न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी. २३ जानेवारी २०१०

Submitted by अनिलभाई on 1 December, 2009 - 13:07

न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी. २३ जानेवारी २०१०

ए.वे.ए.ठी. ला न येण्याची कारणे लिहायला हक्काची जागा.
मग कधी करायचा ए.वे.ए.ठी.
(एकाच वेळी एकाच ठिकाणी) जमणे.
खालील न येण्याची कारणे स्वाती आंबोळे ह्यानी गोळा केली आहेत. व बाकी मायबोलीकरानी त्यात भर टाकली आहे. वाहुन जावु नये म्हणुन येथे देत आहे.

१. घरी पाहुणे येणार आहेत
२. मुलांचा काही कार्यक्रम (गेम / बर्थडे पार्टी / क्लास) आधीच ठरलेला आहे
३. ए.वे.ए.ठि.ची जागा माझ्या घरापासून लांब आहे
४. ज्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ए.वे.ए.ठि. होणार त्यांचं तिकीट फार महाग आहे
5. मला कोणी आमंत्रण दिलं नाही
६. मला आमंत्रण दिलं
७. मला लाडू करता येत नाहीत
८. मला लाडू खायची परवानगी नाही
९. मला लाडू आवडत नाहीत
१०. मी देवळाबिवळात जात नाही
११. छ्या! बागेत कसलं भेटायचं!!
१२. त्या दिवशी स्नो आहे म्हणे
१३. त्या दिवशी पाऊस आहे म्हणे
१४. माझ्याकडे मायबोली टीशर्ट नाही
१५. माझ्याकडचा मायबोली टीशर्ट मला घालवत नाही
१६. भाईंच्या दाढीची भिती वाटते बुवा!
१७. झक्का उथळ आणि पांचट बोलतात
१८. सगळेच उथळ आणि पांचट बोलतात
१९. ऍडमिन येणार असतील तर मी येईन
२०. अमुकतमुक येणार असतील तर मी येईन
२१. अमुकतमुक येणार नसतील तरच मी येईन
२२. अपेंडिक्स, टॉन्सिल्स काढण्याचं ऑपरेशन आणि (एंडो, एक्झो का स्टेथो)स्कोपी त्याच दिवशी आहे.
२३ (अ). मराठी लिहिता येतं पण वाचता येत नाही
२३ (ब). मराठी बोलता येतं पण समजत नाही
२३ (क). वरील दोन्ही
२४. त्या दरम्यान मी देशात मज्जा करायला जाणार आहे.
२५. नवरा/सासु/सासरा/आई/वडील्/बहीण/भाऊ/नणंद/दिर परगावी जाणार आहे.
२६. त्या(च) दिवशी महत्वाचे रिलीज आहे/ऑफिसमधे काम आहे.

ए.वे.ए.ठी चा पत्ता.
४३ -४५ फ्रॅन्कलिन ड्राइव्ह
प्लेन्सबरो, एन जे ०८५३६

भेटायची वेळ : २३ जानेवारी २०१० सकाळी ११.३०

वृत्तांत ह्या पानापासुन पुढे. http://www.maayboli.com/node/12363?page=20
विनय देसाई ह्याचा वृत्तांत. आता गाजले की बारा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

०१)अनिलभाई
०२)फचिन
०३)स्वाती_आंबोळे
०४)परदेसाई (पापलेट आमटी)
०५)झक्की - रंपा
०६)मृण्मयी - गाळा
०७)मैत्रेयी
०८)वैद्यबुवा - २ मोठे, १ लहान, नॉन व्हेज करी (चिकन), पोळ्या
०९)अमृता - २ मोठे, १ लहान (दही वडे)
१०)सायो- १ - मसालेभात आणि भाजी.
११)चमन - राजमलाई
१२)रूनी पॉटर - २ मोठे (ग्लु वाईन) + गोड पदार्थ
१३) विकु
१४) स्वाती
१५)माधुरी.. आय मीन.. अर्चना दिक्षीत (अ‍ॅना)

स्वाति, (आंबोळे नव्हे, डेलावेअरच्या) आजपासून दररोज बा. रा. चा बा.फ. नीट वाचत जा. सर्व लोकांना ओळखण्याचा खेळ तुम्हाला खेळायचा आहे.

हो. गेल्या वेळेसारखी कोण कोणास म्हणाले वाली प्रश्नपत्रिकाही मिळेल. विजेत्याला माबो-लिकर.
अ‍ॅना, हे तुझ्याकरता सुद्धा.

रुनि, ग्लू वाईनसाठी कोणती वाईन लागते? सांगून ठेवा. किती बाटल्या? कोणते कोणते फळांचे रस?
कुणाला डायेट सोडा? कुणाला नेहेमीचा? बीअरवाले किती? वाईनवाले?

अहो एकच महिना राहिला आता!!

मी आणते सगळे ग्लु वाईनच सामान, मला फक्त स्टॉव्ह + भांडे लागेल मागच्यावेळेसारखे. ती मैत्रेयी आणि निराकार मला ओरडणार काय काय मागत असते ही म्हणून.
तसच मी एक गोड पदार्थ पण आणीन.

रुनी, ती स्टोवचं मराठीतलं स्पेलींग बघुन निळी पडलीय बहुतेक.
असो, तु कुठला गोड पदार्थ आणणार आहेस ते गुलदस्त्यात का म्हणुन ठेवतेस? राजमलाई बरोबर डबल धमाका म्हणुन केळकरांची एतिहासीक बोरकुट पावडर आणणार आहेस की काय?

अहो वैद्य
बोरकुट - चमन फचिनसोबत मागवतोय ना.
मी नुसते गोड पदार्थ लिहीलय कारण जो मला करायला जमेल तो आणणार आहे. नाही जमला तर ऐन वेळी विकत मिळेल ते म्हणून नुसतच गोड पदार्थ Happy

ग्लू वाईनची रेसिपी योजाटा ना रुनी. तसंही तू सगळ्यांना प्रात्यक्षिक दाखवतेस म्हणजे ती आता सिक्रेट रेसिपी उरलेली नाही Happy

हायला.. मजा आहे राव..

महिनो महिने आधी जीटी़जीला काय खायचं, शिजवायचं ह्याच्या चर्चा.. प्रत्यक्ष जीटीजी ला दंगा आणि जीटीजीनंतर व्यक्तिगणिक आंखो देखा 'हाल'..

(स्वगत) सिनेमे जलन आंखो मे तुफानसा क्यूं है.. Uhoh
- (डायपरमय) उपास

चला आता नववर्षाच्या मुहुर्तावर मेनू ची खमंग चर्चा सुरु करू या Happy आधीच ज्यांनी ठरवलं आहे त्यांनी वरची लिस्ट अपडेट करत जा म्हणजे डुप्लिकेट भेळ वगैरेसारखे गोंधळ होणार नाहीत !

मारा मारा टोमणे मारा! वर्ष झालं त्या गोष्टीला पण आजुन डुप्लिकेट भेळ आहेच. तरी मी वेळेत बदलला होता माझ्या मेनु मध्ये Sad .

संपुर्ण लिस्ट पुढे आणा रे..

०१)अनिलभाई
०२)फचिन
०३)स्वाती_आंबोळे
०४)परदेसाई (पापलेट आमटी)
०५)झक्की - रंपा
०६)मृण्मयी - गाळा
०७)मैत्रेयी
०८)वैद्यबुवा - २ मोठे, १ लहान, नॉन व्हेज करी (चिकन), पोळ्या
०९)अमृता - २ मोठे, १ लहान (दही वडे)
१०)सायो- १ - मसालेभात आणि भाजी.
११)चमन - राजमलाई
१२)रूनी पॉटर - २ मोठे (ग्लु वाईन) + गोड पदार्थ
१३) विकु
१४) स्वाती
१५) अर्चना दिक्षीत (अ‍ॅना)
१६) सागर + १

अरे हे काय, अमृता काय फक्त दोन मोठे आणि एक लहान असे तीनच दहिवडे आणणार?
ठीक आहे. आहेत बाकीचे पदार्थ.

अनिलभाई, मी लाडवांबद्द्ल नवर्याला सांगीतले तर तो खो खो हसायला लागला. त्यामुळे ते राहुदेत मी मला त्यातल्यात्यात बरा जमणारा पदार्थच आणते. लाडवांची प्रॅक्टीस करुन ते पुढच्या ए.वे.ए.ठी ला Happy

तर मी काय आणु मला कोणी सुचवेल का? मी शाकाहारी, मांसाहारी पेकी काहीही आणायला तयार आहे.
मांसाहारी मध्ये चिकन किंवा मटण करी किंवा बिर्यानी किंवा कोळंबीचे काहीतरी पदार्थ किंवा अपेटायजर्स मधले काहीतरी
नाहीतर शाकाहारी मध्ये पावभाजी किंवा रगडा पॅटीस पेकी काहीतरी सुचतय.

माझा प्रेफरन्स मांसाहारी प्रकारातले काहीतरी आणायला आहे. पण तेच असे काही नाही. मला कोणी काय आणावे ते सुचवेल का?

अरे आमच्यासारख्या शाकाहारी लोकांची चिंता करा कोणी तरी :). बर वरच्या येणार्‍यांच्या यादीत कोण शाकाहारी, कोण मासांहारी ते पण लिहूयात म्हणजे पदार्थ किती आणायचा ते कळेल.

हे घे लगेच लिहिल...

०१)अनिलभाई
०२)फचिन
०३)स्वाती_आंबोळे
०४)परदेसाई (पापलेट आमटी)
०५)झक्की - रंपा
०६)मृण्मयी - गाळा
०७)मैत्रेयी
०८)वैद्यबुवा - २ मोठे, १ लहान, नॉन व्हेज करी (चिकन), पोळ्या
०९)अमृता - २ मोठे, १ लहान (दही वडे), २ शाकाहारी, १ दोन्ही Wink
१०)सायो- १ - मसालेभात आणि भाजी.
११)चमन - राजमलाई
१२)रूनी पॉटर - २ मोठे (ग्लु वाईन) + गोड पदार्थ
१३) विकु
१४) स्वाती
१५) अर्चना दिक्षीत (अ‍ॅना)
१६) सागर + १

ठीक आहे मी कोळंबीचेच आणते काहीतरी करी प्रकारातले. Happy

०१)अनिलभाई
०२)फचिन
०३)स्वाती_आंबोळे
०४)परदेसाई (पापलेट आमटी)
०५)झक्की - रंपा
०६)मृण्मयी - गाळा
०७)मैत्रेयी
०८)वैद्यबुवा - २ मोठे, १ लहान, नॉन व्हेज करी (चिकन), पोळ्या
०९)अमृता - २ मोठे, १ लहान (दही वडे), २ शाकाहारी, १ दोन्ही
१०)सायो- १ - मसालेभात आणि भाजी.
११)चमन - राजमलाई
१२)रूनी पॉटर - २ मोठे (ग्लु वाईन) + गोड पदार्थ
१३) विकु
१४) स्वाती + १
१५) अर्चना दिक्षीत (अ‍ॅना)
१६) सागर + १

स्वाती स्वतःच्या नावापुढे शाकाहारी, मांसाहारी कोण लिहीणार? Happy
०१)अनिलभाई
०२)फचिन
०३)स्वाती_आंबोळे
०४)परदेसाई (पापलेट आमटी)
०५)झक्की - रंपा
०७)मैत्रेयी
०८)वैद्यबुवा - २ मोठे, १ लहान, नॉन व्हेज करी (चिकन), पोळ्या
०९)अमृता - २ मोठे, १ लहान (दही वडे), २ शाकाहारी, १ दोन्ही
१०)सायो- १ - मसालेभात आणि भाजी.
११)चमन - राजमलाई
१२)रूनी पॉटर - २ मोठे (१ शाकाहारी, १ मिश्रहारी) - ग्लु वाईन + गोड पदार्थ
१३) विकु
१४) स्वाती + १
१५) अर्चना दिक्षीत (अ‍ॅना)
१५) सागर + १

०६) मृण्मयी गाळलय.
आतापर्यंत येणारे एकुण मोठे - १९, लहान २

Pages