चित्रपट कसा वाटला १२

Submitted by धनि on 4 August, 2025 - 10:36

२००० झाले पण Lol

मागचा धागा
https://www.maayboli.com/node/86233?page=66#new

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझे आवडते सिक्वेल हे आहेत,

होम अलोन -१-२-३
बेबीज डे आउट -१ & २
स्टुअर्ट लिट्टल - १ & २
द ममी -१ & २
जुरासिक पार्क - १ & २
डाय हार्ड -१ & २

बाकी हिंदी चित्रपटांचे कोणतेही सिक्वेल बघण्यात मजा येत नाही

मला तर द्रुश्यम १ पेक्षा द्रुश्यम २ जास्त भावला होता. अर्थात मी मोहन्बाबुचा पाहिला होता.

मला सिक्वेल नाही आवडत बघायला. बेबीज डे आऊटचा आलेला माहीती नाही. बघायचा प्रयत्न करेन. दृश्यम दोन्ही आवडले मात्र, अर्थात मी अजय देवगणचा बघितला. मोहनबाबू आवडतो पूर्वीपासून पण अजयचा आवडला त्यामुळे मूळ बघायला गेले नाही. अजय आवडतो विजयपथपासून, आधीचा फार नाही आवडत.

डाय हार्ड -१ & २

बाकी हिंदी चित्रपटांचे कोणतेही सिक्वेल बघण्यात मजा येत नाही>>>>

गॉड फादर १-२
बॉर्न फ्रँचायझी (सुप्रीमसी आणि अल्टिमेटम Top notch)

हिंदी मध्ये, वासेपूर चे दोन्ही पार्ट.

संपवले शेवटचे दोन्ही भाग.. आता शांतपणे झोपायला मोकळा Proud
आठवड्याभरात जादू वगैरे खरेच वाटायला लागले Proud

हॅरी पॉटर बघून आपण रूप बदलू शकतो असं वाटतं.
एखाद्या गटगचे फोटो बघताना "अय्या ! ऋत्विक रोशन गटगला आला होता ?" अशा प्रतिक्रिया येऊ शकतात, हा विश्वास हॅरी पॉटरने येतो

एले - तो घोस्टबद्दलचा नागार्जुनाच्या एण्ट्रीपर्यंतचा आख्खा भाग धमाल आहे Happy

वाळवंटात खोकी चढवणे, श्वास घ्यायला बाहेर आलेला तोफेचा भाग, कोलांट्या उड्या संपल्या तरी गोळ्या मारत राहणे >>>> Lol

आता पर्यंत जेव्हढे मेले तेव्हढ्यांसाठी तंबू पण नव्हते >>> Rofl हे खतरनाक निरीक्षण आहे. अवचटांच्या एका लेखात मोर्चा काँग्रेस भवनात गेल्यावर तेथे आमदार की कोणालातरी भेटायला शिष्टमंडळ तयार होते तेव्हा मोर्चापेक्षा शिष्टमंडळात जास्त लोक होते असा उल्लेख होता तो आठवला.

हिरॉइन केवळ तिला स्वतंत्र टीआरपी मिळावा म्हणून नंतर आली का? याच्याबरोबरच का नाही आली? एकदा "सप्प्राइज" म्हणून ओरडून पब्लिकने केक वगैरे खायला सुरूवात केल्यावर पुन्हा कोणीतरी कोचामागून किंवा कपाटातून बाहेर येउन पुन्हा सरप्राइज देण्यासारखे आहे हे. मुळात आतून गोळ्या मारू शकत होते तर बाहेर आलेच कशाला. हीरोने ओढणी घेतलीच आहे तर ठेवायची तशीच. प्रेक्षकांना त्यांचा हीरो आला हे कळायला हवे ठीक आहे, अरबांना कशाला कळायला हवे.

अशा पिक्चरला स्वतंत्र धागाच पाहिजे. नेफिवर इकडे आहे का बघायला पाहिजे. तेलुगू इण्डस्ट्रीत हीरोला वेगळे विशेषण लावणे वगैरे अजून चालूच दिसते.

धुरंधर बघायला घेतला. सध्या सलग एक तासाच्यावर घरी मोठा स्क्रीन म्हणजे टीव्ही, लॅपटॉप बघता येत नाही. पण तेवढा वेळ वाट बघायची गरज पडली नाही. रहमान डकैत निवडणुकीत उभा राहतो तिथ पर्यंत पहिला आणि कंटाळा येऊन ब्रेक घेतला. ( ऑन सेकंड थॉट्स तो पर्यन्त एक तास झाला होता का ते आता लक्षात नाही.).
सुरवतीच - कंधार मधले विमान त्यात जाणारे जसवन्त सिंह आणि डोवाल, डायलॉग आणि अभिनय, डोवालनी भारतमाता की .... चा नारा देणे आणि मागे उभा असलेल्या अतिरेक्याने पिस्तुल रोखली असणे (आधीच डोवाल की जसवन्त सिंग बंदूक से बात नही होगी असे स्पष्टच केले असताना परत त्या अतिरेक्याला टोकलं नाही) सगळं फार अनइम्प्रेसिव्ह पद्धतीने मांडली आहे. (कंधारबद्दलची एक वेबसिरीज आहे ती पाहुन तरी जरा चांगल्या पद्धतीने एवढं दाखवता आले असते असे वाटले.)
पुढे ना तो कारवा की तलाश है च नूतनीकरण चांगलं आहे. यावरून आलेल्या मिम्स पाहता यात कुठून आलासबद्दलची साशंकतेने चौकशी आहे कुणीतरी त्यात पकडला जातो आणि आपला हिरो मात्र पास होतो असं काही असेल असं वाटलं होतं पण तसं काही नाही.
आपल्याकडे आता जसं लाल सिग्नलला थांबणं ऑप्शनल झालाय ज्यांना थांबायचं आहे त्यांनी थांबावं बाकीच्यांनी खुशाल भुर्रकन निघुन जावं तसं या चित्रपटात अभिनयाबद्दल आहे. ज्यांना वाटते त्यांनी करा ज्यांना नाही करायची त्यांनी खुशाल मख्ख चेहरा ठेवावा, मध्येच वाटलं तर जरा अभिनय केल्या सारखे करावी अशी सूट दिली आहे. त्यात बाबू डकैत, सफरचंद खात मारामारी - हल्ला करणारा त्याच एक गुंड, सिलिंडर्सचा स्फोट हात पाय बांधुन ठेवलेला एक अशा अगदीच मोजक्या पात्रांनी आम्ही अभिनय करणार असे ठरवले आहे, जमील या पात्राने कॅज्युअली जमेल तसा करणार ठरवले आहे, बाकींच्यानी आम्ही नाही करणार असे ठरवले आहे. पण चुकून रणवीर सिंग एक दोनदा साजेसे एक्सप्रेशन देतो. अक्षय खन्ना एन्ट्री करताना इम्प्रेसिव्ह वाटतो विनोद खन्ना आलाय असा भास होतो. पुढे त्यानेही एकच एक्सप्रेशन ठेवून काम करण्याचे ठरवले आहे. आता पर्यंत बघितला तेवढा इम्प्रेसिव्ह वाटला नाही, ग्रिप आली नाही.
आज/उद्या पुढचा भाग बघेन, पुढे ग्रिप आली तर पूर्ण बघेन.

सफरचंद खात मारामारी - हल्ला करणारा त्याच एक गुंड, सिलिंडर्सचा स्फोट हात पाय बांधुन ठेवलेला एक >>> ते दोघेही एकच आहेत हो.

आपल्याकडे आता जसं लाल सिग्नलला थांबणं ऑप्शनल झालाय ज्यांना थांबायचं आहे त्यांनी थांबावं बाकीच्यांनी खुशाल भुर्रकन निघुन जावं तसं या चित्रपटात अभिनयाबद्दल आहे. ज्यांना वाटते त्यांनी करा ज्यांना नाही करायची त्यांनी खुशाल मख्ख चेहरा ठेवावा, मध्येच वाटलं तर जरा अभिनय केल्या सारखे करावी अशी सूट दिली आहे.
>>>> पटलं नाही पण हसायला आलं

मानव फारच honest आणि फटकळ रिव्ह्यू लिहीलायत .
मी सुद्धा ऐकून ऐकून बायस झाले होते धुरंधर बद्दल . (प्रपोगंडा आहे म्हणून )
पण मेकिंग चांगलं आहे सिनेमाचं , आणि मला वैयक्तिक बॅकग्राउंड म्युझिक आणि गाण्याचं रिकार्नेशन फार उत्तम पद्धतीने झालंय असं वाटतं .

मोर्चापेक्षा शिष्टमंडळात जास्त लोक होते असा उल्लेख >> Lol

सप्प्राइज" म्हणून ओरडून पब्लिकने केक वगैरे खायला सुरूवात केल्यावर पुन्हा कोणीतरी कोचामागून किंवा कपाटातून बाहेर येउन पुन्हा सरप्राइज देण्यासारखे आहे हे. >>>> Rofl सटीक आहै.

अरबांना कशाला कळायला हवे.>> Rofl

स्वतंत्र धागा म्हणजे किमान एकदा तरी पूर्ण बघायला लागेल. Lol

धन्यवाद फारएण्ड. Happy

या दोन आठवड्यात द पार्टी (वेव्ह्स), तितली (नेफ्लि), सर्वम माया (जिओ) पाहिले.

द पार्टी आवडला. आता सत्तरीत पोचलेले किंवा वर गेलेले कलाकार तेव्हा तरुण होते इतका जुना चित्रपट आहे. त्यामुळे अर्थातच त्यात आलेले काही विषय आज अतिपरिचयामुळे तितकेसे शॉकिंग वाटत नाही;काही प्रश्न आजही प्रश्न म्हणुनच उभे आहेत हे पाहुन दु:ख होते. त्यातला एक नावाजलेला व गौरवलेला लेखक जेव्हा म्हणतो की आज गौरवलेले माझे शब्द अजुन काही वर्षांनंतर तुम्ही परत वाचाल तेव्हा त्यातुन भसाभसा भुस्सा बाहेर पडताना तुम्हाला दिसेल. हे माझे काही लेखकाम्बाबत झालेय Sad तेव्हा जे उत्तुंग वाटले होते ते आज हातात घ्यावेसेही वाटत नाही. आदिवासी, जंगल व सरकारी भुमिका ह्या प्रश्नावर तेव्हाही लोक मरत होते, आजही मरताहेत. मग तेव्हा जे मेले ते वेडे म्हणायचे का? का उगीच मेले अशा प्रश्नांसाठी ज्यांना उत्तरेच नाहीय??

सर्वम माया हलकाफुलका आहे. छान वाटला. त्यातले एक वाक्य आवडले, पटले, अनुकरणीय वाटले. पुर्ण नास्तिक माणुस उदरनिर्वाहासाठी पौरोहित्याचा व्यवसाय पत्करतो. नास्तिकाने हे का करावे? त्याचा विश्वास नाही तर त्याने सांगितलेल्या पुजेला काय अर्थ? ह्या प्रश्नावर तो उत्तर देतो की पौरोहित्य हा माझा पोटापाण्याचा व्यवसाय आहे आणि आपला जो काही व्यवसाय आहे तो पुर्ण सचोटीने श्रद्धापुर्वक मन लाऊन करावा हे माझे मत आहे. मी नास्तिक आहे हा मुद्दा इथे गैरलागु आहे.

तितली चित्रपटाची भानगड कळलीच नाही. त्या भावांचा नक्की व्यवसाय काय हे कळले नाही. गाडी चोरायचा व्यवसाय आहे म्हटले तर अशी गाडी आजच्या दिवसात घेणार कोण विकत?? आणि गाडीतल्या माणसांना लुटायचा आहे म्हटले तर मग शोरुममधुन टेस्ट ड्राईवसाठी गाडी आणुन त्यातल्या सेल्समॅनला लुटुन मिळणार कितीसे? त्याचा मोबाईल व खिशात काही कॅश असेल तितकेच.. आणि तितलीचे लग्न लावुन देताना जे कारण बोलले गेले त्याचा उपयोग केलाच नाही. फक्त तिला एकदा कार शोरुममध्ये पाठवले तेवढेच. शेवट तितलीचे मन बदलते दाखवले तेही फारसे पटत नाही. पात्रयोजना मात्र अगदी योग्य आहे. तितलीची बायको रात अकेली है मध्ये होती. तिला अजुन कामे मिळायला हवीत.

Pages