Submitted by दीपांजली on 14 January, 2026 - 14:02

बिग बॉस मराठी सिझन ६ सुरु झाला आहे.
त्यावर चर्चा करण्यासाठी हा धागा !
स्पर्धक :
दीपाली सय्यद : ( अभिनेत्री/पॉलिटिक्स्ल बॅक्ग्राउंड)
सागर कारंडे : ( कॉमेडियन/ अॅक्टर)
सचिन कुमावत: (खान्देशी गायक)
सोनाली राऊत: (मॉडेल, एक्स बिबॉ कॉन्टेस्टन्ट )
आयुष संजीव: (अॅक्टर )
तन्वी कोलते: (अभिनेत्री)
करण सोनावणे/फोकस्ड इन्डियन : इन्फ्लुएन्सर, कॉमेडियन, क्रिकेट प्लेयर्स/ क्रिकेट क्स्न्टेन्ट साठी फेमस.
प्रभू शेळके:रील स्टार
प्राजक्ता शुक्रे,: इन्डियन आयडॉल सिझन १
अनुश्री माने : मॉडेल्/अॅक्ट्रेस
रुचिता जामदार,: एम टि.व्ही रोडीज एक्स कॉन्टेस्टन्ट
राकेश बापट,: अॅक्टर/एक्स बिबॉ कॉन्टेस्टन्ट
रोशन भजनकर: अमरावतीचा बॉडी बिल्डर
दिव्या शिंदे: युवा नेता
विशाल कोटियन : अॅक्टर/एक्स बिबॉ कॉन्टेस्टन्ट
राधा मुंबईकरः लावणी +आयटेम डान्सर
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हो.मलाही खरतर ममां च हवे होते
हो.मलाही खरतर ममां च हवे होते.रितेशच आता फार म्हणजे फारच नाटकी आणि क्रुत्रिम वाटत आहे.आणि स्पेशली तो जेव्हा 'मी बाहेर काढीन' म्हणतो तेव्हा जाम डोक्यात जात.
हा बाहेर काढेल म्हणजे काय?मग तो नॉमिनेशन टास्क कशासाठी असतो?
सोनालीला घराबाहेर काढायचच असत तर शिवानीला जस वीकेंडला बाहेर काढून वाईल्ड कार्ड हीनाला आणल होत तस नसत का केल बिबॉसने.
पण मी बाहेर काढीन,माझ्या घरात चालणार नाही,याच हेच चालू असत.
दीपाली,गुडीबाईंच फार कौतुक होत आहे.
विशाल अजून कळतच नाही आहे.त्याला माहित असेल की आपल्याला फार पुढे नेणार नाहीत,म्हणून एक ग्रुप करून त्यांना दुसर्यांविरूध्द भडकवायच एवढेच काम आपण करू या..असच करत आहे.
ओमकार डान्स मात्र मस्त करतो.कोरियोग्राफर आहे तो.मग मराठी इंडस्ट्रीत यांना चान्स का देत नाहीत,कदाचित बिबॉसचा फायदा होईल त्याला.
पण फार आठवडे राहिल अस वाटत नाही.
सोनाली सलमानला ,भाऊंना जुमानत नाही ठीक आहे पण ती फार काही करतही नाही.तिला यासाठी नक्कीच आणलेल नाही.बघतील आणि काढतीलही.
ममांचा दरारा वाटत होता हे जरी
ममांचा दरारा वाटत होता हे जरी खरं असलं तरीही ते बरेचदा भलत्याच मुद्द्यावर बोलत होते.त्यामुळे चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा प्रकारही बरेचदा झाला आहे.पण रितेश अगदी टू दि पाॅईंट बोलतो त्यामुळे त्याचं होस्टिंग बोअर झालं तरी कोणावर अन्याय होत नसल्याने समाधान वाटतं.
बाकी तन्वीने मस्त सुनावलं विशालला. बघण्यासारखं तोंड झालं होतं त्याचं.अनुश्री काय दातं काढत होती..बाहेर येऊन
सोमि वरच्या comments वाचून दाखव म्हणाव दातं.
सोनाली रविवारी एकदम आतून हलल्यासारखी वाटली. तिने positive बदल केला पाहिजे. आवडते ती मला.
कुणाला काय बोलायचे हे ममा
कुणाला काय बोलायचे हे ममा किंवा रितेश च्या मनावर नसते, ते मेकर्स चेच स्क्रिप्ट असते जे होस्ट फॉलो करतात. बिबॉ मराठी टीम आता केदार शिदे ने टेक ओवर केलेली आहे, त्यामुळे थोडे फार बदल वाटू शकतात. मलाही रितेश पेक्षा ममां आवडायचे.
बाहेर काढायची पॉवर असते होस्ट
बाहेर काढायची पॉवर असते होस्ट कडे, सलमानने काढले होते २-३ न्युसन्स कॉन्टेस्टन्टाना बाहेर मिसबिहेव केल्या बद्दल

Btw , ती सोनाली हिन्दी बिबॉ फिनाले मधे पजामा घालून मुद्दाम अटेन्शन घ्यायला घरच्या अवतारात बसली होती म्हणे, तिचे कपडे आले नाहेत म्हणून निषेध
अली नावाच्या कॉन्टेस्टन्टला थोबाडीतही मारली होती तिने !
https://youtu.be/B9nTPAxgPlA?si=cg8nSf0luD0CJqP3
अली नावाच्या कॉन्टेस्टन्टला
अली नावाच्या कॉन्टेस्टन्टला थोबाडीतही मारली होती तिने >>ओह!! मग तिला बाहेर नाही काढलं का?
ती सोनाली राऊत, उज्वला राऊतची
ती सोनाली राऊत, उज्वला राऊतची बहीण आहे का. ती ही मॉडेल होती ना किंवा आहे, परदेशात असते कुठेतरी. एक आई रशियन वडील भारतीय राऊत आडनाव अशीही कोणी मॉडेल होती ना, ती फार गोड होती दिसायला. अशा तीन तीन राऊत आडनावाच्या मॉडेल्स आठवल्या.
मला सोनाली राऊत ठीक ठाकच वाटली, impressive फार वाटली नाही.
दिपाली फार grudges ठेवते मनात
दिपाली फार grudges ठेवते मनात.तन्वीवर पहिल्या आठवड्यातला राग अजूनही कायम आहे. आता तन्वी चांगली वागते तरी अधूनमधून तिच्यावर राग काढत राहते.दिव्याच्या बाबतीत पण तेच, तिने मनापासून माफी मागूनही अजूनही ती तेच धरून बसलीये. आता आयुषचा नंबर आहे.दिपाली गर्विष्ठ वाटते. शिवाय सगळ्यांनी तिला special treatment द्यावी असं तिचं म्हणणं असतं.याउलट किशोरी शहाणे किती डाऊन टू अर्थ होती.
आयुष छान वाटतोय.
तन्वीने विशालला अगदीच सळो की पळो करून सोडलंय.अनुश्री दिसतेय हे सांगतानाही तिचे negative पॉईंट्सच सांगितले..मजा आली ऐकायला. तन्वी राहते पण मस्त.रोशन टोळी सोडेल बहुतेक.
वीकेंड वार ठीक ठाक होता..
वीकेंड वार ठीक ठाक होता.. अपेक्षेप्रमाणे रुचिता आणि अनुश्रीवर होता..
अनुश्री गालातल्या गालात हसत होती.. तिला या ओरडण्यामुळे आपण दिसतोय एवढाच मुद्दा महत्वाचा दिसतोय...
सोनाली चा माज अशक्य आहे.. तिला अनुल्लेखानंच सरळ केलं पाहिजे...रविवारी तिला काहीच करु दिलं नाही रितेश ने याचं बरं वाटलं...
राधा जाणारच होती असं वाटतंय.. तिच्या कार्यक्रमांच्या सुपार्या घेतलेल्या आहेत म्हणुन तिला काढलं अशी चर्चा सोमी वर वाचली.. तिने पण आत असताना हे बोलुन दाखवलं.. की माझा हा सिझन आहे बाहेर कार्यक्रम करायचा...
सचिन , ओंकार ला पण काढा आता.. दिसत नाहीयेत ते विषेश..
सचिन, ओंकार, रोशन, प्रभु अशी पुढची यादी असेल आता.. एलिमिनेशन साठी...
काल अंड्यांवरुन नुसता राडा केला.. चोरी करुन फेमस व्हायचं फारच कौतुक दिसतय या सिझन मधे
दिपाली अवडेनाशी झाली आहे.. घरातली मदर फिगर वगैरे व्हायचा तिचा प्रयत्न आहे असं वाटलं..
काल नॉमिनेट झाल्यावर तिला अपमान झाल्यासारखा वाटला..
सागर ने काल आवाज चढवला ते आवडलं.. आई वडिलांची शप्पथ वगैरे काय फालतुपणा आहे हा.. हा गेम आहे.. प्रत्येकाची पद्धत आहे खेळायची..
उगीच सगळ्यांकडुन काय वदवुन घ्यायचं..डोक्यावर हात ठेवुन शप्पथ आणि काय न काय... शाळेत आहात का ?
आयुष आणि तन्वी एक होउन खेळले तर पुढे जातील.. आयुष आवडतो आहे..
दिव्या ला काढा आता... बोअर झालं..
राबा ला पण काय झालेलं ?.. म्हणे जोक जास्त होतायत.. उगीच स्वत: उच्च दर्जाचा माणुस असल्याचा माज वाटायला लगलाय आता.. एक मीच काय तो सभ्य, सुसंकृत, शहाणा.. आणि बाकी सगळे फालतु....तुला काय करायचंय ? तु शायरी करत बस की..
उलट मला सागर, करण, सचिन्, आयुष यांचे टाइमपास जोक आवडतात..
मला तर कोणीच आवडत नाहीये आता.
मला तर कोणीच आवडत नाहीये आता.. काही फुटेज साठी डेस्परेट आणि टु ऑबव्हियस , काही गेम फार कॅज्युअली घेणारे , फॉलॉअर्सचा माज असणारे आणि काही स्वतःला फार क्लासी समजणारे !
आज सर्वात मूर्ख प्राजक्ता आणि करण वाटले, सचिन कुमावत सारखा काहीही न करणारा माणुस असताना प्रभुला नॉमिनेट केले जो इतर सगळ्यांपेक्षा जास्तं कन्टेन्ट देतोय !
नॉमिनेशन मध्ये अजून कोण आल
नॉमिनेशन मध्ये अजून कोण आल आहे ते माहित नाही.पण बिबॉसला जे हवे आहेत ते नाही आले तर त्याचीच पंचाईत होईल.
काल प्रभूला उगाच नॉमिनेट केल अस मलाही वाटल.तो मला आवडत नाही पण कुमावत समोर नक्कीच उजवा होता.
सोनाली एवढा माज दाखवत असेल आणि त्यामुळे फार काही घडत नसेल तर मग कदाचित तिलाही काढतील ,कदाचित म्हणून सुध्दा त्याचवेळी बाहेर न.काढता नॉमिनेट केल असेल या वीक मध्ये बाहेर काढण्यासाठी.
काल साडर गुडी बाईंच्या रियाजावरून काही बोलला का,मला नीट कळल नाही.
तन्वी खरतर विनर होऊ शकते पण कधीकधी कंट्रोलच्याबाहेर जाते.आयुषबरोबर आहे पण तो किती रिलायेबल आहे ते माहित नाही.
अनुश्री सारखी चोरी काय करत आहे?
आज आता बिगबॉस अशा जोड्या करेल जेणेकरून एकमत होणारच नाही आणि मग हवा तो कंटेस्टंट मिळवण्यासाठी अख्ख घर नॉमिनेट करेल.
तशी हिंट काल प्रोमोमध्ये दिलेलीच आहे.
सोनाली त्या हिन्दी बिग बॉस
सोनाली त्या हिन्दी बिग बॉस मधेही फार आळशी होती.. तिला सलमान पुर्ण वेळ वेड्यात काढायचा , खोट खोट कौतुक करायचा पण तिच्या लक्षातही यायच नाही ..इतक्या वर्शात तिच्यात काहिच बदल झाला नाही तर..
अन्जु ताई तुझा गेस बरोबर आहे उज्वला राउतची बहिण आहे
थँक्स प्राजक्ता.
थँक्स प्राजक्ता.
सोनाली, राकेश फायनलची गॅरंटी घेऊन आले असणार.
माझेही अजून कोणी फेवरेट असे
माझेही अजून कोणी फेवरेट असे नाही. पण एकूण यंगर लोक - त्यात पण तन्वी, रुचिता, अनुश्री आणि प्रभू हे गेम खेळत आहेत. विशालही खेळतो आहे.
बाकी आयुष ओंकार पेक्षा जास्त अॅक्टिव असला तरी त्याच बावळट माळेचा मणी आहे. अति शहाणे सिनियर्स दीपाली, करण , सोनाली हे पिकनिक करत आहेत. राकेश, सागर, प्राजक्ता जरा त्यातल्या त्यात तरी काहीतरी करताना दिसतात. सचिन आणि रोशन कंप्लीट हरवलेले आहेत . ते या गेम मधे नसून दुसर्याच आलटर्नेट युनिवर्स मधल्या बिबॉ चा हिस्सा आहेत असे वाटतेय.
मला चान्स मिळाला तर मी सचिन, ओंकार, सोनाली,दीपाली, रोशन, आयुष, करण, प्राजक्ता, राकेश, सागर अशा ऑर्डर ने एलिमिनेशन्स करेन
विकेन्डला बघायचा प्रयत्न केला
विकेन्डला बघायचा प्रयत्न केला पण काही फारस नाविन्य वाटल नाही, नेटाने बघाला लागेल तर कळेल ...रितेशच होस्टिग आवडल नाही, रटाळ आहे फार...खरतर मराठित त्याच काही फार काम नाही,..ममा ना स्पर्धक वचकुन असायचे..ममाना स्पर्धकाना टोमणे मारण, गोन्धळात टाकणारे प्रश्न विचारण वैगरे टॅक्तिक जमायच्या..
त्यापेक्षा मास्टरशेफ चान्गला वाटतोय बघायला.
विशाल आणि राकेशचे हिन्दी बिबॉ
विशाल आणि राकेशचे हिन्दी बिबॉ पासून कोल्डवॉर आहे, विशालचा राग सहाजिक आहे, राकेशने त्याचा गेम खराब केला होता.
अॅक्चुअली बिबॉ ओटीटी मधे राकेश आणि शमिता शेट्टी हॉट कपल म्ह्॑णून फेमस होते , नंतर रिअल लाइफ मधेही डेटिंग करत होते.
ओटीटी नंतर हिन्दी सिझन १५ ला शमिताला डायरेक्ट एन्ट्री मिळाली पहिल्या एपिसोड पासून, तिथे विशाल कोटियनने तिला दोघेही ‘शेट्टी’ जातीत मोडत आसल्याने बहिण मानले.
मग राकेशही त्या सिझनला काही दिवसां पुरता आला होता , वाइल्डकार्ड्/गेस्ट बनून आणि मग त्याने शमिताला विशाल विषयी भडकवले, तेंव्हापासून शमिता- विशाल बॉन्ड संपला आणि विशालचा गेम बिघडलाच.
विशाल खरे तर खूप स्मार्ट प्लेअर होता.
एवढी आग लाऊन मग राकेश मात्रं मेडिकल टर्म वर अचानक बाहेर गेला.
इथे राकेश असं दाखवतोय कि मला विशाल विषयी फार काही माहित्॑च नाही
दिपाली आणि सागर टोळीत सामिल
दिपाली आणि सागर टोळीत सामिल होत आहेत..काय विशेष पाहिलं यांनी टोळीत काय माहीत. दिपाली आधीच आवडत नव्हती. काल सागरही अती करतोय असं वाटलं.जोक्स पण वेगळ्याच लेव्हलचे चालू होते ते नाही आवडलं.एरवी तो मस्त entertain करतो पण भाऊचा धक्का झाल्यापासून जरा डोक्यात हवा गेलीये असं वाटतंय.
आहेच तो..
रूचिता आणि विशाल सतत RB बद्दल बोलत असतात. 'तो आमच्यामुळे दिसला 'असं म्हणतात पण त्यांना त्याच्याशिवाय कोणीच दिसत नाहिये. सोनाली पण अचानक RB बद्दल निगेटिव्ह बोलतेय..RB मस्त डिसेन्ट आहे. कधीच कोणाच्या कागाळ्या करताना दिसत नाही. त्याला अॅक्टिव्ह व्हावं लागेल.
प्राजक्ता आणि करण सगळ्यांशी गोड राहून मस्त decode करतात गेम. हुशार आहेत दोघेही. काल रुचिता विशालला तोंडावर cringe म्हणाली
मी खरेतर बीबॉ बघत नव्हते .
मी खरेतर बीबॉ बघत नव्हते . पण इथली चर्चा वाचून मोह आवरला नाही आणि मी २ दिवसात सगळे एपिसोड्स बघून काढले . तोवर राधा गेली होती . पण ती प्रामाणिक वाटली तिला एक्स्पोजर कमी आहे हे तिने मनमोकळेपणाने मान्य केले .
सोनाली - अजीबात आवडत नाही , मेंगळी, लूज , आळशी , आणि खूप ऍटिट्यूड. माज असल्यासारखी हे करणार नाही , ते करणार नाही , मी अशीच आहे. लवकरच बाहेर जाईल , विकेंड चा वार झाला तेव्हा रितेश नि तिला झापले मला गार गार वाटलं .
तन्वी बद्दल इथे वाचून मी थोडी बायस झाले होते , पण गुलाबी साडीत , पांढऱ्या साडीत अप्रतिम दिसली . तिच्या चेहऱ्यात फार गोडवा आहे आणि पहिल्या आठवड्यानंतर तिचा खेळ थोडा सुधारला सुद्धा आहे .
अनुश्री अजिबात आवडली नाही , मुळात असर्टिव्ह आणि अडामेंट मधला फरक न कळणारे कोणी असेल तर ती ही . अगदी पहिल्या दिवशी सुद्धा बझर वाजवू असं ती म्हणत होती , आणि नंतर बीबॉ नि तिचे कौतुक केले तर किती स्वतःला शहाणी समजत होती .
राकेश बापट , सागर , प्राजक्ता, रोशन , आयुष , सचिन छान वाटतात . शांत संयमी , पॉईंट धरून बोलणारे किंवा अजिबात न बोलणारे . उगीच वचवच करण्यापेक्षा काही जण तोंड बंद करून असतात ते पण ठीकच आहे .
करण मला फार कॅज्युअल वाटला . ज्यात त्यात विनोद . पहिल्या आठवड्यात आला डेंजर झोन मध्ये . बहुधा आपण काहीही केलं तरीही आपले चाहते आपल्याला वाचवतील असा त्याला फाजील आत्मविश्वास असावा .
प्रभू - मला फार फार फार आवडला . तो मागच्या सिझन मधल्या सुरज पेक्षा कितीतरी सुसह्य आहे .
विशाल अजिबात आवडला नाही . सिमिलर प्रकारची बॉडी रोशन ची आहे . पण विशाल पूर्ण नकली वाटतो .
दिव्या शिंदे सुद्धा अशुद्ध बोलते आणि ज्ञान पाजळते तेव्हा डोक्यात जाते . सरकार काय ?
आणि आजकाल शिवाजी महाराज आणि आंबेडकरांचे नाव वापरून फुटेज खाणे फार कॉमन झालेय . ओळख करून देतानाच (माझ्यामते ) स्टेजवर माती खाल्ली तिने )
सागर चुकतोय.. वाईट फसेल टोळीत
सागर चुकतोय.. वाईट फसेल टोळीत जाउन...
रुचिता ने आरडाओरडा जरा कमी केलाय ते बरं वाटतय.. उगीच ओढणीची दोन टोकं हातात धरुन नाचतेय..मला कोणाला फुटेज द्यायचं नाही म्हणत उगीच हसत फिरतेय जिकडे तिकडे,... तिला येडीला वाटतंय की असं करुन आपण चांगले दिसतोय.. पण तसं नाहीये.. अजुनच बावळट दिसतेय...
अनुश्री, विशाल आता या सिझन चे ऑफिशिअल व्हिलन झालेच आहेत..
रोशन ने टोळी सोडावी आता...
दीपाली आणि सागर ची अवस्था ना घर का ना घाट का अशी होणारे लवकरच..
राबा दिव्या ला इतका का सपोर्ट करतोय ? मला अजिबात आवडत नाही ती.. जे काही तावातावानं बोलते त्यात काही फार दम नसतो... नुसतीच हवा...
काल चा टास्क अगदीच दम नसलेला होता.. एकमेकांचे घंटांचे तुकडे फाडायचे किंवा लपवायचे नाहीत हा काय नियम केलाय बिबॉ ने ;-).. मग त्याला बिबॉ कशासाठी म्हणायचं ?
तन्वी काही काही कपड्यात गोड दिसते... काल घेतलेलं कामवाल्या बाईचं बेअरींग मस्त वाटत होतं तिला..मस्त टाईमपास करत होती आणि काम पण केलं तिने.... .कानामागे फुल लावते तेव्हा फार गोड दिसतो तिचा चेहेरा... मात्र सकाळी सकाळी ती टाईट पँट घालुन नाचते ते अगदीच विचित्र दिसतं..तन्वी चांगली खेळली तर शेवटपर्यंत जाईल.. चांगलं फुटेज घेतेय ती...
प्राजक्ता आणि करण फार शार्प आहेत.. कोणाशी पंगा घेत नाहीत.. पण तरी मला आता आवडत नाहियेत ते..
या आठवड्यात सोनाली जायला हवी.. दिसत नाहिये फार.. पण तसं होणार नाही.. ओमकार चा बळी जाईल फुकट...
राबा दिव्या ला इतका का सपोर्ट
राबा दिव्या ला इतका का सपोर्ट करतोय ? मला अजिबात आवडत नाही ती.. जे काही तावातावानं बोलते त्यात काही फार दम नसतो... नुसतीच हवा...
कारण , तिने त्याला सपोर्ट केल होत अनुश्रीविरोधातल्या भाण्डनात. हा हिचा भाऊ कधी झाला? काहीही. दिव्या छान नाचू शकते हे माहित नव्हत. काल प्राजक्ताच्या गाण्यावर एक्सप्रेशन्स मस्त दिलेत तिने. हिला डान्स टास्कमध्ये घ्याव.
एकमेकांचे घंटांचे तुकडे फाडायचे किंवा लपवायचे नाहीत हा काय नियम केलाय - तरीही सागरने तुकडे त्याच्या jacket मध्ये लपवले होतेच.
फायनली सोनाली काल टास्क खेळली.
प्रभु सुद्दा गेम खेळायला लागलाय.
यावेळी ओमकार किव्वा सोनाली जावेत. काहीच करत नाहीत हे!
तन्वी काही काही कपड्यात गोड दिसते... काल घेतलेलं कामवाल्या बाईचं बेअरींग मस्त वाटत होतं तिला..मस्त टाईमपास करत होती आणि काम पण केलं तिने.... .कानामागे फुल लावते तेव्हा फार गोड दिसतो तिचा चेहेरा... मात्र सकाळी सकाळी ती टाईट पँट घालुन नाचते ते अगदीच विचित्र दिसतं..तन्वी चांगली खेळली तर शेवटपर्यंत जाईल.. चांगलं फुटेज घेतेय ती... > अगदी अगदी. बिबॉ हिची आणि आयुषची जोडी तयार करत आहेत. परवा त्याच्यावरुन चिडवल हिला.
तन्वी आणि अनुश्री जुने
तन्वी आणि अनुश्री जुने सीझन्स बघून अभ्यास करून आल्या आहेत पण त्यामुळेच त्यांच्या स्ट्रॅटेजीज ही जुन्या, १ली ड छाप प्रेडिक्टेबल वाटतात. काहीतरी चोरणे. लपवणे, स्वयपाक करणे , अधून मधून कुणासोबत तरी अंगणात नाच, बारीकश्या गोष्टीवरून वाद उकरून काढणे, मग रडणे वगैरे.
तन्वीने साडी नेसणे हेही तान्या मित्तल ने हिंदीत आणलेला ट्रेन्ड आहे म्हणे.
काल ते सेवक टास्क मधे एन्टरटेन्मेन्ट करण्याचा तिचा प्रयत्न अगदीच बालिश होता. पण सो कॉल्ड सिनियर्स ने तेवढाही प्रयत्न केला नाही! काही म्हणजे काहीच कन्टेन्ट देत नाहीत बहुतेक जण.
हो, तानिया मित्तलने दररोज
हो, तानिया मित्तलने दररोज फॅन्सी साड्या नेसून ट्रेन्ड सेट केली होती . लाइक हर ऑर हेट, चर्चा तर असायची तिच्या साड्या आणि ब्लाउजेसची, तिची कॅमेरापुढे साडी नेसायची आणि ब्लाउज बदलायची कॉन्ट्रोव्हर्शिअल रिल्स पण अचानक खूप व्हायरल झाली होती, तिचे बघून मग इतर मुलीही विकेन्डला साड्या नेसायला लागल्या होत्या, ती म्हणायचीही कि तिच्यामुळे हे बदल झालेत
टास्क्स च्या वेळी घालायची अॅथलेटिक वेअर पण एकदा पाण्यात फेकायच्या टास्कला पण मुद्दाम साडीत उभी राहिली आणि मग पाण्यात फेकलं म्हणून इश्यु केला होता , तन्वीही असे काहीतरी इश्युज नक्कीच करणार आहे या सिझनला.. तन्वी ते पर्ल नेकलेस घालते साडीवर ते पण तानियाची स्टाइल होती, ब्लाउजही तानिया सारखेच होते तन्वीचे.
खूप बोरींग चालु आहे हा सिझन, कोणीच आवडत नाहीये, प्रभुच मग थोडी मजा करत असतो.. काल त्याचे 'राणी माझ्या मळ्यामन्दी' व्हर्जन ऐकून हहहपुवा झाली
आज प्रभू भारी खेळला. बोलतही
आज प्रभू भारी खेळला. बोलतही मस्त होता तो. तर काही लोकांनी मुस्कटदाबी सुरू केली. तन्वी छान गाईड करते त्याला.अनुश्री प्रभूला समजावत असताना, बाई गं, आधी स्वतःला समजाव असं झालेलं.प्रभू manipulate होणारा नाही. तो bigg boss चं तर ऐकत नाही. तर बाकीच्यांची काय कथा.
तन्वीचं मात्र ऐकतो तो. काल ती सेवक असून प्रभूच तिची सेवा करत होता. अनुश्री तर सेवक असूनही काम करताना दिसलीच नाही.
सागरला प्रत्येकाच्या भांडणात घुसून आवाज चढवायचा असतो..यावरून त्याची शाळा घ्यायला हवी रितेशने.
तन्वी खूप आवडली आज.. ती बहुतेक चांगलीच आहे. मध्ये पण कोणीतरी बोललं होतं की ती real life मध्ये खूप साधी आहे.पहिल्या आठवड्यात तिने मुद्दाम राडा केला असावा..तेव्हा तिचा आवाज जाम irritating वाटायचा. पण काल तोच आवाज भारी वाटला.गम्मतच आहे.
मेजाॅरिटी लोकांना RB च्या विरोधात ठेवून RB ला sympathy देण्याचा प्रयत्न दिसतोय bb चा.विशाल फक्त बोल बच्चन वाटतोय.फार भित्रा आहे तो. काल तन्वी जाब विचारायला गेली तेव्हा खूप घाबरला होता. रोशनला अडकवून काढता पाय घेतला त्याने.रोशन अज्जिबात आवडत नाहिये.
Entertainment च्या बाबतीत हा सीजन खूप आवडतोय करण,आयुष, सागर, सचिन मस्त Entertain करतात. यावेळी extraa shots नाहियेत का? मला दिसलेच नाहीत.
प्रभु आवडला काल... गेम मधे पण
प्रभु आवडला काल... गेम मधे पण छान डोकं लावुन लपवले तुकडे... आणि रुचिता वर मस्त आवाज चढवला..
सागर उगीच मधे पडला.. त्याचा काही संबंध नसताना.. प्रभु आणी रुचिता चं चाललेलं.. सागर ला जाउन स्वतःवर ओढवुन घ्यायची गरज नव्हती....सागर चा काल राग आला फार...स्वतः ला फार सिनिअर, फेमस वगैरे समजणार्या लोकांना रितेश ने प्लीज समज द्यावी.
बाकी लोकांनी बडबड केलेली चालते.. प्रभु ने नाही करायची हा कोणता नियम आहे ?.. तन्वी बरोबर बोलत होती की त्याला जे हवं ते बोलुद्यात .. का त्याला कंट्रोल करता आहात म्हणुन.. त्यावेळी पण सागर आत आला की माझ्याविरुद्ध त्याला काय भडकवताय बघायला आलोय म्हणुन.. सागर असाच वागला तर उतरेल मनातुन...
प्रभु फार वचवच करतोय असं रुचिता चं काल एक वाक्य होतं ते ऐकुन हसायलाच आलं.. कोण बोलतंय बघा.. हिची वचवच अखंड चालते तेव्हा प्रेक्षक आणि घरतल्या मंडळींचं काय होतं ते तिला कोणीतरी सांगा...
तन्वी चा प्रवास नावडती कडुन आवडती कडे व्हायला लागलाय हळुहळु... टास्क करतेच, स्वत: च्या मतावर ठाम असते, घरात कामं पण करते आणि सगळ्यांसोबत मस्ती मजाक करुन करमणुक पण करते..
दिव्या आणि ओंकार चा काय सीन चालला होता कळलं नाही...
खरच आज प्रभुला अनुश्री सांगत
खरच आज प्रभुला अनुश्री सांगत होती कि आदराने बोल , लाइक सिरीयस्स्ली ? लुक हु इज टॉकिंग !
सागर करान्डे आता फारच् डोक्यात जातोय, दर वेळी स्वतःच्या नसलेल्या मुद्द्यात उगीच आवाज चढवतो.. इन जनरलच प्रभुने आपले मत मांडले कि सगळ्यांना किती खुपतय !
प्रभुला रितेश आणि बिबॉने थोडा अजुन कॉन्फिडन्स द्यायची गरज आहे, उगीच सॉरी म्हणायला लावतात त्याला सगळे , काही गरज नसताना !
मला त्या सागर, करण, आयुश, सचिन यांची सो कॉल्ड एन्टरटेन्मेन्टही फार बोरींग वाटतेय, बास झालं आता शाळेतल्या गॅदरींग टाइप फाल्तुपणा
करण तर काय क्रीपी वागतो, नेलपेन्ट लावणे, मुलींचे टिन्टेड लिपबाम लावतो !
कोणी काही पर्सनॅलिटीज दाखवतच नाहीयेत, सुमार कॉमेडी आणि फेकनेस !
राकेश , विशाल , ओम्कार, रुचीता हे २ टिम्सने दिलेले निवडले प्यादे असताना वेगळेच सेवक कशाला बदलले बिबॉने ?
जरा राकेश आणि विशालला करायला लावायची कि घराची सेवा.. राकेशचे खरे रंग लगेच समोर येतात अशा सिच्युएशन्स मधे !
या सिझनमध्ये टास्क अगदी सुरू
या सिझनमध्ये टास्क अगदी सुरू होतो होतो आणि संपतो.आधीच्या तीन चार सिझन्सचे टास्क किती वेळ चालायचे.
टास्क बघण्यात काही मजाच येत नाही.
काल खरतर कंटेटला केवढा स्कोप दिला होता बिबॉसने.
सेवकांकडून काम करून घ्यायची होती ना.म्हणजे राकेशने अनुश्रीकडून,रुचिताने तन्वीकडून ,विशालने गुडी बाईंकडून,ओमकारने अनुश्रीकडून.कितीतरी स्कोप होता.खरतर तो एकप्रकारचा टास्कच होता बिबॉसचा.पण या लोकांनी फ्लॉप केला.
राकेशने आता नाकासमोरून चालण्याच बेअरिंग सोडाव.भांड ना मनापासून. काल जरा दिपाली बरोबर शाब्दिक चकमक केली ते आवडल.
प्रभू चांगला खेळला.पण तरी नाहीच आवडत आहे.उलट सागरने माती खाल्ल्यामुळे प्रभूलाच सिंपथी मिळाली.
काल रुचिता नेहमीच्या वचवचीत एक वाक्य फक्त करेक्ट बोलली की प्रभू इतरांसारखाच कंटेस्टंट आहे.त्याला काही गोंजारण्याची ,समजावण्याची गरज नाही.
प्रभूला गेम मात्र कळला आहे.हा पुढे धोकादायक ठरु शकतो.
तन्वी थोडी आवडायला लागली आहे पण आयुषबरोबर फार नको राहायला.
रुचिता विशालला बोलून छान समज देते त्याच्याबरोबर राहून.जरा तोंडावर कंट्रोल ठेवला तर जाऊ शकेल पुढे.
अनुश्रीमध्ये पोटेंशियल वाटत आहे पण विशालपासून दूर जायला हव.
अनुश्री आणि रुचितामध्ये बहुतेक विशालमुळे भांडण होईल ,अस वाटत आहे.
सोनालीला ओमकारच्या आधीच काढाव.आणि वाईल्ड कार्डला आणाव .कारण रुचिता,तन्वी ,अनुश्री याच फक्त जर कंटेंट देणार असतील तर आता कंटाळा यायला लागला आहे.
ममां चावडीवर भांडण तरी लावून द्यायचे.
रितेशने पण आता ते कराव.
नाहीतर विश्वासराव आणि प्रतापरावच बघत बसाव लागेल.
सागर टो़ळीमध्ये जाऊन
सागर टो़ळीमध्ये जाऊन निगेटिव्ह झालाय पक्का.
विशाल वुमनायझर आहे. सतत आपला बायकान्मध्ये असतो. रुचिताला किती चिकटत असतो. हा हिन्दी बिबॉमध्ये सुद्दा असाच होता का?
प्रभुने छान गेम खेळला काल.
सागर स्वतःला घराचा वडीलधारा
सागर स्वतःला घराचा वडीलधारा वगैरे समजतो आहे. प्रभूवर आवाज चढवणं सोपंही आहे. असा आवाज त्या अनुश्री, रुचिता, विशालवर चढवा.
त्याचा काहीही संबंध नव्हता काल, रुचिताशी प्रभूचे भांडण होते. तो काही सगळ्यांना बोलत होता असे दिसले तरी नाही.
विशाल खांद्यावर झोपला तर चालते रुचिताला. राकेश ने हात धरून ओढल्यावर मात्र अकांडतांडव. सगळे सोयीने होते तिकडे.
सेवक टास्क सुरू आहे हे लोक विसरून गेले आहेत. मनोरंजन आणि फुटेज ची संधी बहुतेकांनी सोडून दिली आहे. कॅप्टनशिप टास्क पण अगदीच फालतू झाले. बरे झाले कोणीच जिंकले नाही.
करण चे आणि आयुष चे जोक्स महा बोअर होत आहेत. तसेही मला ते सोनावणे वहिनी प्रकरण आधीही फनी वाटले नव्हते. त्यातल्या त्यात आता प्रभूच एन्टरटेन करतो आहे.
सेवक टास्क विशालने किती
सेवक टास्क विशालने किती एन्टरटेनिंग केला होता, तो सैतान आणि काही गुलाम होते , त्याने इतरां आधी स्वतःच्या मित्रांनाच कामाला लावलं होतं , विकासवरच दादागिरी सुरु केली होती


नन्दकिशोरचा डिक्टेटर टास्क तर आयकॉनिक होता, अजुनही सिझन १ इतका ऑरगॅनिक् सिझन नाही आला आणि येणारच नाही
इथे हे बावळट्ट लोक ताई दादा करत बसलेत.. एकानेही सेवकाला छळलं नाही .. तन्वी कामवाली बनली आहे आणि तो रोशन घरगडी असल्या सारखा काम करत सुटलाय
बेकार चालु आहे सिझन ६, आता एक फेब्रुवारी पासून ‘द फिफ्टी‘ शो येतोय, स्विड गेम फॉरमॅट, दरर्रोज डेडली टास्क्स आणि फुल राडा.. बिबी मराठीचा टी आर पी जाणार खाली इथे काही सुधारले नाही तर !
सागरच्या मनात प्रभू साठी
सागरच्या मनात प्रभू साठी चांगल्या भावना आहेत, त्याने माती खाऊ नये म्हणून त्याला बोलला असेल असे वाटते. त्याने त्या २ घाणेरड्या मूर्ख, झोपडपट्टीछाप मुलींना रागावून बोलावे अशी अपेक्षा करणे हास्यास्पद आहे, डुकराशी मस्ती करू नये हे याला नक्की कळतं. विशालला तर पाहूनच डोक्यात सनक जाते. बाकी या चांगल्या लोकांनी एकत्र राहून चांगला गेम दाखवला नाही तर हि डुकरेंच पुढे जातील.
काल टार्गेट टास्क मधे काहीच
काल टार्गेट टास्क मधे काहीच फारसं घडलं नाही. तन्वी चे काही शब्द ऐकु आलेच नाहीत सो तिला नक्की कोणत्या मुद्द्यांवर बोललं गेलं ते नीट कळलं नाही. तन्वी बद्दल विशाल जे काही बोलतो ते आवडलं नाही काल. बिबॉ मधे २४ तास फेक नाही वागता येत त्यामुळे तन्वी प्रत्येक वेळी ठरवुन वागत असेल असं वाटत नाही.
विशाल काल अनुश्री आणि रुचिता ला भिकार्यासारखं करु नका म्हणाला आणि त्या दोघी फारसं काहीच बोलल्या नाहीत. हेच शब्द दुसर्या टीम मधल्या कोणी बोलले असते तर कांड केलं असतं दोघींनी मिळुन. अनुश्री ला घरातली राखी सावंत व्हायचं आहे का ? काम करायचं नाही, वस्तु चोरायच्या, काल पण सगळ्यांसमोर लक्झरी वस्तु घेत होती... आणि तरी समोरची टीम काहीच न करता थंड...
या मुद्द्यांवर खरतर अनुश्री आणि बिबॉ दोघांनाही भांड्ण अपेक्षित होतं पण सज्जन टीम शांतच.... हेच जर उलट असतं तर ? ..फुल राडा झालाच असता.
आज रितेश ला धक्क्यावर बोलायला फार मटेरीअल नाहिचे... हा आठवडा एकदम बोअर होता..
Pages