Submitted by कृष्णा on 13 October, 2025 - 07:56
जुना धागा २००० पार होऊ लागला म्हणून हा नविन धागा.
इथे जुना धागा आहे...
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
जुना धागा २००० पार होऊ लागला म्हणून हा नविन धागा.
इथे जुना धागा आहे...
“ आपल्या गोलंदाजीला धार काढणं
“ आपल्या गोलंदाजीला धार काढणं खूपच निकडीचं वाटतं” - +१ ‘आठव्या नंबरपर्यंत बॅटिंग‘ थियरीमुळे बॉलिंगची धार कमी होते असं मला वाटतं. इतरही कारणं आहेत/असतील. पण आठव्या नंबरपर्यंत बॅटिंग हवी ह्या भुमिकेमुळे ९, १० आणि ११ ह्या तीनच जागा स्पेशलिस्ट बॉलर्ससाठी उरतात, ज्यात संगीतखुर्ची सुरू होते आणि कुणालाच स्वतःचं स्थान पक्कं करता येत नाही.
बोकलत, जसा एक मराठी माणूस
बोकलत, जसा एक मराठी माणूस दुसऱ्या मराठी माणसाचे पाय खेचतो तसेच एक मुंबई इंडियन्स दुसऱ्या मुंबई इंडियन्सवर जळतो.
सूर्याने आधी रोहित शर्माचा पत्ता कट केला आणि स्वतः कर्णधार झाला.
बुमराहला तुम्ही म्हणतात असे दुय्यम वागणूक देतो आणि खेळवत नाही.
हार्दिक पांड्याला पावरप्ले मध्ये ओव्हर देतो आणि चांगली टाकल्यास पुन्हा गोलंदाजी देत नाही.
त्याला फलंदाजी येऊ नये याची काळजी घ्यायला म्हणून काल स्वतःच बाद न होता खेळला.
तिलक वर्माला तर स्पर्धेच्याच बाहेर केले
8 फलंदाजांबद्दल माझे सुद्धा
8 फलंदाजांबद्दल माझे सुद्धा हेच मत आहे. त्याची तितकी गरज नाही.
वरुण कुलदीप बुमराह अर्शदीप या चौकडीत दुर्दैवाने एकालाही भरवशाची फटकेबाजी करता येत नाही. त्यामुळे आर्षदीप जाऊन राणा संघात येऊ शकतो.
पण पहिले सात फलंदाज सध्या ज्या फॉर्म मध्ये दिसत आहे ते पाहता आपण चार चांगले गोलंदाज खेळवू शकतो.
फक्त संजू मध्ये सातत्य नाही. पण ईशान किशन आल्याने आपण त्याच्या जागी श्रेयस आणू शकतो हा पर्याय आहे. ज्याने मिडल ऑर्डरला भरवशाचा प्लेअर भेटेल.
आठव्या फलंदाजाचा फायदा खरे तर इतकाच होतो की फलंदाजी डेप्थ आहे असा विचार बॅक ऑफ द माईंड असल्याने पुढचे बिनधास्त मारू शकतात.
पण हार्दिक पांड्या आणि रिंकू सिंग हे त्यांच्या रोल मध्ये बेस्ट आहेत हा विश्वास बाळगून पुढच्यानी बिनधास्त खेळायला हरकत नाही.
जर गोलंदाजी विकेटटेकिंग असेल तर थोड्या धावा कमी झाल्या तरी आपण सामन्यात राहू हा विश्वास फलंदाजांना मिळतो.
मला असा संघ बघायला आवडेल,
अभिषेक
ईशान
सूर्या
अय्यर
दुबे
पांड्या
रिंकू
कुलदीप
वरून चक्रवर्ती
अर्षदीप सिंग
जसप्रीत बुमराह
*...ज्यात संगीतखुर्ची सुरू
*...ज्यात संगीतखुर्ची सुरू होते आणि कुणालाच स्वतःचं स्थान पक्कं करता येत नाही.* - +१ !
हर्षित राणाने कॉनवेला या
हर्षित राणाने कॉनवेला या दौऱ्यात ५ पैकी ५ वेळा बाद केले.
काल सहज जिंकलो !
काल सहज जिंकलो !
काल कुलदिपच्या पहिल्याच ओव्हरमध्ये त्याला जो मार पडला, त्यावरून त्याची गोलंदाजी आता सर्वांस माहितीची झाली असावी असं वाटतं. गोलंदाजीत नावीन्य व गूढता आणण्यासाठी त्याने आत्ताच धडपड केली पाहिजे, हे नक्की. तो गुणी व मेहनती आहे ह्यात वाद नाही.
‘आठव्या नंबरपर्यंत बॅटिंग‘
‘आठव्या नंबरपर्यंत बॅटिंग‘ थियरीमुळे बॉलिंगची धार कमी होते असं मला वाटतं. इतरही कारणं आहेत/असतील. पण आठव्या नंबरपर्यंत बॅटिंग हवी ह्या भुमिकेमुळे >> किमान येत्या कपमधे तरी ह्यात बदल होणे अशक्य वाटते. वर्ल्ड कप पर्यंत बदलेल कि नाही हे सांगणे कठीण आहे. त्यात वन डे टीम मधे पहिले चार जण बॉलिंग करत नाही त्यामूळे तिथे जास्त कसरत करावी लागते आहे.
रच्याकाने अभिशेक शर्माचा सध्याचा फॉर्म बघता त्याला वन डे मधे न खेळवणे ह्यासारखे नुकसान नसावे.
काल कुलदिपच्या पहिल्याच
काल कुलदिपच्या पहिल्याच ओव्हरमध्ये त्याला जो मार पडला, त्यावरून त्याची गोलंदाजी आता सर्वांस माहितीची झाली असावी असं वाटतं. >> किवीज स्वीप अतिशय झकास वापरत आहेत कुलदीपच काय इतर फिरकी समोरही.
“ काल कुलदिपच्या पहिल्याच
“ काल कुलदिपच्या पहिल्याच ओव्हरमध्ये त्याला जो मार पडला, त्यावरून त्याची गोलंदाजी आता सर्वांस माहितीची झाली असावी असं वाटतं.” - असामीने स्विपविषयी लिहिलंच आहे. त्याच बरोबरीनं बिश्नोई, सुंदर, वरूण हे जसे मनगटाचा फारसा वापर न करता, वेगाने बॉल टाकतात तसा कुलदीप टाकत नाही. त्यामुळे दवाचा परिणाम त्याच्या बॉलिंगवर लवकर जाणवतो असं वाटतं.
*त्यामुळे दवाचा परिणाम
*त्यामुळे दवाचा परिणाम त्याच्या बॉलिंगवर लवकर जाणवतो असं वाटतं.* ही शक्यता जास्त आहे कारण वर उल्लेखिलेल्या कुलादीपच्या पहिल्या ओव्हर मध्ये पाहिलं चेंडू सरळ सिक्सर होती व नंतरही स्वीप शॉट बहुतेक नव्हते !
मला वाटते वर्ल्ड कप च्या आधी
मला वाटते वर्ल्ड कप च्या आधी पासून विशेषतः इंग्लंडचा आक्रमक खेळण्याचा ईफेक्ट बघून वेस्ट इंडीजच्या टी २० कपपासून आपण सुरूवातीपासून आक्रमक खेळण्याचा पवित्रा घेतला. अजून तरी तो वर्क आऊट होत आला आहे. अर्थात इथे रिक्स फॅ़टर कमी करण्यासाठी बॅटींग डेप्थ असणे जरुरी आहे. पहिले आठ जण बॅटींग करू शकतात असे असण्याची गरज त्यातून निर्माण झाली आहे. परत टी २० मधे पार्ट टाईम बॉलर्स वापरून एखाद दोन ओव्हर्स कव्हर करणे जास्त सोपे आहे म्हणून टी २० मधे हे नक्कीच खपते आहे. वन डे किंवा टेस्ट मधे (देवा रे विचार पण करवत नाही) पाच प्रॉपर बॉलर्स नसणॅ जास्त नडण्याची शक्यता अधिक आहे.
आपण 2022 वर्ल्डकप पासून
आपण 2022 वर्ल्डकप पासून अप्रोच बदलाचा ढोल पिटत होतो जेव्हा शर्मा कर्णधार झाला. पण दुर्दैवाने म्हणा किंवा ते नुसतेच तोंडी बच्चन असल्याने आणि त्यानुसार तयारी नसल्याने किंवा त्यानुसार संघ निवड नसल्याने म्हणा ते प्रत्यक्षात कुठे दिसलेच नाही.
नंतर रोहीत शर्माने वन डे मध्ये उचलायला सुरुवात केली. 2023 वर्ल्डकप मध्ये बॅटिंगपीच असल्याने ते दिसले आणि इफेक्टिव सुद्धा ठरले.
मग ट्वेंटी वर्ल्डकप मध्येही राहुल गिल अश्या खेळाडूंना नारळ देत दुबेला स्थान दिले. पंतला तिसऱ्यावर ट्राय केले. तिथे काही खेळपट्ट्या गोलंदाजीला मदत करणाऱ्या होत्या तरी जिथे संधी मिळाली तिथे आपण अप्रोच सोडला नाही. ऑस्ट्रेलियादेखील त्याच तडाख्यात गेली.
नंतर रोहीत कोहली जडेजा निवृत्त झाल्यावर एका गिलला काय ते ट्राय केले पण गेम प्लान क्लिअर असल्याने त्याला सुद्धा वगळण्यात आपण काचकूच केली नाही. आणि हा निर्णय एकूणच संघाचे मनोबल वाढवणारा ठरणार आहे. कारण त्यामुळे क्लॅरिटी येते. नाहीतर बोलायचे वेगळे आणि करायचे वेगळे असे झाल्यास संभ्रम तयार होतात.
पाकिस्तान world cup
पाकिस्तान world cup सहभागाबद्दल शुक्रवारी किंवा सोमवारी निर्णय घेणार आहे. विचाराधीन असणाऱ्या बऱ्याच पर्यायांमध्ये एक पर्याय भारताविरुद्धची मॅच boycott करणे हा आहे असे आत्ताच वाचले. पाकिस्तान असे करू शकेल का? जर त्यांनी असे केले तर भारत, ICC, इतर देश, आणि broadcasters ची reaction kay असेल?
भारताविरुद्धची मॅच boycott
भारताविरुद्धची मॅच boycott करणे >> मग यु-१९ मधली मॅच पण boycott करणार का ?
“ यु-१९ मधली मॅच पण boycott
“ यु-१९ मधली मॅच पण boycott करणार का ?” - त्या मॅचला काही ग्लॅमर नाहीये रे.
*“ यु-१९ मधली मॅच पण boycott
*“ यु-१९ मधली मॅच पण boycott करणार का ?* -
मुलींची मॅचही boycot करणार का ?
आता प्रिंसिपल म्हणून करायचे
आता प्रिंसिपल म्हणून करायचे तर भारतासारखे करण्यापेक्षा सगळेच करायला हवे ना ?
आजची मॅच बघून आठ बॅटसमनचा अट्टाहास का ह्याचे उत्तर अधोरेखित झाले असे समजायचे का ? सूर्या फॉर्ममधे आला तर संजूवरचे प्रश्नचिन्ह कायम राहतेय. उद्या तिलक परत आला कि किशन कि संजू हा प्रश्न गंभीर नि आगरकरला डोके फोडायला लावणार आहे. फॉर्म वर किशन ला बाहेर ठेवता येत नाहि नि डावे-उजवे काँबॉप्रेम संजूला बाहेर ठेवू देत नाहि.
संजू ला आणखी एक मॅच मिळेल
संजू ला आणखी एक मॅच मिळेल बहुदा - वर्ल्डकपचं काँबिनेशन ठरण्याआधी.
आज सहाच फलंदाज का खेळवले
आज सहाच फलंदाज का खेळवले समजले नाही
किशन गेला तिथे अय्यर यायला हवा होता. पण त्याला ती संधी दिली नाही. राजकारण होतेय का त्याच्याशी नेहमीसारखे
"आज सहाच फलंदाज का खेळवले
"आज सहाच फलंदाज का खेळवले समजले नाही" - दव असल्यामुळे एक बॉलर एक्स्ट्रॉ खेळवला होता.
शेवटचे असे फक्त सहा
शेवटचे असे फक्त सहा फलंदाजवाली टीम कधी खेळवली हे आठवत नाही.
या आधी कधी दव नव्हते अशातला भाग नाही.
आधीच आपल्या नेहमीच्या गेम प्लॅन पेक्षा एक फलंदाज कमी होता. त्यात अजून एक उडवला. आणि आहे त्यातही संजू तीन सामने फेल होता.
जसा आपला फलंदाजीचा अॅप्रोच असतो तो कायम राखायला आठवा फलंदाज जिथे हवासा वाटतो तिथे यांनी उलटा अजून एक कमी केला.
उद्या वर्ल्डकपच्या एखाद्या सामन्यात दव आहे म्हणून सहा फलंदाज असलेला संघ कधीच खेळवणार नाहीत.
मग जो आपला गेम प्लॅनच नाहीये असा संघ का निवडायचा? जे जे आपले संभाव्य गेम प्लॅन आहेत तेच चाचपायला हवे होते ना.
एखाद्या गोलंदाजाला किंवा खेळाडूला
*जे जे आपले संभाव्य गेम प्लॅन
*जे जे आपले संभाव्य गेम प्लॅन आहेत तेच चाचपायला हवे होते ना.* - मालिका जिंकल्यात जमा आहे म्हणून कदाचित संघाच्या निवडीपेक्षा ( combination ) व्यक्तिगत निवडीसाठी प्रयोग करण्यावर लक्ष केंद्रित करत असावेत. अर्थात, हा एक अंदाज.
तेच योग्य नाही वाटले.
तेच योग्य नाही वाटले.
सेटअप तसाच ठेवून ज्यांना सराव संधी द्यायची ती द्यायला हवी होती.
कॉम्बिनेशन बदलले की खेळाडूची भूमिका बदलते, माइंडसेट बदलते. बॉलिंग चेंज करताना हेच कर्णधारासोबत होते.
नवीन काहीतरी चाचपण्याच्या नादात ज्याची घडी बसली आहे ते विस्कटू नये.
त्या नादात सामना सुद्धा हरलो हे देखील चुकीचे झाले.
जर सातत्याने जिंकत आहोत तर जिंकतच राहावे.
हा खेळ बेभरवशाच्या आहे आणि आपण हरू सुद्धा शकतो हा विचारच मनात नाही आला पाहिजे. आपल्याच नाही तर समोरच्या संघाच्या मनात सुद्धा हा विचार नाही आला पाहिजे. शेवटी विजयी मानसिकताच विजयाला खेचते.
शेवटच्या सामन्यात असे प्रयोग न करता विनिंग momentum घेऊन वर्ल्डकप स्पर्धेत जातील अशी आशा.
*कॉम्बिनेशन बदलले की खेळाडूची
*कॉम्बिनेशन बदलले की खेळाडूची भूमिका बदलते,* -
प्रयोग करताना टी 20 मध्ये तरी फलंदाजीचा क्रमांक बदलला तर फलंदाजाला फारसा फरक पडतो , असं निदान मला तरी वाटत नाहीं. टी 20 मध्ये फलंदाजांची भूमिका इतर फॉरमॅट सारखी फारशी क्रमांकनिष्ठ नसते, असं मला वाटतं. प्रत्येक चेंडूवर कमाल धांवा मिळवण्याचा प्रयत्न व क्षमता , हा तिथल्या फलंदाजीचा एकमेव गुरुमंत्र असावा.
कदाचित संघाच्या निवडीपेक्षा (
कदाचित संघाच्या निवडीपेक्षा ( combination ) व्यक्तिगत निवडीसाठी प्रयोग करण्यावर लक्ष केंद्रित करत असावेत. अर्थात, हा एक अंदाज. >> सूर्याने सांगितले कि हा प्रयोग मुद्दम केला होता. जर १८० ते २०० चेस करायचे असतील नि फक्त ६-७ फलंडाज असतील तर कसे हँडल करायचे ह्याची चाचणी होती.
अय्यर ह्या टी २० च्या एक्स्टेंडॅड टीममधे नाहिये माझ्या मते त्यामूळे त्याला सिलेक्ट केले नसावे किशनच्या जागी.
टी 20 मध्ये फलंदाजांची भूमिका इतर फॉरमॅट सारखी फारशी क्रमांकनिष्ठ नसते, असं मला वाटतं. >> मी अर्धवट अनुमोदन देईन. सलामीचा फलंदाज एकदम फिनिशर म्हणून खेळणे किंवा उलट जाणे सोपे नसावे. पण एखाद दुसरा नंबर वर खाली केल्याने मॅनेजेबल परीणाम होत असावा. काल रिंकू च्या जागी दुबेला पाठवतील असे मला वाटले होते. दुबे पेक्षा रिंकू जास्ती खात्रीचा फिनिशर आहे नि दुबे इनिंग बिल्ड करून अॅटॅक करण्यामधे अनुभवी खेळाडू आहे. पण दुबेला खाली ठेवल्याने उद्या जर क्लॅश झाला तर रिंकू बाहेर जाईल असा सिग्नल दिलाय असे वाटते.
*मी अर्धवट अनुमोदन देईन. * -
*मी अर्धवट अनुमोदन देईन. * - पूर्ण अनुमोदन अपेक्षितही नाही, कारण, " टी 20 मध्ये फलंदाजांची भूमिका इतर फॉरमॅट सारखी फारशी क्रमांकनिष्ठ नसते " असं म्हटलंय मी, अजिबातच नसते असं नाही !
प्रयोग करताना टी 20 मध्ये तरी
प्रयोग करताना टी 20 मध्ये तरी फलंदाजीचा क्रमांक बदलला तर फलंदाजाला फारसा फरक पडतो , असं निदान मला तरी वाटत नाहीं.
>>>>
फरक तर नक्की पडतो. त्यामुळे मी तर जोरदार असहमत आहे
काल रिंकू तिसऱ्या ओव्हरला फलंदाजीला आला आणि हार्दिक सातव्या ओव्हरला आला तिथेच अंदाज आला की इथून एखादी ब्रिलियंट खेळीच जिंकवू शकते, नॉर्मल गेम प्लान नाही.
कारण मुळात काल नुसते फलंदाजीचा क्रमांक बदलल्याने रोल बदलले नव्हते तर फलंदाजीतील डेप्थ कमी झाल्याने त्या नंबर वर जी भूमिका बजावायची असते त्यातही फरक पडला होता.
जसे तुम्ही म्हणालात की <<< प्रत्येक चेंडूवर कमाल धांवा मिळवण्याचा प्रयत्न >>> हा प्रयत्न मॅच सिच्युएशन नुसार बदलतो. नाहीतर ते क्रिकेट कसले. तो बुक क्रिकेट सारखा ब्रेनलेस खेळ झाला
ऋन्मेऽऽषजी, वरील पोस्टमधील
ऋन्मेऽऽषजी, वरील पोस्टमधील इतर मुद्दे ' मतभेद ' म्हणून मान्य आहेत पण, " नाहीतर ते क्रिकेट कसले. तो बुक क्रिकेट सारखा ब्रेनलेस खेळ झाला " हे मात्र चांगल्या चर्चेच्या व्याख्येत अजिबात बसत नाहीं. मी " प्रयत्न व क्षमता म्हटलंय व त्याचा अर्थ स्पष्ट आहे की कमाल धांवा करण्यासाठी फिटनेस, अपारंपारिक फटके मारण्याचा सराव, नकारात्मक गोलंदाजीवर मात करून धांवा करण्याची मानसिकता व तंत्र इ. गोष्टी जोपासणं हा टी 20 फलंदाजीचा गुरुमंत्र असावा. ओव्हरमध्ये 12 च्या वर धांवगती ठेवण्याची क्षमता बाळगणं व उठसूठ 100 चं लक्ष्य असलं तरी ७-८ ओव्हरमध्येच ते गाठण्याचा बिनडोकपणा करणं यात खूप फरक आहे व तो तुम्हालाही कळतो आहे. कृपया चुकीच्या पद्धतीने चर्चा करू नका .
कृपया चुकीच्या पद्धतीने चर्चा
कृपया चुकीच्या पद्धतीने चर्चा करू नका. >> क्षमस्व. बहुधा माझ्या वाक्याचा काही वेगळा अर्थ जात असावा.
पण बेसिक मुद्दा हाच की ट्वेंटी फॉरमॅट मध्ये देखील एखाद्या फलंदाजांचा फलंदाजीचा क्रमांक आणि एकूण बॅटिंग डेप्थ बदलली की फार मोठा फरक पडतो.
*बहुधा माझ्या वाक्याचा काही
*बहुधा माझ्या वाक्याचा काही वेगळा अर्थ जात असावा * मला तरी जाणवला, इतकंच. पूर्णविराम !
*पण बेसिक मुद्दा हाच की ट्वेंटी...* हा बेसिक मुद्दा प्रामाणिक मतभेद म्हणून मान्य आहेच.
Pages