न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी. २३ जानेवारी २०१०

Submitted by अनिलभाई on 1 December, 2009 - 13:07

न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी. २३ जानेवारी २०१०

ए.वे.ए.ठी. ला न येण्याची कारणे लिहायला हक्काची जागा.
मग कधी करायचा ए.वे.ए.ठी.
(एकाच वेळी एकाच ठिकाणी) जमणे.
खालील न येण्याची कारणे स्वाती आंबोळे ह्यानी गोळा केली आहेत. व बाकी मायबोलीकरानी त्यात भर टाकली आहे. वाहुन जावु नये म्हणुन येथे देत आहे.

१. घरी पाहुणे येणार आहेत
२. मुलांचा काही कार्यक्रम (गेम / बर्थडे पार्टी / क्लास) आधीच ठरलेला आहे
३. ए.वे.ए.ठि.ची जागा माझ्या घरापासून लांब आहे
४. ज्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ए.वे.ए.ठि. होणार त्यांचं तिकीट फार महाग आहे
5. मला कोणी आमंत्रण दिलं नाही
६. मला आमंत्रण दिलं
७. मला लाडू करता येत नाहीत
८. मला लाडू खायची परवानगी नाही
९. मला लाडू आवडत नाहीत
१०. मी देवळाबिवळात जात नाही
११. छ्या! बागेत कसलं भेटायचं!!
१२. त्या दिवशी स्नो आहे म्हणे
१३. त्या दिवशी पाऊस आहे म्हणे
१४. माझ्याकडे मायबोली टीशर्ट नाही
१५. माझ्याकडचा मायबोली टीशर्ट मला घालवत नाही
१६. भाईंच्या दाढीची भिती वाटते बुवा!
१७. झक्का उथळ आणि पांचट बोलतात
१८. सगळेच उथळ आणि पांचट बोलतात
१९. ऍडमिन येणार असतील तर मी येईन
२०. अमुकतमुक येणार असतील तर मी येईन
२१. अमुकतमुक येणार नसतील तरच मी येईन
२२. अपेंडिक्स, टॉन्सिल्स काढण्याचं ऑपरेशन आणि (एंडो, एक्झो का स्टेथो)स्कोपी त्याच दिवशी आहे.
२३ (अ). मराठी लिहिता येतं पण वाचता येत नाही
२३ (ब). मराठी बोलता येतं पण समजत नाही
२३ (क). वरील दोन्ही
२४. त्या दरम्यान मी देशात मज्जा करायला जाणार आहे.
२५. नवरा/सासु/सासरा/आई/वडील्/बहीण/भाऊ/नणंद/दिर परगावी जाणार आहे.
२६. त्या(च) दिवशी महत्वाचे रिलीज आहे/ऑफिसमधे काम आहे.

ए.वे.ए.ठी चा पत्ता.
४३ -४५ फ्रॅन्कलिन ड्राइव्ह
प्लेन्सबरो, एन जे ०८५३६

भेटायची वेळ : २३ जानेवारी २०१० सकाळी ११.३०

वृत्तांत ह्या पानापासुन पुढे. http://www.maayboli.com/node/12363?page=20
विनय देसाई ह्याचा वृत्तांत. आता गाजले की बारा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मैत्रेयीच्या घराकडे जायला जो एक्झिट आहे तो रँप फार राउंडन्राउंड आहे बर्का. आधीच स्नो होणार त्यात तुम्ही तिथे कडमडणार. जरा जपून एक्झिट घ्या Wink

नको त्या वेळी नको त्या ठिकाणी गेलं की त्याला कडमडणार म्हणतात ना? मग त्याअर्थानी जे घरी राहतील ते खरं तर घरी कडमडणार असं म्हणायला हरकत नाही.

लक्षात ठेवा: ए. वे. ए. ठि. ची जागा, हॅरी पॉटरच्या पुस्तकातल्या ऑर्डर ऑफ फिनिक्स चे घर जसे बाहेरून सगळ्यांना दिसत नाही, तसे आहे. एक गुप्त वाट आहे तिथे जायला.

एक गुप्त वात आहे तिथे जायला.>> हे वात काय आहे?. कसा शोधायचा?. झाडु वर बसुन याव लागेल का? Happy

मी घरी नाही हापिसात कडमडणार आहे. वेदर खराब असेल तर आदल्यादिवशीच हाटेलात मुक्कामाची सोय करणार आहेत लांबुन येणार्‍यांची. तसे झाले तर मी इंस्टंट माहेरी कडमडेन.

Lol गुप्त वाट कसली आलीय हो झक्की. सगळे तर पोहोचले गेल्या वेळी. काही लोक तर माझ्याही आधी तिथे पोहोचलेले होते !! फोन वर विचारत दोन तीनदा चकरा मारून मग एकदाचे आलेले तुम्हीच फक्त. हे रंपा आधीच प्राशन करून आले असणार असे कुणीसं कुणालासं म्हटलं पण तेव्हा Proud

माझ्या जीपीएस वर ह्या हॉलचा पत्ता एक्झॅक्ट दाखवत नाही. तेव्हा मी भल्या सकाळीच निघायला हवं.
नुसत्या गप्पा मारण्यापेक्शा मेन्यू लिहा लोकांनो.

हो निघ. मी अगदी नाहीच पोचले हॉलवर तर वाटेत कुठल्यातरी एक्झिटला थांबून खायला माझ्याकडे मसालेभात आणि रायता तरी असेल. Proud

थंडी आहे त्या दिवशी, तर मसालेभाताबरोबर जाईल असं गरम गरम टोमॅटोच नारळाच दूध घालून सार किंवा गरम गरम कढी ठेवावी असं सुचवावसं वाटलं.

आर्च, गरम कढी मला आलेली कालच डोक्यात पण ती तिथवर न्यायची तर पातेल्यात न्यावी लागेल जर तिथे गॅस मिळणार असेल तर. म्हणजे गरम करता येईल. नाहीतर गार झालेली कढी कोण पिणार? (निदान मी तरी नाहीच नाही)

सायो तू थंड कढी दुधाच्या कॅन मध्ये आणू शकतेस, त्या हॉल मध्ये मायक्रोवेव्ह आहे ग, म्हणजे मागच्या वेळी होता .

ह्म्म.... कुणाकडे कँपिंगवाला वगैरे गॅस आहे का? तो आणता आला, तिथे लावता आला तर गरम कढीची मज्जा द्विगुणीत होईल.

MT कडे आहे त्याचा मागच्या दोन्ही गटगला उपयोग करण्यात आला होता, ग्लुवाइन साठी आणि (थोडावेळ) बटाटेवडे तळण्यासाठी.
MT मला क्षमा कर तुझे भांडे फोडल्याबद्दल. Proud

MT मला क्षमा कर तुझे भांडे फोडल्याबद्दल <<< आता तुला ते नवीन आणून द्यायला लागेल.. नुसती क्षमा मागून चालणार नाही... (इथे भरून द्यावे लागेल असेही म्हणता आले असते, पण मग तिने पाणी भरून दिले असते)... Happy

भाई AMP आहे का? Microphone आणि स्पिकर्स आहेत. (Mixer पण) पण Pre-Amp/AMP बिघडलाय. वैद्यबुवाना गाणे म्हणावे वाटले तर... Happy

मग रुनी , तू न मी शेअर करु ग्लुवाईन आणि कढी गरम करण्यात. अशाने लहान मुलांना कृतीतून शेअरींगचा धडा ही मिळेल. Wink

कँपिंग स्टोव्ह आणू शकेन मी, आणि गरम करायला भांडी पण.
सायो, जीपिएस वर ४३-४५ सापडणार नाही. एक तर ४१ फ्रँकलिन तरी नाहीतर ४७ तरी शोधा. सापडेल. कारण ते कम्युनिटीचं क्लबहाउस आहे. ४१ आणि ४७ या दोन घरांच्या मधे त्याचा ड्राइव्हवे, पार्किंग आहे. त्याला स्व्तंत्र पत्ता /मेलबॉक्स नाही.

Pages