बिग बॉस मराठी सिझन ६

Submitted by दीपांजली on 14 January, 2026 - 14:02

बिग बॉस मराठी सिझन ६ सुरु झाला आहे.
त्यावर चर्चा करण्यासाठी हा धागा !
स्पर्धक :
दीपाली सय्यद : ( अभिनेत्री/पॉलिटिक्स्ल बॅक्ग्राउंड)
सागर कारंडे : ( कॉमेडियन/ अ‍ॅक्टर)
सचिन कुमावत: (खान्देशी गायक)
सोनाली राऊत: (मॉडेल, एक्स बिबॉ कॉन्टेस्टन्ट )
आयुष संजीव: (अ‍ॅक्टर )
तन्वी कोलते: (अभिनेत्री)
करण सोनावणे/फोकस्ड इन्डियन : इन्फ्लुएन्सर, कॉमेडियन, क्रिकेट प्लेयर्स/ क्रिकेट क्स्न्टेन्ट साठी फेमस.
प्रभू शेळके:रील स्टार
प्राजक्ता शुक्रे,: इन्डियन आयडॉल सिझन १
अनुश्री माने : मॉडेल्/अ‍ॅक्ट्रेस
रुचिता जामदार,: एम टि.व्ही रोडीज एक्स कॉन्टेस्टन्ट
राकेश बापट,: अ‍ॅक्टर/एक्स बिबॉ कॉन्टेस्टन्ट
रोशन भजनकर: अमरावतीचा बॉडी बिल्डर
दिव्या शिंदे: युवा नेता
विशाल कोटियन : अ‍ॅक्टर/एक्स बिबॉ कॉन्टेस्टन्ट
राधा मुंबईकरः लावणी +आयटेम डान्सर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला पण ती प्राजक्ता बोअर वाटते, नुस्ती गुडी गुडी. करण, सोनाली, राकेश गॅरन्टी घेऊन आलेले असावेत, ओवर कॉन्फिडन्ट वाटत आहेत, त्यांनी अजून अ‍ॅक्टिव व्हायला पाहिजे. मला राकेश आवडतो आहे.जरी फार काही करत नसला तरी. नवे, यंग लोक गॅरन्टी घेऊन आलेले नसावेत त्यामुळे त्यांना स्वतःला प्रूव करण्याची भूक जास्त दिसते. अनुश्री मधेही मला पोटेन्शियल वाटते, हुषार वाटतेय. दिव्या सो फार गर्विष्ठ वाटते आहे आणि गेम कळलाय असे काही फार वाटले नाही पण कालच्या भागात सगळेच ती फिनाले मधे जाणर असे म्हटले. रुचिता आणि राधा फार टिकतील असे वाटत नाही. खर तर गेम च्या पुरते पाहिले तर रोशन पण अर्ली एलिमिनेशन मधे असायला हवा पण समहाऊ त्याला सोमि वर फार सपोर्ट आहे म्हणे!

चावी अनुश्रीने चोरली. >> हे कधी दाखवल ? काल दिसलं नाही
काल धक्यावर अनुश्रीच कन्फेशन पब्लिकला दाखवल.
आजच्या भागात ती तन्वीला सांगताना दाखवल.
याचा बिबॉस पुरेपुर उपयोग करून घेणार.

भाऊचा धक्का फार सेफ होता , बॅशिंग करून मग स्तुति पण केली तन्वीची !
Btw , ती तन्वी कित्ती उर्मिला कानेटकर स॑रखी दिसते !
मलाही ती प्राजक्ता अज्जिबात आवडत नाही , उगीच स्तुति झाली तिचीही Uhoh
सागर, करण, सोनाली यांच्यावरही स्तुतिसुमने उधळली ऑलमोस्ट !
इन जनरलच बिबॉ होस्टने इतकी स्तुति करायची नसते कोणाचीच , तेही प्॑हिल्याच आठवड्यात.. हिन्दी मधे बर्‍यापैकी अंधारात ठेवतात त्यांना गेम बद्दल , होस्टचा दरारा वाटला पाहिजे थोडा !
दीपालीच्या लावणीचं कौतुक झालं , इतका काही खास वाटला नाही तिचा डान्स.
राधा - रुचिरा मधे , रुचिताचा डान्स सर्वात आवडला मस्तं होती तिची एक्स्प्रेशन्स, तिच्या स्टेप्स !
रुचिताला एलिमिनेट करु नये, पोटेन्शिअल आहे तिच्यात, आत्ता लाउड वाटत असली तरी.
राधाला काढतील असं वाटतय, काही समजत नाही तिला… जरा ‘बोलती हो ‘ सांगितल्यावरही मिळमिळीत उत्तरं देत होती, मी गरज पडली तरच बोलते वगैरे !
बाकी करण्,सागर खरच ओव्हरकॉन्फिडन्ट वाटत आहेत आता, कालही त्यांच्या अ‍ॅक्टला ऑलमोस्ट्२०मिनिटे फुटेज दिले !
सागर तर नक्की फिनाले ची एम्जी घेऊन आलाय !

अनुश्रीमधे पोटेन्शियल म्हणता म्हणता माती खाल्ली आज. तिला वाटले तन्वी फुटेज घेऊन गेली मागच्या आठवड्यात. मग मुद्दाम एक स्टन्ट करायला हवा. आणि करायचा तर एखादे सेफ टार्गेट पाहिजे. सागर, करण ला बोलण्यात हरवू शकत नाही हे तिला माहित आहे, राकेश सौम्य व्यक्तिमत्त्व असल्यामुळे त्याची निवड केली असावी. " मला का हात लावला" हा त्रेता युगातला मुद्दा ! अरारा! अन चाय से ज्यादा किटली गरम तसे ती रुचिता तो मुद्दा घेऊन किंचाळत सुटली! आधीही तिने चावी वरून तमाशा केला तेव्हा करण ने कचरा केला अक्षरशः.
बाकी तन्वीने जरा गिअर बदलला होता आज. तोही अगदी २१ अपेक्षित वाचून आल्यासारखा वाटला. आयुष ला म्हणणे की आपण बेस्ट फ्रेन्ड बेस्त फ्रेन्ड (?) खेळू. राकेश सोबत हातात हात घालून फिरणे, प्राजक्ता, करण सोबत गप्पा वगैरे. सगळे आज एकमेकाची स्ट्रॅटेजी ओपनली डिस्कस करताना दिसले. अनुश्री वगैरे तर परीक्षेत उत्तरे देणार्‍या हुष्शार मुलीसारखी " ही असे करणार, मग तो बाजूला होणार, मग अमक्याला सिंपथी मिळणार, असे सुरु होते. अरे हो हो थांबा, होऊ द्या तरी थोडे दिवस ! Lol

अनुश्री फक्त दिसण्यासाठी इतक्‍या खालच्या पातळीवर जाईल असं नव्हत वाटलं..ती रुचिता मूर्खच आहे पण अनुश्री तशी असेल असं वाटलं नव्हतं...जरा जास्तच अभ्यास करून आलेली दिसतेय. चावी काय चोरते, झोपण्याच्या जागेवरून काय भांडते, बिनबुडाचे आरोप काय करते...अगदीच केविलवाणे प्रयत्न...करण नाही आवडत...पण सिरियस भांडण चालू असतानाही जी कॉमेडी करतो ते आवडतं...काल अनुश्री राकेश वाद चालू असताना हा 'माझा चाबीचा मुद्दा राहिला'...हे हातवारे करून सांगत होता Lol रुचिता प्रत्येक गोष्टीवर react होत राहिली तर एका point ला स्फोट होऊन फिजिकल violance मुळे बाहेर जाईल..करणला मारण्याचे chances जास्त आहेत Lol ....तन्वी, anushree,ruchita आणि राधा एकमेकींना मैत्रिणी म्हणतात आणि एकही जण सोबत नसेल तर तिच्या कुचाळक्या करतात...ह्या कसल्या मैत्रिणी...

अनुश्री आणि रुचीताने राकेशला हिरो बनवले Proud
या बावळट जेन्झी मुलींना बिगबॉस थिअरी पाठ आहे , त्याचे परिणाम काय होतात ते नाही समजत !
करण /सोनाली काहीही आवाज न चढवता ऋचिताला मस्तं डिवचतात Happy
तन्वीला निगेटिव वागून फुटेज मिळालं हे पण यांना नाही हे पचत नाहीये ऋचीता - अनुश्रीला.

काल गुडी बाईंकडून करणचा गेम बिबॉसने का केला ते कळल नाही.चावी काय त्याने हिसकावून घेतली नव्हती,रुचिताला न देऊन त्याने त्याचा गेम खेळला होता मग राहू द्यायची होती ना त्याच्याकडे बिबॉसचा गुडी बाई आणि त्याच्यामध्ये जर भांड लावून द्यायचा प्लँन असेल तर करणने पूर्णपणे फ्लॉप केला.
काल करणची चावी हरवल्यावर रुचिताची रिअँक्शन मला चुकीची नाही वाटली,ते तर स्वाभाविकच होती कारण त्या एका डिसिजनमुळे चावी,इम्युनिटी आणि उमेदवारी या तीनही गोष्टी गेल्या.
पण नंतर रुचिताने जी काय माती खाल्ली त्यात भर म्हणून अनुश्री आली,त्यामुळे दोघी आता सोमिवर टार्गेट झाल्या आहेत पण ते रुचिताच माहित नाही पण अनुश्रीला माहीतही असाव ,सो,त्यामधून बाहेर कस पडायच हाही प्लँन कदाचित फिक्स असेल.ते कळेलच.पण यावरून धक्क्यावर ओरडा मिळणार आहे हे नक्की.काहीच गरज नव्हती या मुद्दयावरून भांडायची.काहीही झाल नव्हत.
बापटच फ्रस्ट्रेशन तर मला एखाद्या सिरियलचा सीन वाटला,अगदीच नाटकी.
बाकी,पन्नास टक्केच रेशन मिळाल्यावर ते जपून कस वापरायच याच प्लँनिंग गुडी कँप्टन बाईंना करायच सुचल नाही का?किंवा बाकी कुणालाच सुचल नाही.शेवटी बिबॉसला ते प्रभूला आणि घराला सांगाव लागल.
अशावेळी मेघा धाडेची आठवण येते.तिच संपूर्ण घराकडे लक्ष असायच.
अस इथे कोणी दिसत नाही.
आरडाओरडा, रडण,फ्लर्टिंग अँगल म्हणजेच बिबॉस अशा स्टाईलमध्ये सध्या सगळ चालू आहे.
लास्ट सिझन खुर्ची सम्राट टास्क बिबॉसने आणला नव्हता.या वेळी नक्की आणतील अस वाटत आहे.तेव्हा बघू.काय होय ते.
स्पेशली गुडी बाई,राकेश,सागर,करण,सोनाली ,दिपाली हा टास्क कसा खेळतात ते बघायच आहे.
राधा मला जा द्या ना घरी मोडमध्ये आहेत, म्हणून तिलाच काढतील बहुतेक.

कालचा एपिसोड म्हणजे नुस्ते राडे...
अनुश्री ने भांडण काढण्यासाठीच बेड न सोडण्याचं नाटक केलं.. कधी ना कधी ती ते भांडण काढणार होतीच... रुचिता ने मधेच उडी घेउन अनुश्री चं रीझर्व ठेवलेलं भांडण कालच बाहेर काढलं.. तन्वी ने पलटी मारली आहे वीकेंड नंतर.. ज्याचा खेळ चांगला दिसतोय त्याच्यासोबत हळु हळु जाणार..
काल सागर गायब होता बराच वेळ.. अनुश्री, रुचिता, तन्वी, राधा या चौकडी ची चिकचिक बघुन कंटाळा आला.....
दिव्या ने पण काल नाश्ता आणि फळं कापुन देण्यावरुन भांडण सुरु करायचा प्रयत्न केला पण ओमकार आणि सागर ने वेळीच आवरलं..
नहितर दिव्या आणि अनुश्री राडा पण दिसला असता काल.
रविवार चा एपिसोड बहुतेक मी अर्धाच पाहिला आहे.. त्यामुळे अनुश्री ने चावी चोरलेला व्हिडिओ मी मिस केला.
काल सगळ्यांना सांगत सुटली होती... तिच्यावर मेजर डाव उलटवणार आहेत आता बिबॉ...

काल चं राबा चं रडणं बघुन देजावु असं फिलिंग आलं..
याआधी च्या कोणात्यातरी सिझन मधे पण मुलींना हात लावणे आणि त्यावरुन कॅरॅक्टर वर शंका असा एपिसोड केलाय कोणीतरी. कोण ते आठवत नाहिये...येताजाता एकमेकांना मिठ्या मारतात हे लोक.. आणि मग हे असले मुद्दे काढतात.. येडेपणाचा कळस..
आणि दिव्या राबा ची बहीण कधी झाली म्हणे ? तिचं त्याला समजावणं बघुन राबा पण वैतागला होता असं वाटलं...
शेणामेणाच्या घरात विशाल ला बाहेर करायची संधी असताना दिव्या ने वेडेपणा केला....
बाकी ती रुचिता फारच डोक्यात जाते आहे आता.. किती वचवच करते गं बाई...
सिनिअर ज्युनियर चर्चा बघुन पहिला सिझन आठवला.. अस्ताद, रेशम, राजेश असे सगळे सिनिअर विरुद्ध मेघा, सई... पण मेघा सई डोकेबाज होत्या.. इथे असलेल्या चारही मुली इतक्या हुषार अजुनतरी वाटत नाहीत...

आज अनुश्री प्राजक्ता भांडण आहे...प्राजक्ता बर्‍याच जणांना आवडत नाहिये पण मला ती आवडतेय..खरंतर खूपच cute वाटते...तिचा आवाजही खूप खूप खूप आवडलाय ..अनुश्री जाम डोक्यात जातेय..पहिल्या आठवड्यात वेगळा बुरखा पांघरला होता...फाटतोय हळूहळू...अनुश्रीला राकेशशी बोलायचं होतं तर विशालने लगेच अडवलं...त्यामुळे 'तो चांगला आणि तू वाईट दिसशील 'म्हणे...अजून काय वाईट दिसायचं राहिलय...टोळी टोळी करतात पण अजिबात भावनिक बंध नाहीत...एक से बढकर एक गुंड आहेत नुसते..उलट राकेश, दिव्या आणि दिपाली मधला bond आवडला...किती छान आणि संयतपणे समजावलं राकेशने दिव्याला...दिव्यानेही मनापासून माफी मागितली दिपालीची...तन्वीने group सोडला ते चांगलं केलं...बराच बदल केलाय तिने स्वत:मध्ये...

काल चं राबा चं रडणं बघुन देजावु असं फिलिंग आलं..
याआधी च्या कोणात्यातरी सिझन मधे पण मुलींना हात लावणे आणि त्यावरुन कॅरॅक्टर वर शंका असा एपिसोड केलाय कोणीतरी. कोण ते आठवत नाहिये...>>>तिसऱ्या सीझनमध्ये विशाल निकम सोनाली बद्दल बोलला होता काही बाही

आज रोशनने उगीच रडारडी केली, ओमकार त्याच्यावर पूर्णपणे भारी पडला !
पोते उचलायचा/वजन उचलायचा अनुभव आणि हिसकाऊन घ्यायची चपळाई यात फरक आहे, उगीच पर्सनली घेऊन सिंपथी कार्ड खेळत होता.
संग्राम आणि अरबाझ मधे जो फरक होता तो तोशन-ओम्कार मधे आहे, ओमकारचे लिन फिजिक आहे त्यामुळे चपळ आहे.
अनुश्री , रुचीता बद्दल तर काय बोलणार ? फारच छपरी आहेत.
आजकाल फक्तं विकेन्डला फुटेज मिळणे इतकाच ‘गुड प्लेअर‘ असण्याचा क्रायटेरिआ आहे, वाइट इमेज बनल्याने त्यांना काहीही फरक पडत नाही.
हिन्दी बिबॉ १९ मधे सर्वात बोलणी खाणार्‍या बायकांनाच सर्वात जास्तं कॅमेरा फुटेज, प्रोफेशनल कामं, कोलॅब्ज्स आणि अटेन्शन मिळालं, चर्चाही त्यांचीच झाली.
त्यामुळे या दोघींना फरहाना भट्ट् बनायचं आहे, क्लिन इमेज नकोच आहे.
प्रभु त्या मानाने चांगला वाटतोय, सोशल मिडिया क्रिन्ज कन्टेन्ट असला तरी इथे फिसेन्ट वागतोय आणि एन्टरटेन पण करतोय.
प्राजक्ताही आज फॉर अ चेन्ज स्ट्राँग वाटली.

अनुश्री ,रूचिता काल स्मोकिंग रुममध्ये गेल्या होत्या.किती लहान वय यांची,आणि कशाला ही असली व्यसन!?
खरतर बिबॉस मध्ये सगळेच एका माळेचे मणी असतात पण काल मात्र खरच गुडी बाईंच बोलण पटल.
पण संचालन आणि कँप्टन्सी नाही आवडली त्यांची.
विशालचा गेमच कळत नाही आहे
सोनाली आता विक वाटत आहे गेममध्ये.राकेशला खरतर गेमची ओपनिंग रूचिता आणि अनुश्रीने छान करून दिली आहे,बघू कसा पुढे जातो.प्रभू अजूनही नावडताच आहे.
धक्का सगळा रुचिता आणि अनुश्रीवरच असेल.
म्हणजे परत भाऊंच सिग्नेचर वाक्य आलच
"माझ्या घरात हे चालणार नाही."
दिव्याला काय करायच तेच कळत नाही.

हो अनुश्री ला तरी नक्कीच समजते आहे ती काय करतेय आणि का करतेय. तिला वीकेन्ड ला बोलणी पडली तर तिला मनातून गुदगुल्याच होणार आहेत. रुचिता मात्र इमोशनल फूल म्हणतात तशी आहे. ना धड लीड व्हिलन दिसणार ना पॉझिटिव दिसणार. बाय द वे, कदाचित त्या स्मोक करत असूही शकतील पण करत नसूनही स्मोकिंग रूम मधे फक्त डिस्कस करायला जात असू शकतात, कारण तिथे कॅमेरे नाहीत!
राकेशनेही करण कडून सार्कॅजम शिकायची गरज आहे. सिंपथी घेण्यापेक्षा करण सारखी एन्टरटेनमेन्ट करावी त्यातून.
सोनालीचे वेगळेच इक्वेशन दिसते. ती बर्‍याच वेळा अनुश्री, रुचिता आणि विशाल च्या गँग मधे बसलेली असते. तिचा कोणत्याच ग्रुप मधे जाण्याचा प्लान नाही बहुतेक. काड्या घालून मजा बघणार. विशाल मला क्रिन्ज वाटतो आहे एकदम.
इन्टरेस्टिंगली तन्वी पण इन्डिपेन्डन्ट गेम खेळते आहे सध्या. पब्लिक ची मेमरी किती शॉर्ट टर्म असते, गेल्या आठवड्यात शिव्या देणरे लोक सोमि वर आता तिची तारीफ करत आहेत, अनुश्री विरोधात स्टँड घेतल्याबद्दल!
प्राजक्ता, दीपाली आणि ग्रुप दिव्याला साइडलाइन ला टाकतो आहे सतत. ती फुटणार ग्रुप मधून असे वाटते.
रोशन चे पण सारखे सिंपथी कार्ड चलू आहे, आम्ही गावाकडचे , आम्हाला इन्ग्लिश येत नाही, आम्ही गरीब वगैरे. एक्दा दोनदा ठीक पण तेवढाच गेम असेल तर काही अर्थ नाही.

करण पण बरेचदा विशाल बरोबर बसलेला दिसतो, जरी त्याच्या मैत्रीणींशी भांडणं होत असली तरी, त्याचाही क्लिअर गृप नाहीये.
बाकी त्या स्मोकिंगचं का इतकं आश्चर्य वाटावं ? स्मोकिंग रुम केलीच आहे त्यांच्या साठी !
बरेच मराठी सेलेब्ज आहेत अट्टल स्मोकर्स , सिझन १ ला तर स्मोकिंग रुम मधे जायला रांगा असायच्या.. आस्ताद, रेशम, सुशान्त, राजेश, भूषण,नन्दकिशोर वगैरे !
पहिल्या अनफिक्टर्ड रॉ सिझन नंतर कोण कोण स्मोक करते दाखवणे बन्द केले मराठी बिबॉने कारण पहिल्या सिझन मधे स्मोकर्स वर खूप टिका केली पब्लिकने.
अनुश्री जातेच स्मोकिंग रुम मधे, कोणीतरी लिहिलं होतं कि राधाच्या हातात ती लायटर पण देताना दिसली.
बाकी राकेश चा व्हाइट कॉलर गृप पण घोळ घालतोच.. आधी विशालचा ऑप्शन असताना दिव्याला कॅप्टन्सी मधून बाहेर काढत शेणात पाठवलं, मग काल परत तेच दिव्या बाबतीत !

दीपाली ने काल राकेश चा गेम मुद्दाम केला की गेम न कळल्यामुळे केला ?
राकेश ला कॅपट्न पद उमेदवार व्हायचा चांगला चान्स होता खरतर... त्यामुळेच तो चिडला होता..
टोळी काय शब्द बनवलाय या लोकांनी.. विशाल आवडत नाहीये आता अजिबात.. राधा, रुचिता, अनुश्री यांना बघायचा कंटाळा यायला लागलाय आता. नुसती वचवच आणि कुटाळक्या.. तिकडे सागर, सोनावणे, सचिन,आयुश वगैरे केर काढताना कसली धमाल करत होते.. फार मजा येत होती ते बघायला.. असं हलकंफुलकं का दाखवत नाहीत बरं.. नुसती कचकच भांडणं.. तेच तेच विषय
तन्वी नाहीच सुधारणार असं वाटतंय. आत्ता वाटतेय बदललेली पण अखंड मोठ्या आवाजात ओरडणं ऐकुन कान किटले..
प्राजक्ता काल म्हणाली ते पटलं.. अनुश्री आणि रुचिता खरच काहीही क्लास नसलेली लोकं वाटतात... आपल्या आई वडिलांना आपल्याला असं बघुन काय वाटत असेल असा विचार येत नसेल का मनात ?

काल राकेशसोबत जे झालं ते दिव्याच्या बाबतीत दोन वेळा झालंय..यावेळी पहिल्यांदाच मेजाॅरिटी असणारा group चांगला आहे.पण ते मेजाॅरिटीचा फायदाच करून घेत नाहिये.'एक चान्स तुम्हाला एक आम्हाला' असं चाललंय .अरे काय गल्ली क्रिकेट खेळताय का?घ्या की मेजाॅरिटीचा फायदा.होऊ द्यायचे आपल्याच ग्रुपचे दोन्ही उमेदवार. अनुश्रीला पाठवायलाच नको होतं.सोनालीला गेम कळतो पण ती काहीच ठाम भूमिका घेत नाही.कोणी काहीही खेळलं तरी तिला देणं घेणं नसतं. राकेशला उमेदवारी गेली, यापेक्षा अनुश्रीने बाद केलं याचं जास्त वाईट वाटलं.शिवाय आधीच्या प्रकरणानेही तो खूप डिस्टर्ब्ड आहे. तो साठलेला रागही निघत असेल.बाकी राधा,अनुश्री किती घाणेरड्या आहेत.तो कपड्यांचा मुद्दा फारच किळसवाणा वाटला. आणि ती अनुश्री किती समर्थन करत होती.यावेळी चुगलीसाठी भरपूर मसाला दिलाय सगळ्यांनी.सतत चुगल्या चालू आहेत.

राकेशला बॉस का बनवत आहेत सगळे ? ‘सर’ काय ? Uhoh
उगीच रुसणेफुगणे चालु होते त्याचे आज, क्राय बेबी !
आयुशने या आठवड्यात खूप सुधारला गेम, झाला ना तो कॅप्टन ?

यावेळी पहिल्यांदाच मेजाॅरिटी असणारा group चांगला आहे.पण ते मेजाॅरिटीचा फायदाच करून घेत नाहिये >> अगदी अगदी.. इतिहासात पहिल्यांदाच..

राकेशला उमेदवारी गेली, यापेक्षा अनुश्रीने बाद केलं याचं जास्त वाईट वाटलं.शिवाय आधीच्या प्रकरणानेही तो खूप डिस्टर्ब आहे > > काल अनुश्री म्हणत होती की तिच्या कोणात्यातरी शो मधे तो गेस्ट म्हणुन आलेला आणि आता दोघे एकाच लेव्हल चे स्पर्धक आहेत. म्हणुन तो जळतो आहे ई ई... राबा असा वाटत नाही खरंतर.. बराच जेन्युईन वाटला.. ही असा त्रास देत राहिली तर खरंच गेम सोडुन जाइल तो..

बाकी राधा,अनुश्री किती घाणेरड्या आहेत.तो कपड्यांचा मुद्दा फारच किळसवाणा वाटला >> मी हे मिस केलं बहुतेक..

चांगलं लिहीताय सगळे. मला कोण काय इतकं माहीती नाहीये. नविन आहेत बरेच, आयुष माहीतेय. मराठी सिरीयलमधे होता एक दोन, लीड होता पण सिरीयल्स चालल्या नाहीत पण तो अभिनय चांगला करायचा (तोच ना), मी असेच शॉटस बघितलेले.

माझं विकेंड वार बघायचं राहीलं आहे, यावेळी तेवढंच बघेन. मला तो एक शॉट आवडला मधे बघण्यात आला, कोणीतरी उभ्या उभ्या केर काढत होती, अजिबात वाकत नव्हती आणि तिला सगळे चिडवत होते.

काल राकेश चिडका बिब्बा वाटला Happy तो चिडून बोलायला लागला की मला हसूच येते.
त्याचा पॉइन्ट बरोबर होता की या ग्रुप मधे एकी नाहीये. आपल्याच लोकांना आउट करतात. त्यातल्या त्यात प्राजक्ताच सेन्सिबल वाटते आहे सध्या. अति हुषार मुलींच्या मानाने आयुष आणि ओंकार बावळटच वाटत आहेत अजून .
करण हुषार असून गेम कॅजुअली घेतोय असे वाटते. टास्क्स, कॅप्टन्सी इ. साठी सिरियस च नाही असे दिसते.
सोनालीचा गेम विअर्ड आहे. दोन्ही ग्रुप मधे जाऊन काड्या घालते. अनुश्री बर्‍याचदा बॅकग्राउंड ला दिसते तेव्हा शांत, सेन्सिबल दिसते मग चान्स मिळाला की लगेच स्टेज वर एन्ट्री घ्यावी तसा भांडणाचा बुरखा घेते. तिचे ते वेडावून दाखवणे वगैरे टू मच बालिश वाटले. रुचिता आणि राधा एलिमिनेशन च्या लायकीच्या आहेत.

राकेशने हिन्दी बिबॉ मधेही गणपतीची मूर्ति तयार केली होती , अगदी एगझॅक्ट सेम मूर्ति !
कोणी हिन्दी बिबॉ सिझन १९ बघितला का ? बघितला असेल तर राकेशचा गेम सेम गौरव खन्नाच्या लाइन वर चालला आहे.
घरात अ‍ॅक्टिव्ह नसणे,, फ्र्॑न्ट्फुटवर वर न रहाता स्वतःच्या गॅन्ग कडून सगळे करून घेणे, तो अ‍ॅक्टिव्ह नाही/नियम फॉलो करत नाही म्हणून घरातल्या लाउड मुलींनी सत्॑त त्याला टार्गेट करणे , तरीही 'डिग्निफाइड असणे' अपशब्द न वापरणे या क्वालिटी वर शेवटपर्यन्त टिकणे !
इथे रुचीता, अनुश्री फरहाना -तानियाचा रोल करत आहेत.
बाकी २ आठवडे झाले तरी अजुनही कोणीच विनर क्वालिटी दिसत नाहीये, कोणाचाच गेम फार इम्प्रेसिव दिसत नाहीये.
विशाल लाइकेबल नसला तरी सर्वात हुषार आहे, सगळ्यांचे गेम बरोब्बर डिकोड करतोय !
आयुशने राकेशची मर्जी राखणे फार लाचारी दिसतेय !
आज तन्वी - प्रभुचा सीन बघून सेम छोटा पुढारी-निकीच्या सीनची आठवण झाली, ती त्याला भाऊ भाऊ करत हतात हात घेऊन कुरवाळतेय, त्याच्या बरोबर झोपतेय..त्या,प्रभुच्या मनात भलतच काही चाललय असे वाट्टेय Uhoh
तन्वीलाही व्यवस्थित माहित असेल ते, उगीच फुटेज साठी वाट्टेल ते !

मलाही त्या राकेश ला विन डेडिकेट करणे, सर सर करणे हे झेपले नाही!! कशाला उगाच?! तरी आज त्याला झोपणे, भाग न घेणे बद्दल समज दिली गेली आहे असे दिसते. पण येस, जाणार तो शेवटपर्यन्त.
प्रभू एन्टरटेन करतो आहे हे खरे पण बहुतेक मुली त्याचे लाडबिड करतात ते अगदी याइक्स! क्रिन्ज !वाटते.

आज अपेक्षेप्रमाणे धक्का झाला.
पण रूचितावर काही फार परिणाम झालेला वाटला नाही.
अनुश्रीवर थोडा वाटला.
विशाल बोलण्यात माहिर वाटतो पण तेवढा टास्क मध्ये वाटत नाही.
सोनाली तर काही आठवड्यासाठी पिकनिकला आली आहे रेशमसारखी अस आता वाटायला लागल आहे.
आज एवढ रितेश बोलला,पण काही फरक नाही.तस कोणालाच काही फरक पडत नाही पण निदान काही जण थोडीफार अँक्टिंग करतात.
पण सोनालीचा चेहरा मख्ख वाटला.
प्रभूच कितीही कौतुक केल तरी तो नाहीच आवडत.पण निर्णायक क्षणी त्याच मत मोलाच ठरू शकत.
गुडी बाई,राकेशला नेणार शेवटपर्यंत.
अनुश्री सुधारली तर अजून काही आठवडे तरी नक्की पुढे जाईल.
पण अजूनही विनर कोणी वाटत नाही ,हे मात्र खर आहे.
राधा बाहेर गेली आहे ,अशी न्यूज आहे.

सोनालीने सलमान ला भीक नाय घातली, रितेश काय चीज आहे
विशाल अज्जीबातच आवडत नाही आधीही नाही आता ही नाही फुकट alfa मेल असल्याचा आव

वीकेन्ड ची चावडी काही फार रंगली नाही. जे काय झापले ते ऐकून अनुश्री उघड उघड खुदू खुदू हसत होती. आधी म्हटले होते तसेच, तिला आनंदच झाला होता तिची दखल घेतल्याचा. मधे एकदा ती एक्साइटेड गप्पा मारत तिच्या मैत्रिणींना म्हणाली सुद्धा , तन्वीकडे बघा आज तिच्याबद्दल सर बोलले नाहीत ना, म्हणून जळतीय.
विशाल पण हसतच होता..रुचिता थोडी सिरियस वाटत होती. राकेश आणि सोनालीला बोलले ते बरे केले, राकेश ने इमेज ची काळजी घेत दिलगिरी व्यक्त केली पण सोनाली ला काहीही फरक पडला असे वाटले नाही.

अनुश्री ने चावी चोरल्याची एक ही क्लिप दाखवली नाही. डायरेक्ट शनिवारी आपल्याला तिचे कन्फेशन दाखवले आणि मग ती इतरांना हे सगळं सांगताना दाखवली. आणि काल डायरेक्ट रितेश ने हे चावी चोरल्याचे एक्सपोझ केलं... सर्वांसमोर.... हे कोणाला फिशी वाटत नाही का

मी विकेंड वार पहिला दिवस बघायचा ठरवलंय, पहिला भाग बघितला. अनुश्री, सोनालीला काहीच फरक नाही पडला, पण एकंदरीत ठरवून केलेलं बेड ताब्यात घ्यायचं, विशालच्या चुकीच्या गोष्टीही का ऐकतात या मुली, सॉरी म्हणावंसं वाटलं तर त्याला का विचारायचं. रितेश सोनालीच्या attitude मुळे खरंच चिडला शेवटी असं वाटलं.

रोशनबाबत चुकीचा निर्णय का दिला प्राजक्ताने.

रितेशचा काहीच धाक/भिती वाटत नाही कोणाला, म्हणून त्याचे फ्रस्ञ्रेशन सोनालीवर काढलं , अनुश्री अ‍ॅज एक्स्पेक्टेड खुषच दिसत होती ‘फरहाना’ बनून !
असे निगेटिव /लाउड रहाणार्‍या मुलींना काहीही फरक पडत नाही वैयक्तिक्/प्रोफेशनल आयुष्यत, उलट बिबॉ त्यांची इमेज क्लिन करून त्यांना 'बॉस लेडी' /शेरनी वगैरे टायटल देते जर्नी व्हिडिओ मधे !
आत्ता जान्हवी किल्लेकरला रितेश बरोबर होस्टिंग करायची संधीही मिळाली .
सोनालीला रिअ‍ॅलिटी चेक दिले तसे करणला द्यायची वेळ आली आहे, काहीच फ्रन्टफुट गेम नाही , नुसतच नाव मोठं !
दीपाली सय्यदचेही उगीचच कौतुक होतय !
मांजरेकर बोलायचे तेंव्हा त्यांच्या शब्दाला वजन होतं, शिवाय ते स्वतः मराठी सिनेमात बर्‍यापैकी इन्फ्लुएन्शिअल असल्यामुळे त्यांचा दरारा होता .. रितेशचे ना स्वतःचे एवढे करिअर आहे ना धाक त्यामुळे फ्लॉप जातोय विकेन्ड !

Pages