Submitted by आशुचँप on 25 March, 2025 - 12:02

आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.
हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे
या आधीच्या ग्ंमती जमती इथे वाचता येतील
२. https://www.maayboli.com/node/82073
१. https://www.maayboli.com/node/77227
==================================================================
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सिंबा एकदम खतरनाक दिसतोय.
सिंबा एकदम खतरनाक दिसतोय. मस्त व्हिडिओ काढलाय.
सिंबा भारी दिसतोय. बिचारा
सिंबा भारी दिसतोय. बिचारा ट्रीटसाठी गॉगल सहन करतोय.
कसे आहेत सगळे?
कसे आहेत सगळे?

माउईला मधे चेरी आय झाला होता. म्हणजे डॉग्ज ना जी तिसरी आयलिड असते ती आतमधे असते ती याची जरा बाहेर आली आणि मग ड्राय होऊन स्वेलिंग झाले. ते डोळ्याच्या कोपर्यात लाल फोड आल्यासारखे दिसते म्हणून चेरी आय! वेट म्हणे एक छोटी प्रोसिजर करावी लागेल ज्याने ते ती आत टक इन करतात. चेरी आय होण्याची जेनेटिक टेन्डन्सी असते म्हणे, ती शॉर्ट नाके असणार्या ब्रीड्स मधे असते. माउई ला कॅवेलियर बाबाकडून आले ते!!
छोटी प्रोसिजर असली तरी डोळ्याची प्रोसिजर म्हणजे आम्ही धास्तावलोच होतो. आणि प्रोसिजर पेक्षा आफ्टर केअर भयंकर असा प्रकार! १५ दिवस कोन, दर ३ तासाला दोन वेगवेगळे आय ड्रॉप्स डोळ्यात घालणे!! इमॅजिन, कुत्र्याला धरून डोळ्यात ड्रॉप टाकणे म्हणजे काय दिव्य असेल! औषध घालायची तयारी करायला लागलं की त्याला बरोबर समजायचं, मग ऐन वेळी रिफ्लेक्स अॅक्शन ने झटकेच मारायचा मानेला! की औषध पडलं भलतीकडे!
त्यात डोक्टर म्हणाली की १५ दिवस अजिबात धावाधाव, मस्ती , खेळणे नाही. ते टाके नाजूक असल्यामुळे स्नॅप होऊ शकतात! झालं का, म्हणजे हे तर ड्रॉप टाकण्याची कुस्तीमधेही होऊ शकत होतं!! त्यासाठी मदत म्हणून त्याला झोप येणारी पेन किलर्स दिली होती. त्याची सगळी खेळणी लपवून ठेवली होती. तरी औषधाचा असर उतरला की त्याचा खेळण्याचा हट्ट सुरु! सगळं अवघड झालं होतं
आता या आठवड्यातच कोन निघाला , त्यामुळे गडी खूष आहे आता. तरी अजून मस्ती जपूनच करा म्हणालेत ! हा पहा बिफोर आणि आफ्टर फोटो.
आई ग्ग!!! आय होप ही
आई ग्ग!!!
आय होप ही रिकव्हर्स सून.
माऊईला लवकर बरे वाटू दे.
माऊईला लवकर बरे वाटू दे.
दोन महिन्यांपूर्वी कोकोला ग्रूमिंग करताना ग्रूमरकडून कानाच्या वर चांगलीच मोठी जखम झाली. टाके घालायला लागले होते. १० दिवस कोन, अँटीबयोटीक्स वगैरे सगळे सोपस्कार झाले. आता बरी आहे.
अरे बाप रे! ग्रूमर कडून इतकी
अरे बाप रे! ग्रूमर कडून इतकी मोठी जखम झाली ?!
आता बरी आहे ते छान , पण आता दुसरा/री ग्रूमर शोधणे आले ना?
हा ग्रूमरपण मोबाईल ग्रूमर
हा ग्रूमरपण मोबाईल ग्रूमर होता. तिला अँक्झायटी होते फार म्हणून घरीच बोलवलं होतं तर हे असं. आता घरीच केस कापण्याचा प्रयोग करणार आहे.
घरी केसं कापणं एकदम सोप आहे.
घरी केसं कापणं एकदम सोप आहे. ट्राय करुन बघ. मी हे वापरते
https://www.kohls.com/product/prd-6626852/wahl-pet-clipper-kit.jsp?skuid...
एकदा ग्रूमर कडे traumatize करुन झाल्यावर हेच वापरायच ठरवलं.
हो का? मी एक मागवलंय
हो का? मी एक मागवलंय अमेझॉनवरून. आता ते वापरून बघते नाही तर हे. पण सोपं आहे हे वाचून जीव जरा भांड्यात पडला.
अरे बिच्चारा माऊई
अरे बिच्चारा माऊई
समजू शकतो टोटल किती सहन केला असेल त्याने आणि तुम्हीही
बरा झालाय हे वाचून एकदम छान वाटलं
ओडिनकडून गेट वेल सून माव्या
सगळे फरी बच्चा पार्टी, लवकर
सगळे फरी बच्चा पार्टी, लवकर बरे व्हा रे..
तुम्ही बरे नसला की खूप जास्त काळजी वाटते आणि वाईट पण वाटते..
माऊइ, कोको तुम्हाला खूप खूप warm hug....
(हे मराठीत लिहिणे मलाच ऑड वाटते की काय ??)
रॅम्बोचा 1ला वाढदिवस 24
रॅम्बोचा 1ला वाढदिवस 24 डिसेंबरला झाला. पोस्ट करायला विसरून गेलो. माउई, कोको गेट वेल सून.
कसला भारी हिरो rambo...
कसला भारी हिरो rambo...
हॅप्पी बर्थडे...
त्याच्या चेहऱ्यावर भाव असे आहेत की तुम्ही त्याला खायला द्यायचं विसरलात किंवा तुम्ही त्याला बाहेर जाऊ दिले नाही
@अस्मिता - कोकोनटचा कान बरा
@अस्मिता - कोकोनटचा कान बरा होवो लवकरच
रँबो फारच देखणा आहे.
रँबो फारच देखणा आहे. + 1
रँबो फारच देखणा आहे. + 1
हॅप्पी बड्डे रँबो 🎂 🎉 🎊
माऊई कोकोनट ला लवकर बरं वाटो..
हे आमचं थंडीनं गारठलेलं डबोलकं बारक्या उर्फ गुलब्या उर्फ गुलाब

याला सकाळी सकाळी आमच्या चादरीत घुसून बसायचं असतं . नंतर त्यातच झोपायचं असतं.
रँबो ला बिलेटेड हॅपी बड्डे!!
रँबो ला बिलेटेड हॅपी बड्डे!! देखणं बाळ. गुलाब पण गोंडस दिसतोय
गुलाब भारी लहानगं माऊ दिसतय
गुलाब भारी लहानगं माऊ दिसतय
माऊईला आणी कोकोला लवकर बरे
माऊईला आणी कोकोला लवकर बरे वाटू दे.

सिंबाच्या नाकाखाली अचानक एक फोड दिसतोय, व्हेटने आठवड्याची औषधं दिली आहेत, पण जर फोड बसला नाही तर ट्युमरची शक्यता वर्तवली आहे त्यामुळे आम्ही सगळेच टेंशन मधे आहोत.
माऊईला आणी कोकोला लवकर बरे
माऊईला आणी कोकोला लवकर बरे वाटू दे....+१.
गुलब्या मस्त आहे.
सिंबाचा फोड साधा असू दे.
सिंबा ला बरे वाटू देत काळजी
सिंबा ला बरे वाटू देत
काळजी करु नका, साधासा फोड असेल.
धुरधर सिम्बाचा स्वॅग भारिच!
धुरधर सिम्बाचा स्वॅग भारिच!
रॅम्बोला हॅपि बर्थडे ! एकदम मॉडेल बॉय आहे, गुलाब गोन्डस!
माउई, कोकोला गेट वेल सुन आणि बिग हग
सिम्बाचा फोड साधाच असणार..
बरेच अपडेट आले.
बरेच अपडेट आले.
काही नाही होणार सिंबाला... डोंट वरी
माऊई - अवघड रे बाबा ती नंतरची काळजी! गुड टू नो यु आर बेटर नाऊ!
रँबो हॅपी बर्थडे!
चादरीतला गुलाब
आज जवळपास दिड आठवड्यांच्या
आज जवळपास दिड आठवड्यांच्या गोळ्यांचा डोस घेतल्यावर सिंबाला आलेला फोड कमी व्हायला सुरूवात झाली. व्हेटने सांगीतले की आता काळजीचे कारण नाही. तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छांबद्दल धन्यवाद. मुख्य म्हणजे त्याला काहीही त्रास होत नाहीये, दंगामस्ती जोरदार सुरू झाली आहे परत.
सगळ्या भुभु बाळांना बरं वाटो.
सगळ्या भुभु बाळांना बरं वाटो. हरितात्या, अरे व्वा. बरं झालं. आपल्याला करमत नाही ते मलूल दिसले की.

रॅम्बो हिरो आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा.
मी आणि माझं भुरं कुत्रं हिवाळा - हिवाळा खेळतोय. शेजारणीने तिच्या रिट्रिव्हरचे जॅकेट दिले होते, ते मिरवायला. थंडी विशेष नाही पण मलाच पकडून घालावे वाटले. नाही तर मिरवणार कसं आणि कुठं. हे सगळं फॅशन साठी चाललं आहे.
हरी तात्या मस्त बातमी दिलीत.
हरी तात्या मस्त बातमी दिलीत.
कोकोनट चे एकदम फॅशनेबल सन बेदिंग
गुड टू नो हरीतात्या!
गुड टू नो हरीतात्या!
कोकोनटला बुटं नाही घातली का? माझ्या कम्युनिटीत एक बारकंसं पिल्लू आहे त्याला बुट घालून नेत होते त्याचे बाबा परवाच्या स्नो मधे. फार क्यूट सीन!
सॅमीला बर्फात बाहेर जायला
सॅमीला बर्फात बाहेर जायला अज्जिबात आवडत नाही. इथे बसून बघत बसते मग.
https://youtube.com/shorts/psSVJexAyKU?feature=shared
मला पण पूर्वी मोह झाला होता
सिंबाला बरे वाटले ते छान झाले ! कोकोनट स्वेटर घालून मस्त दिसत आहे.

ट्रीट वगैरे ट्राय केले तरी कसा तरी रांगत जाऊन ट्रीट तेवढी खातो आणि मग पुन्हा ठोंब्या!
मला पण पूर्वी मोह झाला होता त्या बुटांचा! असे वाटले की किती छान होईल, स्नो चा त्रास नाही, पाय खराब होणार नाहीत, ट्रेन करता येईल बूट घालून चालायला. हाय काय अन नाय काय. पण कसले काय , माउई बंदच पडतो, हलतच नाही जागेवरचा ते बूट घातले तर. तरी बळेच पकडून फोटो शूट करायचा प्रयत्न केला परवा स्नो मधे
फोटो बघून लक्षात येईल की जसा ठेवलाय तसाच तिथेच उभा राहतो बूट घातले की
गोड फोटो आहेत माऊईची. एकदम
गोड फोटो आहेत माऊईची. एकदम किसेबल.
त्या शूज, सॉक्सने ते झॉम्बीज सारखे चालायला लागतात. आम्ही उन्हाळ्यात ट्राय केले होते.
हरितात्या, छान बातमी.
हरितात्या, छान बातमी.
कोकोनट गोड दिसतोय.
सॅमी एकदम शांत, विरक्त वाटतेय.
माऊई confused दिसतोय. Ekdam soft toy.
Pages