भुभु आणि माऊ बाळांच्या गंमती जमती ३

Submitted by आशुचँप on 25 March, 2025 - 12:02

bhubhumau.jpg

आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.

हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे

या आधीच्या ग्ंमती जमती इथे वाचता येतील

२. https://www.maayboli.com/node/82073

१. https://www.maayboli.com/node/77227

==================================================================

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओडिन बाळाचा 6 वा आणि दादू चा 18 वा वाढदिवस

नेहमीच्या प्रमाणे दंगामस्ती, धुमाकूळ, ओडिन ला नवं harness घेतलं, दिसतो एकदम रुबाबदार त्यात

भरपूर लाड करून घेतले

ओडिन आणि त्याच्या दादूला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
ओडिन ची पोज मस्त.
सॅमी गोड दिसतेय स्वेटर मध्ये. स्वेटर (फ्रॉक) छान आहे ,बरा घालून दिला ,आमचे बोके अंगावर काहीच घालू देत नाहीत.

धन्यवाद सगळ्यांना मुलीतर्फे! थोडावेळ साठी घालून घेतला होता. पण फारशी काही आवड वगैरे नाही कपड्यांची.

ओडू ला वादिहाशु!! Happy

Happy Birthday to both of your boys Happy
आमचे बोके अंगावर काहीच घालू देत नाहीत. >>same here. रॅम्बो पण काहीही घालून देत नाही

अरे व्वा... १३ मेसेज या धाग्यावर..
दिल गार्डन गार्डन हो गया..

सॅमी आणि तिचा ड्रेस एकदम भारी..
तिचे भाव लगेच वाचता येत आहेत Happy

Odin आणि त्याच्या दादाला खूप शुभेच्छा..
पोरं पटपट मोठी होत आहेत..

Rambo चा fav स्पॉट मला पण आवडला..

स्नोइ आणि मिनी मजेत आहेत.
थंडी वाढलीय चिंचवडला, त्यामुळे त्या बेडवर बेडशीट खाली जाऊन बसतात.. त्यामुळे बेडवर बसताना आम्हांला नीट बघून बसावे लागते Happy Happy

ओडिन ला अणि दादाला हॅप्पी बड्डे !! नविन हार्नेस घालून पोलिस डॉग वाट्त आहे Happy
बेडवर बेडशीट खाली जाऊन बसतात.. >> हाहा Happy

सर्व फोटो मस्त.
धनवन्ती Lol
ओडीन आणि दादुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
कोकोनटचा पण नुकताच तिसरा वाढदिवस झाला. त्याला गादी आणली, दिवसा लोळायला वेगळी. दिवाळीला बॉल आणला.
IMG-20251026-WA0001.jpg
नवीन गादीवर राजाबाबू.
IMG-20251208-WA0000.jpg
ख्रिसमस डेकोरेशन , आवडलं नाही विशेष.
IMG-20251208-WA0002.jpg

भोचकपणा करताना, मांडी घालून बसतो.

त्यामुळे बेडवर बसताना आम्हांला नीट बघून बसावे लागते Lol

कोकोनट ला पण वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा .
त्याची गादी मस्त आणि पोजही .
खूप दिवसांनी कोकोनट दिसला आणि तुही. चिकवावर तुझ्या रिव्ह्युज ची वाट बघत होते

कोकोनटचे फोटो बघूनच त्याचे खूप लाड लाड करावेसे वाटतात...
शेवटचा फोटो स्कूल बस ची वाट बघताना आहे असे वाटले Happy

त्यामुळे बेडवर बसताना आम्हांला नीट बघून बसावे लागते .... Lol

कोकोनटला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा!

थॅंक्यू सर्वांना. Happy
शेवटचा फोटो स्कूल बस ची वाट बघताना आहे असे वाटले
>>>> हे फारच क्यूट आहे. Happy तुझ्या माऊ जशा गादीवर गुडूप होतात, तसा कोकोनट सोफ्याखाली असतो आणि पाहून पाय ठेवावा लागतो. मी उगाच आपण लहान मुलांना बोलतो तसं " अरे व्वा, मस्तच म ऊ म ऊ उशी आणली आहे बुवा," म्हणून कणीक तिंबल्यासारखे करते.
सिमरन /\ Happy

सध्या ईकडे चांगलीच थंडी पडली आहे. हिवाळा सिंबाचा आवडता सिजन, काल -११ तापमान होतं आणी हा मस्त बाहेर बसून गार वार्याचा आनंद घेत होता.

काल एका मिनी गेटटुगेदरला डिजेच्या ऑस्करची भेट झाली ..कसल शहाण बाळ आहे.. एक्दम गोडगोड लोकरिचा गुन्डाच आहे,खुप म्हणजे खुपच फ्रेन्ड्ली आहे तो.पहिल्यादा भेटलोय अस वाटतच नाही त्याला भेटल्यावर..एकदम खुशित येवुन छान ओळख असल्यासारखी झेप घेतली,मस्त मान्डीवर येवुन बसला, डोक ठेवुन झोपला.
डिजे इज ब्लेस्ड टु हॅव सच क्युट फरबेबी !
इथले भुभु बाळ मला एक दिवस पेट पॅरेन्ट गटात नेवुन सोडणार आहेत.

Pages