला नाही. बरा नसेल तर नाही बघणार.
कोणी तगडी वाइल्डकार्ड एन्ट्री नाही मिळाली का ?
<<<
एकदम फालतु होत्या भाऊच्या टिचक्या.. त्या पेक्षा शुक्रवारचा एपिसोड बघ, या सिझनचा सर्वात काँट्रोव्हर्शिअल, टि आर पी खेचणारा एपिसोड.
इतके मटेरिअल असून अगदीच मिळमिळीत विकेन्ड.
बाकी राखीला कशाला आणि किती वेळा आणणार
आय होप गेस्ट असेल राखी, जास्तं दिवस नको ठेवायला तिला , सगळा सिरीयसनेस जाईल !
राखी इज मस्ट इन बीग बॉस..
राखी इज मस्ट इन बीग बॉस...शास्त्र असत ते
https://www.instagram.com/p/DUajVkkFca0/
थँक्स डीजे.
थँक्स डीजे.
शुक्रवार चा भाग एकदम गरमागरम.
शुक्रवार चा भाग एकदम गरमागरम... दिव्या बरंच काही बोललेली दिसतेय.. बरच काही घडलंय.. आपल्याला दाखवलं नाही..
भाउच्या धक्क्याचा काही भाग पण शुक्रवारीच दाखवला.. म्हणजे दिव्या ला बाहेर काढताना सगळी मंडळी धक्क्यासाठी तयार होउन बसली होती. २ दिवस चालु होतं वाटतं रामायण..
शनिवार सगळा रुचिता ने खाल्ला.. तिने भरपुर मसाला दिला यावेळी.. दिपाली तिच्या मैदानी खेळाबद्दल खरच टोमणा मारल्यासारखं बोलली होती आणि नंतर पलटली की तिने सुरुवात केली म्हणुन... दिपाली मला अजिबात आवडत नाहिये... सगळ्यात फेक तीच वाटते.. उगीच सगळ्यांशी चांगली वागाय्चं नाटक करते पण कुचकट वाटते आतुन...
टोळी चं फार कौतुक केलं.. विशाल खरच स्मार्ट आहे...
तन्वी ने काल पण पंच टास्क मधे राडा केला.. रोशन ला काढा आता. त्याला नाही कळत गेम... नुसती सिंपथी देउ नका...
करण आणि प्राजक्ता सुम्डीत कोंबडी आहेत.. आवडायचे कमी झालेत आता.. थेट भिडत नाहीत.. मागुन कुचकुचत बसतात...
सागर पण स्वत: ची बाहेरची इमेज सांभाळुन काहीतरी करायला जातो.. त्याला टोळीत जायचं आहे पण मान्य करत नाहिये...
राखी ला का का का आणतायत ? ती आली की बघवत नाही राडा...
मर्दानी खेळ ही शिवी का वाटतेय
मर्दानी खेळ ही शिवी का वाटतेय लोकांना
विशालने बरोबर प्रेडि़क्ट केले
विशालने बरोबर प्रेडि़क्ट केले या बावळटांचे पुढचे प्लॅनिंग .. सगळे बसले बळेच गृप्स बनवायला, एकातही दम नाही !

करण आणि राकेश तर काय स्टुपिड आहेत, काहीतरी सिक्रेट आहे म्हणे, कॅमेरापुढे नाही सांगणार, वेळ आली कि बघु म्हणे
करणचा बिबॉ सगळा मनातल्या मनात चाल्लाय
दिव्या गेली मला फार आनन्द
दिव्या गेली मला फार आनन्द झाला. स्वतःला सरकार म्हणून घेणं, मी बाहेर सुद्धा अशीच आहे हे प्रौढीने सांगणं, नम्रता नावाला सुद्धा नाही . सतत फक्त टिपेचा आवाज आणि अरेरावी . मी काय बोलते ते तुम्हाला कळत नाही वगैरे वगैरे .
देहबोली आणि बाकी वागणं बोलणं अजिबातच मॅच्युअर किंवा रॅशनल नाही. हि असली लीडरशिप आपला समाज डोक्यावर घेतोय याची खंत वाटते.
हा सिझन फार बोअर . वीकेंड चा वार अतिशय मिळमिळीत . रितेश काहीही बोलला नाही या सगळ्या घटनेबद्दल .
आता राकेश, तन्वी, दीपाली आणि
आता राकेश, तन्वी, दीपाली आणि प्रभू ग्रुप करणार म्हणे. कसला विचित्र ग्रुप. टिकणार नाही.
तन्वीला कळले असावे की अनुश्री आणि रुचितामुळे तिला कमी फुटेज मिळते आहे. शिवाय टोळीचे कौतुक पण झाले . त्यामुळे तिने बळेच ते आयुष ला पंच करण्याचे नाटक केले. तो तिच्या नाटकाला बळी पडला असता तर घेतलेही असते फुटेज पण आयुष ने बर्यापैकी पोपट केला तिचा "तुझ्या अपेक्षा जास्त आहेत" असे सांगून.
प्राजक्ता आणि करण चे "आम्ही सगळे अनालाइज करतो" आणि "वेळ आली की खेळू" हे हास्यास्पद झाले आहे. रितेश ने विषय काढला पण तिथेही धड स्ट्राँग मेसेज दिला नाही. यांना नॉमिनेट करून बॉटम मधे ठेवा १-२ दा आणि मग बाहेरचा रस्ता दाखवा.
सचित कुमावत ला पण का ठेवले, पाठवायचे होते या आठवड्यात घरी. म्हणे या आठवड्यात ते दिसले. त्याच्यापेक्षा ओंकार तरी दिसला होता.
राखीला कशाला आणालेय. टाइमपास करणार हा अख्खा आठवडा. सगळे माहित असते घरच्यांना.
अतिशय रटाळ सुरू आहे big boss.
अतिशय रटाळ सुरू आहे big boss..म्हणूनच राखीला आणलं असेल. दिव्याने माफी मागितली असती तर कदाचित ठेवले असते पण ती वेगळ्याच मूड मध्ये होती. टोळीचं इतकं काय कौतुक चाललंय..चोरीची क्लिप पाहताना कोणी नोटिस केलं का,प्रभू एक पॅकेट घेऊन आला आणि त्याने ते राकेशजवळ दिले आणि राकेशने ते न बघता ठेवून दिले. त्याच वेळी तन्वी काहीतरी बोलली.पण तेव्हा ती किचन मध्ये काम करत होती तरी सगळ्यांनी तिलाच का दोषी ठरवले?
काल राखी आली तरी कंटाळाच आला.
काल राखी आली तरी कंटाळाच आला.. कसलं बोअर आहे हे बिबॉ... विशाल सगळ्यांचे गेम उलगडुन सांगतो त्यामुळे अजुनच कंटाळा येतोय
राखी काय भयंकर अवतारात होती.. असं कोणी समोर आलं तर मी तर पळुनच जाईन...
काल राकेश प्राजक्ता वर लाईन मारत होता का ?
करण आणि प्राजक्ता चा पण काय सीन चालु आहे ?
काल चक्क अनुश्री राखी ला म्हणाली की माझ्या सोबत स्वैपाक करायची ड्युटी घे .. हा हा हा.. अनुश्री आणि किचन ड्युटी ?
अनुश्री ने केलेला प्लॅन तन्वी ने लगेच ओळखला.. सगळेच लोक सगळे बिबॉ सिझन कोळुन प्यायले आहेत सो राखी आल्याचा कोणाला फरक पडला नाही..
Pages