बिग बॉस मराठी सिझन ६

Submitted by दीपांजली on 14 January, 2026 - 14:02

बिग बॉस मराठी सिझन ६ सुरु झाला आहे.
त्यावर चर्चा करण्यासाठी हा धागा !
स्पर्धक :
दीपाली सय्यद : ( अभिनेत्री/पॉलिटिक्स्ल बॅक्ग्राउंड)
सागर कारंडे : ( कॉमेडियन/ अ‍ॅक्टर)
सचिन कुमावत: (खान्देशी गायक)
सोनाली राऊत: (मॉडेल, एक्स बिबॉ कॉन्टेस्टन्ट )
आयुष संजीव: (अ‍ॅक्टर )
तन्वी कोलते: (अभिनेत्री)
करण सोनावणे/फोकस्ड इन्डियन : इन्फ्लुएन्सर, कॉमेडियन, क्रिकेट प्लेयर्स/ क्रिकेट क्स्न्टेन्ट साठी फेमस.
प्रभू शेळके:रील स्टार
प्राजक्ता शुक्रे,: इन्डियन आयडॉल सिझन १
अनुश्री माने : मॉडेल्/अ‍ॅक्ट्रेस
रुचिता जामदार,: एम टि.व्ही रोडीज एक्स कॉन्टेस्टन्ट
राकेश बापट,: अ‍ॅक्टर/एक्स बिबॉ कॉन्टेस्टन्ट
रोशन भजनकर: अमरावतीचा बॉडी बिल्डर
दिव्या शिंदे: युवा नेता
विशाल कोटियन : अ‍ॅक्टर/एक्स बिबॉ कॉन्टेस्टन्ट
राधा मुंबईकरः लावणी +आयटेम डान्सर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

करण आणि आयुष evict झाल्याची news आहे... रोशन सचिनच्या आधी करणला काढण्याचं काय कारण असेल बरं?
की secret room असेल..

रोशन सचिनच्या आधी करणला काढण्याचं काय कारण असेल बरं?.....
रोशनला अजूनही सोमिवर सपोर्ट आहे बर्यापैकी. आणि कदाचित टोळीमध्ये थोडा निगेटिव्ह वाटत आहे म्हणून विशालशी भाडण करून टोळीबाहेर येऊन एक आठवडा ठेऊन मग काढायच असेल.

सचिनची काही आयडिया नाही.
मला वाटल होत आयुष आणि राखीला काढतील.
निक्की त्या 50 शोमधून बाहेर झाली आहे.आता राखीला जर जायला सांगितलं तर हिला आणतील.
पण दोन एव्हिक्शन सतील ,आणि नवीन कोणी वाईल्ड कार्ड येणार नसेल तर मुळात शंभर दिवस सिझन तरी करणार आहेत का?

रोशनला अजूनही सोमिवर सपोर्ट आहे बर्यापैकी.>>>कसला सपोर्ट हो...सपोर्टनुसार केलं असतं तर कोणतंच unfair eviction केलं नसतं..तो रोशन कसा आहे, काल captaincy task मध्ये आम्हाला covince कर म्हणून त्याला सांगत होते..काहीतरीच...एका चांगल्या contestant ची जागा अडवून बसलाय तो.

विशाल परवा रुचिताला म्हणाला होता की ' तु मला आवडतेस पण माझ तुझ्यावर प्रेम नाही' पण काल captaincy task मध्ये हा तिच्याशी Flirt करत होता. तिसुद्दा त्याला रिस्पॉन्स देत होती. सन्तुर टास्कमध्ये हा तिची स्तुती करत होता तेव्हा ही लाजत लाजत ऐकत होती. नक्की ह्यान्च चाललय काय?

बिग बॉस ने करणला orange म्हटल्यावर ह्या दोघान्च हात पकडण चालू झाल. Lol Lol :हाहा करणला काढल तर ह्यान्च्या लव angle चे काय होईल? Biggrin Biggrin Biggrin

राखी गेस्ट म्हणूनच आली आहे, धिंगाणा घालायला. हा आठवडा झालाच आणि अजून एक आठवडा आहे ती.
करण मला अजिबात आवडत नाही पण त्याच्या आधी रोशन, सचिन हे खरंच जायला हवेत पण बिबॉचे काय इक्वेशन आहे कळत नाही. गेम मध्ये कोन्ट्रिब्यूशन नाही, करमणूक करतात का तर तेही नाही.
राकेश फुसक्या स्ट्रॅटेजीज करतो आणि सोअर लूजर वाटतो. शेवटच्या राउंड ला जे लोक डिसिजन घेणार होते ते कॉम्बिनेशन पाहता असेच होणार होते. राकेश ने उगीचच फार डोके लावल्याचे क्रेडिट घेतले.तसे पाहिले तर गेम मधे विशाल त्याच्यापेक्षा पॉझिटिव आहे खर तर.

बिबॉ हिन्दी काय मराठी काय, जे जास्तं पैसे घेऊनही परफॉर्म करत नाहीत त्यांना आधी काढलं जातं, मिनिमम गॅरेन्टी संपली कि काढलं करणला Happy
रोशन सचिन वगैरेंचाही नंबर येईल, पण त्यांना देतात ती किंमत नगण्य असावी.
राकेशला काल लोकांनी हिरो केलय पण तो कायमच असे करतो, ब्रेडला सॉसचा कलर देऊन व्होट करायच्या वेळी मत बरबाद केलं कोणालाही मत न देता, अयुशच्या गळ्यातला फोटो फेकला, गाजर फेकलं त्याची वृत्तिच टास्क न करायची आहे !

गंमत ही आहे की हे बिबॉला माहितच होते. याचा अर्थ त्यांनाही रोशन आणि अनुश्रीपैकी कुणालाच कॅप्टन होऊन इम्म्युनिटी द्यायची नव्हती!
धडाधड एलिमिनेशन्स होत आहेत. हाही सीझन लवकर संपवतायत की काय?!

आयुषला खूपच जास्त injury झाली आहे वाटतं...त्याला चालता सुद्धा येत नव्हतं आज..म्हणून मागे राहिला तो नाहीतर चांगला खेळला असता...पुढच्या वीक मध्ये रोशन जावा आता..

रोशन ला सगळे जण रॉशन का म्हणतात ?

करण गेला मला फार बरं वाटलं . किती बकवास आहे तो . या असल्या लोकांचे इतके फॉलोवर्स असतात? माझा तर विश्वासच बसत नाही. त्यापेक्षा प्रभू कितीतरी बरा.

ते नव्हे राकेश बापट ने कोणता डाव उलटवला ? सोमीवर त्याची फार चर्चा होती . मी एपिसोड परत बघितला पण मला फार काही नीट समजलं नाही . पण त्याने एक निराळंच मत देऊन अनुश्री आणि अजून कोणाला तरी कॅप्टन होण्यापासून वंचित ठेवलं तोच डाव होता का ?

ते नव्हे राकेश बापट ने कोणता डाव उलटवला ? सोमीवर त्याची फार चर्चा होती . मी एपिसोड परत बघितला पण मला फार काही नीट समजलं नाही . पण त्याने एक निराळंच मत देऊन अनुश्री आणि अजून कोणाला तरी कॅप्टन होण्यापासून वंचित ठेवलं तोच डाव होता का ? >>>>>>>>>>> हो तोच होता.

करण गेला याचा आनंदच झाला मलाही. त्याचे ते स्किट्स अज्जिबात फनी वाटत नाहीत मला. आचरट निव्वळ. आणि कसली ती स्ट्रॅटेजी , अनालिसिस करत होता. ते गुलदस्त्यातच राहिले ते बरे झाले. तसे फार एकत्र वावरले नसूनही आयुष आणि करण ची जर्नी एकत्रच दाखवली ! त्यांना वेगळा स्वतंत्र स्क्रीन टाइमही नाही मिळाला!
तरी पण त्या कुमावत ला ठेवले याचे दु:ख झालेच. तो असल्या नसल्याने काहीही फरक पडणार नाहीये बिबॉ च्या एपिसोड्स मधे.
राकेश चे जरा जास्त कौतुक झाले . टोळीचा कॅप्टन होऊ शकला नाही याला कारण तो ठरला हे खरे पण ते होण्यासाठी सगळे अनुकूल फासे बिबॉने त्याला प्लॅटर मधे वाढून दिले होते.

रुचिता किती लाऊड आणि फालतू आहे . Sad तिने राखीच्या बेडवर घाण टाकली , तिथे तन्वीला खरंतर मध्ये पडण्याची गरज नव्हती . किंवा निदान तिला जे सांगायचं होतं ते ऑर्डर दिल्यासारखं न सांगता थोडं समजावणीच्या सुरात सांगायला हवं होतं. कारण तन्वीचा कन्सर्न राखीला समजला नाही. ती म्हटली माझा बाप व्हायला जाऊ नका .
रुचिताच्या नरड्यात शेंदूर कोंबायला पाहिजे .
राखीला बिग बॉसनी मस्त कव्हर केलेय. तंटोजीराव भांडकुदळे यांची उत्तराधिकारी केलं तिला म्हणजे आयतं कोलीत हातात दिलं. पण मजा करतेय राखी .
तन्वी मला खूप आवडू लागली आहे . सुंदर बोलते , शुद्ध बोलते , टू द पॉईंट बोलते .
करण गेल्यापासून प्राजक्ता फुस्स झाली आहे. तोंड पाडून बसलेली. पण तिचं सुद्धा बरोबर आहे कि इमोशन्स मुळे एखादा दिवस लागतो स्थिरस्थावर व्हायला .

प्रभू मला खूप आवडतो , रुचिताला किती गोड़ शिव्या देत होता. आणि राखीच्या मागे फिरताना तिच्या खांद्यावरच्या झुलीखाली लपला होता. फार गोड़ वाटतो मला . रुचिताला म्हटला मी इथे अंडीच खायला आलोय .

त्याचा काय संबंध ? इथे बिगबॉस मध्ये मला तो आवडतो आहे .
कन्टेन्ट म्हणून करत असेल तर तेच त्याचं खरं रूप असेल असं नाही ना ? मी काही त्याचे रिल्स पाहिलेले नाहीत , पण तो घरात व्यवस्थित वागतो आहे इतकं खूप आहे माझ्यासाठी .

तो आयुष घरात असताना राकेशचा जप करत होता.अगदी कँप्टन होण्याच श्रेय पण त्यालाच दिल.पण आता बाहेर सांगत आहे की राकेश डबलफेस आहे.
करण तर मी फेक वागलो नाही म्हणून बाहेर आलो हे कारण देत आहे.
काल नॉमिनेशन टास्क मध्ये प्रभू जेव्हा विशालला म्हणाला की मी दिसलो नसतो तर मला वोटिंग झाल नसत वगैरे तेव्हा खरच अस वाटल की त्याला सांगाव की अरे,वोटिंग वर नसतच काही,बिबॉस च ठरवतात कोणाला काढायच ते.
राकेशच कळतच नाही आहे काल गुडीबाईंना सांगत होता कि मी आहे वगैरे आणि नंतर नॉमिनेट केल.
विशालला का नाही केल,अनुश्री,रुचिता ,रोशनपैकी कुणाला का नाही केल.कदाचित याला माहित असेल की यांच्यापैकी कोणीच इतक्या लवकर बाहेर जाणार नाही.
विशाल ,अनुश्रीने पण राकेशला केल नाही.
कँप्टन होऊन देत नाहीत ,पण महत्वाच नॉमिनेट कस करत नाहीत.
तन्वी आणि दिपालीसुध्दा त्याला कधीच विचारत नाहीत.
राखीला काल पकडून नेऊन बिबॉसने पुढे काय करायच ते सांगितल असाव.
काल नॉमिनेशन टास्कच्यावेळी थकलेली वाटली.शांत होती.
काल तन्वाला भडकवण्याचा प्रयत्न केला,पण काहीच झाल नाही.
रुचिता सोडली तर राखीला हवा तसा रिस्पॉन्स मिळत नाही हे बिबॉसला कळल असाव.
म्हणून आता हुकुमशहाटाईप टास्क चालू केला आहे.
राखीवरच खेचावा लागणार बहुतेक सिझन.
दुसर वाईल्डकार्ड येत नाही बहुतेक.

तो आयुष घरात असताना राकेशचा जप करत होता.अगदी कँप्टन होण्याच श्रेय पण त्यालाच दिल.पण आता बाहेर सांगत आहे की राकेश डबलफेस आहे.
करण तर मी फेक वागलो नाही म्हणून बाहेर आलो हे कारण देत आहे.
काल नॉमिनेशन टास्क मध्ये प्रभू जेव्हा विशालला म्हणाला की मी दिसलो नसतो तर मला वोटिंग झाल नसत वगैरे तेव्हा खरच अस वाटल की त्याला सांगाव की अरे,वोटिंग वर नसतच काही,बिबॉस च ठरवतात कोणाला काढायच ते.
राकेशच कळतच नाही आहे काल गुडीबाईंना सांगत होता कि मी आहे वगैरे आणि नंतर नॉमिनेट केल.
विशालला का नाही केल,अनुश्री,रुचिता ,रोशनपैकी कुणाला का नाही केल.कदाचित याला माहित असेल की यांच्यापैकी कोणीच इतक्या लवकर बाहेर जाणार नाही.
विशाल ,अनुश्रीने पण राकेशला केल नाही.
कँप्टन होऊन देत नाहीत ,पण महत्वाच नॉमिनेट कस करत नाहीत.
तन्वी आणि दिपालीसुध्दा त्याला कधीच विचारत नाहीत.
राखीला काल पकडून नेऊन बिबॉसने पुढे काय करायच ते सांगितल असाव.
काल नॉमिनेशन टास्कच्यावेळी थकलेली वाटली.शांत होती.
काल तन्वाला भडकवण्याचा प्रयत्न केला,पण काहीच झाल नाही.
रुचिता सोडली तर राखीला हवा तसा रिस्पॉन्स मिळत नाही हे बिबॉसला कळल असाव.
म्हणून आता हुकुमशहाटाईप टास्क चालू केला आहे.
राखीवरच खेचावा लागणार बहुतेक सिझन.
दुसर वाईल्डकार्ड येत नाही बहुतेक.

हो ना, नॉमिनेशन्स च्या वेळी राखी काहीच बोलत नव्हती.का ते कळले नाही.
अनुश्री आधी नाटक करता करता आता खरंच डबल एजन्ट गेम करते आहे. दोन्ही बाजूची माहिती इकडची तिकडे करून नॉमिनेशन पासून सेफ रहायचा डाव दिसतो आहे. ती अनॉयिंग असली तरी तिचा गेम स्वतःचा आणि वेगळा दिसतो आहे.
विशाल ला पुन्हा एकदा नीटच समजले आहे की राखीला का पाठवले असावे. तो म्हणत होता की सगळे राखी ला महत्त्व देत आहेत पण सीझन राखीने हायजॅक करणे आपल्यासाठी चांगले नाही.
करण ने बाहेर येऊन तन्वीला सर्वात जास्त फेक म्हटले आहे, जे वाटतच होते. ती ते एक कॅरेक्टर घेऊन बसली आहे. सतत ऑडिशन सुरु! पण तो गेम एकूणच अनेकदा अनेकांनी खेळून झाला आहे.
राकेश मला फारच फुसका आणि चिडीचा डाव करणारा वाटतो. काही डोके चालत नाही त्याचे. फक्त गेम कॅन्सल कसा होईल हेच बघतो. दीपाली तेच तेच इमोशनल गेम्स खेळते. एकूण काटा गँग चे स्टॅटेजीवाइज काही चालणार आहे असे वाटत नाही तिथे. बिबॉ नेच प्लॅटर हातात दिला तर.

राखी काय रुचीताला सिंपथी द्यायला आली आहे का , तिच्या राड्यापुड्ये रुचीता सौम्य दिसतेय Happy
प्रभुच्या बाबतीत दक्षिणाला अनुमोदन ! तो फार रॉ आणि मस्तं बोलतोय आणि रुचीता-विशालला बरोबर नडतोय , प्रत्येकाला उत्तरं देत होता, एक शब्दं खाली पडु देत नाही , राकेश -सागरसारख्या भल्या भल्या सो कॉल्ड स्टार्स पेक्षा त्याचा वावर खूप चांगला आहे.

राकेशने कात्री वापरून पुन्हा टास्क खराब केला, कितीवेळा सांगितले होते बिबॉने टोकदार वस्तु/कात्री /सुरी चालणार नाही म्हणून Uhoh अज्जिबातच स्पोर्टिंग स्पिरिट नाही त्याच्याकडे, आधी दोनदा बिबॉंमधे येऊन गेलेला माणुस आहे हा .. टास्क मधे अशा वस्तु आणणे डेंजरस आहे इतका पण कॉमन सेन्स नाही , हेच ऋचीताने केले असते तर याने तमाशा केला असता, निघून वगैरे गेला असता !
टोळीच फक्तं व्यवस्थित प्लॅन करू खेळते, हे काटावाले सगळे लुजर्स आहेत !

बिबॉस सरळसरळ राकेशला सपोर्ट करत आहे.काल खरतर सांगूनही राकेश कात्री घेऊन आल्यावर तिथेच त्याची उमेदवारी काढून घ्यायला हवी होती.पण बिबॉस राकेशच्या बाबतीत नियम विसरतो.टोळीने व्यवस्थित वेणी घातली होती.
तन्वी आणि दीपाली राकेशसमोर का झुकतात ते कळत नाही.पण अनुश्री आणि रुचिताला सतत विशालवरून बोलतात.
त्या दोघी कशाही असल्या तरी गेम खेळतात.
अनुश्री सध्या डबलढोलकी असली तरी गेम खेळत आहे.

रुचिता ने प्रभु ची तुलना सुरज सोबत केली... सुरज ला एक वाक्य धड बोलता येत नव्हतं.. प्रभु बराच स्मार्ट आहे त्याच्यापेक्षा...नॉमिनेशन टास्क मधे मस्त मुद्दे मांडत होता.. भारी बोलतो तो.. रितेश आणी बिबॉ ला पण मस्त उत्तरं देत असतो..
गमत्या आहे बराच.. राखी राणी झाली तेव्हा तिचा पदर डोक्यावर घेउन मागे मागे फिरत होता.. मज्जा आली ते बघुन

विशाल आणी तन्वी ला नॉमिनेट करु नका असं बिबॉ ने सांगितलं आहे का ? हेच दोघं हवेत बहुतेक फायनल ला Happy

अनुश्री, रुचिता गेम मधे फार स्मार्ट आहेत.. त्यांनी छान पद्धतिने वेणी बनवायला सुरु केले होते.. दुसर्‍या टीम ने सुरुवात उशीरा केली पण विशाल ने त्यांची वेणी तोडली.. राबा ने कात्री वापरली त्यावेळी रागच आला त्याचा.. मठ्ठ.. हेच रुचिता किंवा विशाल ने केले असते तर ? घरात महासंग्राम झाला असता.. प्राजक्ता ने गोड बोलुन राखी चे मन वळवळे आणि टीम ए जिंकली..

आज काय होते बघु.. विशाल ला कोडं सुटेल का ? रुचिता त्याबाबतीत स्मार्ट आहे.., तिला पाठवायला हवं होतं..

आज राखीने ठरवून ड्रामा केला. प्राजक्ता ते पिठ फेकल्यावर आधी थक्क झाली, चिडली पण नंतर तिने सांगितलं की राखीने तिला (आणि बहुतेक सचिन ला) फुटेज देण्यासाठी ते केलं. Happy तन्वी त्यावरून बॅटिंग करण्याचा प्रयत्न करत होती ते ऐकवत नव्हतं मात्र, फेक. फेक.
कोडं घालण्याचे राउंड्स नी एकदमच ट्विस्ट आणले आज. पण तेही बिबॉ च्या मर्जीने झाले असणार अर्थात. अनुश्रीला ३-३ लोक बाद करायला सांगितले अचानक. तिने मुद्दामच काही विचार करून विशाल चे नाव घेतले पण प्राजक्ताला का वाचवले कळले नाही. मग नंतर इतकी रडारड केली पण तरी मला असेच वाटले की ती सगळ्यांना उल्लूही बनवतेय आणि सगळ्यांच्या गुड बुक्स मधेही जाण्याचा प्रयत्न करतेय. पण तरी वेळोवेळी लोक तिच्यवर विश्वास का ठेवतात समजत नाही!
विशाल ला सध्या झटके बसण्याचा आठवडा आहे हा. आधी टोळी ने नॉमिनेशन त्याने सांगितली तशी केली नाहीत. आता अनुश्रीने त्यालाच आउट केले. शिवाय एक गोष्ट त्याला अजून ही झेपत नाहीये हे काल त्यानेच कबूल केले ती म्हणजे प्रभू कसा कायम वाचतो यार ?? Lol काहीही करा तो एलिमिनेट होत नाही. ते पचत नाहीये त्याला.

तन्वी सर्वात अनॉयिंग आहे , कित्ती फेक.. किती लाउड, किती डेस्परेट फुटेज साठी .. राखीच्या येण्याने धमाल तर येतेयच आहे पण तिच्यामुळे ही फुल्ल काटा गॅन्ग एक्स्पोझ होतेय.. अगदीच मूर्ख फेक वाटायला लागली आहे ( मायनस प्रभु).
मला टोळीतले लोक तन्वीची टिंगल करत होते तो सीन फार आवडला, हहपुवा !
राकेश बापटचा वावर तर इतका लेझी आहे , काहीच करत नसतो !
आज राखीने जे ठरवून केले ते बघून बिबॉची बरीच भांड्णं अशीच फेक असतील याची झलक मिळाली !
अनुश्री सॉलिड गेम खेळत आहे, विशाललाही गुंडाळले तिने,गॅन्ग् च्या गुड बुक्स मधे येण्यासाठी, अर्थात आता तिच्यावर कोणीच विश्वास ठेवणार नाही हेही पॉसिबल आहे, आज तिची बाथरुम आडवायची आयडिआही भारी होती.
रुचीता पण खूप हुषार आहे, तिने ओळखले अनुश्रीचे प्लॅनिंग.
टोळी मेंबर्स लाइकेबल नाहीयेत पण त्यांच्यामुळेच सिझन चालु आहे, फक्त तेच एफर्ट्स घेतात.
आज विशालला ऑलमोस्ट कोडे उलगडले होते, थोडक्यात चुकला !

विशाल किती गर्विष्ठ आणि माजोरडा आहे..प्रभूशी कसा बोलतो तो..प्रभू मात्र तोडीस तोड उत्तर देतो...परवा विशाल तन्वीला nominate का नाही केलं म्हणून रोशन आणि रुचिताला जाब विचारत होता मग त्याने स्वतः का नाही केले तन्वीला nominate...कारण तो तिला घाबरतो..top 5 मध्ये राहणारच पण तन्वीच्या आधी जावा घराबाहेर...कोड्याचे उत्तर देताना पण अनुश्री चुकली तर मी जायला हवं होतंचा जप लावला होता. आणि चान्स भेटल्यावर सगळी माती केली..मला तर वाटतंय बिग बॉसलाच टोळीतील कॅप्टन नको आहे..दरवेळी टोळी टास्क जिंकते आणि बिग बॉस काहीतरी ट्विस्ट आणून त्यांच्या हातातला घास काढून घेतात.. आता विशाल रोशनच्या विरुद्ध जाणार म्हणे .गेलाच पाहिजे म्हणजे तो रोशन बाहेर तरी जाईल..टोळी खरंच टास्क डोकं लावून खेळते पण सगळं श्रेय विशालच घेतो आणि काही चूक झाली तर इतरांना blame करतो...
राखीने जान आणली आहे रटाळ झालेल्या शोमध्ये...ती अजून राहिली तर मजा येईल...सागर कारंडेचा गेम पहिले एक-दोन आठवडे चांगला होता.Individually खेळत होता असं जाणवत होतं. आता तर काय करतो आहे काही माहिती फक्त अधून मधून विनाकारण राखी वर आवाज चढवताना दिसतो या व्यतिरिक्त बाकी काही गेम तर दिसत नाहीये त्याचा
काल रूचिता तन्वीला मुद्दाम दिखाऊपणा करते..सूनबाई character play करते वगैरे म्हणत होती पण तन्वी अगदी बरोबर मुद्द्यांवर बोलते..रूचितासारखी अखंड भांडत बसत नाही तर तिचे इतर पैलूही दाखवते.विशेष म्हणजे सगळे काही ना काही बोलत राहतात तरी कोणाच्याही support शिवाय strong उभी राहते म्हणून मला तर आवडतेय तन्वी..या आठवड्यात तर ती कॅप्टन झाली बहुतेक..मजा येणार आता..

तन्वी चा प्रवास हळु हळु मेघा सारखा चालु आहे.. फेक वागते फेक वागते असं मेघालाही सगळे सतत म्हणायचे. अरे पण लोकहो, या शो ची हीच गरज आहे.. मग वागुदेत की तिला तसं.. बाकिच्यांनी घ्यावं की मग तिच्यासारखं वागुन फुटेज.. कोणी अडवलंय..?
अंगावर पीठ फेकुनही गुडी बाई थंड्च होत्या काल. इतकं संत कोण असतं ?.. एक नैसर्गिक प्रतिक्रीया अशी असते की माणुस पटकन जागचा तरी उठेल.. ही शांतपणे तिथेच बसुन.. यालापण फेकच वागणं म्हणतात...
अनुश्रीचं कालचं रडणं पण फेकच होतं, राखीचं वागणं तर आहेच खोटं, बाकीचे लोकही गरजेप्रमाणे आपपले मुखवटे बदलत आहेतच.. हाच गेम आहे.. त्यांना बिबॉ त्याचेच पैसे देतात. सगळे गुण्यागोविंदाने राहिले तर शनिवारी रितेश कोणाला बोलणार ? आणि लोक काय बघणार ? Happy
सो तन्वी ला गेम आणी शो बरोबर कळलाय असं मी तर म्हणेन.. मला आवडते आहे सध्या ती.. आणि प्रभु पण Happy
अनुश्री चलाख आहे मात्र...सगळ्या टोळी ला घालवुन एकटी उरेल शेवटी.. तसं झालं तर मानलं तिला Happy
तिनेपण गेले २-३ आठवडे गेम बदलला आहे असं वाटतंय...

Pages